पढीयंतें मागा पांडुरंगापाशीं । मज दुर्बळासी काय पीडा ॥१॥
या चि साटीं दुराविला संवसार । वाढे हे अपार माया तृष्णा ॥ध्रु.॥
कांहीं करितां कोठें नव्हें समाधान । विचारितां पुण्य तें चि पाप ॥२॥
तुका ह्मणे आतां निश्चळ चि भलें । तुज आठविलें पांडुरंगा ॥३॥
Abhangas 3601–3900 (the Gāthā is numbered 1–4,583), in the original Marathi, with the Gāthā's own section headings — as transcribed on Marathi Wikisource, whose base edition is not named. The refrain (ध्रु.) is set in a warmer colour. One font error is not yet repaired: where you see इप, read ई (होइप = होई).
पढीयंतें मागा पांडुरंगापाशीं । मज दुर्बळासी काय पीडा ॥१॥
या चि साटीं दुराविला संवसार । वाढे हे अपार माया तृष्णा ॥ध्रु.॥
कांहीं करितां कोठें नव्हें समाधान । विचारितां पुण्य तें चि पाप ॥२॥
तुका ह्मणे आतां निश्चळ चि भलें । तुज आठविलें पांडुरंगा ॥३॥
नव्हे मी शाहाणा । तरी ह्मणा नारायणा ॥१॥
तुह्मां बोलवाया कांहीं । ये च भरलोंसे वाहीं ॥ध्रु.॥
आणावेति रूपा । कोपलेती तरी कोपा ॥२॥
कळोनि आवडी । तुका ह्मणे जाते घडी ॥३॥
आह्मी भाविकें हे काय जाणों खोडी । आइकोनि प्रौढी विनविलें ॥१॥
नाहीं ऐसें येथें जालेती असतां । वाढविली चिंता अधिक सोसें ॥ध्रु.॥
न कळे चि आधीं करितां विचार । न धरितां धीर आहाचता ॥२॥
तुका ह्मणे आतां वचनें वचन । वाढले तिक्षीण बुद्धि जाली ॥३॥
कोठें देवा बोलों । तुह्मां भीड घालूं गेलों ॥१॥
करावाया सत्त्वहाणी । भांडवलाची टांचणी ॥ध्रु.॥
दुर्बळा मागतां । त्याच्या प्रवर्तला घाता ॥२॥
तुका ह्मणे नाहीं । मज कळलें ऐसें कांहीं ॥३॥
काय त्या दिवस उचिताचा आला । मागील जो केला श्रम होता ॥१॥
ठेवियेला पूर्ण करूनि संकेत । तयापाशीं चित्त लागलें से ॥ध्रु.॥
जाणसी गे माते लेंकराचें लाड । नये पडों आड निष्ठता ॥२॥
तुका ह्मणे आह्मीं करावें वचन । तुह्मांसी जतन करणें तें ॥३॥
पडिला प्रसंग कां मी ऐसा नेणें । संकल्प ते मनें जिरवले ॥१॥
चेष्टाविलें तरी सांगावें कारणे । भक्ती ते उजेवन करावया ॥ध्रु.॥
लावूनियां दृष्टि घेतली सामोरी । बैसलें जिव्हारीं डसोन तें ॥२॥
तुका ह्मणे जीवा लाविला तो चाळा । करावें गोपाळा शीघ्र दान ॥३॥
मागील विसर होईल सकळ । केली तळमळ दुःखाची ते ॥१॥
दोहींचें अहिक्य घालीं गडसंदीं । िस्थरावेल बुद्धि पायांपाशीं ॥ध्रु.॥
अहाच या केलों देहपरिचारें । तुमचें तें खरें वाटों नये ॥२॥
तुका ह्मणे व्हावें लवकरी उदार । मी आहें सादर प्रतिग्रहासी ॥३॥
वाढवावा पुढें आणीक प्रकार । एक चि तें फार रुचि नेदी ॥१॥
निंच नवें लेणें देह हा पवाडा । पालट रोकडा वरावरी ॥ध्रु.॥
दिसे शोभिवंत सेवेनें सेवक । स्वामीची ते लोकत्रयीं कीर्ति ॥२॥
तुका ह्मणे आजी पाववा संतोष । करुनि कीर्तिघोष नाचईन ॥३॥
क्षोभ आणि कृपा मातेची समान । विभाग जतन करुनि ठेवी ॥१॥
क्षणभंगुर ते उपजली चिंता । खरी अखंडता आवडीची ॥ध्रु.॥
सिकवूं जाणे तें गोमाटियासाटीं । लोभें नाहीं तुटी निश्चयेंसी ॥२॥
अघवें चि मिथ्या समया आरतें । देता तो उचितें काळ जाणे ॥३॥
न करी वेव्हार नेदी गांजूं कोणा । भेडसावी तान्हें हाऊ आला ॥४॥
तुका ह्मणे करी जिवाची जतन। दचकूनि मन जवळी आणी ॥५॥
संसाराचें धांवे वेठी । आवडी पोटीं केवढी ॥१॥
हागों जातां दगड सांची । अंतरीं ही संकल्प ॥ध्रु.॥
लाज तेवढी नारायणीं। वांकडी वाणी पोरांपें ॥२॥
तुका ह्मणे बेशरमा । श्रमावरी पडिभरू ॥३॥
मी त्यांसी अनन्य तीं कोणा असती । ऐसें तंव चित्तीं विचारावें ॥१॥
आहे तो विचार आपणयापाशीं । कळा बिंबाऐसी प्रतिबिंबीं ॥ध्रु.॥
शुभ शकून तो शुभ लाभें फळे । पुढील तें कळे अनुभवें ॥२॥
तुका ह्मणे माझा असेल आठव । तैसा माझा भाव तुझ्या पायीं ॥३॥
बहु कृपावंते माझीं मायबापें । मी माझ्या संकल्पें अंतरलों ॥१॥
संचितानें नाहीं चुकों दिली वाट । लाविलें अदट मजसवें ॥ध्रु.॥
आतां मी रुसतों न कळतां वर्म । परी ठावे धर्म सर्व देवा ॥२॥
तुका ह्मणे उभा राहिला न बैसे । आमची माय असे उद्वेग त्या ॥३॥
कैसीं दिसों बरीं । आम्ही आळवितां हरि ॥१॥
नाहीं सोंग अळंकार । दास जाला संवसार ॥ध्रु.॥
दुःख आह्मां नाहीं चिंता । हरिचे दास ह्मणवितां ॥२॥
तुका ह्मणे देवा । ऐसीं जळो करितां सेवा ॥३॥
आतां सांडूं तरी हातीं ना पदरीं । सखीं सहोदरीं मोकिळलों ॥१॥
जनाचारामध्यें उडाला पातेरा । जालों निलाजिरा ह्मणऊनि ॥ध्रु.॥
कोणाचिया दारा जावेनासें जालें । म्यां च विटंबिलें आपणासी ॥२॥
कां न जाला माझे बुद्धीसी संचार । नाहीं कोठें थार ऐसें जालें ॥३॥
तुका ह्मणे तुज भक्त जाले फार । ह्मणोनियां थार नाहीं येथें ॥४॥
जेथें जातों तेथें पडतो मतोळा । न देखिजे डोळां लाभ कांहीं ॥१॥
कपाळीची रेखा असती उत्तम । तरि कां हा श्रम पावतों मी ॥ध्रु.॥
नव्हे चि तुह्मांस माझा अंगीकार । थीता संवसार अंतरला ॥२॥
भोग तंव जाला खरा भोगावया तो । भांडवल नेतो आयुष्य काळ ॥३॥
कोठें तुझी कीर्ती आइकिली देवा । मुकतों कां जीवा तुका ह्मणे ॥४॥
कां जी आह्मां होतें दोषाचें दर्शन । तुज समर्पून देहभाव ॥१॥
पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरसील सत्ता सकळ ही ॥ध्रु.॥
कां जी आह्मांवरि आणिकांची सत्ता । तुह्मांसी असता जविळकें ॥२॥
तुका ह्मणे पायीं केलें निवेदन । उचित तें दान करीं सत्ता ॥३॥
निंदावें हें जग । ऐसा भागा आला भाग ॥१॥
होतें तैसें आलें फळ । गेलें निवडूनि सकळ ॥ध्रु.॥
दुसयाच्या मता । मिळेनासें जालें चित्ता ॥२॥
तुका जाला सांडा । विटंबिती पोरें रांडा ॥३॥
माझे माथां तुझा हात । तुझे पायीं माझें चित्त ॥१॥
ऐसी पडियेली गांठी । शरीरसंबंधाची मिठी ॥ध्रु.॥
येरयेरांपाशीं । सांपडोन गेलों ऐसीं ॥२॥
तुका ह्मणे सेवा । माझी कृपा तुझी देवा ॥३॥
सत्य त्यागा चि समान । नलगे वेचावें वचन ॥१॥
नारायणा ऐसे दास । येरयेरांची च आस ॥ध्रु.॥
मळ नाहीं चित्ता । तेथें देवाची च सत्ता ॥२॥
तुका ह्मणे जाण । तें च भल्याचें वचन ॥३॥
माझिये बुद्धीचा खुंटला उपाव । करिसील काय पाहेन तें ॥१॥
सूत्रधारी तूं हें सकळचाळिता । कासया अनंता भार वाहों ॥ध्रु.॥
वाहिले संकल्प न पवती सिद्धी । येऊं देहबुद्धीवरि नयों ॥२॥
तुका ह्मणे दुःखी करिती तरंग । चिंतूं पांडुरंग आवरून ॥३॥
देखिलें तें धरिन मनें । समाधानें राहेन ॥१॥
भाव माझी सांटवण । जगजीवन कळावया ॥ध्रु.॥
बोळवीन एकसरें । उत्तरें या करुणेच्या ॥२॥
तुका ह्मणे नयों रूपा । काय बापा करीसी ॥३॥
वांयां जाय ऐसा । आतां उगवावा फांसा ॥१॥
माझें परिसावें गाहाणें । सुखदुःखाचीं वचनें ॥ध्रु.॥
हा चि आह्मां ठाव। पायीं निरोपाया भाव ॥२॥
तुका ह्मणे जार । तुझा तुज देवा भार ॥३॥
खादलें च खावें वाटे । भेटलें भेटे आवडी ॥१॥
वीट नाहीं पांडुरंगीं । वाढे अंगीं आर्त तें ॥ध्रु.॥
इंिद्रयांची हांव पुरे। परि हें उरे चिंतन ॥२॥
तुका ह्मणे पोट भरे । परि ते उरे भूक पुढें ॥३॥
सत्य आठवितां देव । जातो भेंव पळोनि ॥१॥
न लगे कांहीं करणे चिंता । धरी सत्ता सर्व तो ॥ध्रु.॥
ध्रु.॥ भावें भाव राहे पायीं । देव तैं संनिध ॥२॥
तुका ह्मणे कृष्णनामें । शीतळ प्रेम सर्वांसी ॥३॥
ब्रीद याचें जगदानी । तो चि मनीं स्मरावा ॥१॥
सम पाय कर कटी । उभा तटीं भींवरेच्या ॥ध्रु.॥
पाहिलिया वेध लावी । बैसे जीवीं जडोनि ॥२॥
तुका ह्मणे भक्तिकाजा । धांवें लाजा लवलाहें ॥३॥
माझिया मनाची बैसली आवडी । अवसान घडी एकी नेघे ॥१॥
पाय चित्तीं रूप डोळांच राहिलें । चिंतने गोविलें मुख सदा ॥ध्रु.॥
अवघियांचा जाला विसर हा मागें । वेध हा श्रीरंगें लावियेला ॥२॥
तुका ह्मणे कानीं आइकली मात । तो चि जाला घात जीवपणा ॥३॥
याची कोठें लागली चट । बहु तट जालेंसे ॥१॥
देवपिसीं देवपिसीं । मजऐसीं जग ह्मणे ॥ध्रु.॥
एकांताचें बाहेर आलें । लपविलें झांकेना ॥२॥
तुका ह्मणे याचे भेटी । जाली तुटी आपल्यांसी ॥३॥
दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरिकथा ॥१॥
तारूं भवसागरींचें । उंचनीच अधिकार ॥ध्रु.॥
चरित्र तें उच्चारावें । केलें देवें गोकुळीं ॥२॥
तुका ह्मणे आवडी धरीं । कृपा करी ह्मणऊनी ॥३॥
संतोषे माउली आरुषा वचनी । वोरसोनि स्तनीं लावी बाळा ॥१॥
तैसे परिमळाचें अवघें चि गोड । पुरवितो कोड पांडुरंग ॥ध्रु.॥
सेवा करी साहे निष्ठ उत्तरें । त्याचें वाहे मनीं तेंच बरें ॥२॥
तुका ह्मणे इच्छावसे खेळ खेळें । चिंता ते सकळ कांहीं नेणें ॥३॥
विनवीजे ऐसें कांहीं । उरलें नाहीं यावरि ॥१॥
आतां असो पंढरीनाथा । पायीं माथा तुमचिये ॥ध्रु.॥
मागें सारियेली युक्ती । कांहीं होती जवळी ते ॥२॥
निराशेची न करी आस । तुका दास माघारी ॥३॥
आतां येथें जाली जीवासवेंसाटी । होतें तैसें पोटीं फळ आलें ॥१॥
आतां धरिले ते नो सोडीं चरण । सांपडलें धन निजठेवा ॥ध्रु.॥
आतां हा अळस असो परता दुरी । नेदावी तें उरी उरों कांहीं ॥२॥
आतां याचा मज न व्हावा विसर । भरोनि अंतर राहों रूप ॥३॥
आतां लोकलाज नयो येथें आड । बहु जालें गोड ब्रह्मरस ॥४॥
तुका ह्मणे आतां जन्म हा सफळ । अंतरीं गोपाळ िस्थरावला ॥५॥
अनंतां जीवांचीं तोडिलीं बंधनें । मज हि येणें काळें कृपा कीजे ॥१॥
अनंत पवाडे तुझे विश्वंभरा । भक्तकरुणाकरा नारायणा ॥ध्रु.॥
अंतरींचें कळों देइप गुह्य गुज । अंतरीं तें बीज राखईन ॥२॥
समदृष्टी तुझे पाहेन पाउलें । धरीन संचले हृदयांत ॥३॥
तेणें या चित्ताची राहेल तळमळ । होतील शीतळ सकळ गात्रें ॥४॥
तुका ह्मणे शांति करील प्रवेश । मग नव्हे नाश अखंड तो ॥५॥
पराधीन माझें करूनियां जीणें । सांडीं काय गुणें केली देवा ॥१॥
उदार हे कीर्ति असे जगामाजी । कां तें ऐसें आजि पालटिलें ॥ध्रु.॥
आळवितों परी न पुरे चि रीग । उचित तो त्याग नाहीं तुह्मां ॥२॥
तुका ह्मणे कां बा मुळीं च व्यालासी । ऐसें कां नेणसी पांडुरंगा ॥३॥
नेणपणें नाहीं केला हा बोभाट । आतां आली वाट कळों खरी ॥१॥
आतां बहुं शीघ्र यावें लवकरी । वाट पाहें हरी भेटी देइप ॥ध्रु.॥
समर्थाच्या बाळा करुणेचें भाषण । तरी त्याची कोण नांदणूक ॥२॥
तुका ह्मणे बहु बोलिले बडिवार । पडिलें अंतर लौकिकीं तें ॥३॥
जें जें केलें तें तें साहे । कैसें पाहें भाविक ॥१॥
ओंवाळूनि माझी काया । सांडिली यावरूनि ॥ध्रु.॥
काय होय नव्हें करूं । नेणें धरूं सत्ता ते ॥२॥
तुका ह्मणे कटीं कर । उभें धीर धरूनि ॥३॥
नाहीं मज कृपा केली पांडुरंगें । संताचिया संगें पोट भरीं ॥१॥
चतुराचे सभे पंडित कुशळ । मी काय दुर्बळ विष्णुदास ॥२॥
तुका ह्मणे नेणें करूं समाधान । धरिले चरण विठोबाचे ॥३॥
तुह्मी माझा देवा करिजे अंगीकार । हा नाहीं विचार मजपाशीं ॥१॥
आतां दोहीं पक्षीं लागलें लक्षणें । देवभक्तपण लाजविलें ॥ध्रु.॥
एकांतीं एकलें न राहे निश्चळ । न राहे च पळ मन ठायीं ॥२॥
पायीं महत्वाची पडिली शंकळा । बांधविला गळा स्नेहा हातीं ॥३॥
शरीर सोकलें देखिलिया सुखा । कदान्न हें मुखा मान्य नाहीं ॥४॥
तुका ह्मणे जाला अवगुणांचा थारा । वाढली हे निद्रा अळस बहु ॥५॥
बोलिलिया गुणीं नाहीं पाविजेत । देवा नाहीं होत हित तेथें ॥१॥
कवतुक तुझें नवल यावरि । घेसील तें शिरीं काय नव्हे ॥ध्रु.॥
नाहीं मिळों येत संचिताच्या मता । पुराणीं पाहतां अघटित ॥२॥
तुका ह्मणे पायीं निरोपिला भाव । न्याल तैसा जाव सिद्धी देवा ॥३॥
हा तों नव्हता दीन । टाळायाच्या ऐसा क्षण ॥१॥
कां जी नेणों राखा हात । कैसें देखावें रडत ॥ध्रु.॥
दावूनियां आस । दूर पळविता कास ॥२॥
तुका ह्मणे धांव । घेतां न पुरे चि हांव ॥३॥
आर्तभूतां द्यावें दान । खरें पुण्य त्या नांवें ॥१॥
होणार तें सुखें घडो । लाभ जोडो महाबुद्धि ॥ध्रु.॥
सत्य संकल्प च साटीं । उजळा पोटीं रविबिंब ॥२॥
तुका ह्मणे मनीं वाव । शुद्ध भाव राखावा ॥३॥
कवतुकवाणी बोलतसें लाडें । आरुष वांकडें करुनि मुख ॥१॥
दुजेपणीं भाव नाहीं हे आशंका । जननीबाळकामध्यें भेद ॥ध्रु.॥
सलगी दुरूनि जवळी पाचारूं । धांवोनियां करूं अंगसंग ॥२॥
धरूनि पालव मागतों भातुकें । आवडीचें निकें प्रेमसुख ॥३॥
तुका ह्मणे तुज आमची च गोडी । ऐसी हे आवडी कळों आली ॥४॥
ऐकें पांडुरंगा वचन माझें एक । जालों मी सेवक दास तुझा ॥१॥
कळे तैसा आतां करावा उद्धार । खुंटला विचार माझा पुढें ॥ध्रु.॥
दंभ मान माझा करूं पाहे घात । जालिया ही थीत कारणाचा ॥२॥
हीन बुद्धि माझी अधम हे याती । अहंकार चित्तीं वसों पाहे ॥३॥
तुका ह्मणे मज विघडतां क्षण । न लगे जतन करीं देवा ॥४॥
जेणें माझें चित्त राहे तुझ्या पायीं । अखंड तें देइप प्रेमसुख ॥१॥
देहभाव राख दीन करूनियां । जनाचारी वायां जाय तैसा ॥ध्रु.॥
द्रव्य दारा नको मानाची आवडी । कवणेविशीं गोडी प्रपंचाची ॥२॥
तुझें नाम माझें धरूनियां चित्त । एकांत लोकांत सदा राहो ॥३॥
तुका ह्मणे तुझे जडोनियां पायीं । जालों उतराई पांडुरंगा ॥४॥
काय सांगों या संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥
काय द्यावें त्यांचें व्हावें उतराई । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ध्रु.॥
सहज बोलणें हितउपदेश । करूनि सायास शिकविती ॥२॥
तुका ह्मणे वत्स धेनुवेचा चित्तीं । तैसे मज येती सांभाळीत ॥३॥
देव जाणता देव जाणता । आपली च सत्ता एकाएकीं ॥१॥
देव चतुर देव चतुर । जाणोनि अंतर वर्ततसे ॥२॥
देव निराळा देव निराळा । अलिप्त विटाळा तुका ह्मणे ॥३॥
आपण चाळक बुद्धीच्या संचारा । आह्मांसी वेव्हारा पात्र केलें ॥१॥
काय जालें तरी नेघा तुह्मीं भार । आणीक कोणां थोर ह्मणों सांगा ॥ध्रु.॥
पंच भूतें तंव कर्माच्या या मोटा । येथें खरा खोटा कोण भाव ॥२॥
तुका ह्मणे नाहीं बोलावया जागा । कां देवा वाउगा श्रम करूं ॥३॥
एका एक वर्में लावूनियां अंगीं । ठेवितों प्रसंगीं सांभाळीन ॥१॥
नेघावा जीं तुह्मी वाव बहु फार । धरूनि अंतर ठायाठाव ॥ध्रु.॥
वेव्हारें आलें तें समानें चि होतें । बळ नाहीं येथें चालों येत ॥२॥
तुका ह्मणे आतां निवाडा च साटीं । संवसारें तुटी करुनि ठेलों ॥३॥
आतां येथें खरें । नये फिरतां माघारें ॥१॥
होइल हो तैसी आबाळी । देहनिमित्य या बळी ॥ध्रु.॥
तुह्मांसवें गांठी । देवा जीवाचिये साटीं ॥२॥
तुका नव्हे लंड । करूं चौघांमध्यें खंड ॥३॥
कां हो वाडवितां देवा । मज घरी समजावा । केवडा हो गोवा । फार केलें थोड्याचें ॥१॥
ठेविन पायांवरी डोई । यासी तुमचें वेचे काई । जालों उतराई । जाणा एकएकांचे ॥ध्रु.॥
निवाड आपणियांपाशीं । असोन कां व्हावें अपेसी । होती गांठी तैसी । सोडूनियां ठेविली ॥२॥
तुका ह्मणे गोड । होतें जालिया निवाड । दर्शनें ही चाड । आवडी च वाढेल ॥३॥
नव्हों सभाधीट । समोर बोलाया नीट । एकलीं एकट । दुजें नाहीं देखिलें ॥१॥
आतां अवघें तुम्हीं जाणां । तुमचें माझें नारायणा । येईल करुणा । ते चि पहा तुह्मांसी ॥ध्रु.॥
ताळ नाहीं माझे बुद्धी । धरली न धरवे शुद्धी । आतां बळें कधीं । कोण्या जन्में निवाड ॥२॥
आतां शेवटीचें । उत्तर तें हें चि साचें । शरण आलें त्याचें । तुका ह्मणे सांभाळा ॥३॥
ऐसा तंव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥१॥
मागत्याची टाळाटाळी । झिंज्या ओढोनि कपाळीं ॥ध्रु.॥
नसेल ना नवें । ऐसें धरियेलें देवें ॥२॥
तुका ह्मणे जाला । उशीर नाहीं तो विठ्ठला ॥३॥
माझ्या कपाळाच्या गुणें । किंवा सरलेंसे नेणें ॥१॥
नये वचन बाहेरी । उभें तिष्ठतसें दारीं ॥ध्रु.॥
काय सांगायास वेचे। रींद आरंभीं ठायींचे ॥२॥
तुका ह्मणे किती । भीड धरावी पुढती ॥३॥
कांहीं एक तरी असावा आधार । कासयानें धीर उपजावा ॥१॥
ह्मणविल्यासाटीं कैसें पडे रुजु । धणी नाहीं उजू सन्मुख तो ॥ध्रु.॥
वेचल्या दिसांचा कोणावरी लेखा । घालावा हा सुखासुखा आह्मीं ॥२॥
नाहीं मनोगत तोंवरि हे देवा । तुका ह्मणे सेवा नेघीजे तों ॥३॥
मनाचिये साक्षी जाली सांगों मात । सकळ वृत्तांत आपला तो ॥१॥
तुह्मां परामृश घेणें सत्ताबळें । धरितां निराळें कैसीं वांचों ॥ध्रु.॥
मी माझें सांडून यावया पसारा । आणीक दातारा काय काज ॥२॥
तुका ह्मणे आह्मी तुजविण एका । निढळें लौकिका माजी असों ॥३॥
घालूनि लोळणी पडिलों अंगणीं । सिंचा सिंचवणी तीर्थ वरि ॥१॥
वोल्हावेल तनु होईल शीतळ । जाली हळहळ बहुतापें ॥ध्रु.॥
पावेन या ठाया कइप जालें होतें । आलों अवचितें उष्ट्यावरि ॥२॥
तुका ह्मणे कोणी जाणवा राउळी । येइल जवळी पांडुरंग ॥३॥
तरीं भलें वांयां गेलों । जन्मा आलों मागुता । ह्मणऊनि ठेलों दास । सावकास निर्भयें ॥१॥
उणें पुरें काय माझें। त्याचें ओझें तुह्मांसी ॥ध्रु.॥
सांभाळावें तें म्या काई । अवो आई विठ्ठले । मागें जया जाई नें स्थळा । तुज गोपाळा विसरेंना ॥२॥
आपलें म्यां एकसरें । करुनि बरें घेतलें । तुका ह्मणे नारायणा । आतां जाणां आपुलें ॥३॥
उरलें तें भक्तिसुख । डोळां मुख पाहावें । अंतरींचें कां हों नेणां । नारायणा माझिये ॥१॥
पुरवां तैसी केली आळी । बळी जगदानियां ॥ध्रु.॥
हातीं घेउनि चोरां भातें । दावां रितें बाळका। साजतें हें थोरपण । नाहीं विण वत्सळा ॥२॥
शाहणें तरीं लाड दावी । बाळ जेवीं मातेसी । तुका ह्मणे पांडुरंगा । ऐसें पैं गा आहे हें ॥३॥
धरूनि हें आलों जीवीं । भेटी व्हावी विठोबासी ॥१॥
संकल्प तो नाहीं दुजा । महाराजा विनवितों ॥ध्रु.॥
पायांवरि ठेविन भाळ । येणें सकळ पावलें ॥२॥
तुका ह्मणे डोळेभरी । पाहिन हरी श्रीमुख ॥३॥
तुह्मां उद्धरणें फार । मज दुसरी नाहीं थार ॥१॥
आतां जैसें तैसें सोसा । काय करणें हृषीकेशा ॥ध्रु.॥
बरें न दिसेल ओळी । एका अन्न एका गाळी ॥२॥
लावितो आभार । तुका विखरलेती फार ॥३॥
न कळे जी भक्ती काय करूं सेवा । संकोचोनि देवा राहिलोंसे ॥१॥
जोडोनियां कर राहिलों निवांत । पायांपाशीं चित्त ठेवूनियां ॥ध्रु.॥
दिशाभुली करीं स्थळीं प्रदक्षणा । भ्रमें नारायणा कष्टविलें ॥२॥
तुका ह्मणे जालों आज्ञोचा पाळक । जीवनासी एक ठाव केला ॥३॥
एकविध वृत्ति न राहे अंतरीं । स्मरणीं च हरी विस्मृति ॥१॥
कैसा हा नवलाव वाटतो अनुभवें । मज माझ्या जीवें साक्षित्वेसी ॥ध्रु.॥
न राहे निश्चळ जागवितां मन । किती क्षीणेंक्षीणें सावरावें ॥२॥
तुका ह्मणे बहु केले वेवसाव । तेणें रंगें जीव रंगलासे ॥३॥
आतां सोडवणें न या नारायणा । तरि मी न वंचे जाणा काळा हातीं ॥१॥
ऐसें सांगोनिया जालों उतराई । आणीक तें काई माझे हातीं ॥ध्रु.॥
केलियाचें माप नये सेवटासी । करितील नासि अंतराय ॥२॥
तुका ह्मणे भय वाटतसे जीवा । धांवणिया धांवा लवकरी ॥३॥
सत्या माप वाढे । गबाळाची चाली खोडे ॥१॥
उतरे तें कळें कसी । विखरोणें सर्वदेशीं ॥ध्रु.॥
घरामध्ये राजा । नव्हे हो वा पाटपूजा ॥२॥
तुका ह्मणे साचें । रूप तें दर्पणाचें ॥३॥
नाहीं खंड जाला । माझा तुमचा विठ्ठला ॥१॥
कैसें कैसें हो दुश्चित । आहे चौघांपाशीं नीत ॥ध्रु.॥
मुळींचे लिहिलें । मज आतां सांपडलें ॥२॥
तुका ह्मणे मज । न लगे बोलणें सहज ॥३॥
हेचि वादकाची कळा । नाहीं येऊं येत बळा ॥१॥
धीर करावा करावा । तरी तो आहे आह्मां देवा ॥ध्रु.॥
रिघावें पोटांत। पायां पडोन घ्यावा अंत ॥२॥
तुका ह्मणे वरि । गोडा आणावा उत्तरीं ॥३॥
एक परि बहिर बरें । परि तीं ढोरें ग्यानगडें ॥१॥
कपाळास लागली अगी । अभागी कां जीतसे ॥ध्रु.॥
एक परि बरें वेडें । तार्किक कुडें जळो तें ॥२॥
तुका ह्मणे खातडवासी । अमृतासी नोळखे ॥३॥
खेळों मनासवें जीवाच्या संवादें । कौतुक विनोदें निरांजनी ॥१॥
पचीं पडिलें तें रुचे वेळोवेळां । होतसे डोहळा आवडीस ॥ध्रु.॥
एकांताचें सुख जडलें जिव्हारीं । वीट परिचारीं बरा आला ॥२॥
जगाऐसी बुद्धि नव्हे आतां कदा । लंपट गोविंदा जालों पायीं ॥३॥
आणीक ते चिंता न लगे करावी । नित्य नित्य नवी आवडी हे ॥४॥
तुका ह्मणे धडा राहिला पडोन । पांडुरंगीं मन विसांवलें ॥५॥
उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ । आपलें सकळ । ते प्रसंगीं पाहिजे ॥१॥
नेम नाहीं लाभ हानि । अवचित घडती दोनी । विचारूनि मनीं । पाहिजे तें प्रयोजावें ॥ध्रु.॥
जाळ जाळा काळें । करपों नेदावें आगळें । जेवितां वेगळें । ज्याचें त्याचें तेथें तें शोभे ॥२॥
पाळी नांगर पाभारीं । तन निवडूनि सोंकरी । तुका ह्मणे धरी । सेज जमा सेवटीं ॥३॥
पडिलिया ताळा । मग अवघा चि निर्वाळा । तेथें कोणी बळा । नाहीं येत कोणासी ॥१॥
जोडिलें तें लागें हातीं । आपआपली नििंश्चती । हर्ष आणि खंती । तेथें दोनी नासलीं ॥ध्रु.॥
सहज सरलिया कारणें । मग एकला आपण । दिसे तरी भिन्न । वचनाचा प्रसंग ॥२॥
करूनि झाडा पाडा । तुका वेगळा लिगाडा। नििंश्चतीच्या गोडा । गोष्टी ह्मुण लागती ॥३॥
जीविता तो माझा पिता । उखता तो उखत्यांचा ॥१॥
जनार्दनीं सरती कर्में । वाते भ्रमे अनेत्र । अपसव्य सव्यामधीं । ऐसी शुद्धी न धरितां ॥२॥
तुका ह्मणे खांद्या पानें । सिंचतां भिन्न कोरडी ॥३॥
माउलीची चाली लेंकराचे ओढी । तयालागीं काढी प्राणें प्रीती ॥१॥
ऐसी बिळवंत आवडी जी देवा । संतमहानुभावा विनवितों ॥ध्रु.॥
मोहें मोहियेलें सर्वकाळ चित्त । विसरु तो घेत नाहीं क्षणें ॥२॥
तुका ह्मणे दिला प्रेमाचा वोरस । सांभाळिलें दास आपुलें तें ॥३॥
केवढा तो अहंकार । माझा तुह्मां नव्हे दूर ॥१॥
आतां कोण पडे पायां । तुमच्या अहो पंढरिराया ॥ध्रु.॥
कां जी कृपेनें कृपण । वेचत असे ऐसें धन ॥२॥
तुका ह्मणे देवें । दुजियाचें पोतें न्यावें ॥३॥
अपराधी ह्मणोनि येतों काकुलती । नाहीं तरी होती काय चाड ॥१॥
येइल तारूं तरी तारा जी देवा । नाहीं तरी सेवा घ्या वो भार ॥ध्रु.॥
कासया मी आतां वंचूं हे शरीर । आहें बारगीर जाइप जनें ॥२॥
तुका ह्मणे मन करूनि मोकळें । आहें साळेंढाळें उदार मी ॥३॥
माझे तों फुकाचे कायेचे चि कष्ट । नव्हे क्रियानष्ट तुह्मांऐसा ॥१॥
कांहीं च न वंचीं आजिचा प्रसंगीं । सकळा ही अंगीं करीन पूजा ॥ध्रु.॥
द्यावें काहीं तुह्मीं हें तों नाहीं आस । असों या उदास देहभावें ॥२॥
तुका ह्मणे माझी मावळली खंती । समाधान चित्तीं सर्वकाळ ॥३॥
स्वामीचिया सत्ता । आधीं वर्म येतें हाता । पुढती विशेषता । लाभें लाभ आगळा ॥१॥
करीं कवतुकाचे बोल । परि जिव्हाऑयाची ओल । आवडे रसाळ । मायबापा लाडाचें ॥ध्रु.॥
मनें मेळविलें मना । नाहीं अभावी शाहणा । अंतरींच्या खुणा । वरि दिल्या उमटोनि ॥२॥
नाहीं पराश्रमें काळा । अवघ्या जागविल्या वेळा । देवासी निराळा । तुका क्षण न सोडी ॥३॥
एके ठायीं अन्नपाणी । ग्रासोग्रासीं चिंतनीं ॥१॥
वेळोवेळां जागवितों । दुजें येइल ह्मुण भीतों ॥ध्रु.॥
नाहीं हीं गुंतत उपचारीं । मानदंभाचे वेव्हारीं ॥२॥
तुका जालासे शाहाणा । आड लपे नारायणा ॥३॥
वैरागरापाशीं रत्नाचिया खाणी । हे चि घ्यावी धणी फावेल तों ॥१॥
येथें नाहीं तर्कवितर्काची चाड । होतसे निवाड खया खोट्यां ॥ध्रु.॥
उगा च सारावा वाढिला तो ठाव । वाढितिया भाव कळतसे ॥२॥
तुका ह्मणे टांचणीचें पाणी । येथें झरवणी जैशातैसें ॥३॥
समर्थ या नांवें दिनांचा कृपाळ । हें तंव सकळ स्वामीअंगीं ॥१॥
मज काय लागे करणें विनवणी । विदित चरणीं सकळ आहे ॥ध्रु.॥
दयासिंधु तुह्मां भांडवल दया । सिंचावें आतां या कृपापीयूषें ॥२॥
तुका ह्मणे अवो पंढरिनिवासे । बहु जीव आसे लागलासे ॥३॥
लेखिलें कवित्व माझे सहज बोल । न लगे चि ओल जिव्हाऑयाची ॥१॥
नये चि उत्तर कांहीं परतोनि । जालों नारायणीं न सरतें ॥ध्रु.॥
लाजिरवाणी कां वदली हे वाचा । नव्हे च ठायींचा मननशीळ ॥२॥
तुका ह्मणे फळ नव्हे चि सायासा । पंढरीनिवासा काय जालें ॥३॥
येणें जाला तुमचे पोतडीचा झाडा । केलासी उघडा पांडुरंगा ॥१॥
भरूनियां घरीं राहिलों वाखती । आपुली नििंश्चती आपल्यापें ॥ध्रु.॥
आतां काय उरी उरली ते सांगा । आणिलेति जगाचिये साक्षी ॥२॥
तुका ह्मणे कोठें पाहोंजासी आतां । माझी जाली सत्ता तुह्मांवरि ॥३॥
तुमच्या पाळणा ओढतसे मन । गेलों विसरोन आपणासी ॥१॥
लागेल पालटें फेडावें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥ध्रु.॥
तुमचे आवडी संबंधाचा त्याग । घेतला ये लाग जगनिंदेचा ॥२॥
तुका ह्मणे जैसा माझा जीव ओढे । तैसें च तिकडे पाहिजेल ॥३॥
नाहीं मज कोणी उरला दुर्जन । मायबापाविण ब्रह्मांडांत ॥१॥
कासया जी माझी करणें येविसीं । भयाची मानसीं चिंता संतीं ॥ध्रु.॥
विश्वंभराचिये लागलों सांभाळीं । सत्तेनें तो चाळी आपुलिये ॥२॥
तुका ह्मणे माझें पाळणपोषण । करितां आपण पांडुरंगा ॥३॥
मज कांहीं सीण न व्हावा यासाटीं । कृपा तुह्मां पोटीं उपजलीं ॥१॥
होतें तैसें केलें आपलें उचित । शिकविलें हित बहु बरें ॥ध्रु.॥
आह्मी न मनावी कोणाची आशंका । तुह्मां भय लोकां आहे मनीं ॥२॥
तुका ह्मणे आतां संचिताचा ठेवा । वोडवला घ्यावा जैसा तैसा ॥३॥
कोणाचें चिंतन करूं ऐशा काळें । पायांचिया बळें कंठीतसें ॥१॥
पाहातसें वाट येइप गा विठ्ठला । मज कां हा केला परदेश ॥ध्रु.॥
बहुतांचे सत्ते जालों कासावीस । जाय रात्री दिस वैरियांचा ॥२॥
तुका ह्मणे बैसें मनाचिये मुळीं । तरीं च ही जाळीं उगवतीं ॥३॥
कां जी तुह्मीं ऐसे नव्हा कृपावंत । निवे माझें चित्त ठायिंच्या ठायीं ॥१॥
कांही शम नये विषम अंतरा । शांतीचा तो बरा ऐसा योग ॥ध्रु.॥
दुःखी होतों पंचभूतांच्या विकारें । जडत्वें दातारें राखावीं तीं ॥२॥
तुका ह्मणे मोडा अहंकाराची मान । धरितों चरण ह्मणऊनि ॥३॥
मागत्याची कोठें घडते निरास । लेंकरा उदास नाहीं होतें ॥१॥
कासया मी होऊं उतावीळ जीवीं । जाणता गोसावी सर्व आहे ॥ध्रु.॥
जाला तरी वेळ कवतुकासाटीं । निर्दया तों पोटीं उपजेना ॥२॥
तुका ह्मणे त्यासी ठाउकें उचित । होईल संकेत नेमियेला ॥३॥
आरुषा वचनीं मातेची आवडी । ह्मणऊनि तांतडी घेती नाहीं ॥१॥
काय होइल माझें मांडिलें कवतुक । आदराची भूक रडारोवी ॥ध्रु.॥
लपोनियां करी चुकुर माऊली । नाहीं होती केली निष्ठासांडी ॥२॥
तुका ह्मणे करी पारखीं वचनें । भेवउनि तान्हें आळवावें ॥३॥
प्रीतीच्या भांडणा नाहीं शिरपाव । वचनाचे चि भाव निष्टता ॥१॥
जीणें तरी एका जीवें उभयता । पुत्राचिया पिता दुखवे दुःखें ॥ध्रु.॥
काय जाणे तुटों मायेचें लिगाड । विषम तें आड उरों नेणें ॥२॥
तुका ह्मणे मज करुणा उत्तरें । करितां विश्वंभरे पाविजैल ॥३॥
नको घालूं झांसां । मना उपाधिवोळसा ॥१॥
जे जे वाहावे संकल्प । पुण्य तरी ते चि पाप ॥ध्रु.॥
उपजतो भेव । होतो कासावीस जीव ॥२॥
तुका ह्मणे पाहों । होइल तें निवांत राहों ॥३॥
बीजीं फळाचा भरवसा । जतन सिंचनासरिसा । चाविलिया आसा । काकुलती ते नाड ॥१॥
हा तों गडसंदीचा ठाव। पिके पिकविला भाव । संकोचोनि जीव । दशा केली जतन ॥ध्रु.॥
माती घाली धनावरी । रांडा रोटा वरीवरी । सुखाचे सेजारीं। दुःख भ्रमें भोगीतसे ॥२॥
तुका ह्मणे दिशाभुली । जाल्या उफराटी चाली । निवाडाची बोली । अनुभवें साक्षीसी ॥३॥
काय उरली ते करूं विनवणी । वेचलों वचनीं पांडुरंगा ॥१॥
अव्हेरलों आतां कैचें नामरूप । आदर निरोप तरि तो नाहीं ॥ध्रु.॥
माझा मायबाप ये गेलों सलगी । तों हें तुह्मां जगीं सोयइरिका ॥२॥
तुका ह्मणे आतां जोडोनियां हात । करी दंडवत ठायिंचाठायीं ॥३॥
आवडी धरूनि करूं गेलों लाड । भक्तिप्रेमकोड न पुरे चि ॥१॥
ह्मणऊनि जीव ठेला असावोनि । खेद होतो मनीं बहु साल ॥ध्रु.॥
वेठीऐसें वाटे निर्फळ कारण । शीतळ होऊन खोडावलों ॥२॥
तुका ह्मणे सरतें नव्हें चि पायांपें । बळ केलें पापें नव्हें चि भेटी ॥३॥
प्रीतीचा तो कळवळा । जिव्हाळाचि वेगळा ॥१॥
बहु नेदी रडों माता । दुश्चित होतां धीर नव्हे ॥ध्रु.॥
वरी वरी तोंडापुरतें । मोहोरी तें कळतसे ॥२॥
जाणोनियां नेणता तुका । नव्हे लोकांसारिखा ॥३॥
हा गे हा चि आतां लाहो । माझा अहो विठ्ठला ॥१॥
दंडवत दंडवत । वेगळी मात न बोलें ॥ध्रु.॥
वेगळाल्या कोठें भागें। लाग लागें लावावा ॥२॥
तुका ह्मणे केल्या जमा । वृत्तितमा भाजूनि ॥३॥
तुह्मांसी न कळे सांगा काय एक । असया संकल्प वागवूं मी ॥१॥
आहे तेथें सत्ता ठेविलें स्थापूनि । प्रमाणें चि वाणी वदे आज्ञा ॥ध्रु.॥
कृपा जाली मग न लगे अंगसंग । निजध्यासें रंग चढता राहे ॥२॥
तुका ह्मणे मागें बोलिलों तें वाव । आतां हा चि भाव दृढ झाला ॥३॥
आवडी न पुरे मायबापापासीं । घडों का येविसीं सकईल ॥१॥
होईल नेमलें आपुलिया काळें । आलीयाचा बळें आघ्रो उरे ॥ध्रु.॥
जाणविलें तेथे थोडें एकवेळा । सकळ ही कळा सवाौत्तमीं ॥२॥
तुका ह्मणे निवेदिलें गुह्य गुज । आतां तुझी तुज सकळ चिंता ॥३॥
वोखटा तरी मी विटलों देहासी । पुरे आतां जैसी जोडी पुन्हां ॥१॥
किती मरमर सोसावी पुढती । राहिलों संगती विठोबाचे ॥ध्रु.॥
आतां कोण याचा करील आदर । जावो किळवर विटंबोनि ॥२॥
तुका ह्मणे आतां सांडि तें चि सांडि । कोण फिरे लंडी यासी मागें ॥३॥
हें ही ऐसें तें ही ऐसें । उभय पिसें अविचार ॥१॥
अभिमानाचे ठेलाठेलीं । मधीं जाली हिंपुष्टी ॥ध्रु.॥
धीरा शांती ठाव नुरे । हा चि उरे आबाऑया ॥२॥
कौतुक हें पाहे तुका । कढतां लोकां अधनि ॥३॥
हित जाणे चित्त । कळों येतसे उचित ॥१॥
परिहार ते संपादनी । सत्य कारण कारणीं ॥ध्रु.॥
वरदळ तें नुतरे कसीं । आगीमध्यें तें रसीं ॥२॥
तुका ह्मणे करुनी खरें । ठेवितां तें पुढें बरें ॥३॥
देवें दिला देह भजना गोमटा । तों या जाला भांटा बाधिकेच्या ॥१॥
ताठोनियां मान राहिली वरती । अहंकारा हातीं लवों नल्हे ॥ध्रु.॥
दास ह्मणावया न वळे रसना । सइरवचना बासे गळा ॥२॥
तुका ह्मणे कोठें ठेवावा विटाळ । स्नानें नीर्मळ व्हावयासी ॥३॥
काय करूं पोरा लागली चट । धरी वाट देउळाची ॥१॥
सांगितलें नेघे कानीं । दुजें मनीं विठ्ठल ॥ध्रु.॥
काम घरीं न करी धंदा । येथें सदा दुश्चित ॥२॥
आमचे कुळीं नव्हतें ऐसें । हें च पिसें निवडलें ॥३॥
लौकिकाची नाहीं लाज । माझें मज पारिखें ॥४॥
तुका ह्मणे नरका जाणें । त्या वचनें दुष्टांचीं ॥५॥
कारणापें असतां दृष्टी । शंका पोटीं उपजेना ॥१॥
शूर मिरवे रणांगणीं । मरणीं च संतोष ॥ध्रु.॥
पाहिजे तो कळवळा। मग बळा काय उणे ॥२॥
तुका ह्मणे उदारपणें । काय उणें मनाचें ॥३॥
नव्हती हे उसणे बोल । आहाच फोल रंजवण ॥१॥
अनुभव तो वरावरी । नाहीं दुरी वेगळा ॥ध्रु.॥
पाहिजे तें आलें रुची।काचाकुची काशाची ॥२॥
तुका ह्मणे लाजे आड । त्याची चाड कोणासी ॥३॥
जों जों घ्यावा सोस । माझे वारीं गर्भवास । लटिक्याचा दोष । अधिक जडे अंगेसीं ॥१॥
आतां आहे तैसें असो । अनुताप अंगीं वसो । येवढें चि नसो । माझें आणि परावें ॥ध्रु.॥
जागाजालेपणें। काय नासावें स्वप्न । शब्दाचिया शिणें । कष्ट मिथ्या मानावे ॥२॥
छाये माकड विटे । धांवे कुपीं काय भेटे । तुका ह्मणे फुटे । डोई गुडघे कोंपर ॥३॥
गुणांचा चि सांटा । करूं न वजों आणिका वाटा ॥१॥
करिती छंद नानापरी । भरोन सिणती आडभरी ॥ध्रु.॥
नेमली पंगती। आह्मां संतांची संगती ॥२॥
तुका ह्मणे लीळा । येर कवतुक पाहों डोळां ॥३॥
शिकल्या शब्दाचें उत्पादितों ज्ञान । दरपणींचें धन उपर वाया ॥१॥
अनुभउ कइं होईन भोगिता । सांकडें तें आतां हें चि आलें ॥ध्रु.॥
गायें नाचें करीं शरीराचे धर्म । बीजकळावर्म तुमचें दान ॥२॥
तुका ह्मणे केला उशीर न साहे । द्याल तरी आहे सर्व सिद्ध ॥३॥
सिकविला तैसा पढों जाणे पुसा । कैंची साच दशा तैसी अंगीं ।
स्वप्नींच्या सुखें नाहीं होत राजा । तैसा दिसे माझा अनुभव ॥१॥
कासया हा केला जिहुवे अळंकार । पायांसी अंतर दिसतसे ॥ध्रु.॥
दर्पणींचें धन हातीं ना पदरीं । डोळां दिसें परी सत्याचिये ।
आस केली तरी लाळ चि घोंटावी । ठकाठकी तेवीं दिसतसे ॥२॥
कवित्वें रसाळ वदविली वाणी । साक्ष ही पुराणीं घडे ऐसी ।
तुका ह्मणे गुरें राखोनि गोंवारी । माझीं ह्मणे परि लाभ नाहीं ॥३॥
अनुभव तो नाहीं अमुचिया दरषणें । अइकिलें कानें वदे वाणी ।
जेविल्याचा कैसा अनुभव अंतरीं । ह्मणतां मांडे पुरी काय होतें ॥१॥
नाहींनाहीं गेली तळमळ दातारा । कां जी हरिहरा चाळविलें ॥ध्रु.॥
पत्रीं कुशळता भेटी अनादर । काय तें उत्तर येइल मानूं ।
अंतरीं सबाह्यीं कां नाहीं सारिखें । धरूनि पारिखें वर्त्ततसां ॥२॥
आलों आलों ऐसी दाऊनियां आस । वाहों बुडतयास काय द्यावें ।
तुका ह्मणे अहो चतुरा शिरोमणि । किती माझी वाणी तुह्मी कोठें ॥३॥
केलें तरी आता साच चि करावें । विचारिलें द्यावें कृपादान ॥१॥
संकल्पासी नाहीं बोलिला विकल्प । तुह्मां पुण्यपाप कळे देवा ॥ध्रु.॥
उदार शक्ति तंव तुमची भूमंडळीं । ऐसी िब्रदावळी गर्जतसे ॥२॥
तुका ह्मणे अहो रकुमादेवीवरा । उपरोध कां धरा माझा आतां ॥३॥
अहो पुरुषोत्तमा । तुह्मां काशाची उपमा ॥१॥
सतंत तो नाहीं बुद्धी । नाळवितां नाहीं शुद्धि ॥ध्रु.॥
जागविलें तरी । तुह्मां वेक्तियेणें हरी ॥२॥
तुका ह्मणे देवा । तुम्हा नित्य दिस नवा ॥३॥
मथनें भोगे सार । ताकें घडे उपकार ॥१॥
बरवी सायासाची जोडी । अनुभविया ठावी गोडी ॥ध्रु.॥
पाक आणि रुचि। जेथें तेथें ते कइंची ॥२॥
वाढितो पंगती । तुका आवडी संगती ॥३॥
चिंतनाची जोडी । हा चि लाभ घडोघडी ॥१॥
तुह्मी वसूनि अंतरीं । मज जागवा निर्धारीं ॥ध्रु.॥
जाय जेथें मन । आड घाला सुदर्शन ॥२॥
तुका ह्मणे भोजें । नाचें हो ऐसें न लजें ॥३॥
आवडीची न पुरे धणी । प्रीत मनीं बैसली ॥१॥
नित्य नवा कळवळा । मायबाळामध्यें तों ॥ध्रु.॥
सुख सुखा भेटों आलें । होय वाल्हें पोटींचे ॥२॥
तुका ह्मणे ब्रह्मानंदें । संतवृंदें चरणापें ॥३॥
जडलों तों आतां पायीं । होऊं काई वेगळा ॥१॥
तुम्हीं संतीं कृपा केली । गंगे चाली ओघाची ॥ध्रु.॥
सांभाळिलों मायबापा । केलों तापावेगळा ॥२॥
वोरसें या जीव धाला । तुका ठेला मौन्य चि ॥३॥
काळावरी सत्ता । ऐशा करितो वारता ॥१॥
तो मी हीणाहूनि सांडें । देवे दुहें काळतोंडें ॥ध्रु.॥
मानूनी भर्वसा । होतों दासा मी ऐसा ॥२॥
तुका ह्मणे मान । गेलों वाढवूं थोरपण ॥३॥
समर्थाचे सेवे कोठें नाहीं घात । पाहों नये अंत पांडुरंगा ॥१॥
आहे तैसी नीत विचारावी बरी । येऊनी भीतरी वास करा ॥ध्रु.॥
निढळ राखिलें तरी भयाभीत । हर्षामर्ष चित्त पावतसे ॥२॥
तुका ह्मणे तरी कळेल निवाड । दर्शनाची चाड शुभकीर्ति ॥३॥
बहु धीर केला । जाण न होसी विठ्ठला ॥१॥
आतां धरीन पदरीं । करीन तुज मज सरी ॥ध्रु.॥
जालों जीवासी उदार । उभा राहिलों समोर ॥२॥
तुका विनवी संतां । ऐसें सांगा पंढरिनाथा ॥३॥
नेदावी सलगी न करावा संग । करी चित्ता भंग वेळोवेळा ॥१॥
सर्प शांतिरूप न ह्मणावा भला । झोंबे खवळीला तात्काळ तो ॥२॥
तुका ह्मणे दुरी राखावा दुर्जन । करावें वचन न घडे तें ॥३॥
मज अभयदान देई दातारा । कृपेच्या सागरा मायबापा ॥१॥
देहभाव तुझ्या ठेवियेला पायीं । आणीक मी कांहीं दुजें नेणें ॥ध्रु.॥
सेवाभक्तिहीन नेणता पतित । आतां माझे हित तुझ्या पायीं ॥२॥
तुका ह्मणे माझें सर्व ही साधन । नाम संकीर्तन विठोबाचें ॥३॥
करावा वर्षाव । तृषाक्रांत जाला जीव ॥१॥
पाहें आकाशाची वास । जाणता तूं जगनिवास ॥ध्रु.॥
संयोगें विस्तार । वाढी लागे तो अंकूर ॥२॥
तुका ह्मणे फळें । चरणांबुजें तीं सकळें ॥३॥
करीं ऐसी धांवाधांवी । चित्त लावीं चरणापें ॥१॥
मग तो माझा मायबाप । घेइल ताप हरूनी ॥ध्रु.॥
बहुतांच्या मतें गोवा । होऊं जीवा नेदावा ॥२॥
तुका ह्मणे करुणाबोलें । धीर विठ्ठलें निघेना ॥३॥
एकविध नारायण । तेथें विषमाचा सीण । पालटों चि भिन्न । नये अणुप्रमाण ॥१॥
अवघें सारावें गाबाळ । चुकवूनियां कोल्हाळ । आनंदाचें स्थळ । एकाएकीं एकांत ॥ध्रु.॥
कायावाचामन। स्वरूपीं च अनुसंधान । लक्ष भेदी बाण । येणे पाडें लवलाहो ॥२॥
तुका ह्मणे आळस निद्रा । येथें देउनियां चिरा । देउनियां धीरा । मिठी जाणा जागृतीं ॥३॥
हारपोनि गेली निशी । निद्रा कैसी न देखों ॥१॥
नारायणीं वसलें घर । निरंतर आनंद ॥ध्रु.॥
अवघा रुधविला ठाव। नेला वाव मी माझें ॥२॥
तुका ह्मणे एके ठावीं । असूं नाहीं सीनाभिन्न ॥३॥
पाहा कैसेकैसे । देवें उद्धरिले आनयासें ॥१॥
ऐका नवल्याची ठेव । नेणतां भक्तिभाव ॥ध्रु.॥
कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बैसला ॥२॥
पांखांच्या फडत्कारीं । उद्धरुनी नेली घारी ॥३॥
खेचरें पिंडी दिला पाव । त्या पूजनें धाये देव ॥४॥
तुका ह्मणे भोळा । स्वामी माझा हो कोंवळा ॥५॥
अनुभव ऐसा । मज लागला सरिसा ॥१॥
पाठी बैसली सेजारीं । नव्हे शांत कोणे परी ॥ध्रु.॥
कोठें न लगे जावें । कांहीं घालावया ठावें ॥२॥
तुका ह्मणे कोटि । दुःखाच्या च तये पोटीं ॥३॥
पाठीवरी भार । जातो वाहूनियां खर ॥१॥
संत नेतील त्या ठाया । माझी आधीन त्यां काया ॥ध्रु.॥
मोटचौफळ । अंतीं उिच्छष्टाचें बळ ॥२॥
न संडीं मारग । येथें न चोरूनि अंग ॥३॥
आपुलिया सत्ता । चालविती नाहीं चिंता ॥४॥
कळविळला तुका । घराचार येथें नका ॥५॥
मागें पुढें जालों लाटा । अवघा मोटा सरळ ॥१॥
नाहीं कोठें रितें अंग । नित्य रंग नवा चि ॥ध्रु.॥
पोसिंद्याचे पडिलों हातीं । वोझें माती चुकली ॥२॥
जोगावलों पोटीं खर । पाठी भार वरि नाहीं ॥३॥
अवघिया मोकऑया दिशा । नाहीं वोळसा कामाचा ॥४॥
संताचिये लोळें द्वारीं । पळती दुरी गोमाशा ॥५॥
कांहीं न साहेसा जाला । तुका नेला समर्थ ॥६॥
पातोगें महाद्वारीं। वरि झुली वाकळा ॥७॥
करणें न करणें वारलें जेथें । जातों तेणें पंथें संतसंगें ॥१॥
संतीं हें पहिलें लाविलें निशाण । ते खुणा पाहोन गर्जें नाम ॥२॥
तुका ह्मणे तुह्मीं चला या चि वाटे । भरवशानें भेटे पांडुरंग ॥३॥
कइंचें कारण । तृष्णा वाढविते सीण ॥१॥
काय करूनि ऐसा संग । सोसें चि तूं पांडुरंग ॥ध्रु.॥
रूपीं नाहीं गोडी । हांवे हांवे उर फोडी ॥२॥
तुका न पडे भरी । ऐशा वरदळाचे थोरी ॥३॥
धन्य तो ग्राम जेथें हरिदास । धन्य तो चि वास भाग्य तया ॥१॥
ब्रह्मज्ञान तेथें असे घरोघरीं । धन्य त्या नरनारी चतुर्भुज ॥ध्रु.॥
नाहीं पापा रिघ काळाचें जीवन । हरिनामकीर्त्तन घरोघरीं ॥२॥
तुका ह्मणे तिहीं तारिलें सकळां । आपल्या कोटिकुळासहित जीव ॥३॥
मारूं नये सर्प संतांचिये दृष्टी । होतील ते कष्टी व्यापकपणें ॥१॥
एक सूत्र जीवशिवीं आइक्यता । रोम उपडितां अंग कांपे ॥ध्रु.॥
नाहीं साहों येत दुखाची ते जाती । परपीडा भूतीं साम्य जालें ॥२॥
तुका ह्मणे दिला नीतीचा संकेत । पुजा नांवें चित्त सुखी तेणें ॥३॥
भय होतें आह्मीपणें । पाठी येणें घातलें ॥१॥
अवघा आपुला चि देश । काळा लेश उरे चि ना ॥ध्रु.॥
समर्थाचें नाम घेतां । मग चिंता काशाची ॥२॥
तुका ह्मणें नारायणें । जालें जिणें सुखाचें ॥३॥
विषम वाटे दुरवरी । चालूनि परती घरी । मागील ते उरी । नाहीं उरली भयाची ॥१॥
मुख्य न व्हावा तो नाड । सेवटाचे हातीं गोड । सरलिया चाड । मग कैचे उद्वेग ॥ध्रु.॥
होता पहिला अभ्यास । समयीं घालावया कास । तेव्हां लटिके दोष । योगें अनुतापाच्या ॥२॥
तुका ह्मणे आहे । बुद्धी केलियानें साहे । जवळी च पाहें । देव वाट स्मरणाची ॥३॥
आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंदु ॥ध्रु.॥
प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥२॥
तुका ह्मणे आह्मां जोगें । विठ्ठल घोगें खरें माप ॥३॥
विश्वीं विश्वंभर । बोले वेदांतींचा सार ॥१॥
जगीं जगदीश । शास्त्रें वदती सावकास ॥ध्रु.॥
व्यापिलें हें नारायणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥२॥
जनीं जनार्दन । संत बोलती वचनें ॥३॥
सूर्याचिया परी । तुका लोकीं क्रीडा करी ॥४॥
निरोधती परि न मोडे विकार । बहु हीं दुस्तर विषयद्वारें ॥१॥
राहातेति तुह्मी भरोनि अंतरीं । होतों तदाकारी निर्विषचि ॥ध्रु.॥
कृपेचिया साक्षी असती जवळी । वचनें मोकळीं सरत नाहीं ॥२॥
तुका ह्मणे ताळा मेळवणीपाशीं । विनंती पायापाशीं हे चि करीं ॥३॥
अद्वय चि द्वय जालें चि कारण । धरिलें नारायणें भक्तिसुख ॥१॥
अपरोक्ष आकार जाला चतुर्भुज । एकतत्त्व बीज भिन्न नाहीं ॥ध्रु.॥
शून्य निरशुन्यी राहिलें निर्मळ । तें दिसे केवळ इटेवरी ॥२॥
सुखें घ्यावें नाम वदना ही चाड । सरिता वापी आड एक पाणी ॥३॥
तुका ह्मणे मी च आहें तेणें सुखें । भेद नाहीं मुखें नाम गातों ॥४॥
उदार चक्रवर्ती । वैकुंठीचा भूपति । पुंडलिकाचिया प्रीती । विटेवरी राहिला ॥१॥
सर्वसिद्धीचा दातार । सवें आणिला परिवार । भक्त अभयंकर । घ्याघ्या ऐसें ह्मणतसे ॥ध्रु.॥
जेणें हें विश्व निर्मिलें । महर्षीदेवा संस्थापिलें । एकवीस स्वर्गांतें धरिलें । सत्तामात्रें आपुलिया ॥२॥
तुका ह्मणे कृपावंत । इिच्छले पुरवी अर्थ। रिद्धिसिद्धिमुक्ती देतसे । शेखीं संग आपुला ॥३॥
सकलगुणें संपन्न । एक देवाचें लक्षण ॥१॥
वरकड कोठें कांहीं । एक आहे एक नाहीं ॥ध्रु.॥
षड्गुण ऐश्वर्य संपन्न । एक भगवंतीं जाण ॥२॥
तुका ह्मणे जेंजें बोला । तेंतें साजे या विठ्ठला ॥३॥
वैकुंठींचें सुख पंढरिये आलें । अवघें पुंडलिकें सांटविलें ॥१॥
घ्या रे घ्या रे माझे बाप । जिव्हा घेउनि खरें माप। करा एक खेप । मग करणें न लगे ॥ध्रु.॥
विषय गुंडोनी ठेवीं पसारा । मग धांव घ्या पंढरपुरा ॥२॥
जंव आहे आयुष्याचा लेश। तंव करीं पंढरीचा वास ॥३॥
अळस न करीं लाभाचा । तुका विनवी कुणबियाचा ॥४॥
देवाचें चरित्र नाठवे सर्वथा । विनोदार्थ कथा गोड वाटे ॥१॥
हातावरि हात हासोनि आफळी । वाजवितां टाळी लाज वाटे ॥२॥
तुका ह्मणे थुंका त्याच्या तोंडावरि । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
अद्वैतीं तों माझें नाहीं समाधान । गोड हे चरण सेवा तुझी ॥१॥
करूनी उचित देइप हें चि दान । आवडे कीर्तन नाम तुझें ॥ध्रु.॥
देवभक्तपण सुखाचा सोहळा । ठेवुनी निराळा दावी मज ॥२॥
तुका ह्मणे आहे तुझें हें सकळ । कोणी एके काळें देइप मज ॥३॥
हें चि माझें तप हें चि माझें दान । हें चि अनुष्ठान नाम तुझें ॥१॥
हें चि माझें तीर्थ हें चि माझें व्रत । सत्य हें सुकृत नाम तुझें ॥ध्रु.॥
हा चि माझा धर्म हें चि माझें कर्म । हा चि नित्यनेम नाम तुझें ॥२॥
हा चि माझा योग हा चि माझा यज्ञा । हें चि जपध्यान नाम तुझें ॥३॥
हें चि माझें ज्ञान श्रवण मनन । हें चि निजध्यासन नाम तुझे ॥४॥
हा चि कुळाचार हा चि कुळधर्म । हा चि नित्यनेम नाम तुझें ॥५॥
हा माझा आचार हा माझा विचार । हा माझा निर्धार नाम तुझें ॥६॥
तुका ह्मणे दुजें सांगायासि नाहीं । नामेंविण कांहीं धनवित्त ॥७॥
कोण साक्षीविण । केलें उद्धारा भजन ॥१॥
ऐसें सांगा जी दातारा । माझी भक्ति परंपरा ॥ध्रु.॥
कोणें नाहीं केली आळी । ब्रह्मज्ञानाहुनि वेगळी ॥२॥
कोणाचें तों कोड । नाहीं पुरविला लाड ॥३॥
कोणाच्या उद्धारा । केला विलंब माघारा ॥४॥
तुका ह्मणे भिन्न । कांहो बोले साक्षीविण ॥५॥
सुखरूप चाली । हळूहळू उसंतिली ॥१॥
बाळगोपाळाची वाट । सेवे सेवकता नीट ॥ध्रु.॥
जरी झाला श्रम । तरी पडों नये भ्रम ॥२॥
तुका ह्मणे दासां । देव सरिसासरिसा ॥३॥
चुकली ते वाट । पुढें सांपडवी नीट ॥१॥
ह्मणउनी गर्भवास । नेणती ते हरिचे दास ॥ध्रु.॥
संचिताचा संग । काय जाणों पावें भंग ॥२॥
तुका ह्मणे दृष्टी उघडितों नव्हे कष्टी ॥३॥
कइं तो दिवस देखेन डोळां । कल्याण मंगळामंगळाचें ॥१॥
आयुष्याच्या शेवटीं पायांसवे भेटी । किळवरें तुटी जाल्या त्वरे ॥ध्रु.॥
सरो हें संचित पदरींचा गोवा । उताविळें देवा मन जालें ॥२॥
पाउलापाउलीं करितां विचार । अनंतविकार चित्ता अंगीं ॥३॥
ह्मणउनि भयाभीत होतो जीव । भाकितसें कींव अटाहासें ॥४॥
तुका ह्मणे होइल आइकिलें कानीं । तरि चक्रपाणी धांव घाला ॥५॥
दुःखाच्या उत्तरीं आळविले पाय । पाहणें तों काय अजून अंत ॥६॥
कळों येतें वर्म । तरी न पवतों श्रम ॥१॥
तुह्मां शिरीं होता भार । आह्मां कैचा संचार ॥ध्रु.॥
होतें अभयदान । तरी िस्थर होतें मन ॥२॥
तुका ह्मणे पाहें । ऐसी वाट उभा आहे ॥३॥
वारंवार हा चि न पडावा विसर । वसावें अंतर तुमच्या गुणीं ॥१॥
इच्छेचा ये दाता तूं एक समर्था । अगा कृपावंता मायबापा ॥ध्रु.॥
लाभाचिये वोढी उताविळें मन । त्यापरि चिंतन चरणाचें ॥२॥
तुका ह्मणे जीवी जीवन ओलावा । पांडुरंगे दावा शीघ्र आतां ॥३॥
आइका माझीं कवतुकउत्तरें । देउनी सादरें चित्त देवा ॥१॥
वोरसें आवडी आलों पायापासीं । होय तें मनेसीं सुख कीजे ॥ध्रु.॥
तुमचें न भंगे सवाौत्तमपण । करितां समाधान लेंकराचें ॥२॥
तुका ह्मणे जरी बोलतों बोबडें । तरी वाडे कोडें कवतुक ॥३॥
जन्मा आलियाचा लाभ । पद्मनाभदरुषणें ॥१॥
पाठीलागा येतो काळ । तूं कृपाळु माउली ॥ध्रु.॥
कोण्या उपायें हें घडे । भव आंगडें सुटकेचें ॥२॥
बहु उसंतीत आलों । तया भ्यालों स्थळासी ॥३॥
तुका ह्मणे तूं जननी । ये निर्वाणी विठ्ठले ॥४॥
नाहीं गुणदोष लिंपों देत अंगीं । झाडितां प्रसंगीं वरावरी ॥१॥
निकटवासिया आळवितों धांवा । तेथूनियां देवा सोडवूनी ॥ध्रु.॥
उमटे अंतरीं तें करूं प्रगट । कळोनी बोभाट धांव घालीं ॥२॥
तुका ह्मणे तरि वांचलों या काळें । समर्थाचे बळें सुखी असों ॥३॥
आतां येणें पडिपाडें । रस सेवूं हा निवाडें । मुंगी नेली गोडें । ठेविलिये अडचणी ॥१॥
तैसें होय माझ्या जीवा । चरण न सोडीं केशवा । विषयबुद्धि हेवा । वोस पडो सकळ ॥ध्रु.॥
भुकेलिया श्वाना । गांठ पडे सवें अन्ना । भुकों पाहे प्राणा । परि तोंडिंची न सोडी ॥२॥
काय जिंकियेलें मन । जीवित्व कामातुरा तृण । मागे विभिचारिण । भक्ती तुका ये जाती ॥३॥
न पवीजे तया ठाया । आलों कायाक्लेशेसीं ॥१॥
आतां माझें आणीं मना । नारायणा ओजेचें ॥ध्रु.॥
बहु रिणें पिडिलों फार । परिहार करावा ॥२॥
तुका ह्मणे निर्बळशक्ति । काकुलती म्हुण येतों ॥३॥
बहु फिरलों ठायाठाव । कोठें भाव पुरे चि ना ॥१॥
समाधान तों पावलों । उरलों बोलों यावरि ॥ध्रु.॥
घे गा देवा आशीर्वाद । आमुच्या नांद भाग्यानें ॥२॥
तुका ह्मणे जेवूं आधी । खवखव मधीं सारावी ॥३॥
कोण येथें रिता गेला । जो जो आला या ठाया ॥१॥
तातडी ते काय आतां । ज्याची चिंता तयासी ॥ध्रु.॥
नांवासाटीं नेघें भार । न लगे फार वित्पित्त ॥२॥
तुका ह्मणे न लगे जावें । कोठें देवें सुचनें ॥३॥
इंिद्रयाचें पुरे कोड । तें चि गोड पुढती ही ॥१॥
जावें म्हणती पंढरपुरा । हा चि बरा संसार ॥ध्रु.॥
बैसलें तें मनामुळीं । सुख डोळीं देखिलें ॥२॥
तुका ह्मणे देती कान । वाणावाण निवडूनी ॥३॥
आतां देवा मोकिळलें । तुह्मी भलें दिसेना ॥१॥
आतां नाहीं जीवभाव । उरला ठाव वेगळा ॥ध्रु.॥
सांभाळुन घ्यावें देवा । आपणासवा यावरि ॥२॥
तुका ह्मणे नग्न भाज । तरि ते लाज स्वामीसी ॥३॥
आशाबद्ध आह्मी भाकितसों कींव । तत्पर हा जीव कार्यापाशीं ॥१॥
प्रतिउत्तराची पाहातसें वाट । करूनि बोभाट महाद्वारीं ॥ध्रु.॥
आपुल्या उचितें करूनियां ठेवीं । संबंध गोसावी तोडोनियां ॥२॥
तुका ह्मणे एक जालिया निवाड । कोण बडबड करी मग ॥३॥
खद्योतें फुलविलें रविपुढें ढुंग । साक्षी तंव जग उभयतां ॥१॥
आपल्या आपण नाहीं शोभों येत । चार करी स्फीत दाखवूनि ॥ध्रु.॥
खाणार ताकाचें आसातें माजीरें । आपणें चि अधीर कळों येतें ॥२॥
तुका ह्मणे जळो मैंदाची मवाळी । दावूनियां नळी कापी सुखें ॥३॥
नाहीं सरों येत कोरड्या उत्तरीं । जिव्हाऑयाची बरी ओल ठायीं ॥१॥
आपुलिया हिता मानिसी कारण । सत्या नारायण साहे असो ॥ध्रु.॥
निर्वाणीं निवाड होतो आगीमुखें । तप्त लोह सुखें धरितां हातीं ॥२॥
तुका ह्मणे नेम न टळतां बरें । खयासी चि खरें ऐसें नांव ॥३॥
आलों उल्लंघुनि दुःखाचे पर्वत । पायांपाशीं हित तुमच्या तरी ॥१॥
न देखेल लासा दुःखी होतें मन । कठिणें कठिण वाटतसे ॥ध्रु.॥
नव्हे सांडी परि वाटतें निरास । न ये माझा दिस संकल्पाचा ॥२॥
तुका ह्मणे तुह्मीं सदैव जी देवा । माझ्या हा चि जीवा एक ठाव ॥३॥
किती सोसिती करंटीं । नेणों संसाराची आटी । सर्वकाळ पोटीं । चिंतेची हळहळ ॥१॥
रिकामिया तोंडें राम । काय उच्चारितां श्रम । उफराटा भ्रम । गोवी विषय माजिरा ॥ध्रु.॥
कळतां न कळे । उघडे झाकियेले डोळे । भरलें त्याचे चाळे । अंगीं वारें मायेचें ॥२॥
तुका ह्मणे जन । ऐसें नांवबुद्धिहीन । बहुरंगें भिन्न । एकीं एक निमलें ॥३॥
मंगळाचा मंगळ सांटा । विट तोटा नेणे तें ॥१॥
हें भरा सातें आलें । भलें भलें ह्मणवावें ॥ध्रु.॥
जनीं जनार्दन वसे । येथें दिसे तें शुद्ध ॥२॥
तुका ह्मणे बहुतां मुखें । खरें सुखें ठेवावें ॥३॥
नामाचा महिमा बोलिलों उत्कर्ष । अंगा कांहीं रस न ये चि तो ॥१॥
कैसें समाधान राहे पांडुरंगा । न लगे चि अंगा आणी कांहीं ॥ध्रु.॥
लाभाचिये अंगीं सोस कवतुकें । फिक्याचें तें फिकें वेवसाव ॥२॥
तुका ह्मणे करा आपुला महिमा । नका जाऊं धर्मावरि माझ्या ॥३॥
हें चि वारंवार । पडताळुनी उत्तर ॥१॥
करितों पायांसी विनंती । नुपेक्षावें कमळापती ॥ध्रु.॥
गंगोदकें गंगे । अर्घ्य द्यावें पांडुरंगे ॥२॥
जोडोनियां हात । करी तुका प्रणिपात ॥३॥
अवचित या तुमच्या पायां । देवराया पावलों ॥१॥
बरवें जालें देशाउर । आल्या दुर सारिखें ॥ध्रु.॥
राहोनियां जातों ठाया । आलियाची निशानी ॥२॥
तुका ह्मणे चरणसेवा । जोडी हेवा लाधली ॥३॥
आतां पाविजेल घरा । या दातारा संगती ॥१॥
पायावरि ठेवूं माथा । सर्वथा हा नुपेक्षी ॥ध्रु.॥
येथून तेथवरि आतां। नाहीं सत्ता आणिकांची ॥२॥
तुका ह्मणे चक्रपाणी । शिरोमणी बिळयांचा ॥३॥
बरवें माझ्या केलें मनें । पंथें येणें निघालें ॥१॥
अभयें च जावें ठाया । देवराया प्रतापें ॥ध्रु.॥
साधनाचा न लगे पांग । अवघें सांग कीर्तन ॥२॥
तुका ह्मणे सत्ता थोरी । कोण करी खोळंबा ॥३॥
मागें पुढें नाहीं । दुजें यावेगळें कांहीं ॥१॥
नाहीं उरलें आणीक । केला झाडा सकिळक ॥ध्रु.॥
विश्वासावांचून । नांवें दुजियाचे शून्य ॥२॥
देवाविण कांहीं । तुका ह्मणे उरी नाहीं ॥३॥
वैराग्याचा अंगीं जालासे संचार । इच्छी वनांतर सेवावया ॥१॥
कां जी याचें करूं नये समाधान । वियोगानें मन सिणतसे ॥ध्रु.॥
नये चि यावया पंढरीचें मूळ । न देवे चि माळ कंठींची ही ॥२॥
तुका ह्मणे जालें अप्रीतीचें जिणें । लाजिर हें वाणें सेवा करी ॥३॥
आिळकरा कोठें साहातें कठिण । आपुला तें प्राण देऊं पाहे ॥१॥
सांभाळावें मायबापें कृपादृष्टी । पीडितां तो दृष्टी देखों नये ॥ध्रु.॥
अंतरलों मागें संवसारा हातीं । पायांपें सरतीं जालों नाहीं ॥२॥
तुका ह्मणे तुह्मी विचारा जी देवा । ठेवाल तें ठेवा कोणे परी ॥३॥
स्वप्नींचें हें धन हातीं ना पदरीं । प्रत्यक्ष कां हरि होऊं नये ॥१॥
आजुनि कां करा चाळवाचाळवी । सावकाशें द्यावी सत्य भेटी ॥ध्रु.॥
बोलोनियां फेडा जीवींची काजळी । पाहेन कोमळीं चरणांबुजें ॥२॥
तुका ह्मणे माझ्या जीवींचिया जीवा । सारूनियां ठेवा पडदा आतां ॥३॥
येतील अंतरा शिष्टाचे अनुभव । तळमळी जीव तया सुखा ॥१॥
आतां माझा जीव घेउनियां बळी । बैसवावें वोळी संतांचिये ॥ध्रु.॥
विस्तारिली वाचा फळेंविण वेल । कोरडे चि बोल फोस वांझे ॥२॥
तुका ह्मणे आलों निर्वाणा च वरी । राहों नेदीं उरी नारायणा ॥३॥
ह्मणउनि काय जीऊं भक्तपण । जायाचीं भूषणें अळंकार ॥१॥
आपुल्या कष्टाची करूनियां जोडी । मिरवीन उघडी इच्छावसें ॥ध्रु.॥
तुके तरि तुकीं खयाचे उत्तम । मुलाम्याच्या भ्रम कोठवरि ॥२॥
तुका ह्मणे पुढें आणि मागें फांस । पावें ऐसा नास न करीं देवा ॥३॥
आपण चि व्हाल साहे । कसियाला हे धांवणी ॥१॥
भाकिली ते उरली कींव । आहे जीव जीवपणें ॥ध्रु.॥
आहाच कैंचा बीजा मोड । प्रीति कोड वांचूनि ॥२॥
तुका ह्मणे दंडिन काया । याल तया धांवणिया ॥३॥
निश्चितीनें होतों करुनियां सेवा । कां जी मन देवा उद्वेगिलें ॥१॥
अनंत उठती चित्ताचे तरंग । करावा हा त्याग वाटतसे ॥ध्रु.॥
कोण तुह्मांविण मनाचा चाळक । दुजें सांगा एक नारायणा ॥२॥
तुका ह्मणे माझा मांडिला विनोद । करऊं नेणें छंद कराल काइ ॥३॥
आश्वासावें दास । तरी घडे तो विश्वास ॥१॥
नाहीं चुकत चाकरी । पुट लाडे शोचे थोरी ॥ध्रु.॥
स्वामीच्या उत्तरें । सुख वाटे अभयें करें ॥२॥
न मगें परि भातें । तुका ह्मणे निढिळ रितें ॥३॥
जेणें होय हित । तें तूं जाणसी उचित ॥१॥
मज नको लावूं तैसें । वांयां जायें ऐसें पिसें ॥ध्रु.॥
धरितोसी सत्ता । होसी सकळ जाणता ॥२॥
चतुराच्या राया । अंगीकारावें तुकया ॥३॥
राहे उभा वादावादीं । तरी फंदीं सांपडे ॥१॥
लव्हाऑयासी कोठें बळ । करिल जळ आपुलें ॥ध्रु.॥
कठिणासी बळजोडा । नम्र पीडा देखेना ॥२॥
तुका ह्मणे सर्वरसीं । मिळे त्यासी गोत तें ॥३॥
म्हणउनि जाली तुटी । नाहीं भेटी अहंकारें ॥१॥
दाखविलें देवें वर्म । अवघा भ्रम नासला ॥ध्रु.॥
हातें मुरगाळितां कान। नाहीं भिन्न वेदना ॥२॥
तुका ह्मणे एकांतसुखें । अवघें गोतें गुंतलें ॥३॥
न पडो आतां हाडीं घाव । मध्यें कींव नासक ॥१॥
करविली आत्महत्या । जीवा कां द्वंदाचा ॥ध्रु.॥
आशापाशीं गुंतला गळा । तेणें कळाहीन जालों ॥२॥
तुका ह्मणे लावूं मुळी । जीवकुळी थोरेसी ॥३॥
सामावे कारण । नाहीं सोसत धरणें ॥१॥
लादी थींके लाजिरवाणी । हीनकमाईची घाणी ॥ध्रु.॥
पुष्प जवळी नाका। दुगपधीच्या नांवें थुंका ॥२॥
तुका ह्मणे किती । उपदेशहीन जाती ॥३॥
असाल ते तुह्मी असा । आह्मी सहसा निवडों ना ॥१॥
अनुसरलों एका चित्तें । हातोंहातें गींवसित ॥ध्रु.॥
गुणदोष काशासाटीं । तुमचे पोटीं वागवूं ॥२॥
तुका ह्मणे दुजें आतां । कोठें चित्ता आतळों ॥३॥
सोंवळा होऊं तों वोंवळें जडलें । सांडीमांडी बोलतोंडीं बीजीं ॥१॥
एकसरीं केलीं किळवरें साटी । आतां नका तुटी पायांसवें ॥ध्रु.॥
संकल्पीं विकल्प पापाचा सुकाळ । रज्जुसर्प मूळ मरणाचें ॥२॥
तुका ह्मणे हें तूं ब्रह्मांड चाळिता । मी कां करूं चिंता पांडुरंगा ॥३॥
आहे तैसा आतां आहे ठायीं बरा । ठेविलों दातारा उचितें त्या ॥१॥
वचनाचा भार पडिलिया शिरीं । जालें मग भारी उतरेना ॥ध्रु.॥
अबोल्याची सवे लावुनियां मना । फाकों नेदीं गुणा ऐसें करूं ॥२॥
तुका ह्मणे आह्मां गोंवऑयाचा संग । राखतें तें अंग जाणतसों ॥३॥
तूं माझा कोंवसा । परी न कळे या धसां ॥१॥
कूट खाती मागें पुढें । जाती नरयेगांवा पुढें ॥ध्रु.॥
माझी ह्मणती कवी। निषेधुनि पापी जीवीं ॥२॥
तुका ह्मणे पांडुरंगा । आतां कोण लेखी जगा ॥३॥
दर्पणासी बुजे । नखटें तोंड पळवी लाजे ॥१॥
गुण ज्याचे जो अंतरीं । तो चि त्यासी पीडा करी ॥ध्रु.॥
चोरा रुचे निशी। देखोनियां विटे शशी ॥२॥
तुका ह्मणे जन । देवा असे भाग्यहीन ॥३॥
ह्मणउनि शरण जावें । सर्वभावें देवासी ॥१॥
तो हा उतरील पार । भवदुस्तरनदीचा ॥ध्रु.॥
बहु आहे करुणावंत । अनंत हें नाम ज्या ॥२॥
तुका ह्मणे साक्षी आलें । तरी केलें प्रगट ॥३॥
ऐसीं वर्में आह्मां असोनियां हातीं । कां होऊं नेणतीं दिशाभुली ॥१॥
पोटाळुनी पाय कवळीन उभा । कृपे पद्मनाभा हालों नेदीं ॥ध्रु.॥
आपुले इच्छेसी घालीन संपुष्टीं । श्रीमुख तें दृष्टी न्याहाळीन ॥२॥
तुका ह्मणे बहु सांडियेलीं मतें । आपुल्या पुरतें धरुनी ठेलों ॥३॥
रत्नाच्या वोवणी कांचे ऐशा घरी । आव्हेरुनी दुरी अधिकारें ॥१॥
जातिस्वभाव आला डोऑयां आड । तया घडे नाड न कळतां ॥ध्रु.॥
कामधेनु देखे जैशा गाईह्मैसी । आणिकांतें ऐसी करोनियां ॥२॥
तुका ह्मणे काय बोलोनियां फार । जयाचा वेव्हार तया साजे ॥३॥
तरी च हीं केलीं । दानें वाईट चांगलीं ॥१॥
येक येक शोभवावें । केलें कवतुक देवें ॥ध्रु.॥
काय त्याची सत्ता । सूत्र आणीक चाळिता ॥२॥
तुका ह्मणे धुरें । डोळे भरिले परि खरें ॥३॥
अंधळें तें सांगे सांगितल्या खुणा । अनुभव देखणा प्रगट त्या ॥१॥
नांदणुक सांगे वडिलाचें बळ । कैसा तो दुर्बळ सुख पावे ॥२॥
तुका ह्मणे नांदों आपल्या प्रतापें । तयासी लोकांपें स्तुती सांगों ॥३॥
करी आणिकांचा अपमान । खळ छळवादी ब्राह्मण। तया देतां दान । नरका जाती उभयतां ॥१॥
तैसें जालें दोघांजणां। मागतिया यजमाना । जाळियेलें वनां । आपणासहित कांचणी ॥ध्रु.॥
घडितां दगडाची नाव । मोल क्लेश गेले वाव । तरता नाहीं ठाव। बुडवी तारूं तरतीया ॥२॥
चोरा दिधला सांटा । तेणें मारियेल्या वाटा । तुका ह्मणे ताठा । हें तंव दोघे नाडती ॥३॥
जळो ते जाणींव जळो ते शाहाणींव । राहो माझा भाव विठ्ठलपायीं ॥१॥
जळो तो आचार जळो तो विचार । राहो मन स्थीर विठ्ठलपायीं ॥ध्रु.॥
जळो हा लौकिक जळो दंभमान । लागो जीव ध्यान विठ्ठलाचें ॥२॥
जळो हें शरीर जळो हा संबंध । राहो परमानंद माझा कंठीं ॥३॥
तुका ह्मणे येथे अवघें चि होय । धरीं मना सोय विठोबाची ॥४॥
विश्वास धरूनि राहिलों निवांत । ठेवूनियां चित्त तुझे पायीं ॥१॥
तरावें बुडावें तुझिया वचनें । निर्धार हा मनें केला माझा ॥ध्रु.॥
न कळे हें मज साच चाळविलें । देसी तें उगलें घेइन देवा ॥२॥
मागणें तें सरे ऐसें करीं देवा । नाहीं तरी सेवा सांगा पुढें ॥३॥
करावें कांहीं कीं पाहावें उगलें । तुका ह्मणे बोलें पांडुरंगा ॥४॥
देवाचिये पायीं देइप मना बुडी । नको धांवों वोढी इंिद्रयांचे ॥१॥
सर्व सुखें तेथें होती एकवेळे । न सरती काळें कल्पांतीं ही ॥ध्रु.॥
जाणें येणें खुंटे धांवे वेरजार । न लगे डोंगर उसंतावे ॥२॥
सांगन तें तुज इतुलें चि आतां । मानी धन कांता विषतुल्य ॥३॥
तुका ह्मणे तुझे होती उपकार । उतरों हा पार भवसिंधु ॥४॥
आह्मी विठ्ठलाचे दास जालों आतां । न चले हे सत्ता आणिकांची ॥१॥
नावरे तयासी ऐसें नाहीं दुजें । करितां पंढरिराजें काय नव्हे ॥ध्रु.॥
कोठें तुज ठाव घ्यावयासी धांवा । मना तूं विसावा घेई आतां ॥२॥
इंिद्रयांची वोढी मोडिला व्यापार । ज्या अंगें संचार चाळी तुज ॥३॥
तुका ह्मणे आह्मी जिंकोनियां काळ । बैसलों निश्चळ होऊनियां ॥४॥
सांगतों तरि तुह्मी भजा रे विठ्ठला । नाहीं तरि गेला जन्म वांयां ॥१॥
करितां भरोवरी दुरावसी दुरी । भवाचिये पुरीं वाहावसी ॥२॥
कांहीं न लगे एक भाव चि कारण । तुका ह्मणे आण विठ्ठलाची ॥३॥
शब्दज्ञानी येऊं नेदीं दृष्टीपुढें । छळवादी कुडे अभक्त ते ॥१॥
जळो ते जाणींव जळो त्याचे दंभ । जळो त्याचें तोंड दुर्जनाचें ॥२॥
तुका ह्मणे येती दाटूनि छळाया । त्यांच्या बोडूं डोया न धरूं भीड ॥३॥
अन्यायासी राजा जरि न करितां दंड । बहुचक ते लंड पीडिती जना ॥१॥
ने करी निगा कुणबी न काढितां तण । कैंचे येती कण हातासी ते ॥२॥
तुका ह्मणे संतां करूं नये अनुचित। पाप नाहीं नीत विचारिता ॥३॥
भले लोक नाहीं सांडीत ओळखी । हे तों झाली देखी दुसयाची ॥१॥
असो आतां यासी काय चाले बळ । आपुलें कपाळ वोडवलें ॥ध्रु.॥
समर्थासी काय कोणें हें ह्मणावें । आपुलिया जावें भोगावरि ॥२॥
तुका ह्मणे तुह्मां बोल नाहीं देवा । नाहीं केली सेवा मनोभावें ॥३॥
मुकें होतां तुझ्या पदरीचें जातें । मूर्ख तें भोगितें मीमीपण ॥१॥
आपुलिये घरीं मैंद होऊनी बसे । कवण कवणासी बोलों नका ॥२॥
तुका ह्मणे तुह्मां सांगतों मी खुण । देवासी तें ध्यान लावुनि बसा ॥३॥
आषाढी निकट । आणी कार्तिकीचा हाट ॥१॥
पुरे दोन्ही च बाजार । न लगे आणीक व्यापार ॥ध्रु.॥
तें चि घ्यावें तें चि घ्यावें । कैवल्याच्या रासी भावें ॥२॥
कांहीं कोणा नेणे । विठो वांचूनि तुका ह्मणे ॥३॥
देऊनियां प्रेम मागितलें चित्त । जाली फिटाफिट तुह्मां आह्मां ॥१॥
काशानें उदार तुह्मांसी ह्मणावें । एक नेसी भावें एक देसी ॥ध्रु.॥
देऊनियां थोडें नेसील हें फार । कुंटिसी विचार अवघियांचा ॥२॥
तुका ह्मणे आह्मां भांडवल चित्त । देउनी दुश्चित पाडियेलें ॥३॥
तातडीची धांव अंगा आणि भाव । खोळंबा तो मग निश्चयाचा ॥१॥
ह्मणउनि बरी विचारावी चाली । उरीचि ते बोली कामा येते ॥ध्रु.॥
कोरडें वैराग्य माजिरा बडिवार । उतरे तो शूर अंगींचें तें ॥२॥
तुका ह्मणे बरी झयाची ते चाली । सांचवण्या खोली कैसीयांची ॥३॥
मी तों बहु सुखी आनंदभरिता । आहें साधुसंतां मेळीं सदा ॥१॥
देवा कांहीं व्हावें ऐसें नाहीं माझ्या जीवा । आणीक केशवा तुजविण ॥ध्रु.॥
न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता । सुख वाटे घेतां जन्म ऐसें ॥२॥
मृत्युलोकीं कोण धरिलें वासना । पावावया जनासवें दुःख ॥३॥
तुका ह्मणे तुझा दास ऐसें लोकां । कांहीं सकिळकां कळों यावें ॥४॥
घ्या रे लुटी प्रेम सुख । फेडा आजि धणी । चुकला तो मुकला । जाली वेरझार हाणी ॥१॥
घाला घातला वैकुंठीं । करूनियां जीवें साटी । पुरविली पाठी । वैष्णवीं काळाची ॥ध्रु.॥
अवघें आणिलें अंबर । विठोसहित तेथें धुर । भेदूनि जिव्हार । नामबाणीं धरियेला ॥२॥
संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघीं जालीं गहन । केलीं पापपुण्यें । देशधडी बापुडीं ॥३॥
आनंदें गर्जती निर्भर । घोष करिती निरंतर । कांपती असुर । वीर कवणा नांगवती ॥४॥
जें दुर्लभ ब्रह्मादिकां । आजि सांपडलें फुका । घ्या रे ह्मणे तुका । सावचित्त होउनी ॥५॥
तुझिया दासांचा हीन जालों दास । न धरीं उदास मायबापा ॥१॥
तुजविण प्राण कैसा राहों पाहे । वियोग न साहे क्षणभरि ॥ध्रु.॥
आणिक माझ्या जीवें मोकलिली आस । पाहे तुझी वास पांडुरंगा ॥२॥
सर्वभावें तुज आणिला उचित । राहिलों नििंश्चत तुझे पायीं ॥३॥
तुका ह्मणे तुज असो माझा भार । बोलतों मी फार काय जाणें ॥४॥
ते चि करीं मात । जेणें होइल तुझें हित ॥१॥
काय बडबड अमित । सुख जिव्हारीं सिणविसी ॥ध्रु.॥
जो मुळव्याधी पीडिला । त्यासी देखोन हांसे खरजुला ॥२॥
आराथकरी सोसी । त्यासि हांसे तो आळसी ॥३॥
क्षयरोगी ह्मणे परता । सर रोगिया तूं आतां ॥४॥
वडस दोहीं डोळां वाढले । आणिकां कानें कोंचें ह्मणे ॥५॥
तुका ह्मणे लागों पायां । शुद्ध करा आपणियां ॥६॥
कळों आला भाव माझा मज देवा । वांयांविण जीवा आठविलें ॥१॥
जोडूनि अक्षरें केलीं तोंडपिटी । न लगे सेवटीं हातीं कांहीं ॥२॥
तुका ह्मणे माझे गेले दोन्ही ठाय । सवसार ना पाय तुझे मज ॥३॥
आतां तरी मज सांगा साच भाव । काय म्यां करावें ऐसें देवा ॥१॥
चुकावया कर्म नव्हतें कारण । केला होय सीण अवघा चि ॥२॥
तुका ह्मणे नको पाहूं निरवाण । देइप कृपादान याचकासी ॥३॥
बोल नाहीं तुझ्या दातृत्वपणासी । आह्मी अविश्वासी सर्वभावें ॥१॥
दंभें करी भक्ती सोंग दावी जना । अंतरीं भावना वेगिळया ॥२॥
तुका ह्मणे देवा तूं काय करिसी । कर्मा दुस्तरासी आमुचिया ॥३॥
नामधारकासी नाहीं वर्णावर्ण । लोखंड प्रमाण नाना जात ॥१॥
शस्त्र अथवा गोळे भलता प्रकार । परिसीं संस्कार सकळ ही हेम ॥ध्रु.॥
प्रजन्य वर्षतां जीवना वाहावट । तें समसकट गंगे मिळे ॥२॥
सर्व तें हें जाय गंगा चि होऊन । तैसा वर्णावर्ण नाहीं नामीं ॥३॥
महांपुरीं जैसें जातसे उदक । मध्यें तें तारक नाव जैसी ॥४॥
तये नावेसंगें ब्राह्मण तरती । केवीं ते बुडती अनामिक ॥५॥
नाना काष्ठजात पडतां हुताशनीं । ते जात होउनी एकरूप ॥६॥
तेथें निवडेना घुरे कीं चंदन । तैसा वर्णावर्ण नामीं नाहीं ॥७॥
पूर्वानुवोळख तें चि पैं मरण । जरि पावे जीवन नामामृत ॥८॥
नामामृतें जालें मुळीचें स्मरण । सहज साधन तुका ह्मणे ॥९॥
सोइयासी करी पाहुणेर बरा । कांडितो ठोंबरा संता साटीं ॥१॥
गाईसी देखोनी बदबदा मारी । घोड्याची चाकरी गोड वाटे ॥ध्रु.॥
पान फुल नेतो वेश्येसी उदंड । ब्राह्मणासी खांड देऊं नेदी ॥२॥
पर्वकाळीं धर्म न करी नासरी । वेची राजद्वारीं उदंड चि ॥३॥
कीर्त्तना जावया होतसे हींपुष्टी । खेळतो सोंकटीं रात्रंदिवस ॥४॥
बाइलेच्या गोता आवडीनें पोसी । मातापितियासाी दवडितो ॥५॥
तुका ह्मणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥६॥
कां हो पांडुरंगा न करा धांवणें । तरि मज कोणें सोडवावें ॥१॥
तुझा ह्मणऊनि आणिकापें उभा । राहों हें तों शोभा नेदी आतां ॥ध्रु.॥
काळें पुरविली पाठी दुरवरी । पुढें पायां धीरी राहों नेदी ॥२॥
नको आणूं माझें संचित मनासी । पावन आहेसी पतितां तूं ॥३॥
तुका ह्मणे चाले आणिकांची सत्ता । तुज आळवितां नवल हें ॥४॥
कावऑयाच्या गळां मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥१॥
गजालागीं केला कस्तुरीचा लेप । तिचें तो स्वरूप काय जाणे ॥ध्रु.॥
बकापुढें सांगे भावार्थे वचन । वाउगा चि सीण होय त्यासी ॥२॥
तुका ह्मणे तैसे अभाविक जन । त्यांसी वांयां सीण करूं नये ॥३॥
आतां धरितों पदरीं । तुज मज करीन सरी ॥१॥
जालों जीवासी उदार । उभा ठाकलों समोर ॥२॥
तुका विनवीतसे संतां । ऐसें सांगा पंढरिनाथा ॥३॥
न कळसी ज्ञाना न कळसी ध्याना । न कळेसी दर्शना धुंडाळितां ॥१॥
न कळेसी आगमा न कळेसी निगमा । न बोलवे सीमा वेदां पार ॥२॥
तुका ह्मणे तुझा नाहीं अंतपार । ह्मणोनि विचार पडिला मज ॥३॥
पायां लावुनियां दोरी । भृंग बांधिला लेंकुरीं ॥१॥
तैसा पावसी बंधन । मग सोडवील कोण ॥ध्रु.॥
गळां बांधोनियां दोरी । वांनर हिंडवी घरोघरीं ॥२॥
तुका ह्मणे पाहें । रीस धांपा देत आहे ॥३॥
मायबापें सांभाळिती । लोभाकारणें पाळिती ॥१॥
तैसा नव्हे देवराव । याचा कृपाळु स्वभाव ॥ध्रु.॥
मनासारिखें न होतां । बाळकासी मारी माता ॥२॥
तुका ह्मणे सांगूं किती । बाप लेंकासी मारिती ॥३॥
धन मेळवूनि कोटी । सवें नये रे लंगोटी ॥१॥
पानें खाशील उदंड । अंतीं जासी सुकल्या तोंडें ॥ध्रु.॥
पलंग न्याहाल्या सुपती । शेवटीं गोवया सांगाती ॥२॥
तुका ह्मणे राम । एक विसरतां श्रम ॥३॥
विनवितों चतुरा तुज विश्वंभरा । परियेसी दातारा पांडुरंगा ॥१॥
तुझे दास ऐसें जगीं वाखाणिलें । आतां नव्हे भलें मोकलितां ॥ध्रु.॥
माझे गुणदोष कोण जाणे मात । पावनपतित नाम तुझें ॥२॥
लोभ मोह माया आह्मां बांधवितां । तरि हा अनंता बोल कोणा ॥३॥
तुका ह्मणे मी तों पतित चि खरा । परि आलों दातारा शरण तुज ॥४॥
त्राहे त्राहे सोडवीं अनंता । लागों दे ममता तुझे पायीं ॥१॥
एक चि मागणें देइप तुझी गोडी । न लगे आवडी आणिकाची ॥ध्रु.॥
तुझें नाम गुण वर्णीन पवाडे । आवडीच्या कोडें नाचों रंगीं ॥२॥
बापा विठ्ठलराया हें चि देइप दान । जोडती चरण जेणें तुझे ॥३॥
आवडीसारखें मागितलें जरी । तुका ह्मणे करीं समाधान ॥४॥
सुगरणीबाई थिता नास केला । गुळ तो घातला भाजीमध्यें ॥१॥
क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ । थितें चि वोंगळ कैसें केलें ॥ध्रु.॥
दळण दळोनी भरूं गेली पाळी । भरडोनि वोंगळी नास केला ॥२॥
कापुराचे सांते आणिला लसण । वागवितां सीण दुःख होय ॥३॥
रत्नाचा जोहारी रत्न चि पारखी । येर देखोदेखीं हातीं घेती ॥४॥
तुका ह्मणे जरी योग घडे निका । न घडतां थुंका तोंडावरी ॥५॥
बाप माझा दिनानाथ । वाट भक्तांची पाहात ॥१॥
कर ठेवुनियां करीं । उभा चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥
गळां वैजयंतीमाळा। रूपें डोळस सांवळा ॥२॥
तुका ह्मणे भेटावया । सदा उभारिल्या बाह्या ॥३॥
माझें जीवन तुझे पाय । कृपाळुं तूं माझी माय ॥१॥
नेदीं दिसों किविलवाणें । पांडुरंगा तुझें तान्हें ॥ध्रु.॥
जन्ममरण तुजसाटीं । आणीक नेणें दुजी गोष्टी ॥२॥
तुका ह्मणे तुजविण । कोण हरिल माझा सीण ॥३॥
कां रे पुंड्या मातलासी । उभें केलें विठ्ठलासी ॥१॥
ऐसा कैसा रे तूं धीट । मागें भिरकाविली वीट ॥ध्रु.॥
युगें जालीं अठ्ठावीस । अजुनी न ह्मणसी बैस ॥२॥
भाव देखोनि निकट । देवें सोडिलें वैकुंठ ॥३॥
तुका ह्मणे पुंडलिका । तूं चि बिळया एक निका ॥४॥
तुज पाहातां समोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥
माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडिली पंढरिराया ॥ध्रु.॥
नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥२॥
तुका ह्मणे बळी । जीव दिला पायांतळीं ॥३॥
उपदेश किती करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥१॥
शुद्ध कां वासना नव्हे चांडाळाची । होळी संचिताची केली तेणें ॥ध्रु.॥
नाहीं भाव मनीं नाइके वचन । आपला आपण उणें घेतों ॥२॥
तुका ह्मणे त्यासी काय व्याली रांड । करी बडबड रिती दिसे ॥३॥
समर्थासी लाज आपुल्या नामाची । शरण आल्याची लागे चिंता ॥१॥
न पाहे तयाचे गुण दोष अन्याय । सुख देउनि साहे दुःख त्याचें ॥ध्रु.॥
मान भलेपण नाहीं फुकासाटीं । जयावरि गांठी झीज साहे ॥२॥
तुका ह्मणे हें तूं सर्व जाणसी । मज अधिरासी धीर नाहीं ॥३॥
आनंदें कीर्तन कथा करीं घोष । आवडीचा रस प्रेमसुख ॥१॥
मज या आवडे वैष्णवांचा संग । तेथें नाहीं लाग किळकाळा ॥ध्रु.॥
स्वल्प मात्र वाचे बैसलासे निका । राम कृष्ण सखा नारायण ॥२॥
विचारितां मज दुजें वाटे लाज । उपदेशें काज आणीक नाहीं ॥३॥
तुका ह्मणे चित्त रंगलेंसे ठायीं । माझें तुझ्या पायीं पांडुरंगा ॥४॥
ब्रह्मज्ञान जेथें आहे घरोघरीं । सर्व निरंतरी चतुर्भुज ॥१॥
पापा नाहीं रीग काळाचें खंडण । हरिनामकीर्तन परोपरी ॥२॥
तुका ह्मणे हा चि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज ॥३॥
मज नाहीं कोठें उरला दुर्जन । मायबापाविण ब्रह्मांडीं हें ॥१॥
कासया जिकीर करणें येविसीं । भयाची मानसीं चिंता खंती ॥ध्रु.॥
विश्वंभराचिये लागलों सांभाळीं । संत नेती चाली आपुलिया ॥२॥
तुका ह्मणे माझें पाळणें पोषणें । करी नारायण सर्वस्वेंसी ॥३॥
नाहीं हित ठावें जननीजनका । दाविले लौकिकाचार तींहीं ॥१॥
अंधऑयाचे काठी अंधळें लागलें । घात एकवेळे मागेंपुढें ॥ध्रु.॥
न ठेवावी चाली करावा विचार । वरील आहार गळी लावी ॥२॥
तुका ह्मणे केला निवाडा रोकडा । राऊत हा घोडा हातोहातीं ॥३॥
आतां पहाशील काय माझा अंत । आलों शरणागत तुज देवा ॥१॥
करीं अंगीकार राखें पायांपाशीं । झणीं दिसों देसी कऴिवलवाणें ॥ध्रु.॥
नाहीं आइकिली मागें ऐसी मात । जे त्वां शरणागत उपेक्षिले ॥२॥
तुका ह्मणे आतां धरीं अभिमान । आहेसी तूं दानशूर दाता ॥३॥
होईल तो भोग भोगीन आपुला । न घलीं विठ्ठला भार तुज ॥१॥
तुह्मांपासाव हें इच्छीतसें दान । अंतरींचें ध्यान मुखीं नाम ॥ध्रु.॥
नये काकुलती गर्भवासांसाटीं । न धरीं हें पोटीं भय कांहीं ॥२॥
तुका ह्मणे मज उदंड एवढें । न वांचावें पुढें मायबापा ॥३॥
काय तुझी ऐसी वेचते गांठोळी । मांहे टाळाटाळी करीतसां ॥१॥
चतुराच्या राया आहो पांडुरंगा । ऐसें तरि सांगा निवडूनि ॥ध्रु.॥
कोण तुह्मां सुख असे या कवतुकें । भोगितां अनेकें दुःखें आह्मी ॥२॥
तुका ह्मणे काय जालासी निर्गुण । आह्मां येथें कोण सोडवील ॥३॥
देवाची पूजा हे भूताचें पाळण । मत्सर तो सीण बहुतांचा ॥१॥
रुसावें फुगावें आपुलियावरि । उरला तो हरि सकळ ही ॥२॥
तुका ह्मणे संतपण यां चि नांवें । जरि होय जीव सकळांचा ॥३॥
नाहीं जप तप जीवाची आटणी । मनासी दाटणी नाहीं केली ॥१॥
निजलिया ठायीं पोकारिला धांवा । सांकडें तें देवा तुझें मज ॥ध्रु.॥
नाहीं आणूनियां समर्पिलें जळ । सेवा ते केवळ चिंतनाची ॥२॥
तुका ह्मणे आह्मीं वेचिलीं उत्तरें । घेतलीं उदारें साच भावें ॥३॥
देह तंव आहे प्रारब्धा अधीन । याचा मी कां सीण वाहूं भार ॥१॥
सरो माझा काळ तुझिया चिंतनें । कायावाचामनें इच्छीतसें ॥ध्रु.॥
लाभ तो न दिसे याहूनि दुसरा । आणीक दातारा येणें जन्में ॥२॥
तुका ह्मणे आलों सोसीत संकटें । मी माझें वोखटें आहे देवा ॥३॥
सकळ तुझे पायीं मानिला विश्वास । न करीं उदास आतां मज ॥१॥
जीवीं गातां गोड आइकतां कानीं । पाहातां लोचनीं मूर्ती तुझी ॥ध्रु.॥
मन िस्थर माझें जालेंसे निश्चळ । वारिलीं सकळ आशापाश ॥२॥
जन्मजराव्याधि निवारिलें दुःख । वोसंडलें सुख प्रेम धरी ॥३॥
तुका ह्मणे मज जाला हा निर्धार । आतां वांयां फार काय बोलों ॥४॥
होऊं शब्दस्पर्श नये माझा तुह्मां । विप्रवृंदा तुह्मां ब्राह्मणांसी ॥१॥
ह्मणोनियां तुह्मां करितों विनंती । द्यावें शेष हातीं उरलें तें ॥ध्रु.॥
वेदीं कर्म जैसें बोलिलें विहित । करावी ते नीत विचारूनि ॥२॥
तुमचा स्वधर्म माझा अधिकार । भोजन उत्तर तुका ह्मणे ॥३॥
बहुत असती मागें सुखी केलीं । अनाथा माउली जिवांची तूं ॥१॥
माझिया संकटा न धरीं अळस । लावुनियां कास पार पावीं ॥ध्रु.॥
कृपावंता करा ज्याचा अंगीकार । तया संवसार नाहीं पुन्हां ॥ ।2॥
विचारितां नाहीं दुजा बिळवंत । ऐसा सर्वगत व्यापी कोणी ॥३॥
ह्मणउनि दिला मुळीं जीवभाव । देह केला वाव समाधिस्थ ॥४॥
तुका ह्मणे नाहीं जाणत आणीक । तुजविण एक पांडुरंगा ॥५॥
वैभवाचे धनी सकळ शरणागत । सत्यभावें चित्त अर्पिलें तें ॥१॥
नेदी उरों देव आपणांवेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥
जाणोनि नेणती अंगा आली दशा । मग होय इच्छा आपणे चि ॥२॥
तुका ह्मणे बरे धाकट्याचें जिणें । माता स्तनपानें वाढविते ॥३॥
आह्मां देणें धरा सांगतों तें कानीं । चिंता पाय मनीं विठोबाचे ॥१॥
तेणें माझें चित्त होय समाधान । विलास मिष्टान्न न लगे सोनें ॥ध्रु.॥
व्रत एकादशी दारीं वृंदावन । कंठीं ल्या रे लेणें तुळसीमाळा ॥२॥
तुका ह्मणे त्याचे घरींची उष्टावळी । मज ते दिवाळी दसरा सण ॥३॥
आतां मी अनन्य येथें अधिकारी । होइन कोणे परी नेणें देवा ॥१॥
पुराणींचा अर्थ ऐकतां मानस । होतो कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥
इंिद्रयांचे आह्मी पांगिलों अंकित । त्यांच्यासंगें चित्त रंगलें तें ॥२॥
एकाचें ही जेथें न घडे दमन । अवघीं नेमून कैसीं राखों ॥३॥
तुका ह्मणे जरी मोकिळसी आतां । तरी मी अनंता वांयां गेलों ॥४॥
आवडी धरोनी आलेती आकारा । केला हा पसारा याजसाटीं ॥१॥
तें मी तुझें नाम गाईन आवडी । क्षण एक घडी विसंबेना ॥ध्रु.॥
वर्म धरावें हा मुख्यधर्मसार । अवघे प्रकार तयापासीं ॥२॥
वेगऑया विचारें वेगळाले भाव । धरायासी ठाव बहु नाहीं ॥३॥
तुका ह्मणे घालूं इच्छेचिये पोटीं । कवळुनी धाकुटी मूर्ती जीवें ॥४॥
भागलों मी आतां आपुल्या स्वभावें । कृपा करोनि देवें आश्वासीजे ॥१॥
देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरें । अंगें हीं दातारें निववावीं ॥ध्रु.॥
अमृताची दृष्टी घालूनियां वरी । शीतळ हा करीं जीव माझा ॥२॥
घेइप उचलूनि पुसें तानभूक । पुसीं माझें मुख पीतांबरें ॥३॥
बुझावोनि माझी धरीं हनुवंटी । ओवाळुनि दिठी करुनी सांडीं ॥४॥
तुका ह्मणे बापा आहो विश्वंभरा । आतां कृपा करा ऐसी कांहीं ॥५॥
न सरे लुटितां मागें बहुतां जनीं । जुनाट हे खाणी उघडिली ॥१॥
सिद्ध महामुनि साधक संपन्न । तिहीं हें जतन केलें होतें ॥ध्रु.॥
पायाळाच्या गुणें पडिलें ठाउकें । जगा पुंडलिकें दाखविलें ॥२॥
तुका ह्मणे येथें होतों मी दुबळें । आलें या कपाळें थोडें बहु ॥३॥
भगवें तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथें अनुभवाचा काय पंथ ॥१॥
वाढवुनी चटा फिरे दाही दिशा । तरी जंबुवेषा सहज िस्थति ॥ध्रु.॥
कोरोनियां भूमी करिती मधीं वास । तरी उंदरास काय वाणी ॥२॥
तुका ह्मणे ऐसें कासया करावें । देहासी दंडावें वाउगें चि ॥३॥
धन्य दिवस आजि डोळियां लाधला । आनंद देखिला धणीवरी ॥१॥
धन्य जालें मुख निवाली रसना । नाम नारायणा घोंष करूं ॥ध्रु.॥
धन्य हें मस्तक सर्वांग शोभलें । संताचीं पाउलें लागताती ॥२॥
धन्य आजि पंथें चालती पाउलें । टाळिया शोभले धन्य कर ॥३॥
धन्य तुका ह्मणे आह्मांसी फावलें । पावलों पाउलें विठोबाचीं ॥४॥
बरवी हे वेळ सांपडली संधि । साह्य जाली बुद्धि संचितासी ॥१॥
येणें पंथें माझीं चालिलीं पाउलें । दरुषण जालें संतां पायीं ॥ध्रु.॥
त्रासिलें दरिद्रें दोषा जाला खंड । त्या चि काळें पिंड पुनीत जाला ॥२॥
तुका ह्मणे जाला अवघा व्यापार । आली वेरझार फळासी हे ॥३॥
आपणा लागे काम वाण्याघरीं गुळ । त्याचे याति कुळ काय कीजे ॥१॥
उकरड्यावरी वाढली तुळसी । टाकावी ते कैसी ठायागुणें ॥ध्रु.॥
गाईचा जो भक्ष अमंगळ खाय । तीचें दूध काय सेवूं नये ॥२॥
तुका ह्मणे काय सलपटासी काज । फणसांतील बीज काढुनि घ्यावें ॥३॥
जयासी नावडे वैष्णवांचा संग । जाणावा तो मांग जन्मांतरीं ॥१॥
अपवित्र वाचा जातीचा अधम । आचरण धर्म नाहीं जया ॥ध्रु.॥
मंजुळवदनीं बचनागाची कांडी । शेवटीं विघडी जीवप्राणा ॥२॥
तुका ह्मणे ज्याचा पिता नाहीं शुद्ध । तयासी गोविंद अंतरला ॥३॥
वांझेनें दाविलें गहवार लक्षणें । चिरगुटें घालून वाथयाला ॥१॥
तेवीं शब्दज्ञानी करिती चावटी । ज्ञान पोटासाटीं विकूनियां ॥ध्रु.॥
बोलाचि च कढी बोलाचा चि भात । जेवुनियां तृप्त कोण जाला ॥२॥
कागदीं लिहितां नामाची साकर । चाटितां मधुर गोडी नेदी ॥३॥
तुका ह्मणे जळो जळो ते महंती । नाहीं लाज चित्तीं आठवण ॥४॥
तुझिया पाळणा ओढे माझें मन । गेलों विसरोन देहभाव ॥१॥
लागला पालट फेडणें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥२॥
तुका ह्मणे माझा जीव जैसा ओढे । तैसा चि तिकडे पाहिजेल ॥३॥
मी दास तयांचा जयां चाड नाहीं । सुखदुःख दोहीं विरहित ॥१॥
राहिलासे उभा भीवरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥
नवल काय तरी पाचारितां पावे । न स्मरत धांवे भक्तकाजा ॥२॥
सर्व भार माझा त्यासी आहे चिंता । तो चि माझा दाता स्वहिताचा ॥३॥
तुका ह्मणे त्यासी गाईन मी गीतीं । आणीक तें चित्तीं न धरीं कांहीं ॥४॥
जुंझायाच्या गोष्टी ऐकतां चि सुख । करितां हें दुःख थोर आहे ॥१॥
तैसी हरिभक्ति सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥ध्रु.॥
पिंड पोसिलियां विषयांचा पाइक । वैकुंठनायक कैंचा तेथें ॥२॥
तुका ह्मणे व्हावें देहासी उदार । रकुमादेवीवर जोडावया ॥३॥
पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका । हें हो हातीं एका समर्थाचे ॥१॥
अनामिका हातीं समर्थाचा सिक्का । न मानितां लोकां येइल कळों ॥२॥
तुका ह्मणे येथें दुराग्रह खोटा । आपुल्या अदृष्टा शरण जावें ॥३॥
बहु या प्रपंचें भोगविल्या खाणी । टाकोनियां मनीं ठेविला सीण ॥१॥
आतां पायांपाशीं लपवावें देवा । नको पाहूं सेवा भक्ती माझी ॥ध्रु.॥
बहु भय वाटे एकाच्या बोभाटें । आली घायवटे फिरोनियां ॥२॥
तुका ह्मणे सिगे भरूं आलें माप । वियोग संताप जाला तुझा ॥३॥
धरूनियां मनीं बोलिलों संकल्प । होसी तरि बाप सिद्धी पाव ॥१॥
उत्कंठा हे आजी जाली माझे पोटीं । मोकिळली गोष्टी टाळाटाळ ॥ध्रु.॥
माझा मज असे ठाउका निर्धार । उपाधि उत्तर न साहे पैं ॥२॥
तुका ह्मणे जरि दिली आठवण । तरि अभिमान धरीं याचा ॥३॥
आजिवरी होतों संसाराचे हातीं । आतां ऐसें चित्तीं उपजलें ॥१॥
तुला शरणागत व्हावें नारायणा । अंगीकारा दिना आपुलिया ॥ध्रु.॥
विसरलों काम याजसाठीं धंदा । सकळ गोविंदा माझें तुझें ॥२॥
तुका ह्मणे विज्ञापना परिसावी । आवडी हे जीवीं जाली तैसी ॥३॥
धन्यधन्य ज्यास पंढरीसी वास । धन्य ते जन्मास प्राणी आले ॥१॥
बहु खाणीमध्यें होत कोणी एक । त्रिगुण कीटक पिक्षराज ॥ध्रु.॥
उत्तम चांडाळ नर नारी बाळ । अवघे चि सकळ चतुर्भुज ॥२॥
अवघा विठ्ठल तेथें दुजा नाहीं । भरला अंतर्बाहि सदोदीत ॥३॥
तुका ह्मणे येथें होउनी राहेन । सांडोवा पाषाण पंढरीचा ॥४॥
असंत लक्षण भूतांचा मत्सर । मनास निष्ठ अतिवादी ॥१॥
अंतरीचा रंग उमटे बाहेरी । वोळखियापरी आपेंआप ॥ध्रु.॥
संत ते समय वोळखती वेळ । चतुष्ट निर्मळ चित्त सदा ॥२॥
तुका ह्मणे हित उचित अनुचित । मज लागे नित आचरावें ॥३॥
विठ्ठलावांचोनि ब्रह्म जें बोलती । वचन तें संतीं मानूं नये ॥१॥
विठ्ठलावांचूनि जेजे उपासना । अवघा चि जाणा संभ्रमु तो ॥ध्रु.॥
विठ्ठलावांचूनि सांगतील गोष्टी । वांयां ते हिंपुटी होत जाणा ॥२॥
विठ्ठलांवाचूनि जें कांहीं जाणती । तितुल्या वित्पित्त वाउगीया ॥३॥
तुका ह्मणे एक विठ्ठल चि खरा । येर तो पसारा वाउगा चि ॥४॥
सर्व काळ डोळां बैसो नारायण । नयो अभिमान आड मध्यें ॥१॥
धाड पडो तुझ्या थोरपणावरि । वाचे नरहरि उच्चारीना ॥ध्रु.॥
जळो अंतरींचें सर्व जाणपण । विवादवचन अहंतेचें ॥२॥
सकळां चरणीं गिळत माझा जीव । तुका ह्मणे भाव एकविध ॥३॥
मधुरा उत्तरासवें नाहीं चाड । अंतरंगीं वाड भाव असो ॥१॥
प्राणावेगळा न करी नारायण । मग नसो ज्ञान मूर्ख बरा ॥ध्रु.॥
जननिंदा होय तो बरा विचार । थोरवीचा भार कामा नये ॥२॥
तुका ह्मणे चित्तीं भाव निष्टावंत । दया क्षमा शांत सर्वां भूतीं ॥३॥
झाडा वरपोनि खाऊनियां पाला । आठवी विठ्ठला वेळोवेळां ॥१॥
वल्कलें नेसुनि ठुंगा गुंडाळुनी । सांडी देहभान जवळुनी ॥ध्रु.॥
लोकमान वमनासमान मानणें । एकांतीं राहणें विठोसाटीं ॥२॥
सहसा करूं नये प्रपंचीं सौजन्य । सेवावें अरण्य एकांतवास ॥३॥
ऐसा हा निर्धार करी जो मनाचा । तुका ह्मणे त्याचा पांग फिटे ॥४॥
भक्तिभावें करी बैसोनि निश्चित । नको गोवूं चित्त प्रपंचासी ॥१॥
एका दृढ करीं पंढरीचा राव । मग तुज उपाव पुढिल सुचे ॥ध्रु.॥
नको करूं कांहीं देवतापूजन । जप तप ध्यान तें ही नको ॥२॥
मानिसील झणी आपलिक कांहीं । येरझार पाहीं न चुके कदा ॥३॥
ऐसे जन्म किती पावलासी देहीं । अझूनि का नाहीं कळली सोय ॥४॥
सोय घरीं आतां होय पां सावध । अनुभव आनंद आहे कैसा ॥५॥
सहज कैसें आहे तेथीचें तें गुज । अनुभवें निज पाहे तुकीं ॥६॥
तुका ह्मणे आतां होई तूं सावध । तोडीं भवबंध एका जन्में ॥७॥
दोराच्या आधारें पर्वत चढला । पाउलासाटीं केला अपघात ॥१॥
अष्टोत्तरदशें व्याधि ज्य वैद्यें दवडुनी । तो वैद्य मारूनि उत्तीर्ण जाला ॥ध्रु.॥
नव मास माया वाइलें उदरीं । ते माता चौबारीं नग्न केली ॥२॥
गायत्रीचें क्षीर पिळुनी घेऊनी । उपवासी बांधोनी ताडन करी ॥३॥
तुका ह्मणे दासां निंदी त्याचें तोंड । पहातां नरककुंड पूर्वजांसी ॥४॥
न कळे ब्रह्मज्ञान आचार विचार । लटिका वेव्हार करीतसे ॥१॥
विश्वामित्री पोटीं तयाचा अवतार । नांव महाखर चांडाळाचें ॥ध्रु.॥
द्रव्यइच्छेसाटीं करीतसे कथा । काय त्या पापिष्ठा न मिळे खाया ॥२॥
पोट पोसावया तोंडें बडबडी । नाहीं धडफुडी एक गोष्टी ॥३॥
तुका ह्मणे तया काय व्याली रांड । येउनिया भंड जनामध्यें ॥४॥
नित्य उठोनियां खायाची चिंता । आपुल्या तूं हिता नाठवीसी ॥१॥
जननीचे पोटीं उपजलासी जेव्हां । चिंता तुझी तेव्हां केली तेणें ॥ध्रु.॥
चातकां लागूनि मेघ नित्य वर्षे । तो तुज उदास करील केवीं ॥२॥
पक्षी वनचरें आहेत भूमीवरि । तयांलागीं हरि उपेक्षीना ॥३॥
तुका ह्मणे भाव धरुन राहें चित्तीं । तरि तो श्रीपति उपेक्षीना ॥४॥
जेजे आळी केली तेते गेली वांयां । उरला पंढरिराया श्रम माझा ॥१॥
काय समाधान केलें कोण वेळे । कोणें माझे लळे पाळियेले ॥ध्रु.॥
अभ्यास तो नाहीं स्वप्नीं ही दुश्चिता । प्रत्यक्ष कैंचा चि तो ॥२॥
आतां पुढें लाज वाटे पांडुरंगा । भक्त ऐसें जगामाजी जालें ॥३॥
तुका ह्मणे आतां नाहीं भरवसा । मोकलिसी ऐसा वाटतोसी ॥४॥
पूवाअहूनि बहु भक्त सांभाळिले । नाहीं अव्हेरिले दास कोणी ॥१॥
जेजे शरण आले तेते आपंगिले । पवाडे विठ्ठले ऐसे तुझे ॥ध्रु.॥
मिरवे चरणीं ऐसीये गोष्टीचें । भक्तसांभाळाचें ब्रीद ऐसें ॥२॥
तुका ह्मणे आह्मांसाटी येणें रूपा । माझ्या मायबापा पांडुरंगा ॥३॥
दर्दुराचें पिलुं ह्मणे रामराम । नाहीं उदक उष्ण होऊं दिलें ॥१॥
कढेमाजी बाळ करी तळमळ । गोविंद गोपाळ पावें वेगीं ॥ध्रु.॥
आज्ञा तये काळीं केली पावकासी । झणी पिलीयासी तापवीसी ॥२॥
तुका ह्मणे तुझे ऐसे हे पवाडे । वर्णितां निवाडे सुख वाटे ॥३॥
करुणा बहुत तुझिया अंतरा । मज विश्वंभरा कळों आलें ॥१॥
पक्षीयासी तुझें नाम जें ठेविलें । तयें उद्धरिलें गणिकेसी ॥ध्रु.॥
कुंटिणी ते दोष बहु आचरली । नाम घेतां आली करुणा तुज ॥२॥
हृदय कोमळ तुझें नारायणा । ऐसें बहुता जनां तारियेलें ॥३॥
तुका ह्मणे सीमा नाहीं तुझे दये । कोमळ हृदय पांडुरंगा ॥४॥
आजामेळा अंत मरणासी आला । तोंवरि स्मरला नाहीं तुज ॥१॥
प्राण जातेवेळे ह्मणे नारायण । त्यासाटीं विमान पाठविलें ॥ध्रु.॥
बहुत कृपाळु होसी जगन्नाथा । त्रैलोक्यसमर्था सोइरिया ॥२॥
तुका ह्मणे भक्तकाज तूं कैवारी । तुज साही चारी वर्णिताती ॥३॥
धर्म रक्षावया अवतार घेशी । आपुल्या पाळिसी भक्तजना ॥१॥
अंबॠषीसाटीं जन्म सोसियेलें । दुष्ट निर्दाळिले किती एक ॥ध्रु.॥
धन्य तुज कृपासिंधु ह्मणतील । आपुला तूं बोल साच करीं ॥२॥
तुका ह्मणे तुज वर्णिती पुराणें । होय नारायणें दयासिंधु ॥३॥
येउनी जाउनी पाहें तुजकडे । पडिल्या सांकडें नारायणा ॥१॥
आणीक कोणाचा मज नाहीं आधार । तुजवरि भार जीवें भावें ॥ध्रु.॥
निष्ठ अथवा होइप तूं कृपाळ । तुज सर्वकाळ विसरेंना ॥२॥
आपुलें वचन राहावें सांभाळून । तुह्मां आह्मां जाण पडिपाडु ॥३॥
ज्याच्या वचनासी अंतर पडेल । बोल तो होईल तयाकडे ॥४॥
तुह्मां आह्मां तैसें नाहीं ह्मणे तुका । होशील तूं सखा जीवलगा ॥५॥
आइक नारायणा वचन माझें खरें । सांगतों निर्धारें तुजपासीं ॥१॥
नाहीं भाव मज पडिली लोककाज । राहिलेंसे काज तुझे पायीं ॥२॥
जरि तुज कांहीं करणें उचित । तारीं तूं पतित तुका ह्मणे ॥३॥
अनाथ परदेशी हीन दीन भोळें । उगलें चि लोळे तुझे रंगीं ॥१॥
आपुलें ह्मणावें मज नुपेक्षावें । प्रेमसुख द्यावें मायबापा ॥ध्रु.॥
कासवीचे परि दृष्टी पाहें मज । विज्ञानीं उमज दावुनियां ॥२॥
तुका ह्मणे तुझा जालों शरणागत । काया वाचा चित्त दुजें नाहीं ॥३॥
पावलों पंढरी वैकुंठभवन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥१॥
पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥ध्रु.॥
पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं । संत या सज्जनीं निवविलें ॥२॥
पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥३॥
पावलों पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥४॥
पावलों पंढरी आपुलें माहेर । नाहीं संवसार तुका ह्मणे ॥५॥
अभयदान मज देइप गा उदारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥१॥
देहभाव तुझ्या ठेवियेला पायीं । आणीक मी कांही नेणें दुजें ॥ध्रु.॥
सेवा भक्ति भाव नेणें मी पतित । आतां माझें हित तुझ्या पायीं ॥२॥
अवघा निरोपिला तुज देहभाव । आतां मज पाव पांडुरंगा ॥३॥
तुका ह्मणे तुजें नाम दिनानाथ । तें मज उचित करीं आतां ॥४॥
लागो तुझी सोय ऐसे कोणी करी । माझे विठाबाई जननिये ॥१॥
पतितपावन ह्मणविसी जरी । आवरण करीं तरी माझें ॥ध्रु.॥
नाहीं तरी ब्रीद टाकीं सोडूनियां । न धरिसी माया जरी माझी ॥२॥
बोलिला तो बोल करावा साचार । तरि लोक बरें ह्मणतील ॥३॥
करावा संसार लोक लाजे भेणें । वचनासी उणें येऊं नेदीं ॥४॥
तुह्मां आह्मां तैसें नाहीं ह्मणे तुका । होशील तूं सखा जीवलग ॥५॥
तू आह्मां सोयरा सज्जन सांगाति । तुजलागीं प्रीति चालो सदा ॥१॥
तूं माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग । होसी अंतरंग अंतरींचा ॥ध्रु.॥
गण गोत मित्र तूं माझें जीवन । अनन्यशरण तुझ्या पांयीं ॥२॥
तुका ह्मणे सर्वगुणें तुझा दास । आवडे अभ्यास सदा तुझा ॥३॥
आवडेल तैसें तुज आळवीन । वाटे समाधान जीवा तैसें ॥१॥
नाहीं येथें कांहीं लौकिकाची चाड । तुजविण गोड देवराया ॥ध्रु.॥
पुरवीं मनोरथ अंतरींचें आर्त । धायेवरि गीत गाइप तुझे ॥२॥
तुका ह्मणे लेंकी आळवी माहेरा । गाऊं या संसारा तुज तैसें ॥३॥
माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥१॥
अबद्ध चांगलें गाऊं भलतैसें । कळलें हें जैसें मायबापा ॥२॥
तुका ह्मणे मज न लगे वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥३॥
यालागीं आवडी ह्मणा राम कृष्ण । जोडा नारायण सर्वकाळ ॥१॥
सोपें हें साधन लाभ येतो घरा । वाचेसी उच्चारा राम हरि ॥ध्रु.॥
न लगती कष्ट न लगे सायास । करावा अभ्यास विठ्ठलाचा ॥२॥
न लगे तप तीर्थ करणें महादान । केल्या एक मन जोडे हरि ॥३॥
तुका ह्मणे कांहीं न वेचितां धन । जोडे नारायण नामासाटीं ॥४॥
झांकूनियां नेत्र काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं प्रेमभाव ॥१॥
रामनाम ह्मणा उघड मंत्र जाणा । चुकती यातना गर्भवास ॥ध्रु.॥
मंत्र यंत्र संध्या करिसी जडीबुटी । तेणें भूतसृष्टी पावसील ॥२॥
तुका ह्मणे ऐक सुंदर मंत्र एक । भवसिंधुतारक रामनाम ॥३॥
पापिया चांडाळा हरिकथा नावडे । विषयालागीं आवडें गाणें त्याला ॥१॥
ब्राह्मणा दक्षणा देतां रडे रुका । विषयालागीं फुका लुटीतसे ॥ध्रु.॥
वीतभरि लंगोटी नेदी अतीताला । खीरम्या देतो शाला भोरप्यासी ॥२॥
तुका ह्मणे त्याच्या थुंका तोंडावरि । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
क्षुधारथी अन्नें दुष्काळें पीडिलें । मिष्टान्न देखिलें तेणें जैसें ॥१॥
तैसें तुझे पायीं लांचावलें मन । झुरे माझा प्राण भेटावया ॥ध्रु.॥
मांजरें देखिला लोणियांचा गोळा । लावुनियां डोळा बैसलेंसे ॥२॥
तुका ह्मणे आतां झडी घालूं पाहें । पांडुरंगे माये तुझे पायीं ॥३॥
स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचें । काय त्या प्रेमाचें सुख मज ॥१॥
दुःखवीना चित्त तुझें नारायणा । कांहीं च मागेना तुजपासीं ॥ध्रु.॥
रिद्धि सिद्धि मोक्ष संपित्त विलास । सोडियेली आस याची जीवें ॥२॥
तुका ह्मणे एके वेळे देइप भेटी । वोरसोनि पोटीं आलिंगावें ॥३॥
देव तिंहीं बळें धरिला सायासें । करूनियां नास उपाधीचा ॥१॥
पर्वपक्षी धातु धिःकारिलें जन । स्वयें जनार्दन ते चि जाले ॥२॥
तुका ह्मणे यासी न चले तांतडी । अनुभवें गोडी येइल कळों ॥३॥
भेटीवांचोनियां दुजें नाहीं चित्तीं । येणें काकुलती याजसाटीं ॥१॥
भेटोनियां बोलें आवडीचें गुज । आनंदाच्या भोजें जेवूं संगें ॥ध्रु.॥
मायलेकरासीं नाहीं दुजी परि । जेऊं बरोबरी बैसोनियां ॥२॥
तुका ह्मणे ऐसें अंतरींचें आर्त । यावें जी त्वरित नारायणा ॥३॥
आविसाचे आसे गळ गिळी मासा । फुटोनियां घसा मरण पावे ॥१॥
मरणाचे वेळे करी तळमळ । आठवी कृपाळ तये वेळीं ॥२॥
अंतकाळीं ज्याच्या नाम आलें मुखा । तुका ह्मणे सुखा पार नाहीं ॥३॥
जायाचें शरीर जाईल क्षणांत । कां हा गोपिनाथ पावे चि ना ॥१॥
कृपेचे सागर तुह्मी संत सारे । निरोप हा फार सांगा देवा ॥ध्रु.॥
अनाथ अज्ञान कोणी नाहीं त्यासि । पायापें विठ्ठला ठेवीं मज ॥२॥
तुका ह्मणे ऐसें करावें निर्वाण । मग तो रक्षण करिल माझें ॥३॥
त्रासला हा जीव संसारींच्या सुखा । तुजविण सखा नाहीं कोणी ॥१॥
ऐसें माझें मनीं वाटे नारायणा । घालावी चरणावरि मिठी ॥ध्रु.॥
कइं तें सुंदर देखोनि रूपडें । आवडीच्या कोडें आळंगीन ॥२॥
नाहीं पूर्व पुण्य मज पापरासी । ह्मणोनि पायांसी अंतरलों ॥३॥
अलभ्य लाभ कैंचा संचितावेगळा । विनवी गोपाळा दास तुका ॥४॥
मोलाचें आयुष्य वेचुनियां जाय । पूर्वपुण्यें होय लाभ याचा ॥१॥
अनंतजन्मींचे शेवट पाहतां । नर देह हातां आला तुझ्या ॥ध्रु.॥
कराल ते जोडी येईल कार्यासी । ध्यावें विठ्ठलासी सुखालागीं ॥२॥
सांचलिया धन होईल ठेवणें । तैसा नारायण जोडी करा ॥३॥
करा हरिभक्ती परलोकीं ये कामा । सोडवील यमापासोनियां ॥४॥
तुका ह्मणे करा आयुष्याचें मोल । नका वेचूं बोल नामेंविण ॥५॥
Not in the Wikisource transcription: 3815.
Text: तुकाराम गाथा on Marathi Wikisource, which does not name the printed edition it was transcribed from. The verses are public domain; the transcription is by Wikisource contributors, CC BY-SA 4.0. Its systematic legacy-font errors are repaired by rule (see the reading page for details); some remain — इप printed for ई in about 220 abhangas, and a few vowel signs on the wrong letter. Numbering follows Wikisource; printed editions differ. Spotted a wrong line? Write to us with the number.