मनित्यManitya
तुकाराम गाथा · page 15 of 16

अभंग ४२०१–४५००

Abhangas 4201–4500 (the Gāthā is numbered 1–4,583), in the original Marathi, with the Gāthā's own section headings — as transcribed on Marathi Wikisource, whose base edition is not named. The refrain (ध्रु.) is set in a warmer colour. One font error is not yet repaired: where you see इप, read ई (होइप = होई).

↵

संसार करिती मोठ्या महत्वानें । दिसे लोका उणें न कळे त्या ॥१॥

पवित्रपण आपुलें घरच्यासी च दिसे । बाहेर उदास निंदिताती ॥ध्रु.॥

आपणा कळेना आपले अवगुण । पुढिलाचे दोषगुण वाखाणिती ॥२॥

विषयाचे ध्यासें जग बांधियेलें । ह्मणोनि लागले जन्ममृत्यु ॥३॥

तुका ह्मणे माझें संचित चि असें । देवाजीचें पिसे सहजगुण ॥४॥

गव्हाराचें ज्ञान अवघा रजोगुण । सुखवासी होऊन विषय भोगी ॥१॥

त्यासी ज्ञानउपदेश केला । संगेंविण त्याला राहावेना ॥२॥

तुका ह्मणे संग उत्तम असावा । याविण उपावा काय सांगों ॥३॥

भाग्यालागी लांचावले । देवधर्म ते राहिले ॥१॥

कथे जातां अळसे मन । प्रपंचाचें मोटें ज्ञान ॥ध्रु.॥

अखंडप्रीति जाया । नेणे भजनाच्या ठाया ॥२॥

कथाकीर्त्तन धनाचें । सर्वकाळ विषयीं नाचे ॥३॥

तुका ह्मणे पंढरिराया । ऐसे जन्मविले वांयां ॥४॥

पतिव्रतेची कीर्ती वाखाणितां । सिंदळईच्या माथां तिडिक उठे ॥२॥

आमुचें तें आहे सहज बोलणें । नाहीं विचारून केलें कोणीं ॥ध्रु.॥

अंगें उणें त्याच्या बैसे टाळक्यांत । तेणें ठिणग्या बहुत गाळीतसे ॥२॥

तुका ह्मणे आह्मी काय करणें त्यासी । ढका खवंदासी लागतसे ॥३॥

आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाहीं ऐसा मनीं अनुभवावा ॥१॥

आवडी आवडी किळवराकिळवरी । वरिली अंतरी ताळी पडे ॥ध्रु.॥

अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडूं मागे तुटी हर्षयोगें ॥२॥

तुका ह्मणे एकें कळतें दुसरें । बरियानें बरें आहाचाचें आहाच ॥३॥

हे चि माझे चित्तीं । राहो भावप्रीति । विठ्ठल सुषुप्ती। जागृति स्वप्नासी ॥१॥

आणिक नाहीं तुज मागणें । राज्यचाड संपित्त धन । जिव्हे सुख तेणें । घेतां देहीं नाम तुझें ॥ध्रु॥

तुझें रूप सर्वाठायीं । देखें ऐसें प्रेम देइप । न ठेवावा ठायीं । अनुभव चित्ताचा ॥२॥

जन्ममरणाचा बाध । समुळूनि तुटे कंद । लागो हा चि छंद। हरि गोविंद वाचेसी ॥३॥

काय पालटे दरुषणें । अवघें कोंदाटे चैतन्य । जीवशिवा खंडण । होय ते रे चिंतितां ॥४॥

तुका ह्मणे या चि भावें । आह्मीं धालों तुझ्या नामें । सुखें होत जन्म । भलते याती भलतैसीं ॥५॥

मौन कां धरिलें विश्वाच्या जीवना । उत्तर वचना देइप माझ्या ॥१॥

तूं माझें संचित तूं चि पूर्वपुण्य । तूं माझें प्राचीन पांडुरंगा ॥ध्रु.॥

तूं माझें सत्कर्म तूं माझा स्वधर्म । तूं चि नित्यनेम नारायणा ॥२॥

कृपावचनाची वाट पाहातसें । करुणा वोरसें बोल कांहीं ॥३॥

तुका म्हणे प्रेमळाच्या प्रियोत्तमा । बोल सर्वोत्तमा मजसवें ॥४॥

काय करूं आतां धरुनियां भीड । निःशंक हें तोंड वाजविलें ॥१॥

नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ॥ध्रु.॥

आलें तें उत्तर बोलें स्वामीसवें । धीट नीट जीवें होऊनियां ॥२॥

तुका ह्मणे मना समर्थासीं गांठी । घालावी हे मांडी थापटूनि ॥३॥

माझिया तो जीवें घेतला हा सोस । पाहें तुझी वास भेटावया ॥१॥

मातेविण बाळ न मनी आणिका । सर्वकाळ धोका स्तनपाना ॥ध्रु.॥

वोसंगा निघाल्या वांचूनि न राहे । त्याचें आर्त माय पुरवीते ॥२॥

तुका म्हणे माते भक्तां तूं कृपाळ । गिळियेले जाळ वनांतरीं ॥३॥

ते काय पवाडे नाहीं म्यां ऐकिले । गोपाळ रिक्षले वनांतरीं ॥१॥

मावेचा वोणवा होऊनि राक्षस । लागला वनास चहूंकडे ॥ध्रु.॥

गगनासी ज्वाळा लागती तुंबळ । गोधनें गोपाळ वेडावलीं ॥२॥

तुका ह्मणे तेथें पळावया वाट । नाहीं वा निपट ऐसें जालें ॥३॥

धडकला अिग्न आह्या येती वरी । गोपाळ श्रीहरी विनविती ॥१॥

अरे कृष्णा काय विचार करावा । आला रे वोणवा जळों आतां ॥ध्रु.॥

अरे कृष्णा तुझें नाम बिळवंत । होय कृपावंत राख आतां ॥२॥

तुका ह्मणे अरे कृष्णा नारायणा । गोपाळ करुणा भाकितिले ॥३॥

अरे कृष्णा आह्मी तुझे निज गडी । नवनीत आवडी देत होतों ॥१॥

अरे कृष्णा आतां राखेंराखें कैसें तरीं । संकटाभीतरीं पडियेलों ॥ध्रु.॥

वरुषला इंद्र जेव्हां शिळाधारीं । गोवर्धन गिरी उचलिला ॥२॥

तुका ह्मणे तुझे पवाडे गोपाळ । वर्णिती सकळ नारायणा ॥३॥

अरे कृष्णा तुवां काळया नाथिला । दाढे रगडिला रिठासुर ॥१॥

अरे कृष्णा तुवां पुतना शोषिली । दुर्बुद्धि कळली अंतरींची ॥ध्रु.॥

गोपाळ करुणा ऐसी नानापरी । भाकिती श्रीहरी तुजपुढें ॥२॥

तुझें नाम कामधेनु करुणेची । तुका ह्मणे त्यांची आली कृपा ॥३॥

चहुंकडूनियां येती ते कलोळ । सभोंवते जाळ जविळ आले ॥१॥

सकुमार मूर्ति श्रीकृष्ण धाकुटी । घोंगडी आणि काठी खांद्यावरि ॥ध्रु.॥

लहान लेंकरूं होत ते सगुण । विक्राळ वदन पसरिलें ॥२॥

चाभाड तें एक गगनीं लागलें । एक तें ठेविलें भूमीवरि ॥३॥

तये वेळे अवघे गोपाळ ही भ्याले । तुकें ही लपालें भेऊनियां ॥४॥

श्रीमुख वोणवा गिळीत चालिलें । भ्यासुर वासिलें वदनांबुज ॥१॥

विक्राळ त्या दाढा भ्यानें पाहावेना । धाउनी रसना ज्वाळ गिळी ॥ध्रु.॥

जिव्हा लांब धांवे गोळा करी ज्वाळ । मोटें मुखकमळ त्यांत घाली ॥ 2॥

तुका ह्मणे अवघा वोणवा गीळिला। आनंद जाहाला गोपाळांसी ॥३॥

गोपाळ प्रीतीनें कैसे विनविती । विक्राळ श्रीपती होऊं नको ॥१॥

नको रे बा कृष्णा धरूं ऐसें रूप । आह्मां चळकांप सुटलासे ॥ध्रु.॥

होइप बा धाकुटा शाम चतुर्भूज । बैसोनियां गुज सुखें बोलों ॥२॥

वोणव्याच्या रागें गिळिशील आह्मां । तुका मेघशामा पायां लागे ॥३॥

सांडियेलें रूप विक्राळ भ्यासुर । झालें सकुमार कोडिसवाणें ॥१॥

शाम चतुर्भुज मुकुट कुंडलें । सुंदर दंडलें नव बाळ ॥ध्रु.॥

गोपाळ ह्मणती कैसें रे बा कृष्णा । रूप नारायणा धरियेलें ॥२॥

कैसा वाढलासी विक्राळ जालासी । गटगटा ज्वाळांसी गिळियेलें ॥३॥

तुका ह्मणे भावें पुसती गोपाळ । अनाथवत्सल ह्मणोनियां ॥४॥

बा रे कृष्णा तुझें मुख कीं कोमळ । कैसे येवढे ज्वाळ ग्रासियेले ॥१॥

बा रे कृष्णा तुझी जिव्हा कीं कोवळी । होईल पोळिली नारायणा ॥ध्रु.॥

बैसें कृष्णा तुझें पाहूं मुखकमळ । असेल पोळलें कोणे ठायीं ॥२॥

घोंगडिया घालीं घालूनियां तळीं। वरी वनमाळी बैसविती ॥३॥

तुका ह्मणे भावें आकिळला देव । कृपासिंधुराव त्रैलोक्याचा ॥४॥

एक ह्मणती मुख वासीं नारायणा । पाहों दे वदना डोळेभरि ॥१॥

वासुनियां मुख पहाती सकळ । अवघे गोपाळ व्योमाकार ॥ध्रु.॥

ह्मणती गोपाळ बेटे हो हा देव । स्वरूपाचा ठाव न कळे याच्या ॥२॥

तुका ह्मणे अवघे विठोबाभोंवते । मिळाले नेणते लहानथोर ॥३॥

एक ह्मणती कृष्णा वासिलें त्वां मुख । तेव्हां थोर धाक पडिला आह्मां ॥१॥

गिळों लागलासी अग्नीचे कल्लोळ । आह्मी चळचळां कांपतसों ॥ध्रु.॥

ज्वाळांबरोबरि गिळशील आह्मां। ऐसें मेघशामा भय वाटे ॥२॥

तुका ह्मणे ऐसे भाग्याचे गोपाळ । फुटकें कपाळ आमुचें चि ॥३॥

गोपाळांचें कैसें केलें समाधान । देउनि आलिंगन निवविले ॥१॥

ज्वाळाबरोबरि तुह्मां कां ग्रासीन । अवतार घेणें तुह्मांसाटीं ॥ध्रु.॥

निर्गुण निर्भय मी सर्वांनिराळा । प्रकृतिवेगळा गुणातीत ॥२॥

चिन्मय चिद्रूप अवघें चिदाकार । तुका ह्मणे पार नेणे ब्रह्मा ॥३॥

ऐसा मी अपार पार नाहीं अंत । परि कृपावंत भाविकांचा ॥१॥

दुर्जनां चांडाळां करीं निर्दाळण । करीं संरक्षण अंकितांचें ॥ध्रु.॥

भक्त माझे सखे जिवलग सांगाती । सर्वांग त्यांप्रति वोडवीन ॥२॥

पीतांबरछाया करीन त्यांवरी । सदा त्यांचे घरीं दारी उभा ॥३॥

माझे भक्त मज सदा जे रातले । त्यांघरीं घेतलें धरणें म्यां ॥४॥

कोठें हें वचन ठेविलें ये वेळे । तुका ह्मणे डोळे झांकियेले ॥५॥

भ्रतारेंसी भार्या बोले गुज गोष्टी । मज ऐसी कष्टी नाहीं दुजी ॥१॥

अखंड तुमचें धंद्यावरी मन । माझें तों हेळण करिती सर्व ॥ध्रु.॥

जोडितसां तुह्मी खाती हेरेंचोरें । माझीं तंव पोरें हळहळीती ॥२॥

तुमची व्याली माझे डाइप हो पेटली । सदा दुष्ट बोली सोसवेना ॥३॥

दुष्टव्रुति नंदुली सदा द्वेष करी । नांदों मी संसारीं कोण्या सुखें ॥४॥

भावा दीर कांहीं धड हा न बोले । नांदों कोणां खालें कैसी आतां ॥५॥

माझ्या अंगसंगें तुह्मांसी विश्रांति । मग धडगति नाहीं तुमची ॥६॥

ठाकतें उमकतें जीव मुठी धरूनि। परि तुह्मी अजूनि न धरा लाज ॥७॥

वेगळे निघतां संसार करीन । नाहीं तरी प्राण देतें आतां ॥८॥

तुका ह्मणे जाला कामाचा अंकित। सांगे मनोगत तैसा वर्ते ॥९॥

कामाचा अंकित कांतेतें प्रार्थित । तूं कां हो दुश्चित्त निरंतर ॥१॥

माझीं मायबापें बंधु हो बहिण । तुज करी सीण त्यागीन मी ॥ध्रु.॥

त्यांचें जरि तोंड पाहेन मागुता । तरि मज हत्या घडो तुझी ॥२॥

सकाळ उठोन वेगळा निघेन । वाहातों तुझी आण निश्चयेंसी ॥३॥

वेगळें निघतां घडीन दोरे चुडा । तूं तंव माझा जोडा जन्माचा कीं ॥४॥

ताईत सांकळी गळांचि दुलडी । बाजुबंदजोडी हातसर ॥५॥

वेणीचे जे नग सर्व ही करीन । नको धरूं सीण मनीं कांहीं ॥६॥

नेसावया साडी सेलारी चुनडी । अंगींची कांचोळी जाळिया फुलें ॥७॥

तुका ह्मणे केला रांडेनें गाढव । मनासवें धांव घेतलीसे ॥८॥

उजिळतां उजळे दीपकाची वाती । स्वयंभ ते ज्योति हि†या अंगीं ॥१॥

एकीं महाकष्टें मेळविलें धन । एकासी जतन दैवयोगें ॥ध्रु.॥

परिमळें केलें चंदनाचे चिन्ह । निवडी ते भिन्न गाढव तो ॥२॥

तुका ह्मणे जया अंगीं हरिठसा । तो तरे सहसा वंद्य होय ॥३॥

बारावषॉ बाळपण । तें ही वेचलें अज्ञानें ॥१॥

ऐसा जन्म गेला वांयां । न भजतां पंढरिराया ॥ध्रु.॥

बाकी उरलीं आठ्याशीं। तीस वेचलीं कामासी ॥२॥

बाकी उरलीं आठावन्न । तीस वेचली ममतेनें ॥३॥

बाकी उरलीं आठावीस । देहगेह विसरलास ॥४॥

तुका ह्मणे ऐसा झाडा । संसार हा आहे थोडा ॥५॥

सोवळा तो जाला । अंगीकार देवें केला ॥१॥

येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ॥ध्रु.॥

चुकला हा भार । तयाची च येरझार ॥२॥

तुका ह्मणे दास । जाला तया नाहीं नास ॥३॥

आजि शिवला मांग । माझें विटाळलें आंग ॥१॥

यासी घेऊं प्रायिश्चत्त । विठ्ठलविठ्ठल हृदयांत ॥ध्रु.॥

जाली क्रोधासी भेटी । तोंडावाटे नर्क लोटी ॥२॥

अनुतापीं न्हाऊं । तुका ह्मणे रवी पाहूं ॥३॥

ठाव तुह्मांपाशीं । जाला आतां हृषीकेशी ॥१॥

न लगे जागावें सतत । येथें स्वभावें हे नीत ॥ध्रु.॥

चोरट्यासी थारा। येथें कैंचा जी दातारा ॥२॥

तुका ह्मणे मनें । आह्मां जालें समाधान ॥३॥

पाळियेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे ॥१॥

बहुजन्माचें पोषणें । सरतें पायांपाशीं तेणें ॥ध्रु.॥

सवे दिली लागों । भातें आवडीचें मागों ॥२॥

तुका ह्मणे भिन्न । नाहीं दिसों दिलें क्षण ॥३॥

जो या गेला पंढरपुरा । आणीक यात्रा न मानी तो ॥१॥

सुलभ माय पंढरिराणा । पुरवी खुणा अंतरींच्या ॥ध्रु.॥

जन्मांतरिंच्या पुण्यरासी । वारी त्यासी पंढरी ॥२॥

बाहेर येतां प्राण फुटे । रडें दाटे गहिवरें ॥३॥

दधिमंगळभोजन सारा । ह्मणती करा मुरडींव ॥४॥

मागुता हा पाहों ठाव । पंढरिराव दर्शनें ॥५॥

तुका ह्मणे भूवैकुंठ । वाळुवंट भींवरा ॥६॥

न मिळती एका एक । जये नगरीचे लोक ॥१॥

भलीं तेथें राहूं नये । क्षणें होईल न कळे काय ॥ध्रु.॥

न करितां अन्याय । बळें करी अपाय ॥२॥

नाहीं पुराणाची प्रीति । ठायींठायीं पंचाइती ॥३॥

भल्या बु†या मारी । होतां कोणी न निवारी ॥४॥

अविचा†या हातीं । देऊनि प्रजा नागविती ॥५॥

तुका ह्मणे दरी । सुखें सेवावी ते बरी ॥६॥

शिकवणें नाक झाडी । पुढील जोडी कळेना ॥१॥

निरयगांवीं भोग देता । तेथें सत्ता आणिकांची ॥ध्रु.॥

अवगुणांचा सांटा करी । ते चि धरी जीवासी ॥२॥

तुका ह्मणे जडबुद्धि । कर्मशुद्धी सांडवीं ॥३॥

गोपीचंदन मुद्रा धरणें । आह्मां लेणें वैष्णवां ॥१॥

मिरवूं अळंकार लेणें । हीं भूषणें स्वामीचीं ॥ध्रु.॥

विकलों ते सेवाजीवें । एक्या भावें एकविध ॥२॥

तुका ह्मणे शूर जालों । बाहेर आलों संसारा ॥३॥

विषयांचे लोलिंगत । ते फजीत होतील ॥१॥

न सरे येथें यातिकुळ । शुद्ध मूळबीज व्हावें ॥ध्रु.॥

शिखासूत्र सोंग वरि । दुराचारी दंड पावे ॥२॥

तुका ह्मणे अभिमाना । नारायणा न सोसे ॥३॥

वडिलें दिलें भूमिदान । तें जो मागे अभिळासून ॥१॥

अग्रपूजेचा अधिकारी । श्रेष्ठ दंड यमा घरीं ॥ध्रु.॥

उभयकुल समवेत । नकाअ प्रवेश अद्भुत ॥२॥

तप्तलोहें भेटी । तुका ह्मणे कल्पकोटी ॥३॥

लटिकी ग्वाही सभेआंत । देतां पतित आगळा ॥१॥

कुंभपाकीं वस्ती करूं । होय धुरु कुळेसी ॥ध्रु.॥

रजस्वला रुधिर स्रवे । तें चि घ्यावें तृषेसी ॥२॥

तुका ह्मणे जन्मा आला । काळ जाला कुळासी ॥३॥

आचरे दोष न धरी धाक । परीपाक दुःखाचा ॥१॥

चांडाळ तो दुराचारी । अंगीकारी कोण त्या ॥ध्रु.॥

नव्हे संतान वोस घर । अंधकार कुळासी ॥२॥

तुका ह्मणे त्याचें दान । घेतां पतन दुःखासी ॥३॥

कीविलवाणा जाला आतां । दोष करितां न विचारी ॥१॥

अभिळाषी नारी धन । झकवी जन लटिकें चि ॥ध्रु.॥

विश्वासिया करी घात । न धरी चित्ता कांटाळा ॥२॥

तुका ह्मणे नाहीं आला । वृथा गेला जन्मासी ॥३॥

घेऊं नये तैसें दान । ज्याचें धन अभिळाषी ॥१॥

तो ही येथें कामा नये । नर्का जाय ह्मणोनि ॥ध्रु.॥

विकी स्नानसंध्या जप । करी तप पुढिलांचें ॥२॥

तुका ह्मणे दांभिक तो । नर्का जातो स्वइच्छा ॥३॥

सदा नामघोष करूं हरिकथा । तेणें सदा चित्ता समाधान ॥१॥

सर्वसुख ल्यालों सर्व अलंकार । आनंदें निर्भर डुलतसों ॥ध्रु.॥

असों ऐसा कोठें आठव ही नाहीं । देहीं च विदेही भोगूं दशा ॥२॥

तुका ह्मणे आह्मी जालों अिग्नरूप । लागों नेदूं पापपुण्य आतां ॥३॥

वरिवरि बोले युद्धाचिया गोष्टी । परसैन्या भेटी नाहीं जाली ॥१॥

पराव्याचे भार पाहुनियां दृष्टी । कांपतसे पोटीं थरथरां ॥ध्रु.॥

मनाचा उदार रायांचा जुंझार । फिरंगीचा मार मारीतसे ॥२॥

धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप । अंगीं अनुताप हरिनामें ॥३॥

तुका ह्मणे साधु बोले खर्गधार । खोचती अंतरें दुर्जनाचें ॥४॥

गंधर्वनगरीं क्षण एक राहावें । तें चि पैं करावें मुळक्षत्र ॥१॥

खपुष्पाची पूजा बांधोनि निर्गुणा । लक्ष्मीनारायणा तोषवावें ॥ध्रु.॥

वंध्यापुत्राचा लग्नाचा सोहळा । आपुलिया डोळां पाहों वेगीं ॥२॥

मृगजळा पोही घालुनि सज्ञाना । तापलिया जना निववावें ॥३॥

तुका ह्मणे मिथ्या देहेंिद्रयकर्म । ब्रह्मार्पण ब्रह्म होय बापा ॥४॥

तुझा ह्मणविलों दास । केली उिच्छष्टासी आस ॥१॥

मुखीं घालावा कवळ । जरी तूं होशील कृपाळ ॥२॥

सीण भाग माझा पुसें । तुका ह्मणे न करीं हांसें ॥३॥

काय मागें आह्मी गंुतलों काशानीं । पुढें वाहों मनीं धाक देवा ॥१॥

कीर्ति चराचरीं आहे तैसी आहे । भेटोनियां काय घ्यावें आह्मां ॥ध्रु.॥

घेउनी धरणें बैसती उपवासी । हट आह्मांपासीं नाहीं तैसा ॥२॥

तातडी तयांनीं केली विटंबणा । आह्मां नारायणा काय उणें ॥३॥

नाहीं मुक्तिचाड वास वैकुंठींचा । जीव भाव आमुचा देऊं तुज ॥४॥

तुका ह्मणे काय मानेल तें आतां । तूं घेइप अनंता सर्व माझें ॥५॥

जालों बिळवंत । होऊनियां शरणागत ॥१॥

केला घरांत रिघावा । ठायीं पाडियेला ठेवा ॥ध्रु.॥

हाता चढे धन । ऐसें रचलें कारण ॥२॥

तुका ह्मणे मिठी । पायीं देउनि केली लुटी ॥३॥

दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नर्का द्वारीं ॥१॥

ऐसे सांगों जातां जना । नये कोणाचिया मना ॥ध्रु.॥

बरें विचारूनी पाहें । तुज अंतीं कोण आहे ॥२॥

तुका ह्मणे रांडलेंका । अंतीं जासिल यमलोका ॥३॥

गुळ सांडुनि गोडी घ्यावी । मीठ सांडुनि चवि चाखावी ॥१॥

ऐसा प्रपंच सांडुनि घ्यावा । मग परमार्थ जोडावा ॥ध्रु.॥

साकरेचा नव्हे ऊंस । आह्मां कैंचा गर्भवास ॥२॥

बीज भाजुनि केली लाही । जन्ममरण आह्मांसि नाहीं ॥३॥

आकारासी कैंचा ठाव । देह प्रत्यक्ष जाला वाव ॥४॥

तुका ह्मणे अवघें जग । सर्वां घटीं पांडुरंग ॥५॥

आमुचें दंडवत पायांवरि डोई । व्हावें उतराई ठेवूनियां ॥१॥

कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चित्त द्यावें बोला बोबडिया ॥२॥

तुका ह्मणे आह्मी लडिवाळें अनाथें । ह्मणोनि दिनानाथें सांभाळावें ॥३॥

नाही तें पुरवीत आणुनि जवळी । गाउनी माउली गीत सुखें ॥ध्रु.॥

प्रीति अंगीं असे सदा सर्वकाळ । वोळली सकळ सुखें ठायीं ॥२॥

आपुल्या स्वभावें जैसे जेथें असों । तैसे तेथें दिसों साजिरे चि ॥३॥

वासनेचा कंद उपडिलें मूळ । दुरितें सकळ निवारिलीं ॥४॥

तुका ह्मणे भक्तजनाची माउली । करील साउली विठ्ठल आह्मां ॥५॥

भाग्यवंत आह्मी विष्णुदास जगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥१

तीथॉ फळती काळें जन्में आगिळया । संतदृष्टी पाया हेळामात्रें ॥१॥

सुखाचे सुगम वैष्णवांचे पाय । अंतरींचा जाय महाभेव ॥ध्रु.॥

काळें हि न सरे तपें समाधान । कथे मूढजन समाधिस्थ ॥२॥

उपमा द्यावया सांगतां आणीक । नाहीं तिन्ही लोक धुंडाळितां ॥३॥

तुका ह्मणे मी राहिलों येणें सुखें । संतसंगें दुःखें नासावया ॥४॥

संतजना माझी यावया करुणा । ह्मणउनी दीन हीन जालों ॥१॥

नेणें योग युक्ती नाहीं ज्ञान मति । गातसें या गीती पांडुरंगा ॥ध्रु.॥

भाव भक्ती नेणें तप अनुष्ठान । करितों किर्त्तन विठ्ठलाचें ॥२॥

ब्रह्मज्ञान ध्यान न कळे धारणा । एका नारायणा वांचूनियां ॥३॥

तुका ह्मणे माझा विटोबासी भार । जाणे हा विचार तो चि माझा ॥४॥

ऐसें काय उणें जालें तुज देवा । भावेंविण सेवा घेसी माझी ॥१॥

काय मज द्यावा न लगे मुशारा । पहावें दातारा विचारूनि ॥ध्रु.॥

करितों पाखांडें जोडूनि अक्षरें । नव्हे ज्ञान खरें भक्तिरस ॥२॥

गुणवाद तुझे न बोलवे वाणी । आणिका छळणी वाद सांगें ॥३॥

तरी आतां मज राखें तुझे पायीं । देखसील कांहीं प्रेमरस ॥४॥

तुका ह्मणे तुज हांसतील लोक । निःकाम सेवक ह्मणोनियां ॥५॥

भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा ॥१॥

मनुष्याचे परी बोले रावा करी । रंजवी नरनारी जगामध्यें ॥ध्रु.॥

तिमयाचा बैल करी सिकविलें । चित्रींचें बाहुलें गोष्टी सांगे ॥२॥

तुका ह्मणे देवा जळो हे महंती । लाज नाहीं चित्तीं निसुगातें ॥३॥

अंगीं घेऊनियां वारें दया देती । तया भक्ता हातीं चोट आहे ॥१॥

देव्हारा बैसोनि हालविती सुपें । ऐसीं पापी पापें लिंपताती ॥ध्रु.॥

एकीबेकीन्यायें होतसे प्रचित । तेणें लोक समस्त भुलताती ॥२॥

तयाचे स्वाधीन दैवतें असती । तरी कां मरती त्यांचीं पोरें ॥३॥

तुका ह्मणे पाणी अंगारा जयाचा । भक्त कान्होबाचा तो ही नव्हे ॥४॥

कोणा एकाचिया पोरें केली आळी । ठावी नाहीं पोळी मागें देखी ॥१॥

बुझाविलें हातीं देउनी खापर । छंद करकर वारियेली ॥ध्रु.॥

तैसें नको करूं मज कृपावंता । काय नाहीं सत्ता तुझे हातीं ॥२॥

तुका ह्मणे मायबापाचें उचित । करावें तें हित बाळकाचें ॥३॥

पंढरपुरींचें दैवत भजावें । काया वाचा जावें शरण त्या ॥१॥

मनीं ध्यान करी अहंता धरूनी । तया चक्रपाणी दूर ठेला ॥ध्रु.॥

मान अभिमान सांडुनियां द्यावे । अवघ्यां नीच व्हावें तरी प्राप्त ॥२॥

तुका ह्मणे हें चि कोणासी सांगावें । सादर होउनि भावें भजें देवा ॥३॥

अधमाचें चित्त अहंकारीं मन । उपदेश शीण तया केला ॥१॥

पापियाचें मन न करी आचार । विधवे शृंगार व्यर्थ केला ॥ध्रु.॥

अधमाचें चित्त दुश्चित्त ऐकेना । वांयां सीण मना करूं काय ॥२॥

गर्धबासी दिली चंदनाची उटी । केशर लल्हाटीं शुकराच्या ॥३॥

पतिवंचकेसी सांगतां उदंड । परि तें पाषांड तिचे मनीं ॥४॥

तुका ह्मणे तैसें अभावीं सांगतां । वाउगा चि चित्ता सीण होय ॥५॥

किती उपदेश करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥१॥

शुद्ध हे वासना नाहीं चांडाळाची । होळी आयुष्याची केली तेणें ॥ध्रु.॥

नाहीं शुद्ध भाव नायके वचन । आपण्या आपण नाडियेलें ॥२॥

तुका ह्मणे त्यासी काय व्याली रांड । करितो बडबड रात्रदिस ॥३॥

संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी ॥१॥

वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकतां निवे कर्ण ॥ध्रु.॥

कथेमाजी निज वाटे नित्यक्षणीं । िस्त्रयेचे कीर्त्तनीं प्रेमें जागे ॥२॥

तुका ह्मणे तुह्मी क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥३॥

मणि पडिला दाढेसी मकरतोंडीं । सुखें हस्तें चि काढवेल प्रौढीं ॥१॥

परि मूर्खाचें चित्त बोधवेना । दुधें कूर्मीच्या पाळवेल सेना ॥ध्रु.॥

सकळ पृथ्वी हिंडतां कदाचित । ससीसिंगाची प्राप्त होय तेथें ॥२॥

अतिप्रयत्नें गाळितां वाळुवेतें । दिव्य तेलाची प्राप्त होय तेथें ॥३॥

अतिक्रोधें खवळला फणी पाही । धरूं येतो मस्तकीं पुष्पप्रायी ॥४॥

पहा ब्रह्मानंदें चि एकीं हेळा । महापातकी तो तुका मुक्त केला ॥५॥

भोळे भाविक हे जुनाट चांगले । होय तैसें केलें भक्तिभावें ॥१॥

ह्मणउनि चिंता नाहीं आह्मां दासां । न भ्याें गर्भवासा जन्म घेतां ॥ध्रु.॥

आपुलिया इच्छा करूं गदारोळ । भोगूं सर्वकाळ सर्व सुखें ॥२॥

तुका ह्मणे आह्मां देवाचा सांगात । नाहीं विसंबत येर येरां ॥३॥

आतां तरी माझी परिसा वीनवती । रखुमाईच्या पति पांडुरंगा ॥१॥

चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥२॥

तुका ह्मणे तुझा ह्मणताती मज । आतां आहे लाज हे चि तुह्मां ॥३॥

नाही बळयोग अभ्यास कराया । न कळे ते क्रिया साधनाची ॥१॥

तुझिये भेटीचें प्रेम अंतरंगीं । नाहीं बळ अंगीं भजनाचें ॥ध्रु.॥

काय पांडुरंगा करूं बा विचार । झुरतें अंतर भेटावया ॥२॥

तुका ह्मणे सांगा वडिलपणें बुद्धी । तुजविण दयानिधी पुसों कोणां ॥३॥

जिहीं तुझी कास भावें धरियेली । त्यांची नाहीं केली सांड देवा ॥१॥

काय माझा भोग आहे तो न कळे । सुखें तुह्मी डोळे झांकियेले ॥ध्रु.॥

राव रंक तुज सारिके चि जन । नाहीं थोर लहान तुजपाशीं ॥२॥

तुका ह्मणे मागें आपंगिलें भक्तां । माझिया संचिता कृपा नये ॥३॥

पहावया तुझा जरि बोलें अंत । तरि माझे जात डोळे देवा ॥१॥

स्तंबीं तुज नाहीं घातलें प्रल्हादें । आपुल्या आनंदें अवतार ॥ध्रु.॥

भक्ताचिया काजा जालासी सगुण । तुज नाहीं गुण रूप नाम ॥२॥

ऐसा कोण देवा अधम यातीचा । निर्धार हा साचा नाहीं तुझा ॥३॥

तुका ह्मणे बोले कवतुकें गोष्टी । नेदीं येऊं पोटीं राग देवा ॥४॥

प्रगट व्हावें हे अज्ञानवासना । माझी नारायणा हीनबुद्धि ॥१॥

खाणीवाणी होसी काष्टीं तूं पाषाणीं । जंतु जीवाजनीं प्रसिद्ध हा ॥ध्रु.॥

ज्ञानहीन तुज पाहें अल्पमति । लहान हा चित्तीं धरोनियां ॥२॥

परि तूं कृपाळ होसी देवराणा । िब्रदें तुझीं जना प्रसिद्ध हें ॥३॥

उतावीळ बहु भक्तांचिया काजा । होसी केशीराजा तुका ह्मणे ॥४॥

जरी तुझा मज नसता आधार । कैसा हा संसार दु†हावला ॥१॥

ऐसा बळी कोण होइल पुरता । जो हे वारी चिंता आशापाश ॥ध्रु.॥

मायामोहफांसा लोकलाजबेडी । तुजवीण तोडी कोण एक ॥२॥

हें तों मज कळों आलें अनुभवें । बरें माझ्या जीवें पांडुरंगा ॥३॥

तुका ह्मणे यास तूं चि माझा गोही । पुरी भाव नाहीं जना लोका ॥४॥

तुजविण चाड आणिकांची कांहीं । धरीन हें नाहीं तुज ठावें ॥१॥

तरणउपाय योगक्षेम माझा । ठेवियेला तुझ्या पायीं देवा ॥ध्रु.॥

कोण मज आळी काय हे तांतडी । सोनियाची घडी जाय दिस ॥२॥

तुझिया नामाचें ल्यालोंसें भूषण । कृपा संतजन करितील ॥३॥

तुका ह्मणे जाला आनंदाचा वास । हृदया या नास नव्हे कधीं ॥४॥

हें चि सुख पुढे मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान ॥१॥

जन्मजन्मांतरीं तुझा चि अंकिला । करूनि विठ्ठला दास ठेवीं ॥ध्रु.॥

दुजा भाव आड येऊं नेदीं चित्ता । करावा अनंता नास त्याचा ॥२॥

अभय देऊनि करावें सादर । क्षण तो विसर पडों नेदीं ॥३॥

तुका ह्मणे आह्मी जेजे इच्छा करूं । ते ते कल्पतरू पुरविसी ॥४॥

तुज केलिया नव्हे ऐसें काई । डोंगराची राई क्षणमात्रें ॥१॥

मज या लोकांचा न साहे आघात । देखणें प्रचित जीव घेती ॥ध्रु.॥

सहज विनोदें बोलियेलों गोष्टी । अरंभी तों पोटीं न धरावी ॥२॥

दीनरूप मज करावें नेणता । याहुनी अनंता आहें तैसा ॥३॥

तुका ह्मणे जेणें मज तूं भोगसी । तें करीं जनासीं चाड नाहीं ॥४॥

ऐसा सर्व भाव तुज निरोपिला । तूं मज एकला सर्वभावें ॥१॥

अंतरींची कां हे नेणसील गोष्टी । परि सुखासाटीं बोलविसी ॥ध्रु.॥

सर्व माझा भार तुज चालवणें । तेथें म्यां बोलणें काय एक ॥२॥

स्वभावें स्वहित हिताचें कारण । कौतुक करून निवडिसी ॥३॥

तुका ह्मणे तूं हें जाणसी गा देवा । आमुच्या स्वभावा अंतरींच्या ॥४॥

लोखंडाचे न पाहे दोष । शिवोन परीस सोनें करी ॥१॥

जैसी तैसी तरीं वाणी । मना आणी माउली ॥ध्रु.॥

लेकराचें स्नेहे गोड । करी कोड त्यागुणें ॥ ॥

मागें पुढें रिघे लोटी । साहे खेटी करी तें ॥३॥

तुका विनंती पांडुरंगा । ऐसें सांगा आहे हें ॥४॥

पर्वकाळीं धर्म न करी नासरी । खर्ची राजद्वारीं द्रव्यरासी ॥१॥

सोइ†याची करी पाहुणेर बरा । कांडवी ठोंबरा संतांलागीं ॥ध्रु.॥

बाइलेचीं सर्व आवडीनें पोसी । मातापितरांसी दवडोनी ॥२॥

श्राद्धीं कष्टी होय सांगतां ब्राह्मण । गोवार मागून सावडीतो ॥३॥

नेतो पानें फुलें वेश्येला उदंड । ब्राह्मणासी खांड नेदी एक ॥४॥

हातें मो†या शोधी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना कांटाळतो ॥५॥

सारा वेळ धंदा करितां श्रमेना । साधूच्या दर्शना जातां कुंथे ॥६॥

हरिच्या कीर्तनीं गुंगायासि लागे । येरवीं तो जागे उगला चि ॥७॥

पुराणीं बैसतां नाहीं रिकामटी । खेळतो सोंगटी अहोरात्रीं ॥८॥

देवाच्या विभुती न पाहे सर्वथा । करी पानवथा नेत्रभिक्षा ॥९॥

गाईला देखोनी बदबदां मारी । घोड्याची चाकरी गोड लागे ॥१०॥

ब्राह्मणाचें तीर्थ घेतां त्रास मोटा । प्रेमें घेतो घोंटा घटघटां ॥११॥

तुका ह्मणे ऐसे प्रपंचीं गुंतले । जन्मोनि मुकले विठोबासी ॥१२॥

आह्मी रामाचे राऊत । वीर जुंझार बहुत ॥१॥

मनपवनतुरंग । हातीं नामाची फिरंग ॥ध्रु.॥

वारू चालवूं चहूंखुरीं । घाला घालूं यमपुरी ॥२॥

तुका ह्मणे पेणें । आह्मां वैकुंठासी जाणें ॥३॥

पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास घेती जन्म ॥१॥

कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु.॥

वर्णअभिमानें कोण जाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं ॥३॥

अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट जालीं ॥३॥

वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥४॥

कबीर मोमीन लतिब मुसलमान । शेणा न्हावी जाण विष्णुदास ॥५॥

काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदू हरिचे पायीं ॥६॥

चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥७॥

नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ॥८॥

मैराळा जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों ॥९॥

यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥१०॥

तुका ह्मणे तुह्मी विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणों किती ॥११॥

नामासारिखी करणी । हे तों न दिसे त्रिभुवनीं ॥१॥

सिलंगणीचें सोनें । ठेवूं नये तें गाहाण ॥ध्रु.॥

आदित्याचीं झाडें । काय त्याचा उजड पडे ॥२॥

तुका ह्मणे देवा । िब्रदें सोडोनियां ठेवा ॥३॥

येऊनि संसारा काय हित केलें । आयुष्य नासिलें शिश्नोदरा ॥१॥

विषय सेवितां कोण तृप्त जाला । इंधनीं निवाला अिग्न कोठें ॥ध्रु.॥

देखोनी मृगजळ भांबावलीं वेडीं । विचाराची थडी न टाकिती ॥२॥

ऐसियां जीवांसी सोय न लाविसी । निष्ठ‍ कां होसी कृपाळुवा ॥३॥

तुका ह्मणे देवा अगाध पैं थोरी । सर्वांचे अंतरीं पुरलासी ॥४॥

समर्थाचे सेवे बहु असे हित । विचार हृदयांत करुनी पाहें ॥१॥

वरकडोऐसा नव्हे हा समर्थ । क्षणें चि घडित सृष्टी नाशें ॥ध्रु.॥

ज्याची कृपा होतां आपणा ऐसें करी । उरों नेदी उरी दारिद्राची ॥२॥

ऐशालागीं मन वोळगे अहर्निशीं । तेणें वंद्य होशी ब्रह्मांदिकां ॥३॥

तुका ह्मणे हें चि आहे पैं मुद्दल । सत्य माझा बोल हा चि माना ॥४॥

पिकलिये सेंदे कडुपण गेलें । तैसें आह्मां केलें पांडुरंगें ॥१॥

काम क्रोध लोभ निमाले ठायीं चि । सर्व आनंदाची सृष्टि जाली ॥ध्रु.॥

आठव नाठव गेले भावाभाव । जाला स्वयमेव पांडुरंग ॥२॥

तुका ह्मणे भाग्य या नांवें ह्मणीजे । संसारीं जन्मीजे या चि लागीं ॥३॥

येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमागाअ ॥१॥

चंचळ चित्तासी ठेवूनियां ठायीं । संतांचिये पायीं लीन व्हावें ॥ध्रु.॥

भावाचा पैं हात धरावा निश्चयें । तेणें भवभय देशधडी ॥२॥

नामापरतें जगीं साधन सोपें नाहीं । आवडीनें गाइप सर्वकाळ ॥३॥

तुका ह्मणे धन्य वंश त्या नराचा । ऐसा निश्चयाचा मेरु जाला ॥४॥

षडधसीं रांधिलें खापरीं घातलें । चोहोटा ठेविलें मध्यरात्रीं ॥१॥

त्यासी सदाचारी लोक न शिवती । श्वानासी निश्चिती फावलें तें ॥ध्रु.॥

तैसें दुष्टकर्म जालें हरिभक्ता । त्यागिली ममता विषयासक्ति ॥२॥

इहपरलोक उभय विटाळ । मानिती केवळ हरिचे दास ॥३॥

तुका ह्मणे देवा आवडे हे सेवा । अनुदिनीं व्हावा पूर्ण हेतु ॥४॥

बीज भाजुनि केली लाही । आह्मां जन्ममरण नाहीं ॥१॥

आकाराशी कैंचा ठाव । देहप्रत्यक्ष जाला देव ॥ध्रु.॥

साकरेचा नव्हे उस । आह्मां कैंचा गर्भवास ॥२॥

तुका ह्मणे औघा योग । सर्वां घटीं पांडुरंग ॥३॥

वैकुंठींचा देव आणिला भूतळा । धन्य तो आगळा पुंडलीक ॥१॥

धारिष्ट धैर्याचा वरिष्ठ भक्तांचा । पवित्र पुण्याचा एकनिष्ठ ॥ध्रु.॥

पितृसेवा पुण्यें लाधला निधान । ब्रह्म सनातन अंगसंगें ॥२॥

अंगसंगें रंगें क्रीडा करी जाणा । ज्या घरीं पाहुणा वैकुंठींचा ॥३॥

धन्य त्याची शक्ति भक्तीची हे ख्याति । तुका ह्मणे मुक्ति पायीं लोळे ॥४॥

मृगाचिये अंगीं कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव ॥१॥

भाग्यवंत घेती वेचूनियां मोलें । भारवाही मेले वाहतां ओझें ॥ध्रु.॥

चंद्रामृतें तृप्तिपारणें चकोरा । भ्रमरासी चारा सुगंधाचा ॥२॥

अधिकारी येथें घेती हातवटी । परीक्षावंता दृष्टी रत्न जैसें ॥३॥

तुका ह्मणे काय अंधिळया हातीं । दिले जैसें मोतीं वांयां जाय ॥४॥

आलिया संसारीं देखिली पंढरी । कीर्ति महाद्वारीं वानूं तुझी ॥१॥

पताकांचे भार नामाचे गजर । देखिल्या संसार सफळ जाला ॥ध्रु.॥

साधुसंतांचिया धन्य जाल्या भेटी । सांपडली लुटी मोक्षाची हे ॥२॥

तुका ह्मणे आतां हें चि पैं मागणें । पुढती नाहीं येणें संसारासी ॥३॥

ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि ह्मणति साधु ॥१॥

अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥ध्रु.॥

दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा ॥२॥

तुका ह्मणे सांगों किती । जळो तयांची संगती ॥३॥

कोणी निंदा कोणी वंदा । आह्मां स्वहिताचा धंदा ॥१॥

काय तुह्मांसी गरज । आह्मी भजूं पंढरिराज ॥ध्रु.॥

तुह्मांसारिखें चालावें । तेव्हां स्वहिता मुकावें ॥२॥

तुका ह्मणे हो कां कांहीं । गळ दिला विठ्ठल पायीं ॥३॥

तुझे नामें दिनानाथा । आह्मी उघडा घातला माथा ॥१॥

आतां न धरावें दुरी । बोल येईल ब्रीदावरी ॥ध्रु.॥

पतित होतों ऐसा ठावा । आधीं कां न विचारावा ॥२॥

तुका ह्मणे तुझे पायीं । आह्मी मिरास केली पाहीं ॥३॥

रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥१॥

तेणें अंजनगुणें दिव्यदृष्टि जाली । कल्पना निवाली द्वैताद्वैत ॥ध्रु.॥

देशकालवस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥२॥

न जाला प्रपंच आहे परब्रह्म । अहंसोहं ब्रह्म आकळलें ॥३॥

तत्त्वमसि विद्या ब्रह्मानंद सांग । तें चि जाला अंगें तुका आतां ॥४॥

नीत सांडोनि अवनीत चाले । भंडउभंड भलतें चि बोले ॥१॥

त्यांत कोणाचें काय बा गेलें । ज्याचें तेणें अनहित केलें ॥ध्रु.॥

ज्यासि वंदावें त्यासी निंदी । मैत्री सांडोनि होतसे दंदी ॥२॥

आन यातीचे संगती लागे । संतसज्जनामध्यें ना वागे ॥३॥

केल्याविण पराक्रम सांगे । जेथें सांगे तेथें चि भीक मागे ॥४॥

करी आपुला चि संभ्रम । परि पुढें कठीण फार यम ॥५॥

तुका ह्मणे कांहीं नित्यनेम । चित्तीं न धरी तो अधम ॥६॥

मानूं कांहीं आह्मी आपुलिया स्वइच्छा । नाहीं तरि सरिसा रंकरावो ॥१॥

आपुल्या उदास आहों देहभावीं । मग लज्जाजीवीं चाड नाहीं ॥२॥

तुका ह्मणे खेळों आह्मी सहजलीळे । ह्मणोनी निराळे सुख दुःख ॥३॥

बोले तैसा चाले । त्याचीं वंदीन पाउलें ॥१॥

अंगें झाडीन अंगण । त्याचें दासत्व करीन ॥ध्रु.॥

त्याचा होईन किंकर। उभा ठाकेन जोडोनि कर ॥२॥

तुका ह्मणे देव । त्याचे चरणीं माझा भाव ॥३॥

पाण्या निघाली गुजरी । मन ठेविलें दो घागरीं । चाले मोकऑया पदरीं । परी लक्ष तेथें ॥१॥

वावडी उडाली अंबरीं। हातीं धरोनियां दोरी । दिसे दुरिच्या दुरी । परी लक्ष तेथें ॥ध्रु.॥

चोर चोरी करी । ठेवी वनांतरीं । वर्ततसे चराचरीं । परी लक्ष तेथें ॥२॥

व्यभिचारिणी नारी । घराश्रम करी । परपुरुष जिव्हारीं । परी लक्ष तेथें ॥३॥

तुका ह्मणे असों भलतिये व्यापारीं। लक्ष सर्वेश्वरीं । चुकों नेदी ॥४॥

जनाचिया मना जावें कासियेसी । माझी वाराणसी पांडुरंग ॥१॥

तेथें भागीरथी येथें भीमरथी । अधिक ह्मणती चंद्रभागा ॥ध्रु.॥

तेथें माधवराव येथें यादवराज । जाणोनियां भाव पुंडलिकाचा ॥२॥

विष्णुपद गया ते चि येथें आहे । प्रत्यक्ष हें पाहे विटेवरी ॥३॥

तुका ह्मणे हे चि प्रपंच उद्धरी । आतां पंढरपुरी घडो बापा ॥४॥

नको येऊं लाजे होय तूं परती । भजों दे श्रीपती सखा माझा ॥१॥

तुझे संगतीनें मोटा जाला घात । जालों मी अंकित दुर्जनाचा ॥२॥

तुका ह्मणे रांडे घेइन काठीवरी । धनी सहाकारी राम केला ॥३॥

भक्तिॠण घेतलें माझें । चरण गाहाण आहेत तुझे ॥१॥

प्रेम व्याज देइप हरी । माझा हिशेब लवकरी करीं ॥ध्रु.॥

माझें मी न सोडीं धन । नित्य करितों कीर्त्तन ॥२॥

तुझें नाम आहे खत । सुखें करी पंचाईत ॥३॥

तुका ह्मणे गरुडध्वजा । यासी साक्ष श्रीगुरुराजा ॥४॥

फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला ॥१॥

भरियेली हुंडी नरसी महत्याची । धनाजीजाटाचींसेतें पेरी ॥ध्रु.॥

मिराबाईसाटीं घेतों विष प्याला । दामाजीचा जाला पाढेवार ॥२॥

कबीराचे मागीं विणूं लागे सेले । उठविलें मूल कुंभाराचें ॥३॥

आतां तुह्मी दया करा पंढरिराया । तुका विनवी पायां नमीतसे ॥४॥

हे चि वेळ देवा नका मागें घेऊं । तुह्मांविण जाऊं शरण कोणा ॥१॥

नारायणा ये रे पाहें विचारून । तुजविण कोण आहे मज ॥ध्रु.॥

रात्रहि दिवस तुज आठवूनि आहें । पाहातोसी काये सत्त्व माझें ॥२॥

तुका ह्मणे किती येऊं काकुलती । कांहीं माया चित्तीं येऊं द्यावी ॥३॥

इंद्रावणा केलें साकरेचें आळें । न सांडी वेगळें कडुपण ॥१॥

कावऑयाचें पिलूं कौतुकें पोशिलें । न राहे उगलें विष्ठेविण ॥ध्रु.॥

क्षेम देतां अंगा गांधेलाची पोळी । करवी नादाळी महाशब्द ॥२॥

तुका ह्मणे ऐसे न होती ते भले । घालिती ते घाले साधुजना ॥३॥

मुसळाचें धनु नव्हे हो सर्वथा । पाषाण पिळितां रस कैंचा ॥१॥

वांझे बाळा जैसें दुध नाहीं स्तनीं । गारा त्या अधणीं न सिजती ॥ध्रु.॥

नवखंड पृथ्वी पिके मृगजळें । डोंगर भेटे बळें असमानासी ॥२॥

नैश्वर ब्रह्म तेव्हां होय ब्रह्म । तुका ह्मणे श्रम करुनी काय ॥३॥

धन्या आतां काय करूं । माझें तान्हुलें लेकरूं ॥१॥

धन्या अवचित मरण आलें । मज कोणासी निरविलें ॥ध्रु.॥

माझें दारवंड नका पाडूं । त्याचे हात पाय तोडूं ॥२॥

एके हातीं धरली दाढी । घे कु†हाडी दुजे हातीं ॥३॥

येरी घाव घालूं पाहे । तंव तो उठोनि उभा राहे ॥४॥

तुका ह्मणे अवघीं चोरें । सेकी रामनाम सोइरें ॥५॥

निरंजनीं आह्मीं बांधियेलें घर । निराकारीं निरंतर राहिलों आह्मी ॥१॥

निराभासीं पूर्ण जालों समरस । खंड ऐक्यास पावलों आह्मी ॥२॥

तुका ह्मणे आतां नाहीं अहंकार । जालों तदाकार नित्य शुद्ध ॥३॥

पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुद्धिभेद ॥१॥

जीवशिवा सेज रचिली आनंदें । औठावे पदीं आरोहण ॥२॥

निजीं निजरूपीं निजविला तुका । अनुहाते बाळका हलरु गाती ॥३॥

नाना मतांतरें शब्दाची वित्पित्त । पाठांतरें होती वाचाळ ते ॥१॥

माझ्या विठोबाचें वर्म आहे दुरी । कैंची तेथें उरी देहभावा ॥ध्रु.॥

यज्ञा याग जप तप अनुष्ठान । राहे ध्येय ध्यान आलीकडे ॥२॥

तुका ह्मणे होय उपरति चित्ता । अंगीं सप्रेमता येणें लागें ॥३॥

नाहीं शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रीं मंत्रीं अनुभव तो ॥१॥

हर्षामषॉ अंगीं आदळती लाटा । कामक्रोधें तटा सांडियेलें ॥ध्रु.॥

न सरे ते भक्ति विठोबाचे पायीं । उपरति नाहीं जेथें चित्ता ॥२॥

तुका ह्मणे सुख देहनिरसनें । चिंतनें चिंतन तद्रूपता ॥३॥

शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळीं उच्चारण ॥१॥

ह्मणविलें मागें पुढें चाले कैसें । केला सामरस्यें अभिषेक ॥ध्रु.॥

एकछत्र झळके उन्मनी निशाणी । अनुहाताच्या ध्वनी गगन गर्जे ॥२॥

तुकया स्वामी स्थापी निजपदीं दासा । करूनि उल्हासा सप्रेमता ॥३॥

प्रवृत्तिनिवृत्तीचे आटूनियां भाग । उतरिलें चांग रसायण ॥१॥

ज्ञानाग्निहुताशीं कडशिले वोजा । आत्मसिद्धिकाजा लागूनियां ॥ध्रु.॥

ब्रह्मीं ब्रह्मरस शीघ्र जाला पाक । घेतला रुचक प्रतीतीमुखें ॥२॥

स्वानुभवें अंगीं जाला समरस । साधनी निजध्यास ग्रासोग्रासीं ॥३॥

अरोग्यता तुका पावला अष्टांगीं । मिरविला रंगीं निजात्मरंगें ॥४॥

काय बा करिशी सोवळें ओवळें । मन नाहीं निर्मळ वाउगें चि ॥१॥

काय बा करीसी पुस्तकांची मोट । घोकितां हृदयस्फोट हाता नये ॥ध्रु.॥

काय बा करीसी टाळ आणि मृदंग । जेथें पांडुरंग रंगला नाहीं ॥२॥

काय बा करीसी ज्ञानाचिया गोष्टी । करणी नाहीं पोटीं बोलण्याची ॥३॥

काय बा करीसी दंभलौकिकातें। हित नाहीं मातें तुका ह्मणे ॥४॥

स्वामी तूं ही कैसा न पडसी डोळां । सुंदर सांवळा घवघवीत ॥१॥

चतुर्भुज माळा रुळे एकावळी । कस्तुरी निडळीं रेखिलीसे ॥ध्रु.॥

शंख चक्रा गदा रुळे वैजयंती । कुंडलें तळपती श्रवणीं दोन्ही ॥२॥

तुका ह्मणे स्वामी आतां दावीं पाय । पांडुरंग माय कृपावंते ॥३॥

आणीक कोणापुढें वासूं मुख सांग । कीं माझें अंतरंग कोण जाणे ॥१॥

पाहें तुजकडे येऊनि जाऊनी । पांडुरंगा मनीं विचारावें ॥ध्रु.॥

भय चिंता अवघे उद्योग सांडिले । आठवुनी पाउलें असें तुझीं ॥२॥

नका विसरूं मज वैकुंठनायका । विनवितो तुका बंदीजन ॥३॥

सद्ग‍ूचे चरणीं ठेविला मस्तक । देउनियां हस्तक उठविलें ॥१॥

उठविलें मज देऊनियां प्रेम । भावाथॉ सप्रेमे नमस्कारीं ॥२॥

नमस्कारीं त्याला सद्ग‍ुरायाला । तुका ह्मणे बोला नाम वाचें ॥३॥

सद्ग‍ूने मज आशीर्वाद दिला । हरुष भरला हृदयीं माझे ॥१॥

हृदयींचा भाव कळला गुरूसी । आनंदउल्हासीं बोले मज ॥२॥

बोले मज गुरू कृपा तो करूनि । तुका ह्मणे मनीं आनंदलों ॥३॥

आनंदाचा कंद गाइयेला गीतीं । पाहियेला चित्तीं देवराव ॥१॥

देवराव तो ही आहे निश्चयेसीं । अखंड नामासी बोलवितो ॥२॥

बोलवितो मज कृपा तो करूनि । तुका ह्मणे मनीं धरा भाव ॥३॥

सातादिवसांचा जरी जाला उपवासी । तरीं कीर्तनासी टाकुं नये ॥१॥

फुटो हा मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ॥ध्रु.॥

शरीराचे होत दोनी ते ही भाग । परि कीर्त्तनाचा रंग सोडों नये ॥२॥

तुका ह्मणे ऐसा नामीं ज्या निर्धार । तेथें निरंतर देव असे ॥३॥

चला आळंदीला जाऊं । ज्ञानदेवा डोळां पाहूं ॥१॥

होतिल संताचिया भेटी । सुखाचिया सांगों गोष्टी ॥ध्रु.॥

ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर । मुखीं ह्मणतां चुकती फेर ॥२॥

तुह्मां जन्म नाहीं एक । तुका ह्मणे माझी भाक ॥३॥

चरणीं नमन सद्ग‍ूच्या पूर्ण । नित्य हरिगुण गाऊं सदा ॥१॥

गोवर्धन जेणें नखीं हो धरिला । काऑया नाथिला महाबळी ॥ध्रु.॥

ऐसे हरिगुण गातो वाचेवरि । पतितासी तारी जनार्दन ॥२॥

तुका ह्मणे हें चि सज्जना जीवन । वाचेसी स्मरण गोविंदाचें ॥३॥

सद्ग‍ूवांचूनि प्रेतरूप वाणी । बोलती पुराणीं व्यासॠषि ॥१॥

ह्मणोनि तयाचें पाहूं नये तोंड । निगुरा अखंड सुतकाळा ॥ध्रु.॥

कोणे परी तया नव्हे चि सुटका । देह त्याचा लटिका जाणा तुह्मी ॥२॥

तुका ह्मणे ऐसीं बोलती पुराणें । संतांचीं वचनें मागिलां हो ॥३॥

डिवेना डसेना बुझेना निर्मळ । परि अमंगळ स्वीकारीना ॥१॥

परंतु गर्धब अपवित्र जाणा । पर्वकाळीं दाना देऊं नये ॥ध्रु.॥

डिवी लात्री बुजे बहु नेदी दुध । मुखीं नाहीं शुद्ध विष्ठा खाय ॥२॥

परंतु ते गाय पवित्र हो जाणा । पर्वकाळीं दाना देऊजेते ॥३॥

ब्राह्मणें ब्राह्मणा सद्ग‍ू करावा । परि न करावा शूद्रादिक ॥४॥

तुका ह्मणे देवें सांगितली सोय । ह्मणोनि त्याचे पाय धरिले जीवें ॥५॥

संसारींचें ओझें वाहता वाहाविता । तुजविण अनंता नाहीं कोणी ॥१॥

गीतेमाजी शब्द दुंदुभीचा गाजे । योगक्षेमकाज करणें त्याचें ॥ध्रु.॥

चतुर्भुजा करीं वारू शृंगारावे । सारथ्य करावें अर्जुनाचें ॥२॥

श्वपच अंत्यज भक्तिस्नेहें जाला । अचळपदीं केला ध्रुव तुका ॥३॥

कवणदिस येइल कैसा । न कळे संपत्तीचा भरंवसा ॥१॥

चौदा चौकडिया लंकापति । त्याची कोण जाली गती ॥ध्रु.॥

लंकेसारिखें भुवन । त्याचें त्यासी पारखें जाण ॥२॥

तेहतीस कोटि बांदवडी । राज्य जातां न लगे घडी ॥३॥

ऐसे अहंतेनें नाडिले । तुका ह्मणे वांयां गेले ॥४॥

लटिका प्रपंच वांजेची संतति । तत्वज्ञा हे भ्रांति बाधूं नेणे ॥१॥

सूर्यबिंबीं काय अंधार रिघेल । मृगजळें तिंबेल नभ काई ॥ध्रु.॥

तैसा दृश्यभास नाडळे चि डोळा । प्रकाशसोहळा भोगीतसे ॥२॥

भोग भोग्य भोक्ता नाडळे चि कांहीं । चैतन्यविग्रहीं पूर्णकाम ॥३॥

तुका ब्रह्मानंदीं आहे तुकब्रह्म । प्रपंचाचें बंड न देखे डोळां ॥४॥

न ह्मणे वो आह्मी आपुलेनि चित्तीं । निःशेष अतिप्रीति विषयीं तो ॥१॥

खोटा तो विटाळ । ह्मणोनि गाबाळ सांडियेले ॥ध्रु.॥

भांगतमाखूचा चित्ताचा आदर । कोरडें उत्तर चाटावें तें ॥२॥

तुका ह्मणे आह्मी नव्हों फजितखोर । तुटीचा व्यापार करावया ॥३॥

अनाथाचा नाथ पतितपावन । दीनाचें रक्षण करीतसे ॥१॥

ऐसें जाणोनियां नामीं विश्वासलों । भीमातिरा आलों धांवत चि ॥ध्रु.॥

स्नान हें करितां त्रिताप निवाले । महाद्वारा आलें मन माझें ॥२॥

तेथें अनुमात्र रीग नव्हे याचा । परतलों साचा तेथूनियां ॥३॥

पुंडलिकापाशीं येऊनि पुसिलें । चिन्मय दाटलें जनार्दन ॥४॥

तुका ह्मणे आतां दुजा देव नाहीं । बाप तरी आई तो चि विठो ॥५॥

ढालतलवारे गुंतले हे कर । ह्मणे जुंझणार कैसा जुंझे ॥१॥

पेटी पडदळे सिले टोप ओझें । हें तों जालें दुजें मरणमूळ ॥ध्रु.॥

बैसविलें मला येणें अश्वावरी । धावूं पळूं तरी कैसा आतां ॥२॥

असोनि उपाय ह्मणे हे अपाय । ह्मणे हायहाय काय करूं ॥३॥

तुका ह्मणे हा तों स्वयें परब्रह्म । मूर्ख नेणे वर्म संतचरण ॥४॥

किडा अन्नाचें मानुस । त्याचा ह्मणविल्या दास ॥१॥

तें ही त्यासी उपेक्षीना । बोल आपुला सांडीना ॥ध्रु.॥

तो तूं नराचा नरेंद्र । तुजपासूनि इंद्र चंद्र ॥२॥

तुका ह्मणे विश्वंभर । तुज वर्णी फणीवर ॥३॥

कोटिजन्म पुण्यसाधन साधिलें । तेणें हाता आलें हरिदास्य ॥१॥

रात्रीं दिवस ध्यान हरीचें भजन । कायावाचामन भगवंतीं ॥ध्रु.॥

ऐसिया प्रेमळा ह्मणताती वेडा । संसार रोकडा बुडविला ॥२॥

एकवीस कुळें जेणें उद्धरिलीं । हे तों न कळे खोली भाग्यमंदा ॥३॥

तुका ह्मणे त्याची पायधुळी मिळे । भवभय पळे वंदितां चि ॥४॥

उपजला प्राणी न राहे संसारीं । बैसला सेजारी काळ उसां ॥१॥

पाहा तो उंदीर घेउनि जाय बोका । तैसा काळ लोका नेत असे ॥ध्रु.॥

खाटिकाचे घरीं अजापुत्र पाहें । कसाबाची गाय वांचे कैसी ॥२॥

तुका ह्मणे कांहीं करा काढाकाढी । जाती ऐसी घडी पुन्हा नये ॥३॥

पंढरीस जाऊं ह्मणती । यम थोर चिंता करि ती ॥१॥

या रे नाचों ब्रह्मानंदें । विठ्ठलनामाचिया छंदें ॥ध्रु.॥

धरिली पंढरीची वाट । पापें रिगालीं कपाट ॥२॥

केलें भीमरेचें स्नान । यमपुरी पडिले खान ॥३॥

दुरोनि देखिली पंढरी । पापें गेलीं दुरच्यादुरी ॥४॥

दुरोनि देखिलें राउळ । हरुषें नाचती गोपाळ ॥५॥

तुका ह्मणे नाहीं जाणें । अखंड पंढरिराहणें ॥६॥

पय दधि घृत आणि नवनीत । तैसें दृश्यजात एकपणें ॥१॥

कनकाचे पाहीं अलंकार केले । कनकत्वा आले एकपणें ॥ध्रु.॥

मृत्तिकेचे घट जाले नानापरी । मृत्तिका अवधारीं एकपणें ॥२॥

तुका ह्मणे एक एक ते अनेक । अनेकत्वीं एक एकपणा ॥३॥

पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार जाला । विठोबा भेटला निराकार ॥१॥

भांबगिरिपाठारीं विस्त जाण केली । वृत्ति थिरावली परब्रह्मीं ॥ध्रु.॥

निर्वाण जाणोनि आसन घातलें । ध्यान आरंभिलें देवाजीचें ॥२॥

सर्प विंचू व्याघ्र आंगासी झोंबले । पीडूं जे लागले सकिळक ॥३॥

दीपकीं कर्पूर कैसा तो विराला । तैसा देह जाला तुका ह्मणे ॥४॥

अज्ञान हा देह स्वरूपीं मीनला । सर्व वोसावला देहपात ॥१॥

ज्ञानस्वरूपाची सांगड मिळाली । अंतरीं पाहिली ज्ञानज्योती ॥२॥

तुका ह्मणे चित्त स्वरूपीं राहिलें । देह विसावलें तुझ्या पायीं ॥३॥

दामाजीपंताची रसद गुदरली । लज्जा सांभाळिली देवरायें ॥१॥

तयाचें चरित्र परिसा हो सादरें । करितों नमस्कार संतजना ॥ध्रु.॥

मंगळवेढा असे विस्त कुटुंबेंसी । व्यापारी सर्वांसी मान्य सदा ॥२॥

कर्म काय करी ठाणाचा हवाला । तों कांहीं पडला कठिण काळ ॥३॥

धान्याचीं भांडारें होतीं तीं फोडिलीं । पंढरी रिक्षली दुष्काळांत ॥४॥

दुबळें अनाथ तें हि वांचविलें । राष्टधांत ते जाली कीर्त्ति मोठी ॥५॥

मुजुम करीत होता कानडा ब्राह्मण । फिर्याद लिहून पाठविली ॥६॥

अविंदाचें राज्य बेदरीं असतां । कागद पाहतां तलब केली ॥7 ॥

दामाजीपंतासी धरोनि चालविलें । इकडे या विठ्ठलें माव केली ॥८॥

विकते धारणे सवाईचें मोल । धान्याचें सकळ द्रव्य केलें ॥९॥

दामाजीपंताच्या नांवें अर्जदास्त । लिहून खलेती मुद्रा केली ॥१०॥

विठो पाडेवार भक्तां साह्य जाला । वेदरासी गेला रायापासीं ॥११॥

जोहार मायबाप पुसती कोठील । तंव तो ह्मणे स्थळ मंगळवेढें ॥१२॥

दामाजीपंतांनीं रसद पाठविली । खलेती ओतिली अर्जदास्त ॥१३॥

देखोनियां राजा संतोष पावला । ह्मणे व्यर्थ त्याला तलब केली ॥१४॥

काय तुझें नांव पुसती यंत्रधारी । तो ह्मणे बेगारी विठा कां जी ॥१५॥

पावल्याचा जाब द्यावा मायबाप । करोनि घेतों माप ह्मणती ते ॥१६॥

पावल्याचा जाब दिधला लिहून । तसरीफ देऊन पाठविला ॥१७॥

छत्री घोडा शिबिका आभरणांसहित । दिला सवें दूत पाठवूनि ॥१८॥

वाटे चुकामुक जाली याची त्यांची । ते आले तैसे चि मंगळवेढा ॥१९॥

दामाजीपंतासी बेदरासी नेलें । राजा ह्मणे जालें कवतुक ॥२०॥

काल गेला विठा बेगारी देऊन । तसरीफ देऊन जाब दिला ॥२१॥

काय तुमचें काज बोला जी सत्वर । बोलाजी निर्धार वचनाचा ॥२२॥

कैंचा विठा कोण पाठविला कधीं । काढोनियां आधीं जाब दिला ॥२३॥

पहातां चि जाब हृदय फुटलें । नयन निडारले राजा देखे ॥२४॥

सावळें सकुमार रूप मनोहर । माथां तेणें भार वाहियेला ॥२५॥

दामाजीपंतासी रायें सन्मानिलें । तो ह्मणे आपुलें कर्म नव्हे ॥२६॥

आतां तुमची सेवा पुरे जी स्वामिया । शिणविलें सखया विठोबासी ॥२७॥

निरोप घेऊनि आला स्वस्थळासी । उदास सर्वासीं होता जाला ॥२८॥

दामाजीपंतांनीं सेविली पंढरी । ऐसा त्याचा हरि निकटवृत्ति ॥२९॥

तुका ह्मणे विठो अनाथ कैवारी । नुपेक्षी हा हरि दासालागीं ॥३०॥

पहिली माझी ओवी ओवीन जगत्र । गाईन पवित्र पांडुरंग ॥१॥

दुसरी माझी ओवी दुजें नाहीं कोठें । जनीं वनीं भेटे पांडुरंग ॥ध्रु.॥

तिसरी माझी ओवी तिळा नाहीं ठाव । अवघा चि देव जनीं वनीं ॥२॥

चवथी माझी ओवी वैरिलें दळण । गाईन निधान पांडुरंग ॥३॥

पांचवी माझी ओवी ते माझिया माहेरा । गाईन निरंतरा पांडुरंगा ॥४॥

साहावी माझी ओवी साहा ही आटले। गुरूमूर्त्त भेटले पांडुरंग ॥५॥

सातवी माझी ओवी आठवे वेळोवेळां। बैसलासे डोळां पांडुरंग ॥६॥

आठवी माझी ओवी आठावीस योग। उभा चंद्रभागे पांडुरंग ॥७॥

नववी माझी ओवी सरलें दळण। चुकलें मरण संसारीचें ॥८॥

दाहावी माझी ओवी दाहा अवतारा । न यावें संसारा तुका ह्मणे ॥९॥

धरोनियां फरश करी । भक्तजनाचीं विघ्नें वारी ॥१॥

ऐसा गजानन महाराजा । त्याचें चरणीं हालो लागो माझा ॥ध्रु.॥

सेंदुर शमी बहुप्रिय ज्याला । तुरा दुर्वांचा शोभला ॥२॥

उंदिर असे जयाचें वहन । माथां जडितमुगुट पूर्ण ॥३॥

नागयज्ञाोपवीत रुळे । शुभ्र वस्त्र शोभित साजिरें ॥४॥

भावमोदक हराभरी । तुका भावें हे पूजा करी ॥५॥

नाम आहे जयापाशीं । जेथें राहे तेथें चि काशी ॥१॥

ऐसा नामाचा महिमा । जाणे वाल्मीक शंकर उमा ॥ध्रु.॥

नाम प्र†हादबाळ । जाणे पापी आजामेळ ॥२॥

नाम जाणे तो नारद । नामें ध्रुवा अक्षय पद ॥३॥

नाम गणिकेतें तारी । पशु गजेंद्र उद्धारी ॥४॥

नाम जाणे हणुमंत । जाणताति महासंत ॥५॥

नाम जाणे शुकमूर्ति । जाणे राजा परिक्षिती ॥६॥

नाम जाणे तुका । नाहीं संसाराचा धोका ॥७॥

बहुतां जन्मां अंतीं जन्मलासी नरा । देव तूं सोइरा करीं आतां ॥१॥

करीं आतां बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडीं आतां ॥ध्रु.॥

सांडि आतां कुडी कल्पनेची वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ॥२॥

पंढरीस जावें सर्व सुख घ्यावें । रूप तें पाहावें विटेवरि ॥३॥

विटेवरि नीट आनंदाचा कंद । तुका नाचे छंद नामघोषें ॥४॥

वृद्धपणीं आली जरा । शरीर कांपे थरथरा ॥१॥

आयुष्य गेलें हें कळेना । स्मरा वेगीं पंढरिराणा ॥ध्रु.॥

दांत दाढा पडिल्या ओस । हनुवटि भेटे नाकास ॥२॥

हात पाय राहिलें कान। नेत्रा पाझर हाले मान ॥३॥

अंगकांति परतली । चिरगुटा ऐसी जाली ॥४॥

आड पडे जिव्हा लोटे । शब्द नये मुखा वाटे ॥५॥

लांब लोंबताती अंड । भरभरा वाजे गांड ॥६॥

तुका ह्मणे आतां तरी । स्मरा वेगीं हरी हरी ॥७॥

उधानु काटीवरि चोपडुची आस । नवरा राजस मिरवतसे ॥१॥

जिव्हाऑयाचा काठी उबाऑयाच्या मोटा । नवरा चोहटा मिरवतसे ॥ध्रु.॥

तुळसीची माळ नवरीचे कंठीं । नोवरा वैकुंठीं वाट पाहे ॥२॥

तुका ह्मणे ऐसी नोव†याची कथा । परमार्थ वृथा बुडविला ॥३॥

न कळे महिमा वेद मोनावले । जेथें पांगुळले मनपवन ॥१॥

चंद्र सूर्य ज्याचें तेज वागविती । तेथें माझी मती कोणीकडे ॥ध्रु.॥

काय म्यां वाणावें तुझ्या थोरपणा । सहस्रवदना वर्णवेना ॥२॥

तुका ह्मणे आह्मी बाळ तूं माउली । कृपेची साउली करीं देवा ॥३॥

संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ॥१॥

मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥ध्रु.॥

कंठीं प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । हृदयीं प्रगटे रामरूप ॥२॥

तुका ह्मणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ॥३॥

विधवेसि एक सुत । अहर्निशीं तेथें चित्त ॥१॥

तैसा तूं मज एकला । नको मोकलूं विठ्ठला ॥ध्रु.॥

सुपुत्रालागीं बाप । अवघे तेथें चि संकल्प ॥२॥

तुका ह्मणे चित्तीं । पतिव्रते जैसा पति ॥३॥

ह्मणे विठ्ठल पाषाण । त्याच्या तोंडावरि वाहाण ॥१॥

नको नको दर्शन त्याचें । गलितकुष्ट भरो वाचे ॥ध्रु.॥

शाळिग्रामासि ह्मणे धोंडा । कोड पडो त्याच्या तोंडा ॥२॥

भावी सद्ग‍ु मनुष्य । त्याचें खंडो का आयुष्य ॥३॥

हरिभक्ताच्या करी चेष्टा । त्याचे तोंडीं पडो विष्ठा ॥४॥

तुका ह्मणे किती ऐकों । कोठवरी मर्यादा राखों ॥५॥

स्वगाअचे अमर इिच्छताति देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आह्मां ॥१॥

नारायणनामें होऊं जिवनमुक्त । किर्त्तनीं अनंत गाऊं गीती ॥ध्रु.॥

वैकुंठींचे जन सदा चिंतिताति । कइं येथें येती हरिचे दास ॥२॥

यमधर्म वाट पाहे निरंतर । जोडोनियां कर तिष्ठतसे ॥३॥

तुका ह्मणे पावावया पैल पार । नामंत्र सार भाविकासि ॥४॥

व्यापक हा विश्वंभर । चराचर याचेनी ॥१॥

पंढरिराव विटेवरि । त्याचींच धरीं पाउलें ॥ध्रु.॥

अवघियांचा हा चि ठाव । देवोदेवीं सकळ ॥२॥

तुका ह्मणें न करीं सोस । भेदें दोष उफराटे ॥३॥

पसरोनि मुखें । कैसे धालों बा हारीखें ॥१॥

ब्रह्मादिका दुर्लभ वांटा । आह्मां फावला राणटां ॥ध्रु.॥

गोड लागे काय तरि। कृपावंत जाला हरि ॥२॥

उडती थेंबुटें । अमृताहुनि गोमटें ॥३॥

गोडाहुनि गोड । जिव्हा नाचे वाटे कोड ॥४॥

खुणावुनि तुका । दावी वर्म बोलों नका ॥५॥

आमुचि मिरास पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥१॥

पांडुरंग आमुचा पिता । रकुमाबाई आमुचि माता ॥ध्रु.॥

भाव पुंडलीक मुनि । चंद्रभागा आमुची बहिणी ॥२॥

तुका जुन्हाट मिराशी । ठाव दिला पायांपाशीं ॥३॥

गंगा गेली सिंधुपाशीं । जरी तो ठाव नेदी तिशी ॥१॥

तिणें जावें कवण्या ठाया । मज सांगा पंढरिराया ॥ध्रु.॥

जळ क्षोभलें जलचरां । माता बाळा नेदी थारा ॥२॥

तुका ह्मणे आलों शरण । देवा त्वां कां धरिलें मौन्य ॥३॥

बैसो आतां मनीं । आले तैसें चि वदनीं ॥१॥

मग अवघें चि गोड । पुरे सकळ हि कोड ॥ध्रु.॥

बाहेरील भाव । तैसा अंतरीं हि वाव ॥२॥

तुका ह्मणे मणि । शोभा दाखवी कोंदणीं ॥३॥

वेठी ऐसा भाव । न करी अहाच उपाव ॥१॥

रूप डसवी न जिवा । अवघा ये च ठायीं हेवा ॥ध्रु.॥

कृपणाचेपरि । लेखा पळनिमिषेवरि ॥२॥

तुका ह्मणे आस । संनिध चि जगदीशा ॥३॥

सर्वसुखा अधिकारी । मुखें उच्चारी हरिनाम ॥१॥

सर्वांगें तो सवाौत्तम । मुखीं नाम हरीचें ॥ध्रु.॥

ऐशी उभारिली बाहे। वेदीं पाहें पुराणीं ॥२॥

तुका ह्मणे येथें कांही । संदेह नाहीं भरवसा ॥३॥

जो का निर्गुण निराकार । तेथें धरियेले अवतार ॥१॥

निर्गुण होता तो सगुणासि आला । भक्तिसाटीं प्रगटला ॥ध्रु.॥

जो का त्रिभुवनचाळक । तो हा नंदाचा बाळक ॥२॥

सोडविलें वसुदेवदेवकीसि । अवतार धरिला तिचे कुशी ॥३॥

मारियेला कंसराणा । राज्यीं स्थापिलें उग्रसेना ॥४॥

तुका ह्मणे देवादिदेव । तो हा उभा पंढरिराव ॥५॥

जुनाट हें धन अंत नाहीं पार । खात आले फार सरलें नाहीं ॥१॥

नारद हा मुनि शुक सनकादिक । उरलें आमुप तुह्मां आह्मां ॥ध्रु.॥

येथूनियां धना खाती बहु जन । वाल गुंज उणें जालें नाहीं ॥२॥

तुका ह्मणे धना अंत नाहीं पार । कुंटित चार वाचा तेथें ॥३॥

कोडियाचें गोरेपण । तैसें अहंकारीज्ञान ॥१॥

त्यासि अंतरीं रिझे कोण । जवळी जातां चिळसवाण ॥ध्रु.॥

प्रेतदेह गौरविलें। तैसें विटंबवाणें जालें ॥२॥

तुका ह्मणे खाणें विष्ठा । तैशा देहबुद्धिचेष्टा ॥३॥

पाया जाला नारू । तेथें बांधला कापूरु ।

तेथें बिबव्याचें काम । अधमासि तों अधम ॥१॥

रुसला गुलाम । धणी करीतो सलाम ।

तेथें चाकराचें काम । अधमासि तों अधम ॥ध्रु.॥

रुसली घरची दासी । धणी समजावी तियेसि ।

तेथें बटकीचें काम। अधमासि तों अधम ॥२॥

देव्हा†यावरि विंचू आला । देवपूजा नावडे त्याला ।

तेथें पैजारेचें काम । अधमासि तों अधम ॥३॥

तुका ह्मणे जाती । जातीसाटीं खाती माती ॥४॥

ब्राह्मणा न कळे आपुलें तें वर्म । गंवसे परब्रह्म नामें एका ॥१॥

लहानथोरासि करितों प्रार्थना । दृढ नारायणा मनीं धरा ॥ध्रु.॥

सर्वांप्रति माझी हे चि असे विनंती । आठवा श्रीपती मनामाजी ॥२॥

केशव नारायण करितां आचमन । ते चि संध्या स्नान कर्म क्रिया ॥३॥

नामें करा नित्य भजन भोजन । ब्रह्मकर्म ध्यान याचे पायीं ॥४॥

तुका ह्मणे हें चि निर्वाणींचें शस्त्र । ह्मणोनि सर्वत्र स्मरा वेगीं ॥५॥

नरदेह वांयां जाय । सेवीं सद्ग‍ूचे पाय ॥१॥

सांडोनियां अहंभाव । धरीं भक्ती पूजीं देव ॥ध्रु.॥

थोराचिये वाटे। जातां भवशोक आटे ॥२॥

प्रल्हादातें तारी । तुका ह्मणे तो कंठीं धरीं ॥३॥

संचित तैशी बुद्धि उपजे मनामधीं । सांगितलें सिद्धि नव जाय ॥१॥

ज्याचा जैसा ठेवा तो त्यापाशीं धांवे । न लगती करावे उपदेश ॥२॥

घेऊन उठती आपुलाले गुण । भविष्याप्रमाणें तुका ह्मणे ॥३॥

कुरंगीपाडस चुकलेसे वनीं । फुटे दुःखेंकरोनि हृदय त्याचें ॥१॥

तैसा परदेशी जालों तुजविण । नको हो निर्वाण पाहूं माझें ॥ध्रु.॥

अपराध्याच्या कोटि घालीं सर्व पोटीं । नको या शेवटीं उपेक्षूं गा ॥२॥

तुका ह्मणे असों द्यावी माझी चिंता । कृपाळु अनंता पांडुरंगा ॥३॥

धन्य जालों हो संसारीं । आह्मी देखिली पंढरी ॥१॥

चंद्रभागे करूं स्नान । पुंडलीकाचें दर्शन ॥ध्रु.॥

करूं क्षेत्रप्रदिक्षणा। भेटूं सत या सज्जनां ॥२॥

उभे राहूं गरुडपारीं । डोळेंभरुनी पाहों हरी ॥३॥

तुका ह्मणे वाळवंटीं । महालाभ फुकासाटीं ॥४॥

पंढरीचा वारकरी । खेपा वैकुंठबंदरीं ॥१॥

तया नाहीं आणखी पेणें । सदा वैकुंठीं राहाणें ॥ध्रु.॥

आला गेला केल्या यात्रा । उद्धरिलें कुळा सर्वत्रा ॥२॥

तुका ह्मणे नाहीं । यासि संदेह कल्पांतीं ही ॥३॥

सोडियेल्या गाई नवलक्ष गोपाळीं । सवें वनमाळी चालियेला ॥१॥

सुदीन समय भाग्याचा उदय । चारावया गाई वनामाजी ॥ध्रु.॥

गाईगोपाळांच्या संगें चाली हरि । क्रीडा नानापरि खेळताति ॥2 ॥

काठी कांबळीया मोहरीया पोंवा । सिदोरी गांजिवा खांद्यावरि ॥३॥

गोधनें संवगडे खेळे नानापरी । आले भीमातीरीं वेणुनादा ॥४॥

तेथें उभा ठेला गोपाळांसहित । सिदोरिया सोडीत बैसे तेथें ॥५॥

तुका ह्मणे ज्यांनीं आणिल्या भाकरी । नेऊनियां हरीपुढें देती ॥६॥

ज्यां जैसी आवडी त्यां तैसा विभाग । देत पांडुरंग तृप्ति जाली ॥१॥

मुखींचें उिच्छष्ट हिरोनियां खात । विस्मित विधाता देखोनियां ॥ध्रु.॥

दिलें जें गोपाळां तें नाहीं कोणासि । विस्मित मानसीं सुरवर ॥२॥

देव ॠषि मुनि सिद्ध हे चारण । शिव मरुद्गण चंद्र सूर्य ॥३॥

तुका ह्मणे आले सकळ हि सुरवर । आनंदें निर्भर पाहावया ॥४॥

आले सुरवर नानापक्षी जाले । सकळ अवतरले श्वापदवेषें ॥१॥

श्वानखररूपी होऊनियां आले । उिच्छष्ट कवळ वेचिताति ॥ध्रु.॥

होऊनियां दीन हात पसरिती । मागोनियां घेती उष्टावळी ॥२॥

अभिमान आड घालोनि बाहेरि । तयां ह्मणे घ्या रे धणी ॥३॥

तुका ह्मणे धणी लाधली अपार । तया सुखा पार काय सांगों ॥४॥

एकमेकीं घेती थडका । पाडी धडका देऊनि ॥१॥

एकमेका पाठीवरि । बैसोनि करिती ढवाळी ॥ध्रु.॥

हाता हात हाणे लाही । पळतां घाई चुकविती ॥२॥

तुका ह्मणे लपणी चपणी । एका हाणी पाठीवरी ॥३॥

चला वळूं गाई । दूर अंतरल्या भाई ॥१॥

खेळ खेळतां जाला शीण । कोण करी वणवण ॥ध्रु.॥

गाई हकारी कान्हया । ह्मणोनि लागती ते पायां ॥२॥

तुका ह्मणे द्यावें । नाम संकीर्तन बरवें ॥३॥

नाहीं संसाराची चाड । गाऊं हरिचें नाम गोड ॥१॥

हो का प्राणाचा ही घात । परि हा न सोडीं अनंत ॥ध्रु.॥

जन्मोजन्मीं हा चि धंदा । संतसंग राहो सदा ॥२॥

तुका ह्मणे भाव । तो हा जाणा पंढरिराव ॥३॥

हरीविण जिणें व्यर्थ चि संसारीं । प्रेत अळंकारीं मिरवत ॥१॥

देवाविण शब्द व्यर्थ चि कारण । भांड रंजवण सभेसि गा ॥ध्रु.॥

आचार करणें देवाविण जो गा । सर्पाचिया अंगा मृदुपण ॥२॥

तुका ह्मणे काय बहु बोलों फार । भक्तीविण नर अभाग्य कीं ॥३॥

जालासि पंडित पुराण सांगसी । परि तूं नेणसी मीं हें कोण ॥१॥

गाढवभरी पोथ्या उलथिशी पानें । परि गुरुगम्यखुणे नेणशी बापा ॥२॥

तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना ॥३॥

स्वप्नींच्या व्यवहारा काळांतर लेखा । जागृतीसि रुका गांठ नाहीं ॥१॥

तेवीं शब्दज्ञानें करिती चावटी । ज्ञान पोटासाटीं विकों नये ॥ध्रु.॥

बोलाची च कढी बोलाचा ची भात । जेवूनियां तृप्त कोण जाला ॥२॥

कागदीं लिहिली नांवाची साकर। चाटितां मधुर केवीं लागे ॥३॥

तुका ह्मणे जळो जळो त्याचें ज्ञान। यमपुरी कोण दंड साहे ॥४॥

भूत नावरे कोणासी । पुंडलीकें खिळिलें त्यासी ॥१॥

समचरण असे विटे । कटिकर उभें नीट ॥ध्रु.॥

वाळुवंटीं नाचती संत । प्रेमामृतें डुल्लत ॥२॥

तुका ह्मणे पुंडलीका । भक्तिबळें तूं चि निका ॥३॥

आपुले वरदळ नेदा । एवढी गोविंदा कृपणता ॥१॥

यावर बा तुमचा मोळा । हा गोपाळा कळेना ॥ध्रु.॥

सेवा तरी घेतां सांग । चोरिलें अंग सहावेना ॥२॥

तुका जरी क्रियानष्ट । तरी कां कष्ट घेतसां ॥३॥

भीमातिरींचा नाटक । यानें लावियेलें चेटक ॥१॥

मन बुद्धि जाली ठक । नेणे संसाराची टुक ॥ध्रु.॥

कैशी प्रसंगीक वाणी । प्रत्यादर कडसणी ॥२॥

तुका ह्मणे मोठा ठक । जेथें तेथें उभा ठाके ॥३॥

कां रे दाटोन होतां वेडे । देव आहे तुह्मांपुढें ॥१॥

ज्यास पाठ नाहीं पोट । करी त्रैलोक्याचा घोंट ॥ध्रु.॥

तुमची तुह्मां नाहीं सोय । कोणाचें काय जाय ॥२॥

तुका गातो नामीं । तेथें नाहीं आह्मी तुह्मी ॥३॥

नव्हे हें कवित्व टांकसाळी नाणें । घेती भले जन भले लोक ॥१॥

लागलासे झरा पूर्ण नवनीतें । सेविलियां हित फार होय ॥२॥

तुका ह्मणे देवा केला बलात्कार । अंगा आलें फार महंतपण ॥३॥

सांवळें सुंदर पाहे दृष्टिभरि । ऐसें कांहीं करीं मन माझें ॥१॥

मना तुज ठाव दिला त्याचे पायीं । राहें विठाबाईसवें सदा ॥ध्रु.॥

मना नको धरूं आणिकांचा संग । नाहीं पांडुरंग जयां मनीं ॥२॥

वरपंग भाव नको ह्मणे तुका । करीं प्राणसखा नारायणा ॥३॥

एकली वना चालली राना । चोरुनि जना घराचारी ॥१॥

कोणी नाहीं संगीसवें । देहभावें उदास ॥ध्रु.॥

जाउनि पडे दुर्घटवनीं। श्वापदांनीं वेढिली ॥२॥

मार्ग न चले जातां पुढें । भय गाढें उदेलें ॥३॥

मागील मागें अंतरलीं । पुढील चाली खोळंबा ॥४॥

तुका ह्मणे चित्तीं यासि । हृदयस्थासी आपुल्या ॥५॥

पडली घोर रजनी । संगी कोणी नसे चि ॥१॥

पहा हो कैसें चालविलें । पिसें गोवलें लावूनि ॥ध्रु.॥

कोठें लपविलें तें अंग । होता संग दिला तो ॥ ।2॥

मज कधीं नव्हतें ठावें । दोही भावें वाटोळें ॥३॥

तुका ह्मणे कैंची उरी । दोहीपरि नाडिलें ॥४॥

उदार कृपाळ पतितपावन । िब्रदें नारायणा जाती वांयां ॥१॥

वर्णिलासि श्रुति नेणे तुझा पार । राहे मौनाकार नेति ऐसें ॥ध्रु.॥

तेथें माझा धांवा पावे कोणीकडे । अदृष्ट हें पुढें वोडवलें ॥२॥

कोण ऐसा भक्त लाधला भाग्यासी । आठवण ऐसी द्यावी तुज ॥३॥

तुका ह्मणे नको पाहों माझा अंत । जाणोनि हे मात उडी घालीं ॥४॥

ज्याचें जैसें भावी मन । त्यासि देणें दरुषण ॥१॥

पुरवूं जाणे मनिंची खूण । समाधान करोनि ॥ध्रु.॥

आपणियातें प्रगट करी । छाया वरी कृपेची ॥२॥

तुका ह्मणे केले दान । मन उन्मन हरिनामीं ॥३॥

कां रे पुंड्या मातलासी । उभें केलें विठ्ठलासि ॥१॥

विस्त क्षीरसागरवासीं । आला उभा पंढरीसि ॥ध्रु.॥

भक्ती देखोनि निकट । देवें सोडिलें वैकुंठ ॥२॥

तुका ह्मणे बळी । तूं चि एक भूमंडळीं ॥३॥

शेवटींची विनंती । ऐका ऐका कमळापती ॥१॥

काया वाचा मन । चरणीं असे समर्पण ॥ध्रु.॥

जीवपरमात्मा ऐक्यासि। सदा वसो हृदयेंसीं ॥२॥

तुका ह्मणे देवा । कंठीं वसावें केशवा ॥३॥

माझें परिसावें गा†हाणें । चित्त द्यावें नारायणें ॥१॥

माझे हृदयींचें वर्म । देवा जाणशी तूं कर्म ॥ध्रु.॥

सबाह्यअंतरसाक्ष। ऐसा वेदीं केला पक्ष ॥२॥

तुका ह्मणे नेणां । काय सांगों नारायणा ॥३॥

गुरुचिया मुखें होइल ब्रह्मज्ञान । न कळे प्रेमखुण विठोबाची ॥१॥

वेदातें विचारा पुराणातें पुसा । विठोबाचा कैसा प्रेमभाव ॥२॥

तुका ह्मणे सांडा जाणिवेचा शीण । विठोबाची खूण जाणती संत ॥३॥

देव आतां आह्मीं केला असे ॠणी । आणिका वांचूनि काय गुंता ॥१॥

एकाचें आर्जव करू एकनिष्ठ । आणिकांचा बोभाट कामा नये ॥ध्रु.॥

बहुतांचे आर्जव केलिया खटपट । नाहीं हा शेवट शुद्ध होत ॥२॥

पुरता विचार आणोनी मानसीं । अंतरलों सर्वासि पइप देखा ॥३॥

तुका ह्मणे देवा चरणीं असो भाव । तेणें माझा जीव संतोष हा ॥४॥

पापाची वासना नको दावूं डोळां । त्याहुनि अंधळा बराच मी ॥१॥

निंदेचें श्रवण नको माझे कानीं । बधिर करोनि ठेवीं देवा ॥ध्रु.॥

अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याजहुनि मुका बराच मी ॥२॥

नको मज कधीं परस्त्रीसंगति । जनांतुन माती उठतां भली ॥३॥

तुका ह्मणे मज अवघ्याचा कांटाळा । तूं एक गोपाळा आवडसी ॥४॥

कीर्त्तनाचा विकरा मातेचें गमन । भाड खाई धन विटाळ तो ॥१॥

हरिभक्ताचि माता हे हरिगुणकीर्त्ति । इजवर पोट भरिती चांडाळ ते ॥ध्रु.॥

अंत्यज हा ऐसें कल्पांतीं करीना । भाड हे खाईना जननीची ॥२॥

तुका ह्मणे त्याचें दर्शन ही खोटें । पूर्वजांसि नेटें नरका धाडी ॥३॥

पंढरी पावन जालें माझें मन । आतां करूं ध्यान विठोबाचें ॥१॥

आतां ऐसें करूं नाम गाऊं गीतीं । सुखाचा सांगाती विठो करूं ॥ध्रु.॥

संग करूं त्याचा तो सखा आमचा । अनंतां जन्मांचा मायबाप ॥२॥

परतोनि सोई धरीं कां रे मना । विठ्ठलचरणा घालीं मिठी ॥३॥

घातलीसे मिठी नाही भक्तिभाव । उदार पंढरिराव तुका ह्मणे ॥४॥

येइप गे विठ्ठले विश्वजीवनकले । सुंदर घननीळे पांडुरंगें ॥१॥

येइप गे विठ्ठले करुणाकल्लोळे । जीव कळवळे भेटावया ॥ध्रु.॥

न लगती गोड आणीक उत्तरें । तुझें प्रेम झुरे भेटावया ॥२॥

तुका ह्मणे धांव घालीं कृष्णाबाई । क्षेम चाहूंबाही देइप मज ॥३॥

कटावरी कर कासया ठेविले । जननी विठ्ठले जीवलगे ॥१॥

शंखचक्रगदाकमळमंडित । आयुधें मंडित कृष्णाबाई ॥ध्रु.॥

क्षण एक धीर होत नाहीं चित्ता । केव्हां पंढरिनाथा भेटशील ॥२॥

तुका ह्मणे हें चि करीं देइप । तइप च विश्रामा पावईन ॥३॥

आतां मोकलावें नव्हे हें उचित । तरी कृपावंत ह्मणवावें ॥१॥

पूवाअ भक्त जाले सर्व आपंगिले । नाहीं उपेक्षिले तुह्मीं कोणी ॥ध्रु.॥

माझिया वेळेसि कां गा लपालासी । विश्व पोसितोसि लपोनियां ॥२॥

करावी ह्मणावी सर्वां भूतीं दया । तरी भेटावया येईन मी ॥३॥

तरी माझे हाती देइप मनबुद्धि । जरि दयानिधि येशील तूं ॥४॥

तुका ह्मणे तूं चि अवघा सूत्रधारी । माझी सत्ता हरी काय आहे ॥५॥

माझें कोण आहे तुजविण देवा । मुकुंदा केशवा नारायणा ॥१॥

वाट पाहतसें कृपेच्या सागरा । गोपीमनोहरा पांडुरंगा ॥ध्रु.॥

साच करीं हरी आपुली िब्रदावळी । कृपेनें सांभाळीं महाराजा ॥२॥

क्षमा करीं सर्व अपराध माझा । लडिवाळ मी तुझा पांडुरंगा ॥३॥

साह्य होसी तरी जाती साही वैरी । मग सुखें अंतरीं ध्यान तुझें ॥४॥

कृपा करोनि देइप दया क्षमा शांती । तेणें तुझी भक्ति लाभईल ॥५॥

माझें हें सामर्थ्य नव्हे नारायणा । जरी कांहीं करुणा येइल तुज ॥६॥

तुका ह्मणे मज कैसें आपंगा जी । आपुलेंसें करा जी पांडुरंगा ॥७॥

अपराध जाले जरी असंख्यात । तरी कृपावंत नाम तुझें ॥१॥

तुझें लडिवाळ तुज कृपा यावी । म्यां वाट पाहावी कवणाची ॥ध्रु.॥

मायबाप माझा रुक्मादेवीवर । हा दृढ निर्धार अंतरींचा ॥२॥

तुका ह्मणे कोणे गोष्टीचें संकष्ट । न घालीं मज भेट नारायणा ॥३॥

आधीं कां मज लावियेली सवे । आतां न राहावे तुजविण ॥१॥

पहिलें चि तोंडक कां गा नाहीं केलें । आतां उपेक्षिलें न सोडीं मी ॥ध्रु.॥

कृपेच्या सागरा न पाहें निर्वाण । जालों तुजवीण कासावीस ॥२॥

तुका ह्मणे कोठें गुंतलेति हरी । येइप झडकरी पांडुरंगा ॥३॥

बा रे पांडुरंगा केव्हां येशी भेटी । जाहालों हिंपुटी तुजवीण ॥१॥

तुजवीण सखें न वटे मज कोणी । वाटतें चरणीं घालूं मिठीं ॥ध्रु.॥

ओवाळावी काया चरणांवरोनि । केव्हां चक्रपाणी भेटशील ॥२॥

तुका ह्मणे माझी पुरवीं आवडी । वेगीं घालीं उडी नारायणा ॥३॥

पंचाग्निसाधन करूं धूम्रपान । काय तीर्थाटण करूं सांग ॥१॥

सांग कोणे देशीं आहे तुझें गांव । घेऊनियां धांव येऊं तेथें ॥ध्रु.॥

सांग कांहीं वृत्त कोण करूं व्रत । जेणें कृपावंत होशील तूं ॥२॥

वाटतें सेवटीं जालासि निष्ठ‍ । न देसी उत्तर तुका ह्मणे ॥३॥

तुजवीण तीळभरी रिता ठाव । नाहीं ऐसें विश्व बोलतसे ॥१॥

बोलियेले योगी मुनी साधु संत । आहेसि या आंत सर्वांठायीं ॥ध्रु.॥

मी तया विश्वासें आलों शरणागत । पूवाअचें अपत्य आहें तुझें ॥२॥

अनंत ब्रह्मांडें भरोनि उरलासि । मजला जालासि कोठें नाहीं ॥३॥

अंतपार नाहीं माझिया रूपासि । काय सेवकासि भेट देऊं ॥४॥

ऐसें विचारिलें ह्मणोनि न येशी । सांग हृषीकेशी मायबापा ॥५॥

तुका ह्मणे काय करावा उपाय । जेणें तुझे पाय आतुडति ॥६॥

काम क्रोध आड पडले पर्वत । राहिला अनंत पलीकडे ॥१॥

नुलंघवे मज न सांपडे वाट । दुस्तर हा घाट वैरियांचा ॥ध्रु.॥

आतां कैंचा मज सखा नारायण । गेला अंतरोन पांडुरंगा ॥२॥

तुका ह्मणे व्यर्थ मोलाचें शरीर । गेलें हा विचार कळों आला ॥३॥

नव्हे निष्ठावंत तुज काय बोल । सेवेविण मोल मागतसें ॥ध्रु.॥

न घडे भजन शुद्ध भावनिष्ठा । आपुल्या अदृष्टावरी बोल ॥ध्रु.॥

पूवाअ जाले भक्त असंख्य विरक्त । काम क्रोध अहंते निर्दाळिलें ॥२॥

ऐसी अंगवण नाहीं मज देवा । करीतसें हेवा भेटावयाचा ॥३॥

कृपा करोनियां पुरवीं असोसी । आपुल्या िब्रदासी राखावया ॥४॥

तुका ह्मणे एक बाळक अज्ञातें । त्यासि हे पोसित मायबापें ॥५॥

नाटाचे 2

अगा ये मधुसूदना माधवा । अगा ये कमळापती यादवा ।

अगा श्रीधरा केशवा । अगा बांधवा द्रौपदीच्या ॥१॥

अगा विश्वव्यापका जनार्दना । गोकुळवासी गोपिकारमणा ।

अगा गुणनिधि गुणनिधाना । अगा मर्दना कंसाचिया ॥ध्रु.॥

अगा सवाौत्तमा सर्वेश्वरा । गुणातीता विश्वंभरा ।

अगा निर्गुणा निराकारा । अगा आधारा दीनाचिया ॥२॥

अगा उपमन्यसहाकारा । अगा शयना फणिवरा ।

अगा काळकृतांत असुरा । अगा अपारा अलक्षा ॥३॥

अगा वैकुंठनिवासा । अगा अयोध्यापति राजहंसा ।

अगा ये पंढरिनिवासा। अगा सर्वेशा सहजरूपा ॥४॥

अगा परमात्मा परमपुरुषा। अगा अव्यया जगदीशा ।

अगा कृपाळुवा आपुल्या दासा । तोडीं भवपाशा तुका ह्मणे ॥५॥

कैसी करूं तुझी सेवा । ऐसें सांगावें जी देवा ।

कैसा आणूं अनुभवा । होशी ठावा कैशापरी ॥१॥

कर्मभ्रष्ट माझें मन । नेणें जप तप अनुष्ठान ।

नाहीं इंिद्रयांसि दमन । नव्हे मन एकविध ॥ध्रु.॥

नेणे यातीचा आचार । नेणें भक्तीचा विचार ।

मज नाहीं संतांचा आधार । नाहीं िस्थर बुद्धि माझी ॥२॥

न सुटे मायाजाळ । नाहीं वैराग्याचें बळ ।

न जिंकवती सबळ । काम क्रोध शरीरीं ॥३॥

आतां राख कैसें तरि । मज नुपेक्षावें हरी ।

तुझीं िब्रदें चराचरीं । तैसीं साच करीं तुका ह्मणे ॥४॥

भीमातीरवासी । तेथें निश्चयेंसी काशी ॥१॥

मुख्यमुक्तीचें माहेर । ऐसें जाणा पंढरपुर ॥ध्रु.॥

घडे भींवरेशीं स्नान । त्यासि पुन्हा नाहीं जन्म ॥२॥

भाव धरोनि नेटका । मोक्ष जवळी ह्मणे तुका ॥३॥

जाली गाढवी दुधाळ । महिमा गाईची पावेल ॥१॥

श्वान जालेंसे चांगलें । तरी कां सांगातें जेवील ॥ध्रु.॥

जाली सिंदळा चांगली । तरि कां पतिव्रता जाली ॥२॥

तुका ह्मणे ऐशा जाति । काय उंचपण पावती ॥३॥

काशीयात्रा पांच द्वारकेच्या तीन । पंढरीची जाण एक यात्रा ॥१॥

काशी देह विटंबणें द्वारकें जाळणें । पंढरीशी होणें ब्रह्मरूप ॥ध्रु.॥

अठरापगडयाती सकळ हि वैष्णव । दुजा नाहीं भाव पंढरीसि ॥२॥

तुका ह्मणे असो अथवा नसो भाव । दर्शनें पंढरिराव मोक्ष देतो ॥३॥

हें चि मागणें विठाबाई । पायीं ठेवूनियां डोई ॥१॥

शांति दया अंतःकरणीं । रंगो रामनामीं वाणी ॥ध्रु.॥

मूळ द्वंद्वाचें विघडो । निजानंदीं वृत्ति जडो ॥२॥

तुका ह्मणे हरी । आतां आपुलेंसें करीं ॥३॥

करोनि स्नानविधि आणि देवधर्म । क्रिया नित्यनेम तुजसाटीं ॥१॥

तुजलागीं दानें तुजलागीं तीथॉ । सकळ ही व्रतें तुजलागीं ॥ध्रु.॥

सकळ चित्तवृत्ति दिवस आणि राती । आवडशी प्रीती नारायणा ॥२॥

तुका ह्मणे याहो पवित्राच्या राया । प्राणविसावया पांडुरंगा ॥३॥

पहावा नयनीं विठ्ठल चि एक । कांहीं तरी सार्थक संसाराचें ॥१॥

कोठें पाहों तुज कां गा लपालासि । कांहीं बोल मशीं नारायणा ॥ध्रु.॥

वाटते उदास मज दाही दिशा । तुजविण हृषीकेशा वांचोनियां ॥२॥

नको ठेवूं मज आपणा वेगळें । बहुत कळवळें तुजलागीं ॥३॥

तुका ह्मणे भेटी देइप नारायणा । घडी कंठवेना तुजविण ॥४॥

पूवाअ बहुतांचे केले प्रतिपाळ । तें मज सकळ श्रुत आहे ॥१॥

अज अविनाश निर्गुण निरामय । विचारिलें काय त्यांचे वेळे ॥ध्रु.॥

तयांचियें वेळे होशी कृपावंत । माझा चि कां अंत पहातोसि ॥२॥

नारद प्र†हाद उपमन्य धुरू । त्यांचा अंगीकारु कैसा केला ॥३॥

अंबॠषीसाटीं गर्भवास जाले । कां गा मोकलिलें कृपासिंधु ॥४॥

धर्माचें उिच्छष्ट अर्जुनाचीं घोडीं । आणीक सांकडीं कितीएक ॥५॥

जालासि लुगडीं तया द्रौपदीचीं । न ये कां आमुची कृपा कांहीं ॥६॥

तुका ह्मणे कां गा जालासि कठीण । माझा भाग सीण कोण जाणे ॥७॥

कासयासि व्यर्थ घातलें संसारीं । होतें तैसें जरी तुझे चित्तीं ॥१॥

तुझिये भेटीची थोर असे आस । दिसोनी निरास आली मज ॥ध्रु.॥

आतां काय जिणें जालें निरर्थक । वैकुंठनायक भेटे चि ना ॥२॥

आडलासि काय कृपेच्या सागरा । रकुमादेवीवरा सोइरिया ॥३॥

तुका ह्मणे देइप चरणाची सेवा । नुपेक्षीं केशवा मायबापा ॥४॥

पक्षीयाचे घरीं नाहीं सामुगरी । त्यांची चिंता करी नारायण ॥१॥

अजगर जनावर वारुळांत राहे । त्याजकडे पाहे पांडुरंग ॥ध्रु.॥

चातक हा पक्षी नेघे भूमिजळ । त्यासाटीं घननीळ नित्य वर्षे ॥२॥

तुका ह्मणे आह्मी पिप्पलिकांची जात । पुरवीं मनोरथ पांडुरंगा ॥३॥

रामनाम हा चि मांडिला दुकान । आहे वानोवाण घ्यारे कोणी ॥१॥

नका कोणी करूं घेता रे आळस । वांटितों तुह्मांस फुकाचें हें ॥ध्रु.॥

संचितासारिखे पडे त्याच्या हाता । फारसें मागतां तरी न ये ॥२॥

तुका ह्मणे आह्मीं सांठविलें सार । उरलिया थार विचारितां ॥३॥

बहुजन्मां शेवटीं स्वामी तुझी भेटी । बहु मोह पोटीं थोर जाला ॥१॥

बहु पुरें पाहिलीं बहु दिशा शोधिली । बहु चिंता वाहिली दुर्भराची ॥ध्रु.॥

बहु काळ गेले अनुचित केलें । बहु नाहीं गाइलें नाम तुझें ॥२॥

ऐसा मी अपराधी अगा कृपानिधि । बहु संतां संनिधि ठेवीं तुका ॥३॥

कोण उपाव करूं भेटावया । जाळावी हे काया ऐसें वाटे ॥१॥

सोडोनियां गांव जाऊं वनांतरा । रुकुमादेवीवरा पहावया ॥ध्रु.॥

करूं उपवास शोधूं हें शरीर । न धरवे धीर नारायणा ॥२॥

जाती आयुष्याचे दिवस हे चारी । मग केव्हां हरी भेटशील ॥३॥

तुका ह्मणे कांहीं सांगा विचारोनि । विठो तुझे मनीं असेल तें ॥४॥

माय बाप बंधु सोयरा सांगाती । तूं चि माझी प्रीति गण गोत ॥१॥

शरण आलीं त्यांचीं वारिलीं दुरितें । तारिले पतित असंख्यात ॥ध्रु.॥

इतर कोण जाणे पावलें विश्रांति । न येतां तुजप्रति शरणागत ॥२॥

तयामध्यें मज ठेवीं नारायणा । लक्षुमीरमणा सोइरिया ॥३॥

तुका ह्मणे देइप दर्शनाचा लाभ । जे पाय दुर्लभ ब्रह्मादिकां ॥४॥

पाप ताप माझे गुणदोष निवारीं । कृष्णा विष्णु हरी नारायणा ॥१॥

काम क्रोध वैरी घालोनि बाहेरी । तूं राहें अंतरीं पांडुरंगा ॥ध्रु.॥

करिशील तरी नव्हे कांइ एक । निर्मिलें jयैलोक्य हेळामात्रें ॥२॥

समर्थासि काय आह्मीं शिकवावें । तुका ह्मणे यावें पांडुरंगा ॥३॥

This abhang still carries a transcription error we could not repair automatically.

ये गा महाविष्णु अनंतभुजाच्या । आह्मां अनाथांच्या माहेरा ये ॥१॥

भेटावया तुज ओढे माझा जीव । एकवेळा पाय दावीं डोळां ॥ध्रु.॥

आणीक हे आर्त नाहीं नारायणा । ओढे हे वासना भेटावया ॥२॥

वाटे चित्तीं काय करावा विचार । चरण सुंदर पहावया ॥३॥

तुका ह्मणे माझे पुरवीं मनोरथ । येई गा न संवरीत पांडुरंगा ॥४॥

काय पाहतोसि कृपेच्या सागरा । नराच्या नरेंद्रा पांडुरंगा ॥१॥

नामाचा प्रताप िब्रदाचा बडिवार । करावा साचार नारायणा ॥ध्रु.॥

कलीमाजी देव बौध्यरूप जाला । जगाचिया बोला लागूं नका ॥२॥

माय पुत्रा काय मारूं पाहे कळी । जगाची ढवाळी काय काज ॥३॥

तुका ह्मणे या हो कृपेच्या सागरा । रुकुमादेवीवरा मायबापा ॥४॥

रामनामाचे पवाडे । अखंड ज्याची वाचा पढे ॥१॥

धन्य तो एक संसारीं । रामनाम जो उच्चारी ॥ध्रु.॥

रामनाम गर्जे वाचा । काळ आज्ञाधारक त्याचा ॥ 2 ॥

तुका ह्मणे रामनामीं । कृतकृत्य जालों आह्मीं ॥३॥

येइल घरा देव न धरीं संदेहा । फकिराचा यावा व्हावा जेव्हां ॥१॥

होइल फकीर योगी महानुभाव । घडीघडी देव सांभाळील ॥२॥

तुका ह्मणे ऐसें बोलती बहुत । येणे गुणें संत जाले राम ॥३॥

भक्तीवीण जिणें जळो लाजिरवाणें । संसार भोगणें दुःखमूळ ॥१॥

वीसलक्ष योनि वृक्षामाजी घ्याव्या । जलचरीं भोगाव्या नवलक्ष ॥ध्रु.॥

अकरालक्ष योनि किड्यांमाजी घ्याव्या । दशलक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये ॥२॥

तीसलक्ष योनि पशूंचीये घरीं । मानवाभीतरीं चारलक्ष ॥३॥

एकएक योनि कोटिकोटि फेरा । मनुष्यदेहाचा वारा मग लागे ॥४॥

तुका ह्मणे तेव्हां नरदेह नरा । तयाचा मातेरा केला मूढें ॥५॥

तुजवांचून कोणा शरण । जाऊं आतां कर जोडून ॥१॥

कोण करील माझें साहे । चित्तीं विचारूनि पाहें ॥ध्रु.॥

तूं तंव कृपेचा सागर । दीनबंधु जगदोद्धार ॥२॥

तुका ह्मणे निका । भवसिंधु तारक नौका ॥३॥

हातीं धरिलियाची लाज । देवा असोंदे गा तुज ॥१॥

आहें अमंगळ दुर्बळ । होइप दीन तूं दयाळ ॥ध्रु.॥

बाळ सेंबडें मातेसि । काय नावडे तियेसि ॥२॥

तुका ह्मणे जाणें । करोनि देहाचें सांडणें ॥३॥

जळोजळो तें गुरुपण । जळोजळो तें चेलेपण ॥१॥

गुरु आला वेशीद्वारीं । शिष्य पळतों खिंडोरीं ॥ध्रु.॥

काशासाटीं जालें येणें । त्याचें आलें वर्षासन ॥२॥

तुका ह्मणे चेला । गुरू दोघे हि नरकाला ॥३॥

अगा पंढरीच्या राया । वेगीं येइप तूं सावया ॥१॥

दीनबंधु तुझें नाम । देइप आपुलें आह्मां प्रेम ॥ध्रु.॥

जीवनकळा तूं विश्वाची । तूं चि माउली अनाथाची ॥२॥

तुका ह्मणे पुंडलिका । ठेवीं मस्तकीं पादुका ॥३॥

विटेवरी समचरण । तो हा रुक्मिणीरमण ॥१॥

वेदशास्त्रा माहेर । केले दासा उपकार ॥ध्रु.॥

नामापाशीं चारी मुक्ति। पहा हृदयीं प्रतीति ॥२॥

तुका ह्मणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥३॥

सकळ हे माया नागवे कवणा । भांबाविलें जना दाही दिशा ॥१॥

आशा तृष्णा दंभ लागलीं हीं पाठी । नेदी बैसों हाटीं मोह ठायीं ॥ध्रु.॥

काम क्रोध घरा लावितील आगी । निंदा हिंसा दोघी पळतां खाती ॥२॥

लाज पुढें उभी राहिली आडवी । ते करी गाढवी थोर घात ॥३॥

तुका ह्मणे चिंता घाली गर्भवासीं । ओढोनियां पाशीं चहूंकडे ॥४॥

सकळतीर्थाहुनि । पंढरी हें मुगुटमणि ॥१॥

काय सांगों तेथिल शोभा । रमावल्लभ जेथें उभा ॥ध्रु.॥

न लभे व्रततीर्थदानीं। तें या विठ्ठलदर्शनीं ॥२॥

साधु संत गाती नाम । सकळ भूतांचा विश्राम ॥३॥

तुका ह्मणे स्तुती । करूं काय सांगों किती ॥४॥

गव्हांच्या घुग†या । नाचण्यांच्या पु†या । ब†या त्या चि ब†या । पाधाणी त्या पाधाणी ॥१॥

काय थोरपण । वांयां जाळावा तो शीण । कारणापें भिन्न । निवडे तें निराळें ॥ध्रु.॥

रुचि वोजेपाशी । गरज ते जैशीतैशी । करूं नका नाशी । खावें खाणें जालें तें ॥२॥

तुका ह्मणे मोठा । काय करावा तो ताटा । नाहीं वीण निटा । पाविजेत मारग ॥३॥

आपुलिया ऐसें करी । संग धरी ज्याचा हो ॥1 ॥

ह्मणउनि परपरते । वरवरते पळतसें ॥ध्रु.॥

लोभिक तें लोभा लावी। बांधल्या गोवी वांचूनि ॥२॥

तुका ह्मणे नामगोठी । पुरे भेटी तुझी देवा ॥३॥

बरें जालीयाचे अवघें सांगाती । वाइटाचे अंतीं कोणी नाहीं ॥१॥

नोहे मातापिता नोहे कांतासुत । इतरांची मात काय सांगों ॥२॥

तुका ह्मणे जन दुतोंडी सावज । सांपडे सहज तिकडे धरी ॥३॥

मिथ्या आहे सर्व अवघें हें मायिक । न कळे विवेक मज कांहीं ॥१॥

सर्व बाजागिरी वाटती ही खरी । पहातां येथें उरी कांहीं नाहीं ॥ध्रु.॥

आतां मज दुःख वाटतें अंतरीं । उपाय झडकरी सांग कांहीं ॥२॥

पुढें कोण गति न कळे सर्वथा । तुझे पायीं माथा ठेवियेला ॥३॥

करणें तें करीं सुखें आतां हरी । तुज म्यां निर्धारीं धरियेलें ॥४॥

स्वहित तें काय न कळे सर्वथा । तारीं तूं अनंता तुका ह्मणे ॥५॥

अवघ्या कोल्ह्यांचें वर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ॥१॥

भुंकुं नका भुंकुं नका । आला तुका विष्णुदास ॥ध्रु.॥

कवणे ठायीं सादर व्हावें । नाहीं ठावें गाढवा ॥२॥

दुर्जनासि पंचानन । तुका रजरेणु संतांचा ॥३॥

तुझे ह्मणों आह्मां । मग उणें पुरुषोत्तमा ॥१॥

ऐसा धर्म काय । अमृतानें मृत्यु होय ॥ध्रु.॥

कल्पवृक्षा तळीं । गांठी बांधलिया झोळी ॥२॥

तुका ह्मणे परीस । सांपडल्या उपवास ॥३॥

कोरडिया गोष्टी नावडती मना । नाहीं ब्रह्मज्ञानाविण चाड ॥१॥

दाखवीं आपुलें सगुण रूपडें । वंदीन मी कोडें पाय तुझे ॥ध्रु.॥

न लगे तो मोक्ष मज सायुज्यता । नावडे हे वार्ता शून्याकारी ॥२॥

तुका ह्मणे चाड धरीन श्रीमुखें । येशिल कवतुकें जवळीक ॥३॥

गणेश सारजा करिती गायना । आणि देवांगना रंभे ऐशा ॥१॥

तेथें आह्मीं मानवांहीं विनवावें तें काय । सुरवर पाय वंदिति जेथें ॥ध्रु.॥

ज्याच्या गायनासी तटस्थ शंकर । त्या हि परि पार न कळे तुझा ॥२॥

तुका ह्मणे आह्मी किंकर ते किती । इंद्राची हि मति नागविशी ॥३॥

डोळियांचें दैव आजि उभें ठेलें । निधान देखिलें पंढरीये ॥१॥

काय ते वानावें वाचेचे पालवें । वेदा न बोलवे रूप ज्याचें ॥ध्रु.॥

आनंदाच्या रसें ओंतीव चांगलें । देखतां रंगलें चित्त माझें ॥२॥

तुका ह्मणे मी तों सगळाच विरालों । विठ्ठल चि जालों दर्शनानें ॥३॥

भोगियेल्या नारी । परि तो बाळब्रह्मचारी ॥१॥

ऐसी ज्याचें अंगीं कळा । पार न कळे वेदाला ॥ध्रु.॥

वळीवळी थोरथोर। मोडोनियां केले चूर ॥२॥

वांकडी कुबज्या । सरसी आणियेली वोजा ॥३॥

मल्ल रगडिला पायीं । गज झुगारिला बाहीं ॥४॥

जिवें मारियेला मामा । धांवें भक्ताचिया कामा ॥५॥

तुका ह्मणे पूर्ण । दावी भक्तीचीं विंदानें ॥६॥

वृद्धपणी न पुसे कोणी । विटंबणी देहाची ॥१॥

नव द्वारें जाली मोकळीक । गांड सरली वाजती ॥ध्रु.॥

दंत दाढा गळे थुंका । लागे नाका हनुवटी ॥२॥

शब्द नये मुखावाटा । करिती चेष्टा पोरें ती ॥३॥

तुका ह्मणे अजूनि तरी । स्मरें श्रीहरी सोडवील ॥४॥

अतित्याई देतां जीव । नये कींव देवासि ॥१॥

थोड्यासाटीं राग आला । जीव दिला गंगेंत ॥ध्रु.॥

त्यासि परलोकीं नाहीं मुक्ति । अधोगति चुकेना ॥२॥

तुका ह्मणे कृष्णराम । स्मरतां श्रम वारती ॥३॥

तुझें रूप पाहतां देवा । सुख जालें माझ्या जीवा ॥१॥

हें तों वाचे बोलवेना । काय सांगों नारायणा ॥ध्रु.॥

जन्मोजन्मींचे सुकृत । तुझे पायीं रमे चित्त ॥२॥

जरी योगाचा अभ्यास । तेव्हां तुझा निजध्यास ॥३॥

तुका ह्मणे भक्त । गोड गाऊं हरिचें गीत ॥४॥

तुजवीण मज कोण आहे देवा । मुकुंदा केशवा नारायणा ॥१॥

जोडोनियां कर कृपेच्या सागरा । गोपीमनोहरा पांडुरंगा ॥ध्रु.॥

साच करीं हरी आपुली िब्रदावळी । कृपेनें सांभाळीं मायबापा ॥२॥

साह्य होसी जरी जाती सहा वैरी । मग ध्यान करीं आवडीनें ॥३॥

सर्व अपराध क्षमा करीं माझा । लडिवाळ तुझा पांडुरंगा ॥४॥

कृपा करोनियां द्यावी क्षमा शांति । तेणें तुझी भक्ति घडेल देवा ॥५॥

ऐंसें तों सामर्थ्य नाहीं नारायणा । जरी तुज करुणा येइल कांहीं ॥६॥

तुका ह्मणे आतां आपंगावें मज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥७॥

नको विद्या वयसा आयुष्य फारसें । नाहीं मज पिसें मुक्तीचें ही ॥१॥

रामकृष्ण ह्मणतां जावो माझा प्राण । हें चि कृपादान मागतसें ॥ध्रु.॥

नको धन मान न वाढे संतान । मुखीं नारायण प्राण जावा ॥२॥

तुका ह्मणे दीन काकुलती येतों । तुज निरवितों पांडुरंगा ॥३॥

शिष्या सांगे उपदेश । गुरुपूजा हे विशेष ॥१॥

दावी आचार सोवळे । दंड कमंडलु माळे ॥ध्रु.॥

छाटी भगवी मानसीं ।व्यर्थ ह्मणवी संन्यासी ॥२॥

तुका ह्मणे लोभ । न सुटे नाहीं लाभ ॥३॥

जिकडे पाहें तिकडे उभा । अवघ्या गगनाचा गाभा॥ 1 ॥

डोळां बैसलें बैसलें । रूप राहोनि संचलें ॥ध्रु.॥

न वर्जितां दाही दिशा । जिकडे पाहें तिकडे सरिसा ॥२॥

तुका ह्मणे समपदीं । उभा दिठीचिये आधीं ॥३॥

आपटा संवदड रानचारा । दस†याचा होय तुरा ॥१॥

तैसा देवामुळें मान । नाहीं तरी पुसें कोण ॥ध्रु.॥

मृत्तिकेची ते घागरी । पाण्यासाटीं बैसे शिरी ॥२॥

तुका ह्मणे माप जाण । दाण्यासवें घेणें देणें ॥३॥

काळ सार्थक केला त्यांणी । धरिला मनीं विठ्ठल ॥१॥

नाम वाचे श्रवण कीर्त्ति । पाउलें चित्तीं समान ॥ध्रु.॥

कीर्त्तनाचा समारंभ । निदपभ सर्वदा ॥२॥

तुका ह्मणे स्वरूपसिद्धि । नित्य समाधि हरिनामीं ॥३॥

आह्मी जातों आपुल्या गांवा । आमुचा रामराम घ्यावा ॥१॥

तुमची आमची हे चि भेटी । येथुनियां जन्मतुटी ॥ध्रु.॥

आतां असों द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ॥२॥

येतां निजधामीं कोणी । विठ्ठलविठ्ठल बोला वाणी ॥३॥

रामकृष्ण मुखीं बोला । तुका जातो वैकुंठाला ॥४॥

कामधेनूचें वासरूं । खाया न मिळे काय करूं ॥१॥

ऐसें आह्मां मांडियेलें । विठो त्वां कां सांडियेलें ॥ध्रु.॥

बैसोनि कल्पद्रुमातळीं । पोटासाटीं तळमळीं ॥२॥

तुका ह्मणे नारायणा । बरें लोकीं हें दीसेना ॥३॥

तुझें नाम माझे मुखी असो देवा । विनवितों राघवा दास तुझा ॥१॥

तुझ्या नामबळें तरले पतित । ह्मणोनि माझें चित्त तुझे पायीं ॥२॥

तुका ह्मणे तुझें नाम हें सादर । गातां निरंतर सुख वाटे ॥३॥

उभय भाग्यवंत तरी च समान । स्थळीं समाधान तरी च राहे ॥१॥

युक्तीचें गौरव नसतां जिव्हाळा । सांचवणी जळा परी नाश ॥ध्रु.॥

लोखंडा परीस ज्ञानिया तो शठ । नांवाचा पालट दगड खरा ॥२॥

तुका ह्मणे अवघे विनोदाचे ठाव । एकात्मक भाव नाहीं तेथें ॥३॥

दो दिवसांचा पाहुणा चालतो उताणा । कां रे नारायणा न भजसी ॥१॥

तूं अखंड दुश्चित्ता तुज नेती अवचिता । मग पंढरीनाथा भजसी केव्हां ॥२॥

तुका ह्मणे ऐसे आहेत उदंड । तया केशव प्रचंड केवीं भेटे ॥३॥

तुझे पाय माझें भाळ । एकत्रता सर्वकाळ ॥१॥

हें चिं देइप विठाबाई । पांडुरंगे माझे आई ॥ध्रु.॥

नाहीं मोक्ष मुक्ति चाड । तुझी सेवा लागे गोड ॥२॥

सदा संग सज्जनांचा । नको वियोग पंढरीचा ॥३॥

नित्य चंद्रभागे स्नान । करीं क्षेत्रप्रदक्षण ॥४॥

पुंडलीक पाहोन दृष्टी । हषॉ नाचों वाळवंटीं ॥५॥

तुका ह्मणे पांडुरंगा । तुझें स्वरूप चंद्रभागा ॥६॥

बाईल चालिली माहेरा । संगें दिधला ह्मातारा ॥१॥

सिधा सामग्री पोटाची । सवें स्वारी बइलाची ॥ध्रु.॥

जाता पाडिली ढोरानें । सिव्या देती अन्योविन्ये ॥२॥

न सावरी आपणातें । नग्न सावलें वरतें ॥३॥

फजित केलें जनलोकीं । मेला ह्मणे पडे नरकीं ॥४॥

गोहाची हे गेली लाज । गांजितां कां तुह्मी मज ॥५॥

तुका ह्मणे जनीं । छी थू केली विटंबणी ॥६॥

तुळसीवृंदावनीं उपजला कांदा । नावडे गोविंदा कांहीं केल्या ॥१॥

तैसे वंशामध्यें जाले जे मानव । जाणावे दानव अभक्त ते ॥ध्रु.॥

केवड्यामधील निगपध कणसें । तैशीं तीं माणसें भक्तिहीन ॥२॥

तुका ह्मणे जेवीं वंदनांतिल आळी । न चढे निढळीं देवाचिया ॥३॥

शिव शक्ति आणि सूर्य गणपति । एक चि ह्मणती विष्णूस ही ॥१॥

हिरा गार दोनी मानिती समान । राजस भजनें वांयां जाती ॥ध्रु.॥

अन्य देवतांसि देव ह्मणऊन । तामस जीवन तमोयोग्या ॥२॥

वांयां जायासाठीं केलासे हव्यास । अन्य देवतांस देवपण ॥३॥

आपुलिया मुखें सांगतसे धणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥४॥

धन्य ते वैष्णव भजती केशव । सात्विक हे जीव मोक्षा योग्य ॥५॥

तुका ह्मणे मोक्ष नाहीं कोणापासीं । एका गोविंदासी शरण व्हा रे ॥६॥

तुह्मी साधु संत कैवल्यसागर । मोक्षाचे आगर तुह्मां घरीं ॥१॥

तेथें मतिमंद काय बोलों वाणी । अमृताचे धणी पाणी कां घ्या ॥ध्रु.॥

कोटी भानु तेजीं खद्योत बापुडें । तैसा तुह्मांपुढें काय बोलों ॥२॥

तुह्मी अवघे चिंतामणि कल्पतरूचीं वनें । त्यापुढें धांवणें मषकांनीं ॥३॥

वाराणशीक्षेत्र गंगा वाहे कोड । का तेथें पाड कोकणाचे ॥४॥

पल्लवाचा वारा हिमकरीं काय । गगनावरी छाय कोण करी ॥५॥

समुद्राची तृषा हरी ऐसा कोण । जगाची जी तान्ह निववितो ॥६॥

मेरूचा पाठार अवघी ते िक्षति । मषकाचे हातीं मुष्टि फावे ॥७॥

सिंहापुढें काय जंबूक आरोळी । मोतियांचे वोळी कांच काय ॥८॥

कापुरासि काय लावूनि उटावें । काय ओवाळावें दीपकासि ॥९॥

तैशी तुह्मी निरे ज्ञानाचे भरींव । तेथें म्यां बोलावें पाड काय ॥१०॥

कृपानिधि तुह्मीं बोलविलें बोला । सुखें न्याय केला तुमचा मीं ॥११॥

अज्ञान मी वेडें ह्मणवितों बाळ । माझा प्रतिपाळ करणें तुह्मां ॥१२॥

बोबडें बोलणें न धरावा कोप । क्षमा करा बाप कृपासिंधु ॥१३॥

तुका ह्मणे तुह्मी संत बापमाय । भयें धरिले पाय कृपानिधि ॥१४॥

देहीं असोनियां देव । वृथा फिरतो निद।व ॥१॥

देव आहे अंतर्यामीं । व्यर्थ हिंडे तीर्थग्रामीं ॥ध्रु.॥

नाभी मृगाचे कस्तुरी। व्यर्थ हिंडे वनांतरीं ॥२॥

साखरेचें मूळ ऊंस । तैसा देहीं देव दिसे ॥३॥

दुधीं असतां नवनीत । नेणे तयाचें मथित ॥४॥

तुका सांगे मूढजना । देहीं देव कां पाहाना ॥५॥

जयजय ह्मणा राम । हातें टाळी वाचे नाम ॥१॥

आटाआटी नाहीं ज्यास । न वेचे मोल न पडे खांस ॥ध्रु.॥

आपण ह्मणे आणिकां हातीं । यज्ञादिकीं नये ते गति ॥२॥

आसन भोजन करितां काम । ध्यानसमाधि ह्मणतां राम ॥३॥

मंत्र जपा हा चि सार। वर्णा याती जयजयकार ॥४॥

ह्मणतां राम ह्मणे तुका । वेळोवेळां चुकों नका ॥५॥

शिकवणेसाटीं वाटते तळमळ । पुढें येईल काळा फोडों डोई ॥१॥

तेव्हां त्यासि काय देशील उत्तर । मेळउनि अंतर ठेवितोसि ॥ध्रु.॥

येथींचिया सोंगें भोरपियाचे परि । होईल तें दुरि शृंगारिलें ॥२॥

तुका ह्मणे कां रे राखिलें खरकटें । रागेल्याचे तंट रागेलें का ॥३॥

होइप आतां माझ्या भोगाचा भोगिता । सकळ अनंता शुभाशुभ ॥१॥

आठवुनी पाय राहिलों हृदयीं । निवारली तइप सकळ चिंता ॥ध्रु.॥

अचळ न चळे देहाचें चळण । आहे हें वळण प्रारब्धें चि ॥२॥

तुका ह्मणे जालें एक चि वचन । केलिया कीर्त्तन आराणुक ॥३॥

लेखी दुखण्यासमान । वेचला नारायणीं क्षण ।

उद्यांचें आजि च मरण । आणोनि ह्मणे हरि भोक्ता ॥१॥

नाहीं कांहीं पडों येत तुटी । जाणें तो आहे सेवटीं ।

लाभ विचारोनि पोटीं। होइप सेवटीं जागृत ॥ध्रु.॥

आहे ते उरे कटा । लावुनि चळ आपुला फाटा ।

पुरे हें न पुरे सेवटा । तरण्या बळकटा सदा वास ॥२॥

ह्मणोनि मोडावा कांटाळा । अविद्यात्मक कोंवळा ।

होतील प्रबळा । आशा तृष्णा माया ॥३॥

क्षण या देहाच्या अंतीं। जड होउनि राहेल माती ।

परदेश ते परवर होती । चिळसविती नाकडोळे ॥४॥

जंव या नाहीं पातल्या विपित्त । आयुष्य भविष्य आहे हातीं ।

लाभ विचारोनि गुंती । तुका ह्मणे अंतीं सर्व पिसुनें ॥५॥

आसावलें मन जीवनाचें ओढी । नामरूपीं गोडी लावियेली ॥१॥

काय तुझे पायीं नाहीं भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥ध्रु.॥

काय लोखंडाचे पाहे गुणदोष । सिवोन परीस सोनें करी ॥२॥

तुका ह्मणे माझें अवघें असों द्यावें । आपुलें करावें ब्रीद साच ॥३॥

पंढरीची वारी जयांचिये घरीं । पायधुळी शिरीं वंदिन त्यांची ॥१॥

दासाचा मी दास पोसणा डोंगर । आतां बहु फार काय बोलों ॥ध्रु.॥

जातीचें मी हीन न कळे भजन । ह्मणोनि संतचरण इच्छीतसें ॥२॥

तुका ह्मणे मज ह्मणावें आपुलें । बहुता तारिलें संतजनीं ॥३॥

नाम पावन पावन । त्याहून पवित्र आहे कोण ॥१॥

शिव हालाहालें तापला । तो ही नामें शीतळ जाला ॥ध्रु.॥

शिवास नामाचा आधार । केला किळकाळ किंकर ॥२॥

मरण जालें काशीपुरी। तेथें नाम चि उद्धरी ॥३॥

तुका ह्मणे अवघीं चोरें। एक हरिनाम सोइरें ॥४॥

अल्प विद्या परि गर्वशिरोमणि । मजहुनि ज्ञानी कोणी आहे ॥१॥

अंगीं भरे ताठा कोणासी मानीना । साधूची हेळणा स्वयें करी ॥ध्रु.॥

सज्जनाच्या देहीं मानी जो विटाळ । त्रैलोकीं चांडाळ तो चि एक ॥२॥

संतांची जो निंदा करी मुखीं जप। खतेलें तें पाप वज्रलेप ॥३॥

तुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥४॥

नाहीं संतांशीं शरण । काय वाचोनि पुराण ॥१॥

ह्मणे विठ्ठलाचा दास । देखोनी परनारीस हांसे ॥ध्रु.॥

करिती विठोबाची भक्ति । दयाधर्म नाहीं चित्तीं ॥२॥

तेथें नाहीं माझा देव। व्यर्थ श्रमवी हा जीव ॥३॥

अंगीं नाहीं क्षमा दया । ह्मणती भेट पंढरीराया ॥४॥

नाहीं धर्माची वासना । काय करोनि प्रदिक्षणा ॥५॥

ऐसें नव्हे भक्तिवर्म । तेथें नाहीं माझा राम ॥६॥

नये कृपा कांहीं केल्या । नये घाम जीव गेल्या ॥७॥

जैसी खड्गाची धार । विठ्ठलचरणीं तुका शूर ॥८॥

नाहीं रिकामीक परी वाहे मनीं । तया चक्रपाणि साह्य होय ॥१॥

उद्वेग जीवासि पंढरीचें ध्यान । तया नारायण साह्य करी ॥ध्रु.॥

शरीरासि बळ नाहीं स्वता भाव । तया पंढरिराव साह्य करी ॥२॥

असो नसो बळ राहे पराधीन । तरी अनुमान करूं नका ॥३॥

तुका ह्मणे येणें करोनि चिंतनीं । तया नारायण जवळीक ॥४॥

दारिद्रानें विप्र पीडिला अपार । तया पोटीं पोर एक असे ॥१॥

बाहेरी मिष्टान्न मिळे एके दिशीं । घेऊनी छंदासि त्या चि बैसे ॥ध्रु.॥

क्षुधाकाळीं रडे देखिलें तें मागे । कांहीं केल्या नेघे दुजें कांहीं ॥२॥

सहज कौतुकें बोले बापमाये । देवापाशीं आहे मागशी तें ॥३॥

तेव्हां तुजलागीं स्मरे नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥४॥

लागली हे क्षुधा जात असे प्राण । काय हें निर्वाण पाहातोसि ॥५॥

ब्रह्मांडनायक विश्वाचा पाळक । वरी तिन्ही लोक पोसितोसि ॥६॥

प्राण हा उत्कर्ष जाहला विव्हळ । तेव्हां तो कृपाळ धांव घाली ॥७॥

सांडूनि वैकुंठ धांव घाली तइप । आळंगिला बाहीं कृपावंतें ॥८॥

तुका ह्मणे दिला क्षीराचा सागर । राहे निरंतर तयापासीं ॥९॥

अनाथाचा सखा ऐकिला प्रताप । होसि कृपावंत मजवरि ॥१॥

माझिया गा चित्ता करिं शिकवण । जेणें तुझे चरण जोडतील ॥ध्रु.॥

जोडोनियां कर येतों काकुलती । रकुमाईच्या पति कृपावंता ॥२॥

हरुषें निर्भर करीं माझें मन । दाखवीं चरण पांडुरंगा ॥३॥

तुझे भेटीविण जन्म गेलां वांयां । भजन कराया शक्ति नाहीं ॥४॥

न घडे तुझी सेवा न घडे पूजन । जन्मोनि निष्कारण जाऊं पाहे ॥५॥

तुका ह्मणे हरि करावें या काय । भजनासि साह्य होइप बापा ॥६॥

हीनवर बीजवर दोघी त्या गडणी । अखंड कहाणी संसाराची ॥१॥

माझे पति बहु लहान चि आहे । खेळावया जाय पोरांसवें ॥ध्रु.॥

माझें दुःख जरी ऐकशील सई । ह्मातारा तो बाई खोकतसे ॥२॥

खेळे सांजवरी बाहेरी तो राहे । वाट मी पाहें सेजेवरी ॥३॥

पूर्व पुण्य माझें नाहीं वा नीट । बहु होती कष्ट सांगो कांही ॥४॥

जवळ मी जातें अंगा अंग लावूं । नेदी जवळ येऊं कांटाळतो ॥५॥

पूर्व सुकृताचा हा चि बाई ठेवा । तुका ह्मणे देवा काय बोल ॥६॥

स्वामीच्या सामथ्यॉ । चाले बोलिला पुरुषार्थ ॥१॥

पाठी देवाचें हें बळ । मग लाभे हातीं काळ ॥ध्रु.॥

देव ज्यासी साह्य । तेणें केलें सर्व होय ॥२॥

तुका ह्मणे स्वामीसत्ता । मग नाहीं भय चित्ता ॥३॥

नामांचा डांगोरा फिरवीं घरोघरीं । ह्मणा हरीहरी सर्वभावें ॥१॥

नामें हरती कर्में वैकुंठींची पै विस्त । संनिध श्रीपति सदोदित ॥ध्रु.॥

नामाचा महिमा बहुतां कळला । नामें उद्धरिला अजामेळ ॥२॥

गजेंद्राची िस्थति पुराणीं बोलती । नामें चि श्रीपति पावलासे ॥३॥

तुका ह्मणे घेतां मुक्ति आहे । नामें सर्व पाहें आकिळलें ॥४॥

यमाचे हे पाश नाटोपती कोणातें । आह्मां दिनानाथें रिक्षयेलें ॥१॥

यम नेतां तुह्मां रक्षील हें कोण । तुह्मां धन्यधन्य कोण ह्मणती ॥ध्रु.॥

संतसज्जनमेळा पवित्र संतकीर्ति । त्यांनीं उत्तम िस्थति सांगितली ॥२॥

तें चि धरोनि चित्तीं तुका हित करी। यमासि पांपरी हाणे आतां ॥३॥

देवासी पैं भांडों एकचित्त करूनि । आह्मांसि सज्जनीं सांगितलें ॥१॥

आह्मां काय आतां देवें आडो परी । भेटी नेदी तरी सुखें नेदो ॥ध्रु.॥

तो चि नांदो सदा हरि पैं वैकुंठीं । आह्मां देशवटी देवो सुखें ॥२॥

देवें अभिमान चित्तांत धरिला । तरी तो एकला राहो आतां ॥३॥

चित्तीं धरोनि नाम असों सुखें येथें । हषॉ गाऊं गीत गोविंदाचें ॥४॥

तुका ह्मणे सर्व देवाची नष्टाई । आह्मी सुखें डुलतसों ॥५॥

भरणी आली मुक्त पेठा । करा लाटा व्यापार ॥१॥

उधार घ्या रे उधार घ्या रे । अवघे या रे जातीचे ॥ध्रु.॥

येथें पंक्तिभेद नाहीं । मोठें कांहीं लहान ॥२॥

तुका ह्मणे लाभ घ्यावा। मुद्दल भावा जतन ॥३॥

ग्रासोग्रासीं भाव । तरी देहिं च जेवी देव ॥१॥

धरीं स्मरण तें सार । नाहीं दुरी तें अंतर ॥ध्रु.॥

भोगितां तूं भावें । देव जेऊं बैसे सवें ॥२॥

तुज पावो देवा । भावें अंतरींची सेवा ॥३॥

गुंतला साधनीं । देव नाहीं त्रिभुवनीं ॥४॥

तुका ह्मणे हातीं । न धरितां गमाविती ॥५॥

कामिनीसी जैसा आवडे भ्रतार । इच्छीत चकोर चंद्र जैसा ॥१॥

तैसी हे आवडी विठ्ठलाचे पायीं । लागलिया नाहीं गर्भवास ॥ध्रु.॥

दुष्काळें पीडिल्या आवडे भोजन । आणिक जीवन तृषाक्रांता ॥२॥

कामातुर जैसा भय लज्जा सांडोनि । आवडे कामिनी सर्वभावें ॥३॥

तुका ह्मणे तैसी राहिली आवडी । पांडुरंग थडी पाववील ॥४॥

ॐ तत्सदिति सूत्राचें सार । कृपेचा सागर पांडुरंग ॥१॥

हरिःॐ सहित उदत अनुदत । प्रचुरीश्वरासहित पांडुरंग ॥२॥

गोब्राह्मणहिता होऊनि निराळे । वेदाचें तें मूळ तुका ह्मणे ॥३॥

सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभाळिली भूमि शुद्ध ॥१॥

उष्ण तान भूक एवढिये आकांतीं । ओसंगा लाविती काय ह्मुण ॥ध्रु.॥

खांद्यावरि शूळ मरणाचिये वाटे । अन्याय ही मोठे केले साच ॥२॥

हातींचा हिरोनि घातला पोटासी। तुका ह्मणे ऐसी परी जाली ॥३॥

ओंव्या प्रारंभ 231 अभंग 3

पांडुरंगा करूं प्रथम नमन । दुसरें चरणा संतांचिया ॥१॥

याच्या कृपादानें कथेचा विस्तार । बाबाजीसद्ग‍ुदास तुका ॥२॥

काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवूं चित्तासी आपुलिया ॥३॥

या मनासी लागो हरिनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥४॥

सीण जाला मज संवसारसंभ्रमें । सीतळ या नामें जाली काया ॥५॥

या सुखा उपमा नाहीं द्यावयासी । आलें आकारासी निर्विकार ॥६॥

नित्य धांवे तेथें नामाचा गजर । घोष जयजयकार आइकतां ॥७॥

तांतडी ते काय हरिगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥८॥

मूळ नरकाचें राज्यमदेंमाते । अंतरे बहुत देव दुरी ॥९॥

दुरी अंतरला नामनिंदकासी । जैसें गोंचिडासी क्षीर राहे ॥१०॥

हे वाट गोमटी वैकुंठासी जातां । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥११॥

जाणतयांनीं सांगितलें करा । अंतरासी वारा आडूनियां ॥१२॥

यांसी आहे ठावें परि अंध होती । विषयाची खंती वाटे जना ॥१३॥

नाहीं त्या सुटलीं द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥१४॥

चित्त ज्याचें पुत्रपत्नीबंधूवरी । सुटल हा परि कैसें जाणा ॥१५॥

जाणत नेणत करा हरिकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥१६॥

माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥१७॥

कोणीं तरी कांहीं केलें आचरण । मज या कीर्तनेंविण नाहीं ॥१८॥

नाहीं भय भक्ता तराया पोटाचें । देवासी तयाचें करणें लागे ॥१९॥

लागे पाठोवाटी पाहे पायांकडे । पीतांबर खडे वाट सांडी ॥२०॥

डिंकोनियां कां रे राहिले हे लोक । हें चि कवतुक वाटे मज ॥२१॥

जयानें तारिले पाषाण सागरीं । तो ध्या रे अंतरीं स्वामी माझा ॥२२॥

माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळु हा ॥२३॥

हा चि माझा नेम हा चि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबाचें ॥२४॥

चेतवला अिग्न तापत्रयज्वाळ । तो करी शितळ रामनाम ॥२५॥

मना धीर करीं दृढ चित्तां धरीं । तारील श्रीहरि मायबाप ॥२६॥

बाप हा कृपाळु भक्ता भाविकांसी । घरीं होय दासी कामारी त्या ॥२७॥

त्याचा भार माथां चालवी आपुला। जिहीं त्या दिधला सर्व भाव ॥२८॥

भावेंविण त्याची प्राप्ति । पुराणें बोलती ऐसी मात ॥२९॥

मात त्याची जया आवडे जीवासी। तया गर्भवासीं नाहीं येणें ॥३०॥

यावें गर्भवासीं तरी च विष्णुदासीं। उद्धार लोकांसी पूज्य होती ॥३१॥

होती आवडत जीवाचे ताइत। त्यां घडी अच्युत न विसंभे ॥३२॥

भेदाभेद नाहीं चिंता दुःख कांहीं । वैकुंठ त्या ठायीं सदा वसे ॥३३॥

वसे तेथें देव सदा सर्वकाळ । करिती निर्मळ नामघोष ॥३४॥

संपदा तयांची न सरे कल्पांतीं । मेळविला भक्ती देवलाभ ॥३५॥

लाभ तयां जाला संसारा येऊनी । भगवंत ॠणी भक्ती केला ॥३६॥

लागलेंसे पिसें काय मूढजनां । काय नारायणा विसरलीं ॥३७॥

विसरलीं तयां थोर जाली हाणी । पचविल्या खाणी चौ†यासी ॥३८॥

शिकविलें तरी नाहीं कोणा लाज । लागलीसे भाज धन गोड ॥३९॥

गोड एक आहे अविट गोविंद । आणीक तो छंद नासिवंत ॥४०॥

तळमळ त्याची कांहीं तरी करा । कां रे निदसुरा बुडावया ॥४१॥

या जनासी भय यमाचें नाहीं । सांडियेलीं तिहीं एकराज्यें ॥४२॥

जेणें अिग्नमाजी घातलासे पाव । नेणता तो राव जनक होता ॥४३॥

तान भूक जिहीं साहिले आघात । तया पाय हात काय नाहीं ॥४४॥

नाहीं ऐसा तिहीं केला संवसार । दुःखाचे डोंगर तोडावया ॥४५॥

याच जन्में घडे देवाचें भजन । आणीक हें ज्ञान नाहीं कोठें ॥४६॥

कोठें पुढें नाहीं घ्यावया विसांवा । फिरोनि या गांवा आल्याविण ॥४७॥

विनवितां दिवस बहुत लागती । ह्मणउनि चित्तीं देव धरा ॥४८॥

धरा पाय तुह्मी संतांचे जीवासी । वियोग तयांसी देवा नाहीं ॥४९॥

नाहीं चाड देवा आणीक सुखाची । आवडी नामाची त्याच्या तया ॥५०॥

त्याची च उिच्छष्ट बोलतों उत्तरें । सांगितलें खरें व्यासादिकीं ॥५१॥

व्यासें सांगितलें भक्ति हे विचार । भवसिंधु पार तरावया ॥५२॥

तरावया जना केलें भागवत । गोवळ गोपी भक्त माता पिता ॥५३॥

तारुनियां खरे नेली एक्यासरें । निमित्तें उत्तरें रुसिया ॥५४॥

यासी वर्म ठावें भक्तां तरावया । जननी बाळ माया राख तान्हें ॥५५॥

तान्हेलें भुकेलें ह्मणे वेळोवेळां । न मगतां लळा जाणोनियां ॥५६॥

जाणोनियां वर्म देठ लावियेला । द्रौपदीच्या बोलासवें धांवे ॥५७॥

धांवे सर्वता धेनु जैसी वत्सा । भक्तालागीं तैसा नारायण ॥५८॥

नारायण व्होवा हांव ज्याच्या जीवा । धन्य त्याच्या दैवा पार नाहीं ॥५९॥

पार नाहीं सुखा तें दिलें तयासी । अखंड वाचेसी रामनाम ॥६०॥

रामनाम दोनी उत्तम अक्षरें । भवानीशंकरें उपदेशिलीं ॥६१॥

उपदेश करी विश्वनाथ कानीं । वाराणसी प्राणी मध्यें मरे ॥६२॥

मरणाचे अंतीं राम ह्मणे जरी । न लगे यमपुरी जावें तया ॥६३॥

तयासी उत्तम ठाव वैकुंठीं । वसे नाम चित्तीं सर्वकाळ ॥६४॥

सर्वकाळ वसे वैष्णवांच्या घरीं । नसे क्षणभरी थिर कोठें ॥६५॥

कोठें नका पाहों करा हरिकथा । तेथें अवचिता सांपडेल ॥६६॥

सांपडे हा देव भाविकांचे हातीं । शाहाणे मरती तरी नाहीं ॥६७॥

नाहीं भलें भक्ती केलियावांचूनि। अहंता पापिणी नागवण ॥६८॥

नागवलों ह्मणे देव मी आपणा । लाभ दिला जना ठकलों तो ॥६९॥

तो चि देव येर नव्हे ऐसें कांहीं। जनार्दन ठायीं चहूं खाणी ॥७०॥

खाणी भरूनियां राहिलासे आंत । बोलावया मात ठाव नाहीं ॥७१॥

ठाव नाहीं रिता कोणी देवाविण । ऐसी ते सज्जन संतवाणी ॥७२॥

वाणी बोलूनियां गेलीं एक पुढें । तयासी वांकुडें जातां ठक ॥७३॥

ठका नाहीं अर्थ ठाउका वेदांचा । होऊनि भेदाचा दास ठेला ॥७४॥

दास ठेला पोट अर्थ दंभासाटीं । ह्मणउनि तुटी देवासवें ॥७५॥

सवें देव द्विजातीही दुराविला । आणिकांचा आला कोण पाड ॥७६॥

पाड करूनियां नागविलीं फार । पंडित वेव्हार खळवादी ॥७७॥

वादका निंदका देवाचें दरुशन । नव्हे जाला पूर्ण षडकमाअ ॥७८॥

षडकमाअ हीन रामनाम कंठीं । तयासवें भेटी सवें देवा ॥७९॥

देवासी आवड भाविक जो भोळा । शुद्ध त्या चांडाळा करुनि मानी ॥८०॥

मानियेल्या नाहीं विश्वास या बोला । नाम घेतां मला युक्ति थोडी ॥८१॥

युक्त थोडी मज दुर्बळाची वाचा । प्रताप नामाचा बोलावया ॥८२॥

बोलतां पांगल्या श्रुति नेति नेति । खुंटलिया युक्ति पुढें त्यांच्या ॥८३॥

पुढें पार त्याचा न कळे चि जातां । पाउलें देखतां ब्रह्मादिकां ॥८४॥

काय भक्तीपिसें लागलें देवासी । इच्छा ज्याची जैसी तैसा होय ॥८५॥

होय हा सगुण निर्गुण आवडी । भक्तिप्रिय गोडी फेडावया ॥८६॥

या बापासी बाळ बोले लाडें कोडें । करुनि वांकुडें मुख तैसें ॥८७॥

तैसें याचकाचें समाधान दाता । होय हा राखता सत्त्वकाळीं ॥८८॥

सत्त्वकाळीं कामा न येती आयुधें । बळ हा संबंध सैन्यलोक ॥८९॥

सैन्यलोक तया दाखवी प्रताप । लोटला हा कोप कोपावरी ॥९०॥

कोपा मरण नाहीं शांत होय त्यासी । प्रमाण भल्यासी सत्त्वगुणीं ॥९१॥

सत्त्वरजतमा आपण नासती । करितां हे भक्ति विठोबाची ॥९२॥

चित्त रंगलिया चैतन्य चि होय । तेथें उणें काय निजसुखा ॥९३॥

सुखाचा सागरु आहे विटेवरी । कृपादान करी तो चि एक ॥९४॥

एक चित्त धरूं विठोबाचे पायीं । तेथें उणें कांहीं एक आह्मां ॥९५॥

आह्मांसी विश्वास याचिया नामाचा । ह्मणउनि वाचा घोष करूं ॥९६॥

करूं हरिकथा सुखाची समाधि । आणिकाची बुद्धी दुष्ट नास ॥९७॥

नासे संवसार लोकमोहो माया । शरण जा रे तया विठोबासी ॥९८॥

सिकविलें मज मूढा संतजनीं । दृढ या वचनीं राहिलोंसे ॥९९॥

राहिलोंसे दृढ विठोबाचे पायीं । तुका ह्मणे कांहीं न लगे आंता ॥१००॥

गाईन ओंविया पंढरिचा देव । आमुचा तो जीव पांडुरंग ॥१॥

रंगलें हें चित्त माझें तया पायीं । ह्मणउनि घेइप हा चि लाहो ॥२॥

लाहो करीन मी हा चि संवसारीं । राम कृष्ण हरि नारायण ॥३॥

नारायण नाम घालितां तुकासी । न येती या रासी तपतीथॉ ॥४॥

तीथॉ रज माथां वंदिती संतांचे । जे गाती हरिचे गुणवाद ॥५॥

गुणवाद ज्याचे गातां पूज्य जाले । बडिवार बोले कोण त्यांचा ॥६॥

त्याचा नाहीं पार कळला वेदांसी । आणीक ही ॠषि विचारितां ॥७॥

विचारितां तैसा होय त्यांच्या भावें । निजसुख ठावें नाहीं कोणा ॥८॥

कोणा कवतुक न कळे हे माव । निजलिया जिवें करी धंदा ॥९॥

करुनि कवतुक खेळे हा चि लीळा । व्यापूनि वेगळा पाहातुसे ॥१०॥

सेवटीं आपण एकला चि खरा । सोंग हा पसारा नट केला ॥११॥

लावियेलें चाळा मीपणें हें जन । भोग- तया कोण भोगविशी ॥१२॥

विषयीं गुंतलीं विसरलीं तुज । कन्या पुत्र भाज धनलोभा ॥१३॥

लोभें गिळी फांसा आविसाच्या आशा। पडोनि मासा तळमळी ॥१४॥

तळमळ याची तरी शम होईल । जरी हा विठ्ठल आठविती ॥१५॥

आठव हा तरी संतांच्या सांगातें। किंवा हें संचित जन्मांतरें ॥१६॥

जन्मांतरें तीन भोगितां कळती । केलें तें पावती करितां पुढें ॥१७॥

पुढें जाणोनियां करावें संचित। पुजावे अतीत देव द्विज ॥१८॥

जन्म तुटे ऐसें नव्हे तुह्मां जना । पुढिल्या पावना धर्म करा ॥१९॥

करा जप तप अनुष्ठान याग । संतीं हा मारग स्थापियेला ॥२०॥

लावियेलीं कर्में शुद्ध आचरणें । कोणा एका तेणें काळें पावे ॥२१॥

पावला सत्वर निष्काम उदार। जिंकिली अपार वासना हे ॥२२॥

वासनेचें मूळ छेदिल्या वांचून । तरलेंसें कोणी न ह्मणावें ॥२३॥

न ह्मणावें जाला पंडित वाचक । करूं मंत्रघोष अक्षरांचा ॥२४॥

चाळविलीं एकें ते चि आवडीनें । लोक दंभमानें देहसुखें ॥२५॥

सुख तरी च घडे भजनाचें सार । वाचे निरंतर रामनाम ॥२६॥

राम हा उच्चार तरी च बैसे वाचे । अनंता जन्माचें पुण्य होय ॥२७॥

पुण्य ऐसें काय रामनामापुढें । काय ते बापुडे यागयज्ञा ॥२८॥

यागयज्ञा तप संसार दायकें । न तुटती एके नामेंविण ॥२९॥

नामेंविण भवसिंधु पावे पार । अइसा विचार नाहीं दुजा ॥३०॥

जाणती हे भक्तराज महामुनि । नाम सुखधणी अमृताची ॥३१॥

अमृताचें सार निजतत्त्व बीज । गुह्याचें तें गुज रामनाम ॥३२॥

नामें असंख्यात तारिले अपार । पुराणीं हें सार प्रसिद्ध हे ॥३३॥

हें चि सुख आह्मी घेऊं सर्वकाळ । करूनि निर्मळ हरिकथा ॥३४॥

कथाकाळीं लागे सकळा समाधि । तात्काळ हे बुद्धि दुष्ट नासे ॥३५॥

नासे लोभ मोहो आशा तृष्णा माया । गातां गुण तया विठोबाचे ॥३६॥

विठोबाचे गुण मज आवडती । आणीक हे चित्तीं न लगे कांहीं ॥३७॥

कांहीं कोणी नका सांगों हे उपाव। माझा मनीं भाव नाहीं दुजा ॥३८॥

जाणोनियां आह्मी दिला जीवभाव। दृढ याचे पाये धरियेले ॥३९॥

धरियेले आतां न सोडीं जीवेंसी । केला ये च विशीं निरधार ॥४०॥

निरधार आतां राहिलों ये नेटीं। संवसारतुटी करूनियां ॥४१॥

येणें अंगीकार केला पांडुरंगें । रंगविला रंगें आपुलिया ॥४२॥

आपुली पाखर घालुनियां वरि । आह्मांसी तो करी यत्न देव ॥४३॥

देव राखे तया आणिकांचें काय। करितां उपाय चाले तेथें ॥४४॥

तेथें नाहीं रिघ किळकाळासी जातां । दास ह्मणवितां विठोबाचे ॥४५॥

विठोबाचे आह्मी लाडिके डिंगर । कांपती असुर काळ धाकें ॥४६॥

धाक तिहीं लोकीं जयाचा दरारा । स्मरण हें करा त्याचें तुह्मी ॥४७॥

तुह्मी निदसुर नका राहूं कोणी । चुकावया खाणी गर्भवास ॥४८॥

गर्भवासदुःख यमाचें दंडणें । थोर होय शीण येतां जातां ॥४९॥

तान भूक पीडा जीतां ते आगात । मेल्या यमदूत जाच करिती ॥५०॥

जाच करिती हे ह्मणसी कोणा आहे ठावें । नरकीं कौरवें बुडी दिली ॥५१॥

बुडी दिली कुंभपाकीं दुयाौधनें । दाविना लाजेनें मुख धर्मा ॥५२॥

धर्म हा कृपाळू आलासे जवळी । बैसला पाताळीं वरि नये ॥५३॥

न ये वरि कांहीं करितां उपाव । भोगवितो देव त्याचे त्यासी ॥५४॥

त्यांसी अभिमान गर्व या देहाचा । नुच्चारिती वाचा नारायण ॥५५॥

नारायण विसरलीं संवसारीं । तया अघोरीं वास सत्य ॥५६॥

सत्य मानूनियां संतांच्या वचना । जा रे नारायणा शरण तुह्मी ॥५७॥

तुह्मी नका मानूं कोणी विसवास। पुत्र पत्नी आस धन वित्त ॥५८॥

धन वित्त लोभ माया मोहपाश । मांडियले फासे यमदूतीं ॥५९॥

दूतीं याच्या मुखा केलेंसे कुडण । वाचे नारायण येऊं नेदी ॥६०॥

नेदी शुद्धबुद्धि आतळों चित्तासी । नाना कर्म त्यासी दुरावती ॥६१॥

दुराविलीं एकें जाणतीं च फार । निंदा अहंकार वादभेद ॥६२॥

वाद भेद निंदा हे फंद काळाचें । गोवितील वाचे रिकामिकें ॥६३॥

रिकामिक देवा होय नव्हे मना । चिंतेचिये घाणा जुंपिजेसी ॥६४॥

सेवटीं हे गळा लावुनियां दोरी । सांभाळ ये करी वासनेचा ॥६५॥

वासनेचा संग होय अंतकाळीं । तरी तपोबळी जन्म धरी ॥६६॥

धरूनियां देव राहतील चित्तीं । आधींचिया गती आठवाया ॥६७॥

आठवावा देव मरणाचे काळीं। ह्मणउनि बळी जीव दिले ॥६८॥

दिले टाकूनियां भोग ॠषेश्वरीं । खाती वनांतरीं कंदमूळें ॥६९॥

मुळें सुखाचिया देव अंतरला । अल्पासाटीं नेला अधोगती ॥७०॥

गति हे उत्तम व्हावया उपाव । आहे धरा पाव विठोबाचे ॥७१॥

विठोबाचे पायीं राहिलिया भावें । न लगे कोठें जावें वनांतरा ॥७२॥

तरती दुबळीं विठोबाच्या नांवें। संचित ज्या सवें नाहीं शुद्ध ॥७३॥

शुद्ध तरी याचे काय तें नवल। ह्मणतां विठ्ठल वेळोवेळां ॥७४॥

वेळा कांहीं नाहीं कवणाचे हातीं । न कळे हे गति भविष्याची ॥७५॥

भविष्य न सुटे भोगिल्यावांचूनि । संचित जाणोनि शुद्ध करा ॥७६॥

करावे सायास आपुल्या हिताचे । येथें आलियाचे मनुष्यपण ॥७७॥

मनुष्यपण तरी साधी नारायण । नाहीं तरी हीन पशुहूनी ॥७८॥

पशु पाप पुण्य काय ते जाणती । मनुष्या या गति ठाउकिया ॥७९॥

ठाउकें हें असे पाप पुण्य लोका । देखती ते एकां भोगितिया ॥८०॥

भोगतील एक दुःख संवसारीं । काय सांगों परी वेगळाल्या ॥८१॥

ल्यावें खावें बरें असावें सदैव । हे चि करी हांव संवसारीं ॥८२॥

संवसारें जन गिळिले सकळ । भोगवितो फळ गर्भवासा ॥८३॥

वासनेचें मूळ छेदिल्यावांचून । नव्हे या खंडण गर्भवासा ॥८४॥

सायास केलियावांचुनि तें कांहीं । भोगावरी पाहीं घालूं नये ॥८५॥

नये बळें धड घालूं कांट्यावरि । जाये जीवें धरी सर्प हातीं ॥८६॥

हातीं आहे हित करील तयासी । ह्मणउनि ॠषीं सांगितलें ॥८७॥

सांगती या लोकां फजित करूनि ।आपण जे कोणी तरले ते ॥८८॥

तेणें वाळवंटीं उभारिले कर । कृपेचा सागर पांडुरंग ॥८९॥

गंगाचरणीं करी पातकांची धुनी । पाउलें तीं मनीं चिंतिलिया ॥९०॥

चिंतनें जयाच्या तारिले पाषाण । उद्धरी चरण लावूनियां ॥९१॥

लावूनियां टाळी नलगे बैसावें । प्रेमसुख घ्यावें संतसंगें ॥९२॥

संतसंगें कथा करावें कीर्तन । सुखाचें साधन रामराम ॥९३॥

मग कोठें देव जाऊं न सके दुरी । बैसोनि भीतरी राहे कंठीं ॥९४॥

राहे व्यापुनियां सकळ शरीर । आपुला विसर पडों नेदी ॥९५॥

नेदी दुःख देखों आपुलिया दासा । वारी गर्भवासा यमदूता ॥९६॥

तान भूक त्यासी वाहों नेदी चिंता । दुिंश्चत हे घेतां नाम होती ॥९७॥

होती जीव त्यांचे सकळ ही जंत । परि ते अंकित संचिताचे ॥९८॥

चेवले जे कोणी देहअभिमानें । त्यांसी नारायणें कृपा केली ॥९९॥

कृपाळू हा देव अनाथा कोंवसा । आह्मी त्याच्या आशा लागलोंसों ॥१००॥

लावियेले कासे येणें पांडुरंगें । तुका ह्मणे संगें संतांचिया ॥१०१॥

विचार करिती बैसोनि गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा ॥१॥

एकांत एकल्या एका च सुखाच्या । आवडती त्यांच्या गोष्टी त्यांला ॥२॥

तर्कवितकिर्णी दुराविल्या दुरी । मौन त्या परिचारी आरंभिलें ॥३॥

कुशळा कवित्या कथित्या लोभिका । त्या ही येथें नका आह्मांपाशीं ॥४॥

बोलक्या वाचाळा कृष्णरता नाहीं । यां चोरोनि तींहीं खेट केली ॥५॥

भेऊनियां जना एकी सवा जाल्या । वाती विझविल्या दाटोबळें ॥६॥

कृष्णसुख नाहीं कळलें मानसीं । निंदिती त्या त्यासी कृष्णरता ॥७॥

तो नये जवळी देखोनि कोल्हाळ । ह्मणउनि समेळ मेळविला ॥८॥

अंतरीं कोमळा बाहेरी निर्मळा । तल्लीन त्या बाळा कृष्णध्यानीं ॥९॥

हरिरूपीं दृष्टि कानीं त्या च गोष्टी । आळंगिती कंठीं एका एकी ॥१०॥

न साहे वियोग करिती रोदना । भ्रमिष्ट भावना देहाचिया ॥११॥

विसरल्या मागें गृह सुत पती । अवस्था याचिती गोविंदाची ॥१२॥

अवस्था लागोनि निवळ चि ठेल्या । एका एकी जाल्या कृष्णरूपा ॥१३॥

कृष्णा ह्मणोनियां देती आलिंगन । विरहताप तेणें निवारेना ॥१४॥

ताप कोण वारी गोविंदावांचूनि । साच तो नयनीं न देखतां ॥१५॥

न देखतां त्यांचा प्राण रिघों पाहे । आजि कामास ये उसिर केला ॥१६॥

रित्या ज्ञानगोष्टी तयां नावडती । आिंळगण प्रीती कृष्णाचिया ॥१७॥

मागें कांहीं आह्मी चुकलों त्याची सेवा । असेल या देवा राग आला ॥१८॥

आठविती मागें पापपुण्यदोष । परिहार एकीस एक देती ॥१९॥

अनुतापें जाल्या संतप्त त्या बाळा । टाकुनि विव्हळा धरणी अंग ॥२०॥

जाणोनि चरित्र जवळी च होता । आली त्या अनंता कृपा मग ॥२१॥

होउनी प्रगट दाखविलें रूप । तापत्रय ताप निवविले ॥२२॥

निवालेया देखोनि कृष्णाचें श्रीमुख । शोक मोह दुःख दुरावला ॥२३॥

साच भाव त्यांचा आणुनियां मना । आळंगितो राणा वैकुंठींचा ॥२४॥

हरिअंगसंगें हरिरूप जाल्या । बोलों विसरल्या तया सुखा ॥२५॥

व्यभिचारभावें भोगिलें अनंता । वताौनि असतां घराचारी ॥२६॥

सकळा चोरोनि हरि जयां चित्तीं । धन्य त्या नांदती तयामध्यें ॥२७॥

उणें पुरें त्यांचें पडों नेंदी कांहीं । राखे सर्वां ठायीं देव तयां ॥२८॥

न कळे लाघव ब्रह्मादिकां भाव । भक्तिभावें देव केला तैसा ॥२९॥

तुका ह्मणे त्यांचा धन्य व्यभिचार । साधिलें अपार निजसुख ॥३०॥

बाळक्रीडा प्रारंभ अभंग - 100

देवा आदिदेवा जगत्रया जीवा । परियेसीं केशवा विनंती माझी ॥१॥

माझी वाणी तुझे वर्णी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देइप प्रेम कांहीं कळा ॥२॥

कळा तुजपाशीं आमचें जीवन । उचित करून देइप आह्मां ॥३॥

आह्मां शरणागतां तुझा चि आधार। तूं तंव सागर कृपासिंधु ॥४॥

सिंधु पायावाट होय तुझ्या नामें । जाळीं महाकर्में दुस्तरें तीं ॥५॥

तीं फळें उत्तमें तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥६॥

सेविंलिया राम कृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥७॥

संसार तें काय तृणवतमय । अिग्न त्यासी खाय क्षणमात्रें ॥८॥

क्षणमात्रें जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥९॥

करीं िब्रदें साच आपलीं आपण । पतितपावन दिनानाथ ॥१०॥

नाथ अनाथाचा पति गोपिकांचा । पुरवी चित्तींचा मनोरथ ॥११॥

चित्तीं जें धरावें तुका ह्मणे दासीं । पुरविता होसी मनोरथ ॥१२॥

मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥

रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥

सीण जाला वसुदेवदेवकीस । वधी बाळें कंस दुराचारी ॥३॥

दुराचारियासी नाहीं भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥४॥

पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥५॥

गर्भासी तयांच्य आला नारायण । तुटलें बंधन आपेंआप ॥६॥

आपेंआप बेड्या तुटल्या शंकळा । बंदाच्या आगळा किलिया कोंडे ॥७॥

कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष्य नलगतां ॥८॥

न कळे तो त्यासी सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ॥९॥

नंदाघरीं जातां येतां वसुदेवा । नाहीं जाला गोवा सवें देव ॥१०॥

सवें देव तया आड नये कांहीं । तुका ह्मणे नाहीं भय चिंता ॥११॥

चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें ॥१॥

देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा दैव आलें ॥२॥

आलें अविनाश धरूनि आकार । दैत्याचा संहार करावया ॥३॥

करावया भक्तजनाचें पालण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥४॥

गोकुळीं आनंद प्रगटलें सुख । निर्भर हे लोक घरोघरीं ॥५॥

घरोघरीं जाला लक्ष्मीचा वास । दैन्यदाळिद्रास त्रास आला ॥६॥

आला नारायण तयांच्या अंतरा । दया क्षमा नरा नारीलोकां ॥७॥

लोकां गोकुळींच्या जालें ब्रह्मज्ञान । केलियावांचून जपतपें ॥८॥

जपतपें काय करावीं साधनें । जंवें नारायणें कृपा केली ॥९॥

केलीं नारायणें आपुलीं अंकित । तो चि त्यांचें हित सर्व जाणे ॥१०॥

सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाहींनाहीं ॥११॥

नाहीं भक्ता दुजें तिहीं त्रिभुवनीं । एका चक्रपाणीवांचूनियां ॥१२॥

याच्या सुखसंगें घेती गर्भवास । तुका ह्मणे आस त्यजूनियां ॥१३॥

यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिंहीं तो मुरारी खेळविला ॥१॥

खेळविला जिंहीं अंतर्बाह्यसुखें । मेळवूनि मुखें चुंबन दिलें ॥२॥

दिलें त्यांसी सुख अंतरीचें देवें । जिंहीं एका भावें जाणितला ॥३॥

जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचें ॥४॥

ज्यांचें कृष्णीं तन मन जालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥५॥

विष तयां जालें धन मान जन । वसविती वन एकांतीं त्या ॥६॥

एकांतीं त्या जाती हरीसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥७॥

वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणें । अंतरींचा देणें इच्छाभोग ॥८॥

भोग त्याग नाहीं दोन्ही जयापासीं । तुका ह्मणे जैसी स्पटिकशिळा ॥९॥

शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाउनियां छंदे जैसी तैसी ॥१॥

जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावें ॥२॥

फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी मायबापा ॥३॥

मायबापा सोडविलें बंदीहुनि । चाणूर मर्दुनी कंसादिक ॥४॥

दिक नाहीं देणें अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्त केली ॥५॥

मुक्त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥

पाप कोठें राहे हरी आठवितां । भक्ती द्वेषें चिंता जैसा तैसा ॥७॥

साक्षी तयापाशीं पूर्वीलकर्माच्या। बांधला सेवेच्या रुणी देव ॥८॥

देव भोळा धांवे भक्ता पाठोवाठी। उच्चारितां कंठीं मागेंमागें ॥९॥

मानाचा कंटाळा तुका ह्मणे त्यासी। धांवे तो घरासी भाविकांच्या ॥१०॥

चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या ॥१॥

गौळणिया गळा बांधिती धारणीं । पायां चक्रपाणी लागे तया ॥२॥

तयाघरीं रिघे चोरावया लोणी । रितें पाळतूनि शिरे माजी ॥३॥

माजी शिरोनियां नवनीत खाये । कवाड तें आहे जैसें तैसें ॥४॥

जैसा तैसा आहे अंतर्बाह्यात्कारीं । ह्मणउनि चोरी नसंपडे ॥५॥

नसंपडे तयां करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥६॥

वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ॥७॥

निवांत राहिल्या निःसंग होऊनि । निश्चळ ज्या ध्यानीं कृष्णध्यान ॥८॥

न ये क्षणभरी योगियांचे ध्यानीं । धरिती गौळणी भाविका त्या ॥९॥

भाविका तयांसी येतो काकुलती। शाहाण्या मरती नसंपडे ॥१०॥

नलगे वेचावी टोळी धनानांवें । तुका ह्मणें भावें चाड एका ॥११॥

चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका ॥१॥

रंक होती राजे यमाचिये घरीं । आचरणें बरी नाहीं ह्मणवोनि ॥२॥

नसंपडे इंद्रचंद्रब्रह्मादिकां । अभिमानें एका तिळमात्रें ॥३॥

तिळमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥४॥

भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥५॥

दुष्ट अभक्त जे निष्ठ‍ मानसीं । केली हे तयांसी यमपुरी ॥६॥

यमदूत त्यांसी करिती यातना । नाहीं नारायणा भजिजेलें ॥७॥

जे नाहीं भजले एका भावें हरी । तयां दंड करी यमधर्म ॥८॥

यमधर्म ह्मणे तयां दोषियांसी । कां रे केशवासी चुकलेती ॥९॥

चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुह्मां कान डोळे मुख ॥१०॥

कान डोळे मुख संतांची संगति । न धरा च चित्तीं सांगितलें ॥११॥

सांगितलें संतीं तुह्मां उगवूनि । गर्भाद येऊनि यमदंड ॥१२॥

दंडूं आह्मीं रागें ह्मणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनाचा ॥१३॥

दुर्जनाचा याणें करूनि संहार । पूर्णअवतार रामकृष्ण ॥१४॥

रामकृष्णनामें रंगले जे नर । तुका ह्मणे घर वैकुंठी त्यां ॥१५॥

वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरिजन । तया नारायण समागमें ॥१॥

समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चित्तवित्त समर्पिलें ॥२॥

समथॉ तीं गाती हरीचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे ॥३॥

रामकृष्णें केलें कौतुक गोकुळीं । गोपाळांचे मेळीं गाई चारी ॥४॥

गाई चारी मोहोरी पांवा वाहे पाठीं । धन्य जाळी काठी कांबळीचें ॥५॥

काय गौळियांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या ह्मैसी गाई पशु ॥६॥

सुख तें अमुप लुटिलें सकळीं । गोपिका गोपाळीं धणीवरि ॥७॥

धणीवरि त्यांसी सांगितली मात । जयाचें जें आर्त तयापरी ॥८॥

परी याचि तुह्मी आइका नवळ । दुर्गम जो खोल साधनासि ॥९॥

शिक लावूनियां घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवें चि तो ॥१०॥

तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुकें । शिव्या देतां सुखें हासतुसे ॥११॥

हांसतसे शिव्या देतां त्या गौळणी । मरतां जपध्यानीं न बोले तो ॥१२॥

तो जेंजें करिल तें दिसे उत्तम । तुका ह्मणे वर्म दावी सोपें ॥१३॥

दावी वर्म सोपें भाविकां गोपाळां । वाहे त्यांच्या गळां पाले माळा ॥१॥

मान देती आधीं मागतील डाव । देवा तें गौरव माने सुख ॥२॥

मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरि स्नान तेणें ॥३॥

वस्त्रें घोंगडिया घालुनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥४॥

तिंहीं लोकांसी जो दुर्लभ चिंतना । तो धांवे गोधना वळतियां ॥५॥

यांच्या वचनाचीं पुष्पें वाहे शिरीं । नैवेद्य त्यांकरीं कवळ मागे ॥६॥

त्यांचिये मुखींचें हिरोनियां घ्यावें। उिच्छष्ट तें खावें धणीवरी ॥७॥

वरी माथां गुंफे मोरपिसांवेटी । नाचे टाळी पिटी त्यांच्या छंदें ॥८॥

छंदें नाचतील जयासवें हरी । देहभाव वरी विसरलीं ॥९॥

विसरली वरी देहाची भावना । ते चि नारायणा सर्वपूजा ॥१०॥

पूजा भाविकांची न कळतां घ्यावी । न मागतां दावी निज ठाव ॥११॥

ठाव पावावया हिंडे मागें मागें । तुका ह्मणे संगें भक्तांचिया ॥१२॥

भक्तजनां दिलें निजसुख देवें । गोपिका त्या भावें आळंगिल्या ॥१॥

आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरीं हरि ॠणी ॥२॥

रुसलिया त्यांचें करी समाधान । करविता आण क्रिया करी ॥३॥

क्रिया करी तुह्मां न वजे पासुनि । अवघियाजणी गोपिकांसी ॥४॥

गोपिकांसी ह्मणे वैकुंठींचा पति । तुह्मीं माझ्या चित्तीं सर्वभावें ॥५॥

भाव जैसा माझ्याठायीं तुह्मी धरा । तैसा चि मी खरा तुह्मांलागीं ॥६॥

तुह्मां कळों द्या हा माझा साच भाव । तुमचा चि जीव तुह्मां ग्वाही ॥७॥

ग्वाही तुह्मां आह्मां असे नारायण। आपली च आण वाहातसे ॥८॥

सत्य बोले देव भक्तिभाव जैसा। अनुभवें रसा आणूनियां ॥९॥

यांसी बुझावितो वेगळाल्या भावें । एकीचें हें ठावें नाहीं एकी ॥१०॥

एकी क्रिया नाहीं आवघियांचा भाव । पृथक हा देव घेतो तैसें ॥११॥

तैसें कळों नेदी जो मी कोठें नाहीं । अवघियांचे ठायीं जैसा तैसा ॥१२॥

जैसा मनोरथ जये चित्तीं काम । तैसा मेघशाम पुरवितो ॥१३॥

पुरविले मनोरथ गोपिकांचे । आणीक लोकांचे गोकुळींच्या ॥१४॥

गोकुळींच्या लोकां लावियेला छंद । बैसला गोविंद त्याचा चित्तीं ॥१५॥

चित्तें ही चोरूनि घेतलीं सकळा । आवडी गोपाळांवरी तयां ॥१६॥

आवडे तयांसी वैकुंठनायक । गेलीं सकिळक विसरोनि ॥१७॥

निंदा स्तुती कोणी न करी कोणाची । नाहीं या देहाची शुद्धि कोणा ॥१८॥

कोणासी नाठवे कन्या पुत्र माया । देव ह्मणुनि तया चुंबन देती ॥१९॥

देती या टाकून भ्रतारांसी घरीं । लाज ते अंतरीं आथी च ना ॥२०॥

नाहीं कोणा धाक कोणासी कोणाचा । तुका ह्मणे वाचा काया मनें ॥२१॥

मनें हरिरूपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥

यांच्या भ्रतारांचीं धरूनियां रूपें । त्यांच्या घरीं त्यांपें भोग करी ॥२॥

करी कवतुक त्याचे तयापरी । एकां दिसे हरि एकां लेंक ॥३॥

एक भाव नाहीं सकळांच्या चित्तीं । ह्मणऊनि प्रीति तैसें रूप ॥४॥

रूप याचें आहे अवघें चि एक । परि कवतुक दाखविलें ॥५॥

लेंकरूं न कळे स्थूल कीं लहान । खेळे नारायण कवतुकें ॥६॥

कवतुक केलें सोंग बहुरूप । तुका ह्मणे बाप जगाचा हा ॥७॥

जगाचा हा बाप दाखविलें माये । माती खातां जाये मारावया ॥१॥

मारावया तिणें उगारिली काठी । भुवनें त्या पोटीं चौदा देखे ॥२॥

देखे भयानक झांकियेले डोळे । मागुता तो खेळे तयेपुढे ॥३॥

पुढें रिघोनियां घाली गळां कव । कळों नेदी माव मायावंता ॥४॥

मायावंत विश्वरूप काय जाणे । माझें माझें ह्मणे बाळ देवा ॥५॥

बाळपणीं रीठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥६॥

गळां बांधऊनि उखळासी दावें । उन्मळी त्या भावें विमळार्जुन ॥७॥

न कळे जुनाट जगाचा जीवन । घातलें मोहन गौळियांसी ॥८॥

सिंकीं उतरूनि खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥९॥

तरीं दुधडेरे भरले रांजण । खाय ते भरून दावी दुणी ॥१०॥

दुणी जालें त्याचा मानिती संतोष दुभत्याची आस धरूनियां ॥११॥

आशाबद्धा देव असोनि जवळी । नेणती ते काळीं स्वार्थामुळें ॥१२॥

मुळें याच देव न कळे तयांसी । चित्त आशापाशीं गोवियेलें ॥१३॥

लेंकरूं आमचें ह्मणे दसवंती । नंदाचिये चित्तीं तो चि भाव ॥१४॥

भाव जाणावया चरित्र दाखवी। घुसिळतां रवी डेरियांत ॥१५॥

डेरियांत लोणी खादलें रिघोनि । पाहे तों जननी हातीं लागे ॥१६॥

हातीं धरूनियां काढिला बाहेरी। देखोनियां करी चोज त्यासी ॥१७॥

सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियांत ॥१८॥

यांसी पुत्रलोभें न कळे हा भाव । कळों नेदी माव देव त्यांसी ॥१९॥

त्यांसी मायामोहजाळ घाली फांस । देर आपणास कळों नेदी ॥२०॥

नेदी राहों भाव लोभिकांचे चित्तीं । जाणतां चि होती अंधळीं तीं ॥२१॥

अंधळीं तीं तुका ह्मणे संवसारीं । जिहीं नाहीं हरि ओळखिला ॥२२॥

ओळखी तयांसी होय एका भावें । दुसरिया देवें न पविजे ॥१॥

न पविजे कदा उन्मत्त जालिया । डंबु तो चि वांयां नागवण ॥२॥

वनवास देवाकारणें एकांत । करावीं हीं व्रततपें याग ॥३॥

व्रत याग यांसी फळलीं बहुतें । होतीं या संचितें गौळियांची ॥४॥

यांसी देवें तारियेलें न कळतां । मागील अनंता ठावें होतें ॥५॥

होतें तें द्यावया आला नारायण । मायबापां रीण गौळियांचें ॥६॥

गौळियांचें सुख दुर्लभ आणिकां । नाहीं ब्रह्मादिकां तुका ह्मणे ॥७॥

नेणतियांसाटीं नेणता लाहान । थिंकोनि भोजन मागे माये ॥१॥

माया दोनी यास बाप नारायणा । सारखी भावना तयांवरी ॥२॥

तयांवरी त्याचा समचित्त भाव । देवकीवसुदेव नंद दोघे ॥३॥

घेउनियां एके ठायीं अवतार । एकीं केला थोर वाढवूनि ॥४॥

उणा पुरा यासी नाहीं कोणी ठाव । सारिखा चि देव अवघियांसी ॥५॥

यासी दोनी ठाव सारिखे अनंता । आधील मागुता वाढला तो ॥६॥

वाढला तो सेवाभक्तिचिया गुणें । उपचारमिष्टान्नें करूनियां ॥७॥

करोनियां सायास मेळविलें धन । तें ही कृष्णार्पण केलें तीहीं ॥८॥

कृष्णासी सकळ गाई घोडे ह्मैसी । समर्पिल्या दासी जीवें भाव ॥९॥

जीवें भावें त्याची करितील सेवा । न विसंबती नांवा क्षणभरी ॥१०॥

क्षणभरी होतां वेगळा तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥११॥

त्यांचे ध्यानीं मनीं सर्वभावें हरि । देह काम करी चित्त त्यापें ॥१२॥

त्याचें चि चिंतन कृष्ण कोठें गेला । कृष्ण हा जेविला नाहीं कृष्ण ॥१३॥

कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा । कृष्ण हा सोयरा भेटों कृष्णा ॥१४॥

कृष्ण गातां ओंव्या दळणीं कांडणीं । कृष्ण हा भोजनीं पाचारिती ॥१५॥

कृष्ण तयां ध्यानीं आसनीं शयनीं । कृष्ण देखे स्वपनीं कृष्णरूप ॥१६॥

कृष्ण त्यांस दिसे आभास दुश्चितां । धन्य मातापिता तुका ह्मणे ॥१७॥

कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी ह्मणे ॥१॥

ह्मणे कृष्णाविण कैसें तुह्मां गमे । विळ हा करमे वांयांविण ॥२॥

वांयांविण तुह्मीं पिटीत्या चाकटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥३॥

क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनियां ॥४॥

याचें सुख तुह्मां कळलियावरि । मग दारोदारीं न फिराल ॥५॥

लटिकें हें तुह्मां वाटेल खेळणें । एका कृष्णाविणें आवघें चि ॥६॥

अवघ्यांचा तुह्मीं टाकाल सांगात । घेऊनि अनंत जाल राना ॥७॥

नावडे तुह्मांस आणीक बोलिलें । मग हें लागलें हरिध्यान ॥८॥

न करा हा मग या जीवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिका ही ॥९॥

आणिका ही तुह्मा येती काकुलती। जवळी इिच्छती क्षण बैसों ॥१०॥

बैसों चला पाहों गोपाळाचें मुख। एकी एक सुख सांगतील ॥११॥

सांगे जंव ऐसी मात दसवंती । तंव धरिती चित्तीं बाळा ॥१२॥

बाळा एकी घरा घेउनियां जाती । नाहीं त्या परती तुका ह्मणे ॥१३॥

तुका ह्मणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे ॥१॥

दिवस राती कांहीं नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥२॥

याच्या मुखें नये डोळयासी वीट । राहिले हे नीट ताटस्थ चि ॥३॥

ताटस्थ राहिलें सकळ शरीर । इंिद्रयें व्यापार विसरलीं ॥४॥

विसरल्या तान भुक घर दार । नाहीं हा विचार आहों कोठें ॥५॥

कोठें असों कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥६॥

विसरल्या आह्मीं कोणीये जातीच्या। वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥७॥

एक जाल्या तेव्हां कृष्णाचिया सुखें । निःशंकें भातुकें खेळतील ॥८॥

खेळता भातुकें कृष्णाच्या सहित । नाहीं आशंकित चित्त त्यांचें ॥९॥

चित्तीं तो गोविंद लटिकें दळण । करिती हें जन करी तैसें ॥१०॥

जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनियां ॥११॥

करिती आपला आवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥१२॥

त्याणीं केला हरि सासुरें माहेर । बंधु हे कुमर दीर भावें ॥१३॥

भावना राहिली एकाचिये ठायीं । तुका ह्मणे पायीं गोविंदाचे ॥१४॥

गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एक चि तो ॥१॥

एकाचीं च नामें ठेवियेलीं दोनी । किल्पतील मनीं यावें जावें ॥२॥

जावें यावें तिहीं घरऴिचया घरीं । तेथिची सिदोरी तेथें न्यावी ॥३॥

विचारितां दिसे येणें जाणें खोटें । दाविती गोमटें लोका ऐसें ॥४॥

लोक करूनियां साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥५॥

लटिकीं करिती मंगळदायकें । लटिकीं च एकें एकां व्याही ॥६॥

व्याही भाई हरि सोयरा जावायी । अवघियांच्या ठायीं केला एक ॥७॥

एकासि च पावे जें कांहीं करिती । उपचार संपित्त नाना भोग ॥८॥

भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाई ॥९॥

लटिका च त्यांणीं केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥१०॥

त्यांणीं मृत्तिकेचें करूनि अवघें । खेळतील दोघें पुरुषनारी ॥११॥

पुरुषनारी त्यांणीं ठेवियेलीं नावें । कवतुकभावें विचरती ॥१२॥

विचरती जैसे साच भावें लोक । तैसें नाहीं सुख खेळतीया ॥१३॥

यांणीं जाणितलें आपआपणया । लटिकें हें वांयां खेळतों तें ॥१४॥

खेळतों ते आह्मीं नव्हों नारीनर । ह्मणोनि विकार नाहीं तयां ॥१५॥

तया ठावें आहे आह्मी अवघीं एक । ह्मणोनि निःशंक खेळतील ॥१६॥

तयां ठावें नाहीं हरिचिया गुणें । आह्मी कोणकोणें काय खेळों ॥१७॥

काय खातों आह्मी कासया सांगातें । कैसें हें लागतें नेणों मुखी ॥१८॥

मुखीं चवी नाहीं वरी अंगीं लाज । वरणा याती काज न धरिती ॥१९॥

धरितील कांहीं संकोच त्या मना । हांसतां या जना नाइकती ॥२०॥

नाइकती बोल आणिकांचे कानीं । हरि चित्तीं मनीं बैसलासे ॥२१॥

बैसलासे हरि जयांचिये चित्तीं । तयां नावडती मायबापें ॥२२॥

मायबापें त्यांचीं नेती पाचारुनि । बळें परि मनीं हरि वसे ॥२३॥

वसतील बाळा आपलाले घरीं । ध्यान त्या अंतरीं गोविंदाचें ॥२४॥

गोविंदाचें ध्यान निजलिया जाग्या । आणीक वाउग्या न बोलती ॥२५॥

न बोलती निजलिया हरिविण । जागृति सपन एक जालें ॥२६॥

एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागीं तैशा ॥२७॥

तैसा त्यांचा भाव घेतला त्यांपरी । तुका ह्मणे हरि बाळलीला ॥२८॥

Not in the Wikisource transcription: 4438.

Text: तुकाराम गाथा on Marathi Wikisource, which does not name the printed edition it was transcribed from. The verses are public domain; the transcription is by Wikisource contributors, CC BY-SA 4.0. Its systematic legacy-font errors are repaired by rule (see the reading page for details); some remain — इप printed for ई in about 220 abhangas, and a few vowel signs on the wrong letter. Numbering follows Wikisource; printed editions differ. Spotted a wrong line? Write to us with the number.

If you need to talk to someone now: Tele-MANAS 14416 (free, 24×7) · Vandrevala +91 99996 66555 (24×7, call or WhatsApp) · AASRA 022 2754 6669 (24×7) · iCall 9152 987 821 (Mon–Sat, 8am–9pm) · Emergency 112