एक वेळ प्रायिश्चत्त । केलें चित्त मुंडण ॥१॥
अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ध्रु.॥
अनुतापें स्नानविधि । यज्ञासिद्धि देहहोम ॥२॥
जीवशिवा होतां चुका । तेथें तुका विनटला ॥३॥
Abhangas 601–900 (the Gāthā is numbered 1–4,583), in the original Marathi, with the Gāthā's own section headings — as transcribed on Marathi Wikisource, whose base edition is not named. The refrain (ध्रु.) is set in a warmer colour. One font error is not yet repaired: where you see इप, read ई (होइप = होई).
एक वेळ प्रायिश्चत्त । केलें चित्त मुंडण ॥१॥
अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ध्रु.॥
अनुतापें स्नानविधि । यज्ञासिद्धि देहहोम ॥२॥
जीवशिवा होतां चुका । तेथें तुका विनटला ॥३॥
त्रैलोक्य पाळितां उबगला नाहीं । आमचें त्या काई असे ओझें ॥१॥
पाषाणाचे पोटीं बैसला दर्दुर । तया मुखीं चार कोण घाली ॥ध्रु.॥
पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥२॥
तुका ह्मणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥३॥
बोली मैंदाची बरवी असे । वाटे अंतरीं घालावे फांसे ॥१॥
कैसा वरिवरि दिसताहे चांग । नव्हे भाविक केवळ मांग ॥ध्रु.॥
टिळा टोपी माळा कंठीं । अंधारीं नेउनि चेंपी घांटी ॥२॥
तुका ह्मणे तो केवळ पुंड । त्याजवरी यमदंड ॥३॥
दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामें संकीर्तनें ॥१॥
हें कां करूं आदरिलें । खोटें वचन आपुलें ॥ध्रु.॥
तुह्मी पापा भीतां । आह्मां उपजावया चिंता ॥२॥
तुका ह्मणे सेवा । किळकाळा जिंकी देवा ॥३॥
करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥१॥
वृत्ति राखा पायांपाशीं । वस्ती धरूनि मानसीं ॥ध्रु.॥
पाळोनियां लळा । आतां पाववावें फळा ॥२॥
तुका ह्मणे दीनें । त्यांचा हरतिया सीण ॥३॥
मी तों दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान ॥१॥
मी तों आलों शरणागत । माझें करावें स्वहित ॥ध्रु.॥
दिनानाथा कृपाळुवा। सांभाळावें आपुल्या नांवा ॥२॥
तुका ह्मणे आतां । भलें नव्हे मोकलितां ॥३॥
सुख वाटे तुझे वर्णितां पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥१॥
व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी । आला दुराचारी पारधी तो ॥ध्रु.॥
वृक्षाचिया माथां सोडिला ससाना । धनुष्यासि बाणा लावियेलें ॥२॥
तये काळीं तुज पक्षी आठविती । धांवें गा श्रीपती मायबापा ॥३॥
उडोनियां जातां ससाना मारील । बैसतां विंधील पारधी तो ॥४॥
ऐकोनियां धांवा तया पिक्षयांचा । धरिला सर्पाचा वेश वेगीं ॥५॥
डंखोनि पारधी भुमीसि पाडिला । बाण तो लागला ससान्यासी ॥६॥
ऐसा तूं कृपाळु आपुलिया दासा । होसील कोंवसा संकटींचा ॥७॥
तुका ह्मणे तुझी कीर्ति त्रिभुवना । वेदाचिये वाणी वर्णवेना ॥८॥
नाही दुकळलों अन्ना । परि या मान जनार्दना ॥१॥
देव केला सकळसाक्षी । काळीं आणि शुद्धपक्षीं ॥ध्रु.॥
भोगी भोगविता। बाळासवें तो चि पिता ॥२॥
कर्म अकर्म जळालें । प्रौढें तुका तें उरले ॥३॥
प्रथम नमन तुज एकदंता । रंगीं रसाळ वोडवीं कथा। मति सौरस करीं प्रबळता । जेणें फिटे आतां अंधकार ॥१॥
तुझिये कृपेचें भरितें । आणीक काय राहिलें तेथें । मारग सिद्धाच्यानि पंथें। पावविसी तेथें तूं चि एक ॥ध्रु.॥
आरंभा आदि तुझें वंदन । सकळ करितां कारण । देव ॠषि मुनि आदिकरुन । ग्रंथ पुराण निर्माणी ॥२॥
काय वणूप तुझी गती । एवढी कैची मज मती । दिनानाथ तुज ह्मणती । करी । करीं सत्य वचन हें चि आपुलें ॥३॥
मज वाहावतां मायेच्या पुरीं । बुडतां डोहीं भवसागरीं । तुज वांचुनि कोण तारी । पाव झडकरी तुका ह्मणे ॥४॥
प्रथमारंभीं लंबोदर । सकळ सिद्धींचा दातार । चतुर्भुज फरशधर । न कळे पार वर्णितां ॥१॥
तो देव नटला गौरीबाळ । पायीं बांधोनि घागया घोळ । नारदतुंबरसहित मेळ । सुटला पळ विघ्नांसी ॥२॥
नटारंभी थाटियला रंग । भुजा नाचवी हालवी अंग। सेंदुरविलेपनें चांग । मुगुटीं नाग मिरविला ॥३॥
जया मानवतीदेव ॠषि मुनी । पाहातां न पुरें डोळियां धनी । असुर जयाच्या चरणीं। आदीं अवसानीं तो चि एक ॥४॥
सकळां सिद्धींचा दातार । जयाच्या रूपा नाहीं पार । तुका ह्मणे आमुचा दातार । भवसागर तारील हा ॥५॥
विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान । विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥१॥
विठ्ठल कुळींचें दैवत। विठ्ठल वित्त गोत । विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥२॥
विठ्ठल विस्तारला जनीं । सप्त ही पाताळें भरूनी । विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥३॥
विठ्ठल जीवाचा जिव्हाळा। विठ्ठल कृपेचा कोंवळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा। लावियेलें चाळा । विश्व विठ्ठलें ॥४॥
विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता । विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका ह्मणे आतां नाहीं दुसरें ॥५॥
बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥
बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण । तुमचें जालिया दरुषण । जन्ममरण नाहीं आता ॥ध्रु.॥
बरवें जालें आलों या ठाया । होतें संचित ठायींच पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मींची ॥२॥
जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूर्ति मधुसूदन। सम चरण देखियेले ॥३॥
जुनाट जुगादिचें नाणें । बहुता काळाचें ठेवणें । लोपलें होतें पारिखेपणें । ठावचळण चुकविला ॥४॥
आतां या जीवाचियासाठीं । न सुटे पडलिया मिठी। तुका ह्मणे सिणलों जगजेठी । न लगो दिठी दुसयाची ॥५॥
मी तंव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी । तुज म्यां आठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानीधी मायबापा ॥१॥
नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित । नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥ध्रु.॥
केला करविला नाहीं उपकार। नाहीं दया आली पीडितां पर । करू नये तो केला व्यापार। वाहिला भार कुटुंबाचा ॥२॥
नाही केलें तीर्थाचें भ्रमण । पाळिला पिंड करचरण । नाहीं संतसेवा घडलें दान । पूजावलोकन मुर्तीचें ॥३॥
असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय । न कळे हित करावें तें काय । नये बोलूं आठवूं तें ॥४॥
आप आपण्या घातकर। शत्रु जालों मी दावेदार । तूं तंव कृपेचा सागर। उतरीं पार तुका ह्मणे ॥५॥
आतां पावन सकळ सुखें । खादलें कदा तें नखें । अवघे सरलें पारिखें । सकळ देखें माहियरें ॥१॥
जवळी विठ्ठल रखुमाई । बहिणी बंधु बाप आई । सकळ गोताची च साई । पारिखें काइप ऐसें नेणिजे ॥ध्रु.॥
जगदाकारीं जाली सत्ता । वारोनी गेली पराधीनता । अवघे आपुलें चि आतां । लाज आणि चिंता दुहावली ॥२॥
वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं । करवी तैसें आपण करी । भीड न घरी चुकल्याची ॥३॥
सोसिला होता सासुरवास। बहुतांचा बहुत दिवस । बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ॥४॥
करिती कवतुक लाडें । मज बोलविती कोडें । मायबाप उत्तरें गोडें । बोेले बोबडें पुढें तुका ॥५॥
सर्वसुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुक्ती यत्न नाहीं केला । हिंडतां दिशा सीण पावला । मायावेष्टिला जीव माझा ॥१॥
माझें स्वहित नेणती कोणी । कांहीं न करितां मजवांचुनी । स्वजन तंव सुखमांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥ध्रु.॥
काय सांगों गर्भीची यातना । मज भोगितां नारायणा । मांस मळ मूत्र जाणा । तुज क्षणक्षणा ध्यात असें ॥२॥
मज चालतां प्रयाणकाळीं। असतां न दिसती जवळी । मृत्तिके मृत्तिका कवळी । एकले मेळीं संचिताचे ॥३॥
आतां मज ऐसें करीं गा देवा । कांहीं घडे तुझी चरणसेवा । तुका विनवीतसे केशवा । चालवीं दावा संसारें ॥४॥
अगा ए सावऑया सगुणा । गुणनिधिनाम नारायणा । आमची परिसा विज्ञापना । सांभाळी दीना आपुलिया ॥१॥
बहु या उदराचे कष्ट । आह्मांसि केलें कर्मभ्रष्ट । तुमची चुकविली वाट । करीं वटवट या निमित्यें ॥ध्रु.॥
जालों पांगिला जनासी । संसाराची आंदणी दासी । न कळे कधीं सोडविसी । दृढपाशीं बहु बांधलों ॥२॥
येथें तों नये आठव कांहीं । विसावा तो क्षण एक नाहीं । पडिलों आणिके प्रवाहीं । हित तों कांहीं दिसे चि ना ॥३॥
जीवित्व वेचलों वियोगें । हिंडतां प्रवास वाउगें । कांहीं व्याधि पीडा रोगें । केलिया भोगें तडातोडी ॥४॥
माझा मीं च जालों शत्रु । कैचा पुत्र दारा कैचा मित्रु । कासया घातला पसरु । अहो जगद्गु तुका ह्मणे ॥५॥
आतां मज धरवावी शुद्धि । येथुनी परतवावी बुद्धि । घ्यावें सोडवुनि कृपानिधि । सांपडलों संधीं काळचक्रीं ॥१॥
करिसील तरि नव्हे काई । राईचा डोंगर पर्वत राई । आपुले करुणेची खाई। करीं वो आई मजवरी ॥ध्रु.॥
मागील काळ अज्ञानपणें । सरला स्वभावें त्या गुणें । नेणे आयुष्य जालें उणें । पुढील पेणें अंतरलें ॥२॥
आतां मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय । येथें म्या येउनि केलें काय । नाहीं तुझे पाय आठविले ॥३॥
करूनि अपराध क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा । आपुले नामीं घ्यावा प्रेमा। सोडवीं भ्रमापासुनिया ॥४॥
हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव हा पायांपें चरणीं । करूं हा रस सेवन वाणी । फिटे तों धणी तुका ह्मणे ॥५॥
जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन । जगजीवन नारायण । गाईन गुण तयाचे ॥१॥
जो या उभा भीवरेच्या तिरीं । कट धरूनियां करीं । पाउलें सम चि साजिरीं । अंतरीं धरोनि राहेन ॥ध्रु.॥
जो या असुरांचा काळ । भक्तजनप्रतिपाळ । खेळे हीं लाघवें सकळ । तयाच्या भाळ पायांवरी ॥२॥
जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु खेळे वनमाळी । रसातळा नेला बळी । राहे पाताळीं स्वामी माझा ॥३॥
जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगीं सकळ कळा । जयाचे गळां वैजयंतीमाळा । तया वेळोवेळां दंडवत ॥४॥
जयाचे नाम पाप नासी । लक्ष्मी ऐसी जयाची दासी । जो हा तेजोपुंज्यरासी । सर्वभावें त्यासि तुका शरण ॥५॥
काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण । ऐसें तुह्मी सांगा संतजन । करा समाधान चित्त माझें ॥१॥
काय हें खंडईल कर्म । पारुषतील धर्माधर्म । कासयानें तें कळे वर्म । ह्मणउनी श्रम वाटतसे ॥ध्रु.॥
काय हो िस्थर राहेल बुद्धी । कांहीं अरिष्ट न येल मधीं । धरिली जाईल ते शुद्धी । शेवट कधीं तो मज न कळे ॥२॥
काय ऐसें पुण्य होईल गांठीं । घालीन पायीं देवाचे मिठी । मज तो कृवाळील जगजेठी । दाटइन कंठीं सद्गदित ॥३॥
काय हे निवतील डोळे । सुख तें देखोनी सोहळे । संचित कैसें तें न कळे । होतील डोहळे वासनेसी ॥४॥
ऐसी चिंता करीं सदा सर्वकाळ । रात्रिदिवस तळमळ । तुका ह्मणे नाहीं आपुलें बळ । जेणें फळ पावें निश्चयेंसी ॥५॥
तूंचि अनाथाचा दाता । दुःख मोह नासावया चिंता । शरण आलों तुज आतां । तारीं कृपावंता मायबापा ॥१॥
संतसंगति देइप चरणसेवा । जेणें तुझा विसर न पडावा । हा च भाव माझिया जीवा । पुरवीं देवा मनोरथ ॥२॥
मज भाव प्रेम देई कीर्ती । गुण नाम वर्णावया स्तुती । विघ्नां सोडवूनि हातीं । विनंती माझी परिसावी हे ॥३॥
आणीक कांहीं नाहीं मागणें । सुखसंपित्तराज्यचाड धन । सांकडें न पडे तुज जेणें । दुजें भक्तीविण मायबापा ॥४॥
जोडोनियां कर पायीं ठेवीं माथा । तुका विनवी पंढरिनाथा । रंगीं वोडवावी रंगकथा । पुरवीं व्यथा मायबापा ॥५॥
सेंदरीं हें देवी दैवतें । कोण तीं पुजी भुतेंकेतें । आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥१॥
आपुले इच्छे आणिकां पीडी । काय तें देईल बराडी । कळों ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धि अधरा ॥ध्रु.॥
दासीचा पाहुनरउखतें। धणी देईल आपुल्या हातें । करुणाभाषणउचितें । हें तों रितें सतंत शक्तिहीन ॥२॥
काय तें थिल्लरीचें पाणी । ओठ न भिजे फिटे धणी । सीण तरीं आदीं आवसानीं । क्षोभे पुरश्चरणीं दिलें फळ ॥३॥
विलेपनें बुजविती तोंड । भार खोल वाहाती उदंड । करविती आपणयां दंड। ऐसियास भांड ह्मणे देव तो ॥४॥
तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनार्दनष । तुका ह्मणे त्याचें करा चिंतन । वंदूं चरण येती सकळें ॥५॥
विषयओढीं भुलले जीव । आतां यांची कोण करील कींव । नुपजे नारायणीं भाव । पावोनि ठाव नरदेह ॥१॥
कोण सुख धरोनि संसारीं । पडोनि काळाचे आहारीं । माप या लागलें शरीरीं । जालियावरी सळे ओढिती ॥ध्रु.॥
बापुडीं होतील सेवटीं । आयुष्यासवें जालिया तुटी । भोगिले मागें पुढे ही कोटी । होईल भेटी जन्मासी ॥२॥
जंतिली घाणां बांधोनि डोळे । मागें जोडी आर तेणेंही पोळे । चालिलों किती तें न कळे । दुःखें हारंबळे भूकतान ॥३॥
एवढें जयाचें निमित्त । प्रारब्ध क्रियमाण संचित । तें हें देह मानुनि अनित्य। न करिती नित्य नामस्मरण ॥४॥
तुका ह्मणे न वेंचतां मोल । तो हा यासि महाग विठ्ठल । वेंचितां फुकाचे चि बोल। केवढें खोल अभागिया ॥५॥
आले हो संसारा तुह्मी एक करा । मुक्तीमारग हळू चि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । कां रे अघोरा देखसी ना ॥१॥
नाहीं त्या यमासि करुणा । बाहेर काढितां कुडी प्राणा । ओढाळ सांपडे जैं धान्या । चोर यातना धरिजेतां ॥२॥
नाहीं दिलें पावइल कैसा । चालतां पंथ तेणें वळसा । नसेल ठाउकें ऐकतो कैसा । नेती बंद जैसा धरोनियां ॥३॥
क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करितां कांहीं । वोढितां कांटवणा सोइप । अिग्नस्तंभीं बाही कवटाळविती ॥४॥
देखोनि अंगें कांपती । तये नदीमाजी चालविती। लागे ठाव न लगे बुडविती । वरि मारिती यमदंड ॥५॥
तानभूक न साहावे वेळ । तो राखिती कितीएक काळ । पिंड पाळूनि कैसा सीतळ । तो तप्तभूमीं ज्वाळ लोळविती ॥६॥
ह्मणउनी करा कांहीं सायास । व्हावेल तर व्हा रे उदास । करवेल तर करा नामघोष । सेवा भक्तीरस तुका ह्मणे ॥७॥
न बोलसी तें ही कळलें देवा । लाजसी आपुलिया नांवा। तुज मी नाहीं घालीत गोवा । भीड केशवा कासयाची ॥१॥
उतरीं आपुला हा पार । मजशीं बोलोनि उत्तर । माझा तुज नव्हे अंगीकार । मग विचार करीन मी ॥२॥
दात्या आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बोलिली ऐसी । यथानशक्ति टाकेल तैसी । बाधी दोघांसी विन्मुखता ॥३॥
ह्मणोनि करितों मी आस । तुझिया वचनाची वास । धीर हा करूनि सायास । न टळें नेमास आपुलिया ॥४॥
तुझें म्यां घेतल्या वांचून । न वजें एथूनि वचन । हा चि माझा नेम सत्य जाण । आहे नाहीं ह्मणे तुका ह्मणे ॥५॥
आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं । शरण रिघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥१॥
न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझे लाधती पाय । आतां मज न विसंबें माय । मोकलूनि धाय विनवीतसें ॥२॥
बहुत जाचलों संसारें । मोहमायाजाळाच्या विखारें । त्रिगुण येतील लहरें । तेणें दुःखें थोरें आक्रंदलों ॥३॥
आणीक दुःखें सांगों मी किती । सकळ संसारिस्थती । न साहे पाषाण फुटती । भय चित्तीं कांप भरलासे ॥४॥
आतां मज न साहवे सर्वथा । संसारगंधीची हे वार्ता । जालों वेडा असोनि जाणता । पावें अनंता तुका ह्मणे ॥५॥
आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं । जवळी अथवा दुरी धरीं । घाली संसारीं अथवा नको ॥१॥
शरण आलों नेणतपणें । भाव आणि भक्ती कांहीं च नेणें । मतिमंद सर्वज्ञानें । बहु रंक उणें रंकाहुनी ॥ध्रु.॥
मन िस्थर नाहीं माझिये हातीं। इंिद्रयें धांवतां नावरती । सकळ खुंटलिया युक्ती । शांति निवृत्ति जवळी नाहीं ॥२॥
सकळ निवेदिला भाव । तुझिये पायीं ठेविला जीव । आतां करीं कळे तो उपाव । तूं चि सर्व ठाव माझा देवा ॥३॥
राहिलों धरूनि विश्वास । आधार नेटीं तुझी कास । आणीक नेणें मी सायास । तुका ह्मणे यास तुझें उचित ॥४॥
देवा तूं कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु। जीवनसिद्धि साधनसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ॥१॥
शरणागता वज्रपंजर । अभयदाना तूं उदार । सकळां देवां तूं अगोचर । होसी अविकार अविनाश ॥ध्रु.॥
भागली स्तुति करितां फार । तेथें मी काय तें गव्हार । जाणावया तुझा हा विचार । नको अंतर देऊं आतां ॥२॥
नेणें भाव परि ह्मणवीं तुझा । नेणें भक्ती परि करितों पूजा । आपुल्या नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धांवणें ॥३॥
तुझिया बळें पंढरीनाथा । जालों निर्भर तुटली व्यथा । घातला भार तुझिया माथां। न भीं सर्वथा तुका ह्मणे ॥४॥
कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज बा हरी । अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥१॥
प्रथम केला गभाअ वास । काय ते सांगावे सायास । दुःख भोगिलें नव ही मास । आलों जन्मास येथवरी ॥२॥
बाळपण गेलें नेणतां । तारुण्यदशे विषयव्यथा। वृद्धपणीं प्रवर्तली चिंता । मरें मागुता जन्म धरीं ॥३॥
क्षण एक तो ही नाहीं विसावा । लक्ष चौयाशीं घेतल्या धांवा ।
भोवंडिती पाठीं लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ॥४॥
आतां पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनि राहेन द्वारीं । तुझा दास मी दीन कामारी। तुका ह्मणे करीं कृपा आतां ॥५॥
सुख या संतसमागमें । नित्य दुनावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥१॥
ह्मणोनि नाहीं कांहीं चिंता । तूं चि आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥२॥
ऐसा हा कळला निर्धार। मा माझा तुज न पडे विसर । अससी देऊनियां धीर । बाह्य अभ्यंतर मजजवळा ॥३॥
दुःख तें कैसें नये स्वप्नासी । भुक्तिमुक्ति जाल्या कामारी दासी । त्यांचें वर्म तूं आह्मांपाशीं । सुखें राहिलासी प्रेमाचिया ॥४॥
जेथें तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष । काय तें उणें आह्मां आनंदास । सेवूं ब्रह्मरस तुका ह्मणे ॥५॥
देवा तूं आमचा कृपाळ । भक्तीप्रतिपाळ दीनवत्सळ । माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥१॥
तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां । पुडती निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥२॥
आह्मां भय चिंता नाहीं धाक जन्म मरण कांहीं एक । जाला इहलोकीं परलोक । आलें सकळैकवैकुंठ ॥३॥
न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंदलहरीची गती । वर्णू कीर्ती तया सुखा ॥४॥
तुझिया नामाचीं भूषणें । तों यें मज लेवविलीं लेणें । तुका ह्मणे तुझियान गुणें । काय तें उणें एक आह्मां ॥५॥
न पवे सन्निध वाटते चिंता । वरि या बहुतांची सत्ता । नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बिळवंता सांपडलों ॥१॥
बहु भार पडियेला शिरीं । मी हें माझें मजवरी । उघड्या नागविलों चोरीं । घरिच्याघरीं जाणजाणतां ॥ध्रु.॥
तुज मागणें इतुलें आतां । मज या निरवावें संतां । जाला कंठस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ॥२॥
अति हा निकट समय । मग म्यां करावें तें काय । दिवस गेलिया टाकईल छाय । उरईल हाय रातिकाळीं ॥३॥
होईल संचिताची सत्ता। अंगा येईल पराधीनता । ठाव तो न दिसे लपतां। बहुत चिंता प्रवर्तली ॥४॥
ऐसी या संकटाची संधी । धांव घालावी कृपानिधी । तुका ह्मणे माझी बळबुद्धी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥५॥
आतां धर्माधमाअ कांहीं उचित । माझें विचारावें हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि जालों ॥१॥
येथें राया रंका एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं । पावलों पाय भलत्या परी। मग बाहेरी न घालावें ॥ध्रु.॥
ऐसें हें चालत आलें मागें । नाहीं मी बोलत वाउगें । आपुलिया पडिल्या प्रसंगें । कीर्ति हे जगे वाणिजेते ॥२॥
घालोनियां माथां बैसलों भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधीं हे विचारिली थार । अविनाश पर पद ऐसें ॥३॥
येथें एक वर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार । देह हें नाशिवंत जाणार । धरिलें सार नाम तुझें ॥४॥
केली आराणुक सकळां हातीं। धरावें धरिलें तें चित्तीं । तुका ह्मणें सांगितलें संतीं। देइप अंतीं ठाव मज देवा ॥५॥
बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी । महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होइजे ॥१॥
दिलीं इंिद्रयें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन । जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥ध्रु.॥
तिळेंतीळ पुण्य सांचा पडे । तरि हें बहुतां जन्मीं जोडे । नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥२॥
ऐसिये पावविलों ठायीं । आतां मी कांई होऊं उतराई। येवढा जीव ठेवीन पायीं । तूं माझे आई पांडुरंगे ॥३॥
फेडियेला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ । लावूनि स्तनीं केलों सीतळ । निजविलों बाळ निजस्थानीं ॥४॥
नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी लागती गोडा । आला आकारा आमुच्या चाडा। तुका ह्मणे भिडा भक्तीचिया ॥५॥
अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं । अपराधाची वोळिलों मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥१॥
किती दोषा देऊं परिहार । गुणदोषें मिळलें अंतर । आदि वर्तमान भविष्याकार। गेला अंतपार ऐसें नाहीं ॥ध्रु.॥
विविध कर्म चौयाशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा । कर्मकोठार पांजरा । जन्मजरामरणसांटवण ॥२॥
जीवा नाहीं कुडीचें लाहातें । यें भिन्न पंच भूतें । रचतें खचतें संचितें । असार रितें फलकट ॥३॥
पुत्र पत्नी सहोदर । मायबाप गोताचा पसर । मिळतां काष्ठें लोटतां पूर । आदळीं दूर होती खलाळीं ॥४॥
ह्मणोनि नासावें अज्ञान । इतुलें करीं कृपादान । कृपाळु तूं जनार्दन । धरूनि चरण तुका विनवी ॥५॥
ऐसी हे गर्जवूं वैखरी । केशव मुकुंद मुरारी । राम कृष्ण नामें बरीं । हरी हरी दोष सकळ ॥१॥
जनार्दना जगजीवना। विराटस्वरूपा वामना । महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥ध्रु.॥
चक्रपाणी गदाधरा । असुरमर्दना वीर्यवीरा । सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ॥२॥
मदनमूर्ती मनमोहना । गोपाळगोपिकारमणा । नटनाट्यकौशल्य कान्हा । अहो संपन्ना सर्वगुणें ॥३॥
गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी आणि सर्वजाणा। करोनि अकर्ता आपणा । नेदी अभिमाना आतळों ॥४॥
कासयानें घडे याची सेवा । काय एक समर्पावें या देवा । वश्य तो नव्हे वांचुनि भावा । पाय जीवावेगळे न करी तुका ॥५॥
होतों तें चिंतीत मानसीं । नवस फळले नवसीं । जोडिते नारायणा ऐसी । अविट ज्यासी नाश नाहीं ॥१॥
धरिले जीवीं न सोडीं पाय । आलें या जीवित्वाचें काय । कैं हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचितानें ॥ध्रु.॥
मज तों पडियेली होती भुली। चित्ताची अपसव्य चाली । होती मृगजळें गोवी केली । दृष्टि उघडली बरें जालें ॥२॥
आतां हा सिद्धि पावो भाव । मध्यें चांचल्यें न व्हावा जीव । ऐसी तुह्मां भाकीतसें कींव । कृपाळुवा जगदानिया ॥३॥
कळों येतें आपुले बुद्धी । ऐसें तों न घडतें कधीं। केवढे आघात ते मधीं । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ॥४॥
कृपा या केली संतजनीं । माझी अळंकारिली वाणी । प्रीति हे लाविली कीर्तनीं । तुका चरणीं लोळतसे ॥५॥
तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा। भवतारका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥
काय जाणावें म्यां दीनें । तुझिये भक्तीचीं लक्षणें । धड तें तोंड धोऊं नेणें । परि चिंतनें काळ सारीं ॥ध्रु.॥
न लवीं आणीक कांहीं पिसें। माझिया मना वांयां जाय ऐसें । चालवीं आपुल्या प्रकाशें । हातीं सरिसें धरोनियां ॥२॥
तुज समर्पिली काया । जीवें भावें पंढरीराया। सांभाळीं समविषम डाया । करीं छाया कृपेची ॥३॥
चतुर तरीं चतुरां रावो । जाणता तरीं जीवांचा जीव । न्यून तो कोण एक ठाव। आरुष भाव परि माझा ॥४॥
होतें तें माझें भांडवल । पायांपें निवेदिले बोल । आदरा ऐसें पाविजे मोल । तुका ह्मणे साच फोल तूं जाणसी ॥५॥
कां हो माझा मानियेला भार । ऐसा दिसे फार । अनंत पावविलीं उद्धार । नव्हे चि थार मज शेवटीं ॥१॥
पाप बिळवंत गाढें । तुज ही राहों सकतें पुढें । मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें देखियेलें ॥२॥
काय मानिती संतजन । तुमचें हीनत्ववचन। कीं वृद्ध जाला नारायण । न चले पण आधील तो ॥३॥
आतां न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी । पडदा काय घरच्याघरीं । धरिलें दुरी तेव्हां धरिलें ॥४॥
नको चाळवूं अनंता । कासया होतोसि नेणता । काय तूं नाहीं धरीत सत्ता । तुका ह्मणे आतां होइप प्रगट ॥५॥
मज ते हांसतील संत । जींहीं देखिलेती मूर्तिमंत । ह्मणोनि उद्वेगलें चित्त । आहा च भक्त ऐसा दिसें ॥१॥
ध्यानीं म्या वर्णावेति कैसे । पुढें एकीं स्तुति केली असे । तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आश लागलोंसें ॥ध्रु.॥
कासया पाडिला जी धडा । उगा चि वेडा आणि वांकडा । आह्मां लेंकरांसि पीडा । एक मागें जोडा दुसयाचा ॥२॥
सांगा कोणाचा अन्याय । ऐसें मी धरीतसें पाय । तूं तंव सम चि सकळां माय । काय अन्याय एक माझा ॥३॥
नये हा जरी कारणा । तरी कां व्यालेति नारायणा । वचन द्यावें जी वचना । मज अज्ञाना समजावीं ॥४॥
बहुत दिवस केला बोभाट । पाहातां श्रमलों ते वाट । तुका ह्मणे विस्तारलें ताट । काय वीट आला नेणों स्वामी ॥५॥
बरें जालें आजिवरी । नाहीं पडिलों मृत्याचे आहारीं । वांचोन आलों एथवरी । उरलें तें हरी तुह्मां समर्पण ॥१॥
दिला या काळें अवकाश । नाहीं पावलें आयुष्य नाश । कार्या कारण उरलें शेष । गेलें तें भूस जावो परतें ॥ध्रु.॥
बुडणें खोटें पावतां थडी । स्वप्नीं जाली ओढाओढी । नासली जागृतीची घडी । साच जोडी शेवटीं गोड घास ॥२॥
तुह्मासि पावविली हाक । तेणें निरसला धाक । तुमचें भातें हें कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥३॥
रवीच्या नावें निशीचा नाश । उदय होतां चि प्रकाश । अतां कैचा आह्मां दोष । तूं जगदीश कैवारी ॥४॥
आतां जळो देह सुख दंभ मान । न करीं याचें साधन । तूं जगदादि नारायण । आलों शरण तुका ह्मणे ॥५॥
आतां माझा नेणों परतों भाव । विसावोनि पायीं ठेविला जीव । सकळां लाभांचा हा ठाव । ऐसा वाव जाला चित्ताठायीं ॥१॥
भांडवल गांठी तरि विश्वास । जालों तों जालों निश्चय दास । न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचा ची ॥ध्रु.॥
आहे तें निवेदिलें सर्व । मी हें माझें मोडियला गर्व । अकाळीं काळ अवघें पर्व । जाला भरवसा कृपेलाभाचा ॥२॥
वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचुनी जाणत । तरी हें समाधान चित्त । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥३॥
करूनि नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा । कळवळा तो जीवनीं खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥४॥
बहु मतापासूनि निराळा । होऊनि राहिलों सोंवळा । बैसल्या रूपाचा कळवळा । तुका ह्मणे डोळां लेइलों तें ॥५॥
तुळसीमाळा घालुनी कंठीं । उभा विटेवरी जगजेठी । अवलोकोनि पुंडलीका दृष्टी । असे भीमातटीं पंढरीनाथ ॥१॥
भुक्तिमुक्ति जयाच्या कामारी । रिद्धिसिद्धि वोळगती द्वारीं । सुदर्शन घरटी करी । काळ कांपे दुरी धाकें तया ॥२॥
जगज्जननी असे वाम भागीं । भीमकी शोभली अर्धांगीं । जैसी विद्युल्लता झमके मेघीं । दरुषणें भंगी महा दोष ॥३॥
सुखसागर परमानंदु । गोपीगोपाळां गोधनां छंदु । पिक्षश्वापदां जयाचा वेधु । वाहे गोविंदु पांवा छंदें ॥४॥
मुखमंडित चतुर्भुजा । मनमोहना गरुडध्वजा । तुका ह्मणे स्वामी माझा । पावे भक्तिकाजा लवलाहीं ॥५॥
हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें ह्मणावें । करितों जीवें निंबलोण ॥१॥
बैसतां संतांचे पंगती । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणी च नव्हती । निश्चय चित्तीं दृढ जाला ॥ध्रु.॥
येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड । कनिष्ठीं रुचि ठेऊनि गोड । देखत नाड कळतसे ॥२॥
मरती मेलीं नेणों किती । तो चि लाभ तयाचे संगती । ह्मणोनि येतों काकुलती । धीर तो चित्तीं दृढ द्यावा ॥३॥
सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन । आदिपिता तूं नारायण । जोडी चरण तुमचे तें ॥४॥
आपलें आपण न करूं हित । करूं हें प्रमाण संचित । तरी मी नष्ट चि पतित । तुका ह्मणे मज संत हांसती ॥५॥
बरवें जालें लागलों कारणीं । तुमचे राहिलों चरणीं । फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी ॥१॥
न वंचें शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं । जालों संताची अंदणी दासी। केला याविशीं निर्धार ॥ध्रु.॥
जीवनीं राखिला जिव्हाळा । जालों मी मजसी निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥२॥
जयाचें जया होईल ठावें । लाहो या साधियेला भावें । ऐसें होतें राखियलें जीवें । येथूनि देवें भोवहुनी ॥३॥
आस निरसली ये खेपे। अवघे पंथ जाले सोपे । तुमचे दीनबंधु कृपें । दुसरें कांपे सत्ताधाकें ॥४॥
अंकिले पणें आनंदरूप । आतळों नये पुण्यपाप । सारूनि ठेविले संकल्प । तुका ह्मणे आपें आप एकाएकीं ॥५॥
अवघ्या दशा येणें साधती । मुख्य उपासना सगुणभक्ती। प्रगटे हृदयींची मूर्ती । भावशुद्धि जाणोनियां ॥१॥
बीज आणि फळ हरींचे नाम । सकळ पुण्य सकळ धर्म । सकळां कळांचें हे वर्म। निवारी श्रम सकळ ही ॥ध्रु.॥
जेथें कीर्तन हें नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास । सकळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ॥२॥
येती अंगा वसती लक्षणें । अंतरीं देवें धरिलें ठाणें। आपण चि येती तयाचा गुण । जाणें येणें खुंटे वस्तीचें ॥३॥
न लगे सांडावा आश्रम । उपजले कुळींचे धर्म । आणीक न करावे श्रम । एक पुरे नाम विठोबाचें ॥४॥
वेदपुरुष नारायण । योगियांचें ब्रह्म शून्य । मुक्ता आत्मा परिपूर्ण । तुका ह्मणे सगुण भोऑया आह्मां ॥५॥
श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगव्यापका जनार्दना । आनंदघना अविनाशा ॥१॥
सकळदेवा आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥ध्रु.॥
चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा । सहस्रपादा सहस्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥२॥
कमलनयना कमलापती । कामिनीमोहना मदनमूर्ती । भवतारका धरित्या िक्षती । वामनमूर्ती त्रिविक्रमा ॥३॥
अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना। वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥४॥
तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणीं । हे चि करीतसें विनवणी। भवबंधनीं सोडवावें ॥५॥
आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत । पाहातां न कळे जयाचा अंत । तो चि हृदयांत घालूं आतां ॥१॥
विसरोनि आपुला देहपणभाव । नामें चि भुलविला पंढरीराव । न विचारी याती कुळ नांव । लागावया पाव संतांचे ॥२॥
बरें वर्म आलें आमुचिया हातां । हिंडावें धुंडावें न लगतां । होय अविनाश सहाकारी दाता । चतुर्भुज संता परि धाकें ॥३॥
होय आवडी सानें थोर । रूप सुंदर मनोहर । भक्तिप्रिय लोभापर । करी आदर याचकपणें ॥४॥
तें वर्म आलें आमुच्या हाता । ह्मणोनि शरण निघालों संतां । तुका ह्मणे पंढरीनाथा । न सोडी आतां जीवें भावें ॥५॥
माझा तंव खुंटला उपाव । जेणें तुझे आतुडती पाव । करूं भक्ति तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणेविशीं ॥१॥
धर्म करूं तरि नाहीं चित्त । दान देऊं तरि नाहीं वित्त । नेणें पुजों ब्राह्मण अतीत । नाहीं भूतदया पोटा हातीं ॥२॥
नेणें गुरुदास्य संतसेवन । जप तप अनुष्ठान । नव्हे वैराग्य वनसेवन । नव्हे दमन इंिद्रयांसी ॥३॥
तीर्थ करूं तरि मन नये सवें । व्रत करूं तरि विधि नेणें स्वभावें । देव जरि आहे ह्मणों मजसवें । तरि आपपरावें न वंचे ॥४॥
ह्मणोनि जालों शरणागत । तुझा दास मी अंकित । यास कांहीं न लगे संचित । जालों नििंश्चत तुका ह्मणे ॥५॥
तरि म्यां आळवावे कोणा । कोण हे पुरवील वासना। तुजवांचूनि नारायणा । लावी स्तना कृपावंते ॥१॥
आपुला न विचारी सिण । न धरीं अंगसंगें भिन्न । अंगीकारिलें राखें दीन । देइप जीवदान आवडीचें ॥ध्रु.॥
माझिये मनासिहे आस । नित्य सेवावा ब्रह्मरस । अखंड चरणींचा वास । पुरवीं आस याचकाची ॥२॥
माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे वाट दाविली देवा । एवढ्या आदराचा हेवा । मागें सेवादान आवडीनें ॥३॥
आळवीन करुणावचनीं। आणीक गोड न लगे मनीं । निद्रा जागृती आणि स्वप्नीं । धरिलें ध्यानीं मनीं रूप ॥४॥
आतां भेट न भेटतां आहे । किंवा नाहीं ऐसें विचारूनि पाहें । लागला झरा अखंड आहे । तुका ह्मणे साहे केलें अंतरीं ॥५॥
हें चि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥१॥
सांवळें रूप ल्यावें डोळां । सा चौ अठरांचा गोळा । पदर लागों नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्र ॥ध्रु.॥
भोजना न द्यावें अन्न । जेणें चुके अनुपान । तरीं च घेतल्याचा गुण । होईल जाण सत्य भाव ॥२॥
नये निघों आपुलिया घरा । बाहेर लागों नये वारा । बहु बोलणें तें सारा । संग दुसरा वर्जावा ॥३॥
पास तें एक द्यावें वरी । नवनीताची होईल परी । होईल गुसिळलें तें निवारी । सार भीतरी नाहीं तया ॥४॥
न्हायें अनुतापीं पांघरें दिशा । स्वेद निघों दे अवघी आशा । होसिल मागें होतासि तैसा । तुका ह्मणे दशा भोगीं वैराग्य ॥५॥
मागुता हा चि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी। हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥१॥
लक्ष चौयाशी न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा । येउनि पडसी संदेहपुरा। वोळसा थोरा मायाजाळीं ॥२॥
पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती । कांहीं एक उपजतां मरती । बहिरीं अंध होती पांगुळ मुकीं ॥३॥
नरदेह निधान लागलें हातीं । उत्तम सार उत्तम गती । होइन देव चि ह्मणती ते होती । तरि कां चित्तीं न धरावें ॥४॥
क्षण एक मन िस्थर करूनी । साव होइप डोळे उघडोनी । पाहें वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ॥५॥
दास्य करी दासांचें । उणें न साहे तयांचें । वाढिलें ठायींचें । भानें टाकोनियां धांवे ॥१॥
ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटीं कर । सर्वस्वें उदार । भक्तांलागीं प्रगटे ॥ध्रु.॥
हृदयीं श्रीवत्सलांछन । मिरवी भक्तांचें भूषण । नाहीं तयाचा सीण । सुख धरिलें लातेचें ॥२॥
सत्यभामा दान करी । उजुर नाहीं अंगीकारी । सेवकाच्या शिरीं । धरूनि चाले पादुका ॥३॥
राखे दारवंटा बळीचा। रथी जाला अर्जुनाचा । दास सेवकांचा । होय साचा अंकित ॥४॥
भिडा नो बोलवें पुंडलिकाशीं । उभा मर्यादा पाठीशीं । तुका ह्मणे ऐसी । कां रे न भजा माउली ॥५॥
हरि तैसे हरीचे दास । नाहीं तयां भय मोह चिंता आस। होउनि राहाती उदास । बळकट कांस भक्तीची ॥१॥
धरूनि पाय तजिलें जन । न लगे मान मृत्तिकाधन । कंठीं नाम अमृताचें पान। न लगे आन ऐसें जालें ॥ध्रु.॥
वाव तरी उदंड च पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी । कामक्रोधा न सुटे मिठी । वेठी तरी गिहे राबवीती ॥२॥
बळें तरि नांगवती काळा । लीन तरि सकळांच्या तळा । उदार देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥३॥
संसार तो तयांचा दास । मोक्ष तें पाहातसे वास । रिद्धिसिद्धि देशटा त्रास । न शिवति यास वैष्णवजन ॥४॥
जन्ममृत्युस्वप्नांसारिखें । आप त्यां न दिसे पारखें । तुका ह्मणे अखंडित सुखें । वाणी वदे मुखें प्रेमा अमृताची ॥५॥
बहुत जाचलों संसारीं । वसें गभाअ मातेच्या उदरीं । लक्ष चौयाशी योनिद्वारीं । जालों भिकारी याचक ॥१॥
जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बांधलों संचितीं । प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥ध्रु.॥
न भरे पोट नाहीं विसांवा । नाहीं नेम एक ठाव गांवा । नाहीं सत्ता न फिरे ऐसी देवा । लाहे जीवा खापरीं तडफडी ॥२॥
काळ बहुत गेले ऐसिया रीती । आणीक पुढें नेणों किती । खंडणा नाहीं पुनरावृत्ती । मज कल्पांतीं तरी वेगळें ॥३॥
ऐसें दुःख कोण हरील माझें । कोणा भार घालूं आपुलें ओझें । भवसिंधुतारक नाम तुझें । धांवसि काजें आडलिया ॥४॥
आतां धांव घालीं नारायणा । मजकारणें रंका दीना । गुण न विचारीं अवगुणा । तुका करुणा भाकीतसे ॥५॥
जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाये । तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जायें चुकों नको ॥१॥
जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरिगुण गायें आइक वहिला । मनीं भाव धरूनि भला । न वंचें त्याला चुकों नको ॥२॥
जोडोनि धन न घलीं माती । ब्रह्मवृंदें पूजन इति । सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगाती चुकों नको ॥३॥
दशा यौवन बाणली अंगीं । पांगिला नव्हें विषयसंगीं । काम क्रोध लोभ मोह त्यागीं । राहें संतसंगीं चुकों नको ॥५॥
मग तेथें न चले कांहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं। पुढें संचित जाईल ग्वाही । तुका ह्मणे ते ही यमआज्ञा ॥५॥
ऐक पांडुरंगा एक मात । कांहीं बोलणें आहे एकांत । आह्मां जरी तारील संचित । तरी उचित काय तुझें ॥१॥
उसनें फेडितां धर्म तो कोण । काय तया मानवेल जन । काय गा मिरवूनि भूषण । वांयां थोरपण जनांमध्यें ॥ध्रु.॥
अन्न जरी न मिळे तयासी देणें । आगांतुक पात्र उचित दान । उपकार तरी धनमंत्रीपणें । जरी देणेंघेणें नाहीं आशा ॥२॥
शूर तों तयासी बोलिजे जाणा । पाठीशीं घालूनि राखे दीना । पार पुण्य नाहीं त्या भूषणा । ऐक नारायणा वचन हें ॥३॥
आतां पुढें बोलणें तें काइप । मज तारिसी तरी च सही । वचन आपुलें सिद्धी नेइप । तुका ह्मणे तइप मज कळसी ॥४॥
चांगलें नाम गोमटें रूप । निवती डोळे हरती ताप । विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प । अति सार ॥१॥
शस्त्र हे निर्वाणींचा बाण । निकट समय अवसान । कोठें योजेल दश दान। खंडी नारायण दुःख चिंतनें ॥ध्रु.॥
सकळ श्रेष्ठांचें मत । पावे सिद्धी पाववी अनंत । ह्मणोनि व्हावें शरणागत । आहे उचित एवढें चि ॥२॥
ह्मणोनि रुसलों संसारा । सर्प विखार हा पांढरा । तुजशीं अंतर रे दातारा । या चि दावेदारानिमित्त ॥३॥
येणें मज भोगविल्या खाणी। नसतां छंद लाविला मनीं । माजलों मी माझे भ्रमणीं । जाली बोडणी विटंबना ॥४॥
पावलों केलियाचा दंड । खाणी भोगिविल्या उदंड। आतां केला पाहिजे खंड । तुका दंडवत घाली देवा ॥५॥
चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचें चि नाम । दयाळ तरी अवघा धर्म । भला तरी दासा श्रम होऊं नेदी ॥१॥
उदार तरी लक्ष्मीयेसी । जुंझार तरी किळकाळासी । चतुर तरी गुणांची च रासी । जाणता तयासी तो एक ॥ध्रु.॥
जुनाट तरी बहु काळा । न कळे जयाची लीळा । नेणता गोवळीं गोवळा । लाघवी अवळाभुलवणा ॥२॥
गांढ्या तरी भावाचा अंकित । बराडी तरी उिच्छष्टाची प्रीत । ओंगळ तरी कुब्जेशीं रत । भ्याड अनंत बहु पापा ॥३॥
खेळतो येणें चि खेळावा । नट तो येणें चि आवगावा। लपोनि जीवीं न कळे जीवा । धरितां देवा नातुडेसी ॥४॥
उंच तरी बहुत चि उंच । नीच तरी बहुत चि नीच । तुका ह्मणे बोलिलों साच। नाहीं अहाच पूजा केली ॥५॥
काय आह्मी भक्ति करणें कैसी । काय एक वाहावें तुह्मांसी । अवघा भरोनि उरलासी । वाणीं खाणीं रसीं रूपगंधी ॥१॥
कसें करूं इंिद्रयां बंधन । पुण्यपापाचें खंडण । काय व्रत करूं आचरण । काय तुजविण उरलें तें ॥२॥
काय डोळे झांकुनियां पाहूं । मंत्रजप काय ध्याऊं । कवणें ठायीं धरूनि भाव । काय तें वाव तुजविण ॥३॥
काय हिंडों कवण दिशा । कवणे ठायीं पाय ठेवूं कैसा । काय तूं नव्हेसि न कळे तैसा । काय मी कैसा पाहों आतां ॥४॥
तुझिया नामाची सकळ । पूजा अर्चन मंत्र माळ । धूप दीप नैवेद्य फळ तांबूल । घेऊं पुष्पांजुळ तुका ह्मणे ॥५॥
शरीर दुःखाचें कोठार । शरीर रोगाचें भांडार । शरीर दुगपधीची थार । नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ॥१॥
शरीर उत्तम चांगलें। शरीर सुखाचें घोंसुलें । शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रह्म ॥ध्रु.॥
शरीर विटाळाचें अळें । मायामोहपाशजाळें। पतन शरीराच्या मुळें । शरीर काळें व्यापिलें ॥२॥
शरीर सकळ हें शुद्ध । शरीर निधींचा ही निध । शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यें भोगी देव शरीरा ॥३॥
शरीर अविद्येचा बांधा । शरीर अवगुणाचा रांधा । शरीरीं वसे बहुत बाधा । नाहीं गुण सुदा एक शरीरीं ॥४॥
शरीरा दुःख नेदावा भोग । न द्यावें सुख न करीं त्याग । नव्हे वोखटें ना चांग । तुका ह्मणे वेग करीं हरिभजनीं ॥५॥
इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी । सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्तें वेव्हारीं सुखरूप ॥१॥
न करीं दंभाचा सायास । शांती राहें बहुवस । जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥२॥
जनमित्र होइप सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा । संग न धरावा दुर्जनाचा । करीं संतांचा सायास ॥३॥
करिसी देवाविण आस । अवघी होईल निरास । तृष्णा वाढविसी बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥४॥
धरूनि विश्वास करीं धीर । करितां देव हा चि निर्धार । तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर तुका ह्मणे ॥५॥
संसारसिंधु हा दुस्तर । नुलंघवे उलंघितां पार । बहुत वाहाविलें दूर । न लगे चि तीर पैल थडी ॥१॥
किती जन्म जाला फेरा । गणित नाहीं जी दातारा । पडिलों आवताअ भोंवरा । बहुता थोरा वोळसिया ॥ध्रु.॥
वाढलों परी नेणती बुद्धी । नाहीं परतली धरिली शुद्धी । मग म्यां विचारावें कधीं । ऐसी संधी सांडुनिया ॥२॥
अनेक खाणीं आहार निद्रा । भयमैथुनाचा चि थारा । बाळत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथें ॥३॥
ऐसीं उलंघूनि आलों स्थळें । बहु भोवंडिलों काळें । आतां हें उगवावें जाळें । उजेडा बळें दिवसाच्या ॥४॥
सांडीन या संसाराची वाट । बहु येणें भोगविले कष्ट । दावी सत्या ऐसें नष्ट । तुका ह्मणे भ्रष्ट जालों देवद्रोही ॥५॥
विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी । विठ्ठल पुंडलिकापासीं । कृपादानाविसीं उदार ॥१॥
विठ्ठल स्मरणा कोंवळा। विठ्ठल गौरवीं आगळा । आधार ब्रह्मांडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ॥ध्रु.॥
उभा चि परी न मनी सीण । नाहीं उद्धरितां भिन्न । समर्थाचे घरीं एक अन्न । आर्तभूता क्षणोक्षणा सांभाळी ॥२॥
रुचीचे प्रकार। आणिताती आदरें । कोठें ही न पडे अंतर । थोरां थोर धाकुट्या धाकुटा ॥३॥
करितां बळ धरितां नये । झोंबतां डोळे मनें च होय। आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥४॥
पान्हा तरी आल्या अंतर तेथें । तों नाहीं भरिलें रितें । करितों सेवन आइतें । तुका ह्मणे चित्तें चित्त मेळवूनी ॥५॥
ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥१॥
न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेची च खाणी । स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥ध्रु.॥
रामकृष्णध्यान वामननारसिंहीं । उग्र आणि सौम्य कांहीं च नाहीं । सांपडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥२॥
गुणगंभीर चतुर सुजाण। शूर धीर उदार नारायण। व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहनलावण्य हें ॥३॥
ठाण हें साजिरें सुंदर । अविनाश अविकार । अनंत आणि अपार । तो हा कटीं कर धरिताहे ॥४॥
जयाची वाणी सुमनमाळा। परमामृतजिव्हाळा । अनंता अंगीं अनंत कळा । तुका जवळा चरण सेवे ॥५॥
अगा ये वैकुंटनायका । अगा ये त्रैलोक्यतारका । अगा जनार्दना जगव्यापका । अगा पाळका भक्तांचिया ॥१॥
अगा ये वसुदेवदेवकीनंदना । अगा ये गोपिकारमणा । अगा बिळबंध वामना। अगा निधाना गुणनिधी ॥ध्रु.॥
अगा ये द्रौपदीबांधवा । अगा ये सखया पांडवा । अगा जीवाचिये जीवा । अगा माधवा मधुसूदना ॥२॥
अगा महेश्वरा महाराजा । अगा श्रीहरी गरुडध्वजा । अगा सुंदरा सहस्रभुजा । पार मी तुझा काय वणूप ॥३॥
अगा अंबॠषिपरंपरा। निलारंभ निर्विकारा । अगा गोवर्धन धरणीधरा । अगा माहेरा दीनाचिया ॥४॥
अगा धर्मराया धर्मशीळा । कृपासिंधु कृपाळा । अगा प्रेमाचिया कल्लोळा । सकळकळाप्रवीणा ॥५॥
अगा चतुरा सुजाणा । मधुरागिरा सुलक्षणा । अगा उदारा असुरमर्दना । राखें शरणा तुकयाबंधु ॥६॥
उभा देखिला भीमातीरीं । कर मिरवले कटावरी । पाउलें तरी सम चि साजिरीं । नाम तरी अनंत अतिगोड ॥१॥
शंखचक्रांकित भूषणें । जडितमेखळा चिद्रत्नें । पितांबर उटी शोभे गोरेपणें । लोपलीं तेणें रवितेजें ॥२॥
श्रवणीं कुंडलें देती ढाळ । दशांगुळीं मुद्रिका माळ । दंतओळी हिरे झळाळ । मुख निर्मळ सुखरासी ॥३॥
कडीं कडदोरा वांकी वेळा । बाहीं बाहुवटे पदक गळां । मृगनाभी रेखिला टिळा । लवती डोळां विद्युल्लता ॥४॥
सुंदरपणाची साम्यता । काय वणूप ते पावे आतां । तुकयाबंधु ह्मणे रे अच्युता । धन्य ते मातापिता प्रसवली ॥५॥
एक मागणें हृषीकेशी । चित्त द्यावें सांगतों वचनासी । मज अंतर तुझ्या चरणासी । न पडे ऐसी कृपा करीं ॥१॥
नको दुजी बुद्धि आणीक । रिद्धिसिद्धी परलोक । तूं स्वामी मी सेवक । खंडणा नको करूं ऐसी ॥ध्रु.॥
मना येईल तो जन्म देइप । भलते कुळीं भलते ठायीं । तें मी सांकडें घालीत नाहीं । हृदयींहुनीं तूं न वजें ॥२॥
इतुलें करीं भलत्या परी । भलत्या भावें तुझें द्वारीं । राहेन दास होऊनि कामारी । वदो वैखरी नित्य नाम ॥३॥
नको विचारूं दुसरें आतां । शरण आलों जी पंढरीनाथा । तुकयाबंधु ह्मणे रे अच्युता । आहेसि तूं दाता दानशूर ॥४॥
कइप देखतां होईन डोळीं । सकळां भूतीं मूर्ति सांवळी। जीवा नांव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ॥१॥
ऐसा कृपा करील नारायण । जीव जगाचा होईन । प्रेमसागरीं बुडईन । होईल स्नान अनुतापीं ॥ध्रु.॥
ऐसा कइप येईन दैवास । दृश्य नासोनि जाईल आस । सदा संतचरणीं देहाचा वास । सेवीन शेष धणीवरी ॥२॥
कइप नवसा येतील अंकुर । सुखा नाहींसा होईल पार । अमृत तें पृथ्वीजळ सागर । वाहाती पूर आनंदाचे ॥३॥
प्रसन्न दया क्षमा शांति । कइप नवविधा होईल भक्ति । भोगीन वैराग्यसंपित्त । मनोरथ कळती तइप पुरले ॥४॥
तुकयाबंधु ह्मणे सांग । नव्हे तुजविण निरसेना पांग । ह्मणोनि घातलें साष्टांग । पांडुरंगा वरी चरणा ॥५॥
तूं बिळया शिरोमणी । आहेसि माजी ये त्रिभुवनीं । रिघालों पाठी तुझी ह्मणउनी । आतां करीन मी असेल तें ॥१॥
तूं देवा प्रतापदिनकर । सुरा असुरांचा सुर । महावीरां वीर धनुर्धर । मी तों पामर काय तेथें ॥ध्रु.॥
कृपासिंधु दीनवत्सल । फोडिली देवाची बंदशाळ । संहारूनि राक्षसदळ । शरणागत राजीं स्थापिला ॥२॥
उपकर्म करावा बहुत । तरी तूं जाणसी धर्मनीत । उचित काय तें अनुचित । राखें शरणागत आलों आतां ॥३॥
किती म्यां काय विनवावें । शरण आलों जीवें भावें । तुकयाबंधु ह्मणे करावें । क्षेम अवघें येणें काळें ॥४॥
देवा मी चांडाळ चांडाळ । ह्मणतां लागताहे वेळ । नसे पाहातां भूमंडळ । ऐसा अमंगळ खळ दुसरा ॥१॥
जन्मा उपजलियापासुनी । असत्य कर्म तें अझुनी । सत्य आचरण नेणें स्वप्नीं । निखळ खाणी अवगुणांची ॥२॥
भक्ति दया अथवा कथा। कानीं न साहवे वार्ता । अखंड विषयांची वेथा । अधम पुरता अधमाहुनी ॥३॥
काम क्रोध दंभ अहंकार । गर्व ताठा मद मत्सर । यांचें तरी माहेरघर । परउपकार वैरी तैसा ॥४॥
निंदा द्वेष घात विश्वास । करितां नाहीं केला आळस । करूं नये ते केले संतउपहास । अभक्ष तें ही भिक्षलें ॥५॥
पाळिलें नाहीं पितृवचन। सदा परद्वारीं परधनीं ध्यान । बोलों नये घडलें ऐसें अनोविन । दासीगमन आदिकरूनी ॥६॥
कायामनें वाचाइंिद्रयांशीं । सकळ पापांची च राशी । तुकयाबंधु ह्मणे ऐसियासी । आलों हृषीकेशी तुज शरण ॥७॥
काय काय करितों या मना । परी नाइके नारायणा । करूं नये त्याची करी विवंचना । पतना नेऊं आदरिलें ॥१॥
भलतिये सवें धांवे सैराट । वाट आडवाट दरे दरकुट । न विचारी कुडें कांहीं कपट । घात बळकट मांडियेला ॥२॥
न पुरती भ्रमणा दाही दिशा । सप्त ही पाताळ आकाशा । घाली उडी बळें चि देखोनि फांसा । केलों या देशा पाहुणा ॥३॥
चेतवूनि इंिद्रयें सकळ। आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ । दुराविली शुद्ध बुद्धि केली राळ । ऐसें चांडाळ अनिवार हें ॥४॥
आतां काय ऐसें करावें यासी । बहु जाचिलों केलों कासाविसी । तुकयाबंधु ह्मणे हृषीकेशी । धांव मज ऐसी परी जाली ॥५॥
काय खावें आतां कोणीकडे जावें । गांवांत राहावें कोण्या बळें ॥१॥
कोपला पाटील गांवचे हे लोक । आतां घाली भीक कोण मज ॥ध्रु.॥
आतां येणें चवी सांडिली ह्मणती । निवाडा करिती दिवाणांत ॥२॥
भल्या लोकीं यास सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥३॥
तुका ह्मणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठला जाऊं आतां ॥४॥
संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीस आंघोळ ठेवी पाणी ॥१॥
संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥
संतासी देखोनि करितो ढवाऑया । भावें धुतो चोऑया दासीचिया ॥२॥
तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥
एक प्रेमगुज ऐकें जगजेठी । आठवली गोष्टी सांगतसें ॥१॥
एक मृग दोन्ही पाडसांसहित । आनंदें चरत होती वनी ॥ध्रु.॥
अवचिता तेथें पारधी पावला । घेऊनियां आला श्वानें दोन्ही ॥२॥
एकीकडे त्याणें चिरिल्या वाघुरा । ठेविलें श्वानपुत्रा एकीकडे ॥३॥
एकीकडे तेणें वोणवा लाविला । आपण राहिला एकीकडे ॥४॥
चहूंकडोनियां मृगें वेढियेलीं । स्मरों तें लागलीं नाम तुझें ॥५॥
रामा कृष्णा हरी गोविंदा केशवा । देवाचिया देवा पावें आतां ॥६॥
कोण रक्षी आतां ऐसिये संकटीं । बापा जगजेठी तुजविण ॥७॥
आइकोनि तुह्मी तयांचीं वचनें । कृपाअंतःकरणें कळविळलां ॥८॥
आज्ञा तये काळीं केली पर्जन्यासी । वेगीं पावकासी विझवावें ॥९॥
ससें एक तेथें उठवुनी पळविलें । तया पाठीं गेली श्वानें दोन्ही ॥१०॥
मृगें चमकोनी सत्वर चाललीं । गोविंदें रिक्षलीं ह्मणोनियां ॥११॥
ऐसा तूं कृपाळु दयाळु आहेसी । आपुल्या भक्तांसी जीवलग ॥१२॥
ऐसी तुझी कीर्ती जीवीं आवडती । रखुमाईच्या पती तुका ह्मणे ॥१३॥
आशाबद्ध वक्ता । धाक श्रोतयाच्या चित्ता ॥१॥
वांयां गेलें तें भजन । उभयतां लोभी मन ॥ध्रु.॥
बहिर्मुख एके ठायीं । तैसें जालें तया दोहीं ॥२॥
माप तैसी गोणी । तुका ह्मणे रितीं दोन्ही ॥३॥
विठ्ठला रे तूं उदाराचा राव । विठ्ठला तूं जीव या जगाचा ॥१॥
विठ्ठला रे तूं उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशीं सकळसिद्धी ॥ध्रु.॥
विठ्ठला रे तुझें नाम बहु गोड । विठ्ठला रे कोड पुरविसी ॥२॥
विठ्ठला रे तुझें श्रीमुख चांगलें । विठ्ठला लागलें ध्यान मनीं ॥३॥
विठ्ठला रे वाचे बोला बहुरस । विठ्ठला रे सास घेतला जीवें ॥४॥
विठ्ठला रे शोक करीतसे तुका । विठ्ठला तूं ये कां झडकरी ॥५॥
बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्यें । संसारासि जीवें वेटाळिलों ॥१॥
एकामध्यें एक नाहीं मिळों येत । ताक नवनीत निवडीलें ॥ध्रु.॥
जालीं दोनी नामें एका चि मथनीं । दुसरिया गुणीं वेगळालीं ॥२॥
तुका ह्मणे दाखविल्या मुक्ताफळीं । शिंपले चि स्वस्थळीं खुंटलिया ॥३॥
बरवा बरवा बरवा रे देवा तूं । जीवाहूनी आवडसी जीवा रे देवा तूं ॥१॥
पाहातां वदन संतुष्ट लोचन । जाले आइकतां गुण श्रवण रे देवा ॥ध्रु.॥
अष्टै अंगें तनु त्रिविध ताप गेला सीण । वर्णितां लक्षण रे देवा ॥२॥
मन जालें उन्मन अनुपम ग्रहण । तुकयाबंधु ह्मणे महिमा नेणें रे ॥३॥
सोलीव जें सुख अतिसुखाहुनि । उभें हें अंगणीं वैष्णवांच्या ॥१॥
वृंदावन सडे चौक रंग माळा । नाचे तो सोहोळा देखोनियां ॥ध्रु.॥
भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळसी कंठीं ॥२॥
नामओघ मुखीं अमृताचें सार । मस्तक पवित्र सहित रजें ॥३॥
तुका ह्मणे मोक्ष भक्ताचिया मना । नये हा वासना त्याची करी ॥४॥
तीथॉ केलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥१॥
जळो त्याचें ज्यालेंपण । न देखे चि समचरण ॥ध्रु.॥
योग याग अनंत केले । नाहीं समचरण देखिले ॥२॥
तुका ह्मणे विठ्ठलपायीं। अनंत तीथॉ घडिलीं पाहीं ॥३॥
कोणतें कारण राहिलें यामुळें । जें म्यां तुज बळें कष्टवावें ॥१॥
नाहीं जात जीव नाहीं होत हानी । सहज तें मनीं आठवलें ॥ध्रु.॥
नाहीं कांहीं चिंता मरतों उपवासी । अथवा त्या ह्मैसी गाई व्हाव्या ॥२॥
हें तों तुज कळों येतसे अंतरीं । लाखणीक वरी साच भाव ॥३॥
तुका ह्मणे देवा नासिवंतासाठीं । पायांसवें तुटी करिती तुझ्या ॥४॥
रामा अयोध्येच्या राया । दिनानाथा रे सखया ॥१॥
पाप ताप विघ्न हरीं । दिनानाथा सुख करीं ॥ध्रु.॥
भिलटीचिया रे उिच्छष्टा । स्वीकारिसी रे तूं भ्रष्टा ॥२॥
मी तों सलगीचें मूल । तुका ह्मणे तू सखोल ॥३॥
तुजवरी ज्याचें मन । दरुषण दे त्याचें ॥१॥
कैसा जाती शुद्ध भाव । हात पाव ना वृत्ती ॥ध्रु.॥
अवघियांचा करूनि मेळा । तुज डोळां रोखिलें ॥२॥
तुका ह्मणे तुज आड । लपोनि कोड दावीं देवा ॥३॥
विश्वव्यापी माया । तिणें झाकुळिलें छाया ॥१॥
सत्य गेलें भोऑयावारी । अविद्येची चाली थोरी ॥ध्रु.॥
आपुलें चि मन । करवी आपणां बंधन ॥२॥
तुका ह्मणे देवा । तुह्मी कोडीं हीं उगवा ॥३॥
पोटीं जन्मती रोग । तरि कां ह्मणावे आप्तवर्ग ॥१॥
रानीं वसती औषधी । तरि कां ह्मणाव्या निपराधी ॥२॥
तैसें शरीराचें नातें । तुका ह्मणे सर्व आप्तें ॥३॥
नव्हे शब्द एक देशी । सांडी गवशी कोणाला ॥१॥
जाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥ध्रु.॥
मोकलिलें जावें बाणें। भाता जेणे वाइलें ॥२॥
आतां येथें कैचा तुका । बोले सिका स्वामीचा ॥३॥
गायनाचे रंगीं । शक्ति अद्भुत हे अंगीं ॥१॥
हें तों देणें तुमचें देवा । घ्यावी अखंडित सेवा ॥ध्रु.॥
अंगीं प्रेमाचें भरतें । नाहीं उतार चढतें ॥२॥
तुका ह्मणे वाणी । नाम अमृताची खाणी ॥३॥
माप ह्मणे मी मवितें । भरी धणी ठेवी रितें ॥१॥
देवा अभिमान नको । माझेठायीं देऊं सकों ॥ध्रु.॥
देशी चाले सिका । रितें कोण लेखी रंका ॥२॥
हातीं सूत्रदोरी । तुका ह्मणे त्याची थोरी ॥३॥
कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥१॥
नेलें वाया हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ध्रु.॥
कोणाची हे सत्ता। जाली वाचा वदविता ॥२॥
तुका ह्मणे या निश्चयें । माझें निरसलें भय ॥३॥
सकिळकांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥
फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥२॥
तुका ह्मणे चाली जाली चहूं देशी । उतरला कसीं खरा माल ॥३॥
कोण त्याचा पार पावला धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा ॥१॥
अणुरेणु सूक्ष्मस्थूळा पार नाहीं । श्रुती नेती त्या ही खुंटलिया ॥ध्रु.॥
फळांत कीटक येवढें आकाश । ऐसीं तरुवरास अनेक किती ॥२॥
दाविलें अनंतें अर्जुनासि पोटीं । आणीक त्या सृष्टि कृष्णलोक ॥३॥
तुका ह्मणे लागा संतांचिये कासे । ठाव घेतां कैसे वांचा जीवें ॥४॥
जें जें कांही करितों देवा । तें तें सेवा समर्पें ॥१॥
भेद नाहीं सर्वात्मना । नारायणा तुज मज ॥ध्रु.॥
आह्मी दुजें नेणों कोणा। हें चि मना मन साक्ष ॥२॥
तुका ह्मणे जगन्नाथा । हें अन्यथा नव्हे कीं ॥३॥
स्तुति करूं तरी नव्हे चि या वेदा । तेथें माझा धंदा कोणीकडे ॥१॥
परी हे वैखरी गोडावली सुखें । रसना रस मुखें इच्छीतसे ॥ध्रु.॥
रूप वर्णावया कोठें पुरे मती । रोमीं होती जाती ब्रह्मांडें हीं ॥२॥
तुका ह्मणे तूं ऐसा एक साचा । ऐसी तंव वाचा जाली नाहीं ॥३॥
तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं । दुजा कोणी तीहीं त्रिभुवनीं ॥१॥
सहस्रमुखें शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ध्रु.॥
अव्यक्त अलक्षा अपारा अनंता । निर्गुणा सचिद नारायणा ॥२॥
रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा । होसी भाव तैसा त्याकारणें ॥३॥
तुका ह्मणे जरी दाविसी आपणा । तरि च नारायणा कळों येसी ॥४॥
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥
बांधूं विठ्ठलसांगडी । पोहुनि जाऊं पैल थडी । अवघे जन गडी । घाला उडी भाई नो ॥ध्रु.॥
हें तों नाहीं सर्वकाळ । अमुप अमृतांचें जळ ॥२॥
तुका ह्मणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ॥३॥
आणीक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासुनियां ॥१॥
पांडुरंग मनीं पांडुरंग ध्यानीं । जाग्रतीं स्वप्नीं पांडुरंग ॥ध्रु.॥
पडिलें वळण इंिद्रयां सकळां । भाव तो निराळा नाहीं दुजा ॥२॥
तुका ह्मणे नेत्रीं केलें ओळखण । साजिरें तें ध्यान विटेवरी ॥३॥
मी तों सर्वभावें अनधिकारी । होइल कैसी परी नेणों देवा ॥१॥
पुराणींचे अर्थ आणितां मनास । होय कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥
इंिद्रयांचीं आह्मी पांगिलों अंकितें । त्यांचे रंगीं चित्त रंगलेंसे ॥२॥
एकाचें ही मज न घडे दमन । अवघीं नेमून कैसीं राखों ॥३॥
तुका ह्मणे मज तारीं पंढरीराया । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥४॥
लक्षूनियां योगी पाहाती आभास । तें दिसे आह्मांस दृष्टीपुढें ॥१॥
कर दोनी कटी राहिलासे उभा । सांवळी हे प्रभा अंगकांती ॥ध्रु.॥
व्यापूनि वेगळें राहिलेंसे दुरी । सकळां अंतरीं निर्विकार ॥२॥
रूप नाहीं रेखा नाम ही जयासी । आपुला मानसीं शिव ध्याय ॥३॥
अंत नाहीं पार वर्णा नाहीं थार । कुळ याति शिर हस्त पाद ॥४॥
अचेत चेतलें भक्ताचिया सुखें । आपुल्या कौतुकें तुका ह्मणे ॥५॥
कैसें करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावीं मज याचकासी ॥१॥
कैसी भक्ती करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी ॥ध्रु.॥
कैसी कीर्ती वाणूं कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवण कैसा तुज ॥२॥
कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्तीं । कैसी िस्थती मती दावीं मज ॥३॥
तुका ह्मणे जैसें दास केलें देवा। तैसें हें अनुभवा आणीं मज ॥४॥
निगमाचें वन । नका शोधूं करूं सीण ॥१॥
या रे गौळियांचे घरीं । बांधलें तें दावें वरी ॥ध्रु.॥
पीडलेती भ्रमें । वाट न कळतां वर्में ॥२॥
तुका ह्मणे भार । माथा टाका अहंकार ॥३॥
मन वोळी मना । बुद्धि बुद्धी क्षण क्षणां ॥१॥
मी च मज राखण जालों । ज्याणें तेथें चि धरिलों ॥ध्रु.॥
जें जें जेथें उठी। तें तें तया हातें कुंटी ॥२॥
भांजिली खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही ॥३॥
ब्रह्म न लिंपे त्या मेळें । कर्माअकर्मा वेगळें ॥१॥
तो चि एक तया जाणे । पावे अनुभविलें खुणें ॥ध्रु.॥
शोच अशौचाचे संधी । तन आळा तना चि मधीं ॥२॥
पापपुण्यां नाहीं ठाव । तुका ह्मणे सहज भाव ॥३॥
काय दरा करील वन । समाधान नाहीं जंव ॥१॥
तरी काय तेथें असती थोडीं । काय जोडी तयांसी ॥ध्रु.॥
रिगतां धांवा पेंवामध्यें । जोडे सिद्धि ते ठायीं ॥२॥
काय भस्म करील राख । अंतर पाख नाहीं तों ॥३॥
वर्णाआश्रमाचे धर्म । जाती श्रम जालिया ॥४॥
तुका ह्मणे सोंग पाश । निरसे आस तें हित ॥५॥
तें हीं नव्हे जें करितां कांहीं । ध्यातां ध्यायीं तें ही नव्हे ॥१॥
तें ही नव्हे जें जाणवी जना । वाटे मना तें नव्हे ॥ध्रु.॥
त्रास मानिजे कांटाळा । अशुभ वाचाळा तें ही नव्हे ॥२॥
तें ही नव्हे जें भोंवतें भोंवे । नागवें धांवे तें ही नव्हे ॥३॥
तुका ह्मणे एक चि आहे । सहजिं पाहें सहज ॥४॥
बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे ॥१॥
नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वटे खरें ॥ध्रु.॥
विष खावें ग्रासोग्रासीं । धन्य तो चि एक सोसी ॥२॥
तुका ह्मणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं ॥३॥
होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१॥
हा चि माझा नेम धर्म । अवघें विठोबाचें नाम ॥ध्रु.॥
हे चि माझी उपासना । लागन संतांच्या चरणा ॥२॥
तुका ह्मणे देवा । करीन ते भोळी सेवा ॥३॥
सांटविला हरी । जींहीं हृदयमंदिरीं ॥१॥
त्यांची सरली वेरझार । जाला सफळ व्यापार ॥ध्रु.॥
हरी आला हाता । मग कैंची भय चिंता । तुका ह्मणे हरी । कांहीं उरों नेदी उरी ॥३॥
मोक्ष तुमचा देवा । तुह्मी दुर्लभ तो ठेवा ॥१॥
मज भक्तीची आवडी । नाहीं अंतरीं ते गोडी ॥ध्रु.॥
आपल्या प्रकारा । करा जतन दातारा ॥२॥
तुका ह्मणे भेटी । पुरे एक चि शेवटीं ॥३॥
नामपाठ मुक्ताफळांच्या ओवणी । हें सुख सगुणीं अभिनव ॥१॥
तरी आह्मी जालों उदास निर्गुणा । भक्तांचिया मना मोक्ष नये ॥ध्रु.॥
द्यावें घ्यावें ऐसें येथें उरे भाव । काय ठाया ठाव पुसोनियां ॥२॥
तुका ह्मणे आतां अभयदान करा । ह्मणा विश्वंभरा दिलें ऐसें ॥३॥
भवसिंधूचें काय कोडें । दावी वाट चाले पुढें ॥१॥
तारूं भला पांडुरंग । पाय भिजों नेदी अंग ॥ध्रु.॥
मागें उतरिलें बहुत । पैल तिरीं साधुसंत ॥२॥
तुका ह्मणे लाग वेगें । जाऊं तयाचिया मागें ॥३॥
नाहीं साजत हो मोठा । मज अळंकार खोटा ॥१॥
असें तुमचा रजरेण । संतां पायींची वाहाण ॥ध्रु.॥
नाहीं स्वरूपीं ओळखी । भक्तीभाव करीं देखीं ॥२॥
नाहीं शून्याकारीं । क्षर ओळखी अक्षरीं ॥३॥
नाहीं विवेक या ठायीं । आत्मा अनात्मा काई ॥४॥
कांहीं नव्हें तुका । पांयां पडने हें ऐका ॥५॥
सत्य साच खरें । नाम विठोबाचें बरें ॥१॥
जेणें तुटती बंधनें । उभयलोकीं कीर्ति जेणें ॥ध्रु.॥
भाव ज्याचे गांठी । त्यासी लाभ उठाउठी ॥२॥
तुका ह्मणे भोळा । जिंकुं जाणे किळकाळा ॥३॥
सत्य तो आवडे । विकल्पानें भाव उडे ॥१॥
आह्मी तुमच्या कृपादानें । जाणों शुद्ध मंद सोनें ॥ध्रु.॥
आला भोग अंगा। न लवूं उसीर त्या त्यागा ॥२॥
तुका ह्मणे देवा । अंजन ते तुझी सेवा ॥३॥
करावें चिंतन । तें चि बरें न भेटून ॥१॥
बरवा अंगीं राहे भाव । तो गे तो चि जाणा देव ॥ध्रु.॥
दर्शणाची उरी । अवस्था चि अंग धरी ॥२॥
तुका ह्मणे मन । तेथें सकळ कारण ॥३॥
जें जें जेथें पावे । तें तें समर्पावें सेवे ॥१॥
सहज पूजा या चि नांवें । गिळत अभिमानें व्हावें ॥ध्रु.॥
अवघें भोगितां गोसावी। आदीं आवसानीं जीवी ॥२॥
तुका ह्मणे सिण । न धरितां नव्हे भिन्न ॥३॥
नसे तरी मनो नसो । परी वाचे तरी वसो ॥१॥
देह पडो या चिंतनें । विठ्ठलनामसंकीर्तनें ॥ध्रु.॥
दंभिस्थती भलत्या भावें । मज हरिजन ह्मणावें ॥२॥
तुका ह्मणे काळें तरी । मज सांभाळील हरी ॥३॥
नये जरी कांहीं । तरी भलतें चि वाहीं ॥१॥
ह्मणविल्या ढास । कोण न धरी वेठीस ॥ध्रु.॥
समर्थाच्या नांवें । भलतैसें विकावें ॥२॥
तुका ह्मणे सत्ता । वरी असते बहुतां ॥३॥
न संडवे अन्न । मज न सेववे वन ॥१॥
ह्मणउनी नारायणा । कींव भाकितों करुणा ॥ध्रु.॥
नाहीं अधिकार । कांहीं घोकाया अक्षर ॥२॥
तुका ह्मणे थोडें । आयुष्य अवघें चि कोडें ॥३॥
एकांचीं उत्तरें । गोड अमृत मधुरें ॥१॥
ऐशा देवाच्या विभुती । भिन्न प्रारब्धाची गती ॥ध्रु.॥
एकांचीं वचनें । कडु अत्यंत तीक्षणें ॥२॥
प्रकाराचें तीन । तुका ह्मणे केलें जन ॥३॥
वचनें ही नाड । न बोले तें मुकें खोड ॥१॥
दोहीं वेगळें तें हित । बोली अबोलणी नीत ॥ध्रु.॥
अंधार प्रकाशी । जाय दिवस पावे निशी ॥२॥
बीज पृथिवीच्या पोटीं । तुका ह्मणे दावी दृष्टी ॥३॥
विचारा वांचून । न पवीजे समाधान ॥१॥
देह त्रिगुणांचा बांधा । माजी नाहीं गुण सुदा ॥ध्रु.॥
देवाचिये चाडे । देवा द्यावें जें जें घडे ॥२॥
तुका ह्मणे होतें । बहु गोमटें उचितें ॥३॥
तुटे भवरोग । संचितक्रियमाणभोग ॥१॥
ऐसें विठोबाचें नाम । उच्चारितां खंडे जन्म ॥ध्रु.॥
वसों न सके पाप । पळे त्रिविध तो ताप ॥२॥
तुका ह्मणे माया । होय दासी लागे पायां ॥३॥
मुसावलें अंग । रंगीं मेळविला रंग ॥१॥
एकीं एक दृढ जालें । मुळा आपुलिया आलें ॥ध्रु.॥
सागरीं थेंबुडा । पडिल्या निवडे कोण्या वाटा ॥२॥
तुका ह्मणे नवें । नव्हे जाणावें हें देवें ॥३॥
अनुतापें दोष । जाय न लगतां निमिष ॥१॥
परि तो राहे विसावला । आदीं अवसानीं भला ॥ध्रु.॥
हें चि प्रायिश्चत । अनुतापीं न्हाय चित्त ॥२॥
तुका ह्मणे पापा । शिवों नये अनुतापा ॥३॥
चहूं आश्रमांचे धर्म । न राखतां जोडे कर्म ॥१॥
तैसी नव्हे भोळी सेवा । एक भाव चि कारण देवा ॥ध्रु.॥
तपें इंिद्रयां आघात । क्षणें एका वाताहात ॥२॥
मंत्र चळे थोडा । तरि धड चि होय वेडा ॥३॥
व्रतें करितां सांग । तरी एक चुकतां भंग ॥४॥
धर्म सत्त्व चि कारण । नाहीं तरी केला सिण ॥५॥
भूतदयेसि आघात । उंचनिच वाताहात ॥६॥
तुका ह्मणे दुजें । विधिनिषेधाचें ओझें ॥७॥
सोडिला संसार । माया तयावरि फार ॥१॥
धांवत चाले मागें मागें । सुखदुःख साहे अंगे ॥ध्रु.॥
यानें घ्यावें नाम । तीसीकरणें त्याचें काम ॥२॥
तुका ह्मणे भोळी । विठ्ठलकृपेची कोंवळी ॥३॥
बैसों खेळूं जेवूं । तेथें नाम तुझें गाऊं ॥१॥
रामकृष्णनाममाळा । घालूं ओवुनियां गळा ॥ध्रु.॥
विश्वास हा धरूं। नाम बळकट करूं ॥२॥
तुका ह्मणे आतां । आह्मां जीवन शरणागतां ॥३॥
पाटीं पोटीं देव । कैचा हरिदासां भेव ॥१॥
करा आनंदें कीर्तन । नका आशंकितमन ॥ध्रु.॥
एथें कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥२॥
तुका ह्मणे धनी । सपुरता काय वाणी ॥३॥
मनोमय पूजा । हे चि पढीयें केशीराजा ॥१॥
घेतो कल्पनेचा भोग । न मानेती बाह्य रंग ॥ध्रु.॥
अंतरींचें जाणे । आदिवर्तमान खुणे ॥२॥
तुका ह्मणे कुडें । कोठें सरे त्याच्या पुढें ॥३॥
जाणे भक्तीचा जिव्हाळा । तो चि देवीचा पुतळा ॥१॥
आणीक नये माझ्या मना । हो का पंडित शाहाणा ॥ध्रु.॥
नामरूपीं जडलें चित्त । त्याचा दास मी अंकित ॥२॥
तुका ह्मणे नवविध । भक्ती जाणे तो चि शुद्ध ॥३॥
याजसाठीं वनांतरा । जातों सांडुनियां घरा ॥१॥
माझें दिठावेल प्रेम । बुद्धि होईल निष्काम ॥ध्रु.॥
अद्वैताची वाणी । नाहीं ऐकत मी कानीं ॥२॥
तुका ह्मणे अहंब्रह्म । आड येऊं नेदीं भ्रम ॥३॥
बुडतां आवरीं । मज भवाचे सागरीं ॥१॥
नको मानूं भार । पाहों दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥
आहे तें सांभाळीं । तुझी कैसी ब्रीदावळी ॥२॥
तुका ह्मणे दोषी । मी तों पातकांची राशी ॥३॥
अक्षई तें झालें । आतां न मोडे रचिलें ॥१॥
पाया पडिला खोले ठायीं । तेथें पुढें चाली नाहीं ॥ध्रु.॥
होतें विखुरलें । ताळा जमे झडती आलें ॥२॥
तुका ह्मणे बोली । पुढें कुंटित चि जाली ॥३॥
तुझे थोर थोर । भक्त करिती विचार ॥१॥
जपतपादि साधनें । मज चिंतवेना मनें ॥ध्रु.॥
करुणावचनें । म्यां भाकावीं तुह्मां दीनें ॥२॥
तुका ह्मणे घेइप । माझें थोडें फार ठायीं ॥३॥
लावुनि काहाळा । सुखें करितों सोहोळा ॥१॥
सादवीत गेलों जना । भय नाहीं सत्य जाणां ॥ध्रु.॥
गात नाचत विनोदें । टाळघागयांच्या छंदें ॥२॥
तुका ह्मणे भेव । नाहीं पुढें येतो देव ॥३॥
मुक्त कासया ह्मणावें । बंधन तें नाहीं ठावें ॥१॥
सुखें करितों कीर्तन । भय विसरलें मन ॥ध्रु.॥
देखिजेना नास । घालूं कोणावरी कास ॥२॥
तुका ह्मणे साहे । देव आहे तैसा आहे ॥३॥
ओनाम्याच्या काळें । खडें मांडविलें बाळें ॥१॥
तें चि पुढें पुढें काई । मग लागलिया सोई ॥ध्रु.॥
रज्जु सर्प होता । तोंवरी चि न कळतां ॥२॥
तुका ह्मणे साचें । भय नाहीं बागुलाचें ॥३॥
आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी ॥१॥
नको बडबडूं भांडे । कांहीं वाउगें तें रांडें ॥ध्रु.॥
विठ्ठल विठ्ठल । ऐसे सांडुनियां बोल ॥२॥
तुका ह्मणे आण । तुज स्वामीची हे जाण ॥३॥
काय नव्हे करितां तुज । आतां राखें माझी लाज ॥१॥
मी तों अपराधाची राशी । शिखा अंगुष्ट तोंपाशीं ॥ध्रु.॥
त्राहें त्राहें त्राहें । मज कृपादृष्टी पाहें ॥२॥
तुका ह्मणे देवा । सत्या घ्यावी आतां सेवा ॥३॥
वंदीन मी भूतें । आतां अवघीं चि समस्तें ॥१॥
तुमची करीन भावना । पदोपदीं नारायणा ॥ध्रु.॥
गाळुनियां भेद । प्रमाण तो ऐसा वेद ॥२॥
तुका ह्मणे मग । नव्हे दुजयाचा संग ॥३॥
पूजा पुज्यमान । कथे उभे हरिजन ॥१॥
ज्याची कीर्ती वाखाणिती । तेथें ओतली ते मुर्ती ॥ध्रु.॥
देहाचा विसर । केला आनंदें संचार ॥२॥
गेला अभिमान । लाज बोळविला मान ॥३॥
शोक मोह चिंता । याची नेणती ते वार्ता ॥४॥
तुका ह्मणे सखे । विठोबा च ते सारिखे ॥५॥
भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ ॥१॥
धांवे जातीपाशीं जाती । खुण येरयेरां चित्तीं ॥ध्रु.॥
हिरा हिरकणी । काढी आंतुनि आहिरणी ॥२॥
तुका ह्मणे केलें । मन शुद्ध हें चांगलें ॥३॥
वरि बोला रस । कथी ज्ञान माजी फोस ॥१॥
ऐसे लटिके जे ठक । तयां येहे ना पर लोक ॥ध्रु.॥
परिस एक सांगे । अंगा धुळी हे न लगे ॥२॥
तुका ह्मणे हाडें । कुतया लाविलें झगडें ॥३॥
हे चि तुझी पूजा । आतां करीन केशीराजा ॥१॥
अवघीं तुझींच हें पदें । नमस्कारीन अभेदें ॥ध्रु.॥
न वर्जितदिशा । जाय तेथें चि सरिसा ॥२॥
नव्हे एकदेशी । तुका ह्मणे गुणदोषीं ॥३॥
आपलें तों कांहीं । येथें सांगिजेसें नाहीं ॥१॥
परि हे वाणी वायचळ । छंद करविते बरळ ॥ध्रु.॥
पंचभूतांचा हा मेळा । देह सत्यत्वें निराळा ॥२॥
तुका ह्मणे भुली । इच्या उफराट्या चाली ॥३॥
विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साटीं वाचा ॥१॥
कटीं कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥ध्रु.॥
न पाहे सिदोरी । जाती कुळ न विचारी ॥२॥
तुका ह्मणे भेटी । हाका देतां उठाउठीं ॥३॥
कृपावंत किती । दीनें बहु आवडती ॥१॥
त्यांचा भार वाहे माथां । करी योगक्षेमचिंता ॥ध्रु.॥
भुलें नेदी वाट । करीं धरूनि दावी नीट ॥२॥
तुका ह्मणे जीवें । अनुसरतां एका भावें ॥३॥
नेणती वेद श्रुति कोणी । आह्मां भाविकां वांचुनी ॥१॥
रूप आवडे आह्मांशी । तैसी जोडी हृषीकेशी ॥ध्रु.॥
आह्मीं भावें बिळवंत। तुज घालूं हृदयांत ॥२॥
तुका ह्मणे तुज धाक । देतां पावसील हाक ॥३॥
मन गुंतलें लुलयां । जाय धांवोनि त्या ठाया ॥१॥
मागें परती तो बळी । शूर एक भूमंडळीं ॥ध्रु.॥
येऊनियां घाली घाला । नेणों काय होई तुला ॥२॥
तुका ह्मणें येणें । बहु नाडिले शाहाणे ॥३॥
घेइप माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥
तुह्मी घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ध्रु.॥
तुह्मी ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥२॥
मना तेथें धांव घेइप । राहें विठोबाचे पायीं ॥३॥
तुका ह्मणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥४॥
धणी न पुरे गुण गातां । रूप दृष्टी न्याहाळितां ॥१॥
बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥ध्रु.॥
सर्वमंगळाचें सार। मुख सिद्धीचें भांडार ॥२॥
तुका ह्मणे सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥३॥
जरी मी नव्हतों पतित । तरि तूं पावन कैंचा येथ ॥१॥
ह्मणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ॥ध्रु.॥
लोहो महिमान परिसा । नाहीं तरीं दगड जैसा ॥२॥
तुका ह्मणे याचकभावें। कल्पतरु मान पावे ॥३॥
एक भाव चित्तीं । तरीं न लगे कांहीं युक्ती ॥१॥
कळों आलें जीवें । मज माझियाचि भावें ॥ध्रु.॥
आठव चि पुरे । सुख अवघें मोहो रे ॥२॥
तुका ह्मणे मन । पूजा इच्छी नारायण ॥३॥
मज संतांचा आधार । तूं एकलें निर्विकार ॥१॥
पाहा विचारूनि देवा । नको आह्मांसवें दावा ॥ध्रु.॥
तुज बोल न बोलवे। आह्मां भांडायाची सवे ॥२॥
तुका ह्मणे तरी । ऐक्यभाव उरे उरी ॥३॥
तुज मागणें तें देवा । आह्मां तुझी चरणसेवा ॥१॥
आन नेघों देसी तरी । रिद्धि सिद्धि मुक्ती चारी ॥ध्रु.॥
संतसंगति सर्वकाळ । थोर प्रेमाचा सुकाळ ॥२॥
तुका ह्मणे नाम । तेणें पुरे माझें काम ॥३॥
तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित ॥१॥
आणीक नेणें कांहीं हेवा । तुजवांचूनि केशवा ॥ध्रु.॥
हें चि माझें गाणें । तुझें नामसंकीर्तन ॥२॥
तुझ्या नामाचीं भूषणें । तुका म्हणे ल्यालों लेणें ॥३॥
उतरलों पार । सत्य झाला हा निर्धार ॥१॥
तुझें नाम धरिलें कंठीं । केली संसारासी तुटी ॥ध्रु.॥
आतां नव्हे बाधा । कोणेविशीं कांहीं कदा ॥२॥
तुका ह्मणे कांहीं । आतां उरलें ऐसें नाहीं ॥३॥
क्रियामतिहीन । एक मी गा तुझें दीन ॥१॥
देवा करावा सांभाळ । वारीं माझी तळमळ ॥ध्रु.॥
नको माझे ठायीं । गुणदोष घालूं कांहीं ॥२॥
अपराधाच्या कोटी । तुका ह्मणे घालीं पोटीं ॥३॥
नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥१॥
तैसी चित्तशुद्धि नाहीं । तेथें बोध करील काई ॥ध्रु.॥
वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥२॥
वांजे न होती लेकरें । काय करावें भ्रतारें ॥३॥
नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी ॥४॥
प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥५॥
तुका ह्मणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥६॥
नवां नवसांचीं । जालों तुह्मासी वाणीचीं ॥१॥
कोण तुझें नाम घेतें । देवा पिंडदान देतें ॥ध्रु.॥
कोण होतें मागें पुढें । दुजें बोलाया रोकडें ॥२॥
तुका ह्मणे पांडुरंगा । कोणा घेतासि वो संगा ॥३॥
एका बीजा केला नास । मग भोगेल कणीस ॥१॥
कळे सकळां हा भाव । लाहानथोरांवरी जीव ॥ध्रु.॥
लाभ नाहीं फुकासाठीं । केल्यावीण जीवासाठीं ॥२॥
तुका ह्मणे रणीं । जीव देतां लाभ दुणी ॥३॥
आयुष्य गेलें वांयांविण । थोर झाली नागवण ॥१॥
आतां धांवें धांवें तरी । काय पाहातोसि हरी ॥ध्रु.॥
माझे तुझे या चि गती । दिवस गेले तोंडीं माती ॥२॥
मन वाव घेऊं नेदी । बुडवूं पाहे भवनदी ॥३॥
पडिला विषयाचा घाला । तेणें नागविलें मला ॥४॥
शरण आलों आतां धांवें । तुका ह्मणे मज पावें ॥५॥
सोसोनि विपत्ती । जोडी दिली तुझे हातीं ॥१॥
त्याचा हा चि उपकार । अंतीं आह्माशीं वेव्हार ॥ध्रु.॥
नामरूपा केला ठाव। तुज कोण ह्मणतें देव ॥२॥
तुका ह्मणे हरी । तुज ठाव दिला घरीं ॥३॥
आपुलें मागतां । काय नाहीं आह्मां सत्ता ॥१॥
परि या लौकिकाकारणें । उरीं ठेविली बोलणें ॥ध्रु.॥
ये चि आतां घडी । करूं बैसों ते ची फडी ॥२॥
तुका ह्मणे करितों तुला । ठाव नाहींसें विठ्ठला ॥३॥
असो आतां किती । तुज यावें काकुलती ॥१॥
माझें प्रारब्ध हें गाढें । तूं बापुडें तयापुढें ॥ध्रु.॥
सोडवीन आतां । ब्रीदें तुझीं पंढरीनाथा ॥२॥
तुका ह्मणे बळी । तो गांढ्याचे कान पिळी ॥३॥
काय नव्हे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥१॥
सर्व- साधनांचें सार । भवसिंधु उतरी पार ॥ध्रु.॥
योगायागतपें । केलीं तयानें अमुपें ॥२॥
तुका म्हणे जपा । मंत्र तीं अक्षरी सोपा ॥३॥
हो कां दुराचारी । वाचे नाम जो उच्चारी ॥१॥
त्याचा दास मी अंकित । कायावाचामनेंसहित ॥ध्रु.॥
नसो भाव चित्तीं । हरिचे गुण गातां गीतीं ॥२॥
करी अनाचार । वाचे हरिनामउच्चार ॥३॥
हो कां भलतें कुळ । शुचि अथवा चांडाळ ॥४॥
ह्मणवी हरिचा दास । तुका ह्मणे धन्य त्यास ॥५॥
हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥
ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥
करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥
तुका ह्मणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥
लोह चुंबकाच्या बळें । उभें राहिलें निराळें ॥१॥
तैसा तूं चि आह्मांठायीं । खेळतोसी अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
भक्ष अग्नीचा तो दोरा । त्यासि वांचवी मोहरा ॥२॥
तुका ह्मणे अधीलपणें । नेली लांकडें चंदनें ॥३॥
डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥
तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥ध्रु.॥
मेळवूनि नरनारी। शकुन सांगती नानापरी ॥२॥
तुका ह्मणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥३॥
गाढवाचे घोडे । आह्मी करूं दृष्टीपुढें ॥१॥
चघळी वाहाणा । माघारिया बांडा सुना ॥ध्रु.॥
सोंगसंपादनी । तरि करूं शुद्ध वाणी ॥२॥
तुका ह्मणे खळ । करूं समयीं निर्मळ ॥३॥
बाईल मेली मुक्ती जाली । देवें माया सोडविली ॥१॥
विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसयाचें काज ॥ध्रु.॥
पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥२॥
माता मेली मज देखतां । तुका ह्मणे हरली चिंता ॥३॥
योग तप या चि नांवें । गिळत व्हावें अभिमानें ॥१॥
करणें तें हें चि करा । सत्यें बरा व्यापार ॥ध्रु.॥
तरि खंडे येरझार। निघे भार देहाचा ॥२॥
तुका ह्मणे मानामान । हें बंधन नसावें ॥३॥
करी संध्यास्नान । वारी खाउनियां अन्न ॥१॥
तया नाहीं लाभहानी । आदा वेंचाचिये मानीं ॥ध्रु.॥
मजुराचें धन । विळा दोर चि जतन ॥२॥
तुका ह्मणे नाहीं । अधीरासी देव कांहीं ॥३॥
वाखर घेउनि आलें । त्यासी तरवारेणें हालें ॥१॥
नव्हे आपुलें उचित । करुनि टाकावें फजित ॥ध्रु.॥
अंगुळिया मोडी। त्यासी काय सिलें घोडीं ॥२॥
नपुंसकासाठीं । तुका ह्मणे न लगे जेठी ॥३॥
वर्णाश्रम करिसी चोख । तरि तूं पावसी उत्तम लोक ॥१॥
तुजला तें नाहीं ठावें । जेणें अंगें चि ब्रह्म व्हावें ॥ध्रु.॥
जरि तूं जालासी पंडित । करिसी शब्दाचें पांडित्य ॥२॥
गासी तान मान बंध । हाव भाव गीत छंद ॥३॥
जाणसील तूं स्वतंत्र । आगमोक्त पूजायंत्र ॥४॥
साधनाच्या ओढी । डोळियांच्या मोडामोडी ॥५॥
तुका ह्मणे देहीं । संत जाहाले विदेही ॥६॥
प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥१॥
मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥ध्रु.॥
सत्ता सकळ तया हातीं। माझी कींव काकुलती ॥२॥
तुका ह्मणे ठेवी तैसें । आह्मी राहों त्याचे इच्छे ॥३॥
पाववील ठाया । पांडुरंग चिंतिलिया ॥१॥
त्यासी चिंतिलिया मनीं । चित्ता करी गंवसणी ॥ध्रु.॥
पावावया फळ । अंगीं असावें हें बळ ॥२॥
तुका ह्मणे तइप । सिद्धि वोळगती पायीं ॥३॥
धन्य भावशीळ । ज्याचें हृदय निर्मळ ॥१॥
पूजी प्रतिमेचे देव । संत ह्मणती तेथें भाव ॥ध्रु.॥
विधिनिषेध नेणती । एक निष्ठा धरुनी चित्तीं ॥२॥
तुका ह्मणे तैसें देवा । होणें लागे त्यांच्या भावा ॥३॥
आधीं च आळशी । वरी गुरूचा उपदेशी ॥१॥
मग त्या कैंची आडकाठी । विधिनिषेधाची भेटी ॥ध्रु.॥
नाचरवे धर्म । न करवे विधिकर्म ॥२॥
तुका ह्मणे ते गाढव । घेती मनासवें धांव ॥३॥
नाचे टाळी पिटी । प्रेमें अंग धरणीं लोटी ॥१॥
माझे सखे ते सज्जन । भोळे भाविक हरिजन ॥ध्रु.॥
न धरिती लाज । नाहीं जनासवें काज ॥२॥
तुका ह्मणे दाटे । कंठ नेत्रीं जळ लोटे ॥३॥
टिळा टोपी माळा देवाचें गवाळें । वागवी वोंगळ पोटासाटीं ॥१॥
तुळसी खोवी कानीं दर्भ खोवी शेंडी । लटिकी धरी बोंडी नासिकाची ॥ध्रु.॥
कीर्तनाचे वेळे रडे पडे लोळे । प्रेमेंविण डोळे गळताती ॥२॥
तुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥३॥
धन्य देहूं गांव पुण्य भूमि ठाव । तेथें नांदे देव पांडुरंग ॥१॥
धन्य क्षेत्रवासी लोक दइवाचे । उच्चारिती वाचे नामघोष ॥ध्रु.॥
कर कटी उभा विश्वाचा जनिता । वामांगीं ते माता रखुमादेवी ॥२॥
गरुड पारीं उभा जोडुनियां कर । अश्वत्थ समोर उत्तरामुख ॥३॥
दिक्षणे शंकर लिंग हरेश्वर । शोभे गंगातीर इंद्रायणी ॥४॥
लक्ष्मीनारायण बल्लाळाचें वन । तेथें अधिष्ठान सिद्धेश्वर ॥५॥
विघ्नराज द्वारीं बहिरव बाहेरी । हनुमंत शेजारीं सहित दोघे ॥६॥
तेथें दास तुका करितो कीर्तन । हृदयीं चरण विठोबाचे ॥७॥
टंवकारूनि दृष्टी लावुनियां रंग । दावी झगमग डोऑयांपुढें ॥१॥
ह्मणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥ध्रु.॥
दीपाचिया ज्योती कोंडियेलें तेज । उपदेश सांजरात्रीमाजी ॥२॥
रांगोळिया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥३॥
पडदा लावोनियां दीप चहूं कोनीं । बैसोनि आसनीं मुद्रा दावी ॥४॥
नैवेद्यासी ह्मणे करावें पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥५॥
जाला उपदेश कवळ घ्या रे मुखीं । आपोशन शेखीं बुडविलें ॥६॥
पाषांड करोनि मांडिली जीविका । बुडवी भाविकां लोकांप्रती ॥७॥
कायावाचामनें सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥८॥
शुद्ध परमार्थ बुडविला तेणें । गुरुत्वभूषणें भोग भोगी ॥९॥
विधीचा ही लोप बुडविला वेद । शास्त्रांचा ही बोध हरविला ॥१०॥
योगाची धारणा नाहीं प्राणायाम । सांडी यम नेम नित्यादिक ॥११॥
वैराग्याचा लोप हरिभजनीं विक्षेप । वाढविलें पाप मतिलंडें ॥१२॥
तुका ह्मणे गेलें गुरुत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नर्कवासा ॥१३॥
शाक्त गधडा जये देशीं । तेथें राशी पापाच्या ॥१॥
सुकृताचा उदो केला । गोंधळ घाला इंिद्रयें ॥ध्रु.॥
क्रोधरूपें वसे काम । तीचें नाम जपतसे ॥२॥
मद्यभक्षण मांगिण जाती । विटाळ चित्तीं सांटविला ॥३॥
स्तवुनियां पूजी रांड । न लजे भांड दाढीसी ॥४॥
तुका ह्मणे भगवती । नेइल अंतीं आपणापें ॥५॥
राजा प्रजा द्वाड देश । शाक्त वास करिती तो ॥१॥
अधर्माचें उबड पीक । धर्म रंक त्या गांवीं ॥ध्रु.॥
न पिके भूमि कांपे भारें । मेघ वारें पीतील ॥२॥
तुका ह्मणे अवघीं दुःखें । येती सुखें वस्तीसी ॥३॥
ऐसें कलियुगाच्या मुळें । जालें धर्माचें वाटोळें ॥१॥
सांडुनियां रामराम । ब्राह्मण ह्मणती दोमदोष ॥ध्रु.॥
शिवों नये तीं निळीं । वस्त्रें पांघरती काळीं ॥२॥
तुका ह्मणे वृत्ति । सांडुनि गदा मागत जाती ॥३॥
अवघ्या पापें घडला एक । उपासक शक्तीचा ॥१॥
त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥ध्रु.॥
काम क्रोध मद्य अंगीं । रंगला रंगीं अवगुणी ॥२॥
करितां पाप न धरी शंका। ह्मणे तुका कोणी ही ॥३॥
वारितां बळें धरितां हातीं । जुलुमें जाती नरकामधीं ॥१॥
रंडीदासाप्रति कांहीं । उपदेश तो ही चालेना ॥ध्रु.॥
जन्म केला वाताहात । थोर घात येठायीं ॥२॥
तुका ह्मणे पंढरीनाथा । तुझी कथा दूषीती ॥३॥
शाक्तांची शूकरी माय । विष्ठा खाय बिदीची ॥१॥
तिची त्या पडली सवे । मागें धांवें ह्मणोनि ॥ध्रु.॥
शाक्तांची गाढवी माय । भुंकत जाय वेसदारा ॥२॥
तुका ह्मणे शिंदळीचे । बोलतां वाचे निंद्य ते ॥३॥
हरिहर सांडूनि देव । धरिती भाव क्षुल्लकीं ॥१॥
ऐका त्यांची विटंबणा । देवपणा भक्तांची ॥ध्रु.॥
अंगीं कवडे घाली गळां । परडी कळाहीन हातीं ॥२॥
गळां गांठा हिंडें दारीं । मनुष्य परी कुतरीं तीं ॥३॥
माथां सेंदुर दांत खाती । जेंगट हातीं सटवीचें ॥४॥
पूजिती विकट दौंद । पशु सोंड गजाची ॥५॥
ऐशा छंदें चुकलीं वाटा । भाव खोटा भजन ॥६॥
तुका ह्मणे विष्णुशिवा । वांचुनि देवा भजती ती ॥७॥
कांद्यासाठी जालें ज्ञान । तेणें जन नाडिलें ॥१॥
ऐकाकाम क्रोध बुचबुची । भुंके पुची व्यालीची ॥ध्रु.॥
पूजेलागीं द्रव्य मागे।काय सांगे शिष्यातें ॥२॥
तुका ह्मणे कैंचें ब्रह्म । अवघा भ्रम विषयांचा ॥३॥
सांडुनियां पंढरीराव । कवणातें ह्मणों देव ॥१॥
बहु लाज वाटे चित्ता । आणिकांतें देव ह्मणतां ॥ध्रु.॥
सांडुनियां हिरा । कोणें वेचाव्या त्या गारा ॥२॥
तुका ह्मणे हरिहर । ऐसी सांडुनियां धुर ॥३॥
बहुतें गेलीं वांयां । न भजतां पंढरीराया ॥१॥
करिती कामिकांची सेवा । लागोन मागोन खात्या देवा ॥ध्रु.॥
अवघियांचा धनी । त्यासी गेलीं विसरोनि ॥२॥
तुका ह्मणे अंतीं । पडती यमाचिया हातीं ॥३॥
असो आतां ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवूं ॥१॥
रिक्षता तूं होसी जरी । तरि काय येरीं करावें ॥ध्रु.॥
काया वाचा मन पायीं । राहे ठायीं करूं तें ॥२॥
तुका ह्मणे गाइन गीतीं । रूप चित्तीं धरूनियां ॥३॥
नाहीं आह्मी विष्णुदास । करीत आस कोणांची ॥१॥
कां हे नष्ट करिती निंदा । नेणों सदा आमुची ॥ध्रु.॥
असों भलते ठायीं मनें । समाधानें आपुलिया ॥२॥
तुका ह्मणे करूं देवा । तुझी सेवा धंदा तो ॥३॥ ॥१३॥
पाखांड्यांनीं पाठी पुरविला दुमाला । तेथें मी विठ्ठला काय बोलों ॥१॥
कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी । आपुलें भिकारी अर्थ नेणे ॥ध्रु.॥
न कळे तें मज पुसती छळूनी । लागतां चरणीं न सोडिती ॥२॥
तुझ्या पांयांविण दुजें नेणें कांहीं । तूं चि सर्वांठायीं एक मज ॥३॥
तुका ह्मणे खीळ पडो त्यांच्या तोंडा । किती बोलों भांडां वादकांशीं ॥४॥
कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु जाले ॥१॥
द्रव्य दारा चित्तीं प्रजांची आवडी । मुखें बडबडी कोरडा चि ॥ध्रु.॥
डंव करी सोंग मानावया जग । मुखें बोले त्याग मनीं नाहीं ॥२॥
वेदाज्ञो करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥३॥
तुका ह्मणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसें ॥४॥
विषयाचें सुख एथें वाटे गोड । पुढें अवघड यमदंड ॥१॥
मारिती तोडिती झोडिती निष्ठ । यमाचे किंकर बहुसाल ॥ध्रु.॥
असिपत्रीं तरुवरखैराचे विंगळ । निघतील ज्वाळ तेलपाकीं ॥२॥
तप्तभूमीवरि लोळविती पाहीं । अिग्नस्तंभ बाहीं कवळविती ॥३॥
ह्मणऊनि तुका येतो काकुलती । पुरे आतां योनी गर्भवास ॥४॥
अल्प माझी मती । ह्मणोनि येतों काकुलती ॥१॥
आतां दाखवा दाखवा । मज पाउलें केशवा ॥ध्रु.॥
धीर माझ्या मना। नाहीं नाहीं नारायणा ॥२॥
तुका ह्मणे दया । मज करा अभागिया ॥३॥
वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउलें कइं वो डोळां ॥१॥
तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी ॥२॥
तुका ह्मणे माझ्या असांवल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा ॥३॥
देह हा सादर पाहावा निश्चित । सर्व सुख एथें नाम आहे ॥१॥
ब्रह्म जें देखणें द्वैत जेव्हां गेलें । शरीर तें जालें ब्रह्मरूप ॥ध्रु.॥
यजन याजन तप व्रतें करिती । विकल्पें नागवती शुद्ध पुण्या ॥२॥
तुका ह्मणे सर्व सुख एथें आहे । भ्रांति दूर पाहें टाकुनियां ॥३॥
तुझे वणूप गुण ऐसी नाहीं मती । राहिल्या त्या श्रुती मौन्यपणें ॥१॥
मौन्यपणें वाचा थोंटावल्या चारी । ऐसें तुझें हरी रूप आहे ॥ध्रु.॥
रूप तुझें ऐसें डोळां न देखवे । जेथें हें झकवे ब्रह्मादिक ॥२॥
ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी । ह्मणोनि आटाटी फार त्यांसी ॥३॥
तुका ह्मणे तुझें गुण नाम रूप । आहेसी अमुप वाणूं काई ॥४॥
मनवाचातीत तुझें हें स्वरूप । ह्मणोनियां माप भक्ती केलें ॥१॥
भक्तीचिया मापें मोजितों अनंता । इतरानें तत्वता न मोजवे ॥ध्रु.॥
योग याग तपें देहाचिया योगें । ज्ञानाचिया लागें न सांपडेसी ॥२॥
तुका ह्मणे आह्मी भोऑया भावें सेवा । घ्यावी जी केशवा करितों ऐसी ॥३॥
देवा ऐसा शिष्य देई । ब्रह्मज्ञानी निपुण पाहीं ॥१॥
जो कां भावाचा आगळा । भक्तीप्रेमाचा पुतळा ॥ध्रु.॥
ऐशा युक्ति ज्याला बाणे । तेथें वैराग्याचें ठाणें ॥२॥
ऐसा जाला हो शरीरीं । तुका लिंबलोण करी ॥३॥
जंव नाहीं देखिली पंढरी । तोंवरी वर्णिसी थोर वैकुंठींची ॥१॥
मोक्षसिद्धि तेथें हिंडे दारोदारीं । होऊनि कामारी दीनरूप ॥ध्रु.॥
वृंदावन सडे चौक रंग माळा । अभिन्नव सोहोळा घरोघरीं ॥२॥
नामघोष कथापुराणकीर्तनीं । ओविया कांडणीं पांडुरंग ॥३॥
सर्व सुख तेथें असे सर्वकाळ । ब्रह्म तें केवळ नांदतसे ॥४॥
तुका ह्मणे जें न साधे सायासें । तें हें प्रत्यक्ष दिसे विटेवरि ॥५॥
दुःख वाटे ऐसी ऐकोनियें गोष्टी । जेणें घडे तुटी तुझ्या पायीं ॥१॥
येतो कळवळा देखोनियां घात । करितों फजित नाइकती ॥ध्रु.॥
काय करूं देवा ऐसी नाहीं शक्ति । दंडुनि पुढती वाटे लावूं ॥२॥
तुका ह्मणे मज दावूं नको ऐसे । दृष्टीपुढें पिसे पांडुरंगा ॥३॥
शूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥१॥
तेवीं अभक्तांसी आवडे पाखांड । न लगे त्यां गोड परमार्थ ॥ध्रु.॥
श्वानासी भोजन दिलें पंचामृत । तरी त्याचें चित्त हाडावरि ॥२॥
तुका ह्मणे सर्पा पाजिलिया क्षीर । वमितां विखार विष जालें ॥३॥
रासभ धुतला महा तीर्थांमाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥१॥
तेवीं खळा काय केला उपदेश । नव्हे चि मानस शुद्ध त्याचें ॥ध्रु.॥
सर्पासी पाजिलें शर्करापीयूष । अंतरींचें विष जाऊं नेणे ॥२॥
तुका ह्मणे श्वाना िक्षरीचें भोजन । सवें चि वमन जेवी तया ॥३॥
जेवीं नवज्वरें तापलें शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥१॥
तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात ॥ध्रु.॥
कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥२॥
तुका ह्मणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥३॥
आतां असों मना अभक्तांची कथा । न होइप दुश्चिता हरिनामीं ॥१॥
नये त्याची कदा गोष्टी करूं मात । जिव्हे प्रायिश्चत्त त्याच्या नांवें ॥ध्रु.॥
प्रभातें न घ्यावें नांव माकडाचें । तैसें अभक्तांचें सर्वकाळ ॥२॥
तुका ह्मणे आतां आठवूं मंगळ । जेणें सर्व काळ सुखरूप ॥३॥
नाम आठवितां सद्गदित कंठीं । प्रेम वाढे पोटीं ऐसें करीं ॥१॥
रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्रीं । अष्टांग ही गात्रीं प्रेम तुझें ॥ध्रु.॥
सर्व ही शरीर वेचो या कीर्तनीं । गाऊं निशिदिनीं नाम तुझें ॥२॥
तुका ह्मणे दुजें न करीं कल्पांतीं । सर्वदा विश्रांति संतां पाइप ॥३॥
जननी हे जाणे बाळकाचें वर्म । सुख दुःख धर्म जें जें कांहीं ॥१॥
अंधापुढें जेणें दिधला आधार । त्याचा हा विचार तो चि जाणे ॥ध्रु.॥
शरणागता जेणें घातलें पाठीशीं । तो जाणे तेविशीं राखों तया ॥२॥
कासे लागे तया न लगती सायास । पोहोणारा त्यास पार पावी ॥३॥
तुका ह्मणे जीव विठ्ठलाचे हातीं । दिला त्याची गति तो चि जाणे ॥४॥
नका वांटूं मन विधिनिषेधांसी । स्मरावा मानसीं पांडुरंग ॥१॥
खादलिया अन्ना मासी बोलों नये । अवघें चि जाये एका घांसें ॥ध्रु.॥
जोडी होते परी ते बहु कठिण । करितां जतन सांभाळावें ॥२॥
तुका ह्मणें येथें न मना विषाद । निंबेंविण व्याध तुटों नये ॥३॥
नको होऊं देऊं भावीं अभावना । या चि नांवें जाणा बहु दोष ॥१॥
मेघवृष्टि येथें होते अनिवार । जिव्हाऑयां उखर लाभ नाड ॥ध्रु.॥
उत्तमा विभागें कनिष्ठाची इच्छा । कल्पतरु तैसा फळे त्यासी ॥२॥
तुका ह्मणे जिणें बहु थोडें आहे । आपुलिया पाहें पुढें बरें ॥३॥
त्याग तंव मज न वजतां केला । कांहीं च विठ्ठला मनांतूनि ॥१॥
भागलिया आला उबग सहज । न धरितां काज जालें मनीं ॥ध्रु.॥
देह जड जालें ॠणाच्या आभारें । केलें संवसारें कासावीस ॥२॥
तुका ह्मणे गेला आळसकिळस । अकर्तव्य दोष निवारिले ॥३॥
मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहें ॥१॥
तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावलें नरदेह ॥ध्रु.॥
ओटीच्या परिस मुठीचें तें वाढे । यापरि कैवाडें स्वहिताचें ॥२॥
नाहीं काळसत्ता आपुलिये हातीं । जाणते हे गुंती उगविती ॥३॥
तुका ह्मणे पाहें आपुली सूचना । करितो शाहाणा मृत्युलोकीं ॥४॥
राजा चाले तेथें वैभव सांगातें । हें काय लागतें सांगावें त्या ॥१॥
कोणी कोणा एथें न मनी जी फुका । कृपेविण एका देवाचिया ॥ध्रु.॥
शृंगारिलें नाहीं तगोंयेत वरि । उमटे लौकरि जैसे तैतें ॥२॥
तुका ह्मणे घरीं वसे नारायण । कृपेची ते खुण साम्या येते ॥३॥
वत्स पळे धेनु धांवे पाठीलागीं । प्रीतीचा तो अंगीं आयुर्भाव ॥१॥
शिकविलें काय येईल कारणा । सूत्र ओढी मना आणिकांच्या ॥ध्रु.॥
सांडिलें तें नाहीं घेत मेळवितां । ह्मणऊनि लाता मागें सारी ॥२॥
तुका ह्मणे आग्रह करावा न लगे । सांगतसे अंगें अनुभव ॥३॥
देवाच्या संबंधें विश्व चि सोयरें । सूत्र ओढे दोरें एका एक ॥१॥
आहाच हें नव्हे विटायासारिखें । जीव जीवनीं देखें सामावलें ॥ध्रु.॥
आणिकांचें सुख दुःख उमटे अंतरीं । एथील इतरीं तेणें न्यायें ॥२॥
तुका ह्मणे ठसावलें शुद्ध जाती । शोभा चि पुढती विशेषता ॥३॥
अवघा वेंचलों इंिद्रयांचे ओढी । जालें तें तें घडी निरोपिलें ॥१॥
असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्यां भार उतरिला ॥ध्रु.॥
कायावाचामनें तो चि निजध्यास । एथें जालों ओस भक्तीभावें ॥२॥
तुका ह्मणे करूं येईल धावणें । तरि नारायणें सांभाळावें ॥३॥
राहो आतां हें चि ध्यान । डोळा मन लंपटो ॥१॥
कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें ओंवाळीन ॥ध्रु.॥
होईल येणें कळसा आलें । िस्थरावलें अंतरीं ॥२॥
तुका ह्मणे गोजिरिया । विठोबा पायां पडों द्या ॥३॥
आदि मध्य अंत दाखविला दीपें । हा तों आपणापें यत्न बरा ॥१॥
दाशत्त्वें दाविलें धन्याचें भांडार । तोंतों नव्हे सार एथुनियां ॥ध्रु.॥
उपायानें सोस नासला सकळ । सत्ते सत्ताबळ अंगा आलें ॥२॥
तुका ह्मणे दृष्टि सकळांचे शिरीं । वचन चि करी बैसोनियां ॥३॥
सांटविले वाण । पैस घातला दुकान ॥१॥
जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्ध चि जवळी ॥ध्रु.॥
निवडिलें साचें । उत्तममध्यमकनिष्ठाचें ॥२॥
तुका बैसला दुकानीं । दावी मोला ऐसी वाणी ॥३॥
लागलिया मुख स्तनां । घाली पान्हा माउली ॥१॥
उभयतां आवडी लाडें । कोडें कोड पुरतसे ॥ध्रु.॥
मेळवितां अंगें अंग । प्रेमें रंग वाढतो ॥२॥
तुका ह्मणे जड भारी । अवघें शिरीं जननीचे ॥३॥
अवगुण तों कोणीं नाहीं प्रतिष्ठिले । मागें होत आले शिष्टाचार ॥१॥
दुर्बळाच्या नांवें पिटावा डांगोरा । हा तों नव्हे बरा सत्यवाद ॥ध्रु.॥
मद्य आणि मधु एकरासी नांवें । तरि कां तें खावें आधारें त्या ॥२॥
तुका ह्मणे माझा उिच्छष्ट प्रसाद । निवडी भेदाभेद वृष्टिन्यायें ॥३॥
भूतीं भगवंत । हा तों जाणतों संकेत ॥१॥
भारी मोकलितों वाण । ज्याचा त्यासी कळे गुण ॥ध्रु.॥
करावा उपदेश। निवडोनि तरि दोष ॥२॥
तुका ह्मणे वाटे । चुकतां आडरानें कांटे ॥३॥
आह्मां हें कवतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥१॥
कासयाचा बाध एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपें जगाचिया ॥ध्रु.॥
अविद्येचा येथें कोठें परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥२॥
तुका ह्मणे येथें खयाचा विकरा । न सरती येरा खोट्या परी ॥३॥
दर्पणासी नखटें लाजे । शुद्ध खिजे देखोनि ॥१॥
ऐसें अवगुणांच्या बाधें । दिसे सुदें विपरीत ॥ध्रु.॥
अंधऑयास काय हिरा । गारां चि तो सारिखा ॥२॥
तुका ह्मणे भुंके सुनें । ठाया नेणे ठाव तो ॥३॥
नावडे तरि कां येतील हे भांड । घेउनियां तोंड काळें येथें ॥१॥
नासोनियां जाय रस यासंगती । खळाचे पंगती नारायणा ॥ध्रु.॥
तोंडावाटा नर्क काढी अमंगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुनें ॥२॥
तुका ह्मणे नाहीं संतांची मर्यादा । निंदे तो चि निंदा मायझवा ॥३॥
लेकरा आईतें पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥१॥
त्यापरि आमचा जालासे सांभाळ । देखिला चि काळ नाहीं आड ॥ध्रु.॥
भुकेचे संनिध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥२॥
आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगें ॥३॥
शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन । लागत चि धन नाहीं वित्त ॥१॥
सगुणाचे सोई सगुण विश्रांती । आपण चि येती चोजवीत ॥ध्रु.॥
कीर्तनीं चि वोळे कृपेचा वोरस । दुरीपणें वास संनिधता ॥२॥
तुका ह्मणे वर्म सांगतों सवंगें । मन लावा लागें स्वहिताच्या ॥३॥
जीवींचें जाणावें या नांवें आवडी । हेंकड तें ओढी अमंगळ ॥१॥
चित्ताच्या संकोचें कांहीं च न घडे । अतिशयें वेडे चार तो चि ॥ध्रु.॥
काळाविण कांहीं नाहीं रुचों येत । करूनि संकेत ठेवियेला ॥२॥
तुका ह्मणे कळे वचनें चांचणी । काय बोलवूनि वेळोवेळां ॥३॥
कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे ॥१॥
रंगलें तें अंगीं दावी । विष देववी आसडे ॥ध्रु.॥
धनसोसें लागे वेड । ते बडबड शमेना ॥२॥
तुका ह्मणे वेसनें दोन्ही । नर्कखाणी भोगावया ॥३॥
कृष्णांजनें जाले सोज्वळ लोचन । तेणें दिले वान निवडुनी ॥१॥
निरोपाच्या मापें करीं लडबड । त्याचें त्यानें गोड नारायणें ॥ध्रु.॥
भाग्यवंतांघरीं करितां विश्वासें । कार्य त्यासरिसें होईजेतें ॥२॥
तुका ह्मणे पोट भरे बरे वोजा । निज ठाव निजा निजस्थानीं ॥३॥
मैंद आला पंढरीस । हातीं घेउनि प्रेमपाश ॥१॥
पुढें नाडियलें जग । नेतो लागों नेदी माग ॥ध्रु.॥
उभारोनि बाहे । दृष्टादृष्टी वेधीताहे ॥२॥
वैकंठीहुनि पेणें । केलें पंढरीकारणें ॥३॥
पुंडलिकें यारा । देउनि आणिलें चोरा ॥४॥
तुका ह्मणे चला । तुह्मी आह्मी धरूं त्याला ॥५॥
भांडवी माउली कवतुकें बाळा । आपणा सकळां साक्षित्वेसीं ॥१॥
माझी माझी ह्मणे एकएकां मारी । हें तों नाहीं दुरी उभयतां ॥ध्रु.॥
तुझें थोडें भातें माझें बहु फार । छंद करकर वाद मिथ्या ॥२॥
तुका ह्मणे एके ठायीं आहे वर्म । हें चि होय श्रम निवारितें ॥३॥
लटिकियाच्या आशा । होतों पडिलों वळसा । होउनियां दोषा । पात्र मिथ्या अभिमानें ॥१॥
बरवी उघडली दृष्टी । नाहीं तरी होतों कष्टी । आक्रंदते सृष्टी । मात्र या चेष्टांनीं ॥ध्रु.॥
मरणाची नाहीं शुद्धी । लोभीं प्रवर्तली बुद्धी । परती तों कधीं । घडे चि ना माघारीं ॥२॥
सांचूनि मरे धन । लावी पोरांसी भांडण । नाहीं नारायण । तुका ह्मणे स्मरीला ॥३॥
जवळी मुखापाशीं । असतां नेघे अहर्निशीं ॥१॥
भवनिर्दाळण नाम । विठ्ठल विठ्ठल नासी काम ॥ध्रु.॥
सुखाचें शेजार । करूं कां नावडें घर ॥२॥
तुका ह्मणे ठेवा । कां हा न करी चि बरवा ॥३॥
बरवें देशाउर जालें । काय बोलें बोलावें ॥१॥
लाभें लाभ दुणावला । जीव धाला दरुषणें ॥ध्रु.॥
भाग्यें जाली संतभेटी। आवडी पोटीं होती ते ॥२॥
तुका ह्मणे श्रम केला । अवघा आला फळासी ॥३॥
सांगतां हें नये सुख । कीर्ती मुख न पुरे ॥१॥
आवडीनें सेवन करू । जीवींचें धरूं जीवीं च ॥ध्रु.॥
उपमा या देतां लाभा । काशा शोभा सारिखी ॥२॥
तुका ह्मणे नुचलीं डोई । ठेविली पायीं संतांचे ॥३॥
आपुलाला लाहो करूं । केणें भरूं हा विठ्ठल ॥१॥
भाग्य पावलों या ठाया । आतां काया कुरवंडी ॥ध्रु.॥
पुढती कोठें घडे ऐसें । बहुतां दिसें फावलें ॥२॥
तुका ह्मणे जाली जोडी । चरण घडी न विसंभें ॥३॥
उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥१॥
संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ध्रु.॥
संपुष्ट हा हृदयपेटी । करूनि पोटीं सांटवूं ॥२॥
तुका ह्मणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥३॥
आह्मां आपुलें नावडे संचित । चरफडी चित्त कळवऑयानें ॥१॥
न कळतां जाला खोळंब मारगा । जगीं जालों जगा बहुरूपी ॥ध्रु.॥
कळों आलें बरें उघडले डोळे । कर्णधार मिळे तरि बरें ॥२॥
तुका ह्मणे व्हाल ऐकत करुणा । तरि नारायणा उडी घाला ॥३॥
बरगासाटीं खादलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥१॥
फजित तो केला आहे । ताडण साहे गौरव ॥ध्रु.॥
ओढाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥२॥
तुका फजीत करी बुच्या। विसरे कुच्या खोडी तेणें ॥३॥
धांव घालीं आई । आतां पाहातेसी काई ॥१॥
धीर नाहीं माझे पोटीं । जालें वियोगें हिंपुटीं ॥ध्रु.॥
करावें सीतळ । बहु जाली हळहळ ॥२॥
तुका ह्मणे डोई । कधीं ठेवीन हे पायीं ॥३॥
तुह्मां ठावा होता देवा । माझें अंतरींचा हेवा ॥१॥
होती काशानें सुटका । तरि हे वैकुंठनायका ॥ध्रु.॥
नसतें सांभाळिलें। जरि तुह्मीं आश्वासिलें ॥२॥
तुका ह्मणे कृपाळुवा । बरवा केला सावाधावा ॥३॥
देऊं ते उपमा । आवडीनें पुरुषोत्तमा ॥१॥
पाहातां काशा तूं सारिखा । तिंहीं लोकांच्या जनका ॥ध्रु.॥
आरुष हे वाणी। गोड वरूनि घेतां कानीं ॥२॥
आवडीनें खेळे । तुका पुरवावे सोहाळे ॥३॥
दर्शनाची आस । आतां ना साहे उदास ॥१॥
जीव आला पायांपाशीं । येथें असें कलिवरेंसीं ॥ध्रु.॥
कांहीं च नाठवे । ठायीं बैसलें नुठवे ॥२॥
जीव असतां पाहीं । तुका ठकावला ठायीं ॥३॥
भोगावरि आह्मीं घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥१॥
विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं बळा येऊं आतां ॥ध्रु.॥
काय सारूनियां काढावें बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं ॥२॥
केला तरी उरे वाद चि कोरडा । बळें घ्यावी पीडा स्वपनींची ॥३॥
आवघे चि वाण आले तुह्मां घरा । मजुरी मजुरा रोज कीदव ॥४॥
तुका ह्मणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ॥५॥
कां हो एथें काळ आला आह्मां आड । तुह्मांपाशीं नाड करावया ॥१॥
कां हो विचाराचें पडिलें सांकडें । काय ऐसें कोडें उपजलें ॥ध्रु.॥
कां हो उपजेना द्यावी ऐशी भेटी । काय द्वैत पोटीं धरिलें देवा ॥२॥
पाप फार किंवा जालासी दुर्बळ । मागिल तें बळ नाहीं आतां ॥३॥
काय जालें देणें निघालें दिवाळें । कीं बांधलासि बळें ॠणेंपायीं ॥४॥
तुका ह्मणे कां रे ऐसी केली गोवी । तुझी माझी ठेवी निवडुनियां ॥५॥
काय देह घालूं करवती करमरी । टाकुं या भितरी अग्नीमाजी ॥१॥
काय सेवूं वन शीत उष्ण तान । साहों कीं मोहन धरुनी बैसों ॥ध्रु.॥
काय लावूं अंगीं भस्म उधळण । हिंडूं देश कोण खुंट चारी ॥२॥
काय तजूं अन्न करूनि उपास । काय करूं नास जीवित्वाचा ॥३॥
तुका ह्मणे काय करावा उपाव । ऐसा देइप भाव पांडुरंगा ॥४॥
दंभें कीर्ति पोट भरे मानी जन । स्वहित कारण नव्हे कांहीं ॥१॥
अंतरती तुझे पाय मज दुरी । धरितां हे थोरी जाणिवेची ॥ध्रु.॥
पिंडाच्या पाळणें धांवती विकार । मज दावेदार मजमाजी ॥२॥
कैसा करूं घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥३॥
तुका ह्मणे मज दावी तो सोहोळा । देखें पाय डोळां तुझे देवा ॥४॥
धिग जिणें त्याचा स्वामी हीन वर । मरण तें बर भलें मग ॥१॥
ऐका जी देवा ऐसी आहे नीत । काय तें उचित सांभाळावें ॥ध्रु.॥
देशोदेशीं धाक जयाच्या उत्तरें । तयाचें कुतरें परि भलें ॥२॥
तुका ह्मणे हें कां सुचलें उत्तर । जाणोनि अंतर ओळखावें ॥३॥
आतां गाऊं तुज ओविया मंगळीं । करूं गदारोळी हरिकथा ॥१॥
होसि निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ध्रु.॥
भोगिले ते भोग लावूं तुझे अंगीं । अलिप्त या जगीं होउनि राहों ॥२॥
तुका ह्मणे आह्मी लाडिकीं लेंकरें । न राहों अंतरे पायांविण ॥३॥
सर्व सुखें आजी एथें चि वोळलीं । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥१॥
सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळें ॥२॥
तुका ह्मणे वाचा राहिली कुंटित । पुढें जालें चित्त समाधान ॥३॥
विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥१॥
विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ध्रु.॥
बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥२॥
सकळां इंिद्रयां मन एक प्रधान । तें ही करी ध्यान विठोबाचें ॥३॥
तुका ह्मणे या विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥४॥
होयें वारकरी । पांहे पांहे रे पंढरी ॥१॥
काय करावीं साधनें । फळ अवघें चि तेणें ॥ध्रु.॥
अभिमान नुरे । कोड अवघें चि पुरे ॥२॥
तुका ह्मणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥
पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥१॥
अवघा होय पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥ध्रु.॥
न लगे धन मान । देहभावें उदासीन ॥२॥
तुका ह्मणे मळ । नासी तात्काळ तें स्थळ ॥३॥
बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग । नाहीं जाला त्याग अंतरींचा ॥१॥
ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ध्रु.॥
जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातों विसरुनि सकळ हें ॥२॥
प्रपंचाबाहेरि नाहीं आलें चित्त । केले करी नित्य वेवसाय ॥३॥
तुका ह्मणे मज भोरप्या चि परी । जालें सोंग वरी आंत तैसें ॥४॥
ह्मणवितों दास ते नाहीं करणी । आंत वरी दोन्ही भिन्न भाव ॥१॥
गातों नाचतों तें दाखवितों जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ध्रु.॥
पाविजे तें वर्म न कळे चि कांहीं । बुडालों या डोहीं दंभाचिया ॥२॥
भांडवल काळें हातोहातीं नेलें । माप या लागलें आयुष्यासी ॥३॥
तुका ह्मणे वांयां गेलों ऐसा दिसें । होईल या हांसें लौकिकाचें ॥४॥
न कळतां काय करावा उपाय । जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥१॥
येऊनियां वास करिसी हृदयीं । ऐसें घडे कइप कासयानें ॥ध्रु.॥
साच भावें तुझें चिंतन मानसीं । राहे हें करिसी कैं गा देवा ॥२॥
लटिकें हें माझें करूनियां दुरी । साच तूं अंतरीं येउनि राहें ॥३॥
तुका ह्मणे मज राखावें पतिता ।आपुलिया सत्ता पांडुरंगा ॥४॥
चिंतिलें तें मनिंचें जाणें । पुरवी खुणे अंतरींचें ॥१॥
रात्री न कळे दिवस न कळे । अंगीं खेळे दैवत हें ॥ध्रु.॥
नवसियाचे नव रस । भोगी त्यास भिन्न नाहीं ॥२॥
तुका ह्मणे सम चि देणें । समचरण उभा असे ॥३॥
उधाराचा संदेह नाहीं । याचा कांहीं सेवकां ॥१॥
पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥ध्रु.॥
बुडतां जळीं जळतां अंगीं । ते प्रसंगीं राखावें ॥२॥
तुका ह्मणे आह्मांसाटीं । कृपा पोटीं वागवी ॥३॥
काय विरक्ति कळे आह्मां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥१॥
नाचों सुखें वैष्णवमेळीं । टाळघोळीं आनंदें ॥ध्रु.॥
शांति क्षमा दया मी काय जाणें । गोविंद कीर्तनेंवांचूनियां ॥२॥
कासया उदास असों देहावरी । अमृतसागरीं बुडोनियां ॥३॥
कासया एकांत सेवूं तया वना । आनंद तो जनामाजी असे ॥४॥
तुका ह्मणे आह्मां ऐसा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥५॥
जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥१॥
दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ॥ध्रु.॥
गरुडटकयांच्या भारें । भूमि गर्जे जेजेकारें ॥२॥
सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ॥३॥
तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥४॥
तुका ह्मणे भेणें । काळ नये तेणें राणें ॥५॥
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरू ॥१॥
पढियें देहभावें पुरवितो वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥
मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥२॥
योगक्षेम जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥३॥
तुका ह्मणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥४॥
सकळ धर्म मज विठोबाचें नाम । आणीक त्यां वर्म नेणें कांहीं ॥१॥
काय जाणों संतां निरविलें देवें । करिती या भावें कृपा मज ॥२॥
तुका ह्मणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळों यावा ॥३॥
उदंड शाहाणे होत तर्कवंत । परि या नेणवे अंत विठोबाचा ॥१॥
उदंडा अक्षरां करोत भरोवरी । परि ते नेणवे थोरी विठोबाची ॥२॥
तुका ह्मणे नाहीं भोळेपणाविण । जाणीव ते सिण रितें माप ॥३॥
आधारावांचुनी । काय सांगसी काहाणी ॥१॥
ठावा नाहीं पंढरीराव । तोंवरी अवघें चि वाव ॥ध्रु.॥
मानिताहे कोण । तुझें कोरडें ब्रह्मज्ञान ॥२॥
तुका ह्मणे ठेवा । जाणपण एक सवा ॥३॥
अनाथांची तुह्मां दया । पंढरीराया येतसे ॥१॥
ऐसी ऐकोनियां कीर्ति । बहु विश्रांति पावलों ॥ध्रु.॥
अनाथांच्या धांवा घरा । नामें करा कुडावा ॥२॥
तुका ह्मणे सवघड हित । ठेवूं चित्त पायांपें ॥३॥
येथें नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥१॥
विषयांचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे मज ॥ध्रु.॥
वाहोनियां भार कुंथसील ओंझे । नव्हे तें चि माझें थीता त्याग ॥२॥
तुका ह्मणे कैसी नाहीं त्याची लाज । संतीं केशीराज साधियेला ॥३॥
हीं च त्यांचीं पंचभूतें । जीवन भातें प्रेमाचें ॥१॥
कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ध्रु.॥
हा च काळ वर्तमान । साधन ही संपत्ती ॥२॥
तुका ह्मणे दिवसरातीं । हें चि खाती अन्न ते ॥३॥
दीप न देखे अंधारा । आतां हें चि करा जतन ॥१॥
नारायण नारायण । गांठी धन बळकट ॥ध्रु.॥
चिंतामणीपाशीं चिंता । तत्वता ही नयेल ॥२॥
तुका ह्मणे उभयलोकीं । हे चि निकी सामोग्री ॥३॥
धन्य काळ संतभेटी । पायीं मिठी पडिली तो ॥१॥
संदेहाची सुटली गांठी । जालें पोटीं शीतळ ॥ध्रु.॥
भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥२॥
तुका ह्मणे मंगळ आतां । कोण दाता याहूनि ॥३॥
दिनरजनीं हा चि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥१॥
संकिल्पला देह देवा । सकळ हेवा तये ठायीं ॥ध्रु.॥
नाहीं अवसान घडी । सकळ जोडी इंिद्रयां ॥२॥
कीर्ति मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥३॥
खरें नानवट निक्षेपीचें जुनें । काढिलें ठेवणें समर्थाचें ॥१॥
मजुराच्या हातें मापाचा उकल । मी तों येथें फोल सत्ता त्याची ॥ध्रु.॥
कुलाळाच्या हातें घटाच्या उत्पित्त । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥२॥
तुका ह्मणे जीवन तें नारायणीं । प्रभा जाते कीणाअ प्रकाशाची ॥३॥
गंगेचिया अंताविण काय चाड । आपुलें तें कोड तृषेपाशीं ॥१॥
विठ्ठल हे मूर्ति साजिरी सुंदर । घालीं निरंतर हृदयपुटीं ॥ध्रु.॥
कारण तें असे नवनीतापाशीं । गबाळ तें सोसी इतर कोण ॥२॥
बाळाचे सोईतें घांस घाली माता । आटाहास चिंता नाहीं तया ॥३॥
गाऊं नाचों करूं आनंदसोहळा । भाव चि आगळा नाहीं हातां ॥४॥
तुका ह्मणे अवघें जालें एकमय । परलोकींची काय चाड आतां ॥५॥
स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥१॥
आतां हाता धांवा नारायणा । मज हे वासना अनावर ॥ध्रु.॥
येउनियां आड ठाके लोकलाज । तें हें दिसे काज अंतरलें ॥२॥
तुका ह्मणे आह्मां जेथें जेथें गोवा । तेथें तुह्मीं देवा सांभाळावें ॥३॥
पडिलों भोवणीं । होतों बहु चिंतवणी ॥१॥
होतों चुकलों मारग । लाहो केला लाग वेगें ॥ध्रु.॥
इंिद्रयांचे संदी । होतों सांपडलों बंदीं ॥२॥
तुका ह्मणे बरें जालें । विठ्ठलसें वाचे आलें ॥३॥
बरें जालें आलीं ज्याचीं त्याच्या घरा । चुकला पाहेरा ओढाळांचा ॥१॥
बहु केलें दुखी त्यांचिया सांभाळें । आतां तोंड काळें तेणें लोभें ॥ध्रु.॥
त्यांचिया अन्यायें भोगा माझें अंग । सकळ ही लाग द्यावा लागे ॥२॥
नाहीं कोठें िस्थर राहों दिलें क्षण । आजिवरी सिण पावलों तो ॥३॥
वेगळाल्या खोडी केली तडातडी। सांगावया घडी नाहीं सुख ॥४॥
निरवूनि तुका चालिला गोवारें । देवापाशीं भार सांडवूनि ॥५॥
न करावी आतां पोटासाटीं चिंता । आहे त्या संचिता माप लावूं ॥१॥
दृष्टि ते घालावी परमार्थाठायीं । क्षुल्लका उपायीं सिण जाला ॥ध्रु.॥
येथें तंव नाहीं घेइजेसें सवें । कांहीं नये जीवें वेचों मिथ्या ॥२॥
खंडणें चि नव्हे उद्वेग वेरझारीं । बापुडे संसारीं सदा असों ॥३॥
शेवटा पाववी नावेचें बैसनें । भुजाबळें कोणें कष्टी व्हावें ॥४॥
तुका ह्मणे आतां सकळांचें सार । करावा व्यापार तरी ऐसा ॥५॥
आमच्या हें आलें भागा । जीव्हार या जगाचें ॥१॥
धरूनियां ठेलों जीवें । बळकट भावें एकविध ॥ध्रु.॥
आणूनियां केला रूपा । उभा सोपा जवळी ॥२॥
तुका ह्मणे अंकित केला । खालीं आला वचनें ॥३॥
खरें भांडवल सांपडलें गांठी । जेणें नये तुटी उदमासी ॥१॥
संवगाचें केणें सांपडलें घरीं । भरूनि वैखरी सांटविलें ॥ध्रु.॥
घेतां देतां लाभ होतसे सकळां । सदेवां दुर्बळा भाव तैसा ॥२॥
फडा आलिया तो न वजे निरासे । जरि कांहीं त्यास न कळतां ॥३॥
तुका ह्मणे आतां जालीसे नििंश्चती । आणीक तें चित्तीं न धरूं दुजें ॥४॥
पदोपदीं दिलें अंग । जालें सांग कारण ॥१॥
रुधवूनि ठेलों ठाव । जगा वाव सकळ ॥ध्रु.॥
पुढती चाली मनालाहो । वाढे देहो संतोष ॥२॥
। तुका ह्मणे क्षरभागीं । जालों जगीं व्यापक ॥३॥
निवडुनि दिलें नवनीत । संचित ते भोगीत ॥१॥
आतां पुढें भावसार । जीवना थार पाहावया ॥ध्रु.॥
पारखियाचे पडिलें हातीं । चांचपती आंधळीं ॥२॥
तुका ह्मणे सेवन घडे । त्यासी जोडे लाभ हा ॥३॥
उचित न कळे इंिद्रयाचे ओढी । मुखें बडबडी शिकलें तें ॥१॥
आपण जाऊन न्यावीं नरकास । बळें बेताळीस कुळें जग ॥ध्रु.॥
अबोलणें बोले डोळे झांकुनियां । बडबडी वांयां दंभासाटीं ॥२॥
तुका ह्मणे आह्मी तेथील पारखी । नाचे देखोवेखीं जाणों खरें ॥३॥
एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वांटितां तें तुला येई कैसें ॥१॥
ह्मणउनि दृढ धरीं पांडुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ध्रु.॥
आणिका संकल्पा नको गोऊं मन । तरी च कारण साध्य होय ॥२॥
तुका ह्मणे ऐसें जाणावें उचित । तरी सहज िस्थत येईल कळों ॥३॥
गावे ह्मणउनि गीत । धरुनि राहे तैसें चित्त ॥१॥
हें चि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥ध्रु.॥
ऐकावी ह्मूण कथा । राहे तैसें धरुनि चित्ता ॥२॥
तुका ह्मणे धणी । नव्हे जेविल्यावांचुनि ॥३॥
कळल हे खुण । तरि दावी नारायण ॥१॥
सत्य संतांपाशीं राहे । येरां भय आड आहे ॥ध्रु.॥
अनुचिया ऐसें । असे भरलें प्रकाशें ॥२॥
इंिद्रयांचें धनी । ते हे जाती समजूनि ॥३॥
तर्क कुतर्क वाटा । नागवण घटापटा ॥४॥
तुका ह्मणे ल्यावें । डोळां अंजन बरवें ॥५॥
जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥१॥
कैसा जालासे बेश्रम । लाज नाहीं न ह्मणे राम ॥ध्रु.॥
पाहे वैरियाकडे। डोळे वासुनियां रडे ॥२॥
बांधुनियां यमा हातीं । दिला नाहीं त्याची खंती ॥३॥
नाहीं यांपें काम । ऐसें जाणे तो अधम ॥४॥
अझुन तरि मुका । कां रे जालासि ह्मणे तुका ॥५॥
वांटा घेइप लवकरि । मागें अंतरसी दुरी । केली भरोवरी। सार नेती आणीक ॥१॥
ऐसीं भांमावलीं किती । काय जाणों नेणों किती । समय नेणती । माथां भार वाहोनि ॥ध्रु.॥
नाहीं सारिलें तोंवरी । धांव घेइप वेग करीं । घेतलें पदरीं । फावलें तें आपुलें ॥२॥
फट लंडी ह्मणे तुका । एक न साहावे धका । तरि च या सुखा । मग कैसा पावसी ॥३॥
चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया । ऐकिल्या वांयां वारता त्या ॥१॥
ऐका जी वोजे पडतसें पायां । भावाचि तें जायावाट नव्हे ॥ध्रु.॥
व्याली कुमारीचा अनुभवें अनुभव । सांगतां तो भाव येत नाहीं ॥२॥
तुका ह्मणे येथें पाहिजे आरालें । बिंबीं निवळलें तरि भासे ॥३॥
काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ॥१॥
जया न फळे उपदेश । धस ऐसा त्या नांवें ॥ध्रु.॥
काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा ॥२॥
तुका ह्मणे कुचर दाणा । तैसा ह्मणा डेंग हा ॥३॥
देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हिया ऐसी केवीं गारगोटी ॥१॥
मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूर्ति ॥ध्रु.॥
काय पडिलेंसी लटिक्याचे भरी । वोंवाळुनि थोरी परती सांडीं ॥२॥
तुका ह्मणे पुढें दिसतसे घात । करितों फजित ह्मणउनी ॥३॥
संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥१॥
भक्तीची ते जाती ऐसी । सर्वस्वासी मुकावें ॥ध्रु.॥
भिक्षाणी वेवसाव। काला करितो गाढव ॥२॥
करुनि वस्ती बाजारीं । ह्मणवी कासया निस्पृही ॥३॥
प्रसादा आडुनि कवी । केलें तुप पाणी तेवीं ॥४॥
तुका ह्मणे होंई सुर । किंवा निसुर मजुर ॥५॥
तेज्या इशारती । तटा फोक वरी घेती ॥१॥
काय सांगावें त्याहूनी । ऐका रे धरा मनीं ॥ध्रु.॥
नव्हे भांडखोर । ओढूनि धरूं पदर ॥२॥
तुका ह्मणे तोंड । काळें करा खालीं मुंड ॥३॥
मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥१॥
आचारभ्रष्ट होती लोक कळी । पुण्य क्षीण बळी जालें पाप ॥ध्रु.॥
वर्णधर्म कोण न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायीं ॥२॥
वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांड ॥३॥
तुका ह्मणे किती करावे फजित । ते चि छंद नित्य बहु होती ॥४॥
अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो ॥१॥
अवघियाचा तळ धरी । जीवा उरी नुरउनी ॥ध्रु.॥
फळलें तें लवे भारें । पीक खरें आलें तइप ॥२॥
तुका ह्मणे देवा । पुढें भाव सारावा ॥३॥
उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायीं िस्थर ॥१॥
न घलावी धांव मनाचिये ओढी । वचन आवडी संताचिये ॥२॥
अंतरीं या राहे वचनाचा विश्वास । न उगे उपदेश तुका ह्मणे ॥३॥
Text: तुकाराम गाथा on Marathi Wikisource, which does not name the printed edition it was transcribed from. The verses are public domain; the transcription is by Wikisource contributors, CC BY-SA 4.0. Its systematic legacy-font errors are repaired by rule (see the reading page for details); some remain — इप printed for ई in about 220 abhangas, and a few vowel signs on the wrong letter. Numbering follows Wikisource; printed editions differ. Spotted a wrong line? Write to us with the number.