रज्जु धरूनियां हातीं । भेडसाविलीं नेणतीं । कळों येतां चित्तीं । दोरी दोघां सारिखी ॥१॥
तुह्मांआह्मांमध्यें हरी । जाली होती तैसी परी । मृगजळाच्या पुरीं । ठाव पाहों तरावया ॥ध्रु.॥
सरी चिताक भोंवरी । अळंकाराचिया परी । नामें जालीं दुरी । एक सोनें आटितां ॥२॥
पिसांचीं पारवीं । करोनि बाजागिरी दावी । तुका ह्मणे तेवीं । मज नको चाळवूं ॥३॥
नेघें तुझें नाम । न करीं सांगितलें काम ॥१॥
वाढे वचनें वचन । दोष उच्चारितां गुण ॥ध्रु.॥
आतां तुझ्या घरा । कोण करी येरझारा ॥2 ॥
तुका ह्मणे ठायीं । मजपाशीं काय नाहीं ॥३॥
व्यवहार तो खोटा । आतां न वजों तुझ्या वाटा ॥१॥
एका नामा नाहीं ताळ । केली सहजरांची माळ ॥ध्रु.॥
पाहों जातां घाई। खेळसी लपंडाई ॥२॥
तुका ह्मणे चार । बहु करितोसी फार ॥३॥
लटिका चि केला । सोंग पसारा दाविला ॥१॥
अवघा बुडालासी ॠणें । बहुतांचे देणें घेणें ॥ध्रु.॥
लावियेलीं चाळा। बहू दावूनि पुतळा ॥२॥
तुका ह्मणे हात । आह्मी अवरिली मात ॥३॥
दाखवूनि आस । केला बहुतांचा नास ॥१॥
थोंटा झोडा शिरोमणी । भेटलासी नागवणी ॥ध्रु.॥
सुखाचें उत्तर । नाहीं मुदलासी थार ॥२॥
तुका ह्मणे काय । तुझे घ्यावें उरे हाय ॥३॥
लाज ना विचार । बाजारी तूं भांडखोर ॥१॥
ऐसें ज्याणें व्हावें । त्याची गांठी तुजसवें ॥ध्रु.॥
फेडिसी लंगोटी । घेसी सकळांसी तुटी ॥२॥
तुका ह्मणे चोरा । तुला आप ना दुसरा ॥३॥
ठाव नाहीं बुड । घरें वसविसी कुड ॥१॥
भलते ठायीं तुझा वास । सदा एरवी उदास ॥ध्रु.॥
जागा ना निजेला । धाला ना भुकेला ॥२॥
न पुसतां भलें । तुका ह्मणे बुझें बोलें ॥३॥
श्वाना दिली सवे । पायांभोंवतें तें भोंवे ॥१॥
तैसी जाली मज परी । वसे निकट सेजारीं ॥ध्रु.॥
जेवितां जवळी । येऊनियां पुंस घोळी ॥२॥
कोपेल तो घनी । तुका ह्मणे नेणें मनीं ॥३॥
वटवट केली । न विचारितां मना आली ॥१॥
मज कराल तें क्षमा । कैसें नेणों पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥
उचित न कळे । जिव्हा भलतें चि बरळे ॥२॥
तुका ह्मणे कांहीं । लौकिकाची चाड नाहीं ॥३॥
जीवें व्हावें साटी । पडे संवसारें तुटी ॥१॥
ऐशीं बोलिलों वचनें । सवें घेउनि नारायण ॥ध्रु.॥
नाहीं जन्मा आलों । करील ऐसें नेदीं बोलों ॥२॥
ठाव पुसी सेणें । तुका ह्मणे खुंटी येणें ॥३॥
आता पंढरीराया । माझ्या निरसावें भया ॥१॥
मनीं राहिली आशंका । स्वामिभयाची सेवका ॥ध्रु.॥
ठेवा माथां हात । कांहीं बोला अभयमात ॥२॥
तुका ह्मणे लाडें । खेळें ऐसें करा पुढें ॥३॥
कवतुकवाणें । बोलों बोबड्या वचनें ॥१॥
हें तों नसावें अंतरीं । आह्मां धरायाचें दुरी ॥ध्रु.॥
स्तुति तैसी निंदा । माना सम चि गोविंदा ॥२॥
तुका ह्मणे बोलें । मज तुह्मी शिकविलें ॥३॥
असो मागें जालें । पुडें गोड तें चांगलें ॥१॥
आतां माझे मनीं । कांहीं अपराध न मनीं ॥ध्रु.॥
नेदीं अवसान । करितां नामाचें चिंतन ॥२॥
तुका ह्मणे बोले । तुज आधीं च गोविलें ॥३॥
मातेविण बाळा । आणिक न माने सोहळा ॥१॥
तैसें जालें माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥ध्रु.॥
वाट पाहेमेघा बिंदु । नेघे चातक सरिता सिंधू ॥२॥
सारसांसी निशीं । ध्यानरवीच्या प्रकाशीं ॥३॥
जीवनाविण मत्स्य । जैसें धेनूलागीं वत्स ॥४॥
पतिव्रते जिणें । भ्रताराच्या वर्त्तमानें ॥५॥
कृपणाचें धन । लोभालागीं जैसें मन ॥६॥
तुका ह्मणे काय । तुजविण प्राण राहे ॥७॥
तुजऐसा कोणी न देखें उदार । अभयदानशूर पांडुरंगा ॥१॥
शरण येती त्यांचे न विचारिसी दोष । न मागतां त्यांस अढळ देसी ॥ध्रु.॥
धांवसी आडणी ऐकोनियां धांवा । कइवारें देवा भक्तांचिया ॥२॥
दोष त्यांचे जाळी कल्पकोटिवरी । नामासाटीं हरि आपुलिया ॥३॥
तुका ह्मणे तुज वाणूं कैशा परी । एक मुख हरी आयुष्य थोडें ॥४॥
काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगों मी या जगामाजी आतां ॥१॥
जतन हें माझें करूनि संचित । दिलें अवचित आणूनियां ॥ध्रु.॥
घडल्या दोषांचें न घली च भरी । आली यास थोरी कृपा देवा ॥२॥
नव्हतें ठाउकें आइकिलें नाहीं । न मगतां पाहीं दान दिलें ॥३॥
तुका ह्मणे याच्या उपकारासाटीं । नाहीं माझें गाठीं कांहीं एंक ॥४॥
वाळूनियां जन सांडी मज दुरी । करिसील हरी ऐसें कधीं ॥१॥
आठवीन पाय धरूनि अनुताप । वाहे जळ झोंप नाहीं डोळां ॥ध्रु.॥
नावडती जीवा आणीक प्रकार । आवडी ते फार एकांताची ॥२॥
तुका ह्मणे ऐसी धरितों वासना । होइप नारायणा साह्य मज ॥३॥
सांगतों या मना तें माझें नाइके । घातावरी टेंके चांडाळ हें ॥१॥
ह्मणऊनि पाहे तरतें बुडतें । न ल्हाये पुरतें बळ करूं ॥ध्रु.॥
काय तें संचित न कळे पाहातां । मतिमंद चित्ता उपजतें ॥२॥
तुका ह्मणे ऐसें बळ नाहीं अंगी । पाहोनियां वेगीं पार टाकीं ॥३॥
आतां नको चुकों आपुल्या उचिता । उदारा या कांता रखुमाईच्या ॥१॥
आचरावे दोष हें आह्मां विहित । तारावे पतित तुमचें तें ॥ध्रु.॥
आह्मी तों आपुलें केलेसें जतन । घडो तुह्मांकून घडेल ते ॥२॥
तुका ह्मणे विठो चतुराच्या राया । आहे ते कासया मोडों देसी ॥३॥
मुखें बोलावें तें जीविंचें जाणसी । विदित पायांपाशीं सर्व आहे ॥१॥
आतां हें चि भलें भाकावी करुणा । विनियोग तो जाणां तुह्मी त्याचा ॥ध्रु.॥
आपलें तों येथें केलें नव्हे कांहीं । साधनाचा वांहीं पडों नये ॥२॥
तुका ह्मणे देह दिला पिंडदान । वेळोवेळां कोण चिंता करी ॥३॥
कामातुरा भय लाज ना विचार । शरीर असार तृणतुल्य ॥१॥
नवल हे लीळा करात्याचें लाघव । प्रारब्धें भाव दाखविले ॥ध्रु.॥
लोभालोभ एका धनाचिये ठायीं । आणिकांची सोई चाड नाहीं ॥२॥
तुका ह्मणे भूक न विचारी प्रकार । योजे तें चि सार यथाकाळें ॥३॥
बांधे सोडी हें तों धन्याचिये हातीं । हेंकडें गोविती आपणां बळें ॥१॥
भुललियासी नाहीं देहाचा आठव । धोतयानें भाव पालटिला ॥ध्रु.॥
घरांत रिघावें दाराचिये सोई । भिंतीसवें डोई घेऊनि फोडी ॥२॥
तुका ह्मणे देवा गेलीं विसरोन । आतां वर्म कोण दावी यांसी ॥३॥
कवण जन्मता कवण जन्मविता । न कळे कृपावंता माव तुझी ॥१॥
कवण हा दाता कवण हा मागता । न कळे कृपावंता माव तुझी ॥ध्रु.॥
कवण भोगिता कवण भोगविता । न कळे कृपावंता माव तुझी ॥२॥
कवण ते रूप कवण अरूपता । न कळे कृपावंता माव तुझी ॥३॥
सर्वां ठायीं तूं चि सर्व ही जालासी। तुका ह्मणे यासी दुजें नव्हे ॥४॥
काय नाहीं माता गौरवीत बाळा । काय नाहीं लळा पाळीत ते ॥१॥
काय नाहीं त्याची करीत ते सेवा । काय नाहीं जीवा गोमटें तें ॥ध्रु.॥
अमंगळपणें कांटाळा न धरी । उचलोनि करीं कंठीं लावी ॥२॥
लेववी आपुले अंगें अळंकार । संतोषाये फार देखोनियां ॥३॥
तुका ह्मणे स्तुति योग्य नाहीं परी । तुह्मां लाज थोरी अंकिताची ॥४॥
जे दोष घडले न फिटे करितां कांहीं । सरते तुझ्या पायीं जाले तैसे ॥१॥
माझा कां हो करूं नये अंगीकार । जालेती निष्ठ पांडुरंगा ॥ध्रु.॥
यातिहीन नये ऐकों ज्यां वेद । तयां दिलें पद वैकुंठींचें ॥२॥
तुका ह्मणे कां रे एकाचा आभार । घेसी माथां भार वाहोनियां ॥३॥
हरिकथेची आवडी देवा । करितो सेवा दासांची ॥१॥
ह्मणोनि हिंडे मागें मागें । घरटी जागे घालितसे ॥ध्रु.॥
निर्लज्ज भोजें नाचत रंगीं । भरतें अंगीं प्रेमाचें ॥२॥
तुका ह्मणे विकलें देवें। आपण भावें संवसाटी ॥३॥
साधन संपित्त हें चि माझें धन । सकळ चरण विठोबाचे ॥१॥
शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळी च नीट सुखरूप ॥ध्रु.॥
वैष्णवांचा संग रामगाणें गाणें । मंडित भूषण अळंकार ॥२॥
भवनदी आड नव्हतीसी जाली । कोरडी च चाली जावें पायी ॥३॥
मायबाप दोघें पाहातील वाट । ठेवूनिया कटीं कर उभी ॥४॥
तुका ह्मणे केव्हां देखेन कळस । पळाली आळस निद्रा भूक ॥५॥
यथार्थवादें तुज न वर्णवे कदा । बोलतों ते निंदा करितों तुझी ।
वेदश्रुति तुज नेणती कोणी । चोवीस ठेंगणीं धांडोळितां ॥१॥
आतां मज क्षमा करावें देवा । सलगी ते केशवा बोलियेलों ॥ध्रु.॥
सगुण कीं साकार निर्गुण कीं निराकार । न कळे हा पार वेदां श्रुतीं ।
तो आह्मी भावें केलासी लहान । ठेवूनियां नांवें पाचारितों ॥२॥
सहजरमुखें शेष सीणला स्तवितां । पार न कळतां ब्रह्मा ठेला ।
तेथें माझी देहबुद्धि तें काई । थोर मी अन्यायी तुका ह्मणे ॥३॥
कृष्ण गातां गीतीं कृष्ण ध्यातां चित्तीं । ते ही कृष्ण होती कृष्णध्यानें ॥१॥
आसनीं शयनीं भोजनीं जेवितां । ह्मणारे भोगिता नारायण ॥ध्रु.॥
ओविये दळणीं गावा नारायण । कांडितां कांडण करितां काम ॥२॥
नर नारी याति हो कोणी भलतीं । भावें एका प्रीती नारायणा ॥३॥
तुका ह्मणे एका भावें भजा हरी । कांति ते दुसरी रूप एक ॥४॥
डोळियां पाझर कंठ माझा दाटे । येऊं देइप भेटे पांडुरंगे ॥१॥
बहु दिस टाकिले निरास कां केलें । कोठें वो गुंतलें चित्त तुझें ॥ध्रु.॥
बहु धंदा तुज नाहीं वो आठव । राहिलासे जीव माझा कंठीं ॥२॥
पंढरीस जाती वारकरी संतां । निरोप बहुतां हातीं धाडीं ॥३॥
तुजविण कोण सांवा धांवा करी । ये वो झडकरी पांडुरंगे ॥४॥
काय तुझी वाट पाहों कोठवरी । कृपाळु कांपरी विसरलासी ॥५॥
एक वेळ माझा धरूनि आठव । तुका ह्मणे ये वो न्यावयासी ॥६॥
अधिक कोंडितां चरफडी । भलतीकडे घाली उडी ॥१॥
काय करूं या मना आतां । का विसरातें पंढरिनाथा ।
करी संसाराची चिंता । वेळोवेळां मागुती ॥ध्रु.॥
भजन नावडे श्रवण । धांवे विषय अवलोकून ॥२॥
बहुत चंचळ चपळ । जातां येतां न लगे वेळ ॥३॥
किती राखों दोनी काळ । निजलिया जागे वेळे ॥४॥
मज राखें आतां । तुका ह्मणे पंढरिनाथा ॥५॥
कंथा प्रावर्ण । नव्हे भिक्षेचें तें अन्न ॥१॥
करीं यापरी स्वहित । विचारूनि धर्म नीत ॥ध्रु.॥
देऊळ नव्हे घर । प्रपंच परउपकार ॥२॥
विधिसेवन काम । नव्हे शब्द रामराम ॥३॥
हत्या क्षत्रधर्म । नव्हे निष्काम तें कर्म ॥४॥
तुका ह्मणे संतीं । करूनि ठेविली आइती ॥५॥
पडोनियां राहीं । उगा च संतांचिये पायीं ॥१॥
न लगे पुसणें सांगावें । चित्त शुद्ध करीं भावें ॥ध्रु.॥
सहज ते िस्थति। उपदेश परयुक्ति ॥२॥
तुका ह्मणे भाव । जवळी धरूनि आणी देव ॥३॥
देवाचे घरीं देवें केले चोरी । देवें देव नागवूनि केला भिकारी ॥१॥
धांवणियां धांवा धांवणियां धांवा । माग चि नाहीं जावें कवणिया गांवा ॥ध्रु.॥
सवें चि होता चोर घरिचिया घरीं । फावलियावरी केलें अवघें वाटोळें ॥२॥
तुका ह्मणे येथें कोणी च नाहीं । नागवलें कोण गेलें कोणाचें काई ॥३॥
अवघे चि निजों नका अवघिये ठायीं । वेळ अवेळ तरी सांभाळावी कांहीं ॥१॥
जतन करा रे जतन करा । घालूं पाहे घरावरी घाला चोरटें ॥ध्रु.॥
सीतरिलीं फार खाती भोंवताले फेरे । गेलें नये हातां सेकीं तळमळ उरे ॥२॥
तुका ह्मणे आह्मी करूं आपलें जतन । न लगे कांहीं कोणां द्यावें उघडा रे कान ॥३॥
काळोखी खाऊन कैवाड केला धीर । आपुलिया हितें जाले जनामध्यें शूर ॥१॥
कां रें तुह्मी नेणां कां रे तुह्मी नेणां। अल्पसुखासाटीं पडशी विपत्तीचे घाणां ॥ध्रु.॥
नाहीं ऐसी लाज काय तयांपें आगळें । काय नव्हे केलें आपुलिया बळें ॥२॥
तुका ह्मणे तरी सुख अवघें चि बरें । जतन करून हे आपुलालीं ढोरें ॥३॥
जाय परतें काय आणिला कांटाळा । बोला एक वेळा ऐसें तरी ॥१॥
कां हो केलें तुह्मी निष्ठ देवा । मानेना हे सेवा करितों ते ॥ध्रु.॥
भाग्यवंत त्यांसी सांगितल्या गोष्टी । तें नाहीं अदृष्टीं आमुचिया ॥२॥
तुका ह्मणे तुह्मापासूनि अंतर । न पडे नाहीं िस्थर बुद्धि माझी ॥३॥
अनुभवें कळों येतें पांडुरंगा । रुसावें तें कां गा तुह्मांवरी ॥१॥
आवरितां चित्त नावरे दुर्जन । घात करी मन माझें मज ॥ध्रु.॥
अंतरीं संसार भक्ति बाह्यात्कार । ह्मणोनि अंतर तुझ्या पायीं ॥२॥
तुका ह्मणे काय करूं नेणें वर्म । आलें तैसें कर्म सोसूं पुढें ॥३॥
तुजकरितां होतें आनाचें आन । तारिले पाषाण उदकीं देवा ॥१॥
कां नये कैवार करूं अंगीकार । माझा बहु भार चड जाला ॥ध्रु.॥
चुकलासी ह्मणों तरी जीवांचा ही जीव । रिता नाहीं ठाव उरों दिला ॥२॥
तुका ह्मणे ऐसें काय सत्ताबळ । माझे परी कृपाळ आहां तुह्मी ॥३॥
फळ देंठींहून झडे । मग मागुतें न जोडे ॥१॥
ह्मणोनि तांतडी खोटी । कारण उचिताचे पोटीं ॥ध्रु.॥
पुढें चढे हात। त्याग मागिलां उचित ॥२॥
तुका ह्मणे रणीं । नये पाहों परतोनि ॥३॥
अगी देखोनियां सती । अंगीं रोमांच उठती ॥१॥
हा तो नव्हे उपदेश । सुख अंतरीं उल्हासे ॥ध्रु.॥
वित्तगोतांकडे । चित्त न घाली न रडे ॥२॥
आठवूनि एका । उडी घाली ह्मणे तुका ॥३॥
फळ पिके देंठीं । निमित्य वारियाची भेटी ॥१॥
हा तों अनुभव रोकडा । कळों येतो खरा कुडा ॥ध्रु.॥
तोडिलिया बळें। वांयां जाती काचीं फळें ॥२॥
तुका ह्मणे मन । तेथे आपुलें कारण ॥३॥
हालवूनि खुंट । आधीं करावा बळकट ॥१॥
मग तयाच्या आधारें । करणें अवघें चि बरें ॥ध्रु.॥
सुख दुःख साहे । हर्षामषाअ भंगा नये ॥२॥
तुका ह्मणे जीवें । आधीं मरोनि राहावें ॥३॥
धांवे माते सोई । बाळ न विचारितां कांहीं ॥१॥
मग त्याचें जाणें निकें । अंग वोडवी कौतुकें ॥ध्रु.॥
नेणे सर्प दोरी । अगी भलतें हातीं धरी ॥२॥
तीविन तें नेणें । आणीक कांहीं तुका ह्मणे ॥३॥
भोग द्यावे देवा । त्याग भोगीं च बरवा ॥१॥
आपण व्हावें एकीकडे । देव कळेवरी जोडे ॥ध्रु.॥
योजे यथाकाळें । उत्तम पाला कंदें मूळें ॥२॥
वंचक त्यासी दोष । तुका ह्मणे मिथ्या सोस ॥३॥
पायांच्या प्रसादें । कांहीं बोलिलों विनोदें ॥१॥
मज क्षमा करणें संतीं । नव्हे अंगभूत युक्ति ॥ध्रु.॥
नव्हे हा उपदेश । तुमचें बडबडिलों शेष ॥२॥
तुमचे कृपेचें पोसणें । जन्मोजन्मीं तुका ह्मणे ॥३॥
जायांचें अंगुलें लेतां नाहीं मान । शोभा नेदी जन हांसविलें ॥१॥
गुसिळतां ताक कांडितां भूस । साध्य नाहीं क्लेश जाती वांयां ॥२॥
तुका ह्मणे नाहीं स्वता भांडवल । भिकेचें तें फोल बीज नव्हे ॥३॥
न बोलावें परी पडिला प्रसंग । हाकलितें जग तुझ्या नामें ॥१॥
लटिकें चि सोंग मांडिला पसारा । भिकारी तूं खरा कळों आलें ॥ध्रु.॥
निलाजिरीं आह्मी करोनियां धीर । राहिलों आधार धरूनियां ॥२॥
कैसा नेणों आतां करिसी शेवट । केली कटकट त्याची पुढें ॥३॥
तुका ह्मणे कांहीं न बोलसी देवा । उचित हे सेवा घेसी माझी ॥४॥
नाहीं जालें मोल कळे देतां काळीं । कोण पाहों बळी दोघांमध्यें ॥१॥
आह्मी तरी जालों जीवासी उदार । कैंचा हा धीर तुजपाशीं ॥ध्रु.॥
बहु चाळविलें मागें आजिवरी । आतां पुढें हरि जाऊं नेदीं ॥२॥
नव्हती जों भेटी नामाची ओळखी । ह्मणऊनि दुःखी बहु जालें ॥३॥
तुका ह्मणे कांहीं राहों नेदीं बाकी । एकवेळा चुकी जाली आतां ॥४॥
कैसा कृपाळु हें न कळसी देवा । न बोलसी सेवा घेसी माझी ॥१॥
काय ऐसें बळ आहे तुजपाशीं । पाहों हा रिघेसी कोणा आड ॥ध्रु.॥
पाडियेला ठायीं तुझा थारा मारा । अवघा दातारा लपसी तो ॥२॥
आतां तुह्मां आह्मां उरी तों चि बरें । काय हें उत्तरें वाढवूनि ॥३॥
तुका ह्मणे मज साह्य झाले संत । ह्मणऊनि मात फावली हे ॥४॥
चुकलिया आह्मां करितसां दंड । हाकासी कां खंड पांडुरंगा ॥१॥
चाळविलीं एकें रिद्धिसिद्धीवरी । तैसा मी भिकारी नव्हें देवा ॥ध्रु.॥
कां मी येथें गुंतों मांडूनि पसारा । मागुता दातारा दंभासाटीं ॥२॥
केलें म्यां जतन आपुलें वचन । ठायींचें धरून होतों पोटीं ॥३॥
तुका ह्मणे ताळा घातला आडाखीं । ठावें होतें सेकीं आडविसी ॥४॥
कृपावंता कोप न धरावा चित्तीं । छळूं वक्रोक्ती स्तुती करूं ॥१॥
आह्मी तुझा पार काय जाणों देवा । नेणों कैसी सेवा करावी ते ॥ध्रु.॥
अनंता अरूपा अलक्षा अच्युता । निर्गुणा सचिता सवाौत्तमा ॥२॥
चांगलीं हीं नामें घेतलीं ठेवून । जालासी लाहान भक्तिकाजा ॥३॥
तुका ह्मणे तुझ्या पायांवरी सदा । मस्तक गोविंदा असो माझा ॥४॥
आतां तुझा भाव कळों आला देवा । ठकूनियां सेवा घेसी माझी ॥१॥
टाकूनि सांकडें आपुलिये माथां । घातला या संतावरी भार ॥ध्रु.॥
स्तुती करवूनि पिटिला डांगोरा । तें कोण दातारा साच करी ॥२॥
जातीचें वाणी मी पोटींचे कुडें । नका मजपुढें ठकाठकी ॥३॥
तुका ह्मणे नाहीं आलें अनुभवा । आधीं च मी देवा कैसें नाचों ॥४॥
जन पूजी याचा मज कां आभार । हा तुह्मी विचार जाणां देवा ॥१॥
पत्र कोण मानी वंदितील सिक्का । गौरव सेवका त्या चि मुळें ॥ध्रु.॥
मी मीपणें होतों जनामधीं आधीं । कोणें दिलें कधीं काय तेव्हां ॥२॥
आतां तूं भोगिता सर्व नारायणा । नको आह्मां दीनां पीडा करूं ॥३॥
आपुलिया हातें देसील मुशारा । तुका ह्मणे खरा तो चि आह्मां ॥४॥
आमची कां नये तुह्मासी करुणा । किती नारायणा आळवावें ॥१॥
काय जाणां तुह्मी दुर्बळाचें जिणें । वैभवाच्या गुणें आपुलिया ॥ध्रु.॥
देती घेती करिती खटपटा आणिकें । निराळा कौतुकें पाहोनियां ॥२॥
दिवस बोटीीं आह्मीं धरियेलें माप । वाहातों संकल्प स्वहिताचा ॥३॥
तुका ह्मणे मग देसी कोण्या काळें । चुकुर दुर्बळें होतों आह्मी ॥४॥
तुह्मां आह्मां तुटी होईल यावरी । ऐसें मज हरी दिसतसे ॥१॥
वचनाचा कांहीं न देखों आधार । करावा हा धीर कोठवरी ॥ध्रु.॥
सारिलें संचित होतें गांठी कांहीं । पुढें ॠण तें ही नेदी कोणी ॥२॥
जावें चि न लगे कोणांचिया घरा । उडाला पातेरा तुझ्या संगें ॥३॥
तुका ह्मणे आह्मां हा चि लाभ जाला । मनुष्यधर्म गेला पांडुरंगा ॥४॥
देव मजुर देव मजुर । नाहीं उजुर सेवेपुढें ॥१॥
देव गांढ्याळ देव गांढ्याळ । देखोनियां बळ लपतसे ॥२॥
देव तर काई देव तर काई । तुका ह्मणे राई तरी मोटी ॥३॥
देव दयाळ देव दयाळ । साहे कोल्हाळ बहुतांचा ॥१॥
देव उदार देव उदार । थोड्यासाटीं फार देऊं जाणे ॥२॥
देव चांगला देव चांगला । तुका लागला चरणीं ॥३॥
देव बासर देव बासर । असे निरंतर जेथें तेथें ॥१॥
देव खोळंबा देव खोळंबा । मज झळंबा म्हूण कोंडी ॥ध्रु.॥
देव लागट देव लागट । लाविलिया चट जीवीं जडे ॥२॥
देव बावळा देव बावळा । भावें जवळा लुडबुडी ॥३॥
देव न व्हावा देव न व्हावा। तुका ह्मणे गोवा करी कामीं ॥४॥
देव निढळ देव निढळ । मूळ नाहीं डाळ परदेशी ॥१॥
देव अकुळी देव अकुळी । भलते ठायीं सोयरीक ॥२॥
देव लिगाड्या देव लिगाड्या । तुका ह्मणे भाड्या दंभें ठकी ॥३॥
देव बराडी देव बराडी । घाली देंठासाटीं उडी ॥१॥
देव भ्याड देव भ्याड । राखे बळीचें कवाड ॥ध्रु.॥
देव भाविक भाविक । होय दासाचें सेवक ॥२॥
देव होया देव होया । जैसा ह्मणे तैसा तया ॥३॥
देव लाहान लाहान । तुका ह्मणे अनुरेण ॥४॥
देव भला देव भला । मिळोनि जाय जैसा त्याला ॥१॥
देव उदार उदार । देतां नाहीं थोडें फार ॥ध्रु.॥
देव बळी देव बळी। जोडा नाहीं भूमंडळीं ॥२॥
देव व्हावा देव व्हावा । आवडे तो सर्वां जीवां ॥३॥
देव चांगला चांगला । तुका चरणीं लागला ॥४॥
देव पाहों देव पाहों । उंचे ठायीं उभे राहों ॥१॥
देव देखिला देखिला । तो नाहीं कोणां भ्याला ॥ध्रु.॥
देवा कांहीं मागों मागों । जीव भाव त्यासी सांगों ॥२॥
देव जाणे देव जाणे । पुरवी मनींचिये खुणे ॥३॥
देव कातर कातर । तुका ह्मणे अभ्यंतर ॥४॥
देव आमचा आमचा । जीव सकळ जीवांचा ॥१॥
देव आहे देव आहे । जवळीं आह्मां अंतरबाहे ॥ध्रु.॥
देव गोड देव गोड । पुरवी कोडाचें ही कोड ॥२॥
देव आह्मां राखे राखे । घाली किळकाळासी काखे ॥३॥
देव दयाळ देव दयाळ । करी तुक्याचा सांभाळ ॥४॥
जाऊं देवाचिया गांवां । देव देईल विसांवा ॥१॥
देवा सांगों सुखदुःख । देव निवारील भूक ॥ध्रु.॥
घालूं देवासी च भार। देव सुखाचा सागर ॥२॥
राहों जवळी देवापाशीं । आतां जडोनि पायांसी ॥३॥
तुका ह्मणे आह्मी बाळें । या देवाचीं लडिवाळें ॥४॥
प्रेम तेथें वास करी । मुखीं उच्चारितां हरी ॥१॥
प्रेम यावें तया गांवा । चोजवीत या वैष्णवां ॥ध्रु.॥
प्रेमें पाठी लागे बळें। भक्त देखोनियां भोळे ॥२॥
प्रेम न वजे दवडितां । शिरे बळें जेथें कथा ॥३॥
तुका ह्मणे थोर आशा । प्रेमा घरीं विष्णुदासां ॥४॥
संत मानितील मज । तेणें वाटतसे लाज ॥१॥
तुह्मी कृपा केली नाहीं । चित्त माझें मज ग्वाही ॥ध्रु.॥
गोविलों थोरिवां । दुःख वाटतसे जीवा ॥२॥
तुका ह्मणे माया । अवरा हे पंढरिराया ॥३॥
नाहीं तुह्मी केला । अंगीकार तो विठ्ठला ॥१॥
सोंगें न पवीजे थडी । माजी फुटकी सांगडी ॥ध्रु.॥
प्रेम नाही अंगीं । भले ह्मणविलें जगीं ॥२॥
तुका ह्मणे देवा । मज वांयां कां चाळवा ॥३॥
आतां चक्रधरा । झणी आह्मांस अव्हेरा ॥१॥
तुमचीं ह्मणविल्यावरी । जैसीं तैसीं तरी हरी ॥ध्रु.॥
काळ आह्मां खाय । तरी तुझें नांव जाय ॥२॥
तुका ह्मणे देवा । आतां पण सिद्धी न्यावा ॥३॥
मज ऐसें कोण उद्धरिलें सांगा । ब्रीदें पांडुरंगा बोलतसां ॥१॥
हातींच्या कांकणां कायसा आरिसा । उरलों मी जैसा तैसा आहें ॥ध्रु.॥
धनमंत्री हरी रोग्याचिये वेथे । तें तों कांहीं येथें न देखिजे ॥२॥
तुका ह्मणे नाहीं अनुभव अंगें । वचन वाउगें कोण मानी ॥३॥
काय तें सामर्थ्य न चले या काळें । काय जालीं बळें शक्तिहीण ॥१॥
माझिया संचितें आणिलासी हरी । जालें तुजवरी वरिष्ठ तें ॥ध्रु.॥
काय गमाविली सुदर्शन गदा । नो बोला गोविंदा लाजतसां ॥२॥
तुका ह्मणे काय िब्रदाचें तें काम । सांडा परतें नाम दिनानाथ ॥३॥
बळ बुद्धी वेचुनियां शक्ती । उदक चालवावें युक्ती ॥१॥
नाहीं चळण तया अंगीं । धांवें लवणामागें वेगीं ॥ध्रु.॥
पाट मोट कळा । भरित पखाळा सागळा ॥२॥
बीज ज्यासी घ्यावें। तुका ह्मणे तैसें व्हावें ॥३॥
न ह्मणे साना थोर । दृष्ट पापी अथवा चोर ॥१॥
सकळा द्यावी एकी चवी । तान हरूनि निववी ॥ध्रु.॥
न ह्मणे दिवस राती । सर्व काल सर्वां भूतीं ॥२॥
तुका ह्मणे झारी । घेतां तांब्यानें खापरी ॥३॥
इच्छा चाड नाहीं । न धरी संकोच ही कांहीं ॥१॥
उदका नेलें तिकडे जावें । केलें तैसें सहज व्हावें ॥ध्रु.॥
मोहरी कांदा ऊंस । एक वाफा भिन्न रस ॥२॥
तुका ह्मणे सुख । पीडा इच्छा पावे दुःख ॥३॥
तरले ते मागें आपुलिया सत्ता । कमाई अनंता करूनियां ॥१॥
उसनें फेडितां धर्म तेथें कोण । ते तुज अनन्ये तुह्मी त्यांसी ॥ध्रु.॥
मज ऐसा कोण सांगा वांयां गेला । तो तुह्मी तारिला पांडुरंगा ॥२॥
तुका ह्मणे नांवासारिखी करणी । न देखें हें मनीं समजावें ॥३॥
कवणांशीं भांडों कोण माझें साहे । कोण मज आहे तुजविण ॥१॥
धरिलें उदास दुरदुरांतरें । सांडी एकसरें केली माझी ॥ध्रु.॥
आइकोन माझे नाइकसी बोल । देखोनियां खोळ बुंथी घेसी ॥२॥
तुका ह्मणे एके गांवींची वसती । ह्मणऊनि खंती वाटे देवा ॥३॥
आळवितां कंठ शोकला भीतर । आयुष्य वेचे धीर नाहीं मना ॥१॥
अझून कां नये हें तुझ्या अंतरा । दिनाच्या माहेरा पांडुरंगा ॥ध्रु.॥
धन दिसे डोळा दगडाचे परी । भोग ते शरीरीं विष जालें ॥२॥
चुकलों काय तें मज क्षमा करीं । आिंळगूनि हरी प्रेम द्यावें ॥३॥
अवस्था राहिली रूपाची अंतरीं । बाहेर भीतरी सर्व काळ ॥४॥
तुका ह्मणे माजे सकळ उपाय । पांडुरंगा पाय तुझे आतां ॥५॥
शिवाजी राजे यांनीं स्वामींस अबदागिरी, घोडा, कारकून असे न्यावयास पाठविले ते अभंग ॥ 14
दिवट्या छत्री घोडे । हें तों बयांत न पडे ॥१॥
आतां येथें पंढरिराया । मज गोविसी कासया ॥ध्रु.॥
मान दंभ चेष्टा। हे तों शूकराची विष्ठा ॥२॥
तुका ह्मणे देवा । माझे सोडववणे धांवा ॥३॥
नावडे जें चित्ता । तें चि होसी पुरविता ॥१॥
कां रे पुरविली पाठी । माझी केली जीवेसाटीं ॥ध्रु.॥
न करावा संग । वाटे दुरावावें जग ॥२॥
सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात ॥३॥
जन धन तन । वाटे लेखावें वमन ॥४॥
तुका ह्मणे सत्ता । हातीं तुझ्या पंढरिनाथा ॥५॥
जाणोनि अंतर । टाळिसील करकर ॥१॥
तुज लागली हे खोडी । पांडुरंगा बहु कुडी ॥ध्रु.॥
उठविसी दारीं । धरणें एखादिया परी ॥२॥
तुका ह्मणे पाये । कैसे सोडीन ते पाहें ॥३॥
नाहीं विचारीत । मेघ हागनदारी सेत ॥१॥
नये पाहों त्याचा अंत । ठेवीं कारणापें चित्त ॥ध्रु.॥
वर्जीत गंगा । नाहीं उत्तम अधम जगा ॥२॥
तुका ह्मणे मळ । नाहीं अग्नीसी विटाळ ॥३॥
काय दिला ठेवा । आह्मां विठ्ठल चि व्हावा ॥१॥
तुह्मी कळलेती उदार । साटीं परिसाची गार ॥ध्रु.॥
जीव दिला तरी। वचना माझ्या नये सरी ॥२॥
तुका ह्मणे धन । आह्मां गोमासासमान ॥३॥
पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥१॥
पुढें उरे खातां देतां । नव्हे खंडण मवितां ॥ध्रु.॥
खोलीं पडे ओली बीज। तरीं च हातीं लागे निज ॥२॥
तुका ह्मणे धनी । विठ्ठल अक्षरी हीं तिन्ही ॥३॥
मुंगी आणि राव । आह्मां सारखाची जीव ॥१॥
गेला मोह आणि आशा । किळकाळाचा हा फांसा ॥ध्रु.॥
सोनें आणि माती। आह्मां समान हें चित्तीं ॥२॥
तुका ह्मणे आलें । घरा वैकुंठ सगळें ॥३॥
तिहीं त्रिभुवनीं । आह्मी वैभवाचे धनी ॥१॥
हातां आले घाव डाव । आमचा मायबाप देव ॥ध्रु.॥
काय त्रिभुवनीं बळ। अंगीं आमुच्या सकळ ॥२॥
तुका ह्मणे सत्ता । अवघी आमुची च आतां ॥३॥
आह्मी तेणें सुखी । ह्मणा विठ्ठल विठ्ठल मुखीं ॥१॥
तुमचें येर वित्त धन । तें मज मृत्तिकेसमान ॥ध्रु.॥
कंटीं मिरवा तुळसी । व्रत करा एकादशी ॥२॥
ह्मणवा हरिचे दास । तुका ह्मणे मज हे आस ॥३॥
नाही काष्ठाचा गुमान । गोवी भ्रमरा सुमन ॥१॥
प्रेम प्रीतीचेे बांधलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ध्रु.॥
पदरीं घालीं पिळा। बाप निर्बळ साटी बाळा ॥२॥
तुका ह्मणे भावें । भेणें देवा आकारावें ॥३॥
भावापुढें बळ । नाहीं कोणाचे सबळ ॥१॥
करी देवावरी सत्ता । कोण त्याहूनि परता ॥ध्रु.॥
बैसे तेथें येती । न पाचारितां सर्व शक्ति ॥२॥
तुका ह्मणे राहे । तयाकडे कोण पाहे ॥३॥
भावाचिया बळें । आह्मी निर्भर दुर्बळें ॥१॥
नाहीं आणिकांची सत्ता । सदा समाधान चित्ता ॥ध्रु.॥
तर्का नाहीं ठाव । येथें रिघावया वाव ॥२॥
एकछत्रीं राज । तुक्या पांडुरंगीं काज ॥३॥
सत्तावर्त्ते मन । पाळी विठ्ठलाची आन ॥१॥
आज्ञा वाहोनियां शिरीं । सांगितलें तें चि करीं ॥ध्रु.॥
सरलीसे धांव । न लगे वाढवावी हांव ॥२॥
आहे नाहीं त्याचें । तुका ह्मणे कळे साचें ॥३॥
खावें ल्यावें द्यावें । जमाखर्च तुझ्या नांवें ॥१॥
आतां चुकली खटपट । झाड्या पाड्याचा बोभाट ॥ध्रु.॥
आहे नाहीं त्याचें । आह्मां काम सांगायाचें ॥२॥
तुका ह्मणे चिंता । भार वाहे तुझ्या माथां ॥३॥
आतां बरें जालें । माझे माथांचें निघालें ॥१॥
चुकली हे मरमर । भार माथांचे डोंगर ॥ध्रु.॥
नसतां कांहीं जोडी । करिती बहुतें तडातोडी ॥२॥
जाला झाडापाडा । तुका ह्मणे गेली पीडा ॥३॥
संचितें चि खावें । पुढें कोणाचें न घ्यावें ॥१॥
आतां पुरे हे चाकरी । राहों बैसोनियां घरीं ॥ध्रु.॥
नाहीं काम हातीं। आराणूक दिसराती ॥२॥
तुका ह्मणे सत्ता । पुरे पराधीन आतां ॥३॥
ज्याचे गांवीं केला वास । त्यासी नसावें उदास ॥१॥
तरी च जोडिलें तें भोगे । कांहीं आघात न लगे ॥ध्रु.॥
वाढवावी थोरी। मुखें ह्मणे तुझे हरी ॥२॥
तुका ह्मणे हे गोमटी । दासा न घलावी तुटी ॥३॥
माझा तुह्मी देवा केला अंगीकार । हें मज साचार कैसें कळे ॥१॥
कां हो कांहीं माझ्या नये अनुभवा । विचारितां देवा आहें तैसा ॥ध्रु.॥
लौकिकाचा मज लाविसी आभार । शिरोरत्नभार दुःखाचा हा ॥२॥
तुका ह्मणे नाहीं पालट अंतरीं । तेथें दिसे हरी ठकाठकी ॥३॥
तोंडें बोलावें तें तरी वाटे खरें । जीव येरेयेरें वंचिजे ना ॥१॥
हें तुह्मां सांगणें काय उगवूनि । जावें समजोनि पांडुरंगा ॥ध्रु.॥
जेवित्याची खूण वाढित्या अंतरीं । प्रीतीनें हे धरी चाली तेथें ॥२॥
तुका ह्मणे बहु परीचे आदर । अत्यंत वेव्हारसंपादणी ॥३॥
न पालटे एक । भोळा भक्त चि भाविक ॥१॥
येरां नास आहे पुढें । पुण्य सरतां उघडें ॥ध्रु.॥
नेणे गर्भवास । एक विष्णूचा चि दास ॥२॥
तुका ह्मणे खरें । नाम विठोबाचे बरें ॥३॥
स्वामींनीं पत्र पंढरीनाथास पंढरीस पाठविलें ते अभंग ॥ 66 संतांबरोबर पाठविल्या पत्राचे अभंग 36
कोणा मुखें ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरिनाथ बोलावितो ॥१॥
मग मी न धरीं आस मागील बोभाट । वेगीं धरिन वाट माहेराची ॥ध्रु.॥
निरांजिरें चित्त करितें तळमळ । केधवां देखती मूळ आलें डोळे ॥२॥
तुका ह्मणे कइप भाग्याची उजरी। होईल पंढरी देखावया ॥३॥
कां माझा विसर पडिला मायबाप । सांडियेली कृपा कोण्या गुणें ॥१॥
कैसा कंठूनियां राहों संवसार । काय एक धीर देऊं मना ॥ध्रु.॥
नाहीं निरोपाची पावली वारता । करावी ते चिंता ऐसी कांहीं ॥२॥
तुका ह्मणे एक वेचूनि वचन । नाहीं समाधान केलें माझें ॥३॥
कांहीं माझे कळों आले गुणदोष । ह्मणऊनि उदास धरिलें ऐसें ॥१॥
नाहीं तरी येथें न घडे अनुचित । नाहीं ऐसी रीत तया घरीं ॥ध्रु.॥
कळावें तें मना आपुलिया सवें । ठायींचे हें घ्यावें विचारूनि ॥२॥
मज अव्हेरिलें देवें । माझिया कर्तव्यें बुद्धीचिया ॥३॥
नव्हे धीर कांहीं पाठवूं निरोप । आला तरीं कोप येऊ सुखें ॥१॥
कोपोनियां तरी देईल उत्तर । जैसें तैसें पर फिरावूनि ॥ध्रु.॥
नाहीं तया तरी काय एक पोर । मज तों माहेर आणीक नाहीं ॥२॥
तुका ह्मणे असे तयामध्यें हित । आपण निवांत असों नये ॥३॥
आतां पाहों पंथ माहेराची वाट । कामाचा बोभाट पडो सुखें ॥१॥
काय करूं आतां न गमेसें जालें । बहुत सोसिलें बहु दिस ॥ध्रु.॥
घर लागे पाठी चित्ता उभे वारे । आपुलें तें झुरे पाहावया ॥२॥
तुका ह्मणे जीव गेला तरी जाव । धरिला तो देव भाव सिद्धी ॥३॥
विनवीजे ऐसें भाग्य नाहीं देवा । पायांशीं केशवा सलगी केली ॥१॥
धीटपणें पत्र लिहिलें आवडी । पार नेणे थोडी मति माझी ॥ध्रु.॥
जेथें देवा तुझा न कळे चि पार । तेथें मी पामर काय वाणूं ॥२॥
जैसे तैसे माझे बोल अंगीकारीं । बोबड्या उत्तरीं गौरवितों ॥३॥
तुका ह्मणे विटेवरि जी पाउलें । तेथें म्यां ठेविलें मस्तक हें ॥४॥
देवांच्या ही देवा गोपिकांच्या पती । उदार हे ख्याती त्रिभुवनीं ॥१॥
पातकांच्या रासी नासितोसी नामें । जळतील कर्में महा दोष ॥ध्रु.॥
सर्व सुखें तुझ्या वोळगती पायीं । रिद्धि सिद्धि ठायीं मुक्तिचारी ॥२॥
इंद्रासी दुर्लभ पाविजे तें पद । गीत गातां छंद वातां टाळी ॥३॥
तुका ह्मणे जड जीव शक्तिहीन । त्यांचें तूं जीवन पांडुरंगा ॥४॥
काय जालें नेणों माझिया कपाळा । न देखीजे डोळां मूळ येतां ॥१॥
बहु दिस पाहें वचनासी वास । धरिलें उदास पांडुरंगा ॥ध्रु.॥
नाहीं निरोपाचें पावलें उत्तर । ऐसें तों निष्ठ न पाहिजे ॥२॥
पडिला विसर किंवा कांहीं धंदा । त्याहूनि गोविंदा जरूरसा ॥३॥
तुका ह्मणे आलें वेचाचें सांकडें । देणें घेणें पुढें तो ही धाक ॥४॥
एवढा संकोच तरि कां व्यालासी । आह्मी कोणांपाशीं तोंड वासूं ॥१॥
कोण मज पुसे सिणलें भागलें । जरी मोकलिलें तुह्मीं देवा ॥ध्रु.॥
कवणाची वाट पाहों कोणीकडे । कोण मज ओढे जीवलग ॥२॥
कोण जाणे माझे जीवींचें सांकडें । उगवील कोडें संकटाचें ॥३॥
तुका ह्मणे तुह्मी देखिली नििंश्चती । काय माझे चित्तीं पांडुरंगा ॥४॥
देइप डोळे भेटी न धरीं संकोच । न घलीं कांहीं वेच तुजवरी ॥१॥
तुज बुडवावें ऐसा कोण धर्म । अहर्निशीं नाम घेतां थोडें ॥ध्रु.॥
फार थोडें काहीं करूनि पातळ । त्याजमध्यें काळ कडे लावूं ॥२॥
आहे माझी ते चि सारीन सिदोरी । भार तुजवरी नेदीं माझा ॥३॥
तुका ह्मणे आह्मां लेंकराची जाती । भेटावया खंती वाटतसे ॥४॥
सीण भाग हरे तेथींच्या निरोपें । देखिलिया रूप उरी नुरे ॥१॥
इंिद्रयांची धांव होईल कुंटित । पावेल हें चित्त समाधान ॥ध्रु.॥
माहेर आहेसें लौकिकीं कळावें । निढळ बरवें शोभा नेदी ॥२॥
आस नाहीं परी उरी बरी वाटे । आपलें तें भेटे आपणासी ॥३॥
तुका ह्मणे माझी अविट आवडी । खंडण तांतडी होऊं नेदीं ॥४॥
धरितों वासना परी नये फळ । प्राप्तीचा तो काळ नाहीं आला ॥१॥
तळमळी चित्त घातलें खापरीं । फुटतसे परी लाहीचिया ॥ध्रु.॥
प्रकार ते कांहीं नावडती जीवा । नाहीं पुढें ठावा काळ हातीं ॥२॥
जातों तळा येतों मागुता लौकरी । वोळशाचे फेरी सांपडलों ॥३॥
तुका ह्मणे बहु करितों विचार । उतरें डोंगर एक चढें ॥४॥
कां माझे पंढरी न देखती डोळे । काय हें न कळे पाप यांचें ॥१॥
पाय पंथें कां हे न चलती वाट । कोण हें अदृष्ट कर्म बळी ॥ध्रु.॥
कां हें पायांवरी न पडे मस्तक । क्षेम कां हस्तक न पवती ॥२॥
कां या इंिद्रयांची न पुरे वासना । पवित्र होईना जिव्हा कीर्ती ॥३॥
तुका ह्मणे कइप जाऊनि मोटळें । पडेन हा लोळें महाद्वारीं ॥४॥
काय पोरें जालीं फार । किंवा न साहे करकर ॥१॥
ह्मणऊनि केली सांडी । घांस घेऊं न ल्हां तोंडीं ॥ध्रु.॥
करूं कलागती। तुज भांडणें भोंवतीं ॥२॥
तुका ह्मणे टांचें । घरीं जालेंसे वरोचें ॥३॥
कांहीं चिंतेविण । नाहीं उपजत सीण ॥१॥
तरी हा पडिला विसर । माझा तुह्मां जाला भार ॥ध्रु.॥
आली कांहीं तुटी । गेली सुटोनियां गांठी ॥२॥
तुका ह्मणे घरीं । बहु बैसले रिणकरी ॥३॥
निरोपासी वेचे । काय बोलतां फुकाचें ॥१॥
परी हें नेघेवे चि यश । भेओं नको सुखी आस ॥ध्रु.॥
सुख समाधानें । कोण पाहे देणें घेणें ॥२॥
न लगे निरोपासी मोल । तुका ह्मणे वेचे बोल ॥३॥
जोडीच्या हव्यासें । लागे धनांचें चि पिसें ॥१॥
मग आणीक दुसरें । लोभ्या नावडती पोरें ॥ध्रु.॥
पाहे रुक्याकडे । मग अवघें ओस पडे ॥२॥
तुका ह्मणे देवा । तुला बहुत चि हेवा ॥३॥
मविलें मविती । नेणों रासी पडिल्या किती ॥१॥
परि तूं धाला चि न धासी । आलें उभाउभीं घेसी ॥ध्रु.॥
अवघ्यां अवघा काळ । वाटा पाहाती सकळ ॥२॥
तुका ह्मणे नाहीं । अराणूक तुज कांहीं ॥३॥
न बैससी खालीं । सम उभा च पाउलीं ॥१॥
ऐसे जाले बहुत दिस । जालीं युगें अठ्ठाविस ॥ध्रु.॥
नाहीं भाग सीण । अराणूक एक क्षण ॥२॥
तुका ह्मणे किती । मापें केलीं देती घेती ॥३॥
जोडी कोणांसाटीं । एवढी करितोसी आटी ॥१॥
जरी हें आह्मां नाहीं सुख । रडों पोरें पोटीं भूक ॥ध्रु.॥
करूनि जतन। कोणा देसील हें धन ॥२॥
आमचे तळमळे । तुझें होईल वाटोळें ॥३॥
घेसील हा श्राप । माझा होऊनियां बाप ॥४॥
तुका ह्मणे उरी । आतां न ठेवीं यावरी ॥५॥
करूनि चाहाडी । अवघी बुडवीन जोडी ॥१॥
जरि तूं होऊनि उदास । माझी बुडविसी आस ॥ध्रु.॥
येथें न करी काम। मुखें नेघें तुझें नाम ॥२॥
तुका ह्मणे कुळ । तुझें बुडवीन समूळ ॥३॥
समर्थाचे पोटीं । आह्मी जन्मलों करंटीं ॥१॥
ऐसी जाली जगीं कीर्ति । तुझ्या नामाची फजिती ॥ध्रु.॥
येथें नाहीं खाया। न ये कोणी मूळ न्याया ॥२॥
तुका ह्मणे जिणें । आतां खोटें जीवपणें ॥३॥
पुढें तरी चित्ता । काय येईल तें आतां ॥१॥
मज सांगोनिया धाडीं । वाट पाहातों वराडी ॥ध्रु.॥
कंठीं धरिला प्राण । पायांपाशीं आलें मन ॥२॥
तुका ह्मणे चिंता । बहु वाटतसे आतां ॥३॥
कैंचा मज धीर । कोठें बुद्धि माझी िस्थर ॥१॥
जें या मनासी आवरूं । आंत पोटीं वाव धरूं ॥ध्रु.॥
कैंची शुद्ध मति। भांडवल ऐसें हातीं ॥२॥
तुका ह्मणे कोण दशा आली सांगा ॥३॥
समर्पक वाणी । नाहीं ऐकिजेसी कानीं ॥१॥
आतां भावें करूनि साचा । पायां पडिलों विठोबाच्या ॥ध्रु.॥
न कळे उचित। करूं समाधान चित्त ॥२॥
तुका ह्मणे विनंती । विनविली धरा चित्तीं ॥३॥
येती वारकरी । वाट पाहातों तोंवरी ॥१॥
घालूनियां दंडवत । पुसेन निरोपाची मात ॥ध्रु.॥
पत्र हातीं दिलें । जया जेथें पाठविलें ॥२॥
तुका ह्मणे येती । जाइन सामोरा पुढती ॥३॥
रुळें महाद्वारीं । पायांखालील पायरी ॥१॥
तैसें माझें दंडवत । सांगा निरोप हा संत ॥ध्रु.॥
पडे दंडकाठी । देह भलतीसवा लोटी ॥२॥
तुका ह्मणे बाळ । लोळे न धरितां सांभाळ ॥३॥
तुह्मी संतजनीं । माझी करावी विनवणी ॥१॥
काय तुक्याचा अन्याय । त्यासी अंतरले पाय ॥ध्रु.॥
भाका बहुतां रीती। माझी कीव काकुलती ॥२॥
न देखे पंढरी । तुका चरण विटेवरी ॥३॥
होइल कृपादान । तरी मी येईन धांवोन ॥१॥
होती संतांचिया भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥ध्रु.॥
रिघेन मातेपुढें । स्तनपान करीन कोडें ॥२॥
तुका ह्मणे ताप । हरती देखोनियां बाप ॥३॥
परिसोनि उत्तर । जाब देईजे सत्वर ॥१॥
जरी तूं होसी कृपावंत । तरि हा बोलावीं पतित ॥ध्रु.॥
नाणीं कांहीं मना । करूनि पापाचा उगाणा ॥२॥
तुका ह्मणे नाहीं । काय शक्ति तुझे पायीं ॥३॥
ऐकोनियां कीर्ती । ऐसी वाटती विश्रांती ॥१॥
माते सुख डोळां पडे । तेथें कोण लाभ जोडे ॥ध्रु.॥
बोलतां ये वाचे । वीट नये जिव्हा नाचे ॥२॥
तुका ह्मणे धांवे । वासना ते रस घ्यावे ॥३॥
किती करूं शोक । पुढें वाढे दुःखें दुःख ॥१॥
आतां जाणसी तें करीं । माझें कोण मनीं धरी ॥ध्रु.॥
पुण्य होतें गांठी । तरि कां लागती हे आटी ॥२॥
तुका ह्मणे बळ । माझी राहिली तळमळ ॥३॥
करील आबाळी । माझ्या दांताची कसाळी ॥१॥
जासी एखादा मरोन । पाठी लागेल हें जन ॥ध्रु.॥
घरीं लागे कळहे। नाहीं जात तो शीतळ ॥२॥
तुका ह्मणे पोरवडे । मज येतील रोकडे ॥३॥
आतां आशीर्वाद । माझा असो सुखें नांद ॥१॥
ह्मणसी कोणा तरी काळें । आहेतसी माझीं बाळें ॥ध्रु.॥
दुरी दूरांतर। तरी घेसी समाचार ॥२॥
नेसी कधीं तरी । तुका ह्मणे लाज हरी ॥३॥
आतां हे सेवटीं । माझी आइकावी गोष्टी ॥१॥
आतां द्यावा वचनाचा । जाब कळे तैसा याचा ॥ध्रु.॥
आतां करकर। पुढें न करीं उत्तर ॥२॥
तुका ह्मणे ठसा । तुझा आहे राखें तैसा ॥३॥
बोलिलों ते आतां । कांहीं जाणतां नेणतां ॥१॥
क्षमा करावे अन्याय । पांडुरंगे माझे माय ॥ध्रु.॥
स्तुती निंदा केली। लागे पाहिजे साहिली ॥२॥
तुका ह्मणे लाड । दिला तैसें पुरवा कोड ॥३॥
या पत्राच्या उत्तराच्या मार्गप्रतीक्षेचे अभंग 19
माहेरिंचा काय येईल निरोप । ह्मणऊनि झोंप नाहीं डोळां ॥१॥
वाट पाहें आस धरूनियां जीवीं । निडळा हे ठेवीं वरी बाहे ॥ध्रु.॥
बोटवरी माप लेखितों दिवस । होतों कासावीस धीर नाहीं ॥२॥
काय नेणों संतां पडेल विसर । कीं नव्हे सादर मायबाप ॥३॥
तुका ह्मणे तेथें होईल दाटणी । कोण माझें आणी मना तेथें ॥४॥
परि तो आहे कृपेचा सागर । तोंवरी अंतर पडों नेदी ॥१॥
बहुकानदृष्टी आइके देखणा । पुरोनियां जना उरलासे ॥ध्रु.॥
सांगितल्याविणें जाणे अंतरिंचें । पुरवावें ज्याचें तैसें कोड ॥२॥
बहुमुखें कीर्ती आइकिली कानीं । विश्वास ही मनीं आहे माझा ॥३॥
तुका ह्मणे नाहीं जात वांयांविण । पाळितो वचन बोलिलों तें ॥४॥
यावरि न कळे संचित आपुलें । कैसें वोडवलें होइल पुढें ॥१॥
करील विक्षेप धाडितां मुळासी । किंवा धाडा ऐसी तांतडी हे ॥ध्रु.॥
जोंवरी हे डोळां देखें वारकरी । तों हें भरोवरी करी चित्त ॥२॥
आस वाढविते बुद्धीचे तरंग । मनाचे ही वेग वावडती ॥३॥
तुका ह्मणे तेव्हां होतील निश्चळ । इंिद्रयें सकळ निरोपानें ॥४॥
होईल निरोप घेतला यावरी । राउळाभीतरीं जाऊनियां ॥१॥
करूनियां दधिमंगळभोजन । प्रयाण शकुनसुमुहूर्तें ॥ध्रु.॥
होतील दाटले सद्गदित कंठीं । भरतें या पोटीं वियोगाचें ॥२॥
येरयेरां भेटी क्षेम आलिंगनें । केलीं समाधान होतीं संतीं ॥३॥
तुका ह्मणे चाली न साहे मनास । पाहाती कळस परपरतों ॥४॥
ऐसी ते सांडिली होईल पंढरी । येते वारकरी होत वाटे ॥१॥
देखिले सोहळे होती आठवत । चालती ते मात करूनियां ॥ध्रु.॥
केली आइकिली होईल जे कथा । राहिलें तें चित्ता होइल प्रेम ॥२॥
गरुडटके टाळ मृदांग पताका । सांगती ते एकां एक सुख ॥३॥
तुका ह्मणे आतां येती लवलाहीं । आलिंगूनि बाहीं देइन क्षेम ॥४॥
क्षेम मायबाप पुसेन हें आधीं । न घलीं हें मधीं सुख दुःख ॥१॥
न करीं तांतडी आपणांपासूनि । आइकेन कानीं सांगतीं तें ॥ध्रु.॥
अंतरींचें संत जाणतील गूज । निरोप तो मज सांगतील ॥२॥
पायांवरी डोई ठेवीन आदरें । प्रीतिपडिभरें आिंळगून ॥३॥
तुका ह्मणे काया करीन कुरवंडी । ओवाळून सांडीं त्यांवरून ॥४॥
होइल माझी संतीं भाकिली करुणा । जे त्या नारायणा मनीं बैसे ॥१॥
शृंगारूनि माझीं बोबडीं उत्तरें । होतील विस्तारें सांगितलीं ॥ध्रु.॥
क्षेम आहे ऐसें होइल सांगितलें । पाहिजे धाडिलें शीघ्र मूळ ॥२॥
अवस्था जे माझी ठावी आहे संतां । होइल कृपावंता निरोपिली ॥३॥
तुका ह्मणे सवें येईल मुहाळी । किंवा कांहीं उरी राखतील ॥४॥
दोहींमध्यें एक घडेल विश्वासें । भातुकें सरिसें मूळ तरी ॥१॥
करिती निरास निःशेष न घडे । कांहीं तरी ओढे चित्त माये ॥ध्रु.॥
लौकिकाची तरी धरितील लाज । काय माझ्या काज आचरणें ॥२॥
अथवा कोणाचें घेणें लागे रीण । नाहीं तरी हीनकर्मी कांहीं ॥३॥
व्यालीचिये अंगीं असती वेधना । तुका ह्मणे मना मन साक्ष ॥४॥
बैसतां कोणापें नाहीं समाधान । विवरे हें मन ते चि सोई ॥१॥
घडी घडी मज आठवे माहेर । न पडे विसर क्षणभरी ॥ध्रु.॥
नो बोलावें ऐसा करितों विचार । प्रसंगीं तों फार आठवतें ॥२॥
इंिद्रयांसी वाहो पडिली ते चाली । होती विसांवली ये चि ठायीं ॥३॥
एकसरें सोस माहेरासी जावें । तुका ह्मणे जीवें घेतलासे ॥४॥
नाहीं हानि परी न राहावे निसुर । न पडे विसर काय करूं ॥१॥
पुसाविसी वाटे मात कापडियां । पाठविती न्याया मूळ मज ॥ध्रु.॥
आणीक या मना नावडे सोहळा । करितें टकळा माहेरींचा ॥२॥
बहु कामें केलें बहु कासावीस । बहु जाले दिस भेटी नाहीं ॥३॥
तुका ह्मणे त्याचें न कळे अंतर । अवस्था तों फार होते मज ॥४॥
तोंवरी म्यां त्यास कैसें निषेधावें । जों नाहीं बरवें कळों आलें ॥१॥
कोणाचिया मुखें तट नाहीं मागें । वचन वाउगें बोलों नये ॥ध्रु.॥
दिसे हानि परी निरास न घडे । हे तंव रोकडे अनुभव ॥२॥
आपुलिया भोगें होईल उशीर । तोंवरी कां धीर केला नाहीं ॥३॥
तुका ह्मणे गोड करील सेवट । पाहिली ते वाट ठायीं आहे ॥४॥
माहेरींचें आलें तें मज माहेर । सुखाचें उत्तर करिन त्यासी ॥१॥
पायांवरी माथा आिंळगीन बाहीं । घेईन लवलाहीं पायवणी ॥ध्रु.॥
सुख समाचार पुसेन सकळ । कैसा पर्वकाळ आहे त्यास ॥२॥
आपुले जीवींचें सुखदुःख भावें । सांगेन अघवें आहे तैसें ॥३॥
तुका ह्मणे वीट नेघें आवडीचा । बोलिली च वाचा बोलवीन ॥४॥
वियोग न घडे सन्निध वसलें । अखंड राहिलें होय चित्तीं ॥१॥
विसरु न पडे विकल्प न घडे । आलें तें आवडे तया पंथें ॥ध्रु.॥
कामाचा विसर नाठवे शरीर । रसना मधुर नेणे फिकें ॥२॥
निरोपासी काज असो अनामिक । निवडितां एक नये मज ॥३॥
तुका ह्मणे हित चित्तें ओढियेलें । जेथें तें उगलें जावें येणें ॥४॥
आतां माझे सखे येती वारकरी । जीवा आस थोरी लागली ते ॥१॥
सांगतील माझ्या निरोपाची मात । सकळ वृत्तांत माहेरींचा ॥ध्रु.॥
काय लाभ जाला काय होतें केणें । काय काय कोणे सांटविलें ॥२॥
मागणें तें काय धाडिलें भातुकें । पुसेन तें सुखें आहेतसीं ॥३॥
तुका ह्मणे काय सांगती ते कानीं । ऐकोनियां मनीं धरुनि राहें ॥४॥
काय करावें म्यां केले ते विचार । घडेल साचार काय पाहों ॥१॥
काय मन नाहीं धरीत आवडी । प्रारब्धीं जोडी ते चि खरी ॥ध्रु.॥
काय म्यां तेथींचें रांधिलें चाखोनि । तें हें करीं मनीं विवंचना ॥२॥
आणीक ही त्यासी बहुत कारण । बहु असे जिणें ओढीचें ही ॥३॥
तुका ह्मणे आह्मां बोळविल्यावरी । परती माघारी केली नाहीं ॥४॥
आह्मां अराणूक संवसारा हातीं । पडिली नव्हती आजिवरी ॥१॥
पुत्रदाराधन होता मनी धंदा । गोवियेलों सदा होतों कामें ॥ध्रु.॥
वोडवलें ऐसें दिसतें कपाळ । राहिलें सकळ आवरोनि ॥२॥
मागें पुढें कांहीं न दिसे पाहातां । तेथूनियां चिंता उपजली ॥३॥
तुका ह्मणे वाट पाह्याचें कारण । येथीचिया हिंणें जालें भाग्य ॥४॥
बहु दिस नाहीं माहेरिंची भेटी । जाली होती तुटी व्यवसायें ॥१॥
आपुल्याला होतों गुंतलों व्यासंगें । नाहीं त्या प्रसंगें आठवलें ॥ध्रु.॥
तुटातें तुटतें जडती जडलें । आहे तें आपुलें आपणापें ॥२॥
बहु निरोपाचें पावलें उत्तर । जवळी च पर एक तें ही ॥३॥
काय जाणों मोह होईल सांडिला । बहु दिस तुटला तुका ह्मणे ॥४॥
होतीं नेणों जालीं कठिणें कठीण । जवळी च मन मनें ग्वाही ॥१॥
आह्मी होतों सोई सांडिला मारग । घडिलें तें मग तिकून ही ॥ध्रु.॥
नििंश्चतीनें होते पुढिलांची सांडी । न चाले ते कोंडी मायबापा ॥२॥
आह्मां नाहीं त्यांचा घडिला आठव । त्यांचा बहु जीव विखुरला ॥३॥
तुका ह्मणे जालें धर्माचें माहेर । पडिलें अंतर आह्मांकूनि ॥४॥
आतां करावा कां सोंस वांयांविण । लटिका चि सीण मनासी हा ॥१॥
असेल तें कळों येईल लौकरी । आतां वारकरी आल्यापाठी ॥ध्रु.॥
बहु विलंबाचें सन्निध पातलें । धीराचें राहिलें फळ पोटीं ॥२॥
चालिलें तें ठाव पावेल सेवटीं । पुरलिया तुटी पाउलांची ॥३॥
तुका ह्मणे आसे लागलासे जीव । ह्मणऊनि कींव भाकीतसें ॥४॥
व संत परत आले त्यांची भेट झाली ते अभंग 11
भागलेती देवा । माझा नमस्कार घ्यावा ॥१॥
तुह्मी क्षेम कीं सकळ । बाळ अवघे गोपाळ ॥ध्रु.॥
मारगीं चालतां । श्रमलेती येतां जातां ॥२॥
तुका ह्मणे कांहीं । कृपा आहे माझ्या ठायीं ॥३॥
घालूनियां ज्योती । वाट पाहें दिवसराती ॥१॥
बहु उताविळ मन । तुमचें व्हावें दरुषण ॥ध्रु.॥
आलों बोळवीत । तैसें या चि पंथें चित्त ॥२॥
तुका ह्मणे पेणी । येतां जातां दिवस गणीं ॥३॥
आजि दिवस धन्य । तुमचें जालें दरुषण ॥१॥
सांगा माहेरींची मात । अवघा विस्तारीं वृत्तांत ॥ध्रु.॥
आइकतों मन। करूनि सादर श्रवण ॥२॥
तुका ह्मणे नाम । माझा सकळ संभ्रम ॥३॥
बोलिलीं तीं काय । माझा बाप आणि माय ॥१॥
ऐसें सांगा जी झडकरी । तुह्मी सखे वारकरी ॥ध्रु.॥
पत्राचें वचन । काय दिलें फिरावून ॥२॥
तुका ह्मणे कांहीं । मना आणिलें कीं नाहीं ॥३॥
काय पाठविलें । सांगा भातुकें विठ्ठलें ॥१॥
आसे लागलासे जीव । काय केली माझी कींव ॥ध्रु.॥
फेडिलें मुडतर । किंवा कांहीं जरजर ॥२॥
तुका ह्मणे सांगा । कैसें आर्त पांडुरंगा ॥३॥
आजिचिया लाभें ब्रह्मांड ठेंगणें । सुखी जालें मन कल्पवेना ॥१॥
आर्तभूत माझा जीव जयांसाटीं । त्यांच्या जाल्या भेटी पायांसवें ॥ध्रु.॥
वाटुली पाहातां सिणले नयन । बहु होतें मन आर्तभूत ॥२॥
माझ्या निरोपाचें आणिलें उत्तर । होइल समाचार सांगती तो ॥३॥
तुका ह्मणे भेटी निवारला ताप । फळलें संकल्प संत आले ॥४॥
आजि बरवें जालें । माझें माहेर भेटलें ॥१॥
डोळां देखिले सज्जन । निवारला भाग सीण ॥ध्रु.॥
धन्य जालों आतां । क्षेम देऊनियां संतां ॥२॥
इच्छेचें पावलों । तुका ह्मणे धन्य जालों ॥३॥
वोरसोनि येती । वत्सें धेनुवेच्या चित्तीं ॥१॥
माझा कराया सांभाळ । वोरसोनियां कृपाळ ॥ध्रु.॥
स्नेहें भूक तान । विसरती जाले सीण ॥२॥
तुका ह्मणे कौतुकें । दिलें प्रेमाचें भातुकें ॥३॥
आलें तें आधीं खाईन भातुकें । मग कवतुकें गाईन ओव्या ॥१॥
सांगितला आधीं आइकों निरोप । होइल माझा बाप पुसें तों तें ॥२॥
तुका ह्मणे माझे सखे वारकरी । आले हे माहेरीहून आजि ॥३॥
आमुप जोडल्या सुखाचिया रासी । पार त्या भाग्यासी नाहीं आतां ॥१॥
काय सांगों सुख जालें आलिंगन । निवाली दर्शनें कांति माझी ॥२॥
तुका ह्मणे यांच्या उपकारासाटीं । नाहीं माझे गांठी कांहीं एक ॥३॥
पवित्र व्हावया घालीन लोळणी । ठेवीन चरणीं मस्तक हें ॥१॥
जोडोनि हस्तक करीन विनवणी । घेइन पायवणी धोवोनियां ॥२॥
तुका ह्मणे माझें भांडवल सुचें । संतां हें ठायींचें ठावें आहे ॥३॥
पत्राचे अभंग समाप्त । 36 । 19 । 11 ॥ 66
मना एक करीं । ह्मणे जाईन पंढरी । उभा विटेवरी। तो पाहेन सांवळा ॥१॥
करीन सांगती तें काम । जरी जपसी हें नाम । नित्य वाचे राम । हरि कृष्ण गोविंदा ॥ध्रु.॥
लागें संतांचिया पायां । कथे उल्हास गावया । आलों मागावया । शरण देइप उचित ॥२॥
नाचें रंगीं वाहें टाळी । होय सादर ते काळीं । तुका ह्मणे मळी । सांडूनियां अंतरी ॥३॥
न राहे क्षण एक वैकुंठीं । क्षीरसागरीं त्रिपुटी ।
जाय तेथें दाटी । वैष्णवांची धांवोनि ॥१॥
भाविक गे माये भोळें गुणाचें। आवडे तयाचें नाम घेतां तयासी ॥ध्रु.॥
जो नातुडे कवणिये परी । तपें दानें व्रतें थोरी ।
ह्मणतां वाचे हरि । राम कृष्ण गोविंदा ॥२॥
चौदा भुवनें जया पोटीं । तो राहे भक्तांचिये कंठीं ।
करूनियां साटी। चित्त प्रेम दोहींची ॥३॥
जया रूप ना आकार । धरी नाना अवतार ।
घेतलीं हजार । नांवें ठेवूनि आपणां ॥४॥
ऐसा भक्तांचा ॠणी । पाहातां आगमीं पुराणीं ।
नाहीं तुका ह्मणे ध्यानीं । तो कीर्तनीं नाचतसे ॥५॥
स्वल्प वाट चला जाऊं । वाचे गाऊं विठ्ठल ॥१॥
तुह्मी आह्मी खेळीमेळीं । गदा रोळी आनंदें ॥ध्रु.॥
ध्वजा कुंचे गरुडटके । शृंगार निके करोनि ॥२॥
तुका ह्मणे हें चि नीट । जवळी वाट वैकुंठा ॥३॥
आनंदाच्या कोटी । सांटवल्या आह्मां पोटीं ॥१॥
प्रेम चालिला प्रवाहो । नामओघ लवलाहो ॥ध्रु.॥
अखंड खंडेना जीवन । राम कृष्ण नारायण ॥२॥
थडी आहिक्य परत्र । तुका ह्मणे सम तीर ॥३॥
चाहाडाची माता । व्यभिचारीण तत्त्वता ॥१॥
पाहे संतांचें उणें । छिद्र छळावया सुनें ॥ध्रु.॥
जेणों त्याच्या वाचें । कांहीं सोडिलें गाठीचें ॥२॥
तुका ह्मणे घात । व्हावा ऐसी जोडी मात ॥३॥
सापें ज्यासी खावें । तेणें प्राणासी मुकावें ॥१॥
काय लाधला दुर्जन । तोंडावरी थुंकी जन ॥ध्रु.॥
विंचु हाणें नांगी। अग्न लावी आणिकां अंगीं ॥२॥
तुका ह्मणे जाती । नरका पाउलीं चालती ॥३॥
स्वामींनीं स्त्रीस उपदेश केला ते अभंग ॥ 11
पिकल्या सेताचा आह्मां देतो वांटा । चौधरी गोमटा पांडुरंग ॥१॥
सत्तर टके बाकी उरली मागे तो हा । मागें झडले दाहा आजिवरी ॥ध्रु.॥
हांडा भांडीं गुरें दाखवी ऐवज । माजघरीं बाजे बैसलासे ॥२॥
मज यासी भांडतां जाब नेदी बळें । ह्मणे एका वेळे घ्याल वांटा ॥३॥
तुका ह्मणे िस्त्रये काय वो करावें । नेदितां लपावें काय कोठें ॥४॥
करितां विचार अवघें एक राज्य । दुजा कोण मज पाठी घाली ॥१॥
कोण्या रीती जावें आह्मी वो पळोनि । मोकळ अंगणीं मागें पुढें ॥ध्रु.॥
काय तें गव्हाणें हिंडावीं वो किती । दूत ते लागती याच पाठी ॥२॥
कोठें याची करूं केलों कुळवाडी । आतां हा न सोडी जीवें आह्मां ॥३॥
होऊनि बेबाख येथें चि राहावें। देईल तें खावें तुका ह्मणे ॥४॥
नागवूनि एकें नागवीं च केली । फिरोनियां आलीं नाहीं येथें ॥१॥
भेणें सुती कोणी न घेती पालवीं । करूनियां गोवी निसंतान ॥ध्रु.॥
एकें तीं गोविलीं घेऊनि जमान । हांसतील जन लोक तयां ॥२॥
सरले तयांसी घाली वैकुंठीं । न सोडी हे साटी जीवें जाली ॥३॥
तुका ह्मणे जालों जाणोनि नेणती । सांपडलों हातीं याचे आह्मी ॥४॥
आतां तूं तयास होई वो उदास । आरंभला नास माझ्या जीवा ॥१॥
जरूर हें जालें मज कां नावडे । उपास रोकडे येती आतां ॥ध्रु.॥
बरें म्या तुझिया जीवाचें तें काय । व्हावें हें तें पाहें विचारूनि ॥२॥
तुज मज तुटी नव्हे या विचारें । सहित लेकुरें राहों सुखें ॥३॥
तुका ह्मणे तरी तुझा माझा संग । घडेल वियोग कधीं नव्हे ॥४॥
काय करूं आतां माझिया संचिता । तेणें जीववित्ता साटी केली ॥१॥
न ह्मणावें कोणी माझें हें करणें । हुकुम तो येणें देवें केला ॥ध्रु.॥
करूनि मोकळा सोडिलों भिकारी । पुरविली तरी पाठी माझी ॥२॥
पाणिया भोंपळा जेवावया पानें । लाविलीं वो येणें देवें आह्मां ॥३॥
तुका ह्मणे यासी नाहीं वो करुणा । आहे नागवणा ठावा मज ॥४॥
नको धरूं आस व्हावें या बाळांस । निर्माण तें त्यांस त्यांचें आहे ॥१॥
आपुला तूं गळा घेइप उगवूनि । चुकवीं जाचणी गर्भवास ॥ध्रु.॥
अवेज देखोनि बांधितील गळा । ह्मणोनि निराळा पळतुसें ॥२॥
देखोनियां त्यांचा अवघड मार । कांपे थरथर जीव माझा ॥३॥
तुका ह्मणे जरी आहे माझी चाड । तरी करीं वाड चित्त आतां ॥४॥
भले लोक तुज बहु मानवती । वाढेल या कीर्ति जगामाजी ॥१॥
ह्मणे मेलीं गुरें भांडीं नेलीं चोरें । नाहींत लेंकुरें जालीं मज ॥ध्रु.॥
आस निरसूनि कठिण हें मन । करीं वो समान वज्र तैसें ॥२॥
किंचित हें सुख टाकीं वो थुंकोनि । पावसील धनी परमानंद ॥३॥
तुका ह्मणे थोर चुकती सायास । भवबंद पाश तुटोनियां ॥४॥
ऐक हें सुख होईल दोघांसी । सोहळा हे ॠषि करिती देव ॥१॥
जडितविमानें बैसविती मानें । गंधर्वांचें गाणें नामघोष ॥ध्रु.॥
संत महंत सिद्ध येतील सामोरे । सर्वसुखा पुरे कोड तेथें ॥२॥
आलिंगूनि लोळों त्यांच्या पायांवरी । जाऊं तेथवरी मायबापें ॥३॥
तुका ह्मणे तया सुखा वणूप काय । जेव्हां बापमाय देखें डोळां ॥४॥
देव पाहावया करीं वो सायास । न धरीं हे आस नाशिवंत ॥१॥
दिन शुद्ध सोम सकाळीं पातला । द्वादशी घडला पर्वकाळ ॥ध्रु.॥
द्विजां पाचारूनि शुद्ध करीं मन । देइप वो हें दान यथाविध ॥२॥
नको चिंता करूं वस्त्रा या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥३॥
तुका ह्मणे दुरी सांगतों पाल्हाळीं । परी तो जवळी आहे आह्मां ॥४॥
सुख हें नावडे आह्मां कोणा बळें । नेणसी अंधळें जालीशी तूं ॥१॥
भूक तान कैसी राहिली निश्चळ । खुंटलें चपळ मन ठायीं ॥ध्रु.॥
द्रव्य जीवाहूनि आवडे या जना । आह्मांसी पाषाणाहूनि हीन ॥२॥
सोइरे सज्जन जन आणि वन । अवघें समान काय गुणें ॥३॥
तुका ह्मणे आह्मां जवळी च आहे । सुख दुःख साहे पांडुरंग ॥४॥
गुरुकृपे मज बोलविलें देवें । होईल हें घ्यावें हित कांहीं ॥१॥
सत्य देवें माझा केला अंगीकार । आणीक विचार नाहीं आतां ॥ध्रु.॥
होई बळकट घालूनियां कास । हा चि उपदेश तुज आतां ॥२॥
सडा संमार्जन तुळसीवृंदावन । अतीतपूजन ब्राह्मणाचें ॥३॥
वैष्णवांची दासी होइप सर्वभावें । मुखीं नाम घ्यावें विठोबाचें ॥४॥
पूर्णबोध स्त्रीभ्रतारसंवाद । धन्य जिहीं वाद आइकिला ॥५॥
तुका ह्मणे आहे पांडुरंगकथा । तरेल जो चित्ता धरील कोणी ॥६॥
खडा रवाळी साकर । जाला नामाचा चि फेर ।
न दिसे अंतर । गोडी ठायीं निवडितां ॥१॥
तुह्मी आह्मी पांडुरंगा । भिन्न ऐसें काय सांगा ।
जाळविलें जगा । मी हें माझें यासाटीं ॥ध्रु॥
पायीं हातीं नाकीं शिरीं । हेम राहे अळंकारीं ।
मुसे आल्यावरी। काय निवडे वेगळें ॥२॥
निजलिया लाभ हानी । तों च खरी ते स्वप्नीं ।
तुका ह्मणे दोन्ही । निवारलीं जागतां ॥३॥
आह्मी जाणों तुझा भाव । कैंचा भक्त कैंचा देव । बीजा नाहीं ठाव । कैंचें फळ शेवटीं ॥१॥
संपादिलें बहु रूप । कैंचें पुण्य कैंचें पाप । नव्हतों आह्मी आप । आपणासी देखिलें ॥ध्रु.॥
एके ठायीं घरिच्याघरीं । न कळतां जाली चोरी । तेथें तें चि दुरी । जाणें येणें खुंटलें ॥२॥
तुका ह्मणे धरूनि हातीं । उर ठेविली मागुती । एकांतीं लोकांतीं । देवभक्तिसोहळा ॥३॥
कांहीं बोलिलों बोबडें । मायबापा तुह्मांपुढें । सलगी लाडें कोडें । मज क्षमा करावी ॥१॥
काय जाणावा महिमा । तुमचा म्यां पुरुषोत्तमा । आवडीनें सीमा । सांडविली मज हातीं ॥ध्रु.॥
घडे अवज्ञा सख्यत्वें । बाळें बापासी न भ्यावें । काय म्यां सांगावें । आहे ठावें तुह्मासी ॥२॥
तुका ह्मणे देवा । प्रेम लोभ न संडावा । पाळिला पाळावा । लळा पुढती आगळा ॥३॥
बहु भितों जाणपणा । आड न यो नारायणा ।
घेइन प्रेमपान्हा । भक्तिसुख निवाडें ॥१॥
यासी तुळे ऐसे कांहीं । दुजें त्रिभुवनीं नाहीं ।
काला भात दहीं । ब्रह्मादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥
निमिशा अर्ध संतसंगति । वास वैकुंठीं कल्पांतीं ।
मोक्षपदें होती । ते विश्रांति बापुडी ॥२॥
तुका ह्मणे हें चि देइप । मीतूंपणा खंड नाहीं।
बोलिलों त्या नाहीं । अभेदाची आवडी ॥३॥
देवा आतां ऐसा करीं उपकार । देहेचा विसर पाडीं मज ॥१॥
तरीं च हा जीव सुख पावे माझा । बरें केशीराजा कळों आलें ॥ध्रु.॥
ठाव देइप चित्ता राख पायांपाशीं । सकळ वृत्तींसी अखंडित ॥२॥
असे भय आतां लाज काम क्रोध । तोडावा संबंध यांचा माझा ॥३॥
मागणें तें एक हें चि आहे आतां । नाम मुखीं संतसंग देइप ॥४॥
तुका ह्मणे नको वरपंग देवा । घेइप माझी सेवा भावशुद्ध ॥५॥
तुज न करितां काय नव्हे एक । हे तों सकिळक संतवाणी ॥१॥
घेइप माझा भार करीं कइवार । उतरीं हा पार भवसिंधु ॥ध्रु.॥
उचित अनुचित पापपुण्यकाला । हा तों नये मला निवडितां ॥२॥
कुंटित राहिली बोलतां बोलतां । पार न पवतां वाणी पुढें ॥३॥
पुसतां ही कोणां न कळे हें गुज । राखें आतां लाज पांडुरंगा ॥४॥
तुका ह्मणे बहु पाहिलें या जीवें । वर्म जालें जी ठावें नाम तुझें ॥५॥
मज त्याची भीड नुलंघवे देवा । जो ह्मणे केशवा दास तुझा ॥१॥
मज आवडती बहु तैसे जन । करिती कीर्तन कथा तुझी ॥ध्रु.॥
सांडूनियां लाज नाचेन त्यांपुढें । आइकती कोडें नाम तुझें ॥२॥
न लगे उपचार होईन भिकारी । वैष्णवांच्या घरीं उष्टावळी ॥३॥
तुका ह्मणे जाणों उचित अनुचित । विचारूनि हित तें चि करूं ॥४॥
तुझे पाय माझे राहियेले चित्तीं । ते मज दाविती वर्म देवा ॥१॥
आह्मां अंधां तुझ्या पायांचा आधार । जाणसी विचार चाळवितां ॥ध्रु.॥
मन िस्थर ठेलें इंिद्रयें निश्चळ । हें तों माझें बळ नव्हे देवा ॥२॥
पापपुण्य भेद नासिलें तिमिर । त्रिगुण शरीर सांडियेलें ॥३॥
तुका ह्मणे तुझा प्रताप हा खरा । मी जाणें दातारा शरणागत ॥४॥
जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरूनियां ॥१॥
चालों वाटे आह्मी तुझा चि आधार । चालविसी भार सवें माझा ॥ध्रु.॥
बोलों जातां बरळ करिसी तें नीट । नेली लाज धीट केलों देवा ॥२॥
अवघें जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥३॥
तुका ह्मणे आतां खेळतों कौतुकें । जालें तुझें सुख अंतर्बाहीं ॥४॥
जालें पीक आह्मां अवघा सुकाळ । घेऊं अवघा काळ प्रेमसुख ॥१॥
जाली अराणुक अवघियांपासून । अवघा गेला सीण भाग आतां ॥ध्रु.॥
अवघा जाला आह्मां एक पांडुरंग । आतां नाहीं जग माझें तुझें ॥२॥
अवघे चि आह्मी ल्यालों अळंकार । शोभलों हि फार अवघ्यांवरी ॥३॥
तुका ह्मणे आह्मी सदेवांचे दास। करणें न लगे आस आणिकांची ॥४॥
साधनें आमुचीं आज्ञोचीं धारकें । प्रमाण सेवकें स्वामिसत्ता ॥१॥
प्रकाशिलें जग आपुल्या प्रकाशें । रवि कर्मरसें अलिप्त त्या ॥ध्रु.॥
सांगणें तें तें नाहीं करणें आपण । मोलही वचन बाध जालें ॥२॥
तुका ह्मणे आह्मां भांडवल हातीं । येरझारा खाती केवढियें ॥३॥
शुभ जाल्या दिशा अवघा चि काळ । अशुभ मंगळ मंगळाचें ॥१॥
हातींचिया दीपें दुराविली निशी । न देखिजे कैसी आहे ते ही ॥ध्रु.॥
सुख दुःखाहूनि नाहीं विपरीत । देतील आघात हितफळें ॥२॥
तुका ह्मणे आतां आह्मांसी हें भलें । अवघे चि जाले जीव जंत ॥३॥
पाप पुण्य दोन्ही वाहाती मारग । स्वर्गनर्कभोग यांचीं पेणीं ॥१॥
एका आड एक न लगे पुसावें । जेविल्या देखावें मागें भूक ॥ध्रु.॥
राहाटीं पडिलें भरोनियां रितीं । होतील मागुतीं येतीं जातीं ॥२॥
तुका ह्मणे आह्मी खेळतियांमधीं । नाहीं केली बुद्धी िस्थर पाहों ॥३॥
हित तें हें एक राम कंठीं राहे । नाठविती देहभाव देही ॥१॥
हा चि एक धर्म निज बीजवर्म । हें चि जाळी कर्में केलीं महा ॥ध्रु.॥
चित्त राहे पायीं रूप बैसे डोळां । जीवें कळवळा आवडीचा ॥२॥
अखंड न खंडे अभंग न भंगे । तुका ह्मणे गंगे मिळणी सिंधु ॥३॥
माझिये जातीचें मज भेटो कोणी । आवडीची धणी फेडावया ॥१॥
आवडे ज्या हरि अंतरापासूनि । ऐसियाचे मनीं आर्त माझें ॥ध्रु.॥
तयालागीं जीव होतो कासावीस । पाहातील वास नयन हे ॥२॥
सुफळ हा जन्म होईल तेथून । देतां आलिंगन वैष्णवांसी ॥३॥
तुका ह्मणे तो चि सुदिन सोहळा । गाऊं या गोपाळा धणीवरि ॥४॥
आमुचें जीवन हें कथाअमृत । आणिक ही संतसमागम ॥१॥
सारूं एके ठायीं भोजन परवडी । स्वादरसें गोडी पदोपदीं ॥ध्रु.॥
धालिया ढेंकर येती आनंदाचे । वोसंडलें वाचे प्रेमसुख ॥२॥
पिकलें स्वरूप आलिया घुमरि । रासी ते अंबरीं न समाये ॥३॥
मोजितां तयाचा अंत नाहीं पार । खुंटला व्यापार तुका ह्मणे ॥४॥
जोडिलें तें आतां न सरे सारितां । जीव बळी देतां हाता आलें ॥१॥
संचित सारूनि बांधिलें धरणें । तुंबिलें जीवन आक्षय हें ॥ध्रु.॥
शीत उष्ण तेथें सुखदुःख नाहीं । अंतर सबाही एक जालें ॥२॥
बीज तो अंकुर पत्र शाखा फळें । प्राप्तबीज मुळें अवघें नासे ॥३॥
तुका ह्मणे नामीं राहिलीसे गोडी । बीजाच्या परवडी होती जाती ॥४॥
भक्तिभाव आह्मी बांधिलासे गांठी । साधावितों हाटीं घ्या रे कोणी ॥१॥
सुखाचिया पेंठे घातला दुकान । मांडियेले वान रामनाम ॥ध्रु.॥
सुखाचें फुकाचें सकळांचें सार । तरावया पार भवसिंधु ॥२॥
मागें भाग्यवंत जाले थोर थोर । तिहीं केला फार हा चि सांटा ॥३॥
खोटें कुडें तेथें नाहीं घातपात । तुका ह्मणे चित्त शुद्ध करीं ॥४॥
प्रजन्यें पडावें आपुल्या स्वभावें । आपुलाल्या दैवें पिके भूमि ॥१॥
बीज तें चि फळ येईल शेवटीं । लाभहानितुटी ज्याची तया ॥ध्रु.॥
दीपाचिये अंगीं नाहीं दुजाभाव । धणी चोर साव सारिखे चि ॥२॥
काउळें ढोंपरा ककर तित्तिरा । राजहंसा चारा मुक्ताफळें ॥३॥
तुका ह्मणे येथें आवडी कारण । पिकला नारायण जयां तैसा ॥४॥
धीर तो कारण एकविधभाव । पतिव्रते नाहो सर्वभावें ॥१॥
चातक हे जळ न पाहाती दृष्टी । वाट पाहे कंठीं प्राण मेघा ॥ध्रु.॥
सूर्यविकाशनी नेघे चंद्रामृत । वाट पाहे अस्तउदयाची ॥२॥
धेनु येऊं नेदी जवळी आणिकां । आपुल्या बाळकाविण वत्सा ॥३॥
तुका ह्मणे नेम प्राणांसवेंसाटी । तरी च या गोष्टी विठोबाची ॥४॥
रामें स्नानसंध्या केलें क्रियाकर्म । त्याचा भवश्रम निवारला ॥१॥
आणिकें दुरावलीं करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥ध्रु.॥
रामनामीं जिंहीं धरिला विश्वास । तिंहीं भवपाश तोडियेले ॥२॥
तुका ह्मणे केलें किळकाळ ठेंगणें । नामसंकीर्तनें भाविकांनीं ॥३॥
वैष्णवांची कीर्ती गाइली पुराणीं । साही अठरांजणीं चहूं वेदीं ॥१॥
ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक । कर्मठ धार्मिक पुण्यशील ॥ध्रु.॥
आदिनाथ शंकर नारद मुनेश्वर । शुका ऐसा थोर आणिक नाहीं ॥२॥
तुका ह्मणे मुगुटमणी हे भक्ति । आणीक विश्रांति अरतिया ॥३॥
बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जातिकुळ ॥१॥
करा क्षमा कांहीं नका धरूं कोप । संत मायबाप दीनावरि ॥ध्रु.॥
वाचेचा चाळक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥२॥
तुका ह्मणे घडे अपराध नेणतां । द्यावा मज आतां ठाव पायीं ॥३॥
संतांचे घरींचा दास मी कामारी । दारीं परोपरीं लोळतसें ॥१॥
चरणींचे रज लागती अंगांस । तेण बेताळीस उद्धरती ॥ध्रु.॥
उिच्छष्ट हें जमा करुनि पत्रावळी । घालीन कवळी मुखामाजी ॥२॥
तुका ह्मणे मी आणीक विचार । नेणें हे चि सार मानीतसें ॥३॥
एक शेरा अन्ना चाड । येर वाउगी बडबड ॥१॥
कां रे तृष्णा वाढविसी । बांधवूनि मोहपाशीं ॥ध्रु.॥
ओठ हात तुझा जागा। येर सिणसी वाउगा ॥२॥
तुका ह्मणे श्रम । एक विसरतां राम ॥३॥
आलें धरायच पेट । पुढें मागुतें न भेटे ॥१॥
होसी फजीती वरपडा । लक्ष चौयासीचे वेढां ॥ध्रु.॥
नाहीं कोणांचा सांगात । दुःख भोगितां आघात ॥२॥
एका पाउलाची वाट । कोणां सांगावा बोभाट ॥३॥
जुंतिजेसी घाणां । नाहीं मारित्या करुणा ॥४॥
तुका ह्मणे हित पाहें । जोंवरि हें हातीं आहे ॥५॥
लाभ जाला बहुतां दिसीं । लाहो करा पुढें नासी । मनुष्यदेहा ऐसी । उत्तमजोडी जोडिली ॥१॥
घेइप हरिनाम सादरें । भरा सुखाचीं भांडारें । जालिया व्यापारें । लाहो हेवा जोडीचा ॥ध्रु.॥
घेउनि माप हातीं । काळ मोवी दिवस राती । चोर लाग घेती । पुढें तैसें पळावें ॥२॥
हित सावकासें । ह्मणे करीन तें पिसें । हातीं काय ऐसें । तुका ह्मणे नेणसी ॥३॥
सुखाचें ओतलें । दिसे श्रीमुख चांगलें ॥१॥
मनेंधरिला अभिळास । मिठी घातली पायांस ॥ध्रु.॥
होतां दृष्टादृष्टी । तापगेला उठाउठी ॥२॥
तुका ह्मणे जाला । लाभें लाभ दुणावला ॥३॥
झरा लागला सुखाचा । ऐसा मापारी कइंचा ॥१॥
जो हें माप तोंडें धरी । सळे जाली ते आवरी ॥ध्रु.॥
जाले बहु काळ । कोणा नाहीं ऐसें बळ ॥२॥
तुका ह्मणे तळ । नाहीं पाहेसा सकळ ॥३॥
आह्मी बोलों तें तुज कळे । एक दोहीं ठायीं खेळे ॥१॥
काय परिहाराचें काम । जाणें अंतरींचें राम ॥ध्रु.॥
कळोनियां काय चाड । माझी लोकांसी बडबड ॥२॥
कारण सवें एका । अवघें आहे ह्मणे तुका ॥३॥
उमटे तें ठायीं । तुझे निरोपावें पायीं ॥१॥
आह्मीं करावें चिंतन । तुझें नामसंकीर्तन ॥ध्रु.॥
भोजन भोजनाच्या काळीं। मागों करूनियां आळी ॥२॥
तुका ह्मणे माथां । भार तुझ्या पंढरिनाथा ॥३॥
केला पण सांडी । ऐसियासी ह्मणती लंडी ॥१॥
आतां पाहा विचारून । समर्थासी बोले कोण ॥ध्रु.॥
आपला निवाड। आपणें चि करितां गोड ॥२॥
तुह्मीं आह्मीं देवा । बोलिला बोल सिद्धी न्यावा ॥३॥
आसे धुरे उणें । मागें सरे तुका ह्मणे ॥४॥
न व्हावें तें जालें । तुह्मां आह्मांसी लागलें ॥१॥
आतां हालमाकलमें । भांडोनियां काढूं वर्में ॥ध्रु.॥
पाटोऑयासवेंसाटी। दिली रगट्याची गांठी ॥२॥
तुका ह्मणे हरी । आणूनियां करिन सरी ॥३॥
पतितमिरासी । ते म्यां धरिला जीवेंसी ॥१॥
आतां बिळया सांग कोण । ग्वाही तुझें माझें मन ॥ध्रु.॥
पावणांचा ठसा। दावीं मज तुझा कैसा ॥२॥
वाव तुका ह्मणे जालें । रोख पाहिजे दाविलें ॥३॥
करितां वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा ॥१॥
हे तों झोंडाईचे चाळे । काय पोटीं तें न कळे ॥ध्रु.॥
आरगुणी मुग । बैसलासी जैसा बग ॥२॥
तुका ह्मणे किती । बुडविलीं आळवितीं ॥३॥
नाहीं देणें घेणे । गोवी केली अभिमानें ॥१॥
आतां कां हो निवडूं नेदां । पांडुरंगा येवढा धंदा ॥ध्रु.॥
पांचांमधीं जावें । थोड्यासाटीं फजित व्हावें ॥२॥
तुज ऐसी नाहीं । पांडुरंगा आह्मी कांहीं ॥३॥
टाकुं तो वेव्हार । तुज बहू करकर ॥४॥
तुका ह्मणे आतां । निवडूं संतां हें देखतां ॥५॥
सिंचन करितां मूळ । वृक्ष वोल्हावे सकळ ॥१॥
नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरीं ॥ध्रु.॥
पाणचोयाचें दार। वरिल दाटावें तें थोर ॥२॥
वस्व जाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥३॥
एक चिंतामणी । फिटे सर्व सुखधणी ॥४॥
तुका ह्मणे धांवा । आहे पंढरिये विसांवा ॥५॥
करूं याची कथा नामाचा गजर । आह्मां संवसार काय करी ॥१॥
ह्मणवूं हरिचे दास लेऊं तीं भूषणें । कांपे तयाभेणें किळकाळ ॥ध्रु.॥
आशा भय लाज आड नये चिंता । ऐसी तया सत्ता समर्थाची ॥२॥
तुका ह्मणे करूं ऐसियांचा संग । जेणें नव्हे भंग चिंतनाचा ॥३॥
काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचें ॥१॥
अंतरींची बुद्धि खोटी । भरलें पोटीं वाईट ॥ध्रु.॥
काय उंदीर नाहीं धांवीं । राख लावी गाढव ॥२॥
तुका ह्मणे सुसर जळीं । काउळीं कां न न्हाती ॥३॥
मदें मातलें नागवें नाचे । अनुचित वाचे बडबडी ॥१॥
आतां शिकवावा कोणासी विचार । कर्म तें दुस्तर करवी धीट ॥ध्रु.॥
आलें अंगासी तें बिळवंत गाढें । काय वेड्यापुढें धर्मनीत ॥२॥
तुका ह्मणे कळों येईल तो भाव । अंगावरिल घाव उमटतां ॥३॥
सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू ॥१॥
परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथें हे उपाय न सरती ॥ध्रु.॥
अमृतें सागर भरवे ती गंगा । ह्मणवेल उगा राहें काळा ॥२॥
भूत भविष्य कळों येईल वर्तमान । करवती प्रसन्न रिद्धिसिद्धी ॥३॥
स्थान मान कळों येती योगमुद्रा । नेववेल वारा ब्रह्मांडासी ॥४॥
तुका ह्मणे मोक्ष राहे आलीकडे । इतर बापुडें काय तेथें ॥५॥
भाविकां हें वर्म सांपडलें निकें । सेविती कवतुकें धणीवरि ॥१॥
इिच्छतील तैसा नाचे त्यांचे छंदें । वंदिती तीं पदें सकुमारें ॥ध्रु.॥
विसरले मुक्ती भक्तिअभिळासें । ओढत सरिसें सुखा आलें ॥२॥
तुका ह्मणे नाहीं मागायाची आस । पांडुरंग त्यांस विसंबेना ॥३॥
भक्तां समागमें सर्वभावें हरि । सर्व काम करी न संगतां ॥१॥
सांटवला राहे हृदयसंपुष्टीं । बाहेर धाकुटी मूर्ति उभा ॥ध्रु.॥
मागण्याची वास पाहे मुखाकडे । चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥२॥
तुका ह्मणे जीव भाव देवापायीं । ठेवूनि ते कांहीं न मगती ॥३॥
प्रेमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं ॥१॥
सकळ ही तेथें वोळलीं मंगळें । वृष्टि केली जळें आनंदाच्या ॥ध्रु.॥
सकळ इंिद्रयें जालीं ब्रह्मरूप । ओतलें स्वरूप माजी तया ॥२॥
तुका ह्मणे जेथें वसे भक्तराव । तेथें नांदे देव संदेह नाहीं ॥३॥
कासया गुणदोष पाहों आणिकांचे । मज काय त्यांचें उणें असे ॥१॥
काय पापपुण्य पाहों आणिकांचें । मज काय त्यांचें उणें असें ॥ध्रु.॥
नष्टदुष्टपण कवणाचें वाणू । तयाहून आनु अधिक माझें ॥२॥
कुचर खोटा मज कोण असे आगळा । तो मी पाहों डोळां आपुलिये ॥३॥
तुका ह्मणे मी भांडवलें पुरता । तुजसी पंढरिनाथा लावियेलें ॥४॥
काळ जविळ च उभा नेणां । घाली झांपडी खुंटी कानां ॥१॥
कैसा हुशार सावध राहीं । आपुला तूं अपुलेठायीं ॥ध्रु.॥
काळ जविळच उभा पाहीं । नेदी कोणासि देऊं कांहीं ॥२॥
काळें पुरविली पाठी । वरुषें जालीं तरी साठी ॥३॥
काळ भोंवताला भोंवे। राम येऊं नेदी जिव्हे ॥४॥
तुका ह्मणे काळा । कर्म मिळतें तें जाळा ॥५॥
दुष्ट भूषण सज्जनाचें । अलभ्यलाभ पुण्य त्याचें ॥१॥
धन्य ऐसा परउपकारी । जाय नरका आणिकांवारि ॥ध्रु.॥
मळ खाये संवदणी । करी आणिकांची उजळणी ॥२॥
तुका ह्मणे त्याचा । प्रीती आदर करा साचा ॥३॥
साहोनियां टांकीघाये । पाषाण देव चि जाला पाहें ॥१॥
तया रीती दृढ मन । करीं साधाया कारण ॥ध्रु.॥
बाण शस्त्र साहे गोळी । सुरां ठाव उंच स्थळीं ॥२॥
तुका ह्मणे सती । अग्न न देखे ज्या रीती ॥३॥
तेणें वेशें माझीं चोरिलीं अंगें । मानावया जग आत्मैपणे।
नाहीं चाड भीड संसाराचें कोड । उदासीन सर्व गुणें ।
भय मोह लज्जा निरसली शंका । अवघियां एक चि पणें ।
विठ्ठलाच्या पायीं बैसोनि राहिलीं । भागलीं नुटित तेणें ॥१॥
आतां त्यांसीं काय चाले माझें बळ । जालोंसें दुर्बळ सत्त्वहीन ।
दग्ध पट दिसे संगति बरवंट । काय त्याचें कारण ॥ध्रु.॥
आळसें दृष्टी न पाहे आपुलें । एक चि देखिलें सर्वरूप ।
मानामान तेथें खुंटोनि राहिलें । पिसुन तो कोण बाप ।
ज्योति ना अंधार अवघा एकंकार। तेथें काय पुण्यपाप ।
विठ्ठलावांचुनि कांहीं च नावडे । वेगळाल्या भावें रूप ॥२॥
बळबडिवार लौकिक वेव्हार । गेली आशा तृष्णा माया ।
सुखदुःखाची वार्ता नाइके । अंतरलों दुरी तया ।
मीतूंपणनिःकाम होऊनि । राहिलों आपुलिया ठायां ।
तुजविण आतां मज नाहीं कोणी । तुका ह्मणे देवराया ॥३॥
कथा पुराण ऐकतां । झोंप नाथिलि तत्त्वता । खाटेवरि पडतां । व्यापी चिंता तळमळ ॥१॥
ऐसी गहन कर्मगति। काय तयासी रडती । जाले जाणते जो चित्तीं । कांहीं नेघे आपुला ॥ध्रु.॥
उदक लावितां न धरे । चिंता करी केव्हां सरे । जाऊं नका धीरें । ह्मणे करितां ढवाऑया ॥२॥
जवळी गोंचिड क्षीरा । जैसी कमळणी दर्दुरा । तुका ह्मणे दुरा । देशत्यागें तयासी ॥३॥
संदेह बाधक आपआपणयांतें । रज्जुसर्पवत भासतसे।
भेऊनियां काय देखिलें येणें । मारें घायेंविण लोळतसे ॥१॥
आपणें चि तारी आपण चि मारी । आपण उद्धरी आपणयां ।
शुकनिळकेन्यायें गुंतलासी काय । विचारूनि पाहें मोकिळया ॥ध्रु॥
पापपुण्य कैसे भांजिले अख । दशकाचा एक उरविला ।
जाणोनियां काय होतोसी नेणता । शून्या ठाव रिता नाहीं नाहीं ॥२॥
दुरा दृष्टी पाहें न्याहाळूनि । मृगजला पाणी न ह्मणें चाडा ।
धांवतां चि फुटे नव्हे समाधान । तुका ह्मणे जाण पावे पीडा ॥३॥
कथे उभा अंग राखे जो कोणी । ऐसा कोण गणी तया पापा ॥१॥
येथें तो पातकी न येता च भला । रणीं कुचराला काय चाले ॥ध्रु.॥
कथे बैसोनी आणीक चर्चा । धिग त्याची वाचा कुंभपाक ॥२॥
तुका ह्मणे ऐलपैल ते थडीचे । बुडतील साच मध्यभागीं ॥३॥
नावडे ज्या कथा उठोनियां जाती । ते यमा फावती बरे वोजा ॥१॥
तो असे जवळी गोंचिडाच्या न्यायें । देशत्यागें ठायें तया दुरी ॥ध्रु.॥
नव्हे भला कोणी नावडे दुसरा । पाहुणा किंकरा यमा होय ॥२॥
तुका ह्मणे तया करावें तें काई । पाषाण कां नाहीं जळामध्यें ॥३॥
जवळी नाहीं चित्त । काय मांडियेलें प्रेत ॥१॥
कैसा पाहे चिद्रद्राष्टि । दीप स्नेहाच्या शेवटीं ॥ध्रु.॥
कांतेलेंसें श्वान । तैसें दिशा हिंडे मन ॥२॥
त्याचे कानीं हाणे । कोण बोंब तुका ह्मणे ॥३॥
दुर्बळा वाणीच्या एक दोनि सिद्धि । सदैवा समाधि विश्वरूपीं ॥१॥
काय त्याचें वांयां गेलें तें एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥ध्रु.॥
तीर्थ देव दुरी तया भाग्यहीना । विश्व त्या सज्जना दुमदुमिलें ॥२॥
तुका ह्मणे एक वाहाती मोळिया । भाग्यें आगिळया घरा येती ॥३॥
परिमळें काष्ठ ताजवां तुळविलें । आणीक नांवांचीं थोडीं । एक तें कातिवें उभविलीं ढवळारें
एकाचिया कुड मेडी । एक दीनरूप आणिती मेळिया । एक ते बांधोनि माडी
अवघियां बाजार एक चि जाला । मांविकलीं आपुल्या पाडीं ॥१॥
गुण तो सार रूपमध्यकार । अवगुण तो फार पीडीतसे ॥ध्रु.॥
एक गुणें आगळे असती । अमोल्य नांवांचे खडे । एक समर्थ दुर्बळा घरीं
फार मोलाचे थोडे । एक झगमग करिती वाळवंटीं । कोणी न पाहाती तयांकडे
सभाग्य संपन्न आपुलाले घरीं । मायेक दैन्य बापुडें ॥२॥
एक मानें रूपें सारिख्या असती । अनेकप्रकार याती। ज्याचिया संचितें जैसें आलें पुढें
तयाची तैसी च गति । एक उंचपदीं बैसउनि सुखें । दास्य करवी एका हातीं
तुका ह्मणे कां मानिती सुख । चुकलिया वांयां खंती ॥३॥
नाहीं आह्मां शत्रु सासुरें पिसुन । दाटलें हें घन माहियेर ॥१॥
पाहें तेथें पांडुरंग रखुमाई । सत्यभामा राही जननिया ॥ध्रु.॥
लज्जा भय कांही आह्मां चिंता नाहीं । सर्वसुखें पायीं वोळगती ॥२॥
तुका ह्मणे आह्मी सदैवाचीं बाळें । जालों लडिवाळें सकळांचीं ॥३॥
गभाअ असतां बाळा । कोण पाळी त्याचा लळा ॥१॥
कैसा लाघवी सूत्रधारी । कृपाळुवा माझा हरी ॥ध्रु.॥
सर्प पिलीं वितां चि खाय । वांचलिया कोण माय ॥२॥
गगनीं लागला कोसरा । कोण पुरवी तेथें चारा ॥३॥
पोटीं पाषाणांचे जीव । कवण जीव त्याचा भाव ॥४॥
तुका ह्मणे निश्चळ राहें । होईल तें सहज पाहें ॥५॥
न ह्मणे कवणां सिद्ध साधक गंव्हार । अवघा विश्वंभर वांचूनियां ॥१॥
ऐसें माझे बुद्धि काया वाचा मन । लावीं तुझें ध्यान पांडुरंगा ॥ध्रु.॥
गातां प्रेमगुण शंका माझ्या मनीं । नाचतां रंगणीं नाठवावी ॥२॥
देइप चरणसेवा भूतांचें भजन । वर्णा अभिमान सांडवूनि ॥३॥
आशापाश माझी तोडीं माया चिंता । तुजविण वेथा नको कांहीं ॥४॥
तुका ह्मणे सर्व भाव तुझे पायीं । राहे ऐसें देइप प्रेम देवा ॥५॥
अिग्नमाजी गेलें । अिग्न होऊन तें च ठेलें ॥१॥
काय उरलें तया पण । मागील तें नाम गुण ॥ध्रु.॥
लोह लागेपरिसा अंगीं । तो ही भूषण जाला जगीं ॥२॥
सरिता वोहळा ओघा। गंगे मिळोनि जाल्या गंगा ॥३॥
चंदनाच्या वासें । तरु चंदन जालेस्पर्शे ॥४॥
तुका जडला संतां पायीं । दुजेपणा ठाव नाहीं ॥५॥
ऐशा भाग्यें जालों । तरी धन्य जन्मा आलों ॥१॥
रुळें तळीले पायरी । संत पाय देती वरी ॥ध्रु.॥
प्रेमामृतपान । होईल चरणरजें स्नान ॥२॥
तुका ह्मणे सुखें । तया हरतील दुःखें ॥३॥
करितां या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥
माथां पडती संतपाय । सुख कैवल्य तें काय ॥ध्रु.॥
ऐसा लाभ नाहीं । दुजा विचारितां कांहीं ॥२॥
तुका ह्मणे गोड । तेथें पुरे माझें कोड ॥३॥
वेद जया गाती । आह्मां तयाची संगति ॥१॥
नाम धरियेलें कंठीं । अवघा सांटविला पोटीं ॥ध्रु.॥
ॐकाराचें बीज । हातीं आमुचे तें निज ॥२॥
तुका ह्मणे बहु मोटें । अणुरणियां धाकुटें ॥३॥
तूं श्रीयेचा पति । माझी बहु हीन याती ॥१॥
दोघे असों एके ठायीं । माझा माथा तुझे पायीं ॥ध्रु.॥
माझ्या दीनपणां पार । नाहीं बहु तूं उदार ॥२॥
तुका ह्मणे पांडुरंगा । मी ओहोळ तूं गंगा ॥३॥
मी याचक तूं दाता । काय सत्य पाहों आतां ॥१॥
म्या तों पसरिला हात । करीं आपुलें उचित ॥ध्रु.॥
आह्मी घ्यावें नाम । तुह्मां समाधान काम ॥२॥
तुका ह्मणे देवराजा । वाद खंडीं तुझा माझा ॥३॥
तुझे पोटीं ठाव । व्हावा ऐसा माझा भाव ॥१॥
करीं वासनेसारिखें । प्राण फुटे येणें दुःखें ॥ध्रु.॥
अहंकार खोटे । वाटे श्वापदांची थाटे ॥२॥
तुका ह्मणे आई । हातीं धरूनि संग देई ॥३॥
दारीं परोवरी । कुडीं कवाडीं मी घरीं ॥१॥
तुमच्या लागलों पोषणा । अवघे ठायीं नारायणा ॥ध्रु.॥
नेदीं खाऊं जेवूं । हातींतोंडींचें ही घेऊं ॥2 ॥
तुका ह्मणे अंगीं । जडलों ठायींचा सलगी ॥३॥
मज कोणी कांहीं करी । उमटे तुमचे अंतरीं ॥१॥
व्याला वाडविलें ह्मुण । मज सुख तुज सीण ॥ध्रु.॥
माझें पोट धालें। तुझे अंगीं उमटलें ॥२॥
तुका ह्मणे खेळें । तेथें तुमचिया बळें ॥३॥
जोडोनियां कर । उभा राहिलों समोर ॥१॥
हें चि माझेंभांडवल।जाणे कारण विठ्ठल ॥ध्रु.॥
भाकितों करुणा । आतां नुपेक्षावें दीना ॥२॥
तुका ह्मणे डोई । ठेवीं वेळोवेळां पायीं ॥३॥
आह्मी घ्यावें तुझें नाम । तुह्मी आह्मां द्यावें प्रेम ॥१॥
ऐसें निवडिलें मुळीं । संतीं बैसोनि सकळीं ॥ध्रु.॥
माझी डोई पायांवरी । तुह्मी न धरावी दुरी ॥२॥
तुका ह्मणे केला । खंड दोघांचा विठ्ठला ॥३॥
वारिलें लिगाड । बहुदिसांचें हें जाड ॥१॥
न बोलावें ऐसें केलें । काहीं वाउगें तितुलें ॥ध्रु.॥
जाला चौघांचार । गेला खंडोनि वेव्हार ॥२॥
तुका ह्मणे देवा । करीन ते घ्यावी सेवा ॥३॥
पायरवे अन्न । मग करी क्षीदक्षीण ॥१॥
ऐसे होती घातपात । लाभे विण संगें थीत ॥ध्रु.॥
जन्माची जोडी । वाताहात एके घडी ॥२॥
तुका ह्मणे शंका । हित आड या लौकिका ॥३॥
आह्मांवैष्णवांचा।नेमकायामनेंवाचा ॥१॥
धीर धरूं जिवासाटीं । येऊं नेदूं लाभा तुटी ॥ध्रु.॥
उचित समय । लाजनिवारावें भय ॥२॥
तुका ह्मणे कळा । जाणों नेम नाहीं बाळा ॥३॥
उलंघिली लाज । तेणें साधियेलें काज ॥१॥
सुखें नाचे पैलतीरीं । गेलों भवाचे सागरीं ॥ध्रु.॥
नामाची सांगडी । सुखें बांधली आवडी ॥२॥
तुका ह्मणे लोकां । उरली वाचा मारीं हाका ॥३॥
बैसलोंसे दारीं । धरणें कोंडोनि भिकारी ॥१॥
आतां कोठें हालों नेदीं । बरी सांपडली संदी ॥ध्रु.॥
किती वेरझारा । मागें घातलीया घरा ॥२॥
माझें मज नारायणा । देतां ां रे नये मना ॥३॥
भांडावें तें किती । बहु सोसिली फजिती ॥४॥
तुका ह्मणे नाहीं । लाज तुझे अंगीं कांहीं ॥५॥
जालों द्वारपाळ । तुझें राखिलें सकळ ॥१॥
नाहीं लागों दिलें अंगा । आड ठाकलों मी जगा ॥ध्रु.॥
करूनियां नीती। दिल्याप्रमाणें चालती ॥२॥
हातीं दंड काठी । भा जिवाचिये साटीं ॥३॥
बळ बुद्धी युक्ती । तुज दिल्या सर्व शक्ती ॥४॥
तुका ह्मणे खरा । आतां घेईन मुशारा ॥५॥
फळाची तों पोटीं । घडे वियोगें ही भेटी ॥१॥
करावें चिंतन । सार तें चि आठवण ॥ध्रु.॥
चित्त चित्ता ग्वाही । उपचारें चाड नाहीं ॥२॥
तुका ह्मणे देवा । पावे ंतरींची सेवा ॥३॥
दुर्बळाचें कोण । ऐके घालूनियां मन । राहिलें कारण। तयावांचूनि काय तें ॥१॥
कळों आलें अनुभवें । पांडुरंगा माझ्या जीवें । न संगतां ठावें । पडे चर्या देखोनि ॥ध्रु.॥
काम क्रोध माझा देहीं । भेदाभेद ोले नाहीं । होतें तेथें कांहीं । तुज कृपा करितां ॥२॥
हें तों नव्हे उचित । नुपेक्षावें शरणागत । तुका ह्मणे रीत । तुमची आह्मां न कळे ॥३॥
आह्मी भाव जाणों देवा । न कळती तुझिया मावा । गणिकेचा कुढावा । पतना न्यावा दशरथ ॥१॥
तरी म्यां काय गा करावें । कोण्या रीती तुज पावें । न संगतां ठावें । तुह्मांविण न पडे ॥ध्रु.॥
दोनी फाकलिया वाटा । ाोवी केला घटापटा । नव्हे धीर फांटा । आड रानें भरती ॥२॥
तुका ह्मणे माझे डोळे । तुझे देखती हे चाळे । आतां येणें वेळे । चरण जीवें न सोडीं ॥३॥
वेरझारीं जाला सीण । बहु केलें क्षीदक्षीण । भांडणासी दिन । आजी येथें फावला ॥१॥
आतां काय भीड भार । धरूनियां लोकचार । बुडवूनि वेव्हार । सरोबरी करावी ॥ध्रु.॥
आलें बहुतांच्या मना । कां रे न ोसी ााहाणा । मुळींच्या वचना । आह्मी जागों आपुल्या ॥२॥
तुका ह्मणे चौघांमधीं । तुज नेलें होतें आधीं । आतां नामधीं । उरी कांहीं राहिली ॥३॥
कल्पतरूखालीं । फळें येती मागीतलीं ॥१॥
तेथें बैसल्याचा भाव । विचारूनि बोलें ठाव ॥ध्रु.॥
द्यावें तें उत्तर । येतो प्रतित्याचा फेर ॥२॥
तुका ह्मणे मनीं । आपुल्या च लाभहानि ॥३॥
रंगलें या रंगें पालट न घरी । खेवलें अंतरीं पालटेना ॥१॥
सावळें निखळ कृष्णनाम ठसे । अंगसंगें कैसे शोभा देती ॥ध्रु.॥
पवित्र जालें तें न लिंपे विटाळा । नैदी बैसों मला आडवरी ॥२॥
तुका ह्मणे काळें काळें केलें तोंड । प्रकाश अभंड देखोनियां ॥३॥
जगा काळ खाय । आह्मी माथां दिले पाय ॥१॥
नाचों तेथें उभा राहे । जातां व्यंग करी साहे ॥ध्रु.॥
हरिच्या गुणें धाला । होता खात चि भुकेला ॥२॥
तुका ह्मणे हळु । जाला कढत शीतळु ॥३॥
ब्रह्मरस घेइप काढा । जेणें पीडा वारेल ॥१॥
पथ्य नाम विठोबाचें । अणीक वाचे न सेवीं ॥ध्रु.॥
भवरोगाऐसें जाय । आणीक काय क्षुल्लकें ॥२॥
तुका ह्मणे नव्हे बाधा । अणीक कदा भूतांची ॥३॥
अंगें अनुभव जाला मज । संतरजचरणांचा ॥१॥
सुखी जालों या सेवनें । दुःख नेणें यावरी ॥ध्रु.॥
निर्माल्याचें तुळसीदळ । विष्णुजळ चरणींचें ॥२॥
तुका ह्मणे भावसार । करूनि फार मिश्रित ॥३॥
वैद्य एक पंढरिराव । अंतर्भाव तो जाणे ॥१॥
रोगाऐशा द्याव्या वल्ली । जाणे जाली बाधा ते ॥ध्रु.॥
नेदी रुका वेचों मोल । पोहे बोल प्रीतीचे ॥२॥
तुका ह्मणे दयावंता । सदा चिंता दीनांची ॥३॥
करितां कोणाचें ही काज । नाहीं लाज देवासी ॥१॥
बरे करावें हें काम । धरिलें नाम दीनबंधु ॥ध्रु.॥
करुनि अराणूक पाहे । भलत्या साह्य व्हावया ॥२॥
बोले तैसी करणी करी । तुका ह्मणे एक हरि ॥३॥
उभें चंद्रभागे तीरीं । कट धरोनियां करीं ।
पाउलें गोजिरीं । विटेवरी शोभलीं ॥१॥
त्याचा छंद माझ्या जीवा । काया वाचा मनें हेवा ।
संचिताचा ठेवा । जोडी हातीं लागली ॥ध्रु.॥
रूप डोळियां आवडे । कीर्ति श्रवणीं पवाडे ।
मस्तक नावडे । उठों पायांवरोनि ॥२॥
तुका ह्मणे नाम । ज्याचें नासी क्रोध काम ।
हरी भवश्रम । उच्चारितां वाचेसी ॥३॥
आह्मां हें चि भांडवल । ह्मणों विठ्ठल विठ्ठल ॥१॥
सुखें तरों भवनदी । संग वैष्णवांची मांदी ॥ध्रु.॥
बाखराचें वाण। सांडूं हें जेवूं जेवण ॥२॥
न लगे वारंवार । तुका ह्मणे वेरझार ॥३॥
आतां माझ्या भावा । अंतराय नको देवा ॥१॥
आलें भागा तें करितों । तुझें नाम उच्चारितों ॥ध्रु.॥
दृढ माझें मन। येथें राखावें बांधोन ॥२॥
तुका ह्मणे वाटे । नको फुटों देऊं फांटे ॥३॥
काय देवापाशीं उणें । हिंडे दारोदारीं सुनें ॥१॥
करी अक्षरांची आटी । एके कवडी च साटीं ॥ध्रु.॥
निंदी कोणां स्तवी । चिंतातुर सदा जीवीं ॥२॥
तुका ह्मणे भांड । जलो जळो त्याचें तोंड ॥३॥
मागणें तें मागों देवा । करूं भक्ती त्याची सेवा ॥१॥
काय उणे तयापाशीं । रिद्धिसिद्धी ज्याच्या दासी ॥ध्रु.॥
कायावाचामन । करूं देवा हें अर्पण ॥२॥
तुका ह्मणे विश्वंभर । ज्याच्यानें हें चराचर ॥३॥
चित्तीं नाहीं आस । त्याचा पांडुरंग दास ॥१॥
असे भक्तांचिये घरीं । काम न संगतां करी ॥ध्रु.॥
अनाथाचा बंधु । असे अंगीं हा संबंधुं ॥२॥
तुका ह्मणे भावें । देवा सत्ता राबवावें ॥३॥
कर्कशसंगति । दुःख उदंड फजिती ॥१॥
नाहीं इह ना परलोक । मजुर दिसे जैसें रंक ॥ध्रु.॥
वचन सेंटावरी । त्याचें ठेवूनि धिक्कारी ॥२॥
तुका ह्मणे पायीं बेडी । पडिली कपाळीं कुहाडी ॥३॥
बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती ॥१॥
वांयां गेलें ऐसें दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥ध्रु.॥
पाल्याची जतन । तरि प्रांतीं येती कण ॥२॥
तुका ह्मणे आळा । उदक देतां लाभे फळा ॥३॥
जाणावें तें सार । नाहीं तरी दगा फार ॥१॥
डोळे झांकिलिया रवि । नाहीं ऐसा होय जेवीं ॥ध्रु.॥
बहुथोड्या आड । निवारितां लाभें जाड ॥२॥
तुका ह्मणे खरें । नेलें हातींचे अंधारें ॥३॥
मुळीं नेणपण । जाला तरी अभिमान ॥१॥
वांयां जावें हें चि खरें । केलें तेणें चि प्रकारें ॥ध्रु.॥
अराणूक नाहीं कधीं। जाली तरि भेदबुद्धि ॥२॥
अंतरली नाव । तुका ह्मणे नाहीं ठाव ॥३॥
संवसारसांते आले हो आइका । तुटीचें ते नका केणें भरूं ॥१॥
लाभाचा हा काळ अवघे विचारा । पारखी ते करा साह्य येथें ॥ध्रु.॥
शृंगारिलें दिसे न कळें अंतर । गोविला पदर उगवेना ॥२॥
तुका ह्मणे खोटें गुंपतां विसारें । हातिंचिया खरें हातीं घ्यावें ॥३॥
सारावीं लिगाडें धरावा सुपंथ । जावें उसंतीत हळूहळू ॥१॥
पुढें जातियाचे उमटले माग । भांबावलें जग आडरानें ॥ध्रु.॥
वेचल्याचा पाहे वरावरि झाडा । बळाचा निधडा पुढिलिया ॥२॥
तुका ह्मणे जैसी दाखवावी वाणी । ते द्यावी भरोनी शेवट तों ॥३॥
बुद्धिमंद शिरीं । भार फजिती पदरीं ॥१॥
जाय तेथें अपमान । पावे हाणी थुंकी जन ॥ध्रु.॥
खरियाचा पाड । मागें लावावें लिगाड ॥२॥
तुका ह्मणे करी । वर्म नेणें भरोवरी ॥३॥
पूर्वजांसी नर्का । जाणें तें आइका ॥१॥
निंदा करावी चाहाडी । मनीं धरूनि आवडी ॥ध्रु.॥
मात्रागमना ऐसी।जोडी पातकांची रासी ॥२॥
तुका ह्मणे वाट । कुंभपाकाची ते नीट॥
वेडीं तें वेडीं बहुत चि वेडीं । चाखतां गोडी चवी नेणे ॥ध्रु.॥
देहा लावी वात । पालव घाली जाली रात ॥१॥
कडिये मूल भोंवतें भोंये । मोकलुनि रडे धाये ॥२॥
लेंकरें वित्त पुसे जगा । माझा गोहो कोण तो सांगा ॥३॥
आपुली शुद्धि जया नाहीं । आणिकांची ते जाणे काई ॥४॥
तुका ह्मणे ऐसे जन । नर्का जातां राखे कोण ॥५॥
आवडीचें दान देतो नारायण । बाहे उभारोनि राहिलासे ॥१॥
जें जयासी रुचे तें करी समोर । सर्वज्ञा उदार मायबाप ॥ध्रु.॥
ठायीं पडिलिया तें चि लागे खावें । ठायींचे चि घ्यावें विचारूनि ॥२॥
बीज पेरूनियां तें चि घ्यावें फळ । डोरलीस केळ कैंचें लागे ॥३॥
तुका ह्मणे देवा कांहीं बोल नाहीं । तुझा तूं चि पाहीं शत्रु सखा ॥४॥
अडचणीचें दार । बाहेर माजी पैस फार ॥१॥
काय करावें तें मौन्य । दाही दिशा हिंडे मन ॥ध्रु.॥
बाहेर दावी वेश । माजी वासनेचे लेश ॥२॥
नाहीं इंिद्रयां दमन । काय मांडिला दुकान ॥३॥
सारविलें निकें । वरि माजी अवघें फिकें ॥४॥
तुका ह्मणे अंतीं । कांहीं न लगे चि हातीं ॥५॥
लय लक्षूनियां जालों ह्मणती देव । तो ही नव्हे भाव सत्य जाणा ॥१॥
जालों बहुश्रुत न लगे आतां कांहीं । नको राहूं ते ही निश्चितीनें ॥ध्रु.॥
तपें दान काय मानिसी विश्वास । बीज फळ त्यास आहे पुढें ॥२॥
कर्म आचरण यातीचा स्वगुण । विशेष तो गुण काय तेथें ॥३॥
तुका ह्मणे जरी होईल निष्काम । तरि च होय राम देखे डोळां ॥४॥
पुरली धांव कडिये घेइप । पुढें पायीं न चलवीं ॥१॥
कृपाळुवे पांडुरंगे । अंगसंगे जिवलगे ॥ध्रु.॥
अवघी निवारावी भूक। अवघ्या दुःख जन्माचें ॥२॥
तुका ह्मणे बोलवेना । लावीं स्तनां विश्वरें ॥३॥
जें जें मना वाटे गोड । तें तें कोड पुरविसी ॥१॥
आतां तूं चि बाह्यात्कारीं । अवघ्यापरी जालासी ॥ध्रु.॥
नाहीं सायासाचें काम । घेतां नाम आवडी ॥२॥
तुका ह्मणे सर्वसांगे । पांडुरंगे दयाळे ॥३॥
जेथें माझी दृष्टि जाय । तेथें पाय भावीन ॥१॥
असेन या समाधानें । पूजा मनें करीन ॥ध्रु.॥
अवघा च अवघे देसी। सुख घेवविसी संपन्न ॥२॥
तुका ह्मणे बंधन नाहीं । ऐसें कांहीं ते करूं ॥३॥
नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ॥१॥
भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां ॥ध्रु.॥
कोण्या काळें सुखा। ऐशा कोण पावता ॥२॥
अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥३॥
तुका ह्मणे धन्य जालें । भूमी वैकुंठ आणिलें ॥४॥
अवघे चुकविले सायास । तप रासी जीवा नास ॥१॥
जीव देऊनियां बळी । अवघीं तारिलीं दुर्बळीं । केला भूमंडळीं । माजी थोर पवाडा ॥ध्रु.॥
कांहीं न मगे याची गती । लुटवितो जगा हातीं ॥२॥
तुका ह्मणे भक्तराजा । कोण वर्णी पार तुझा ॥३॥
प्रमाण हें त्याच्या बोला । देव भक्तांचा अंकिला ॥१॥
न पुसतां जातां नये । खालीं बैसतां ही भिये ॥ध्रु.॥
अवघा त्याचा होत । जीव भावाही सहित ॥२॥
वदे उपचाराची वाणी । कांहीं माग ह्मणऊनि ॥३॥
उदासीनाच्या लागें । तुका ह्मणे धांवे मागें ॥४॥
कांहीं न मागती देवा । त्यांची करूं धांवे सेवा ॥१॥
हळूहळू फेडी ॠण । होऊनियां रूपें दीन ॥ध्रु.॥
होऊं न सके वेगळा । क्षण एक त्यां निराळा ॥२॥
तुका ह्मणे भक्तिभाव । हा चि देवाचा ही देव ॥३॥
जाणे अंतरिंचा भाव । तो चि करितो उपाव ॥१॥
न लगें सांगावें मांगावें ॥
जीवें भावें अनुसरावें । अविनाश घ्यावें। फळ धीर धरोनि ॥ध्रु.॥
बाळा न मागतां भोजन । माता घाली पाचारून ॥२॥
तुका ह्मणे तरी । एकीं लंघियेले गिरी ॥३॥
आह्मी नाचों तेणें सुखें । वाऊं टाळी गातों मुखें ॥१॥
देव कृपेचा कोंवळा । शरणागता पाळी लळा ॥ध्रु.॥
आह्मां जाला हा निर्धार । मागें तारिलें अपार ॥२॥
तुका ह्मणे संतीं । वर्म दिलें आह्मां हातीं ॥३॥
जालों निर्भर मानसीं । ह्मणऊनि कळलासी ॥१॥
तुझे ह्मणविती त्यांस । भय चिंता नाहीं आस ॥ध्रु.॥
चुकविसी पाश । गर्भवासयातना ॥२॥
तुझें जाणोनियां वर्म । कंठीं धरियेलें नाम ॥३॥
तुका ह्मणे तेणें सुखें । विसरलों जन्मदुःख ॥४॥
नको दुष्टसंग । पडे भजनामधीं भंग ॥१॥
काय विचार देखिला । सांग माझा तो विठ्ठला ॥ध्रु.॥
तुज निषेधितां । मज न साहे सर्वथा ॥२॥
एका माझ्या जीवें । वाद करूं कोणासवें ॥३॥
तुझे वणूप गुण । कीं हे राखों दुष्टजन ॥४॥
काय करूं एका। मुखें सांग ह्मणे तुका ॥५॥
विठ्ठल माझी माय । आह्मां सुखा उणें काय ॥१॥
घेतों अमृताची धनी । प्रेम वोसंडलें स्तनीं ॥ध्रु.॥
क्रीडों वैष्णवांच्या मेळीं । करूं आनंदाच्या जळीं ॥२॥
तुका ह्मणे कृपावंत । ठेवीं आह्मांपाशीं चित्त ॥३॥
भक्तिसुखें जे मातले । ते किळकाळा शूर जाले ॥१॥
हातीं बाण हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥ध्रु.॥
महां दोषां आला त्रास । जन्ममरणां केला नाश ॥२॥
सहस्रनामाची आरोळी। एक एकाहूनि बळी ॥३॥
नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचें अंकित त्यावांचून ॥४॥
तुका ह्मणे त्यांच्या घरीं । मोक्षसिद्धी या कामारी ॥५॥
पंधरां दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥
काय तुझा जीव जातो एका दिसें । फराळाच्या मिसें धणी घेसी ॥ध्रु.॥
स्वहित कारण मानवेल जन । हरिकथा पूजन वैष्णवांचें ॥२॥
थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥३॥
तुका ह्मणे कां रे सकुमार जालासी । काय जाब देसी यमदूतां ॥४॥
कथा हें भूषण जनामध्यें सार । तरले अपार बहुत येणें ॥१॥
नीचिये कुळींचा उंचा वंद्य होय । हरीचे जो गाय गुणवाद ॥ध्रु.॥
देव त्याची माथां वंदी पायधुळी । दीप झाला कुळीं वंशाचिये ॥२॥
त्याची निंदा करी त्याची कुष्ठ वाणी । मुख संवदणी रजकाची ॥३॥
तुका ह्मणे नाहीं चोरीचा व्यापार । विठ्ठलाचें सार नाम ध्यावें ॥४॥
Text: तुकाराम गाथा on Marathi Wikisource, which does not name the printed edition it was transcribed from. The verses are public domain; the transcription is by Wikisource contributors, CC BY-SA 4.0. Its systematic legacy-font errors are repaired by rule (see the reading page for details); some remain — इप printed for ई in about 220 abhangas, and a few vowel signs on the wrong letter. Numbering follows Wikisource; printed editions differ. Spotted a wrong line? Write to us with the number.