मनित्यManitya
तुकाराम गाथा · page 8 of 16

अभंग २१०१–२४००

Abhangas 2101–2400 (the Gāthā is numbered 1–4,583), in the original Marathi, with the Gāthā's own section headings — as transcribed on Marathi Wikisource, whose base edition is not named. The refrain (ध्रु.) is set in a warmer colour. One font error is not yet repaired: where you see इप, read ई (होइप = होई).

↵

टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषें जेजेकार ब्रह्मानंदु ॥१॥

गरुडटके दिंडी पताकांचे भार । आनंद अपार ब्रह्मादिकां ॥ध्रु.॥

आनंदें वैष्णव जाती लोटांगणीं । एक एकाहुनि भद्रजाति ॥२॥

तेणें सुखें सुटे पाषाणां पाझर । नष्ट खळ नर शुद्ध होती ॥३॥

तुका ह्मणे सोपें वैकुंठवासी जातां । रामकृष्ण कथा हे ची वाट ॥४॥

देखोवेखीं करिती गुरू । नाहीं ठाउका विचारु ॥१॥

वर्म तें न पडे ठायीं । पांडुरंगाविण कांहीं ॥ध्रु.॥

शिकों कळा शिकों येती । प्रेम नाहीं कोणां हातीं ॥२॥

तुका ह्मणे सार । भक्ति नेणती गव्हार ॥३॥

भाग्यवंत ह्मणों तयां । शरण गेले पंढरिराया ॥१॥

तरले तरले हा भरवसा । नामधारकांचा ठसा ॥ध्रु.॥

भुक्तिमुक्तीचें तें स्थळ । भाविकनिर्मळ निर्मळ ॥२॥

गाइलें पुराणीं । तुका ह्मणे वेदवाणी ॥३॥

जैसें चित्त जयावरी । तैसें जवळी तें दुरी ॥१॥

न लगे द्यावा परिहार । या कोरडें उत्तर ।

असे अभ्यंतर । साक्षभूत जवळी ॥ध्रु.॥

अवघें जाणे सूत्रधारी । कोण नाचे कोणे परी ॥२॥

तुका ह्मणे बुद्धि । ज्याची ते च तया सिद्धि ॥३॥

नाहीं पाइतन भूपतीशीं दावा । धिग त्या कर्तव्या आगी लागो ॥१॥

मुंगियांच्या मुखा गजाचा आहार । न साहावे भार जाय जीवें ॥२॥

तुका ह्मणे आधीं करावा विचार । शूरपणें तीर मोकलावा ॥३॥

तिन्ही लोक ॠणें बांधिले जयानें । सर्वसिद्धि केणें तये घरीं ॥१॥

पंढरीचोहोटां घातला दुकान । मांडियेले वान आवडीचे ॥ध्रु.॥

आषाढी कार्तिकी भरियेले हाट । इनाम हे पेंठ घेतां देतां ॥२॥

मुक्ति कोणी तेथें हातीं नेघे फुका । लुटितील सुखा प्रेमाचिया ॥३॥

तुका ह्मणे संतसज्जन भाग्याचें । अनंतां जन्मींचे सांटेकरी ॥४॥

दुःखाचिये साटीं तेथें मिळे सुख । अनाथाची भूक दैन्य जाय ॥१॥

उदाराचा राणा पंढरीस आहे । उभारोनि बाहे पालवितो ॥१॥

जाणतियाहूनि नेणत्याची गोडी । आिंळगी आवडी करूनियां ॥२॥

शीण घेऊनियां प्रेम देतो साटी । न विचारी तुटी लाभा कांहीं ॥३॥

तुका ह्मणे असों अनाथ दुबळीं । आह्मांसी तो पाळी पांडुरंग ॥४॥

आणिक मात माझ्या नावडे जीवासी । काय करूं यासी पांडुरंगा ॥१॥

मुखा तें चि गोड श्रवणां आवडी । चित्त माझें ओढी तुझे पायीं ॥ध्रु.॥

जये पदीं नाहीं विठ्ठलाचें नाम । मज होती श्रम आइकतां ॥२॥

आणिकाचें मज ह्मणवितां लाज । वाटे हें सहज न बोलावें ॥३॥

तुका ह्मणे मज तूं च आवडसी । सर्वभावेंविसीं पांडुरंगा ॥४॥

कळेल हें तैसें गाईन मी तुज । जनासवें काज काय माझें ॥१॥

करीन मी स्तुती आपुले आवडी । जैसी माझ्या गोडी वाटे जीवा ॥ध्रु.॥

होऊनी निर्भर नाचेन मी छंदें । आपुल्या आनंदें करूनियां ॥२॥

काय करूं कळा युक्ती या कुसरी । जाणिवेच्या परी सकिळका ॥३॥

तुका ह्मणे माझें जयासवें काज । भोळा तो सहज पांडुरंग ॥४॥

तयासी नेणतीं बहु आवडती । होय जयां चित्तीं एक भाव ॥१॥

उपमन्यु धुरु हें काय जाणती । प्रल्हादाच्या चित्तीं नारायण ॥ध्रु.॥

कोळें भिल्लें पशु श्वापदें अपारें । कृपेच्या सागरें तारियेलीं ॥२॥

काय तें गोपाळें चांगलीं शाहाणीं । तयां चक्रपाणी जेवी सवें ॥३॥

तुका ह्मणे भोळा भाविक हा देव । आह्मी त्याचे पाव धरूनी ठेलों ॥४॥

न लगे पाहावें अबद्ध वांकडें । उच्चारावें कोडें नाम तुझें ॥१॥

नाहीं वेळ नाहीं पंडितांचा धाक । होत कां वाचक वेदवक्ते ॥ध्रु.॥

पुराणीं ही कोठें न मिळे पाहातां । तैशीं या अनंता ठेवूं नामें ॥२॥

आपुलिया मना उपजे आनंद । तैसे करूं छंद कथेकाळीं ॥३॥

तुका ह्मणे आह्मी आनंदें चि धालों । आनंद चि ल्यालों अळंकार ॥४॥

दैन्य दुःख आह्मां न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥१॥

सर्व सुखें येती मानें लोटांगणीं । कोण यांसी आणी दृष्टीपुढें ॥ध्रु.॥

आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचें ॥२॥

आमचें मागणें मागों त्याची सेवा । मोक्षाची निद।वा कोणा चाड ॥३॥

तुका ह्मणे पोटीं सांटविला देव । नुन्य तो भाव कोण आह्मां ॥४॥

काळतोंडा सुना । भलतें चोरुनि करी जना ॥१॥

धिग त्याचें साधुपण । विटाळुनि वर्ते मन ॥ध्रु.॥

मंत्र ऐसे घोकी । वश व्हावें जेणें लोकीं ॥२॥

तुका ह्मणे थीत । नागवला नव्हे हित ॥३॥

विठ्ठल मुक्तिदाता । नव्हे मरो हें बोलता ॥१॥

मज न साहावें कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥ध्रु.॥

हरीकथेतें धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥२॥

सुना काळतोंडा । जो या देवा ह्मणे धोंडा ॥३॥

अहं ह्मणे ब्रह्म । नेणे भक्तीचें तें वर्म ॥४॥

तुका ह्मणे क्षण। नको तयाचें दर्षण ॥५॥

यमपुरी त्यांणीं वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला ॥१॥

अवघड कोणी न करी सांगतां । सुलभ बहुतां गोड वाटे ॥ध्रु.॥

काय ते नेणते होते मागें ॠषी । आधार लोकांसी ग्रंथ केले ॥२॥

द्रव्य दारा कोणें स्थापियेलें धन । पिंडाचें पाळण विषयभोग ॥३॥

तुका ह्मणे दोहीं ठायीं हा फजित । पावे यमदूतजना हातीं ॥४॥

न कळतां कोणीं मोडियेलें व्रत । तया प्रायिश्चत्त चाले कांहीं ॥१॥

जाणतियां वज्रलेप जाले थोर । तयांस अघोर कुंभपाक ॥ध्रु.॥

आतां जरी कोणी नाइके सांगतां । तया शिकवितां तें चि पाप ॥२॥

काय करूं मज देवें बोलविलें । माझें खोळंबिलें काय होतें ॥३॥

तुका ह्मणे जना पाहा विचारूनी । सुख वाटे मनीं तें चि करा ॥४॥

वाचे विठ्ठल नाहीं । तो चि प्रेतरूप पाहीं ॥१॥

धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥ध्रु.॥

न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥२॥

जातां कांटाळे देउळा । तो चि सुना मुखकाळा ॥३॥

हरिभक्तीविण । त्याचें जळो शाहाणपण ॥४॥

तुका ह्मणे तेणें । वंशा आणियेलें उणें ॥५॥

तारिलीं बहुतें चुकवूनि घात । नाम हें अमृत स्वीकारितां ॥१॥

नेणतां सायास शुद्ध आचरण । यातीकुळहीन नामासाटीं ॥ध्रु.॥

जन्म नांव धरी भक्तीच्या पाळणा । आकार कारणा या च साटीं ॥२॥

असुरीं दाटली पाप होतां फार । मग फेडी भार पृथिवीचा ॥३॥

तुका ह्मणे देव भक्तपण सार । कवतुक- वेव्हार तयासाटीं ॥४॥

याचिया आधारें राहिलों नििंश्चत । ठेवूनियां चित्त पायीं सुखें ॥१॥

माझें सुखदुःख जाणे हित फार । घातलासे भार पांडुरंगा ॥ध्रु.॥

कृपेचीं पोसणीं ठायींचीं अंखिलीं । ह्मणऊनि लागली यास चिंता ॥२॥

मन राखे हातीं घेऊनियां काठी । इंिद्रयें तापटीं फांकों नेदी ॥३॥

तुका ह्मणे यासी अवघड नाहीं । शरणागता कांहीं रक्षावया ॥४॥

उभाउभी फळ । अंगीं मंत्राचे या बळ ॥१॥

ह्मणा विठ्ठल विठ्ठल । गोड आणि स्वल्प बोल ॥ध्रु.॥

किळकाळाची बाधा । नव्हे उच्चारितां सदा ॥२॥

तुका ह्मणे रोग । वारे भवाऐसा भोग ॥३॥

जैसा अधिकार । तैसें बोलावें उत्तर ॥१॥

काय वाउगी घसघस । आह्मी विठोबाचे दास ॥ध्रु.॥

आह्मी जाणों एका देवा । जैसी तैसी करूं सेवा ॥२॥

तुका ह्मणे भावें । माझें पुढें पडेल ठावें ॥३॥

नव जातां घरा । आह्मी कोणाच्या दातारा ॥१॥

कां हे छळूं येती लोक । दाट बळें चि कंटक ॥ध्रु.॥

नाहीं आह्मी खात। कांहीं कोणाचें लागत ॥२॥

कळे तैसी सेवा । तुका ह्मणे करूं देवा ॥३॥

मोहरोनी चित्ता । आणूं हळूं चि वरि हिता ॥१॥

तों हे पडती आघात । खोडी काढिती पंडित ॥ध्रु.॥

संवसारा भेणें । कांहीं उसंती तों पेणें ॥२॥

एखादिया भावें । तुका ह्मणे जवळी यावें ॥३॥

काय जाणों वेद । आह्मी आगमाचे भेद ॥१॥

एक रूप तुझें मनीं । धरूनि राहिलों चिंतनी ॥ध्रु.॥

कोठें अधिकार । नाहीं रानट विचार ॥२॥

तुका ह्मणे दीना । नुपेक्षावें नारायणा ॥३॥

धर्माचे पाळण । करणें पाषांड खंडण ॥१॥

हें चि आह्मां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥ध्रु.॥

तीक्षण उत्तरें । हातीं घेउनि बाण फिरें ॥२॥

नाहीं भीड भार । तुका ह्मणे साना थोर ॥३॥

निवडावें खडे । तरी दळण वोजें घडे ॥१॥

नाहीं तरि नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ॥ध्रु.॥

निवडावें तन। सेतीं करावें राखण ॥२॥

तुका ह्मणे नीत । न विचारितां नव्हे हित ॥३॥

दुर्जनाचा मान । सुखें करावा खंडण ॥१॥

लात हाणोनियां वारी । गुंड वाट शुद्ध करी ॥ध्रु.॥

बहुतां पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ॥२॥

तुका ह्मणे नखें । काढुनि टाकिजेती सुखें ॥३॥

नका धरूं कोणी । राग वचनाचा मनीं ॥१॥

येथें बहुतांचें हित । शुद्ध करोनि राखा चित्त ॥ध्रु.॥

नाहीं केली निंदा । आह्मीं दुसिलेंसे भेदा ॥२॥

तुका ह्मणे मज । येणें विण काय काज ॥३॥

कांहीं जडभारी । पडतां ते अवश्वरी ॥१॥

तुज आठवावे पाय । आह्मीं मोकलूनि धाय ॥ध्रु.॥

तान पीडी भूक । शीत उष्ण वाटे दुःख ॥२॥

तुका ह्मणे लाड । तेथें पुरे माझें कोड ॥३॥

होउनि कृपाळ । भार घेतला सकळ ॥१॥

तूं चि चालविसी माझें । भार सकळ ही ओझें ॥ध्रु.॥

देह तुझ्या पायीं । ठेवुनि झालों उतराई ॥२॥

कायावाचामनें । तुका ह्मणे दुजें नेणें ॥३॥

आतां होइप माझे बुद्धीचा जनिता । अवरावें चित्ता पांडुरंगा ॥१॥

येथूनियां कोठें न वजें बाहेरी । ऐसें मज धरीं सत्ताबळें ॥ध्रु.॥

अनावर गुण बहुतां जातींचे । न बोलावें वाचे ऐसें करीं ॥२॥

तुका ह्मणे हित कोणिये जातीचें । तुज ठावें साचें मायबापा ॥३॥

नित्य मनासी करितों विचार । तों हें अनावर विषयलोभी ॥१॥

आतां मज राखें आपुलिया बळें । न देखें हे जाळें उगवतां ॥ध्रु.॥

सांपडलों गळीं नाहीं त्याची सत्ता । उगळी मागुता घेतला तो ॥२॥

तुका ह्मणे मी तों अज्ञान चि आहें । परि तुझी पाहें वास देवा ॥३॥

दुर्बळाचे हातीं सांपडलें धन । करितां जतन नये त्यासी ॥१॥

तैसी परी मज झाली नारायणा । योगक्षेम जाणां तुह्मी आतां ॥ध्रु.॥

खातां लेतां नये मिरवितां वरि । राजा दंड करी जनराग ॥२॥

तुका ह्मणे मग तळमळ उरे । देखिलें तें झुरे पाहावया ॥३॥

मागें जैसा होता माझे अंगीं भाव । तैसा एक ठाव नाहीं आतां ॥१॥

ऐसें गोही माझें मन मजपाशीं । तुटी मुदलेंसी दिसे पुढें ॥ध्रु.॥

पुढिलांचे मना आणि गुणदोष । पूज्य आपणांस करावया ॥२॥

तुका ह्मणे जाली कोंबड्याची परी । पुढें चि उकरी लाभ नेणें ॥३॥

किती तुजपाशीं देऊं परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥१॥

आतां माझें हातीं देइप हित । करीं माझें चित्त समाधान ॥ध्रु.॥

राग आला तरी कापूं नये मान । बाळा मायेविण कोण दुजें ॥२॥

तुका ह्मणे ऐसा होईल लौकिक । मागे बाळ भीक समर्थाचें ॥३॥

लाज वाटे पुढें तोंड दाखवितां । परि जाऊं आतां कोणापाशी ॥१॥

चुकलिया काम मागतों मुशारा । लाज फजितखोरा नाहीं मज ॥ध्रु.॥

पाय सांडूनिया फिरतों बासर । स्वामिसेवे चोर होऊनियां ॥२॥

तुका ह्मणे मज पाहिजे दंडिलें । पुढें हे घडलें न पाहिजे ॥३॥

पुढिलिया सुखें निंब देतां भले । बहुत वारलें होय दुःख ॥१॥

हें तों वर्म असे माउलीचे हातीं । हाणी मारी प्रीती हितासाठीं ॥ध्रु.॥

खेळतां विसरे भूक तान घर । धरूनियां कर आणी बळें ॥२॥

तुका ह्मणे पाळी तोंडऴिचया घांसें । उदार सर्वस्वें सर्वकाळ ॥३॥

आतां गुण दोष काय विचारिसी । मी तों आहे रासी पातकांची ॥१॥

पतितपावनासवें समागम । अपुलाला धर्म चालवीजे ॥ध्रु.॥

घनघायें भेटी लोखंडपरिसा । तरी अनारिसा न पालटे ॥२॥

तुका ह्मणे माती कोण पुसे फुका । कस्तुरीच्या तुका समागमें ॥३॥

कृपावंता दुजें नाहीं तुह्मां पोटीं । लाडें बोलें गोठी सुख मातें ॥१॥

घेउनि भातुकें लागसील पाठी । लाविसील ओंठीं ब्रह्मरस ॥ध्रु.॥

आपुलिये पांख घालिसी पाखर । उदार मजवर कृपाळू तूं ॥२॥

तुका ह्मणे आह्मांकारणें गोविंदा । वागविसी गदा सुदर्शन ॥३॥

पाळिलों पोसिलों जन्मजन्मांतरीं । वागविलों करीं धरोनियां ॥१॥

आतां काय माझा घडेल अव्हेर । मागें बहु दूर वागविलें ॥ध्रु.॥

नेदी वारा अंगीं लागों आघाताचा । घेतला ठायींचा भार माथां ॥२॥

तुका ह्मणे बोल करितों आवडी । अविट ते चि गोडी अंतरींची ॥३॥

पांडुरंगा कांहीं आइकावी मात । न करावें मुक्त आतां मज ॥१॥

जन्मांतरें मज तैसीं देइप देवा । जेणें चरणसेवा घडे तुझी ॥ध्रु.॥

वाखाणीन कीर्ती आपुलिया मुखें । नाचेन मी सुखें तुजपुढें ॥२॥

करूनि कामारी दास दीनाहुनी । आपुला अंगणीं ठाव मज ॥३॥

तुका ह्मणे आह्मी मृत्युलोकीं भले । तुझे चि अंखिले पांडुरंगा ॥४॥

माझे अंतरींचें तो चि जाणे एक । वैकुंठनायक पांडुरंग ॥१॥

जीव भाव त्याचे ठेवियेला पायीं । मज चिंता नाहीं कवणेविशीं ॥ध्रु.॥

सुखसमारंभें संतसमागमें । गाऊं वाचे नाम विठोबाचें ॥२॥

गातां पुण्य होय आइकतां लाभ । संसारबंद तुटतील ॥३॥

तुका ह्मणे जीव तयासी विकिला । आणीक विठ्ठलाविण नेणें ॥४॥

कथा दुःख हरी कथा मुक्त करी । कथा याची बरी विठोबाची ॥१॥

कथा पाप नासी उद्धरिले दोषी । समाधि कथेसी मूढजना ॥ध्रु.॥

कथा तप ध्यान कथा अनुष्ठान । अमृत हे पान हरिकथा ॥२॥

कथा मंत्रजप कथा हरी ताप । कथाकाळी कांप किळकाळासी ॥३॥

तुका ह्मणे कथा देवाचें ही ध्यान । समाधि लागोन उभा तेथें ॥४॥

काय ऐसा सांगा । धर्म मज पांडुरंगा ॥१॥

तुझे पायीं पावें ऐसा । जेणें उगवे हा फांसा ॥ध्रु.॥

करीं कृपादान । तैसें बोलवीं वचन ॥२॥

तुका ह्मणे देवा । माझें हृदय वसवा ॥३॥

भला ह्मणे जन । परि नाहीं समाधान ॥१॥

माझें तळमळी चित्त । अंतरलें दिसे हित ॥ध्रु.॥

कृपेचा आधार । नाहीं दंभ जाला भार ॥२॥

तुका ह्मणे कृपे । अंतराय कोण्या पापें ॥३॥

शिकविले बोल । बोलें तैसी नाहीं ओल ॥१॥

आतां देवा संदेह नाहीं । वांयां गेलों यासी कांहीं ॥ध्रु.॥

एकांताचा वास । नाहीं संकल्पाचा नास ॥२॥

बुद्धि नाहीं िस्थर । तुका ह्मणे शब्दा धीर ॥३॥

उचिताचा दाता । कृपावंता तूं अनंता ॥१॥

कां रे न घालिसी धांव । तुझें उच्चारितां नांव ॥ध्रु.॥

काय बळयुक्ति । नाहीं तुझे अंगीं शक्ति ॥२॥

तुका ह्मणे तूं विश्वंभर । ओस माझें कां अंतर ॥३॥

वाहवितों पुरीं । आतां उचित तें करीं ॥१॥

माझी शक्ति नारायणा । कींव भाकावी करुणा ॥ध्रु.॥

आह्मां ओढी काळ। तुझें क्षीण झालें बळ ॥२॥

तुका ह्मणे गोडी । जीवा मातेचिया ओढी ॥३॥

आतां घेइप माझें । भार सकळ ही ओझें ॥१॥

काय करिसी होई वाड । आलों पोटासीं दगड ॥ध्रु.॥

तूं चि डोळे वाती। होई दीपक सांगातीं ॥२॥

तुका ह्मणे कांहीं । विचाराया चाड नाहीं ॥३॥

असोत हे बोल । अवघें तूं चि भांडवल ॥१॥

माझा मायबाप देवा । सज्जन सोयरा केशवा ॥ध्रु.॥

गाळियेले भेद । सारियेले वादावाद ॥२॥

तुका ह्मणे मधीं । आतां न पडे उपाधि ॥३॥

करीन कोल्हाळ । आतां हा चि सर्वकाळ ॥१॥

आतां ये वो माझे आई । देइप भातुकें विठाई ॥ध्रु.॥

उपायासी नाम। दिलें याचें पुढें क्षेम ॥२॥

बीज आणि फळ । हें चि तुका ह्मणे मूळ ॥३॥

धनासीं च धन । करी आपण जतन ॥१॥

तुज आळवितां गोडी । पांडुरंगा खरी जोडी ॥ध्रु.॥

जेविल्याचें खरें । वरी उमटे ढेंकरें ॥२॥

तुका ह्मणे धाय । तेथें कोठें उरे हाय ॥३॥

अनुभवा आलें । माझें चित्तींचें क्षरलें ॥१॥

असे जवळी अंतर । फिरे आवडीच्या फेरें ॥ध्रु.॥

खादलें चि वाटे । खावें भेटलें चि भेटे ॥२॥

तुका ह्मणे उभें । आह्मी राखियेलें लोभें ॥३॥

पोटीं शूळ अंगीं उटी चंदनाची । आवडी सुखाची कोण तया ॥१॥

तैसें मज कां गा केलें पंढरिराया । लौकिक हा वांयां वाढविला ॥ध्रु.॥

ज्वरिलियापुढें वाढिलीं मिष्टान्नें । काय चवी तेणें घ्यावी त्याची ॥२॥

तुका ह्मणे मढें शृंगारिलें वरी । ते चि जाली परी मज देवा ॥३॥

बेगडाचा रंग राहे कोण काळ । अंगें हें पितळ न देखतां ॥१॥

माझें चित्त मज जवळीच गो ही । तुझी मज नाहीं भेटी ऐसें ॥ध्रु.॥

दासीसुतां नाहीं पितियाचा ठाव । अवघें चि वाव सोंग त्याचें ॥२॥

तुका ह्मणे माझी केली विटंबना । अनुभवें जना येईल कळों ॥३॥

मजपुढें नाहीं आणीक बोलता । ऐसें कांहीं चित्ता वाटतसें ॥१॥

याचा कांहीं तुह्मीं देखा परिहार । सर्वज्ञा उदार पांडुरंगा ॥ध्रु.॥

काम क्रोध नाहीं सांडिलें आसन । राहिले वसोन देहामध्यें ॥२॥

तुका ह्मणे आतां जालों उतराई । कळों यावें पायीं निरोपिलें ॥३॥

सावित्रीची विटंबण । रांडपण करीतसे ॥१॥

काय जाळावें तें नांव । अवघें वाव असे तें ॥ध्रु.॥

कुबिर नांव मोळी वाहे। कैसी पाहें फजिती ॥२॥

तुका ह्मणे ठुणगुण देखें । उगीं मूर्ख काुंफ्दतां ॥३॥

न गमेसी जाली दिवसरजनी । राहिलों लाजोनि नो बोलावें ॥१॥

रुचिविण काय शब्द वा†या माप । अनादरें कोप येत असे ॥ध्रु.॥

आपुलिया रडे आपुलें चि मन । दाटे समाधान पावतसें ॥२॥

तुका ह्मणे तुह्मी असा जी जाणते । काय करूं रिते वादावाद ॥३॥

मेल्यावरि मोक्ष संसारसंबंधें । आरालिया बधे ठेवा आह्मां ॥१॥

वागवीत संदेह राहों कोठवरी । मग काय थोरी सेवकाची ॥ध्रु.॥

गाणें गीत आह्मां नाचणें आनंदें । प्रेम कोठें भेदें अंगा येतें ॥२॥

तुका ह्मणे किती सांगावे दृष्टांत । नसतां तूं अनंत सानकुळ ॥३॥

एकाएकीं आतां असावेंसें वाटे । तरि च हे खोटे चाळे केले ॥१॥

वाजवूनि तोंड घातलों बाहेरी । कुल्प करुनी दारीं माजी वसा ॥ध्रु.॥

उजेडाचा केला दाटोनि अंधार । सवें हुद्देदार चेष्टाविला ॥२॥

तुका ह्मणे भय होतें तों चि वरी । होती कांहीं उरी स्वामिसेवा ॥३॥

काय नव्हेसी तूं एक । देखों कासया पृथक ॥१॥

मुंग्या कैंचे मुंगळे । नटनाट्य तुझे चाळे ॥ध्रु.॥

जाली तरी मर्यादा। किंवा त्रासावें गोविंदा ॥२॥

तुका ह्मणे साचा । कोठें जासी हृदयींचा ॥३॥

कां जी वाढविलें । न लगतां हें उगलें ॥१॥

आतां मानितां कांटाळा । भोवतीं मिळालिया बाळा ॥ध्रु.॥

लावूनियां सवे। पळतां दिसाल बरवे ॥२॥

तुका ह्मणे बापा । येतां न कळा चि रूपा ॥३॥

क्षुधेलिया अन्न । द्यावें पात्र न विचारून ॥१॥

धर्म आहे वर्मा अंगीं । कळलें पाहिजे प्रसंगीं ॥ध्रु.॥

द्रव्य आणि कन्या। येथें कुळ कर्म शोधण्या ॥२॥

तुका ह्मणे पुण्य गांठी । तरि च उचितासी भेटी ॥३॥

वेचावें तें जीवें । पूजा घडे ऐशा नावें ॥१॥

बिगारीची ते बिगारी । साक्षी अंतरींचा हरी ॥ध्रु.॥

फळ बीजाऐसें । कार्यकारणासरिसें ॥२॥

तुका ह्मणे मान । लवणासारिखें लवण ॥३॥

मज नाहीं धीर । तुह्मी न करा अंगीकार ॥१॥

ऐसें पडिलें विषम । बळी देवाहूनि कर्म ॥ध्रु.॥

चालों नेणें वाट । केल्या न पवा बोभाट ॥२॥

वेचों नेणे जीवें । तुका उदास धरिला देवें ॥३॥

तळमळी चित्त दर्शनाची आशा । बहु जगदीशा करुणा केली ॥१॥

वचनीं च संत पावले स्वरूप । माझें नेदी पाप योगा येऊं ॥ध्रु.॥

वेठीऐसा करीं भक्तिवेवसाव । न पवे चि जीव समाधान ॥२॥

तुका ह्मणे कइप देसील विसांवा । पांडुरंगे धांवा घेतें मन ॥३॥

हागतां ही खोडी । चळण मोडवितें काडी ॥१॥

ऐसे अनावर गुण । आवरावे काय ह्मुण ॥ध्रु.॥

नाहीं जरी संग । तरी बडबडविती रंग ॥२॥

तुका ह्मणे देवा । तुमची न घडे चि सेवा ॥३॥

देह निरसे तरी । बोलावया नुरे उरी ॥१॥

येर वाचेचें वाग्जाळ । अळंकारापुरते बोल ॥ध्रु.॥

काचें तरी कढे । जाती ऐसें चित्त ओढे ॥२॥

विष्णुदास तुका । पूर्ण धनी जाणे चुका ॥३॥

खोट्याचा विकरा । येथें नव्हे कांच हिरा ॥१॥

काय दावायाचें काम । उगा च वाढवावा श्रम ॥ध्रु.॥

परीक्षकाविण । मिरवों जाणों तें तें हीण ॥२॥

तुका पायां पडे । वाद पुरे हे झगडे ॥३॥

पंढरीस घडे अतित्यायें मृत्य । तो जाय पतित अधःपाता ॥१॥

दुराचारें मोक्ष सुखाचे वसति । भोळी बाळमूर्ति पांडुरंग ॥ध्रु.॥

केला न सहावे तीर्थउपवास । कथेविण दोषसाधन तें ॥२॥

कालियापें भेद मानितां निवडे । श्रोत्रियांसी जोडे आंतेजेता ॥३॥

माहेरीं सलज्ज ते जाणा सिंदळी । काळिमा काजळी पावविते ॥४॥

तुका ह्मणे तेथें विश्वास जतन । पुरे भीमास्नान सम पाय ॥५॥

चातुर्याच्या अनंतकळा । सत्या विरळा जाणत ॥१॥

हांसत्यासवें हांसे जन । रडतां भिन्न पालटे ॥ध्रु.॥

जळो ऐसे वांजट बोल । गुणां मोल भूस मिथ्या ॥२॥

तुका ह्मणे अंधऑयाऐसें । वोंगळ पिसें कौतुक ॥३॥

नयो वाचे अनुचित वाणी । नसो मनीं कुडी बुद्धि ॥१॥

ऐसें मागा अरे जना । नारायणा विनवूनि ॥ध्रु.॥

कामक्रोधां पडो चिरा । ऐसा बरा सायास ॥२॥

तुका ह्मणे नानाछंदें । या विनोदें न पडावें ॥३॥

माझिया देहाची मज नाहीं चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥१॥

इिच्छतां ते मान मागा देवापासीं । आसा संचितासी गुंपले हो ॥ध्रु.॥

देह आह्मी केला भोगाचे सांभाळीं । राहिलों निराळीं मानामानां ॥२॥

तुका ह्मणे कोणें वेचावें वचन । नसतां तो सीण वाढवावा ॥३॥

धरितां इच्छा दुरी पळे । पाठी सोहळे उदासा ॥१॥

ह्मणऊनि असट मन । नका खुण सांगतों ॥ध्रु.॥

आविसापासी अवघें वर्म । सोस श्रम पाववी ॥२॥

तुका ह्मणे बीज न्यावें । तेथें यावें फळानें ॥३॥

वेद शास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका ॥१॥

ताकिर्याचें अंग आपणा पारिखें । माजि†यासारिखें वाईचाळे ॥ध्रु.॥

माता निंदी तया कोण तो आधार । भंगलें खपर याचे नावें ॥२॥

तुका ह्मणे आडराणें ज्याची चाली । तयाची ते बोली मिठेंविण ॥३॥

कस्तुरीचें अंगीं मीनली मृत्तिका । मग वेगळी कां येईल लेखूं ॥१॥

तयापरि भेद नाहीं देवभक्तीं । संदेहाच्या युक्ति सरों द्याव्या ॥ध्रु.॥

इंधनें ते आगी संयोगाच्या गुणें । सागरा दरुषणें वाहाळ तों चि ॥२॥

तुका ह्मणे माझें साक्षीचें वचन । येथें तों कारण शुद्ध भाव ॥३॥

भक्ति तें नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मीं भोग ब्रह्मतनु ॥१॥

देहाच्या निरसनें पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥ध्रु.॥

उदक अिग्न धान्य जाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥२॥

तुका ह्मणे मज केले ते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥३॥

श्रीसंतांचिया माथा चरणांवरी । साष्टांग हें करीं दंडवत ॥१॥

विश्रांती पावलों सांभाळउत्तरीं । वाढलें अंतरीं प्रेमसुखें ॥ध्रु.॥

डौरली हे काया कृपेच्या वोरसें । नव्हे अनारिसें उद्धरलों ॥२॥

तुका ह्मणे मज न घडतां सेवा । पूर्वपुण्यठेवा वोडवला ॥३॥

नेणों काय नाड । आला उचित काळा आड ॥१॥

नाहीं जाली संतभेटी । येवढी हानी काय मोठी ॥ध्रु.॥

सहज पायांपासीं । जवळी पावलिया ऐसी ॥२॥

चुकी जाली आतां काय। तुका ह्मणे उरली हाय ॥३॥

आणीक कांहीं नेणें । असें पायांच्या चिंतनें ॥१॥

माझा न व्हावा विसर । नाहीं आणीक आधार ॥ध्रु.॥

भांडवल सेवा। हा चि ठेवियेला ठेवा ॥२॥

करीं मानभावा । तुका विनंती करी देवा ॥३॥

आरुश माझी वाणी बोबडीं उत्तरें । केली ते लेकुरें सलगी पायीं ॥१॥

करावें कवतुक संतीं मायबापीं । जीवन देउनि रोपीं विस्तारिजे ॥ध्रु.॥

आधारें वदली प्रसादाची वाणी । उिच्छष्टसेवणी तुमचिया ॥२॥

तुका ह्मणे हे चि करितों विनंती । मागोनि पुढती सेवादान ॥३॥

पुरुषा हातीं कंकणचुडा । नवल दोडा वृत्ति या ॥१॥

पाहा कैसी विटंबणा । नारायणा देखिली ॥ध्रु.॥

जळो ऐसी िब्रदावळी। भाटवोळीपणाची ॥२॥

तुका ह्मणे पाहों डोळां । अवकळा नये हे ॥३॥

वितीयेवढेंसें पोट । केवढा बोभाट तयाचा ॥१॥

जळो याची विटंबना । भूक जना नाचवी ॥ध्रु.॥

अभिमान सिरीं भार । जाले खर तृष्णेचे ॥२॥

तुका ह्मणे नरका जावें । हा चि जीवें व्यापार ॥३॥

सेवटासी जरी आलें । तरी जालें आंधळें ॥१॥

स्वहिताचा लेश नाहीं । दगडा कांहीं अंतरीं ॥ध्रु.॥

काय परिसासवें भेटी । खापरखुंटी जालिया ॥२॥

तुका ह्मणे अधम जन । अवगुणें चि वाढवी ॥३॥

प्रायिश्चत्तें देतो तुका । जातो लोकां सकळां ॥१॥

धरितील ते तरती मनीं । जाती घाणी वांयां त्या ॥ध्रु.॥

निग्रहअनुग्रहाचे ठाय । देतो घाय पाहोनि ॥२॥

तुका जाला नरसिंहीं । भय नाहीं कृपेनें ॥३॥

दुर्जनाचें अंग अवघें चि सरळ । नर्काचा कोथळ सांटवण ॥१॥

खाय अमंगळ बोले अमंगळ । उठवी कपाळ संघष्टणें ॥ध्रु.॥

सर्पा मंत्र चाले धरावया हातीं । खळाची ते जाती निखळे चि ॥२॥

तुका ह्मणे कांहीं न साहे उपमा । आणीक अधमा वोखट्याची ॥३॥

ऐका जी संतजन । सादर मन करूनि ॥१॥

सकळांचें सार एक । कंटक ते तजावे ॥ध्रु.॥

विशेषता कांद्याहूनि । सेवित्या घाणी आगळी ॥२॥

तुका ह्मणे ज्याची जोडी । ते परवडी बैसीजे ॥३॥

आज्ञा पाळुनियां असें एकसरें । तुमचीं उत्तरें संतांचीं हीं ॥१॥

भागवूनि देह ठेवियेला पायीं । चरणावरि डोई येथुनें चि ॥ध्रु.॥

येणें जाणें हें तों उपाधीचे मूळ । पूजा ते सकळ अकर्तव्य ॥२॥

तुका ह्मणे असें चरणींचा रज । पदीं च सहज जेथें तेथें ॥३॥

न संडावा ठाव । ऐसा निश्चयाचा भाव ॥१॥

आतां पुरे पुन्हा यात्रा । हें चि सारूनि सर्वत्रा ॥ध्रु.॥

संनिध चि सेवा । असों करुनियां देवा ॥२॥

आज्ञोच्या पाळणें । असें तुका संतां ह्मणे ॥३॥

उपाधीजें बीज । जळोनि राहिलें सहज ॥१॥

आह्मां राहिली ते आतां । चाली देवाचिया सत्ता ॥ध्रु.॥

प्राधीन तें जिणें । केलें सत्ता नारायणें ॥२॥

तुका ह्मणे जाणें पाय । खुंटले आणीक उपाय ॥३॥

गोविंदावांचोनि वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते ॥१॥

मस्तक सांडूनि सिसफूल गुडघां । चार तो अवघा बावऑयाचा ॥ध्रु.॥

अंगभूत ह्मूण पूजितो वाहाणा । ह्मणतां शाहाणा येइल कैसा ॥२॥

तुका ह्मणे वेश्या सांगे सवासिणी । इतर पूजनीं भाव तैसा ॥३॥

कुत†याऐसें ज्याचें जिणें । संग कोणी न करीजे ॥१॥

जाय तिकडे हाडहाडी । गो†हवाडी च सोइरीं ॥ध्रु.॥

अवगुणांचा त्याग नाहीं । खवळे पाहीं उपदेशें ॥२॥

तुका ह्मणे कैंची लवी । ठेंग्या केवीं अंकुर ॥३॥

सर्वथा ही खोटा संग । उपजे भंग मनासी ॥१॥

बहु रंगें भरलें जन । संपन्न चि अवगुणी ॥ध्रु.॥

सेविलिया निःकामबुद्धी। मदें शुद्धी सांडवी ॥२॥

त्रासोनियां बोले तुका । आतां लोकां दंडवत ॥३॥

उपचारासी वांज जालों । नका बोलों यावरी ॥१॥

असेल तें असो तैसें । भेटीसरिसें नमन ॥ध्रु.॥

दुस†यामध्यें कोण मिळे । छंद चाळे बहु मतें ॥२॥

एकाएकीं आतां तुका । लौकिका या बाहेरी ॥३॥

मी तें मी तूं तें तूं । कुंकुड हें लाडसी ॥१॥

वचनासी पडो तुटी । पोटींचें पोटीं राखावें ॥ध्रु.॥

तेथील तेथें येथील येथें । वेगऑया कुंथे कोण भारें ॥२॥

याचें यास त्याचें त्यास । तुक्यानें कास घातली ॥३॥

लाडाच्या उत्तरीं वाढविती कलहे । हा तो अमंगळ जातिगुण ॥१॥

तमाचे शरीरीं विटाळ चि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥ध्रु.॥

कवतुकें घ्यावे लेंकराचे बोल । साहिलिया मोल ऐसें नाहीं ॥२॥

तुका ह्मणे काय उपदेश खळा । न्हाउनि काउळा खतें धुंडी ॥३॥

आतां मज देवा । इचे हातींचें सोडवा ॥१॥

पाठी लागलीसे लांसी । इच्छा जिते जैसी तैसी ॥ध्रु.॥

फेडा आतां पांग। अंगीं लपवुनी अंग ॥२॥

दुजें नेणें तुका । कांहीं तुह्मासी ठाउका ॥३॥

बहु वाटे भये । माझे उडी घाला दये ॥१॥

फांसा गुंतलों लिगाडीं । न चले बळ चरफडी ॥ध्रु.॥

कुंटित चि युक्ति । माझ्या जाल्या सर्व शक्ति ॥२॥

तुका ह्मणे देवा । काममोहें केला गोवा ॥३॥

विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळ चि सखें वोंगळाचें ॥१॥

नये पाहों कांहीं गो†हवाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापें ॥ध्रु.॥

भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी सीण दरुषणें ॥२॥

तुका ह्मणे छी थूं जया घरीं धन । तेथें तें कारण कासयाचें ॥३॥

चावळलें काय न करी बडबड । न ह्मणे फिकें गोड भुकेलें तें ॥१॥

उमजल्याविण न धरी सांभाळ । असो खळखळ जनाची हे ॥ध्रु.॥

गरज्या न कळे आपुलिया चाडा । करावी ते पीडा कोणा काई ॥२॥

तुका ह्मणे भोग भोगितील भोगें । संचित तें जोगें आहे कोणा ॥३॥

आपुला तो देह आह्मां उपेक्षीत । कोठें जाऊं हित सांगों कोणा ॥१॥

कोण नाहीं दक्ष करितां संसार । आह्मीं हा विचार वमन केला ॥ध्रु.॥

नाहीं या धरीत जीवित्वाची चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥२॥

तुका ह्मणे असों चिंतोनियां देवा । मी माझें हा हेवा सारूनियां ॥३॥

चाकरीवांचून । खाणें अनुचित वेतन ॥१॥

धणी काढोनियां निजा । करील ये कामाची पूजा ॥ध्रु.॥

उचितावेगळें । अभिलाषें तोंड काळें ॥२॥

सांगे तरी तुका । पाहा लाज नाहीं लोकां ॥३॥

बरें सावधान । राहावें समय राखोन ॥१॥

नाहीं सारखिया वेळा । अवघ्या पावतां अवकळा ॥ध्रु.॥

लाभ अथवा हानी । थोड्यामध्यें च भोवनी ॥२॥

तुका ह्मणे राखा । आपणा नाहीं तोंचि वाखा ॥३॥

काय करूं जी दातारा । कांहीं न पुरे संसारा ॥१॥

जाली माकडाची परि । येतों तळा जातों वरी ॥ध्रु.॥

घालीं भलते ठायीं हात । होती शिव्या बैस लात ॥२॥

आदि अंतीं तुका । सांगे न कळे झाला चुका ॥३॥

धर्म तो न कळे । काय झांकितील डोळे ॥१॥

जीव भ्रमले या कामें । कैसीं कळों येती वर्में ॥ध्रु.॥

विषयांचा माज । कांहीं धरूं नेदी लाज ॥२॥

तुका ह्मणे लांसी । माया नाचविते कैसी ॥३॥

दुर्जनाची जोडी । सज्जनाचे खेंटर तोडी ॥१॥

पाहे निमित्य तें उणें । धांवे छळावया सुनें ॥ध्रु.॥

न ह्मणे रामराम । मनें वाचे हें चि काम ॥२॥

तुका ह्मणे भागा । आली निंदा करी मागा ॥३॥

शादीचें तें सोंग । संपादितां जरा वेंग ॥१॥

पाहा कैसी विटंबना । मूर्खा अभाग्याची जना ॥ध्रु.॥

दिसतें तें लोपी । झिंज्या बोडुनियां पापी ॥२॥

सिंदळी त्या सती । तुका ह्मणे थुंका घेती ॥३॥

भक्ता ह्मणऊनि वंचावें जीवें । तेणें शेण खावें काशासाटीं ॥१॥

नासिले अडबंद कौपीन ते माळा । अडचण राउळामाजी केली ॥ध्रु.॥

अंगीकारिले सेवे अंतराय । तया जाला न्याय खापराचा ॥२॥

तुका ह्मणे कोठें तगों येती घाणीं । आहाच ही मनीं अधीरता ॥३॥

गयाळाचें काम हिताचा आवारा । लाज फजितखोरा असत नाहीं ॥१॥

चित्ता न मिळे तें डोळां सलों येतें । असावें परतें जवळूनि ॥ध्रु.॥

न करावा संग न बोलावी मात । सावधान चित्त नाहीं त्यासी ॥२॥

तुका ह्मणे दुःख देतील माकडें । घालिती सांकडें उफराटें ॥३॥

बहु बरें एकाएकीं । संग चुकी करावा ॥१॥

ऐसें बरें जालें ठावें । अनुभवें आपुल्या ॥ध्रु.॥

सांगावें तें काम मना । सलगी जना नेदावी ॥२॥

तुका ह्मणे निघे अगी । दुजे संगीं आतळतां ॥३॥

बोलिले कीं कवित्व बुडवणें तेव्हां कवित्व बुडवून पांच दिवस होते ॥

अलकापुरीं स्वामी कीर्तनास उभे राहिले तेव्हां कवित्वाचा निषेध करून लोक लोकांनीं फार पीडा केली कीं संसारही नाहीं व परमार्थही बुडविला आणीक कोणी असतें तें जीव देतें मग निद्रा केली ते अभंग ॥ 20

भूतबाधा आह्मां घरीं । हें तों आश्चर्य गा हरी ॥१॥

जाला भक्तीचा कळस । आले वस्तीस दोष ॥ध्रु.॥

जागरणाचें फळ । दिली जोडोनि तळमळ ॥२॥

तुका ह्मणे देवा । आहाच कळों आली सेवा ॥३॥

नाहीं जों वेचलों जिवाचिया त्यागें । तोंवरी वाउगें काय बोलों ॥१॥

जाणिवलें आतां करीं ये उदेश । जोडी किंवा नाश तुमची जीवें ॥ध्रु.॥

ठायींचे चि आलें होतें ऐसें मना । जावें ऐसें वना दृढ जालें ॥२॥

तुका ह्मणे मग वेचीन उत्तरें । उद्धेसिलें खरें जाल्यावरी ॥३॥

करूं कवि काय आतां नाही लाज । मज भक्तराज हांसतील ॥१॥

आतां आला एका निवाड्याचा दिस । सत्याविण रस विरसला ॥ध्रु.॥

अनुभवाविण कोण करी पाप । रिते चि संकल्प लाजलावे ॥२॥

तुका ह्मणे आतां न धरवे धीर । नव्हे जीव िस्थर माझा मज ॥३॥

नाहीं आइकत तुह्मी माझे बोल । कासया हें फोल उपणूं भूस ॥१॥

येसी तें करीन बैसलिया ठाया । तूं चि बुझावया जवळी देवा ॥ध्रु.॥

करावे ते केले सकळ उपाय । आतां पाहों काय अझुनि वास ॥२॥

तुका ह्मणे आला आज्ञोसी सेवट । होऊनियां नीट पायां पडों ॥३॥

नव्हे तुह्मां सरी । येवढें कारण मुरारी ॥१॥

मग जैसा तैसा काळ । दाट सारावा पातळ ॥ध्रु.॥

स्वामींचें तें सांडें । पुत्र होतां काळतोंडें ॥२॥

शब्दा नाहीं रुची । मग कोठें तुका वेची ॥३॥

केल्यापुरती आळी । कांहीं होते टाळाटाळी ॥१॥

सत्यसंकल्पाचें फळ । होतां न दिसे चि बळ ॥ध्रु.॥

दळणांच्या ओव्या । रित्या खरें मापें घ्याव्या ॥२॥

जातीं उखळें चाटूं । तुका ह्मणे राज्य घाटूं ॥३॥

आतां नेम जाला । या च कळसीं विठ्ठला ॥१॥

हातीं न धरीं लेखणी । काय भुसकट ते वाणी ॥ध्रु.॥

जाणें तेणें काळ । उरला सारीन सकळ ॥२॥

तुका ह्मणे घाटी । चाटू कोरडा शेवटीं ॥३॥

पावावे संतोष । तुह्मीं यासाटीं सायास ॥१॥

करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥ध्रु.॥

द्यावें अभयदान । भुमीन पाडावें वचन ॥२॥

तुका ह्मणे परस्परें । कांहीं वाढवीं उत्तरें ॥३॥

बोलतां वचन असा पाठमोरे । मज भाव बरे कळों आले ॥१॥

मागतिलें नये अरुचीनें हातां । नाहीं वरी सत्ता आदराची ॥ध्रु.॥

समाधानासाटीं लाविलासे कान । चोरलें तें मन दिसतसां ॥२॥

तुका ह्मणे आह्मां तुमचे चि फंद । वरदळ छंद कळों येती ॥३॥

काशासाटीं बैसों करूनियां हाट । वाउगा बोभाट डांगोरा हा ॥१॥

काय आलें एका जिवाच्या उद्धारें । पावशी उच्चारें काय हो तें ॥ध्रु.॥

नेदी पट परी अन्नें तों न मरी । आपुलिये थोरीसाटीं राजा ॥२॥

तुका ह्मणे आतां अव्हेरिलें तरी । मग कोण करी दुकान हा ॥३॥

माझा मज नाहीं । आला उबेग तो कांहीं ॥१॥

तुमच्या नामाची जतन । नव्हतां थोर वाटे सीण ॥ध्रु.॥

न पडावी निंदा । कानीं स्वामींची गोविंदा ॥२॥

तुका ह्मणे लाज । आह्मां स्वामीचें तें काज ॥३॥

कांहीं मागणें हें आह्मां अनुचित । वडिलांची रीत जाणतसों ॥१॥

देह तुच्छ जालें सकळ उपाधी । सेवेपाशीं बुद्धि राहिलीसे ॥ध्रु.॥

शब्द तो उपाधि अचळ निश्चय । अनुभव हो काय नाहीं अंगीं ॥२॥

तुका ह्मणे देह फांकिला विभागीं । उपकार अंगीं उरविला ॥३॥

मागितल्यास कर पसरी । पळतां भरी वाखती ॥१॥

काय आह्मी नेणों वर्म । केला श्रम नेणतां ॥ध्रु.॥

बोलतां बरें येतां रागा । कठीण लागा मागेंमागें ॥२॥

तुका ह्मणे येथें बोली । असे चाली उफराटी ॥३॥

असो तुझें तुजपाशीं । आह्मां त्यासी काय चाड ॥१॥

निरोधें कां कोंडूं मन । समाधान असोनी ॥ध्रु.॥

करावा तो उरे आट । खटपट वाढतसे ॥२॥

तुका ह्मणे येउनि रागा । कां मी भागा मुकेन ॥३॥

आहे तें चि पुढें पाहों । बरे आहों येथें चि ॥१॥

काय वाढवूनि काम । उगा च श्रम तृष्णेचा ॥ध्रु.॥

िस्थरावतां ओघीं बरें । चाली पुरें पडेना ॥२॥

तुका ह्मणे विळतां मन । आह्मां क्षण न लगे ॥३॥

सांगा दास नव्हें तुमचा मी कैसा । ऐसें पंढरीशा विचारूनि ॥१॥

कोणासाटीं केली प्रपंचाची होळी । या पायां वेगळी मायबापा ॥ध्रु.॥

नसेल तो द्यावा सत्यत्वासी धीर । नये भाजूं हीर उफराटे ॥२॥

तुका ह्मणे आह्मां आहिक्य परत्रीं । नाहीं कुळगोत्रीं दुजें कांहीं ॥३॥

अनन्यासी ठाव एक सर्वकाजें । एकाविण दुजें नेणे चित्त ॥१॥

न पुरतां आळी देशधडी व्हावें । हें काय बरवें दिसतसे ॥ध्रु.॥

लेंकराचा भार माउलीचे शिरीं । निढळ तें दुरी धरिलिया ॥२॥

तुका ह्मणे किती घातली लांबणी । समर्थ होउनि केवढ्यासाटीं ॥३॥

स्तुती तरि करूं काय कोणापासीं । कीर्त तरि कैसी वाखाणावी ॥१॥

खोट्या तंव नाहीं अनुवादाचें काम । उरला भ्रम वरि बरा ॥ध्रु.॥

ह्मणवावें त्याची खुण नाहीं हातीं । अवकळा फजिती सावकाशें ॥२॥

तुका ह्मणे हेंगे तुमचें माझें तोंड । होऊनिया लंड आळवितों ॥३॥

कांहीं च न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसां ॥१॥

अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ति जाली पुढें ॥ध्रु.॥

बोलिलें वचन हारपलें नभीं । उतरलों तों उभीं आहों तैसीं ॥२॥

तुका ह्मणे कांहीं न करावेंसें जालें । थकित चि ठेलें वित्त उगें ॥३॥

रूपें गोविलें चित्त । पायीं राहिलें नििंश्चत ॥१॥

तुह्मीं देवा अवघे चि गोमटे । मुख देखतां दुःख न भेटे ॥ध्रु.॥

जाली इंिद्रयां विश्रांति । भ्रमतां पीडत ते होतीं ॥२॥

तुका ह्मणे भेटी । सुटली भवबंदाची गांठी ॥३॥

स्वामींनीं तेरा दिवस निद्रा केली. मग भगवंतें येऊन समाधान केलें कीं, कवित्व कोरडें आहे तें काढणें उदकांतून

थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला । जनाचिया बोलासाटीं चित्त क्षोभविलें ॥१॥

भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ध्रु.॥

अवघें घालूनियां कोडें तानभुकेचें सांकडें । योगक्षेम पुढें तुज करणें लागेल ॥२॥

उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद । तुका ह्मणे ब्रीद साच केलें आपुलें ॥३॥

तूं कृपाळू माउली आह्मां दीनांची साउली । न संरित आली बाळवेशें जवळी ॥१॥

माझें केलें समाधान रूप गोजिरें सगुण । निवविलें मन आलिंगन देऊनी ॥ध्रु.॥

कृपा केली जना हातीं पायीं ठाव दिला संतीं । कळों नये चित्तीं दुःख कैसें आहे तें ॥२॥

तुका ह्मणे मी अन्यायी क्षमा करीं वो माझे आई । आतां पुढें काई तुज घालूं सांकडें ॥३॥

कापो कोणी माझी मान सुखें पीडोत दुर्जन । तुज होय सीण तें मी न करीं सर्वथा ॥१॥

चुकी जाली एकवेळा मज पासूनि चांडाळा । उभें करोनियां जळा माजी वह्या राखिल्या ॥ध्रु.॥

नाहीं केला हा विचार माझा कोण अधिकार । समर्थासी भार न कळे कैसा घालावा ॥२॥

गेलें होऊनियां मागें नये बोलों तें वाउगें । पुढिलिया प्रसंगें तुका ह्मणे जाणावें ॥३॥

काय जाणें मी पामर पांडुरंगा तुझा पार । धरिलिया धीर काय एक न करिसी ॥१॥

उताविळ जालों आधीं मतिमंद हीनबुद्धि । परि तूं कृपानिधी नाहीं केला अव्हेर ॥ध्रु.॥

तूं देवांचा ही देव अवघ्या ब्रह्मांडाचा जीव । आह्मां दासां कींव कां भाकणें लागली ॥२॥

तुका ह्मणे विश्वंभरा मी तों पतित चि खरा । अन्याय दुसरा दारीं धरणें बैसलों ॥३॥

नव्हती आली सीसा सुरी अथवा घाय पाठीवरी । तो म्यां केला हरी एवढा तुह्मां आकांत ॥१॥

वांटिलासी दोहीं ठायीं मजपाशीं आणि डोहीं । लागों दिला नाहीं येथें तेथें आघात ॥ध्रु.॥

जीव घेती मायबापें थोड्या अन्याच्या कोपें । हें तों नव्हे सोपें साहों तों चि जाणीतलें ॥२॥

तुका ह्मणे कृपावंता तुज ऐसा नाहीं दाता। काय वाणूं आतां वाणी माझी कुंटली ॥३॥

वर्षाव केला

तूं माउलीहून मयाळ चंद्राहूनि शीतळ । पाणियाहूनि पातळ कल्लोळ प्रेमाचा ॥१॥

देऊं काशाची उपमा दुजी तुज पुरुषोत्तमा । ओंवाळूनि नामा तुझ्या वरूनि टाकिलों ॥ध्रु.॥

तुवां केलें रे अमृता गोड त्या ही तूं परता । पांचां तत्त्वांचा जनिता सकळ सत्तानायक ॥२॥

कांहीं न बोलोनि आतां उगा च चरणीं ठेवितों माथा । तुका ह्मणे पंढरिनाथा क्षमा करीं अपराध ॥३॥

मी अवगुणी अन्यायी किती ह्मणोन सांगों काई । आतां मज पायीं ठाव देइप विठ्ठले ॥१॥

पुरे पुरे हा संसार कर्म बिळवंत दुस्तर । राहों नेदी िस्थर एके ठायीं निश्चळ ॥ध्रु.॥

अनेक बुद्धिचे तरंग क्षणक्षणां पालटती रंग । धरूं जातां संग तंव तो होतो बाधक ॥२॥

तुका ह्मणे आतां अवघी तोडीं माझी चिंता । येऊनि पंढरिनाथा वास करीं हृदयीं ॥३॥

बरें आह्मां कळों आलें देवपण । आतां गुज कोण राखे तुझें ॥१॥

मारिलें कां मज सांग आजिवरी । आतां सरोबरी तुज मज ॥ध्रु.॥

जें आह्मी बोलों तें आहे तुझ्या अंगीं । देईन प्रसंगीं आजि शिव्या ॥२॥

निलाजिरा तुज नाहीं याति कुळ । चोरटा शिंदळ ठावा जना ॥३॥

खासी धोंडे माती जीव जंत झाडें । एकलें उघडें परदेसी ॥४॥

गाढव कुतरा ऐसा मज ठावा बईल तूं देवा भारवाही ॥५॥

लडिका तूं मागें बहुतांसी ठावा । आलें अनुभवा माझ्या तें ही ॥६॥

तुका ह्मणे मज खविळलें भांडा । आतां धीर तोंडा न धरवे ॥७॥

आह्मी भांडों तुजसवें । वर्मी धरूं जालें ठावें ॥१॥

होसी सरड बेडुक । बाग गांढ्या ही पाईक ॥ध्रु.॥

बळ करी तया भ्यावें । पळों लागे तया घ्यावें ॥२॥

तुका ह्मणे दूर परता । नर नारी ना तूं भूता ॥३॥

काय साहतोसी फुका । माझा बुडविला रुका ॥१॥

रीण घराचें पांगिलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ध्रु.॥

चौघांचिया मतें। आधीं खरें केलें होते ॥२॥

तुका ह्मणे यावरी । आतां भीड कोण धरी ॥३॥

प्रीतीचा कलहे पदरासी घाली पीळ । सरों नेदी बाळ मागें पुढें पित्यासी ॥१॥

काय लागे त्यासी बळ हेडावितां कोण काळ । गोवितें सबळ जाळीं स्नेहसूत्राचीं ॥ध्रु.॥

सलगी दिला लाड बोले तें तें वाटे गोड । करी बुझावोनि कोड हातीं देऊनि भातुकें ॥२॥

तुका ह्मणे बोल कोणा हें कां नेणां नारायणा । सलगीच्या वचना कैचें उपजे विषम।3॥

भार देखोनि वैष्णवांचे । दूत पळाले यमाचे ॥१॥

आले आले वैष्णववीर । काळ कांपती असुर ॥ध्रु.॥

गरुडटकयाच्या भारें । भूमी गर्जे जेजेकारें ॥ ।2॥

तुका ह्मणे काळ । पळे देखोनियां बळ ॥३॥

रंगीं रंगें रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगें ॥१॥

शरीर जायांचें ठेवणें । धरिसी अभिळास झणें ॥ध्रु.॥

नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥२॥

अंतकाळींचा सोइरा । तुका ह्मणे विठो धरा ॥३॥

जन्मा येउनि काय केलें । तुवां मुदल गमाविलें ॥१॥

कां रे न फिरसी माघारा । अझुनि तरी फजितखोरा ॥ध्रु.॥

केली गांठोळीची नासी । पुढें भीके चि मागसी ॥२॥

तुका ह्मणे ठाया । जाइप आपल्या आलिया ॥३॥

पंढरीस जाते निरोप आइका । वैकुंठनायका क्षम सांगा ॥१॥

अनाथांचा नाथ हें तुझें वचन । धांवें नको दीन गांजों देऊं ॥ध्रु.॥

ग्रासिलें भुजंगें सर्पें महाकाळें । न दिसे हें जाळें उगवतां ॥२॥

कामक्रोधसुनीं श्वापदीं बहुतीं । वेढलों आवताअ मायेचिये ॥३॥

मृदजलनदी बुडविना तरी । आणूनियां वरी तळा नेते ॥४॥

तुका ह्मणे तुवां धरिलें उदास । तरि पाहों वास कवणाची ॥५॥

कृपाळू सज्जन तुह्मी संतजन । हें चि कृपादान तुमचें मज ॥१॥

आठवण तुह्मी द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ॥ध्रु.॥

अनाथ अपराधी पतिताआगळा । परि पायांवेगळा नका करूं ॥२॥

तुका ह्मणे तुह्मी निरविल्यावरि । मग मज हरि उपेक्षीना ॥३॥

संतांचिया पायीं माझा विश्वास । सर्वभावें दास जालों त्यांचा ॥१॥

ते चि माझें हित करिती सकळ । जेणें हा गोपाळ कृपा करी ॥ध्रु.॥

भागलिया मज वाहतील कडे । यांचियातें जोडे सर्व सुख ॥२॥

तुका ह्मणे शेष घेईन आवडी । वचन न मोडीं बोलिलों तें ॥३॥

लाघवी सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी । उपजवी पाळूनि संसारि नानापरिचीं लाघवें ॥१॥

पुरोनि पंढरिये उरलें भक्तिसुखें लांचावलें । उभें चि राहिलें कर कटीं न बैसे ॥ध्रु.॥

बहु काळें ना सावळें बहु कठिण ना कोंवळें । गुणत्रया वेगळें बहुबळें आथीलें ॥२॥

असोनि नसे सकळांमधीं मना अगोचर बुद्धी । स्वामी माझा कृपानिधि तुका ह्मणे विठ्ठल ॥३॥

कीर्तन ऐकावया भुलले श्रवण । श्रीमुख लोचन देखावया ॥१॥

उदित हें भाग्य होईल कोणे काळीं । चित्त तळमळी ह्मणऊनि ॥ध्रु.॥

उतावीळ बाह्या भेटिलागीं दंड । लोटांगणीं धड जावयासी ॥२॥

तुका ह्मणे माथा ठेवीन चरणीं । होतील पारणी इंिद्रयांची ॥३॥

नाम घेतां कंठ शीतळ शरीर । इंिद्रयां व्यापार नाठवती ॥१॥

गोड गोमटें हें अमृतासी वाड । केला कइवाड माझ्या चित्तें ॥ध्रु.॥

प्रेमरसें जाली पुष्ट अंगकांति । त्रिविध सांडिती ताप अंग ॥२॥

तुका ह्मणे तेथें विकाराची मात । बोलों नये हित सकळांचें ॥३॥

स्वामिकाज गुरुभक्ति । पितृवचन सेवा पति ॥१॥

हे चि विष्णूची महापूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥ध्रु.॥

सत्य बोले मुखें । दुखवे आणिकांच्या दुःखें ॥२॥

निश्चयाचें बळ । तुका ह्मणे तें च फळ ॥३॥

चित्त घेऊनियां तू काय देसी । ऐसें मजपासीं सांग आधीं ॥१॥

तरि च पंढरिराया करिन साटोवाटी । नेघें जया तुटी येईल तें ॥ध्रु.॥

रिद्धिसिद्धि कांहीं दाविसी अभिळास । नाहीं मज आस मुक्तीची ही ॥२॥

तुका ह्मणे तुझें माझें घडे तर । भक्तीचा भाव रे देणें घेणें ॥३॥

तुझा संग पुरे संग पुरे । संगति पुरे विठोबा ॥१॥

आपल्या सारिखें करिसी दासां । भिकारिसा जग जाणे ॥ध्रु.॥

रूपा नाहीं ठाव नांवा । तैसें आमुचें करिसी देवा ॥२॥

तुका ह्मणे तोयें आपुलें भेंडोळें । करिसी वाटोळें माझें तैसें ॥३॥

आतां मज तारीं । वचन हें साच करीं ॥१॥

तुझें नाम दिनानाथ । िब्रदावळी जगविख्यात ॥ध्रु.॥

कोण लेखी माझ्या दोषा । तुझा त्रिभुवनीं ठसा ॥२॥

वांयां जातां मज । तुका ह्मणे तुह्मां लाज ॥३॥

विठ्ठल आमुचा निजांचा । सज्जन सोयरा जीवाचा ॥१॥

मायबाप चुलता बंधु । अवघा तुजशीं संबंधु ॥ध्रु.॥

उभयकुळींसाक्ष। तूं चि माझा मातुळपक्ष ॥२॥

समर्पिली काया । तुका ह्मणे पंढरिराया ॥३॥

वेदाचा तो अर्थ आह्मांसी च ठावा । येरांनी वाहावा भार माथां ॥१॥

खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं । भार धन वाही मजुरीचें ॥ध्रु.॥

उत्पित्तपाळणसंहाराचें निज । जेणें नेलें बीज त्याचे हातीं ॥२॥

तुका ह्मणे आलें आपण चि फळ । हातोहातीं मूळ सांपडलें ॥३॥

आमचा तूं ॠणी ठायींचा चि देवा । मागावया ठेवा आलों दारा ॥१॥

वर्म तुझें आह्मां सांपडलें हातीं । धरियेले चित्तीं दृढ पाय ॥ध्रु.॥

बैसलों धरणें कोंडोनियां द्वारीं । आंतूनि बाहेरी येओं नेदी ॥२॥

तुज मज सरी होइल या विचारें । जळो भांडखोरें निलाजिरीं ॥३॥

भांडवल माझें मिरविसी जनीं । सहजर वोवनी नाममाळा ॥४॥

तुका ह्मणे आह्मी केली जिवें साटी । तुह्मां आह्मां तुटी घालूं आतां ॥५॥

काय धोविलें बाहेरी मन मळलें अंतरीं । गादलें जन्मवरीं असत्यकाटें काटलें ॥१॥

सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करीं रे मन वाचा । तुझिया चित्ताचा तूं च ग्वाही आपुला ॥ध्रु.॥

पापपुण्यविटाळ देहीं भरितां न विचारिसी कांहीं । काय चाचपसी मही जी अखंड सोंवळी ॥२॥

कामक्रोधा वेगळा ऐसा होइप कां सोंवळा । तुका ह्मणे कळा गुंडुन ठेवीं कुसरी ॥३॥

ऊंस वाढवितां वाढली गोडी । गुळ साकर हे त्याची परवडी ॥१॥

सत्यकर्में आचरें रे । बापा सत्यकर्में आचरें रे ।

सत्यकर्में आचरें होईल हित । वाढेल दुःख असत्याचें ॥ध्रु.॥

साकरेच्या आळां लाविला कांदा । स्थूळसानापरि वाढे दुगपधा ॥२॥

सत्य असत्य हें ऐसिया परी । तुका ह्मणे याचा विचार करीं ॥३॥

पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी ॥१॥

सार तो भाव सार तो भाव । अनुभवीं देव ते चि जाले ॥ध्रु.॥

उदका भिन्न पालट काई । गंगा गोड येरां चवी काय नाहीं ॥२॥

तुका ह्मणे हें भाविकांचें वर्म । येरीं धर्माधर्म विचारावें ॥३॥

जन्मा येऊनि कां रे निदसुरा । जायें भेटी वरा रखुमाईच्या ॥१॥

पाप ताप दैन्य जाईल सकळ । पावसी अढळउत्तम तें ॥ध्रु.॥

संतमहंतसिद्धहरिदासदाटणी । फिटती पारणीं इंिद्रयांचीं ॥२॥

तुका ह्मणे तेथें नामाचा गजर । फुकाची अपार लुटी घेइप ॥३॥

काय धोविलें कातडें । काळकुट भीतरि कुडें ॥१॥

उगा राहें लोकभांडा । चाळविल्या पोरें रांडा ॥ध्रु.॥

घेसी बुंथी पानवथां । उगा च हालविसी माथा ॥२॥

लावूनि बैसे टाळी । मन इंिद्रयें मोकळीं ॥३॥

हालवीत बैस माळा । विषयजप वेळोवेळां ॥४॥

तुका ह्मणे हा व्यापार । नाम विठोबाचें सार ॥५॥

येइप वो येइप वो येइप धांवोनियां । विलंब कां वायां लाविला कृपाळे ॥१॥

विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके । कोठें गुंतलीस अगे विश्वव्यापके ॥ध्रु.॥

न करीं न करीं न करीं आतां अळस अव्हेरु । व्हावया प्रकट कैंचें दूरि अंतरु ॥२॥

नेघें नेघें नेघें माझी वाचा विसांवा । तुका ह्मणे हांवा हांवा हांवा साधावा ॥३॥

हें चि याच्या ऐसें मागावें दान । वंदूनि चरण नारायणा ॥१॥

धीर उदारींव निर्मळ निर्मत्सर । येणें सर्वेश्वर ऐसें नांव ॥ध्रु.॥

हा चि होईजेल याचिया विभागें । अनुभववी अंगें अनुभववील ॥२॥

जोडे तयाचे कां न करावे सायास । जाला तरि अळस दीनपणे ॥३॥

पावल्यामागें कां न घलावी धांव । धरिल्या तरि हांव बळ येतें ॥४॥

तुका ह्मणे घालूं खंडीमध्ये टांक । देवाचें हें एक करुनी घेऊं ॥५॥

सत्ताबळें येतो मागतां विभाग । लावावया लाग निमित्य करूं ॥१॥

तुझीं ऐसीं मुखें करूं उच्चारण । बोलें नारायण सांपडवूं ॥ध्रु.॥

आसेविण नाहीं उपजत मोहो । तरि च हा गोहो न पडे फंदीं ॥२॥

तुका ह्मणे आतां व्हावें याजऐसें । सरिसें सरिसें समागमें ॥३॥

करितां होया व्हावें चित्त चि नाहीं । घटापटा कांहीं करूं नये ॥१॥

मग हालत चि नाहीं जवळून । करावा तो सीण सीणवितो ॥ध्रु.॥

साहत चि नाहीं कांहीं पांकुळलें । उगल्या उगलें ढळत आहे ॥२॥

तुका ह्मणे तरी बोलावें झांकून । येथें खुणे खूण पुरतें चि ॥३॥

संतसंगें याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूर्तिमंत ॥१॥

घालूनियां काळ अवघा बाहेरी । त्यासी च अंतरीं वास दिला ॥ध्रु.॥

आपुलेसें जिंहीं नाहीं उरों दिलें । चोजवितां भलें ऐसीं स्थळें ॥२॥

तुका ह्मणे नाही झांकत परिमळ । चंदनाचें स्थळ चंदन चि ॥३॥

पुष्ट कांति निवती डोळे । हे सोहळे श्रीरंगीं ॥१॥

अंतर्बाहीं विलेपन । हें भूषण मिरवूं ॥ध्रु.॥

इच्छेऐसी आवड पुरे । विश्वंभरे जवळी ॥२॥

तुका करी नारायण । या या सेवन नामाचें ॥३॥

सुकाळ हा दिवसरजनी । नीत धणी नवी च ॥१॥

करुण सेवूं नानापरी । राहे उरी गोडीनें ॥ध्रु.॥

सरे ऐसा नाहीं झरा। पंक्ती करा समवेत ॥२॥

तुका ह्मणे बरवा पान्हा । कान्हाबाई माउलीचा ॥३॥

पाहतां तव एकला दिसे । कैसा असे व्यापक ॥१॥

ज्याचे त्याचे मिळणीं मिळे । तरी खेळे बहुरूपी ॥ध्रु.॥

जाणिवेचें नेदी अंग । दिसों रंग निवडीना ॥२॥

तुका ह्मणे ये चि ठायीं । हें तों नाहीं सर्वत्र ॥३॥

तुह्मांसाटीं आह्मां आपुला विसर । करितां अव्हेर कैसें दिसे ॥१॥

विचाराजी आतां ठायीचें हे देवा । आह्मां नये हेवा वाढवितां ॥ध्रु.॥

आलों टाकोनियां सुखाची वसती । पुढें माझ्या युक्ति खुंटलिया ॥२॥

तुका ह्मणे जाला सकळ वृत्तांत । केला प्रणिपात ह्मणऊनि ॥३॥

करावा उद्धार हें तुह्मां उचित । आह्मी केली नीत कळली ते ॥१॥

पाववील हाक धांवा ह्मणऊन । करावें जतन ज्याचें तेणें ॥ध्रु.॥

दुश्चितासी बोल ठेवायासी ठाव । ऐसा आह्मी भाव जाणतसों ॥२॥

तुका ह्मणे माझें कायावाचामन । दुसरें तें ध्यान करित नाही ॥३॥

संताचे उपदेश आमुचे मस्तकीं । नाहीं मृतेलोकीं राहाणेसा ॥१॥

ह्मणऊनि बहु तळमळी चित्त । येइप वो धांवत पांडुरंगे ॥ध्रु.॥

उपजली चिंता लागला उसीर । होत नाहीं धीर निढळ वाटे ॥२॥

तुका ह्मणे पोटीं रिघालेंसे भय । करूं आतां काय ऐसें जालें ॥३॥

काळावरि घालूं तरि तो सरिसा । न पुरतां इच्छा दास कैसे ॥१॥

आतां नाहीं कांहीं उसिराचें काम । न खंडावें प्रेम नारायणा ॥ध्रु.॥

देणें लागे मग विलंब कां आड । गोड तरि गोड आदि अंत ॥२॥

तुका ह्मणे होइल दरुषणें नििंश्चती । गाईन तें गीतीं ध्यान मग ॥३॥

परउपकारें कायावाचामन । वेचे सुदर्शन रक्षी तया ॥१॥

याजसाटीं असें योजिलें श्रीपति । संकल्पाचे हातीं सर्व जोडा ॥ध्रु.॥

परपीडे ज्याची जिव्हा मुंडताळे । यमदूत डाळे करिती पूजा ॥२॥

तुका ह्मणे अंबॠषी दुयाौधना । काय झालें नेणां दुर्वासया ॥३॥

हागिल्याचे सिंके वोणवा चि राहे । अपशकुन पाहे वेडगळ ॥१॥

अत्यंत समय नेणतां अवकळा । येऊं नये बळा सिक धरा ॥ध्रु.॥

भोजनसमयीं ओकाचा आठव । ठकोनियां जीव कष्टी करी ॥२॥

तुका ह्मणे किती सांगों उगवून । अभाग्याचे गुण अनावर ॥३॥

नारे तरि काय नुजेडे कोंबडें । करूनियां वेडें आघ्रो दावी ॥१॥

आइत्याचें साहे फुकाचा विभाग । विक्षेपानें जग ची थू करी ॥ध्रु.॥

नेमून ठेविला करत्यानें काळ । नल्हायेसें बळ करूं पुढें ॥२॥

तुका ह्मणे देव साहे जाल्यावरी । असांग चि करी सर्व संग ॥३॥

तरी सदा निर्भर दास । चिंताआसविरहित ॥१॥

अवघा चि एकीं ठाव । सर्व भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥

निरविलें तेव्हां त्यास । जाला वास त्यामाजी ॥२॥

तुका ह्मणे रूप ध्यावें । नाहीं ठावे गुणदोष ॥३॥

वेडिया उपचार करितां सोहळे । काय सुख कळे तयासी तें ।

अंधापुढें दीप नाचती नाचणें । भक्तिभावेंविण भक्ति तैसी ॥१॥

तिमाणें राखण ठेवियेलें सेता । घालुनियां माथां चुना तया ।

खादलें ह्मणोनि सेवटीं बोबाली । ठायींची भुली कां नेणां रया ॥ध्रु.॥

मुकियापासाव सांगतां पुराण । रोगिया मिष्टान्न काई होय ।

नपुंसका काय करील पिद्मणी । रुचिविण वाणी तैसे होय ॥२॥

हात पाय नाहीं करिल तो काई । वृक्षा फळ आहे अमोलिक।

हातां नये तैसा वांयां च तळमळी । भावेंविण भोळीं ह्मणे तुका ॥३॥

मेघवृष्टीनें करावा उपदेश परि गुरुनें न करावा शिष्य। वांटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा ॥१॥

द्रव्य वेचावें अन्नसत्रीं भूतीं द्यावें सर्वत्र । नेदावा हा पुत्र उत्तमयाती पोसना ॥ध्रु.॥

बीज न पेरावें खडकीं ओल नाहीं ज्याचे बुडखीं । थीतां ठके सेखीं पाठी लागे दिवाण ॥२॥

गुज बोलावें संतांशीं पत्नी राखावी जैसी दासी । लाड देतां तियेसी वांटा पावे कर्माचा ॥३॥

शुद्ध कसूनिपाहावें वरि रंगा न भुलावें । तुका ह्मणे घ्यावें जया नये तुटी तें ॥४॥

नावडावें जन नावडावा मान । करूनि प्रमाण तूं चि होइप ॥१॥

सोडुनि देहसंबंध वेसनें । ऐसी नारायणें कृपा कीजे ॥ध्रु.॥

नावडावें रूप नावडावे रस । अवघी राहो आस पायांपाशीं ॥२॥

तुका ह्मणे आतां आपुलिया सत्ता । करूनि अनंता ठेवा ऐसें ॥३॥

उपाधिवेगळे तुह्मी निर्विकार । कांहीं च संसार तुह्मां नाहीं ॥१॥

ऐसें मज करूनि ठेवा नारायणा । समूळ वासना नुरवावी ॥ध्रु.॥

निसंग तुह्मांसी राहणें एकट । नाहीं कटकट साहों येक ॥२॥

तुका ह्मणे नाहीं मिळों येत शिळा । रंगासी सकळा स्पटिकाची ॥३॥

माहार माते चपणी भरे । न कळे खरें पुढील ॥१॥

वोंगळ अधमाचे गुण । जातां घडी न लगे चि ॥ध्रु.॥

श्वान झोळी स्वामिसत्ता । कोप येतां उतरे ॥२॥

तुका ह्मणे गुमान कां । सांगों लोकां अधमासी ॥३॥

डोऑयामध्यें जैसें कणु । अणु तें हि न समाये ॥१॥

तैसें शुद्ध करीं हित । नका चित्त बाटवूं ॥ध्रु.॥

आपल्याचा कळवळा। आणिका बाळावरि न ये ॥२॥

तुका ह्मणे बीज मुडा । जैशा चाडा पिकाच्या ॥३॥

मुखीं नाम हातीं मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांसी ॥१॥

वैष्णवांचा माल खरा । तुरतुरा वस्तूसी ॥ध्रु.॥

भस्म दंड न लगे काठी । तीर्थां आटी भ्रमण ॥२॥

तुका ह्मणे आडकाठी । नाहीं भेटी देवाचे ॥३॥

आगी लागो तया सुखा । जेणें हरि नये मुखा ॥१॥

मज होत कां विपित्त । पांडुरंग राहो चित्तीं ॥ध्रु.॥

जळो तें समूळ। धन संपित्त उत्तम कुळ ॥२॥

तुका ह्मणे देवा । जेणें घडे तुझी सेवा ॥३॥

आतां न ह्मणे मी माझें । नेघें भार कांहीं ओझें ॥१॥

तूं चि तारिता मारिता । कळों आलासी निरुता ॥ध्रु.॥

अवघा तूं चि जनार्दन । संत बोलती वचन ॥२॥

तुका ह्मणे पांडुरंगा । तुझ्या रिगालों वोसंगा ॥३॥

समुद्रवळयांकित पृथ्वीचें दान । करितां समान न ये नामा ॥१॥

ह्मणऊनि कोणीं न करावा आळस । ह्मणा रात्रीदिवस रामराम ॥ध्रु.॥

सकळ ही शास्त्रें पठण करतां वेद । सरी नये गोविंदनाम एकें ॥२॥

सकळ ही तीथॉ प्रयाग काशी । करितां नामाशीं तुळेति ना ॥३॥

कर्वतीं कर्मरीं देहासी दंडण । करितां समान नये नामा ॥४॥

तुका ह्मणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । नाम हें चि सार विठोबाचें ॥५॥

अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळीं न घडे साधन । उचित विधि विधान न कळे न घडे सर्वथा ॥१॥

भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवया पापा । येणें जाणें खेपा येणें चि एक खंडती ॥ध्रु.॥

उभारोनि बाहे विठो पालवीत आहे । दासां मी चि साहे मुखें बोले आपुल्या ॥२॥

भाविक विश्वासी पार उतरिलें त्यांसी । तुका ह्मणे नासी कुतर्क्याचे कपाळीं ॥३॥

आह्मीं नामाचें धारक नेणों प्रकार आणीक । सर्व भावें एक विठ्ठल चि प्रमाण ॥१॥

न लगे जाणावें नेणावें गावें आनंदें नाचावें । प्रेमसुख घ्यावें वैष्णवांचे संगती ॥ध्रु.॥

भावबळें घालूं कास लज्जा चिंता दवडूं आस । पायीं निजध्यास ह्मणों दास विष्णूचे ॥२॥

भय नाहीं जन्म घेतां मोक्षपदा हाणों लाता । तुका ह्मणे सत्ता धरूं निकट सेवेची ॥३॥

आह्मी हरिचे सवंगडे जुने ठायींचे वेडे बागडे । हातीं धरुनी कडे पाठीसवें वागविलों ॥१॥

ह्मणोनि भिन्न भेद नाहीं देवा आह्मां एकदेहीं । नाहीं जालों कहीं एका एक वेगळे ॥ध्रु.॥

निद्रा करितां होतों पायीं सवें चि लंका घेतली तइप । वान्नरें गोवळ गाई सवें चारित फिरतसों ॥२॥

आह्मां नामाचें चिंतन राम कृष्ण नारायण। तुका ह्मणे क्षण खातां जेवितां न विसंभों ॥३॥

मागें बहुतां जन्मीं हें चि करित आलों आह्मी । भवतापश्रमी दुःखें पीडिलीं निववूं त्यां ॥१॥

गजाॉ हरिचे पवाडे मिळों वैष्णव बागडे । पाझर रोकडे काढूं पाषाणामध्यें ॥ध्रु.॥

भाव शुद्ध नामावळी हषॉ नाचों पिटूं टाळी । घालूं पायां तळीं किळकाळ त्याबळें ॥२॥

कामक्रोध बंदखाणी तुका ह्मणे दिले दोन्ही । इंिद्रयांचे धणी आह्मी जालों गोसांवी ॥३॥

अमर तूं खरा । नव्हे कैसा मी दातारा ॥१॥

चाल जाऊं संतांपुढें । वाद सांगेन निवाडें ॥ध्रु.॥

तुज नांव जर नाहीं । तर माझें दाव काई ॥२॥

तुज रूप नाहीं । तर माझें दाव काई ॥३॥

खळसी तूं लीळा । तेथें मी काय वेगळा ॥४॥

साच तूं लटिका । तैसा मी ही ह्मणे तुका ॥५॥

मंत्र चळ पिसें लागतें सत्वर । अबद्ध ते फार तरले नामें ॥१॥

आशोचे तो बाधी आणिकां अक्षरां । नाम निदसुरा घेतां तरे ॥ध्रु.॥

रागज्ञानघात चुकतां होय वेळ । नाम सर्वकाळ शुभदायक ॥२॥

आणिकां भजना बोलिला निषेध । नाम तें अभेद सकळां मुखीं ॥३॥

तुका ह्मणे तपें घालिती घालणी । वेश्या उद्धरूनि नेली नामें ॥४॥

नव्हती ते संत करितां कवित्व । संताचे ते आप्त नव्हती संत ॥१॥

येथें नाहीं वेश सरतें आडनांवें । निवडे घावडाव व्हावा अंगीं ॥ध्रु.॥

नव्हती ते संत धरितां भोंपळा । करितां वाकळा प्रावरण ॥२॥

नव्हती ते संत करितां कीर्तन । सांगतां पुराणें नव्हती संत ॥३॥

नव्हती ते संत वेदाच्या पठणें । कर्म आचरणें नव्हती संत ॥४॥

नव्हती संत करितां तप तीर्थाटणें । सेविलिया वन नव्हती संत ॥५॥

नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणें । भस्म उधळणें नव्हती संत ॥६॥

तुका ह्मणे नाहीं निरसला देहे । तों अवघे हे सांसारिक ॥७॥

हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥ध्रु.॥

न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देइप सदा ॥२॥

तुका ह्मणे गर्भवासीं । सुखें घालावें आह्मासी ॥३॥

भाग्यवंता हे परवडी । करिती जोडी जन्माची ॥१॥

आपुलाल्या लाहो भावें । जें ज्या व्हावें तें आहे ॥ध्रु.॥

इच्छाभोजनाचा दाता । न लगे चिंता करावी ॥२॥

तुका ह्मणे आल्या था†या । वस्तु ब†या मोलाच्या ॥३॥

वंचुनियां पिंड । भाता दान करी लंड ॥१॥

जैसी याची चाली वरी । तैसा अंतरला दुरी ॥ध्रु.॥

मेला राखे दिस । ज्यालेपणें जालें वोस ॥२॥

तुका ह्मणे देवा । लोभें न पुरे चि सेवा ॥३॥

अधीरा माझ्या मना ऐक एकी मात । तूं कां रे दुश्चित निरंतर ॥१॥

हे चि चिंता काय खावें ह्मणऊनि । भले तुजहूनि पिक्षराज ॥ध्रु.॥

पाहा ते चातक नेघे भूमिजळा । वरुषे उन्हाळा मेघ तया ॥२॥

सकळयातींमध्यें ठक हा सोनार । त्याघरीं व्यापार झारियाचा ॥३॥

तुका ह्मणे जळीं वनीं जीव एक । तयापाशीं लेख काय असे ॥४॥

कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥१॥

बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥ध्रु.॥

फुटती तरुवर उष्णकाळमासीं । जीवन तयांसी कोण घाली ॥२॥

तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनि ॥३॥

तुका ह्मणे ज्याचें नाम विश्वंभर । त्याचें निरंतर ध्यान करीं ॥४॥

उदारा कृपाळा पतितपावना । िब्रदें नारायणा साच तुझीं ॥१॥

वर्णिलासी जैसा जाणतां नेणतां । तैसा तूं अनंता साच होसी ॥ध्रु.॥

दैत्यां काळ भक्तां मेघश्याममूर्ति । चतुर्भुज हातीं शंख चक्र ॥२॥

काम इच्छा तयां तैसा होसी राणीं । यशोदेच्या स्तनीं पान करी ॥३॥

होऊनि सकळ कांहींच न होसी । तुका ह्मणे यासी वेद ग्वाही ॥४॥

ऐका संतजन उत्तरें माझे बोबडे बोल । करीं लाड तुह्मांपुढें हो कोणी झणी कोपाल ॥१॥

उपाय साधन आइका कोण गति अवगति । दृढ बैसोनि सादर तुह्मी धरावें चित्तीं ॥ध्रु.॥

धर्म तयासी घडे रे ज्याचे स्वाधीन भाज । कर्म तयासी जोडे रे भीत नाहीं लाज ॥२॥

पुण्य तें जाणां रे भाइनो परउपकाराचें । परपीडा परनिंदा रे खरें पाप तयाचें ॥३॥

लाभ तयासी जाला रे मुखीं देव उच्चारी । प्रपंचापाठी गुंतला हाणी तयासी च थोरी ॥४॥

सुख तें जाणा रे भाइनो संतसमागम । दुःख तें जाणारे भाइनो शम तेथे विशम ॥५॥

साधन तयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुद्धि । पराधीनासी आहे घात रे थोर जाण संबंधी ॥६॥

मान पावे तो आगळा मुख्य इंिद्रयें राखे । अपमानी तो अधररसस्वाद चाखे ॥६॥

जाणता तयासी बोलिजे जाणे समाधान । नेणता तयासी बोलिजे वाद करी भूषण ॥८॥

भला तो चि एक जाणा रे गयावर्जन करी । बुरा धन नष्ट मेळवी परद्वार जो करी ॥९॥

आचारी अन्न काढी रे गाई अतितभाग । अनाचारी करी भोजन ग्वाही नसतां संग ॥१०॥

स्वहित तेणें चि केलें रे भूतीं देखिला देव । अनहित तयाचें जालें रे आणी अहंभाव ॥११॥

धन्य जन्मा ते चि आले रे एक हरिचे दास । धिग ते विषयीं गुंतले केला आयुष्या नास ॥१२॥

जोहोरि तो चि एक जाणा रे जाणे सिद्धलक्षणें । वेडसरु तो भुले रे वरदळभूषणें ॥१३॥

बिळयाढा तो चि जाणा रे भक्ति दृढ शरीरीं। गांढ्या तयासी बोलिजे एक भाव न धरी ॥१४॥

खोल तो वचन गुरूचें जो गिळूनि बैसे । उथळ धीर नाहीं अंगीं रे ह्मणे होईल कैसें ॥१५॥

उदार तो जीवभाव रे ठेवी देवाचे पायीं । कृपण तयासी बोलिजे पडे उपाधिडाइप ॥१६॥

चांगलेंपण तें चि रे ज्याचें अंतर शुद्ध । वोंगळ मिळन अंतरीं वाणी वाहे दुगपध ॥१७॥

गोड तें चि एक आहे रे सार विठ्ठलनाम । कडु तो संसार रे लक्षचौ†याशी जन्म ॥१८॥

तुका ह्मणे मना घरी रे संतसंगतिसोई । न लगे कांहीं करावें राहें विठ्ठलपायीं ॥१९॥

येकाखडी ॥ 1

करावा कैवाड । नाहीं तरी आला नाड ॥१॥

स्मरा पंढरीचा देव । मनीं धरोनिया भाव ॥ध्रु.॥

खचविलें काळें । उगवा लवलाहें जाळें ॥२॥

गजर नामाचा । करा लवलाहे वाचा ॥३॥

घरटी चक्रफेरा । जन्ममृत्याचा भोंवरा ॥४॥

नानाहव्यासांची जोडी। तृष्णा करी देशधडी ॥५॥

चरणीं ठेवा चित्त । ह्मणवा देवाचे अंकित ॥६॥

छंद नानापरी । कळा न पविजे हरी ॥७॥

जगाचा जनिता । भुक्तिमुक्तींचा ही दाता ॥८॥

झणी माझें माझें । भार वागविसी ओझें ॥९॥

यांची कां रे गेली बुद्धि । नाहीं तरायाची शुद्धि ॥१०॥

टणक धाकुलीं । अवघीं सरती विठ्ठलीं ॥११॥

ठसा त्रिभुवनीं । उदार हा शिरोमणि ॥१२॥

डगमगी तो वांयां जाय । धीर नाहीं गोता खाय ॥१३॥

ढळों नये जरी । लाभ घरिचिया घरीं ॥१४॥

नाहीं ऐसें राहे । कांहीं नासिवंत देहे ॥१५॥

तरणा भाग्यवंत । नटे हरिकीर्तनांत ॥१६॥

थडी टाकी पैलतीर । बाहे ठोके होय वीर ॥१७॥

दया तिचें नांव । अहंकार जाय जंव ॥१८॥

धनधान्य हेवा । नाडे कुटुंबाची सेवा ॥१९॥

नाम गोविंदाचें । घ्या रे हें चि भाग्य साचें ॥२०॥

परउपकारा । वेचा शक्ति निंदा वारा ॥२१॥

फळ भोग इच्छा । देव आहे जयां तैसा ॥२२॥

बरवा ऐसा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥२३॥

भविष्याचे माथां । भजन न द्यावें सर्वथा ॥२४॥

माग लागला न संडीं । अळसें माती घालीं तोंडीं ॥२५॥

यश कीर्ति मान । तरी जोडे नारायण ॥२६॥

रवि लोपे तेजें । जरी हारपे हें दुजें ॥२७॥

लकार लाविला । असतां नसतां चि उगला ॥२८॥

वासने चि धाडी । बंद खोड्या नाड्या बेडी ॥२९॥

सरतें न कळे । काय झांकियेले डोळे ॥३०॥

खंती ते न धरा । होणें गाढव कुतरा ॥३१॥

सायासाच्या जोडी । पिके काढियेल्या पेडी ॥३२॥

हातीं हित आहे । परि न करिसी पाहें ॥३३॥

अळंकार लेणें । ल्या रे तुळसीमुद्राभूषणें ॥३४॥

ख्याति केली विष्णुदासीं । तुका ह्मणे पाहा कैसी ॥३५॥

देवें देऊळ सेविलें । उदक कोरडें चि ठेविलें ॥१॥

नव्हे मत गूढ उमानें कांहीं । तूं आपणआपणापें पाहीं ॥ध्रु.॥

पाठें पूर वोसंडला । सरिता सागर तुंबोनि ठेला ॥२॥

वांजेघरीं बाळ तान्हा । एक बाळी दों कानां ॥३॥

तुका ह्मणे पैस । अनुभविया ठावा गोडीरस ॥४॥

लोहागांवीं कीर्तनांत मेलें मूल जीत झालें ते समयीं स्वामींनीं अभंग केले ते

अशक्य तों तुह्मां नाहीं नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥१॥

मागें काय जाणों स्वामीचे पवाडे । आतां कां रोकडे दावूं नये ॥ध्रु.॥

थोर भाग्य आह्मी समर्थाचे कासे । ह्मणवितों दास काय थोडें ॥२॥

तुका ह्मणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे सामर्थ्याचे ॥३॥

दाता तो एक जाणा । नारायणा स्मरवी ॥१॥

आणीक नासिवंतें काय । न सरे हाय ज्यांच्यानें ॥ध्रु.॥

यावें तयां काकुलती । जे दाविती सुपंथ ॥२॥

तुका ह्मणे उरी नुरे । त्याचे खरे उपकार ॥३॥

अलंकापुरीं ब्राह्मण धरणें बसून बेताळीस दिवस उपवासी होता त्यास द्दष्टांत कीं देहूस तुकोबापाशी जाणें. ब्राह्मण स्वामीपें आला त्याबद्दल अभंग ॥ 31

श्रीपंढरीशा पतितपावना । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥

अनाथां जीवांचा तूं काजकैवारी । ऐसी चराचरीं िब्रदावळी ॥ध्रु.॥

न संगतां कळे अंतरीचें गुज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥

आिळकर ज्याचें करिसी समाधान । अभयाचें दान देऊनियां ॥३॥

तुका ह्मणे तूं चि खेळें दोहीं ठायीं । नसेल तो देइप धीर मना ॥४॥

अगा ये उदारा अगा विश्वंभरा । रखुमाईच्या वरा पांडुरंगा ॥१॥

अगा सवाौत्तमा अगा कृष्णा रामा । अगा मेघश्यामा विश्वजनित्या ॥ध्रु.॥

अगा कृपावंता जीवन तूं दाता । अगा सर्वसत्ता धरितया ॥२॥

अगा सर्वजाणा अगा नारायणा । करुणवचना चित्त द्यावें ॥३॥

तुका ह्मणे नाहीं अधिकार तैसी । सरती पायांपाशीं केली मागें ॥४॥

नव्हें दास खरा । परि जाला हा डांगोरा ॥१॥

यासी काय करूं आतां । तूं हें सकळ जाणता ॥ध्रु.॥

नाहीं पुण्यगाठीं । जे हें वेचूं कोणासाठीं ॥२॥

तुका ह्मणे कां उपाधी । वाढविली कृपानिधी ॥३॥

तुजविण सत्ता । नाहीं वाचा वदविता ॥१॥

ऐसे आह्मी जाणों दास । ह्मणोनि जालों उदास ॥ध्रु.॥

तुह्मी दिला धीर। तेणें मन झालें िस्थर ॥२॥

तुका ह्मणे आड । केलों मी हें तुझें कोड ॥३॥

काय मी जाणता । तुह्मांहुनि अनंता ॥१॥

जो हा करूं अतिशय । कां तुह्मां दया नये ॥ध्रु.॥

काय तुज नाहीं कृपा । विश्वाचिया मायबापा ॥२॥

तुका ह्मणे वाणी । माझी वदे तुह्मांहुनि ॥३॥

काय ज्ञानेश्वरीं उणें । तिंहीं पाठविलें धरणें ॥१॥

ऐकोनियां लिखित । ह्मुण जाणवली हे मात ॥ध्रु.॥

तरी जाणे धणी। वदे सेवकाची वाणी ॥२॥

तुका ह्मणे ठेवा । होतां सांभाळावें देवा ॥३॥

ठेवूनियां डोई । पायीं जालों उतराई ॥१॥

कारण तें तुह्मीं जाणां । मी तराळ नारायणा ॥ध्रु.॥

प्रसंगीं वचन । दिलें तें चि खावें अन्न ॥२॥

तुका ह्मणे भार । तुह्मी जाणां थोडा फार ॥३॥

उपदेश अभंग ॥ 11

नको कांहीं पडों ग्रंथाचे भरीं । शीघ व्रत करीं हें चि एक ॥१॥

देवाचिये चाडे आळवावें देवा । ओस देहभावा पाडोनियां ॥ध्रु.॥

साधनें घालिती काळाचिये मुखी । गर्भवास सेकीं न चुकती ॥२॥

उधाराचा मोक्ष होय नव्हे ऐसा । पतनासी इच्छा आवश्यक ॥३॥

रोकडी पातली अंगसंगें जरा । आतां उजगरा कोठवरि ॥४॥

तुका ह्मणे घालीं नामासाठी उडी । पांडुरंग थडी पाववील ॥५॥

नाहीं देवापाशीं मोक्षाचे गांठोळें । आणूनि निराळें द्यावें हातीं ॥१॥

इंिद्रयांचा जय साधुनियां मन । निर्विषय कारण असे तेथें ॥ध्रु.॥

उपास पारणीं अक्षरांची आटी । सत्कर्मां शेवटीं असे फळ ॥२॥

आदरें संकल्प वारीं अतिशय । सहज तें काय दुःख जाण ॥३॥

स्वप्नींच्या घायें विळवसी वांयां । रडे रडतियासवें मिथ्या ॥४॥

तुका ह्मणे फळ आहे मूळापाशीं । शरण देवासीं जाय वेगीं ॥५॥

तजिलें भेटवी आणूनि वासना । दाविल्याचे जना काय काज ॥१॥

आळवावें देवा भाकूनि करुणा । आपुलिया मना साक्ष करीं ॥ध्रु.॥

नाहीं जावें यावें दुरूनि लागत । आहे साक्षभूत अंतरींचा ॥२॥

तुका ह्मणे हा आहे कृपासिंधु। तोडी भवबंधु तात्काळिक ॥३॥

गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥

मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥ध्रु.॥

आनंदलें मन । प्रेमें पाझरती लोचन ॥२॥

तुका ह्मणे आळी । जेवी नुरे चि वेगळी ॥३॥

ज्याचें जया ध्यान । तें चि होय त्याचें मन ॥१॥

ह्मणऊनि अवघें सारा । पांडुरंग दृढ धरा ॥ध्रु.॥

सम खूण ज्याचे पाय । उभा व्यापक विटे ठाय ॥२॥

तुका ह्मणे नभा । परता अनूचा ही गाभा ॥३॥

पाहुनियां ग्रंथ करावें कीर्तन । तेव्हां आलें जाण फळ त्याचें ॥१॥

नाहीं तरि वांयां केली तोंडपिटी । उरी ते शेवटी उरलीसे ॥ध्रु.॥

पढोनियां वेद हरिगुण गावे । ठावें तें जाणावें तेव्हां जालें ॥२॥

तप तिर्थाटण तेव्हां कार्यसिद्धि । िस्थर राहे बुद्धि हरिच्या नामीं ॥३॥

यागयज्ञादिक काय दानधर्म । तरि फळ नाम कंठीं राहे ॥४॥

तुका ह्मणे नको काबाडाचे भरी । पडों सार धरीं हें चि एक ॥५॥

सुखें खावें अन्न । त्याचें करावें चिंतन ॥१॥

त्याचें दिलें त्यासी पावे । फळ आपणासी फावे ॥ध्रु.॥

आहे हा आधार। नाम त्याचें विश्वंभर ॥२॥

नाही रिता ठाव । तुका ह्मणे पसरीं भाव ॥३॥

संकोचोनि काय जालासी लहान । घेइप अपोशण ब्रह्मांडाचें ॥१॥

करोनि पारणें आंचवें संसारा । उशीर उशिरा लावूं नको ॥ध्रु.॥

घरकुलानें होता पडिला अंधार । तेणें केलें फार कासावीस ॥२॥

झुगारूनि दुरी लपविलें काखे । तुका ह्मणे वाखे कौतुकाचे ॥३॥

माझ्या बापें मज दिधलें भातुकें । ह्मणोनि कवतुकें क्रीडा करीं ॥१॥

केली आळी पुढें बोलिलों वचन । उत्तम हें ज्ञान आलें त्याचें ॥ध्रु.॥

घेऊनि विभाग जावें लवलाहा । आलेति या ठाया आपुलिया ॥२॥

तुका ज्ञानदेवीं समुदाय । करावा मी पाय येइन वंदूं ॥३॥

ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । ह्मणती ज्ञानदेव ऐसें तुह्मां ॥१॥

मज पामरा हें काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी ॥ध्रु.॥

ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे । इतर तुळणें काय पुरे ॥२॥

तुका ह्मणे नेणे युक्तीची ते खोलीं । ह्मणोनि ठेविली पायीं डोई ॥३॥

बोलिलीं लेकुरें । वेडीं वांकुडीं उत्तरें ॥१॥

करा क्षमा अपराध । महाराज तुह्मी सिद्ध ॥ध्रु.॥

नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ॥२॥

तुका ह्मणे ज्ञानेश्वरा । राखा पायांपें किंकरा ॥३॥

काय तुह्मी जाणां । करूं अव्हेर नारायणा ॥१॥

तरी या लटिक्याची गोही । निवडली दुसरे ठायीं ॥ध्रु.॥

कळों अंतरींचा गुण । नये फिटल्यावांचून ॥२॥

आणिलें अनुभवा । जनाच्या हें ज्ञानदेवा ॥३॥

आणीक कोणी मिती । त्यांच्या चिंतनें विश्रांति ॥४॥

तुका ह्मणे बीज पोटीं । फळ तैसें चि सेवटीं ॥५॥

अविश्वासीयाचें शरीर सुतकी । विटाळ पातकी भेद वाही ॥१॥

काय त्याचे वेल जाईल मांडवा । होता तैसा ठेवा आला पुढें ॥ध्रु.॥

मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा । कपाळीचें धोंडा उभा ठाके । तुका ह्मणे जैसा कुचराचा दाणा । परिपाकीं अन्ना न मिळे जैसा ॥३॥

तामसाचीं तपें पापाची सिदोरी । तमोगुणें भरी घातले ते ॥१॥

राज्यमदा आड सुखाची संपित्त । उलंघूनि जाती निरयगांवा ॥ध्रु.॥

इंिद्रयें दमिलीं इच्छा जिती जीवीं । नागविती ठावीं नाहीं पुढें ॥२॥

तुका ह्मणे हरिभजनावांचून । करिती तो सीण पाहों नये ॥३॥

हरिकथेवांचून इिच्छती स्वहित । हरिजन चित्त न घला तेथें ॥१॥

जाईल भंगोन आपुला विश्वास । होईल या नास कारणांचा ॥ध्रु.॥

ज्याचिया बैसावे भोजनपंगती । त्याचिया संगती तैसे खावें ॥२॥

तुका ह्मणे काय जालेसि जाणते । देवा ही परते थोर तुह्मी ॥३॥

सेवकें करावें स्वामीचें वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥१॥

घेईल जीव कां सारील परतें । भंगलिया चित्तें सांदी जनां ॥ध्रु.॥

खद्योतें दावावी रवी केवीं वाट । आपुलें चि नीट उसंतावें ॥२॥

तुका ह्मणे तो ज्ञानाचा सागर । परि नेंदी अगर भिजों भेदें ॥३॥

जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥१॥

करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥ध्रु.॥

जेणें हे घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥२॥

तुका ह्मणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्ताचिया ॥३॥

बहुतां छंदाचें बहु वसे जन । नये वांटूं मन त्यांच्या संगें ॥१॥

करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥ध्रु.॥

सुखाची समाधी हरिकथा माउली । विश्रांति साउली सिणलियांची ॥२॥

तुका ह्मणे बुडे बांधोनि दगड । तेथें काय कोड धांवायाचें ॥३॥

हरिकथे नाहीं । विश्वास ज्याचे ठायीं ॥१॥

त्याची वाणी अमंगळ । कान उंदराचें बीळ ॥ध्रु.॥

सांडुनि हा रस । करिती आणीक सायास ॥२॥

तुका ह्मणे पिसीं । वांयां गेलीं किती ऐसीं ॥३॥

प्रेम अमृताची धार । वाहे देवा ही समोर ॥१॥

उर्ध्ववाहिनी हरिकथा । मुगुटमणि सकळां तीर्थां ॥ध्रु.॥

शिवाचें जीवन। जाळी महादोष कीर्तन ॥२॥

तुका ह्मणे हरि । इची स्तुति वाणी थोरी ॥३॥

आतां माझ्या मना । इची घडो उपासना ॥१॥

ऐसें करींपांडुरंगा।प्रेमवोसंडेसेंअंगा ॥ध्रु.॥

सर्व काळ नये । वाचेविट आड भये ॥२॥

तुका वैष्णवांसंगती । हें चि भजन पंगती ॥३॥

उपास कराडी । तिहीं करावीं बापुडीं ॥१॥

आह्मी विठोबाचे दास । चिंता झुगारावी आस ॥ध्रु.॥

भक्तीच्या उत्कषॉ । नाहीं मुक्तीचें तें पिसें ॥२॥

तुका ह्मणे बळ । अंगीं आमुच्या सकळ ॥३॥

करविली तैसी केली कटकट । वांकडें कीं नीट देव जाणे ॥१॥

कोणाकारणें हें जालेंसे निर्माण । देवाचें कारण देव जाणे ॥२॥

तुका ह्मणे मी या अभिमाना वेगळा । घालुनि गोपाळा भार असें ॥३॥

तुह्मी येथें पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका ते ॥१॥

आतां काय पुढें वाढवुनि विस्तार । जाला समाचार आइका तो ॥ध्रु.॥

तुका ह्मणे सेवा समर्पूनि पायीं । जालों उतराई ठावें असो ॥३॥

देवाचें उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करूनि गेला ॥२

मरण माझें मरोन गेलें । मज केलें अमर ॥१॥

ठाव पुसिलें बुड पुसिलें । वोस वोसलें देहभावा ॥ध्रु.॥

आला होता गेला पूर । धरिला धीर जीवनीं ॥२॥

तुका ह्मणे बुनादीचें । जालें साचें उजवणें ॥३॥

माझे लेखीं देव मेला । असो त्याला असेल ॥१॥

गोष्टी न करी नांव नेघें । गेलों दोघें खंडोनी ॥ध्रु.॥

स्तुतिसमवेत निंदा । केला धंदा उदंड ॥२॥

तुका ह्मणे निवांत ठेलों । वेचित आलों जीवित्व ॥३॥

लवविलें तया सवेें लवे जाती । अभिमाना हातीं सांपडेना ॥१॥

भोळिवेचें लेणें विष्णुदासां साजे । तेथें भाव दुजे हारपती ॥ध्रु.॥

अर्चन वंदन नवविधा भक्ति । दया क्षमा शांति ठायीं ॥२॥

तये गांवीं नाहीं दुःखाची वसती । अवघा चि भूतीं नारायण ॥३॥

अव घें चि जालें सोंवळें ब्रह्मांड । विटाळाचें तोंड न देखती ॥४॥

तुका ह्मणे गाजे वैकुंठीं सोहळा । याही भूमंडळामाजी कीर्ति ॥५॥

पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत ॥१॥

व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहर्निशीं मुखीं नाम ॥२॥

नाम विठोबाचें घेईन मी वाचे । बीज कल्पांतींचें तुका ह्मणे ॥३॥

संपदा सोहळा नावडे मनाला । करी तें टकळा पंढरीचा ॥१॥

जावें पंढरिसी आवडी मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ॥२॥

तुका ह्मणे ऐसें आर्त ज्याचे मनीं । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥

कथनी पठणी करूनि काय । वांचुनि रहणी वांयां जाय ॥१॥

मुखीं वाणी अमृतगोडी । मिथ्या भुकें चरफडी ॥ध्रु.॥

पिळणी पाक करितां दगडा । काय जडा होय तें ॥२॥

मधु मेळवूनि माशी । आणिका सांसी पारधिया ॥३॥

मेळऊनि धन मेळवी माती । लोभ्या हातीं तें चि मुखीं ॥४॥

आपलें केलें आपण खाय । तुका वंदी त्याचे पाय ॥५॥

उमटती वाणी । वाटे नामाचिया ध्वनी ॥१॥

बरें सेवन उपकारा । द्यावें द्यावें या उत्तरा ॥ध्रु.॥

सरळ आणि मृद । कथा पाहावी तें उर्ध ॥२॥

गात जात तुका । हा चि उपदेश आइका ॥३॥

कथाकाळींची मर्यादा सांगतों ते भावें वंदा । प्रीतीने गोविंदा हें चि एक आवडे ॥१॥

टाळ वाद्या गीत नृत्य अंतःकरणें प्रेमभरित । वाणिता तो कीर्त तद्भावने लेखावा ॥ध्रु.॥

नये अळसें मोडूं अंग कथे कानवडें हुंग । हेळणेचा रंग दावी तो चांडाळ ॥२॥

तोंडी विडा माने ताठा थोरपणे धाली गेंठा । चित्त नेदी नामपाठा गोष्टी लावी तो चांडाळ ॥४॥

कथे इच्छी मान दावूनियां थोरपण रजा संकोच न लुगडी सांवरी तो चांडाळा ॥४॥

आपण बैसे बाजेवरी सामान हरिच्या दासां धरी । तरि तो सुळावरि वाहिजे निश्चयेसीं ॥५॥

येतां नकरी नमस्कार कर जोडोनियां नम्र । न म्हणवितां थोर आणिकां खेटी तो चांडाळ ॥६॥

तुका विनवी जना कथे नाणावें अवगुणा । करा नारायणा ॠणी समर्पक भावें ॥७॥

कथा देवाचें ध्यान । कथा साधना मंडण । कथे ऐसें पुण्य आणीक नाहीं सर्वथा ॥१॥

ऐसा साच खरा भाव । कथेमाजी उभा देव ॥ध्रु.॥

मंत्र स्वल्प जना उच्चारितां वाचे मना । म्हणतां नारायणा क्षणें जळती महा दोष ॥२॥

भावें करितां कीर्तन तरे तारी आणीक जन । भेटे नारायण संदेह नाहीं ह्मणे तुका ॥३॥

कथा त्रिवेणीसंगम देव भक्त आणि नाम । तेथींचें उत्तम चरणरज वंदितां ॥१॥

जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर । गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा ॥ध्रु.॥

तीथॉ तया ठाया येती पुनीत व्हावया । पर्वकाळ पायां तळीं वसे वैष्णवां ॥२॥

अनुपम्य हा महिमा नाहीं द्यावया उपमा । तुका ह्मणे ब्रह्मा नेणे वणूप या सुखा ॥३॥

सांडूनि कीर्तन न करीं आणीक काज । नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगीं ॥१॥

आवडीचें आर्त पुरवीं पंढरिराया । शरण तुझ्या पायां या चि लागीं ॥ध्रु.॥

टाळी वाहूनियां विठ्ठल ह्मणेन । तेणें निवारीन भवश्रम ॥२॥

तुका ह्मणे देवा नुपेक्षावें आह्मां । न्यावें निजधामा आपुलिया ॥३॥

जळती कीर्तनें दोष पळतील विघ्नें ॥१॥

हें चि बिळवंत गाढें । आनंद करूं दिंडीपुढें ॥ध्रु.॥

किळ पापाची हे मूर्ति। नामखड्ग घेऊं हातीं ॥२॥

तुका ह्मणे जाऊं । बळें दमामे ही लावूं ॥३॥

यम सांगे दूतां तुह्मां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥

नका जाऊं तया गांवां नामधारकाच्या शिवां । सुदर्शन येवा घरटी फिरे भोंवती ॥ध्रु.॥

चक्र गदा घेउनी हरि उभा असे त्यांचे द्वारीं । लक्ष्मी कामारी रिद्धिसिद्धीसहित ॥२॥

ते बिळयाशिरोमणी हरिभक्त ये मेदिनी । तुका ह्मणे कानीं यम सांगे दूतांचे ॥३॥

कान्हया रे जगजेठी । देइप भेटी एकवेळे ॥१॥

काय मोकलिलें वनीं । सावजांनीं वेढिलें ॥ध्रु.॥

येथवरी होता संग । अंगें अंग लपविलें ॥२॥

तुका ह्मणें पाहिलें मागें । एवढ्या वेगें अंतरला ॥३॥

आपुल्या आह्मी पुसिलें नाही । तुज कांहीं कारणें ॥१॥

मागें मागें धांवत आलों । कांहीं बोलों यासाटीं ॥ध्रु.॥

बहुत दिस होतें मनीं । घ्यावी धणी एकांतीं ॥२॥

तुका ह्मणे उभा राहें । कान्हो पाहें मजकडे ॥३॥

धन्य बा ह्या ऐशा नारी । घरीं दारीं नांदती ॥१॥

चोरूनिया तुजपाशीं । येतां त्यांसी न कळतां ॥ध्रु.॥

दोन्हीं ठायीं समाधान । सम कठीण बहुतचि ॥२॥

तुका ह्मणे जीवासाठीं । दुर्लभ भेटी ते देवा ॥३॥

उदासीना पावल्या वेगीं । अंगा अंगीं जडलिया ॥१॥

वेटाळिला भोंवता हरी । मयोरफेरीं नाचती ॥ध्रु.॥

मना आले करिती चार । त्या फार हा एकला ॥२॥

तुका ह्मणे नारायणीं । निराजनी मीनलिया ॥३॥

विशमाची शंका वाटे । सारिखें भेटे तरी सुख ॥१॥

ह्मणऊनि चोरिलें जना । आल्या राणां एकांतीं ॥ध्रु.॥

दुजियासी कळों नये । जया सोय नाहीं हे ।2॥

तुका ह्मणे मोकळें मन । नारायण भोगासी ॥३॥

आलिंगन कंठाकंठीं । पडे मिठी सर्वांगें ॥१॥

न घडे मागें परतें मन । नारायण संभोगी ॥ध्रु.॥

वचनासी वचन मिळे। रिघती डोळे डोळियांत ॥२॥

तुका ह्मणे अंतर्ध्यानीं । जीव जीवनीं विराल्या ॥३॥

कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी सतंता ॥१॥

अवघियांची जगनिंद । जाली धिंद सारखी ॥ध्रु.॥

अवघ्या अवघ्या चोरा । विना वरा मायबापा ॥२॥

तुका ह्मणे करा सेवा । आलें जीवावर तरी ॥३॥

येथील जें एक घडी । तये जोडी पार नाहीं ॥१॥

ती त्यांचा सासुरवास । कैंचा रस हा तेथें ॥ध्रु.॥

अवघे दिवस गेले कामा । हीं जन्मा खंडण ॥२॥

तुका ह्मणे रतल्या जनीं । सोडा झणी कान्होबा ॥३॥

चिंता नाहीं गांवीं विष्णुदासांचिये । घोष जयजयकार सदा ॥१॥

नारायण घरीं सांठविलें धन । अवघे चि वाण तया पोटीं ॥ध्रु.॥

सवंग सकळां पुरे धणीवरी । सेवावया नारी नर बाळा ॥२॥

तुका ह्मणे येणें आनंदी आनंदु । गोविंदें गोविंदु पिकविला ॥३॥

करिती तया वेवसाव आहे । येथें व्हा रे साहे एकां एक ॥१॥

गातां आइकतां समान चि घडे । लाभें लाभ जोडे विशेषता ॥ध्रु.॥

प्रेमाचें भरतें भातें घ्यावें अंगीं । नटे टाळी रंगीं शूरत्वेंसी ॥२॥

तुका ह्मणे बहुजन्मांचे खंडण । होइल हा सीण निवारोनि ॥३॥

नाहीं घाटावें लागत । एका सितें कळें भात ॥१॥

क्षीर निवडितें पाणी । चोंची हंसाचिये आणी ॥ध्रु.॥

आंगडें फाडुनि घोंगडें करी । अवकळा तये परी ॥२॥

तुका ह्मणे कण । भुसीं निवडे कैंचा सीण ॥३॥

स्वामीचें अभंगींचें नांव काढून सालोमालो आपलें नांव घालीत त्यावर अभंग ॥ 8

सालोमालो हरिचे दास । ह्मणउन केला अवघा नास ॥१॥

अवघें बचमंगळ केलें । ह्मणती एकांचें आपुले ॥ध्रु.॥

मोडूनि संतांचीं वचनें । करिती आपणां भूषणें ॥२॥

तुका ह्मणे कवी । जगामधीं रूढ दावी ॥३॥

जायाचे अळंकार । बुडवूनि होती चोर ॥१॥

त्यांसी ताडणाची पूजा । योग घडे ब†या वोजा ॥ध्रु.॥

अभिलाषाच्या सुखें। अंतीं होती काळीं मुखें ॥२॥

तुका ह्मणे चोरा । होय भूषण मातेरा ॥३॥

कालवूनि विष । केला अमृताचा नास ॥१॥

ऐशा अभाग्याच्या बुद्धि । सत्य लोपी नाहीं शुद्धि ॥ध्रु.॥

नाक कापुनि लावी सोनें । कोण अळंकार तेणें ॥२॥

तुका ह्मणे बावी । मोडूनि मदार बांधावी ॥३॥

कण भुसाच्या आधारें । परि तें निवडितां बरें ॥

काय घोंगालि पाधाणी । ताकामध्यें घाटी लोणी ॥ध्रु.॥

सुइणीपुढें चेंटा । काय लपविसी चाटा ॥२॥

तुका ह्मणे ज्ञान । दिमाकाची भनभन ॥३॥

विकल तेथें विका । माती नांव ठेवूनि बुका ॥१॥

हा तो निवाड्याचा ठाव । ख†या खोट्या निवडी भाव ॥ध्रु.॥

ग†हवारे हा विधि । पोट वाढविलें चिंधीं ॥२॥

लावूं जाणे विल्हे। तुका साच आणिक कल्हे ॥३॥

विषयीं अद्वये । त्यासी आह्मां सिवो नये ॥१॥

देव तेथुनि निराळा । असे निष्काम वेगळा ॥ध्रु.॥

वासनेची बुंथी । तेथें कैची ब्रह्मिस्थति ॥२॥

तुका ह्मणे असतां देहीं । तेथें नाही जेमेतीं ॥३॥

नमितों या देवा । माझी एके ठायीं सेवा ॥१॥

गुणअवगुण निवाडा । ह्मैस ह्मैस रेडा रेडा ॥ध्रु.॥

जनीं जनार्दन। साक्ष त्यासी लोटांगण ॥२॥

तुका ह्मणे खडे । निवडू दळणीं घडघडे ॥३॥

जीव जीती जीवना संगें । मत्स्या मरण त्या वियोगें ॥१॥

जया चित्तीं जैसा भाव । तयां जविळ तैसा देव ॥ध्रु.॥

सकळां पाडीये भानु । परि त्या कमळाचें जीवनु ॥२॥

तुका ह्मणे माता । वाहे तान्हे याची चिंता ॥३॥

मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली ॥१॥

याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥ध्रु.॥

उदक अन्न काये ह्मणे मज खा ये । भुकेला तो जाये चोजवीत ॥२॥

व्याधी पिडिला धांवे वैद्याचिया घरा । दुःखाच्या परिहारा आपुलिया ॥३॥

तुका ह्मणे जया आपुलें स्वहित। करणें तो चि प्रीत धरी कथे ॥४॥

जन्मांतरिंचा परिट न्हावी । जात ठेवी त्यानें तें ॥१॥

वाखर जैसा चरचरी । तोंड करी संव दणी ॥ध्रु.॥

पूर्व जन्म शिखासूत्र । मळ मूत्र अंतरीं ॥२॥

तुका ह्मणे करिती निंदा । धुवटधंदा पुढिलांचा ॥३॥

नाम दुसी त्याचें नको दरषण । विष तें वचन वाटे मज ॥२॥

अमंगळ वाणी नाइकवे कानीं । निंदेची पोहोणी उठे तेथें ॥ध्रु.॥

काय लभ्य त्याचिये वचनीं । कोणत्या पुराणीं दिली ग्वाही ॥२॥

काय आड लावूं त्याचिया तोंडासी । आतां या जिभेसी काय करूं ॥३॥

तुका ह्मणे संत न मनिती त्यांस । घेऊं पाहे ग्रास यमदूत ॥४॥

येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक ॥१॥

उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनियां ॥ध्रु.॥

बहु फेरे आले सोसोनि वोळसा । पुढें नाहीं ऐसा लाभ मग ॥२॥

तुका ह्मणे जाऊं सादावीत वाट । भेटे तरी भेटो कोणी तरी ॥३॥

नव्हे जोखाई जोखाई । मायराणी मेसाबाई ॥१॥

बिळया माझा पंढरिराव । जो या देवांचा ही देव ॥ध्रु.॥

रंडी चंडी शक्ति । मद्यमांस भिक्षती ॥२॥

बहिरव खंडेराव । रोटीसुटीसाटीं देव ॥३॥

गणोबा विक्राळ । लाडुमोदकांचा काळ ॥४॥

मुंज्या ह्मैसासुरें । हें तों कोण लेखी पोरें ॥५॥

वेताळें फेताळें । जळो त्यांचें तोंड काळें ॥६॥

तुका ह्मणे चित्तीं । धरा रखुमाईचा पती ॥७॥

पडतां जड भारी । दासीं आठवावा हरी ॥१॥

मग तो होऊं नेदी सीण । आड घाली सुदर्शन ॥ध्रु.॥

नामाच्या चिंतनें । बारा वाटा पळती विघ्नें ॥२॥

तुका ह्मणे प्राण । करा देवासी अर्पण ॥३॥

मायें मोकलिलें कोठें जावें बळें । आपुलिया बळें न वंचे तें ॥१॥

रुसोनियां पळे सांडुनियां ताट । मागें पाहे वाट यावें ऐसीं ॥ध्रु.॥

भांडवल आह्मां आळी करावी हे । आपणें माये धांवसील ॥२॥

तुका ह्मणे आळी करुनियां निकी । देसील भातुकीं बुझाऊनि ॥३॥

नागर गोडें बाळरूप । तें स्वरूप काळीचें ॥१॥

गाईगोपाळांच्या संगें । आलें लागें पुंडलीका ॥ध्रु.॥

तें हें ध्यान दिगांबर । कटीं कर मिरवती ॥२॥

नेणपणे उगें चि उभें । भक्तिलोभें राहिलें ॥३॥

नेणे वरदळाचा मान । विटे चरण सम उभें ॥४॥

सहज कटावरी हात । दहींभात शिदोरी ॥५॥

मोहरी पांवा गांजिवा पाठीं । धरिली काठी ज्या काळें ॥६॥

रम्य स्थळ चंद्रभागा । पांडुरंगा क्रीडेसी ॥७॥

भीमा दक्षणमुख वाहे । दृष्टी पाहे समोर ॥८॥

तारावेसे मूढ लोक । दिली भाक पुंडलिका ॥९॥

तुका ह्मणे वैकुंठवासी । भक्तांपासीं राहिला ॥१०॥

विठ्ठलनामाचा नाहीं ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्यें ॥१॥

तयासी बोलतां होईल विटाळ । नेव जाये तो जळस्नान करितां ॥ध्रु.॥

विठ्ठलनामाची नाहीं ज्या आवडी । त्याची काळ घडी लेखिताहे ॥२॥

तुका ह्मणे मज विठोबाची आण। जरी प्रतिवचन करिन त्यासी ॥३॥

तया घडले सकळ नेम । मुखीं विठोबाचें नाम ॥१॥

कांहीं न लगे सिणावें । आणिक वेगळाल्या भावें । वाचे उच्चारावें। रामकृष्णगोविंदा ॥ध्रु.॥

फळ पावाल अवलिळा । भोग वैकुंठ सोहळा ॥२॥

तुका ह्मणे त्याच्या नांवें । तो चि होइजेल स्वभावें ॥३॥

पुराणप्रसिद्ध सीमा । नामतारकमहिमा ॥१॥

मागें जाळी महा दोष । पुढें नाही गर्भवास ॥ध्रु.॥

जें निंदिलें शास्त्रें । वंद्य जालें नाममात्रें ॥२॥

तुका ह्मणे ऐसा । त्रिभुवनीं नामठसा ॥३॥

नाम घेतां न लगे मोल । नाममंत्र नाहीं खोल ॥१॥

दों अक्षरांचें काम । उच्चारावें राम राम ॥ध्रु.॥

नाहीं वर्णाधमयाती। नामीं अवघीं चि सरतीं ॥२॥

तुका ह्मणे नाम । चैतन्य निजधाम ॥३॥

नाम घेतां वांयां गेलां । ऐसा कोणें आईिकला ॥१॥

सांगा विनवितों तुह्मांसी । संत महंत सिद्ध ॠषी ॥ध्रु.॥

नामें तरला नाहीं कोण । ऐसा द्यावा निवडून ॥२॥

सलगीच्या उत्तरा । तुका ह्मणे क्षमा करा ॥३॥

फुकाचें तें लुटा सार । व्हा रे अमर सदैव ॥१॥

नाहीं गर्भवास पुढती । डोंगर जळती दोषांचे ॥ध्रु.॥

उदंड भावें उदंड घ्यावें । नाम गावें आवडी ॥२॥

तुका ह्मणे घरिच्या घरीं । देशा उरीं न सीणीजे ॥३॥

प्रीति नाही राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी ॥१॥

तैसे दंभी जालों तरी तुझे भक्त । वास यमदूत न पाहाती ॥ध्रु.॥

राजयाचा पुत्र अपराधी देखा । तो काय आणिकां दंडवेल ॥२॥

बाहातरी खोडी परी देवमण कंठीं । तैसो जगजेठी ह्मणे तुका ॥३॥

करावा उद्धार किंवा घ्यावी हारी । एका बोला िस्थरी राहें देवा ॥१॥

निरसनें माझा होईल संदेह । अवघें चि आहे मूळ पायीं ॥ध्रु.॥

राहिलों चिकटूण कांहीं चि न कळे । कोणा नेणों काळे उदय भाग्य ॥२॥

तुका ह्मणे बहु उद्वेगला जीव । भाकीतसें कीव देवराया ॥३॥

आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ॥१॥

मग तो कृपासिंधु निवारी सांकडें । येर तें बापुडें काय रंके ॥ध्रु.॥

भयाचिये पोटीं दुःखाचिया रासी । शरण देवासी जातां भले ॥२॥

तुका ह्मणे नव्हे काय त्या करितां । चिंतावा तो आतां विश्वंभर ॥३॥

भोग तो न घडे संचितावांचूनि । करावें तें मनीं समाधान ॥१॥

ह्मणऊनी मनीं मानूं नये खेदु । ह्मणावा गोविंद वेळोवेळां ॥ध्रु.॥

आणिकां रुसावें न लगे बहुतां । आपुल्या संचितावांचूनियां ॥२॥

तुका ह्मणे भार घातलिया वरी । होईल कैवारी नारायण ॥३॥

निर्वैर व्हावें सर्वभूतांसवें । साधन बरवें हें चि एक ॥१॥

तरी च अंगीकार करिल नारायण । बडबड तो सीण येणेंविण ॥ध्रु.॥

सोइरें पिशुन समान चि घटे । चित्त पर ओढे उपकारी ॥२॥

तुका ह्मणे चित्त जालिया निर्मळ । तरि च सकळ केलें होय ॥३॥

दिली चाले वाचा । क्षय मागिल्या तपाचा ॥१॥

रिद्धि सिद्धि येती घरा । त्याचा करिती पसारा ॥ध्रु.॥

मानदंभांसाटीं। पडे देवासवें तुटी ॥२॥

तुका ह्मणे मेवा । कैचा वेठीच्या नदवां ॥३॥

तापल्यावांचून नव्हे अळंकार । पिटूनियां सार उरलें तें ॥१॥

मग कदाकाळीं नव्हे शुद्ध जाति । नासें शत्रु होती मित्र ते चि ॥ध्रु.॥

किळवर बरें भोगूं द्यावें भोगा । फांसिलें तें रोगा हातीं सुटे ॥२॥

तुका ह्मणे मन करावें पाठेळ । साहावे चि जाळ सिजेवरि ॥३॥

पाठेळ करितां न साहावे वारा । साहेलिया ढोरा गोणी चाले ॥१॥

आपणां आपण हे चि कसवटी । हर्षामर्ष पोटीं विरों द्यावें ॥ध्रु.॥

नवनीत तोंवरी कडकडी लोणी । निश्चळ होऊनी राहे मग ॥२॥

तुका ह्मणे जरी जग टाकी घाया । त्याच्या पडे पायां जन मग ॥३॥

काविळयासी नाहीं दया उपकार । काळिमा अंतर विटाळसें ॥१॥

तैसें कुधनाचें जिणें अमंगळ । घाणेरी वोंगळ वदे वाणी ॥ध्रु.॥

कडु भोंपऑयाचा उपचारें पाक । सेविल्या तिडीक कपाळासी ॥२॥

तुका ह्मणे विष सांडूं नेणे साप । आदरें तें पाप त्याचे ठायीं ॥३॥

लाभ खरा नये तुटी । नाहीं आडखळा भेटी ॥१॥

जाय अवघिया देशा । येथें संचलाची तैसा ॥ध्रु.॥

मग न लगे पारखी। अवघीं सकट सारखीं । तुका ह्मणे वोळे । रूपें भुलविले डोळे ॥३॥

नको आतां पुसों कांहीं । लवलाहीं उसंती ॥१॥

जाय वेगीं पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥ध्रु.॥

वचनाचा न करीं गोवा । रिघें देवासीं शरण ॥२॥

तुका ह्मणे कृपावंता । बहु चिंता दीनाची ॥३॥

बुद्धिहीनां जडजीवां । नको देवा उपेक्षूं ॥१॥

परिसावी हे विज्ञापना । आह्मां दीनां दासांची ॥ध्रु.॥

चिंतूनियां आले पाय । त्यांसी काय वंचन ॥२॥

तुका ह्मणे पुरुषोत्तमा । करीं क्षमा अपराध ॥३॥

ह्मणऊनि काकुळती । येतों पुढतों पुढती । तुह्मां असे हातीं । कमळापती भांडार ॥१॥

फेडूं आलेती दरिद्र । तरी न लगे उशीर । पुरे अभयंकर । ठाया ठाव रंकाशी ॥ध्रु.॥

कोठें न घली धांव । याजसाठीं तजिली हांव । घेऊं नेदी वाव । मना केला विरोध ॥२॥

कारणांच्या गुणें । वेळ काळ तोही नेणें । तुमच्या कीर्तनें । तुका तुह्मां जागवी ॥३॥

बहु नांवें ठेविलीं स्तुतीचे आवडी । बहुत या गोडी आली रसा ॥१॥

बहु सोसें सेवन केलें बहुवस । बहु आला दिस गोमट्याचा ॥ध्रु.॥

बहुतां पुरला बहुतां उरला । बहुतांचा केला बहु नट ॥२॥

बहु तुका जाला निकट वृत्ती । बहु काकुलती येऊनियां ॥३॥

येहलोकीं आह्मां वस्तीचें पेणें । उदासीन तेणें देहभावीं ॥१॥

कार्यापुरतें कारण मारगीं । उलंघूनि वेगीं जावें स्थळा ॥ध्रु.॥

सोंगसंपादणी चालवितों वेव्हार । अत्यंतिक आदर नाहीं गोवा ॥२॥

तुका ह्मणे वेंच लाविला संचिता । होइल घेतां लोभ कोणां ॥३॥

रोजकीदव जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी ॥१॥

नाहीं होत झाड्यापाड्याचें लिगाड । हुजराती ते गोड सेवा रूजू ॥ध्रु.॥

चोरासाटीं रदबदल आटा हाश । जळो जिणे दाश बहुताचें ॥२॥

सावधान तुका निर्भर मानसीं । सालझाड्यापाशी गुंपों नेणे ॥३॥

त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविला ॥१॥

आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख गौरव संतां अंगीं ॥ध्रु.॥

हिशेबें आलें तें सकळांसी प्रमाण । तेथें नाही आन चालों येत ॥२॥

तुका ह्मणे नाहीं पापपुण्य खतीं । झाड्याची हुजती हातां आली ॥३॥

Text: तुकाराम गाथा on Marathi Wikisource, which does not name the printed edition it was transcribed from. The verses are public domain; the transcription is by Wikisource contributors, CC BY-SA 4.0. Its systematic legacy-font errors are repaired by rule (see the reading page for details); some remain — इप printed for ई in about 220 abhangas, and a few vowel signs on the wrong letter. Numbering follows Wikisource; printed editions differ. Spotted a wrong line? Write to us with the number.

If you need to talk to someone now: Tele-MANAS 14416 (free, 24×7) · Vandrevala +91 99996 66555 (24×7, call or WhatsApp) · AASRA 022 2754 6669 (24×7) · iCall 9152 987 821 (Mon–Sat, 8am–9pm) · Emergency 112