साकरेचें नाम घेतां कळे गोडी । तैसी आह्मां जोडी वैष्णवांची ॥१॥
मोक्ष गांठी असे ठेविला बांधोनी । सोस तो भजनीं आवडीचा ॥ध्रु.॥
भोजनाची चिंता माय वाहे बाळा । आह्मांसि तरी खेळावरि चित्त ॥२॥
तुका ह्मणे आह्मी देहउपकारें । गाऊं निरंतर नाचों लागों ॥३॥
Abhangas 2401–2700 (the Gāthā is numbered 1–4,583), in the original Marathi, with the Gāthā's own section headings — as transcribed on Marathi Wikisource, whose base edition is not named. The refrain (ध्रु.) is set in a warmer colour. One font error is not yet repaired: where you see इप, read ई (होइप = होई).
साकरेचें नाम घेतां कळे गोडी । तैसी आह्मां जोडी वैष्णवांची ॥१॥
मोक्ष गांठी असे ठेविला बांधोनी । सोस तो भजनीं आवडीचा ॥ध्रु.॥
भोजनाची चिंता माय वाहे बाळा । आह्मांसि तरी खेळावरि चित्त ॥२॥
तुका ह्मणे आह्मी देहउपकारें । गाऊं निरंतर नाचों लागों ॥३॥
सुखें घेऊं जन्मांतरें । एक बरें इहलोकीं ॥१॥
पंढरीचे वारकरी । होतां थोरी जोडी हे ॥ध्रु.॥
हरिदासांचा समागम। अंगीं प्रेम विसांवे ॥२॥
तुका ह्मणे हें चि मन । इच्छादान मागतसे ॥३॥
करूं जातां सन्निधान । क्षणि जन पालटे ॥१॥
आतां गोमटे ते पाय । तुझे माय विठ्ठले ॥ध्रु.॥
हें तों आलें अनुभवा । पाहावें जीवावरूनि ॥२॥
तुका ह्मणे केला त्याग । सर्वसंग ह्मणऊनि ॥३॥
क्षीर मागे तया रायतें वाढी । पाधानी गधडी ऐशा नांवें ॥१॥
समयो जाणां समयो जाणां । भलतें नाणां भलतेथें ॥ध्रु.॥
अमंगळ वाणी वदवी मंगळी । अशुभ वोंगळी शोभन तें ॥२॥
तुका ह्मणे नेणें समयो ठाया ठाव । राहाडी ते वाव नरकाडी ॥३॥
विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे अंगीं ॥१॥
केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥ध्रु.॥
मधुरा उत्तरीं । रांवा खेळे उरावरी ॥२॥
तुका ह्मणे रेडा । सुखें जाती ऐशा पीडा ॥३॥
तीथाअची अपेक्षा स्थळीं वाढे धर्म । जाणावें तें वर्म बहु पुण्य ॥१॥
बहु बरी ऐसी भाविकांची जोडी । काळ नाहीं घडी जात वांयां ॥ध्रु.॥
करूनी चिंतन करवावें आणिकां । तो या जाला लोकां नाव जगीं ॥२॥
तुका ह्मणे ऐसे परउपकारी । त्यांच्या पायांवरी डोई माझी ॥३॥
भयाची तों आह्मां चिंत्तीं । राहो खंती सकेना ॥१॥
समर्पिलों जीवें भावें । काशा भ्यावें कारणें ॥ध्रु.॥
करीन तें कवतुकें। अवघें निकें शोभेल ॥२॥
तुका ह्मणे माप भरूं । दिस सारूं कवतुकें ॥३॥
पाचारितां धावे । ऐसी ठायींची हे सवे ॥१॥
बोले करुणा वचनीं । करी कृपा लावी स्तनीं ॥ध्रु.॥
जाणे कळवळा । भावसिद्धींचा जिव्हाळा ॥२॥
तुका ह्मणे नाम । मागें मागें धांवे प्रेम ॥३॥
कां जी माझे जीवीं । आळस ठेविला गोसावीं ॥१॥
येवढा घात आणीक काय । चिंतनासी अंतराय ॥ध्रु.॥
देहआत्म वंदी । केला घात कुबुद्धी ॥२॥
तुका ह्मणे मन । कळवळी वाटे सीण ॥३॥
दर्शनाचें आर्त जीवा । बहु देवा राहिलें ॥१॥
आतां जाणसी तें करीं । विश्वंभरीं काय उणें ॥ध्रु.॥
येथें जरी उरे चिंता । कोण दाता याहूनी ॥२॥
तुका ह्मणे जाणवलें । आह्मां भलें एवढेंच ॥३॥
बैसों पाठमोरीं । मना वाटे तैसे करीं ॥१॥
परिं तूं जाणसीं आवडीं । बाळा बहुतांचीं परवडी ॥ध्रु.॥
आपुलाल्या इच्छा। मागों जया व्हावें जैशा ॥२॥
तुका ह्मणे आई । नव्हसी उदास विठाई ॥३॥
विश्वंभरा वोळे । बहुत हात कान डोळे ॥१॥
जेथें असे तेथें देखे । मागितलें तें आइके ॥ध्रु.॥
जें जें वाटे गोड । तैसें पुरवितो कोड ॥२॥
तुका ह्मणे भेटी । कांहीं पडों नेदी तुटी ॥३॥
दाटे कंठ लागे डोळियां पाझर । गुणाची अपार वृष्टि वरी ॥१॥
तेणें सुखें छंदें घेईन सोंहळा । होऊनि निराळा पापपुण्यां ॥ध्रु.॥
तुझ्या मोहें पडो मागील विसर । आलापें सुस्वर करिन कंठ ॥२॥
तुका ह्मणे येथें पाहिजे सौरस । तुह्मांविण रस गोड नव्हे ॥३॥
पसरूनि राहिलों बाहो । सोयी अहो तुमचिये ॥१॥
आतां यावें लागवेगें । पांडुरंगे धांवत ॥ध्रु.॥
बैसायाची इच्छा कडे। चाली खडे रुपताती ॥२॥
तुका ह्मणे कृपाळुवा । करीन सेवा लागली ॥३॥
आह्मी जालों एकविध । सुद्या सुदें असावें ॥१॥
यावरी तुमचा मोळा । तो गोपाळा अकळ ॥ध्रु.॥
घेतलें तें उसणें द्यावें । कांहीं भावें विशेषें ॥२॥
तुका ह्मणे क्रियानष्ट । तरी कष्ट घेतसां ॥३॥
आह्मी आर्तभूत जिवीं । तुह्मी गोसावी तों उदास ॥१॥
वादावाद समर्थाशीं । काशानशीं करावा ॥ध्रु.॥
आह्मी मरों वेरझारीं। स्वामी घरीं बैसले ॥२॥
तुका ह्मणे करितां वाद । कांहीं भेद कळेना ॥३॥
पुसावें तें ठाई आपुल्या आपण । अहंकारा शून्य घालूनियां ॥१॥
येर वाग्जाळ मायेचा अहंकार । वचनाशीं थार अज्ञान तें ॥ध्रु.॥
फळ तें चि बीज बीज तें ची फळ । उपनांवें मूळ न पालटे ॥२॥
तुका ह्मणे अवघे गव्हांचे प्रकार । सोनें अलंकार मिथ्या नांव ॥३॥
माझी आतां सत्ता आहे । तुह्मां पायां हे वरती ॥१॥
एकाविण नेणें दुजा । पंढरिराजा सर्वांगें ॥ध्रु.॥
पुरवावी केली आळी । जे जे काळीं मागण तें ॥२॥
तुका ह्मणे सुटसी कैसा । धरूनि दिशा राहिलों ॥३॥
फावलें तुह्मां मागें । नवतों लागें पावलों ॥१॥
आलों आतां उभा राहें । जवळी पाहें सन्मुख ॥ध्रु.॥
घरीं होती गोवी जाली । कामें बोली न घडे चि ॥२॥
तुका ह्मणे धडफुडा । जालों झाडा देइप देवा ॥३॥
आतां नये बोलों अव्हेराची मात । बाळावरि चित्त असों द्यावें ॥१॥
तुज कां सांगणें लागे हा प्रकार । परि हें उत्तर आवडीचें ॥ध्रु.॥
न वंचीं वो कांहीं एकही प्रकार । आपणां अंतर नका मज ॥२॥
तुका ह्मणे मोहो राखावा सतंत । नये पाहों अंत पांडुरंगा ॥३॥
करूनि राहों जरी आत्मा चि प्रमाण । निश्चळ नव्हे मन काय करूं ॥१॥
जेवलिया विण काशाचे ढेंकर । शब्दाचे प्रकार शब्द चि ते ॥ध्रु.॥
पुरे पुरे आतां तुमचें ब्रह्मज्ञान । आह्मासी चरण न सोडणें ॥२॥
विरोधें विरोध वाढे पुढतोपुढती । वासनेचे हातीं गर्भवास ॥३॥
सांडीमांडीअंगीं वसे पुण्यपाप । बंधन संकल्प या चि नांवें ॥४॥
तुका ह्मणे नाहीं मुक्तता मोकळी । ऐसा कोण बळी निरसी देह ॥५॥
तुमचे स्तुतियोग्य कोटें माझी वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
भक्तिभाग्य तरी नेदीं तुळसीदळ । जोडूनि अंजुळ उभा असें ॥ध्रु.॥
कैचें भाग्य ऐसें पाविजे संनिध । नेणें पाळूं विध करुणा भाकीं ॥२॥
संतांचे सेवटीं उिच्छष्टाची आस । करूनियां वास पाहातसें ॥३॥
करीं इच्छा मज ह्मणोत आपुलें । एखादिया बोलें निमित्याच्या ॥४॥
तुका ह्मणे शरण आलों हें साधन । करितों चिंतन रात्रदिवस ॥५॥
सर्वविशीं आह्मीं हे चि जोडी केली । स्वीमीची साधिली चरणसेवा ॥१॥
पाहिलें चि नाहीं मागें परतोनी । जिंकिला तो क्षणीं क्षण काळ ॥ध्रु.॥
नाहीं पडों दिला विचाराचा गोवा । नाहीं पाठी हेवा येऊं दिला ॥२॥
केला लाग वेगीं अवघी चि तांतडी । भावना ते कुडी दुराविली ॥३॥
कोठें मग ऐसें होतें सावकास । जळो तया आस वेव्हाराची ॥४॥
तुका ह्मणे लाभ घेतला पालवीं। आतां नाहीं गोवी कशाची ही ॥५॥
येणें मुखें तुझे वणाअ गुण नाम । तें चि मज प्रेम देइप देवा ॥१॥
डोळे भरूनियां पाहें तुझें मुख । तें चि मज सुख देइप देवा ॥ध्रु.॥
कान भरोनियां ऐकें तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देई देवा ॥२॥
वाहें रंगीं टाळी नाचेन उदास । हें देइप हातांस पायां बळ ॥३॥
तुका ह्मणे माझा सकळ देहभाव । आणीक नको ठाव चिंतूं यासी ॥४॥
तूं माझा मायबाप सकळ वित्त गोत । तूं चि माझें हित करिता देवा ॥१॥
तूं चि माझा देव तूं चि माझा जीव । तूं चि माझा भाव पांडुरंगा ॥ध्रु.॥
तूं चि माझा आचार तूंचि माझा विचार। तूं चि सर्व भार चालविसी ॥२॥
सर्व भावें मज तूं होसी प्रमाण । ऐसी तुझी आण वाहातुसें ॥३॥
तुका ह्मणे तुज विकला जीवभाव। कळे तो उपाव करीं आतां ॥४॥
वारंवार तुज द्यावया आठव । ऐक तो भाव माझा कैसा ॥१॥
गेले मग नये फिरोन दिवस । पुडिलांची आस गणित नाहीं ॥ध्रु.॥
गुणां अवगुणांचे पडती आघात । तेणें होय चित्त कासावीस ॥२॥
कांहीं एक तुझा न देखों आधार । ह्मणऊनी धीर नाहीं जीवा ॥३॥
तुका ह्मणे तूं ब्रह्मांडाचा जीव । तरी कां आह्मी कींव भाकीतसों ॥४॥
असोत हे तुझे प्रकार सकळ । काय खळखळ करावी हे ॥१॥
आमुचें स्वहित जाणतसों आह्मी । तुझें वर्म नामीं आहे तुझ्या ॥ध्रु.॥
विचारितां आयुष्य जातें वांयांविण । रोज जन्मा गोवण पडतसे ॥२॥
राहेन मी तुझे पाय आठवूनी । आणीक तें मनीं येऊं नेदीं ॥३॥
तुका ह्मणे येथें येसी अनायासें । थोर तुज पिसें कीर्तनाचें ॥४॥
विष्णुदासां भोग । जरी आह्मां पीडी रोग ॥१॥
तरि हें दिसे लाजिरवाणें । काय तुह्मांसी सांगणें ॥ध्रु.॥
आह्मां काळें खावें । बोलिलें तें वांयां जावें ॥२॥
तुका ह्मणे दास । आह्मी भोगूं गर्भवास ॥३॥
भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त ॥१॥
तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥ध्रु.॥
आणिकांचे कानीं । गुण दोष मना नाणीं ॥२॥
मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा ॥३॥
वेचीं तें वचन । जेणें राहे समाधान ॥४॥
तुका ह्मणे फार । थोडा तरी पर उपकार ॥५॥
वचन तें नाहीं तोडीत शरीरा । भेदत अंतरा वज्रा- ऐसें ॥१॥
कांहीं न सहावें काशा करणें । संदेह निधान देह बळी ॥ध्रु.॥
नाहीं शब्द मुखीं लागत तिखट । नाहीं जड होत पोट तेणें ॥२॥
तुका ह्मणे जरी गिळे अहंकार । तरी वसे घर नारायण ॥३॥
नव्हो आतां जीवीं कपटवसती । मग काकुळती कोणा यावें ॥१॥
सत्याचिये मापें गांठीं नये नाड । आदि अंत गोड नारायण ॥ध्रु.॥
चोखटिया नाहीं विटाळाचा आघात । साच ते साचांत सांचा पडे ॥२॥
विचारिली वाट उसंत सीतळ । बुद्धीपुढें बळ तृणतुल्य ॥३॥
आहाराच्या घासें पचोनियां जिरे । वासना ही उरे उर्वरीत ॥४॥
तुका ह्मणे ताळा घालावा वचनीं । तूं माझी जननी पांडुरंगे ॥५॥
नव्हती हीं माझीं जायाचीं भूषणें । असे नारायणें उचित केलें ॥१॥
शब्दाच्या वोवोनी रत्नाचिया माळा । मुळींच जिव्हाळा झरवणी ॥ध्रु.॥
अर्थांतरीं असे अनुभवसेवन । परिपाकीं मन साक्ष येथें ॥२॥
तुका ह्मणे मज सरतें परतें । हें नाहीं अनंतें उरों दिलें ॥३॥
सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचूं वाचा ऐसें जालें ॥१॥
उपक्रमें वदे निशब्दाची वाणी । जे कोठें बंधनीं गुंपों नेणें ॥ध्रु.॥
तम नासी परि वेव्हारा वेगळा । रविप्रभाकळा वर्ते जन ॥२॥
तुका ह्मणे येथें गेला अतिशय । आतां पुन्हा नये तोंड दावूं ॥३॥
बोलाल या आतां आपुल्यापुरतें । मज या अनंतें गोवियेलें ॥१॥
झाडिला न सोडी हातींचा पालव । वेधी वेधें जीव वेधियेला ॥ध्रु.॥
तुमचे ते शब्द कोरडिया गोष्टी । मज सवें मिठी अंगसंगें ॥२॥
तुका ह्मणे तुह्मां होईल हे परी । अनुभव वरी येईल मग ॥३॥
जैशा तुह्मी दुरी आहां । तैशा राहा अंतरें ॥१॥
नका येऊं देऊं आळ । अंगीं गोपाळ जडलासे ॥ध्रु.॥
अवघा हा चि राखा काळ । विक्राळ चि भोंवता ॥२॥
तुका ह्मणे मज ऐशा । होतां पिशा जगनिंद्य ॥३॥
सतीचें तें घेतां वाण । बहु कठीण परिणामीं ॥१॥
जिवासाटीं गौरव वाढे । आहाच जोडे तें नव्हे ॥ध्रु.॥
जरि होय उघडी दृष्टि । तरि गोष्टी युद्धाच्या ॥२॥
तुका ह्मणे अंगा येतां । तरी सत्ता धैर्याची ॥३॥
आडवा तो उभा । असे दाटोनियां प्रभा ॥१॥
देव नाहीं एकविध । एक भाव असे शुद्ध ॥ध्रु.॥
भेदाभेद आटी । नाहीं फार कोठें तुटी ॥२॥
तुका ह्मणे गोवा । उगवा वेव्हाराचा हेवा ॥३॥
एका बोटाची निशाणी । परीपाख नाहीं मनीं ॥१॥
तरिं तें संपादिलें सोंग । कारणावांचूनियां वेंग ॥ध्रु.॥
वैष्णवांचा धर्म। जग विष्णु नेणे वर्म ॥२॥
अतिशयें पाप । तुका सत्य करी माप ॥३॥
सत्यत्वेंशीं घेणें भक्तीचा अनुभव । स्वामीचा गौरव इच्छीतसें ॥१॥
मग तें अवीट न भंगे साचारें । पावलें विस्तारें फिरों नेणे ॥ध्रु.॥
वाणी वदे त्याचा कोणांसी विश्वास । अभयें करें दास सत्य तइप ॥२॥
तुका ह्मणे आधीं न करीं तांतडी । पायीं जाली जोडी तेणें शुद्ध ॥३॥
सर्वात्मकपण । माझें हिरोनि नेतो कोण ॥१॥
मनीं भक्तीची आवडी । हेवा व्हावी ऐशी जोडी ॥ध्रु.॥
घेईन जन्मांतरें। हें चि करावया खरें ॥२॥
तुका ह्मणे देवा । ॠणी करूनि ठेवूं सेवा ॥३॥
आणितां त्या गती । हंस काउळे न होती ॥१॥
सांडा सांडा रे मठारे । येथें गांठीसवें धुरें ॥ध्रु.॥
नाकेंविण मोती । उभ्या बाजारें फजिती ॥२॥
हुकुमदाज तुका । येथें कोणी काुंफ्दों नका ॥३॥
ढेंकणासी बाज गड । उतरचढ केवढी ॥१॥
होता तैसा कळों भाव । आला वाव अंतरींचा ॥ध्रु.॥
बोरामध्यें वसे अळी। अठोळीच भोंवती ॥२॥
पोटासाटीं वेंची चणे । राजा ह्मणे तोंडें मी ॥३॥
बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर ॥४॥
तुका ह्मणे ऐसें आहे । काय पाहे त्यांत तें ॥५॥
धांव धांव गरुडध्वजा । आह्मां अनाथांच्या काजा ॥१॥
बहु जालों कासावीस । ह्मणोनि पाहें तुझी वास ॥ध्रु.॥
पाहें पाहें त्या मारगें । कोणी येतें माझ्या लागें ॥२॥
असोनियां ऐसा । तुज सारिखा कोंवसा ॥३॥
न लवावा उशीर । नेणों कां हा केला धीर ॥४॥
तुका ह्मणे चाली । नको चालूं धांव घालीं ॥५॥
पांडुरंगे पांडुरंगे । माझे गंगे माउलिये ॥१॥
पान्हां घाली प्रेमधारा । पूर क्षीरा लोटों दे ॥ध्रु.॥
अंगें अंग मेळउनी । करीं धणी फेडाया ॥२॥
तुका ह्मणे घेइन उड्या । सांडिन कुड्या भावना ॥३॥
गजइंद्र पशु आप्तें मोकलिला । तो तुज स्मरला पांडुरंगा ॥१॥
त्यासाठीं गरुड सांडुनि धांवसी । माया झळंबेसी दिनानाथा ॥ध्रु.॥
धेनु वत्सावरी झेंप घाली जैसी । तैसें गजेंद्रासी सोडविलें ॥२॥
तुका ह्मणे ब्रीद बांधलें यासाठीं । भक्तांसी संकटीं रक्षावया ॥३॥
चारी वेद जयासाटीं । त्याचें नाम धरा कंठीं ॥१॥
न करीं आणीक साधनें । कष्टसी कां वांयांविण ॥ध्रु.॥
अठरा पुराणांचे पोटीं । नामाविण नाहीं गोठी ॥२॥
गीता जेणें उपदेशिली। ते ही विटेवरी माउली ॥३॥
तुका ह्मणे सार धरीं । वाचे हरिनाम उच्चारीं ॥४॥
पाहातां ठायाठाव । जातो अंतरोनि देव ॥१॥
नये वाटों गुणदोषीं । मना जतन येविशीं ॥ध्रु.॥
त्रिविधदेह परिचारा । जनीं जनार्दन खरा ॥२॥
तुका ह्मणे धीरें- । विण कैसें होतें बरें ॥३॥
नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरें ॥१॥
न लगे सायास जावें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥ध्रु.॥
ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥२॥
रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥३॥
याहूनि आणीक नाहीं पैं साधन । वाहातसें आण विठोबाची ॥४॥
तुका ह्मणे सोपें आहे सर्वांहूनि । शाहाणा तो धणी घेतो येथें ॥५॥
भाविकांचें काज अंगें देव करी । काढी धर्माघरीं उिच्छष्ट तें ॥१॥
उिच्छष्ट तीं फळें खाय भिल्लटीचीं । आवडी तयांची मोठी देवा ॥ध्रु.॥
काय देवा घरीं न मिळेची अन्न । मागे भाजीपान द्रौपदीसी ॥२॥
अर्जुनाचीं घोडीं धुतलीं अनंतें । संकटें बहुतें निवारिलीं ॥३॥
तुका ह्मणे ऐसीं आवडती लडिवाळें । जाणीवेचें काळें तोंड देवा ॥४॥
सांवळें रूपडें चोरटें चित्ताचें । उभें पंढरीचे विटेवरी ॥१॥
डोळियांची धणी पाहातां न पुरे । तया लागीं झुरे मन माझें ॥ध्रु.॥
आन गोड कांहीं न लगे संसारीं । राहिले अंतरीं पाय तुझे ॥२॥
प्राण रिघों पाहे कुडी हे सांडुनी । श्रीमुख नयनीं न देखतां ॥३॥
चित्त मोहियेलें नंदाच्या नंदनें । तुका ह्मणे येणें गरुडध्वजें ॥४॥
ऐका ऐका भाविकजन । कोण कोण व्हाल ते ॥१॥
ताकिकांर्चा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥ध्रु.॥
नका शोधूं मतांतरें। नुमगे खरें बुडाल ॥२॥
कलिमध्यें दास तुका । जातो लोकां सांगत ॥३॥
आपुलिया आंगें तोडी मायाजाळ । ऐसें नाहीं बळ कोणापाशीं ॥१॥
रांडापोरें त्याग करी कुटुंबाचा । नावरे हे वाचा आणि मन ॥ध्रु.॥
हर्षामर्ष जों हे नाहीं जों जिराले । तोंवरि हे केले चार त्यांनीं ॥२॥
मुक्त जालों ऐसें बोलों जाये मुखें । तुका ह्मणे दुःखें बांधला तो ॥३॥
आलिया अतीता ह्मणतसां पुढारें । आपुलें रोकडें सत्त्व जाय ॥१॥
काय त्याचा भार घेऊनि मस्तकीं । हीनकर्मी लोकीं ह्मणावया ॥ध्रु.॥
दारीं हाका कैसें करवतें भोजन । रुची तरि अन्न कैसें देतें ॥२॥
तुका ह्मणे ध्वज उभारिला कर । ते शक्ति उदार काय जाली ॥३॥
जेथें लक्ष्मीचा वास । गंगा आली पापा नास ॥१॥
तें म्यां हृदयीं धरिलें । तापें हरण पाउलें ॥ध्रु.॥
सेवा केली संतजनीं। सुखें राहिले लपोनि ॥२॥
तुका ह्मणे वांकी । भाट जाली तिहीं लोकीं ॥३॥
रूपीं जडले लोचन । पायीं िस्थरावलें मन ॥१॥
देहभाव हरपला । तुज पाहातां विठ्ठला ॥ध्रु.॥
कळों नये सुखदुःख। तान हरपली भूक ॥२॥
तुका ह्मणे नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥३॥
जाणतें लेकरूं । माता लागे दूर धरूं ॥१॥
तैसें न करीं कृपावंते । पांडुरंगे माझे माते ॥ध्रु.॥
नाहीं मुक्ताफळा । भेटी मागुती त्या जळा ॥२॥
तुका ह्मणे लोणी । ताक सांडी निवडूनि ॥३॥
तुजविण कोणां । शरण जाऊं नारायणा ॥१॥
ऐसा न देखें मी कोणी । तुजा तिहीं त्रिभुवनीं ॥ध्रु.॥
पाहिलीं पुराणें । धांडोळिलीं दरुषणें ॥२॥
तुका ह्मणे ठायीं । जडून ठेलों तुझ्या पायीं ॥३॥
ऐसें भाग्य कइप लाहाता होईन । अवघें देखें जन ब्रह्मरूप ॥१॥
मग तया सुखा अंत नाहीं पार । आनंदें सागर हेलावती ॥ध्रु.॥
शांति क्षमा दया मूर्तिमंत अंगीं । परावृत्त संगीं कामादिकां ॥२॥
विवेकासहित वैराग्याचें बळ । धग्धगितोज्ज्वाळ अिग्न जैसा ॥३॥
भक्ति नवविधा भावशुद्ध बरी । अळंकारावरी मुगुटमणि ॥४॥
तुका ह्मणे माझी पुरवी वासना । कोण नारायणा तुजविण ॥५॥
कासया करावे तपाचे डोंगर । आणीक अपार दुःखरासी ॥१॥
कासया फिरावे अनेक ते देश । दावितील आस पुढें लाभ ॥ध्रु.॥
कासया पुजावीं अनेक दैवतें । पोटभरे तेथें लाभ नाहीं ॥२॥
कासया करावे मुक्तीचे सायास । मिळे पंढरीस फुका साटीं ॥३॥
तुका ह्मणे करीं कीर्तन पसारा । लाभ येईल घरा पाहिजे तो ॥४॥
वैष्णवमुनिविप्रांचा सन्मान । करावा आपण घेऊं नये ॥१॥
प्रभु जाला तरी संसाराचा दास । विहित तयासी यांची सेवा ॥२॥
तुका ह्मणे हे आशीर्वादें बळी । जाईल तो छळी नरकायासीं ॥३॥
देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥१॥
ऐसें आवडतें मना । देवा पुरवावी वासना ॥ध्रु.॥
हरिजनासी भेटी । नहो अंगसंगें तुटी ॥२॥
तुका ह्मणे जिणें । भलें संतसंघष्टणें ॥३॥
भाग सीण गेला । माझा सकळ विठ्ठला ॥१॥
तुझा ह्मणवितों दास । केली उिच्छष्टाची आस ॥ध्रु.॥
राहिली तळमळ । तइप पासोनी सकळ ॥२॥
तुका ह्मणे धालें । पोट ऐसें कळों आलें ॥३॥
रायाचें सेवक । सेवटीचें पीडी रंक ॥१॥
हा तों हिणाव कवणा । कां हो नेणां नारायणा ॥ध्रु.॥
परिसेंसी भेटी । नव्हे लोहोपणा तुटी ॥२॥
तुझें नाम कंठीं । तुक्या काळासवें भेटी ॥३॥
सुखरूप ऐसें कोण दुजें सांगा । माझ्या पांडुरंगा सारिकें तें ॥१॥
न लगे हिंडणें मुंडणें ते कांहीं । साधनाची नाहीं आटाआटी ॥ध्रु.॥
चंद्रभागे स्नान विध तो हरिकथा । समाधान चित्ता सर्वकाळ ॥२॥
तुका ह्मणे काला वैकुंठीं दुर्लभ । विशेष तो लाभ संतसंग ॥३॥
नसतां अधिकार उपदेशासी बळत्कार । तरि ते केले हो चार माकडा आणि गारूडी ॥१॥
धन धान्य राज्य बोल वृथा रंजवणें फोल । नाहीं तेथें ओल बीज वेची मूर्ख तो ॥ध्रु.॥
नये बांधों गांठी पदरा आण ऐसी तुटी । असोन कसोटी शिष्टाचारअनुभव ॥२॥
उपदेसी तुका मेघ वृष्टीनें आइका । संकल्पासी धोका सहज तें उत्तम ॥३॥
घालुनियां मापीं । देवभक्त बैसले जपीं ॥१॥
तैसी होते सांडउलंडी । निजनिजांची मुडी ॥ध्रु.॥
अमुपीं उखतें । आपण वोस आपण यातें ॥२॥
देव आतां जाला । उगवे संकोच वहिला ॥३॥
अखंड नेलें वेठी । भार सत्याविण गांठी ॥४॥
आडकिला झोंपा । रिता किळवरचा खोंपा ॥५॥
गोदातीरीं आड । करिते करविते द्वाड ॥६॥
तुका ह्मणे बळें । उपदेशाचें तोंड काळें ॥७॥
उंबरांतील कीटका । हें चि ब्रह्मांड ऐसें लेखा ॥१॥
ऐसीं उंबरें किती झाडीं । ऐशीं झाडें किती नवखडीं ॥ध्रु.॥
हें चि ब्रह्मांड आह्मांसी । ऐसीं अगणित अंडें कैसीं ॥२॥
विराटाचे अंगी तैसे । मोजूं जातां अगणित केंश ॥३॥
ऐशा विराटाच्या कोटी । सांटवल्या ज्याच्या पोटीं ॥४॥
तो हा नंदाचा बाळमुकुंद । तान्हा ह्मणवी परमानंद ॥५॥
ऐशी अगम्य ईश्वरी लीळा । ब्रह्मानंदीं गम्य तुक्याला ॥६॥
ब्रह्मज्ञान तरी एके दिवसीं कळे । तात्काळ हा गळे अभिमान ॥१॥
अभिमान लागे शुकाचिये पाठी । व्यासें उपराटी दृष्टी केली ॥ध्रु.॥
जनकभेटीसी पाठविला तेणें । अभिमान नाणें खोटें केलें ॥२॥
खोटें करूनियां लाविला अभ्यासीं । मेरुशिखरासी शुक गेला ॥३॥
जाऊनियां तेणें साधिली समाधी । तुका ह्मणे तधीं होतों आह्मी ॥४॥
सहज पावतां भगवंतीं परि हीं विकल्पें परतीं । फुकाची हे चित्तीं वाठवण कां न धरिती ॥१॥
हरि व्यापक सर्वगत हें तंव मुख्यत्वें वेदांत । चिंतनासी चित्त असों द्यावें सावध ॥ध्रु.॥
विरजाहोम या चि नांवें देह नव्हे मी जाणावें । मग कां जी यावें वरी लागे संकल्पा ॥२॥
कामक्रोधे देह मिळण स्वाहाकारीं कैंचें पुण्य । मंत्रीं पूजियेला यज्ञा मनमुंडण नव्हे चि ॥३॥
अनन्यभक्तीचे उपाय ते या विठोबाचे पाय । ध्याइल तो काय जाणे चुकों मारग ॥४॥
आतां सांगे तुका एक तुह्मी चुकों नका । सांडीमांडी धोका शरण रिघतां गोमटें ॥५॥
आह्मीं जाणावें तें काई तुझें वर्म कोणे ठायीं । अंतपार नाहीं ऐसें श्रुति बोलती ॥१॥
होइप मज तैसा मज तैसा साना सकुमार रुषीकेशा । पुरवीं माझी आशा भुजा चारी दाखवीं ॥ध्रु.॥
खालता सप्त ही पाताळा वरता स्वर्गाहूनि ढिसाळा । तो मी मस्यक डोळां कैसा पाहों आपला ॥२॥
मज असे हा भरवसा पढीयें वोसी तयां तैसा । पंढरीनिवासा तुका ह्मणे गा विठोबा ॥३॥
वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥
आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥२॥
कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवश्वरु ॥३॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥४॥
तुका ह्मणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥५॥
अनंत ब्रह्मांडें । एके रोमीं ऐसें धेंडें ॥१॥
तो या गौळियांचे घरीं । उंबरा चढतां टेंका धरी ॥ध्रु.॥
मारी दैत्य गाडे । ज्यांचे पुराणीं पवाडे ॥२॥
तुका ह्मणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥३॥
सावधान ऐसें काय तें विचारा । आले हो संसारा सकळ ही ॥१॥
अंतीं समयाचा करणें विचार । वेचती सादर घटिका पळें ॥ध्रु.॥
मंगळ हें नोहे कन्यापुत्रादिक । राहिला लौकिक अंतरपाट ॥२॥
तुका ह्मणे देव अंतरला दुरी । डोळिया अंधारी पडलीसे ॥३॥
लवण मेळवितां जळें । काय उरलें निराळें ॥१॥
तैसा समरस जालों । तुजमाजी हरपलों ॥ध्रु.॥
अिग्नकर्पुराच्या मेळीं । काय उरली काजळी ॥२॥
तुका ह्मणे होती । तुझी माझी एक ज्योती ॥३॥
सुख नाहीं कोठें आलिया संसारीं । वांया हांवभरी होऊं नका ॥१॥
दुःखबांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥ध्रु.॥
चवदा कल्पेंवरी आयुष्य जयाला । परी तो राहिला ताटीखालीं ॥२॥
तुका ह्मणे वेगीं जाय सुटोनियां । धरूनि हृदयामाजी हरि ॥३॥
तुज करितां होय ऐसें कांहीं नाहीं । डोंगराची राई रंक राणा ॥१॥
अशुभाचें शुभ करितां तुज कांही । अवघड नाहीं पांडुरंगा ॥ध्रु.॥
सोळा सहजर नारी ब्रह्मचारी कैसा । निराहारी दुर्वासा नवल नव्हे ॥२॥
पंचभ्रतार द्रौपदी सती । करितां पितृशांती पुण्य धर्मा ॥३॥
दशरथा पातकें ब्रह्महत्ये ऐसीं । नवल त्याचे कुशीं जन्म तुझा ॥४॥
मुनेश्वरा नाहीं दोष अनुमात्र । भांडवितां सुत्र वध होती ॥५॥
तुका ह्मणे माझे दोष ते कायी । सरता तुझा पायीं जालों देवा ॥६॥
जननिया बाळका रे घातलें पाळणा । पंचतत्त्वीं जडियेल्या वारतिया चहूं कोणा । अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा । वैखरी धरूनि हातीं भाव दावी खेळणा ॥१॥
निजीं रे निजीं आतां । ह्मणोनि परिये दे माता । खेळतां कष्टलासी बाळा तूं रे नेणतां । निजीं रे निजीं आतां ॥ध्रु.॥
खेळतां बाहेरि रे मुला लोकांच्या सवें । बागुल काळतोंडा नाहीं नेतो तें ठावें । खेळतां दुश्चित्ता रे देखोनि तें न्यावें । ह्मणोनि सांगें तुज शीघ्र वचन पाळावें ॥२॥
संचित मागें तुज शुद्ध होतें सांगाती । तेणें तुज वांचविलें वेरझारिया हातीं । आणीक नेली मागें काय जाणों तीं किती । आलासि येथवरि थोरपुण्यें बहुतीं ॥३॥
खेळतां शुक देवा तो रे लागला पाठीं । लपाला वरुषें बारा तिये मातेचे पोटीं । रिघतां बाहेरि रे पळे घेऊनि कासोटी । ते चि परी जाली स्वामी भेणें रिघें कपाटीं ॥४॥
खेळतां चक्रवर्ती जनका लागला धाक । पडिला अग्नीमाजी पाव जळत एक। भरलासे कांप अंगीं सुख नाठवें दुःख। आप पर तें ही नाहीं देहभाव सकिळक ॥५॥
सिभ्रीया चक्रवर्ती कव पडिली अवचिती । धीट तो न भे तया मास कापिलें हातीं । टाकिलें तयावरी खुणें गोविला अंतीं । पावला मायबाप हिरोन घेतला हातीं ॥६॥
बांधलें अजामेळा वेश्यागणीका कैसी । मारिली हाक धाकें कळलें मायबापासी। घातली धांव नेटें वेगीं पावला त्यासी । हिरोनि नेलीं दोघें आपणयां तीं पासी ॥७॥
धरूनी आठवू रे बाळा राहें निश्चळ । खेळतां दुश्चिता रे नको जाऊं बरळ। टोंकताहे तुजलागीं दिवस लेखूनी काळ । मग नेदी आठवूं रे नेत्रीं घालीं पडळ ॥८॥
ऐसी तीं कृपावंतें बाळा मोहिलें चित्त । सुस्वरें कंठ गाय मधुर आणि संगीत । तेणें तें चि चित्त राहे होऊनियां निवांत । पावती तुका ह्मणे नाहीं विश्वास ते घात ॥९॥
उभ्या बाजारांत कथा । हे तों नावडे पंढरिनाथा ॥१॥
अवघें पोटासाटीं ढोंग । तेथें कैंचा पांडुरंग ॥ध्रु.॥
लावी अनुसंधान। कांहीं देईल ह्मणऊन ॥२॥
काय केलें रांडलेंका । तुला राजी नाहीं तुका ॥३॥
असोत लोकांचे बोल शिरावरी । माझी मज बरी विठाबाई ॥१॥
आपंगिलें मज आहे ते कृपाळु । बहुत कनवाळु अंतरींची ॥ध्रु.॥
वेदशास्त्रें जिसी वर्णिती पुराणें । तिचें मी पोसणें लडिवाळ ॥२॥
जिचें नाम कामधेनु कल्पतरू । तिचें मी लेंकरूं तुका ह्मणे ॥३॥
वाराणसी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीच्या ॥१॥
पंढरीसी नाहीं कोणा अभिमान । पायां पडे जन एकमेका ॥२॥
तुका ह्मणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरीं यम न ये ॥३॥
सांडुनियां सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भक्तिभावें ॥१॥
पाहूनियां झाडें वरबडूनि पाला । खाऊनि विठ्ठला आळवावें ॥ध्रु.॥
वेंचूनियां चिंध्या भरूनियां धागा । गुंडाळूनि ढुंगा आळवावें ॥२॥
तुका म्हणे ऐसें मांडिल्या निर्वाण । तया नारायण उपेक्षीना ॥३॥
दह्यांचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागों नये ॥१॥
आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणें । दोहींशी समान पाहों नये ॥ध्रु.॥
पृथ्वीचा पोटीं हिरा गारगोटी । दोहोंसी समसाटी करूं नये ॥२॥
तुका ह्मणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजूं नये ॥३॥
तेरा दिवस जाले निश्चक्र करितां । न पवसी अनंता मायबापा ॥१॥
पाषाणांची खोळ घेउनि बैसलासी । काय हृषीकेशी जालें तुज ॥ध्रु.॥
तुजवरी आतां प्राण मी तजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा ॥२॥
फार विठाबाई धरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥३॥
तुका ह्मणे आतां मांडिलें निर्वाण । प्राण हा सांडीन तुजवरी ॥४॥
लोक फार वाखा अमंगळ जाला । त्याचा त्याग केला पांडुरंगा ॥१॥
विषयां वंचलों मीपणा मुकलों । शरण तुज आलों पांडुरंगा ॥ध्रु.॥
घर दार अवघीं तजिलीं नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥२॥
तुका ह्मणे पडिलों पुंडलिकापाशीं । धांव हृषीकेशी आिंळगीं मज ॥३॥
इंिद्रयांचीं दिनें । आह्मी केलों नारायणें ॥१॥
ह्मणऊनि ऐसें सोसीं । काय सांगों कोणांपाशी ॥ध्रु.॥
नाहीं अंगीं बळ । त्याग करींसा सकळ ॥२॥
तुका ह्मणे मोटें । प्रारब्ध होतें खोटें ॥३॥
हातीं धरूं जावें । तेणें परतें चि व्हावें ॥१॥
ऐसा कां हो आला वांटा । हीन भाग्याचा करंटा ॥ध्रु.॥
देव ना संसार । दोहीं ठायीं नाहीं थार ॥२॥
तुका ह्मणे पीक । भूमि न दे न मिळे भीक ॥३॥
मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया ॥१॥
तैसा भक्तिवाद काय । रंगबेगडीचा न्याय ॥ध्रु.॥
वेठी धरिल्या दावी भाव । मागें पळायाचा पाव ॥२॥
काजव्याच्या ज्योती । तुका ह्मणे न लगे वाती ॥३॥
तरि च जन्मा यावें । दास विठ्ठलाचें व्हावें ॥१॥
नाहीं तरि काय थोडीं । श्वानशूकरें बापुडीं ॥ध्रु.॥
ज्याल्याचें तें फळ। अंगीं लागों नेदी मळ ॥२॥
तुका ह्मणे भले । ज्याच्या नावें मानवलें ॥३॥
देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥१॥
मी तों सांगतसें भावें । असो ठावें सकळां ॥ध्रु.॥
निराकारी ओस दिशा । येथें इच्छा पुरतसे ॥२॥
तुका ह्मणे रोकडें केणें । सेवितां येणें पोट धाय ॥३॥
न कळे माव मुनि मागे एकी अंतुरी । साठी संवत्सरां जन्म तया उदरीं ॥१॥
कैसा आकळे गे माये चपळ वो । त्रिभुवनव्यापक सकळ वो ॥ध्रु.॥
हनुमंता भेटी गर्व हरिला दोहींचा । गरुडा विटंबना रूपा सत्यभामेच्या ॥२॥
द्रौपदीचा भेद पुरविला समयीं । ॠषि फळवनीं देंठीं लावितां ठायीं ॥३॥
अर्जुनाच्या रथीं कपि स्तंभीं ठेविला । दोहीं पैज तेथें गर्व हरी दादुला ॥४॥
भावभक्ती सत्त्वगुण जाला दुर्जना । तुका ह्मणे सकळां छंदें खेळे आपण ॥५॥
उदारा कृपाळा अंगा देवांच्या देवा । तुजसवें पण आतां आमुचा दावा ॥१॥
कैसा जासी सांग आतां मजपासुनी । केलें वाताहात दिले संसारा पाणी ॥ध्रु.॥
अवघीं आवरूनि तुझे लाविलीं पाठीं । आतां त्या विसर सोहंकोहंच्या गोष्टी ॥२॥
तुका ह्मणे आतां चरणीं घातली मिठी । पडिली ते पडो तुह्मा आह्मांसी तुटी ॥३॥
जाली होती काया । बहु मळीन देवराया ॥१॥
तुमच्या उजळली नामें । चित्त प्रक्षाळिलें प्रेमें ॥ध्रु.॥
अनुतापें झाला झाडा । प्रारब्धाचा केला तोडा ॥२॥
तुका ह्मणे देह पायीं । ठेवूनि झालों उतराई ॥३॥
आजि आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति ह्मणती गोविंदु रे ॥१॥
विठोबाचीं वेडीं आह्मां आनंदु सदा । गाऊं नाचों वाऊं टाळी रंजवूं गोविंदा ॥ध्रु.॥
सदा सन सांत आह्मां नित्य दिवाळी । आनंदें निर्भर आमचा कैवारी बळी ॥२॥
तुका ह्मणे नाहीं जन्ममरणांचा धाक । संत सनकादिक तें आमचें कवतुक ॥३॥
प्राणियां एक बीजमंत्र उच्चारीं । प्रतिदिनीं रामकृष्ण ह्मण कां मुरारि ॥१॥
हें चि साधन रे तुज सर्व सिद्धींचे । नाम उच्चारीं पां गोपाळाचें वाचे ॥ध्रु.॥
उपास पारणें न लगे वनसेवन। न लगे धूम्रपान पंचाअग्नतापन ॥२॥
फुकाचें सुखाचें कांहीं न वेचें भांडार । कोटी यज्ञां परिस तुका ह्मणे हें सार ॥३॥
विठ्ठल कीर्तनाचे अंतीं । जय जय हरी जे ह्मणती ॥१॥
तें चि सुकृताचें फळ । वाचा रामनामें निखळ ॥ध्रु.॥
बैसोनि हरिकथेसी । होय सावध चित्तासी ॥२॥
तुका ह्मणे त्याचा जन्म । सुफळ जाला भवक्रम ॥३॥
न चलवे पंथ वेच नसतां पालवीं । शरीर विटंबिलें वाटे भीक मागावी ॥१॥
न करीं रे तैसें आपआपणां । नित्य राम राम तुह्मी सकळ ह्मणा ॥ध्रु.॥
राम ह्मणवितां रांडा पोरें निरविशी । पडसी यमा हांतीं जाचविती चौयाशी ॥२॥
मुखीं नाहीं राम तो ही आत्महत्यारा । तुका ह्मणे लाज नाहीं तया गंव्हारा ॥३॥
थडियेसी निघतां पाषाणांच्या सांगडी । बुडतां मध्यभागीं तेथें कोण घाली उडी ॥१॥
न करी रे तैसें आपआपणा । पतंग जाय वांयां जीवें ज्योती घालूनियां ॥ध्रु.॥
सावधपणें सोमवल वाटी भरोनियां प्याला । मरणा अंतीं वैद्य बोलावितो गहिला ॥२॥
तुकाह्मणे करीं ठायींचा चि विचार । जंवें नाहीं पातला यमाचा किंकर ॥३॥
द्या जी माझा विचारोनियां विभाग । न खंडे हा लाग आहाचपणें ॥१॥
किती नेणों तुह्मां साहाते कटकट । आह्मी च वाईट निवडलों ते ॥ध्रु.॥
करवितां कल्हें जिवाचियेसाटीं । हे तुह्मां वोखटीं ढाळ देवा ॥२॥
तुका ह्मणे धीर कारण आपुला । तुह्मीं तों विठ्ठला मायातीत ॥३॥
आमुचे ठाउके तुह्मां गर्भवास । बिळवंत दोष केले भोग ॥१॥
काय हा सांगावा नसतां नवलावो । मैंदपणें भाव भुलवणेचा ॥ध्रु.॥
एका पळवूनि एका पाठी लावा । कवतुक देवा पाहावया ॥२॥
तुका ह्मणे ज्याणें असें चेतविलें । त्याच्यानें उगळें कैसें नव्हे ॥३॥
निर्दयासी तुह्मी करितां दंडण । तुमचें गाहाणें कोठें द्यावें ॥१॥
भाकितों करुणा ऐकती कान ।उगलें चि मौन्य धरिलें ऐसें ॥ध्रु.॥
दीनपणें पाहें पाय भिडावोनि । मंजुळा वचनीं विनवीतसें ॥२॥
तुका ह्मणे गांठी मनाची उकला । काय जी विठ्ठला पाहातसां ॥३॥
नसतों किविलवाणें । कांहीं तुमच्या कृपादानें ॥१॥
हे चि तयाची ओळखी । धालें टवटवित मुखीं ॥ध्रु.॥
वांयां जात नाहीं । वचन प्रीतीचें तें कांहीं ॥२॥
तुका ह्मणे देवा । सत्य येतें अनुभवा ॥३॥
जालों तंव साचें । दास राहवणें काचें ॥१॥
हें कां मिळतें उचित । तुह्मी नेणा कृपावंत ॥ध्रु.॥
सिंहाचें ते पिलें । जाय घेऊनियां कोल्हें ॥२॥
तुका ह्मणे नास । आह्मां ह्मणविलियां दास ॥३॥
देवाच्या उद्देशें जेथें जेथें भाव । तो तो वसे ठाव विश्वंभरें ॥१॥
लोभाचे संकल्प पळालियावरी । कैंची तेथें उरी पापपुण्या ॥ध्रु.॥
शुद्ध भक्ती मन जालिया निर्मळ । कुश्चळी विटाळ वज्रलेप ॥२॥
तुका ह्मणे ज्याचें तयासी च कळे । प्रांत येतो फळें कळों मग ॥३॥
कडसणी धरितां अडचणीचा ठाव । ह्मणऊनि जीव त्रासलासे ॥१॥
लौकिकाबाहेरि राहिलों निराळा । तुजविण वेगळा नाहीं तुजा ॥ध्रु.॥
संकोचानें नाहीं होत धणीवरी । उरवूनि उरी काय काज ॥२॥
तुका ह्मणे केलें इच्छे चि सारिखें । नाहींसें पारिखें येथें कोणी ॥३॥
हें चि जतन करा दान । धरुनी चरण राहिलों तो ॥१॥
आणीक कांहीं न घलीं भार । बहुत फार सांकडें ॥ध्रु.॥
घ्यावी माझ्या हातें सेवा । हे चि देवा विनवणी ॥२॥
तुका तुमचा ह्मणवी दास । तेणें आस पुरवावी ॥३॥
आपल्या च स्काुंफ्दें । जेथें तेथें घेती छंदें ॥१॥
पडिला सत्याचा दुष्काळ । बहु फार जाली घोळ ॥ध्रु.॥
विश्वासाचे माठ । त्याचे कपाळीं तें नाट ॥२॥
तुका ह्मणे घाणा । मूढा तीथाअ प्रदिक्षणा ॥३॥
उद्वेगाची धांव बैसली आसनीं । पडिलें नारायणीं मोटळें हें ॥१॥
सकळ नििंश्चती जाली हा भरवसा । नाहीं गर्भवासा येणें ऐसा ॥ध्रु.॥
आपुलिया नांवें नाहीं आह्मां जिणें । अभिमान तेणें नेला देवें ॥२॥
तुका ह्मणे चेळें एकाचिया सत्ता । आपुलें मिरवितां पणें ऐसें ॥३॥
बहुतां पुरे ऐसा वाण । आलें धन घरासी ॥१॥
घ्या रे फुका मोलेंविण । नारायण न भुला ॥ध्रु.॥
ऐका निवळल्या मनें। बरवें कानें सादर ॥२॥
तुका ह्मणे करूनि अंतीं । नििंश्चती हे ठेवावी ॥३॥
माझी मज जाती आवरली देवा । नव्हतां या गोवा इंिद्रयांचा ॥१॥
कासया मी तुझा ह्मणवितों दास । असतों उदास सर्व भावें ॥ध्रु.॥
भयाचिया भेणें धरियेली कास । न पुरतां आस काय थोरी ॥२॥
तुका ह्मणे आपआपुलीं जतन । कैचें थोरपण मग तुह्मां ॥३॥
विनवितों तरी आणितोसि परी । याचकानें थोरी दातयाची ॥१॥
आमुचे ही कांहीं असों द्या प्रकार । एकल्यानें थोर कैचे तुह्मी ॥ध्रु.॥
नेघावी जी कांहीं बहु साल सेवा । गौरव तें देवा यत्न कीजे ॥२॥
तुका ह्मणे नाहीं आमुची मिरासी । असावेंसें ऐसीं दुर्बळें चि ॥३॥
एका ऐसें एक होतें कोणां काळें । समर्थाच्या बळें काय नव्हे ॥१॥
घालूनि बैसलों मिरासीस पाया । जिंकों देवराया संदेह नाहीं ॥ध्रु.॥
केला तो न संडीं आतां कइवाड । वारीन हे आड कामक्रोध ॥२॥
तुका ह्मणे जाळीं अळसाची धाडी । नव्हती आली जोडी कळों साच ॥३॥
जाले समाधान । तुमचे धरिले चरण ॥१॥
आतां उठावेंसें मना । येत नाहीं नारायणा ॥ध्रु.॥
सुरवाडिकपणें । येथें सांपडलें केणें ॥२॥
तुका ह्मणे भाग । गेला निवारला लाग ॥३॥
मुखाकडे वास । पाहें करूनियां आस ॥१॥
आतां होईल ते शिरीं । मनोगत आज्ञा धरीं ॥ध्रु.॥
तुह्मीं अंगीकार । केला पाहिजे हें सार ॥२॥
तुका ह्मणे दारीं । उभें याचक मीं हरी ॥३॥
नाहीं माथां भार । तुह्मी घेत हा विचार ॥१॥
जाणोनियां ऐसें केलें । दुरिल अंगेसी लाविलें ॥ध्रु.॥
आतां बोलावें आवडी । नाम घ्यावें घडी घडी ॥२॥
तुका ह्मणे दुरी । देवा खोटी ऐसी उरी ॥३॥
माझें जड भारी । आतां अवघें तुह्मांवरी ॥१॥
जालों अंकित अंकिला । तुमच्या मुकलों मागिला ॥ध्रु.॥
करितों जें काम। माझी सेवा तुझें नाम ॥२॥
तुका पायां लागे । कांहीं नेदी ना न मगे ॥३॥
तुह्मी आह्मी भले आतां । जालों चिंता काशाची ॥१॥
आपुलाले आलों स्थळीं । मौन कळी वाढेना ॥ध्रु.॥
सहज जें मनीं होतें । तें उचितें घडलें ॥२॥
तुका ह्मणे नसतें अंगा । येत संगा सारिखें ॥३॥
चित्ता ऐसी नको देऊं आठवण । जेणें देवाचे चरण अंतरे तें ॥१॥
आलिया वचनें रामनामध्वनि । ऐकावीं कानीं ऐसीं गोडें ॥ध्रु.॥
मत्सराचा ठाव शरीरीं नसावा । लाभेंविण जीवा दुःख देतो ॥२॥
तुका ह्मणे राहे अंतर शीतळ । शांतीचें तें बळ क्षमा अंगीं ॥३॥
कोण पुण्य कोणा गांठी । ज्यासी ऐसियांची भेटी ॥१॥
जिहीं हरी धरिला मनीं । दिलें संवसारा पाणी ॥ध्रु.॥
कोण हा भाग्याचा । ऐसियांसी बोले वाचा ॥२॥
तुका ह्मणे त्यांचे भेटी। होय संसारासी तुटी ॥३॥
तरि च हा जीव संसारीं उदास । धरिला विश्वास तुह्मां सोई ॥१॥
एके जातीविण नाहीं कळवळा । ओढली गोपाळा सूत्रदोरी ॥ध्रु.॥
फुटतसे प्राण क्षणांच्या विसरें । हें तों परस्परें सारिखें चि ॥२॥
तुका ह्मणे चित्तीं राखिला अनुभव । तेणें हा संदेह निवारला ॥३॥
किती विवंचना करीतसें जीवीं । मन धांवडवी दाही दिशा ॥१॥
कोणा एका भावें तुह्मी अंगीकार । करावा विचार या च साटीं ॥ध्रु.॥
इतर ते आतां लाभ तुच्छ जाले । अनुभवा आले गुणागुण ॥२॥
तुका ह्मणे लागो अखंड समाधि । जावें प्रेमबोधीं बुडोनियां ॥३॥
दिक चि या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची ॥१॥
तांतडींत करीं ह्मणऊनि तांतडी । साधिली ते घडी सोनियाची ॥ध्रु.॥
संकल्पाच्या बीजें इंिद्रयांची चाली । प्रारब्ध तें घाली गर्भवासीं ॥२॥
तुका ह्मणे बीजें जाळुनी सकळ । करावा गोपाळ आपुला तो ॥३॥
आतां होइन धरणेकरी । भीतरीच कोंडीन ॥१॥
नाही केली जीवेंसाटी । तों कां गोष्टी रुचे तें ॥ध्रु.॥
आधी निर्धार तो सार । मग भार सोसीन ॥२॥
तुका ह्मणे खाऊं जेवूं । नेदूं होऊं वेगळा ॥३॥
होइल तरि पुसापुसी । उत्तर त्यासी योजावें ॥१॥
तोंवरि मी पुढें कांहीं । आपुलें नाहीं घालीत ॥ध्रु.॥
जाणेनियां अंतर देव । जेव्हां भेव फेडील ॥२॥
तुका ह्मणे धरिला हातीं । करील खंतीवेगळें ॥३॥
हा तों नव्हे कांहीं निराशेचा ठाव । भलें पोटीं वाव राखिलिया ॥१॥
विश्वंभरें विश्व सामाविलें पोटी । तेथें चि सेवटीं आह्मी असों ॥ध्रु.॥
नेणतां चिंतन करितों अंतरीं । तेथें अभ्यंतरीं उमटेल ॥२॥
तुका ह्मणे माझा स्वामी अबोलणा । पुरवूं खुणे खुणा जाणतसों ॥३॥
निष्ठ तो दिसे निराकारपणें । कोंवळा सगुणें प्रतिपाळी ॥१॥
केला च करावा केला कइवाड । होईल तें गोड न परेते ॥ध्रु.॥
मथिलिया लागे नवनीत हातां । नासे वितिळतां आहाच तें ॥२॥
तुका ह्मणे आतां मनाशीं विचार । करावा तो सार एकचित्त ॥३॥
बहु देवा बरें जालें । नसतें गेलें सोंवळें ॥१॥
धोवटाशीं पडिली गांठी । जगजेठीप्रसादें ॥ध्रु.॥
गादल्याचा जाला जाडा । गेली पीडा विकल्प ॥२॥
तुका ह्मणे वरावरी । निर्मळ करी निर्मळा ॥३॥
स्वामित्वाचीं वर्में असोनि जवळी । वाहों जावें मोळी गुणांसवें ॥१॥
काबाडापासूनि सोडवा दातारा । कांहीं नका भारा पात्र करूं ॥ध्रु.॥
धनवंjयाचिये अंगीं सत्ताबळ । व्याधि तो सकळ तोडावया ॥२॥
तुका ह्मणे आलें मोड्यासी कोंपट । सांडव्याची वाट विसरावी ॥३॥
This abhang still carries a transcription error we could not repair automatically.
ॠणाच्या परिहारा जालों वोळगणा । द्यावी नारायणा वासलाती ॥१॥
जालों उतराई शरीरसंकल्पें । चुकों द्यावीं पापें सकळ ही ॥ध्रु.॥
आजिवरि होतों धरूनि जिवासी । व्याजें कासाविसी बहु केलें ॥२॥
तुका ह्मणे मना आणिला म्यां भाव । तुमचा तेथें ठाव आहे देवा ॥३॥
येणें पांगें पायांपाशीं । निश्चयेंसी राहेन ॥१॥
सांगितली करीन सेवा । सकळ देवा दास्यत्व ॥ध्रु.॥
बंधनाची तुटली बेडी । हे चि जोडी मग आह्मां ॥२॥
तुका ह्मणे नव्हें क्षण । पायांविण वेगळा ॥३॥
आपुल्या आपण उगवा लिगाड । काय माझें जड करुन घ्याल ॥१॥
उधारासी काय उधाराचें काम । वाढवूं चि श्रम नये देवा ॥ध्रु.॥
करा आतां मजसाटीं वाड पोट । ठाव नाहीं तंटे जालें लोकीं ॥२॥
तुका ह्मणे बाकी झडलियावरी । न पडें वेव्हारीं संचिताचे ॥३॥
सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी ॥१॥
दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु.॥
बहु जालों क्षीदक्षीण । येणें सीण तो नासे ॥२॥
तुका ह्मणे गंगवास । बहु त्या आस स्थळाची ॥३॥
शीतळ तें शीतळाहुनी । पायवणी चरणींचें ॥१॥
सेवन हे शिरसा धरीं । अंतरीं हीं वरदळा ॥ध्रु.॥
अवघें चि नासी पाप । तीर्थ बाप माझ्याचें ॥२॥
बैसोनियां तुका तळीं । त्या कल्लोळीं डौरला ॥३॥
गोदे कांठीं होता आड । करूनि कोड कवतुकें ॥१॥
देखण्यांनीं एक केलें । आइत्या नेलें जिवनापें ॥ध्रु.॥
राखोनियां ठाव । अल्प जीव लावूनि ॥२॥
तुका ह्मणे फिटे धनी । हे सज्जनीं विश्रांति ॥३॥
न पाहें माघारें आतां परतोनि । संसारापासूनि विटला जीव ॥१॥
सामोरें येऊनि कवळीं दातारा । काळाचा हाकारा न साहावे ॥ध्रु.॥
सावधान चित्त होईल आधारें । खेळतां ही बरें वाटईल ॥२॥
तुका ह्मणे कंठ दाटला या सोसें । न पवे कैसें जवळी हें ॥३॥
मथनीचें नवनीत । सर्व हितकारक ॥१॥
दंडवत दंडा परी । मागें उरी नुरावी ॥ध्रु.॥
वचनाचा तो पसरुं काई । तांतडी डोईपाशींच ॥२॥
तुका ह्मणे जगजेठी । लावीं कंठीं उचलूनि ॥३॥
अवचिता चि हातीं ठेवा । दिला सेवा न करितां ॥१॥
भाग्य फळलें जाली भेटी । नेघें तुटी यावरी ॥ध्रु.॥
दैन्य गेलें हरली चिंता । सदैव आतां यावरी ॥२॥
तुका ह्मणे वांटा जाला । बोलों बोली देवासीं ॥३॥
समर्थाची धरिली कास । आतां नाश काशाचा ॥१॥
धांव पावें करीन लाहो । तुमच्या आहो विठ्ठला ॥ध्रु.॥
न लगे मज पाहाणें दिशा । हाकेसरिसा ओढसी ॥२॥
तुका ह्मणे नव्हे धीर । तुह्मां िस्थर दयेनें ॥३॥
करूं तैसें पाठांतर । करुणाकर भाषण ॥१॥
जिहीं केला मूर्तिमंत । ऐसे संतप्रसाद ॥ध्रु.॥
सोज्ज्वळ केल्या वाटा । आइत्या नीटा मागीलां ॥२॥
तुका ह्मणे घेऊं धांवा । करूं हांवा ते जोडी ॥३॥
अचळ न चळे ऐसें जालें मन । धरूनि निज खुण राहिलोंसें ॥१॥
आवडी बैसली गुणांची अंतरीं । करूं धणीवरी सेवन तें ॥ध्रु.॥
एकविध भाव नव्हे अभावना । आणिकिया गुणां न मिळवे ॥२॥
तुका ह्मणे माझे पडिलें आहारीं । ध्यान विटेवरी ठाकले तें ॥३॥
काय तुझी थोरी वणूप मी पामर । होसी दयाकर कृपासिंधु ॥१॥
तुज ऐसी दया नाहीं आणिकासी । ऐसें हृषीकेशी नवल एक ॥ध्रु.॥
कुरुक्षेत्रभूमीवरी पक्षी व्याले । तृणामाजी केलें कोठें त्यांनीं ॥२॥
अकस्मात तेथें रणखांब रोविला । युद्धाचा नेमिला ठाव तेथें ॥३॥
कौरव पांडव दळभार दोन्ही । झुंजावया रणीं आले तेथें ॥४॥
तये काळीं तुज पक्षी आठविती । पाव बा श्रीपती ह्मणोनियां ॥५॥
हस्ती घोडे रथ येथें धांवतील । पाषाण होतील शतचूर्ण ॥६॥
ऐसिये आकांतीं वांचों कैसे परी । धांव बा श्रीहरी लवलाहें ॥७॥
टाकोनियां पिलीं कैसें जावें आतां । पावें जगन्नाथा लवलाहीं ॥८॥
आली तिये काळीं कृपा तुझ्या चित्ता । अनाथांच्या नाथा नारायणा ॥९॥
एका गजाचिया कंठीं घंटा होती। पाडिली अवचिती तयांवरी ॥१०॥
अठरा दिवस तेथे द्वंदजुंज जालें । वारा ऊन लागलें नाहीं तयां ॥११॥
जुंज जाल्यावरी दाविलें अर्जुना । तुह्मीं नारायणा पिक्षयांसी ॥१२॥
पाहें आपुलिया दासां म्यां रिक्षलें । रणीं वांचविलें कैशा परी ॥१३॥
ऐसी तुज माया आपुल्या भक्तांची । माउली आमुची तुका ह्मणे ॥१४॥
वैष्णवां संगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें ॥१॥
गायें नाचें उडें आपुलिया छंदें । मनाच्या आनंदें आवडीनें ॥ध्रु.॥
लाज भय शंका दुराविला मान । न कळे साधन यापरतें ॥२॥
तुका ह्मणे आतां आपुल्या सायासें । आह्मां जगदेशें सांभाळावें ॥३॥
शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा विनवणी ॥१॥
स्तुती न पुरे हे वाचा । सत्य दास मी दासांचा ॥ध्रु.॥
देह सांभाळून। पायांवरी लोटांगण ॥२॥
विनवी संता तुका दीन । नव्हे गोरवें उत्तीर्ण ॥३॥
लेंकरा लेववी माता अळंकार । नाहीं अंतपार आवडीसी ॥१॥
कृपेचें पोसणें तुमचें मी दीन । आजि संतजन मायबाप ॥ध्रु.॥
आरुषा उत्तरीं संतोषे माउली । कवळूनि घाली हृदयात ॥२॥
पोटा आलें त्याचे नेणे गुणदोष । कल्याण चि असे असावें हें ॥३॥
मनाची ते चाली मोहाचिये सोई । ओघें गंगा काई परतों जाणे ॥४॥
तुका ह्मणे कोठें उदार मेघां शक्ति । माझी तृषा किती चातकाची ॥५॥
युक्ति तंव जाल्या कुंटित सकळा । उरली हे कळा जीवनाची ॥१॥
संतचरणीं भावें ठेविलें मस्तक । जोडोनि हस्तक राहिलोंसें ॥ध्रु.॥
जाणपणें नेणें कांहीं चि प्रकार । साक्षी तें अंतर अंतरासी ॥२॥
तुका ह्मणे तुह्मी केलें अभयदान । जेणें समाधान राहिलेंसे ॥३॥
हा गे आलों कोणी ह्मणे बुडतिया । तेणें किती तया बळ चढे ॥१॥
तुह्मी तंव भार घेतला सकळ । आश्वासिलों बाळ अभयकरें ॥ध्रु.॥
भुकेलियां आस दावितां निर्धार । किती होय धीर समाधान ॥२॥
तुका ह्मणे दिली चिंतामणीसाटीं । उचित कांचवटी दंडवत ॥३॥
कैसा तीं देखिला होसील गोपाळीं । पुण्यवंतीं डोळीं नारायणा ॥१॥
तेणें लोभें जीव जालासे बराडी । आह्मी ऐशी जोडी कइप लाभों ॥ध्रु.॥
असेल तें कैसें दर्शनाचें सुख । अनुभवें श्रीमुख अनुभवितां ॥२॥
तुका ह्मणे वाटे देसी आलिंगन । अवस्था ते क्षणाक्षणां होते ॥३॥
कासया या लोभें केलें आर्तभूत । सांगा माझें चित्त नारायणा ॥१॥
चातकाचे परी एक चि निर्धार । लक्षभेदीतीर फिरों नेणे ॥ध्रु.॥
सांवळें रूपडें चतुर्भुज मूर्ति । कृष्णनाम चित्तीं संकल्प हा ॥२॥
तुका ह्मणे करीं आवडीसी ठाव । नको माझा भाव भंगों देऊं ॥३॥
काय माझा पण होईल लटिका । िब्रदावळी लोकां दाविली ते ॥१॥
खरी करूनियां देइप माझी आळी । येऊनि कृवाळी पांडुरंगे ॥ध्रु.॥
आणीक म्यां कोणा ह्मणवावें हातीं । नये काकुलती दुजियासी ॥२॥
तुका ह्मणे मज येथें चि ओळखी । होईन तो सुखी पायांनीं च ॥३॥
तुह्मां आह्मां जंव जालिया समान । तेथें कोणां कोण सनमानी ॥१॥
उरी तों राहिली गोमटें गौरव । ओढे माझा जीव पायांपाशीं ॥ध्रु.॥
नेणपणें आह्मी आळवूं वोरसें । बोलवितों रसें शब्दरत्नें ॥२॥
तुका ह्मणे लळे पाळीं वो विठ्ठले । कां हे उरविले भेदाभेद ॥३॥
नको माझे मानूं आहाच ते शब्द । कळवऑयाचा वाद करीतसें ॥१॥
कासयानें बळ करूं पायांपाशीं । भाकावी ते दासीं करुणा आह्मीं ॥ध्रु.॥
काय मज चाड असे या लौकिकें । परी असे निकें अनुभवाचें ॥२॥
लांचावल्यासाटीं वचनाची आळी । टकऑयानें घोळी जवळी मन ॥३॥
वाटतसे आस पुरविसी ऐसें । तरि अंगीं पिसें लावियेले ॥४॥
तुका ह्मणे माझी येथें चि आवडी। श्रीमुखाची जोडी इच्छीतसें ॥५॥
ह्मणऊनी लवलाहें । पाय आहें चिंतीत ॥१॥
पाठिलागा येतो काळ । तूं कृपाळू माउली ॥ध्रु.॥
बहु उसंतीत आलों । तया भ्यालों स्थळासी ॥२॥
तुका ह्मणे तूं जननी । ये निर्वाणीं विठ्ठलें ॥३॥
जेणें वाढे अपकीर्ति । सर्वाथाअ तें वर्जावें ॥१॥
सत्य रुचे भलेपण । वचन तें जगासी ॥ध्रु.॥
होइजेतें शूर त्यागें । वाउगें तें सारावें ॥२॥
तुका ह्मणे खोटें वर्म । निंद्यकर्म काळिमा ॥३॥
याची सवे लागली जीवा । गोडी हेवा संगाचा ॥१॥
परतें न सरवे दुरी । क्षण हरीपासूनि ॥ध्रु.॥
जालें तरी काय तंट । आतां चट न संटे ॥२॥
तुका ह्मणे चक्रचाळे । वेळ बळें लाविलें ॥३॥
याचा तंव हा चि मोळा । देखिला डोळा उदंड ॥१॥
नेदी मग फिरों मागें । अंगा अंगें संचरे ॥ध्रु.॥
कां गा याची नेणां खोडी । जीभा जोडी करितसां ॥२॥
पांघरे तें बहु काळें । घोंगडें ही ठायींचें ॥३॥
अंगीं वसे चि ना लाज । न ह्मणे भाज कोणाची ॥४॥
सर्वसाक्षी अबोल्यानें । दुश्चित कोणें नसावें ॥५॥
तुका ह्मणे धरिला हातीं । मग नििंश्चतीं हरीनें ॥६॥
प्रसिद्ध हा असे जगा । अवघ्या रंगारंगाचा ॥१॥
तरी वाटा न वजे कोणी । नारायणीं घरबुडी ॥ध्रु.॥
बहुतां ऐसें केलें मागें । लाग लागें लागेना ॥२॥
हो कां नर अथवा नारी । लाहान थोरीं आदर ॥३॥
जालें वेगळें लोकीं पुरे । मग नुरे समूळ ॥४॥
कळेना तो आहे कैसा । कोणी दिशा बहु थोडा ॥५॥
तुका ह्मणे दुसया भावें । छायें नावें न देखवे ॥६॥
न संडावा आतां ऐसें वाटे ठाव । भयाशी उपाव रक्षणाचा ॥१॥
ह्मणऊनि मनें विळयेलें मन । कारियेकारण चाड नाहीं ॥ध्रु.॥
नाना वीचि उपाधि करूनियां मूळ । राखतां विटाळ तें चि व्हावें ॥२॥
तुका ह्मणे येथें न वेचे वचन । निजीं निजखूण सांपडली ॥३॥
सत्तेचें भोजन समयीं आतुडे । सेवन ही घडे रुचिनेसी ॥१॥
वर्में श्रम नेला जालें एकमय । हृदयस्थीं सोय संग जाला ॥ध्रु.॥
कोथळीस जमा पडिलें संचित । मापल्याचा वित्त नेम जाला ॥२॥
तुका ह्मणे धणी ऐसा जालों आतां । करीन ते सत्ता माझी आहे ॥३॥
देईल तें उणें नाहीं । याचे कांहीं पदरीं ॥१॥
पाहिजे तें संचित आतां । येथें सत्ता करावया ॥ध्रु.॥
गुणां ऐसा भरणा भरी। जो जें चारी तें लाभे ॥२॥
तुका ह्मणे देवीं देव । फळे भव आपुला ॥३॥
तेव्हां होतों भोगाधीन । तुह्मां भिन्न पासूनि ॥१॥
आतां बोलों नये ऐसें । आनारिसें वेगळें ॥ध्रु.॥
सन्मुख जालों स्वामीकडे । भव औठडे निराळे ॥२॥
चिंतिलें तें चिंतामणी । फिटे धणी तों द्यावें ॥३॥
सहज िस्थत आहे अंगीं । प्रसंगीं ते वंचेना ॥४॥
तुमची देवा धरिली कास । केला नास प्रपंचा ॥५॥
तुका ह्मणे जाणोनि वर्म । कर्माकर्में ठेविलीं ॥६॥
केला कैवाड संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें ॥१॥
काय जीवित्वाची धरुनियां आशा । व्हावें गर्भवासा पात्र भेणें ॥ध्रु.॥
अबाळीनें जावें निचिंतिया ठायां । रांडा रोटा वांयां करूं नये ॥२॥
तुका ह्मणे बळी देतां तें निधान । भिकेसाटीं कोण राज्य देतो ॥३॥
संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें ॥१॥
जैसीं तैसीं असों पुढिलांचे सोई । धरिती हातीं पायीं आचारिये ॥ध्रु.॥
उपकारी नाहीं देखत आपदा । पुढिलांची सदा दया चित्तीं ॥२॥
तुका ह्मणे तरीं सज्जनाची कीर्ति । पुरवावी आर्ति निर्बळांची ॥३॥
करितां विचार सांपडलें वर्म । समूळ निश्रम परिहाराचें ॥१॥
मज घेऊनियां आपणांसी द्यावें । साटी जीवें जीवें नारायणा ॥ध्रु.॥
उरी नाहीं मग पडदा कां आला । स्वमुखें चि भला करितां वाद ॥२॥
तुका ह्मणे माझें खरें देणें घेणें । तुह्मी साक्षी जाणें अंतरींचें ॥३॥
कुळींची हे कुळदेवी । केली ठावी संतांनीं ॥१॥
बरवें जालें शरण गेलों । उगविलों संकटीं ॥ध्रु.॥
आणिला रूपा ही बळें । करूनि खळें हरिदासीं ॥२॥
तुका ह्मणे समागमें । नाचों प्रेमें लागलों ॥३॥
आतां देह अवसान । हें जतन तोंवरी ॥१॥
गाऊं नाचों गदारोळें । जिंकों बळें संसार ॥ध्रु.॥
या चि जीऊं अभिमानें। सेवाधनें बळकट ॥२॥
तुका ह्मणे न सरें मागें । होईन लागें आगळा ॥३॥
ज्याने आड यावें कांहीं । त्याचें नाहीं बळ आतां ॥१॥
मन येथें साह्य जालें । हरिच्या धालें गुणवादीं ॥ध्रु.॥
चुकुर तो गेला काळ । जालें बळ संगाचें ॥२॥
तुका ह्मणे धरूं सत्ता । होईल आतां करूं तें ॥३॥
देवासी तो पुरे एकभाव गांठी । तो चि त्याचे मिठी देइल पायीं ॥१॥
पाहोनि राहीन कवतुक निराळा । मी मज वेगळा होऊनियां ॥ध्रु.॥
कांहीं नेघें शिरीं निमित्त्याचा भार । न लगे उत्तर वेचावें चि ॥२॥
तुका ह्मणे जीवें पडिलिया गांठी । मग नाहीं मिठी सुटों येत ॥३॥
लौकिकासाटीं या पसायाचा गोवा । कांहीं नाहीं देवा लागों येत ॥१॥
ठेवावा माथा तो नुचलावा पायीं । ठांयींचिये ठांयीं हालों नये ॥ध्रु.॥
डव्हिळल्या मनें वितिळलें रूप । नांवऐसें पाप उपाधीचें ॥२॥
तुका ह्मणे देव प्रीतीनें कवळी । ठेवील जवळी उठवूनि ॥३॥
नाहीं होत भार घातल्या उदास । पुरवावी आस सकळ ही ॥१॥
ऐसा नाहीं मज एकाचा अनुभव । धरिला तो भाव उद्धरलें ॥ध्रु.॥
उतावीळ असे शरणागतकाजें । धांव केशीराजे आइकतां ॥२॥
तुका ह्मणे हित चिंतन भरवंसा । नेदी गर्भवासा येऊं देवा ॥३॥
उपजों मरों हे तों आमुची मिरासी । हें तूं निवारिसी तरी थोर ॥१॥
उभा राहीं करीं खरा खोटा वाद । आह्मी जालों निंद लंडीपणें ॥ध्रु.॥
उभयतां आहे करणें समान । तुह्मां ऐसा ह्मणें मी ही देवा ॥२॥
तुका ह्मणे हातीं सांपडलें वर्म । अवघाची भ्रम फेडिन आतां ॥३॥
मेलियांच्या रांडा इिच्छती लेकरूं । लाज नाहीं धरूं प्रीती कैशी ॥१॥
मागिलां पुढिलां एकी सरोबरी । काळाची पेटारी खांदा वाहे ॥ध्रु.॥
आन दिसे परी मरणें चि खरें । सांपळा उंदिरें सामाविलीं ॥२॥
तुका ह्मणे जाली मनाची परती । निवळली ज्योती दिसों आली ॥३॥
निष्ठ मी जालों अतिवादागुणें । हें कां नारायणें नेणिजेल ॥१॥
सांडियेली तुह्मी गोत परिसोय । फोडविली डोय कर्मा हातीं ॥ध्रु.॥
सांपडूनि संदी केली जीवेंसाटीं । घ्यावयासि तुटी कारण हें ॥२॥
तुका ह्मणे तुज काय ह्मणों उणें । नाहीं अभिमानें चाड देवा ॥३॥
माझें माझ्या हाता आलें । आतां भलें सकळ ॥१॥
काशासाटीं विषम थारा । तो अंतरा विटाळ ॥ध्रु.॥
जालीं तया दुःखें तुटी । मागिल पोटीं नसावें ॥२॥
तुका ह्मणे शुद्धकुळ । तेथें मळ काशाचा ॥३॥
समर्थपणें हे करा संपादणी । नसतें चि मनीं धरिल्याची ॥१॥
दुसयाचें येथें नाहीं चालों येत । तरि मी निवांत पाय पाहें ॥ध्रु.॥
खोटियाचें खरें खरियाचें खोटें । मानलें गोमटें तुह्मांसी तें ॥२॥
तुका ह्मणे तुह्मां सवें करितां वाद । होईजेतें निंद जनीं देवा ॥३॥
तुह्मां आह्मांसवें न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां ॥१॥
किती ह्मणों आतां वाइटा वाइट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ध्रु.॥
बोलिल्याची आतां हे चि परचित । भीड भार थीत बुडवील ॥२॥
तुका ह्मणे आली रोकडी प्रचिती । झांकणें तें किती कोठें देवा ॥३॥
सकळ सत्ताधारी । व्हावें ऐसें काय हरी ॥१॥
परि या कृपेच्या वोरसें । कुढावयाचें चि पिसें ॥ध्रु.॥
अंगें सवाौत्तम । अवघा चि पूर्णकाम ॥२॥
तुका ह्मणे दाता । तरि हा जीव दान देता ॥३॥
कोणापाशीं द्यावें माप । आपीं आप राहिलें ॥१॥
कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी ॥ध्रु.॥
एकें दाखविले दाहा। फांटा पाहा पुसून ॥२॥
तुका ह्मणे सरलें वोझें । आतां माझें सकळ ॥३॥
नभोमय जालें जळ । एकीं सकळ हरपलें ॥१॥
आतां काय सारासारी । त्याच्या लहरी तयांत ॥ध्रु.॥
कैचा तेथ यावा सांडी । आप कोंडी आपण्यां ॥२॥
तुका ह्मणे कल्प जाला। अस्त गेला उदय ॥३॥
राजा करी तैसे दाम । ते ही चाम चालती ॥१॥
कारण ते सत्ता शिरीं । कोण करी अव्हेर ॥ध्रु.॥
वाइले तें सुनें खांदीं । चाले पदीं बैसविलें ॥२॥
तुका ह्मणे विश्वंभरें । करुणाकरें रिक्षलें ॥३॥
आह्मी देव तुह्मी देव । मध्यें भेव अधीक ॥१॥
कैवाडाच्या धांवा लागें । मागें मागें विठ्ठले ॥ध्रु.॥
भेडसाविलें हाके नादें । वोळखी भेदें मोडिली ॥२॥
तुका ह्मणे उभा राहे । मागें पाहे परतोनि ॥३॥
हीनसुरबुद्धीपासाीं । आकृतीसी भेद नाहीं ॥१॥
एक दांडी एक खांदी । पदीं पदीं भोगणें ॥ध्रु.॥
एकाऐसें एक नाहीं । भिन्न पाहीं प्रकृती ॥२॥
तुका ह्मणे भूमी खंडे । पीक दंडे जेथें तें ॥३॥
काय बोलों सांगा । याउपरी पांडुरंगा ॥१॥
कांहीं आधारावांचून । पुढें न चले वचन ॥ध्रु.॥
वाढे ऐसा रस । कांहीं करावा सौरस ॥२॥
भक्तिभाग्यसीमा । द्यावा जोडोनियां प्रेमा ॥३॥
कोरड्या उत्तरीं । नका गौरवूं वैखरी ॥४॥
करी विज्ञापना । तुका प्रसादाची दाना ॥५॥
आहाच तो मोड वाळलियामधीं । अधीराची बुद्धि तेणें न्यायें ॥१॥
ह्मणऊनि संग न करीं दुसरें । चित्त मळीन द्वारें दोड पडे ॥ध्रु.॥
विषासाटीं सर्पां भयाभीत लोक । हें तों सकळीक जाणतसां ॥२॥
तुका ह्मणे काचें राहे कुळांकुड । अवगुण तो नाड ज्याचा तया ॥३॥
क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती । आठवती चित्तीं पाय देवा ॥१॥
येइप वो येइप वो येइप लवलाहीं । आिंळगूनि बाहीं क्षेम देइप ॥ध्रु.॥
उताविळ मन पंथ अवलोकी । आठवा ते चुकी काय जाली ॥२॥
तुका ह्मणे माझ्या जीवींच्या जीवना । घाला नारायणा उडी वेगीं ॥३॥
आळी करावी ते कळतें बाळका । बुझवावें हें कां नेणां तुह्मी ॥१॥
निवाड तो तेथें असे पायांपाशीं । तुह्मांआह्मांविशीं एकेठायीं ॥ध्रु.॥
आणीक तों आह्मी न देखोंसें जालें । जाणावें शिणलें भागलेंसें ॥२॥
तुका ह्मणे तुह्मां लागतें सांगावें । अंतरींचें ठावें काय नाहीं ॥३॥
तांतडीनें आह्मां धीर चि न कळे । पाळावे हे लळे लवलाहीं ॥१॥
नका कांहीं पाहों सावकाशीं देवा । करा एक हेवा तुमचा माझा ॥ध्रु.॥
वोरसाचा हेवा सांभाळावी प्रीत । नाहीं राहों येत अंगीं सदा ॥२॥
तुका ह्मणे मज नका गोवूं खेळा । भोजनाची वेळा राखियेली ॥३॥
नाहीं लोपों येत गुण । वेधी आणीकें चंदन ॥१॥
न संगतां पडे ताळा । रूप दर्पणीं सकळां ॥ध्रु.॥
सारविलें वरी । आहाच तें क्षणभरी ॥२॥
तुका ह्मणे वोहळें । सागराच्या ऐसें व्हावें ॥३॥
वचनें चि व्हावें आपण उदार । होइल विश्वंभर संपुष्ट चि ॥१॥
सत्यसंकल्पाचीं फळें बीजाऐसीं । शुद्ध नाहीं नासी पावों येत ॥ध्रु.॥
वंचिलिया काया येतसे उपेगा । शरीर हें नरकाचें चि आळें ॥२॥
तुका ह्मणे जीव जितां थारे लावा । पडिलिया गोवा देशधडी ॥३॥
उखतें आयुष्य जायांचें किळवर । अवघें वोडंबर विषयांचें ॥१॥
कोणासी हा लागे पुसणें विचार । मनें चि सादर करूं आतां ॥ध्रु.॥
उत्पित्त प्रळय पडिलें दळण । पाकाचें भोजन बीज वाढे ॥२॥
तुका ह्मणे जाऊं अभयाच्या ठायां । रिघों देवराया शरण वेगीं ॥३॥
बोलावे ह्मुण हे बोलतों उपाय । प्रवाहें हें जाय गंगाजळ ॥१॥
भाग्ययोगें कोणां घडेल सेवन । कैंचे येथें जन अधिकारी ॥ध्रु.॥
मुखीं देतां घांस पळवितीं तोंडें । अंगींचिया भांडे असुकानें ॥२॥
तुका ह्मणे पूजा करितों देवाची । आपुलिया रुची मनाचिये ॥३॥
लटिक्याचे वाणी चवी ना संवाद । नांहीं कोणां वाद रुचों येत ॥१॥
अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळा । मायबापीं वेळा न साधिली ॥ध्रु.॥
अनावर अंगीं प्रबळ अवगुण । तांतडीनें मन लाहो साधी ॥२॥
तुका ह्मणे दोष आणि अवकळा । न पडतां ताळा घडे तसे ॥३॥
नये स्तवूं काचें होतें क्रियानष्ट । काुंफ्दाचे ते कष्ट भंगा मूळ ॥१॥
नाहीं परमार्थ साधत लौकिकें । धरुन होतों फिकें अंगा आलें ॥ध्रु.॥
पारखिया पुढें नये घालूं तोंड । तुटी लाभा खंड होतो माना ॥२॥
तुका ह्मणे तरी मिरवतें परवडी । कामावल्या गोडी अविनाश ॥३॥
कोण्या काळें येईल मना । नारायणा तुमचिया ॥१॥
माझा करणें अंगीकार । सर्व भार फेडूनि ॥ध्रु.॥
लागली हे तळमळ चित्ता । तरी दुश्चिता संसारी ॥२॥
सुखाची च पाहें वास । मागें दोष सांभाळीं ॥३॥
इच्छा पूर्ण जाल्याविण । कैसा सीण वारेल ॥४॥
लाहो काया मनें वाचा । देवा साच्या भेटीचा ॥५॥
कांटाळा तो न धरावा । तुह्मी देवा दासांचा ॥६॥
तुका ह्मणे माझे वेळे । न कळे कां हें उफराटें ॥७॥
घ्यावी तरी घ्यावी उदंड चि सेवा । द्यावें तरी देवा उदंड चि ॥१॥
ऐसीं कैंचीं आह्मी पुरतीं भांडवलें । आल्या करीं बोलें समाधान ॥ध्रु.॥
व्हावें तरीं व्हावें बहुत चि दुरी । आलिया अंतरीं वसवावें ॥२॥
तुका ह्मणे तुझें सख्यत्व आपणीं । अससील ॠणी आवडीचा ॥३॥
काय करूं जीव होतो कासावीस । कोंडलिये दिस गमे चि ना ॥१॥
पडिलें हें दिसे ब्रह्मांड चि वोस । दाटोनि उच्छ्वास राहातसे ॥२॥
तुका ह्मणे आगा सर्वजाणतिया । विश्वंभरें काया निववावी ॥३॥
सुकलियां कोमां अत्यंत जळधर । तेणें च प्रकार न्याय असे ॥१॥
न चलें पाउलीं सांडीं गरुडासन । मनाचें हो मन त्वरेलागीं ॥२॥
तुका ह्मणे भूक न साहावे बाळा । जीवनांची कळा ओढलीसे ॥३॥
शृंगारिक माझीं नव्हती उत्तरें । आळवितों खरे अवस्थेच्या ॥१॥
न घलावा मधीं कामाचा विलंब । तुह्मी तों स्वयंभ करुणामूर्ति ॥२॥
तुका ह्मणे केलें सन्मुख वदन । देखतां चरण पोटाळीन ॥३॥
तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहातों वाटुली पांडुरंगे ॥१॥
तूं मज येकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव ॥२॥
तुका ह्मणे जीव तुजपाशीं असे । तुझियानें ओस सर्व दिशा ॥३॥
कराल तें करा । हातें आपुल्या दातारा ॥१॥
बिळयाचीं आह्मी बाळें । असों निर्भर या सळे ॥ध्रु.॥
आतां कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥२॥
तुका ह्मणे पंढरीराया । थापटितों ठोक बाह्या ॥३॥
डोळां भरिलें रूप । चित्ता पायांपें संकल्प ॥१॥
अवघी घातली वांटणी । प्रेम राहिलें कीर्तनी ॥ध्रु.॥
वाचा केली माप । रासीं हरिनाम अमुप ॥२॥
भरूनियां भाग । तुका बैसला पांडुरंग ॥३॥
आतां आहे नाहीं । न कळे आळी करा कांहीं ॥१॥
देसी पुरवुनी इच्छा । आतां पंढरीनिवासा ॥ध्रु.॥
नेणे भाग सीण । दुजें कोणी तुह्मांविण ॥२॥
आतां नव्हे दुरी । तुका पायीं मिठी मारी ॥३॥
संकल्पासी अधिष्ठान । नारायण गोमटें ॥१॥
अवघियांचें पुरे कोड । फिडे जड देहत्व ॥ध्रु.॥
उभय लोकीं उत्तम कीर्ति । देव चित्तीं राहिलिया ॥२॥
तुका ह्मणे जीव धाय । नये हाय जवळी ॥३॥
भाग्यवंता ऐशी जोडी । परवडी संतांची ॥१॥
जनाविरहित हा लाभ । टांचें नभ सांटवणें ॥२॥
तुका ह्मणे विष्णुदासां । नाहीं आशा दुसरी ॥३॥
जरी आलें राज्य मोळविक्या हातां । तरी तो मागुता व्यवसायी ॥१॥
तृष्णेचीं मंजुरें नेणती विसांवा । वाढें हांव हांवां काम कामीं ॥ध्रु.॥
वैभवाचीं सुखें नातळतां अंगा । चिंता करी भोगा विघ्न जाळी ॥२॥
तुका ह्मणे वाहे मरणाचें भय । रक्षणउपाय करूनि असे ॥३॥
कोण होईल आतां संसारपांगिलें । आहे उगवलें सहजें चि ॥१॥
केला तो चालवीं आपुला प्रपंच । काय कोणां वेच आदा घे दे ॥ध्रु.॥
सहजें चि घडे आतां मोऑयाविण । येथें काय सीण आणि लाभ ॥२॥
तुका ह्मणे जालों सहज देखणा । ज्याच्या तेणें खुणा दाखविल्या ॥३॥
आह्मां शरणागतां । एवढी काय करणें चिंता ॥१॥
परि हे कौतुकाचे खेळ । अवघे पाहातों सकळ ॥ध्रु.॥
अभयदानवृंदें। आह्मां कैंचीं द्वंदें ॥२॥
तुका ह्मणे आह्मी । हरिजन साधनाचे स्वामी ॥३॥
देवाचिये चाडे प्रमाण उचित । नये वांटूं चित्त निषेधासीं ॥१॥
नये राहों उभें कसमळापाशीं । भुंकतील तैसीं सांडावीं तीं ॥२॥
तुका ह्मणे क्षमा सुखाची हे रासी । सांडूनि कां ऐसी दुःखी व्हावें ॥३॥
खळा सदा क्षुद्रीं दृष्टी । करी कष्टी सज्जना ॥१॥
करितां आपुलाले परी । धणीवरी व्यापार ॥ध्रु.॥
दया संतां भांडवल। वेची बोल उपकार ॥२॥
तुका ह्मणे आपुलालें । उसंतिलें ज्यांणीं तें ॥३॥
जग ऐसें बहुनांवें । बहुनावें भावना ॥१॥
पाहों बोलों बहु नये । सत्य काय सांभाळा ॥ध्रु.॥
कारियासी जें कारण। तें जतन करावें ॥२॥
तुका ह्मणे संतजनीं । हें चि मनीं धरावें ॥३॥
निघालें तें अगीहूनि । आतां झणी आतळे ॥१॥
पळवा परपरतें दुरी । आतां हरी येथूनि ॥ध्रु.॥
धरिलें तैसें श्रुत करा हो । येथें आहो प्रपंचीं ॥२॥
अबोल्यानें ठेला तुका । भेउनि लोकां निराळा ॥३॥
आतां दुसरें नाहीं वनीं । निरांजनी पडिलों ॥१॥
तुमची च पाहें वास । अवघी आस निरसली ॥ध्रु.॥
मागिलांचा मोडला माग । घडला त्याग अरुची ॥२॥
तुका ह्मणे करुणाकरा । तूं सोयरा जीवींचा ॥३॥
धरूनियां सोई परतलें मन । अनुलक्षीं चरण करूनियां ॥१॥
येइप पांडुरंगे नेइप सांभाळूनि । करुणावचनीं आळवितों ॥ध्रु.॥
बुद्धि जाली साह्य परि नाहीं बळ । अवलोकितों जळ वाहे नेत्रीं ॥२॥
न चलती पाय गिळत जाली काया । ह्मणऊनि दया येऊं द्यावी ॥३॥
दिशच्या करितों वारियासीं मात । जोडुनियां हात वास पाहें ॥४॥
तुका ह्मणे वेग करावा सत्वर । पावावया तीर भवनदीचें ॥५॥
कौलें भरियेली पेंठ । निग्रहाचे खोटे तंट ॥१॥
ऐसें माता जाणे वर्म । बाळ वाढवितां धर्म ॥ध्रु.॥
कामवितां लोहो कसे। तांतडीनें काम नासे ॥२॥
तुका ह्मणे खडे । देतां अक्षरें तें जोडे ॥३॥
चालिलें न वाटे । गाऊनियां जातां वाटे ॥१॥
बरवा वैष्णवांचा संग । येतो सामोरा श्रीरंग ॥ध्रु.॥
नाहीं भय आड । कांहीं विषमांचें जड ॥२॥
तुका ह्मणे भक्ति । सुखरूप आदीं अंतीं ॥३॥
करितां विचार तो हा दृढ संसार । ब्रह्मांदिकां पार नुलंघवे सामथ्यॉ ॥१॥
शरण शरण नारायणा मज अंगीकारीं दीना। आलें तें वचनांपासीं माझ्या सामर्थ्य ॥ध्रु.॥
पाठीवरी मोळी तो चि कळवा पायीं तळीं । सांपडला जाळीं मत्स्य जाला तो न्याय ॥२॥
आतां करीन तांतडी लाभाची ते याच जोडी । तुका ह्मणे ओढी पायां सोई मनाची ॥३॥
बहुतां जातीचा केला अंगीकार । बहुत ही फार सवाौत्तमें ॥१॥
सरला चि नाहीं कोणांचिये वेचें । अक्षोभ ठायींचें ठायीं आहे ॥ध्रु.॥
लागत चि नाहीं घेतां अंतपार । वसवी अंतर अणुचें ही ॥२॥
तुका ह्मणे केला होय टाकीऐसा । पुरवावी इच्छा धरिली ते ॥३॥
पोट धालें आतां जीवनीं आवडी । पुरवावे परवडी बहुतांचे ॥१॥
काय आंचवणा तांतडीचें काम । मागील तीं श्रम न पवावीं ॥ध्रु.॥
वाढितिया पोटीं बहु असे वाव । सांभाळितां ठाव काय वांचे ॥२॥
दाविल्यावांचूनि नाहीं कळों येत । तेथें ही दुश्चित एकपणें ॥३॥
नावेचा भार तो उदकाचे शिरीं । काय हळू भारी तये ठायीं ॥४॥
तुका ह्मणे गीतीं गाऊनि गोविंद । करूं ब्रह्मानंद एकसरें ॥५॥
एका हातीं टाळ एका हातीं चिपिळया । घालिती हुंमरी एक वाताती टाळिया ॥१॥
मातले वैष्णव नटती नाना छंदें। नाहीं चाड मोक्षपदें भजनीं आवडी ॥ध्रु.॥
हाका अरोळिया गीतवादें सुखसोहळे । जाय तें न कळे केव्हां रजनी दिवस ॥२॥
तीथाअ नाहीं चाड न लगे जावें वनांतरा । तुका ह्मणे हरिहरात्मक चि पृथुवी ॥३॥
देव सखा आतां केलें नव्हे काई । येणें सकळई सोइरीं च ॥१॥
भाग्यवंत जालों गोतें सपुरतीं । आतां पुण्या नीती पार नाहीं ॥ध्रु.॥
पाहातां दिसती भरलिया दिशा । ठसावला ठसा लोकत्रयीं ॥२॥
अविनाश जोडी आह्मां भाग्यवंतां । जाली होती सत्ता संचिताची ॥३॥
पायांवरी डोई ठेवाया अरोथा । जाली द्यावी सत्ता क्षेम ऐसी ॥४॥
तुका ह्मणे जीव पावला विसावा । ह्मणवितां देवा तुमचींसीं ॥५॥
कोण आतां किळकाळा । येऊं बळा देईल ॥१॥
सत्ता झाली त्रिभुवनीं । चक्रपाणी कोंवसा ॥ध्रु.॥
लडिवाळांचा भार वाहे । उभा आहे कुढावया ॥२॥
तुका ह्मणे घटिका दिस । निमिश ही न विसंभे ॥३॥
आह्मां आवडे नाम घेतां । तो ही पिता संतोषे ॥१॥
उभयतां एकचित्त । तरी प्रीत वाढली ॥ध्रु.॥
आह्मी शोभों निकटवासें। अनारिसें न दिसे ॥२॥
तुका ह्मणे पांडुरंगे । अवघीं अंगें निवालीं ॥३॥
देह तंव असे भोगाचे अधीन । याचें सुख सीण क्षीणभंगर ॥१॥
अविनाश जोडी देवापायीं भाव । कल्याणाचा ठाव सकळही ॥ध्रु.॥
क्षणभंगुर हा तेथील पसारा । आलिया हाकारा अवघें राहे ॥२॥
तुका ह्मणे येथें सकळ विश्रांति । आठवावा चित्तीं नारायण ॥३॥
आतां आवश्यक करणें समाधान । पाहिलें निर्वाण न पाहिजे ॥१॥
केलें तरीं आतां शुशोभें करावें । दिसतें बरवें संतांमधीं ॥ध्रु.॥
नाहीं भक्तराजीं ठेविला उधार । नामाचा आकार त्यांचियानें ॥२॥
तुका ह्मणे माझ्या वडिलांचें ठेवणें । गोप्य नारायणें न करावें ॥३॥
काया वाचा मनें श्रीमुखाची वास । आणीक उदास विचारासी ॥१॥
काय आतां मोक्ष करावा जी देवा । तुमचिया गोवा दर्शनासी ॥ध्रु.॥
केलिया नेमासी उभें ठाडें व्हावें । नेमलें तें भावें पालटेना ॥१२॥
तुका ह्मणे जों जों कराल उशीर । तों तों मज फार रडवील ॥३॥
पुढीलांचे सोयी माझ्या मना चाली । मताची आणिली नाहीं बुद्धी ॥१॥
केलासी तो उभा आजवरी संतीं । धरविलें हातीं कट देवा ॥ध्रु.॥
आहे तें ची मागों नाहीं खोटा चाळा । नये येऊं बळा लेंकराशीं ॥२॥
तुका ह्मणे माझा साक्षीचा वेव्हार । कृपण जी थोर परी तुह्मी ॥३॥
बहुत करूनि चाळवाचाळवी । किती तुह्मी गोवी करीतसां ॥१॥
लागटपणें मी आलों येथवरी । चाड ते दुसरी न धरूनि ॥ध्रु.॥
दुजियाचा तंव तुह्मांसी कांटाळा । राहासी निराळा एकाएकीं ॥२॥
तुका ह्मणे आतां यावरी गोविंदा । मजशीं विनोदा येऊं नये ॥३॥
तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा । संत ते अधमा माणसाऐसे ॥१॥
वांजेच्या मैथुनापरी गेलें वांयां । बांडेल्याचें जायां जालें पीक ॥ध्रु.॥
अभाविक सदा सुतकी चांडाळ । सदा तळमळ चुके चि ना ॥२॥
तुका ह्मणे वरदळी ज्याची दृष्टी । देहबुद्धि कष्टी सदा दुःखी ॥३॥
नव्हे मतोऑयाचा वाण । नीच नवा नारायण ॥१॥
सुख उपजे श्रवणें । खरें टांकसाळी नाणें ॥ध्रु.॥
लाभ हातोहातीं । अधिक पुढतोंपुढती ॥२॥
तुका ह्मणे नेणों किती । पुरोनि उरलें पुढती ॥३॥
घातला दुकान । देती आलियासी दान ॥१॥
संत उदार उदार । भरलें अनंत भांडार ॥ध्रु.॥
मागत्याची पुरे । धणी आणिकांसी उरे ॥२॥
तुका ह्मणे पोतें । देवें भरिलें नव्हे रितें ॥३॥
नरस्तुति आणि कथेचा विकरा । हें नको दातारा घडों देऊं ॥१॥
ऐसिये कृपेचि भाकितों करुणा । आहेसि तूं राणा उदाराचा ॥ध्रु.॥
पराविया नारी आणि परधना । नको देऊं मनावरी येऊं ॥२॥
भूतांचा मत्सर आणि संतनिंदा । हें नको गोविंदा घडों देऊं ॥३॥
देहअभिमान नको देऊं शरीरीं । चढों कांहीं परी एक देऊं ॥४॥
तुका ह्मणे तुझ्या पायांचा विसर । नको वारंवार पडों देऊं ॥५॥
लौकिकापुरती नव्हे माझी सेवा । अनन्य केशवा दास तुझा ॥१॥
ह्मणऊनि करीं पायांसवें आळी । आणीक वेगळी नेणें परी ॥ध्रु.॥
एकविध आह्मी स्वामिसेवेसाटीं । वरी तो चि पोटीं एकभाव ॥२॥
तुका ह्मणे करीं सांगितलें काम । तुह्मां धर्माधर्म ठावे देवा ॥३॥
ज्यांच्या संगें होतों पडिलों भोवनीं । ते केली धोवनी झाडूनियां ॥१॥
आतां एकाएकीं मनासीं विचार । करूं नाहीं भार दुजा याचा ॥ध्रु.॥
प्रसादसेवनें आली उष्टावळी । उचित ते काळीं अवचित ॥२॥
तुका ह्मणे वर्म सांपडलें हातीं । सांडिली ते खंती चिंता देवा ॥३॥
आवडीभोजन प्रकार परवडी । भिन्नाभिन्न गोडी एक रसा ॥१॥
भोगित्या पंगती लाधलों प्रसाद । तिंहीं नाहीं भेद राखियेला ॥ध्रु.॥
पाकसिद्धि स्वहस्तकें विनियोग। आवडीचे भाग सिद्ध केले ॥२॥
तुका ह्मणे आला उिच्छष्ट प्रसाद । तेणें हा आनंद माझ्या जीवा ॥३॥
समर्थाचा ठाव संचलाचि असे । दुर्बळाची आस पुढें करी ॥१॥
पावलें घेईन पदरीं हें दान । एकांतीं भोजन करूं दाऊं ॥ध्रु.॥
न लगे पाहावी उचिताची वेळ । अयाचित काळ साधला तो ॥२॥
तुका ह्मणे पोट धालिया उपरी । गौरवा उत्तरीं पूजूं देवा ॥३॥
आपुल्यांचा करीन मोळा । माझ्या कुळाचारांचा ॥१॥
अवघियांचे वंदिन पाय । ठायाठाय न देखें ॥ध्रु.॥
नेदीं तुटों समाधान । थांबों जन सकळ ॥२॥
तुका ह्मणे झाडा होय । तों हे सोय न संडीं ॥३॥
जन्ममरणांची विसरलों चिंता । तूं माझा अनंता मायबाप ॥१॥
होतील ते डोळां पाहेन प्रकार । भय आणि भार निरसलीं ॥ध्रु.॥
लिगाडाचें मूळ होतीं पंच भूतें । त्यांचें यां पुरतें विभागिलें ॥२॥
तुका ह्मणे जाला प्रपंच पारिखा । जिवासी तूं सखा पांडुरंगा ॥३॥
उदार तूं हरी ऐसी कीर्ति चराचरीं । अनंत हे थोरी गर्जतील पवाडे ॥१॥
तुझे लागों पायीं माझा भाव पुसी जन्ममरणां ठाव। देवाचा तूं देव स्वामी सकळा ब्रह्मांडा ॥ध्रु.॥
मागणें तें तुज मागों जीवभाव तुज सांगों । लागों तरी लागों पायां तुमच्या दातारा ॥२॥
दिसों देसी कीविलवाणें तरी तुज चि हें उणें । तुका ह्मणे जिणें माझें तुज अधीन ॥३॥
पाहा किती आले शरण समान चि केले । नाहीं विचारिले गुण दोष कोणांचे ॥१॥
मज सेवटींसा द्यावा ठाव तयांचिये देवा । नाहीं करीत हेवा कांहीं थोरपणाचा ॥ध्रु.॥
नाहीं पाहिला आचार कुळगोत्रांचा विचार । फेडूं आला भार मग न ह्मणे दगड ॥२॥
तुका ह्मणे सर्वजाणा तुझ्या आल्यावरि मना । केला तो उगाणा घडल्या दोषांच्या ॥३॥
आतां चुकलें बंधन गेलें विसरोनि दान । आपुले ते वाण सावकाश विकावे ॥१॥
लाभ जोडला अनंत घरीं सांपडलें वित्त । हातोहातीं थीत उरों तळ नल्हाचि ॥ध्रु.॥
होतें गोविलें विसारें माप जालें एकसरें । होतें होरें वारें तों चि लाहो साधिला ॥२॥
कराया जतन तुका ह्मणे निजधन । केला नारायण साह्य नेदी विसंबों ॥३॥
तुझ्या रूपें माझी काया भरों द्यावी पंढरीराया । दर्पणींची छाया एका रूपें भिन्नत्व ॥१॥
सुख पडिलें साटवण सत्ता वेचे शनें शनें । अडचणीचे कोन चारी मार्ग उगवले ॥ध्रु.॥
वसो डोऑयांची बाहुली कवळे भिन्न छाया आली । कृष्णांजन चाली नव्हे प्रति माघारी ॥२॥
जीव ठसावला शिवें मना आलें तेथें जावें । फांटा पडिला नांवें तुका ह्मणे खंडलें ॥३॥
सोसें सोसें मारूं हाका । होइल चुका ह्मणऊनि ॥१॥
मागें पुढें क्षणभरी । नव्हे दुरी अंतर ॥ध्रु.॥
नाम मुखीं बैसला चाळा। वेळोवेळां पडताळीं ॥२॥
तुका ह्मणे सुखी केलें । या विठ्ठलें बहुतांसी ॥३॥
धरूनियां चाली हांवा । येइन गांवां धांवत ॥१॥
पाठविसी मूळ तरी । लवकरी विठ्ठले ॥ध्रु.॥
नाचेन त्या प्रेमसुखें । कीर्ती मुखें गाईन ॥२॥
तुका ह्मणे संतमेळीं । पायधुळी वंदीन ॥३॥
मायबापाचिये भेटी । अवघ्या तुटी संकोचा ॥१॥
भोगिलें तें आहे सुख । खातां मुख मोकळें ॥ध्रु.॥
उत्तम तें बाळासाटीं । लावी ओठीं माउली ॥२॥
तुका ह्मणे जाली धणी । आनंद मनीं न समाये ॥३॥
उदासीनाचा देह ब्रह्मरूप । नाहीं पुण्य पाप लागत त्या ॥१॥
अनुताप अंगीं अिग्नचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझों येत ॥ध्रु.॥
दोष ऐशा नावें देहाचा आदर । विटलें अंतर अहंभावें ॥२॥
तुका ह्मणे जाय नासोनियां खंती । तंव चि हे चित्तीं बद्धता ते ॥३॥
बंधनाचा तोडूं फांसा । देऊं आशा टाकोनि ॥१॥
नाहीं तें च घेतां शिरीं । होइल दुरी निजपंथ ॥ध्रु.॥
नाथिलें चि माझें तुझें । कोण वोझें वागवी ॥२॥
तुका ह्मणे अंतराय । देवीं काय जिणें तें ॥३॥
तें च किती वारंवार । बोलों फार बोलिलें ॥१॥
आतां माझें दंडवत । तुमच्या संत चरणांसी ॥ध्रु.॥
आवडी ते नीच नवी । जाली जीवीं वसती ॥२॥
तुका ह्मणे बरवें जालें । घरा आलें बंदरीचें ॥३॥
उपासा सेवटीं अन्नासवें भेटी । तैसी माझी मिठी पडो पायीं ॥१॥
पुरवीं वासना साच सर्वजाणा । आह्मां नारायणा अंकिताची ॥ध्रु.॥
बहुदिसां पुत्रामातेमध्यें भेटीं । तैसा दाटो पोटीं प्रीतिउभोड ॥२॥
तुका ह्मणे धन कृपणा सोयरें । यापरि दुसरें नहो आतां ॥३॥
रणीं निघतां शूर न पाहे माघारें । ऐशा मज धीरें राख आतां ॥१॥
संसारा हातीं अंतरलों दुरी । आतां कृपा करीं नारायणा ॥ध्रु.॥
वागवितों तुझिया नामाचें हत्यार । हा चि बडिवार मिरवितों ॥२॥
तुका ह्मणे मज फिरतां माघारें । तेथें उणें पुरें तुह्मी जाणां ॥३॥
सकळ पूजा स्तुति । करावी ते व्होवें याती ॥१॥
ह्मणऊनि वारा जन । संतपूजा नारायण ॥ध्रु.॥
सेवावें तें वरी । दावी उमटूनि ढेंकरीं ॥२॥
तुका ह्मणे सुरा । दुधा ह्मणतां केवीं बरा ॥३॥
धीर नव्हे मनें । काय तयापाशीं उणें ॥१॥
भार घातलियावरी । दासां नुपेक्षील हरी ॥ध्रु.॥
याऐसी आटी । द्यावी द्रव्याचिये साटी ॥२॥
तुका ह्मणे पोटें । देवा बहु केलें खोटें ॥३॥
द्रव्याचिया कोटी । नये गांडीची लंगोटी ॥१॥
अंती बोळवणेसाटीं । पांडुरंग धरा कंठीं ॥ध्रु.॥
लोभाची लोभिकें । यांचें सन्निधान फिकें ॥२॥
तुका ह्मणे हितें । जग नव्हो पडो रितें ॥३॥
कोणापाशीं आतां सांगों मी बोभाट । कधीं खटखट सरेल हे ॥१॥
कोणां आराणूक होईल कोणे काळीं । आपुलालीं जाळीं उगवूनि ॥ध्रु.॥
माझा येणें दुःखें फुटतसे प्राण । न कळतां जन सुखी असे ॥२॥
भोगा आधीं मनें मानिलासे त्रास । पाहें लपायास ठाव कोठें ॥३॥
तुका ह्मणे देतों देवाचें गाहाणें । माझें रिण येणें सोसियेलें ॥४॥
राहिलों निराळा । पाहों कवतुक डोळां ॥१॥
करूं जगाचा विनोद । डोळां पाहोनियां छंद ॥ध्रु.॥
भुललिया संसारें । आलें डोऑयासी माजिरें ॥२॥
तुका ह्मणे माथा । कोणी नुचली सर्वथा ॥३॥
आह्मां एकविधा पुण्य सर्वकाळ । चरणसकळ स्वामीचे ते ॥१॥
चित्ताचे संकल्प राहिलें चळण । आज्ञा ते प्रमाण करुनी असों ॥ध्रु.॥
दुजियापासून परतलें मन । केलें द्यावें दान होईल तें ॥२॥
तुका ह्मणे आतां पुरला नवस । एकाविण ओस सकळ ही ॥३॥
राहाणें तें पायांपाशी । आणिकां रसीं विटोनि ॥१॥
ऐसा धीर देइप मना । नारायणा विनवितों ॥ध्रु.॥
अंतरीं तों तुझा वास । आणिकां नास कारण ॥२॥
तुका ह्मणे शेवटींचें । वाटे साचें राखावें ॥३॥
चंदन तो चंदनपणें । सहज गुणसंपन्न ॥१॥
वेधलिया धन्य जाती । भाग्यें होती सन्मुख ॥ध्रु.॥
परिसा अंगीं परिसपण । बाणोनि तें राहिलें ॥२॥
तुका ह्मणे कैंची खंती । सुजाती ते ठाकणी ॥३॥
लय लक्षी मन न राहे निश्चळ । मुख्य तेथें बळ आसनाचें ॥१॥
हें तों असाध्य जी सर्वत्र या जना । भलें नारायणां आळवितां ॥ध्रु.॥
कामनेचा त्याग वैराग्य या नांव । कुटुंब ते सर्वविषयजात ॥२॥
कर्म उसंतावें चालत पाउलीं । होय जों राहिली देहबुद्धि ॥३॥
भक्ति तें नमावें जीवजंतुभूत । शांतवूनि ऊत कामक्रोध ॥४॥
तुका ह्मणे साध्य साधन अवघडें । देतां हें सांकडें देह बळी ॥५॥
ऐसें कां हो न करा कांहीं । पुढें नाहीं नास ज्या ॥१॥
विश्वंभरा शरणागत । भूतजात वंदूनि ॥ध्रु.॥
श्रुतीचें कां नेघा फळ। सारमूळ जाणोनि ॥२॥
तुका ह्मणे पुढें कांहीं । वाट नाहीं यावरी ॥३॥
जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लिक्षयेला ठाव श्मशानींचा ॥१॥
रडती रात्रदिवस कामक्रोधमाया । ह्मणती हायहाया यमधर्म ॥ध्रु.॥
वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि भरभरां जीवित्वेसी ॥२॥
फिरविला घट फोडिला चरणीं । महावाक्य जनीं बोंब जाली ॥३॥
दिली तिळांजुळी कुळनामरूपांसी । शरीर ज्याचें त्यासी समर्पिलें ॥४॥
तुका ह्मणे रक्षा जाली आपींआप । उजळला दीप गुरुकृपा ॥५॥
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥१॥
आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला ॥ध्रु.॥
एकदेशीं होतों अहंकारें आथिला । त्याच्या त्यागें जाला सुकाळ हा ॥२॥
फिटलें सुतक जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी जालों ॥३॥
नारायणें दिला वस्तीस ठाव । ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥४॥
तुका ह्मणे दिलें उमटूनि जगीं । घेतलें तें अंगीं लावूनियां ॥५॥
बोळविला देह आपुलेनि हातें । हुताशिलीं भूतें ब्रह्माग्नीसीं ॥१॥
एकवेळे जालें सकळ कारण । आतां नारायण नारायण ॥ध्रु.॥
अमृतसंजीवनी निवविली खाई । अंगें तये ठायीं हारपलीं ॥२॥
एकादशीविध जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा ।3॥
अवघीं कर्में जालीं घटस्पोटापाशीं । संबंध एकेसी उरला नामीं ॥४॥
तुका ह्मणे आतां आनंदीं आनंदु । गोविंदीं गोविंदु विस्तारला ॥५॥
पिंडदान पिंडें ठेविलें करून । तिळीं तिळवण मूळत्रयीं ॥१॥
सारिले संकल्प एका चि वचनें । ब्रह्मीं ब्रह्मार्पण सेवटींच्या ॥ध्रु.॥
सव्य अपसव्य बुडालें हें कर्म । एका एक वर्म एकोविष्णु ॥२॥
पित्यापुत्रत्वाचें जालें अवसान । जनीं जनार्दन अभेदेंसी ॥३॥
आहे तैसी पूजा पावली सकळ । सहज तो काळ साधियेला ॥४॥
तुका ह्मणे केला अवघियांचा उद्धार । आतां नमस्कार सेवटींचा ॥५॥
सरलें आतां नाहीं । न ह्मणे वेळकाळ कांहीं ॥१॥
विठ्ठल कृपाळु माउली । सदा प्रेमें पान्हायेली ॥ध्रु.॥
सीण न विचारी भाग । नव्हे निष्ठ नाहीं राग ॥२॥
भेदाभेद नाहीं । तुका ह्मणे तिच्याठायीं ॥३॥
तुज पाहावें हे धरितों वासना । परि आचरणा नाहीं ठाव ॥१॥
करिसी कैवार आपुलिया सत्ता । तरि च देखता होइन पाय ॥ध्रु.॥
बाहिरल्या वेषें उत्तम दंडलें । भीतरी मुंडलें नाहीं तैसें ॥२॥
तुका ह्मणे वांयां गेलों च मी आहे । जरि तुह्मी साहे न व्हा देवा ॥३॥
दुष्ट आचरण ग्वाही माझें मन । मज ठावे गुण दोष माझे ॥१॥
आतां तुह्मी सर्वजाण पांडुरंगा । पाहिजे प्रसंगाऐसें केलें ॥ध्रु.॥
व्याह्याजांवायांचे पंगती दुर्बळ । वंचिजे तो काळ नव्हे कांहीं ॥२॥
तुका ह्मणे आतां जालों शरणागत । पुढिल उचित तुह्मां हातीं ॥३॥
आतां भय नाहीं ऐसें वाटे जीवा । घडलिया सेवा समर्थाची ॥१॥
आतां माझ्या मनें धरावा निर्धार । चिंतनीं अंतर न पडावें ॥ध्रु.॥
येथें नाहीं जाली कोणांची निरास । आल्या याचकास कृपेविशीं ॥२॥
तुका ह्मणे येथें नाहीं दुजी परी । राया रंका सरी देवा पायीं ॥३॥
वैष्णवें चोरटीं । आलीं घरासी करंटीं ॥१॥
आजि आपुलें जतन । करा भांडें पांघुरण ॥ध्रु.॥
ज्याचे घरीं खावें ।त्याचें सर्वस्वें ही न्यावें ॥२॥
तुका ह्मणे माग । नाहीं लागों देत लाग ॥३॥
ऐकतों दाट । आले एकांचें बोभाट ॥१॥
नका विश्वासों यावरी । चोर देहाचे खाणोरी ॥ध्रु.॥
हे चि यांची जोडी। सदा बोडकीं उघडीं ॥२॥
तुका ह्मणे न्यावें । ज्याचे त्यासी नाहीं ठावें ॥३॥
आणिकांची सेवा करावी शरीरें । तीं येथें उत्तरे कोरडीं च ॥१॥
ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा । नेघे येरझारा सेवकाच्या ॥ध्रु.॥
आणिकांचे भेटी आडकाठी पडे । येथें तें न घडे वचन ही ॥२॥
आणिकांचे देणें काळीं पोट भरे । येथील न सरे कल्पांतीं ही ॥३॥
आणिकें दंडिती चुकलिया सेवा । येथें सोस हेवा नाहीं दोन्ही ॥४॥
तुका ह्मणे करी आपण्यासारिखें । उद्धरी पारिखें उंच निंच ॥५॥
दुर्जनाची जाती । त्याचे तोंडीं पडे माती ॥१॥
त्याची बुद्धि त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ॥ध्रु.॥
पाहें संतांकडे । दोषदृष्टी सांडी भडे ॥२॥
उंच निंच नाहीं । तुका ह्मणे खळा कांहीं ॥३॥
न करीं उदास । माझी पुरवावी आस ॥१॥
ऐका ऐका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥ध्रु.॥
मायबाप बंधुजन। तूं चि सोयरा सज्जन ॥२॥
तुका ह्मणे तुजविरहित । माझें कोण करी हित ॥३॥
जीवन उपाय । वैदेवाणी तुझे पाय ॥१॥
ते मी नाठवीं घडिघडी । ह्मणोनियां चरफडीं ॥ध्रु.॥
तुटे भवरोग । जेथें सर्व सुखें भोग ॥२॥
तुका ह्मणे विटे । धरियेले जें गोमटें ॥३॥
ऐका हें वचन माझें संतजन । विनवितों जोडुन कर तुह्मां ॥१॥
तर्क करूनियां आपुल्या भावना । बोलतिया जना कोण वारी ॥ध्रु.॥
आमुच्या जीवींचा तो चि जाणे भावो । रकुमाईचा नाहो पांडुरंग ॥२॥
चित्त माझें त्याचे गुंतलेंसे पायीं । ह्मणऊनि कांहीं नावडे त्या ॥३॥
तुका ह्मणे मज न साहे मीनती । खेद होय चित्तीं भंग मना ॥४॥
ऐसा कोणी नाहीं हें जया नावडे । कन्या पुत्र घोडे दारा धन ॥१॥
निंब घेतें रोगी कवणिया सुखें । हरावया दुःखें व्याधि पीडा ॥ध्रु.॥
काय पळे सुखें चोरा लागे पाठी । न घलावी काठी आड तया ॥२॥
जयाचें कारण तो चि जाणे करूं । नये कोणां वारूं आणिकासी ॥३॥
तुका ह्मणे तरी सांपडे निधान । द्यावा ओंवाळून जीव बळी ॥४॥
काय मी अन्यायी तें घाला पालवीं । आणीक वाट दावीं चालावया ॥१॥
माग पाहोनियां जातों ते च सोयी । न वजावें कायी कोण सांगा ॥ध्रु.॥
धोपट मारग लागलासे गाढा । मज काय पीडा करा तुह्मी ॥२॥
वारितां ही भय कोण धरी धाक । परी तुह्मां एक सांगतों मी ॥३॥
तुका ह्मणे शूर दोहीं पक्षीं भला । मरतां मुक्त जाला मान पावे ॥४॥
नव्हती माझे बोल जाणां हा निर्धार । मी आहें मजूर विठोबाचा ॥१॥
निर्धारा वचन सोडविलें माझ्या । कृपाळुवें लज्जा राखियेली ॥ध्रु.॥
निर्भर मानसीं जालों आनंदाचा । गोडावली वाचा नामघोषें ॥२॥
आतां भय माझें नासलें संसारीं । जालोंसें यावरी गगनाचा ॥३॥
तुका ह्मणे हा तों संतांचा प्रसाद । लाधलों आनंद प्रेमसुख ॥४॥
जरा कर्णमूळीं सांगों आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली ॥१॥
आतां माझ्या मना होइप सावधान । वोंपुण्याची जाण कार्यसिद्धी ॥ध्रु.॥
शेवटील घडी बुडतां न लगे वेळ । साधावा तो काळ जवळी आला ॥२॥
तुका ह्मणे चिंतीं कुळींची देवता । वारावा भोंवता शब्द मिथ्या ॥३॥
मागील ते आटी येणें घडे सांग । सुतवेल अंग एका सूत्रें ॥१॥
पहिपाहुणेर ते सोहऑयापुरते । तेथुनि आरते उपचार ते ॥ध्रु.॥
आवश्यक तेथें आगळा आदर । चाली थोडें फार संपादतें ॥२॥
तुका ह्मणे ॠण फिटे एके घडी । अलभ्य ते जोडी हातां आल्या ॥३॥
साधावा तो देव सर्वस्वाचेसाटीं । प्रारब्ध तुटी क्रियमाण ॥१॥
मग कासयानें पुन्हा संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती ॥ध्रु.॥
जिणें दिल्हें त्यासी द्यावा पिंडदान । उत्तीर्ण चरण धरूनि व्हावें ॥२॥
तुका ह्मणे निज भोगईल निजता । नाहीं होइल सत्ता दुजियाची ॥३॥
जळों अगी पडो खान । नारायण भोक्ता ॥१॥
ऐसी ज्याची वदे वाणी । नारायणीं ते पावे ॥ध्रु.॥
भोजनकाळीं करितां धंदा । ह्मणा गोविंदा पावलें ॥२॥
तुका ह्मणे न लगे मोल। देवा बोल आवडती ॥३॥
संतांसी क्षोभवी कोण्या ही प्रकारें । त्याचें नव्हें बरें उभयलोकीं ॥१॥
देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वी ही थार नेदी तया ॥ध्रु.॥
संतांपाशीं ज्याचा नुरे चि विश्वास । त्याचे जाले दोष बिळवंत ॥२॥
तुका ह्मणे क्षीर वासराच्या अंगें । किंवा धांवे लागें विषमें मारूं ॥३॥
उदकीं कालवी शेण मलमूत्र । तो होय पवित्र कासयानें ॥१॥
उद्धारासी ठाव नाहीं भाग्यहीना । विन्मुख चरणां संतांचिया ॥ध्रु.॥
दुखवी तो बुडे सांगडीचा तापा । अतित्याई पापाची च मूर्ति ॥२॥
तुका ह्मणे जेव्हां फिरतें कपाळ । तरी अमंगळ योग होतो ॥३॥
शोकवावा म्यां देहे । ऐसें नेणों पोटीं आहे ॥१॥
तरी च नेदा जी उत्तर । दुःखी राखिलें अंतर ॥ध्रु.॥
जावें वनांतरा। येणें उद्देशें दातारा ॥२॥
तुका ह्मणे गिरी । मज सेववावी दरी ॥३॥
येइल तुझ्या नामा । जाल ह्मणों पुरुषोत्तमा ॥१॥
धीर राहिलों धरूनि । त्रास उपजला मनीं ॥ध्रु.॥
जगा कथा नांव। निराशेनें नुपजे भाव ॥२॥
तुह्मी साक्षी कीं गा । तुका ह्मणे पांडुरंगा ॥३॥
नेणें जप तप अनुष्ठान याग । काळें तंव लाग घेतलासे ॥१॥
रिघालो या भेणें देवाचे पाठीसी । लागे त्याचें त्यासी सांभाळणें ॥ध्रु.॥
मापें माप सळे चालिली चढती । जाली मग राती काय चाले ॥२॥
तुका ह्मणे चोरा हातीं जे वांचलें । लाभावरी आलें वारिलेशु ॥३॥
कळों आलें ऐसें आतां । नाहीं सत्ता तुह्मांसी ॥१॥
तरी वीर्य नाहीं नामा । जातो प्रेमा खंडत ॥ध्रु.॥
आड ऐसें येतें पाप। वाढे ताप आगळा ॥२॥
तुका ह्मणे गुण जाला । हा विठ्ठला हीनशक्ति ॥३॥
लागों दिलें अंगा । ऐसें कां गा सन्निध ॥१॥
कोण्या पापें उदो केला । तो देखिला प्रळय ॥ध्रु.॥
न देखवे पिडला सर्प। दया दर्प विषाचा ॥२॥
तुका ह्मणे भलें । मज तो न वजे साहिलें ॥३॥
धांवा शीघ्रवत । किंवा घ्यावें दंडवत ॥१॥
तुमचा जातो बडिवार । आह्मीं होतों हीनवर ॥ध्रु.॥
न धरावा धीर । धांवा नका चालों िस्थर ॥२॥
तुका ह्मणे वाणी । माझी लाजली जी गुणीं ॥३॥
सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥१॥
मनाचिये मुळीं रहावें बैसोन । आक्रशावे गुण पायांपाशीं ॥ध्रु.॥
भेटीचे तांतडी करीतसे लाहो । ओंवाळावा देहो ऐसें वाटे ॥४॥
तुका ह्मणे माझें करावें कारण । आपुलें जतन ब्रीद कशाला ॥३॥
उद्वेगासी बहु फाकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें ॥१॥
आतां कोण यासी करणें विचार । तो देखा साचार पांडुरंगा ॥ध्रु
मज तो अत्यंत दर्शनाची आस । जाला तरि हो नाश जीवित्वाचा ॥२॥
तुका ह्मणे आहे वचनाची उरी । करितों तोंवरि विज्ञापना ॥३॥
दुःखाची संगति । तिच्याठायीं कोण प्रीति ॥१॥
अवघें असो हें निराळें । करूं सोइरें सावळें ॥ध्रु.॥
क्षणभंगुर ते ठाव। करूनि सांडावे चि वाव ॥२॥
तुका ह्मणे बरा । ठाव पावलों हा थारा ॥३॥
मेला तरी जावो सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नये ॥१॥
रजस्वला करी वेलासी आघात । अंतरें तों हित दुरी बरें ॥ध्रु.॥
उगी च कां आलीं नासवावीं फळें । विटाळ विटाळें कालवूनि ॥२॥
तुका ह्मणे लोणी घालोनि शेणांत । उपेगाची मात काय असे ॥३॥
वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ॥१॥
विश्वासिया घडे लाभ । देइल तरी पद्मनाभ ॥ध्रु.॥
भाव शुद्ध तरी । सांगितलें काम करी ॥२॥
तुका ह्मणे भोळा देव । परि हा नागवी संदेह ॥३॥
संचितावांचून । पंथ न चलवे कारण ॥१॥
कोरडी ते अवघी आटी । वांयां जाय लाळ घोंटीं ॥ध्रु.॥
धन वित्त जोडे । देव ऐसें तों न घडे ॥२॥
तुका ह्मणे आड । स्वहितासी बहु नाड ॥३॥
अतित्याई बुडे गंगे । पाप लागे त्याचें त्या ॥१॥
हें तों आपुलिया गुणें । असे जेणें योजिलें ॥ध्रु.॥
अवचटें अिग्न जाळी । न सांभाळी दुःख पावे ॥२॥
जैसें तैंसें दावी आरसा । नकट्या कैसा पालटे ॥३॥
हेंदयाचें भरितां कान । हलवी मान भोंक रितें ॥१॥
नाहीं मी येथें सांगों स्पष्ट । भावें नष्ट घेत नाहीं ॥ध्रु.॥
अवगुणी वाटलें चित्त । तया हित आतळे ना ॥२॥
तुका ह्मणे फजितखोरा। ह्मणतां बरा उगा रहा ॥३॥
नाहीं सरो येत जोडिल्या वचनीं । कवित्वाची वाणी कुशळता ॥१॥
सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येतों ॥ध्रु.॥
काय आगीपाशीं शृंगारिलें चाले । पोटींचें उकले कसापाशीं ॥२॥
तुका ह्मणे येथे करावा उकल । लागे चि ना बोल वाढवूनि ॥३॥
लचाळाच्या कामा नाहीं ताळावाळा । न कळे ओंगळा उपदेश ॥१॥
वचनचर्येची न कळे चांचणी । ऐसी संघष्टनी अमंगळ ॥ध्रु.॥
समय न कळे वेडगळ बुद्धि । विजाती ते शुद्धि चांच चाट ॥२॥
तुका ह्मणे याचा धिक्कार चि बरा । बहुमति खराहूनि हीन ॥३॥
एक धरिला चित्तीं । आह्मीं रखुमाईचा पती ॥१॥
तेणें जालें अवघें काम । निवारला भवश्रम ॥ध्रु.॥
परद्रव्य परनारी । जालीं विषाचिये परी ॥२॥
तुका ह्मणे फार । नाहीं लागत वेव्हार ॥३॥
भेणें पळे डोळसा । न कळे मृत्यु तो सरिसा ॥१॥
कैसी जाली दिशाभुली । न वजातिये वाटे चाली ॥ध्रु.॥
संसाराची खंती । मावळल्या तरी शक्ति ॥२॥
तुका ह्मणे हीणा । बुद्धि चुकली नारायणा ॥३॥
अभिमानाचें तोंड काळें । दावी बळें अंधार ॥१॥
लाभ न्यावा हातोहातीं । तोंडी माती पाडोनि ॥ध्रु.॥
लागलीसे पाठी लाज । जालें काज नासाया ॥२॥
तुका ह्मणे कुश्चळ मनीं । विटंबनीं पडिलीं तीं ॥३॥
Text: तुकाराम गाथा on Marathi Wikisource, which does not name the printed edition it was transcribed from. The verses are public domain; the transcription is by Wikisource contributors, CC BY-SA 4.0. Its systematic legacy-font errors are repaired by rule (see the reading page for details); some remain — इप printed for ई in about 220 abhangas, and a few vowel signs on the wrong letter. Numbering follows Wikisource; printed editions differ. Spotted a wrong line? Write to us with the number.