मनित्यManitya
तुकाराम गाथा · page 11 of 16

अभंग ३००१–३३००

Abhangas 3001–3300 (the Gāthā is numbered 1–4,583), in the original Marathi, with the Gāthā's own section headings — as transcribed on Marathi Wikisource, whose base edition is not named. The refrain (ध्रु.) is set in a warmer colour. One font error is not yet repaired: where you see इप, read ई (होइप = होई).

↵

कांहीं विपित्त अपत्यां । आतां अमुचिया होतां । काय होईल अनंता । पाहा बोलों कासया ॥१॥

बरें अनायासें जालें। सायासेंविण बोले चाले । काबाड चुकलें । केलें कष्टावेगळें ॥ध्रु.॥

बरा सांपडलासी वोजा । वर्मावरी केशीराजा । बोलायासी तुझा । उजुरचि नाहींसा ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे दगा । बरा दिला होता बागा । झडकरी चलागा । चांग दैवें पावलों ॥३॥

देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ॠण । आहे तें कां नेदिसी अझून ।

अवगलासीं झोंडपणें । परी मी जाण जीवें जिरों नेदीं ॥१॥

कळों येईल रोकडें । उभा करिन संतांपुढें ।

तुझें काय एवढें । भय आपुलें मागतां ॥ध्रु.॥

आजिवरी होतों नेणता । तों तुज फावलें रे अनंता ।

कवडीचा तो आतां । पडों नेदीन फेर ॥२॥

ठेविला ये जीवनीं जीव । ह्मणे तुकयाचा बंधव ।

माझा गळा तुझा पाव । एके ठायीं बांधेन ॥३॥

मागें असताशी कळला । उमस घेऊं नसता दिला।

तेणें चि काळें केला । असता अवघा निवाडा ॥१॥

इतका न लगता उशीर । न धरितों भीडभार ।

सिद्धासी वेव्हार । कासयासी लागला ॥ध्रु.॥

असोनियां माल खरा । किती केल्या येरझारा ।

धरणें ही दिवस तेरा । माझ्या भावें घेतलें ॥२॥

अझुन तरी इतक्यावरी । चुकवीं जनाचार हरी ।

तुकयाबंधु ह्मणे उरी । नाहीं तरी नुरे कांहीं ॥३॥

आतां न राहें क्षण एक । तुझा कळला रे लौकिक। नेदीं हालों एक । कांहीं केल्यावांचूनि ॥१॥

संबंध पडिला कोणाशीं। काय डोळे झांकितोसी । नेईन पांचांपाशीं । दे नाहींतरी वोढूनि ॥ध्रु.॥

सुखें नेदीस जाणवलें । नास केल्याविण उगलें । तरि तें ही विचारिलें । आह्मी आहे तुज आधीं ॥२॥

असें च करूनि किती । नागविलीं नाहीं नीती । तुकयाबंधु ह्मणे अंतीं । न सोडिसी ते खोडी ॥३॥

तुज ते सवे आहे ठावें । घ्यावें त्याचें बुडवावें । परि ते आह्मांसवें आतां न फावे कांहीं ॥१॥

नव्हों सोडायाचे धणी । कष्टें मेळविलें करोनि । पाहा विचारोनी । आढी धरोनि काम नाहीं ॥ध्रु.॥

अवघे राहिले प्रकार । जालों जीवासी उदार । असा हा निर्धार । कळला असावा असेल ॥२॥

आतां निदसुर नसावें । गाठ पडली कुणब्यासवें । तुकयाबंधु ह्मणे राखावें । देवा महत्व आपुलें ॥३॥

बहु बोलणें नये कामा । वाउगें तें पुरुषोत्तमा । एकाचि वचनें आह्मां । काय सांगणें तें सांग ॥१॥

देणें आहे कीं भांडाई । करणें आहे सांग भाई । आतां भीड कांहीं । कोणी न धरी सर्वथा ॥ध्रु.॥

मागें गेलें जें होउनी । असो तें धरित नाहीं मनीं । आतां पुढें येथूनि । कैसा काय विचार ॥२॥

सारखी नाहीं अवघी वेळ । हें तों कळतें सकळ । तुकयाबंधु ह्मणे खळखळ । करावी ते उरेल ॥३॥

आतां हें न सुटे न चुके । बोल कां दवडिसी फिके।

जन लोक पारिखें । अवघें केलें म्यां यासाटीं ॥१॥

नये सरतां नव्हे भलें । तुझें लक्षण कळलें ।

बैसलासी काढिलें । देहाचें मुळीं दिवाळें ॥ध्रु.॥

दिसतोसी बरा बोल कोंवळे । गुण मैंदाचे चाळे ।

दिसताती ये वेळे । काय करूं विसंबोनि ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे देखतां । अंध बहिर ऐकतां ।

कैसें व्हावें आतां । इतकियाउपरी ॥३॥

तिहीं ताळीं हेचि हाक । ह्मणती पांढरा स्फटिक ।

अवघा बुडविला लौकिक । सुखें चि भीके लाविलीं ॥१॥

थोंटा नांव शिरोमणी । नाहीं जोडा त्रिभुवनीं ।

ह्मणोनि शाहाणे ते कोणी। तुझे दारीं बैसतिना ॥ध्रु.॥

निर्गुण निलाजिरा निनांवा । लंड झोंड कुडा देवा ।

नागवणा या नांवा । वांचूनि दुजा नाइकों ॥२॥

सर्वगुणें संपन्न । कळों आलासी संपूर्ण ।

तुकयाबंधु ह्मणे चरण । आतां जीवें न सोडीं ॥३॥

तो चि प्रसंग आला सहज । गुज धरितां नव्हे काज। न संडितां लाज । पुढें वोज न दिसे ॥१॥

तूं तर न होसी शाहाणा। नये सांगतों तें ही मना । आपण आपणा । आतां प्रयत्न देखावा ॥ध्रु.॥

न पुरवी पाहातां वाट । द्यावें प्रमाण चोखट । कास घालूनियां नीट । चौघाचार करावा ॥२॥

आतां श्रमाचें कारण । नव्हे व्हावें उदासीन । न पडे तयाविण । गांठी तुकयाबंधु ह्मणे ॥३॥

हळूहळू जाड । होत चालिलें लिगाड । जाणवेल निवाड । न करिसी परी पुढें ॥१॥

मी तों सांगून उतराई । जालों आतां तुज काई । कळों येईल भाई । तैसा करीं विचार ॥ध्रु.॥

मागें युगें अठ्ठाविस । जालीं दिवसाचा दिवस । मुदल व्याज कासावीस। होसी देवा ये कामें ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे राखें । आतां टाकीं तुझीं तीं सुखें । जगजाहिर ठाउकें । जालें नाहीं खंडलेंसें ॥३॥

पत्र उचटिलें प्रेत्नें । ग्वाही कराया कारणें । नाहींतरी पुण्यें । तुझ्या काय उणें आह्मां ॥१॥

नांव तुझें चि करोनि । आहों सुखें पोट भरोनि । केली जाणवणी । ह्मणउनि नाहीं ह्मणसील ॥ध्रु.॥

आतां इतकियाउपरी । दे नको भलतें करीं । ह्मणती ॠणकरी । आमुचा इतकें उदंड ॥२॥

तुकयाबंधु जागा । अळवावया पांडुरंगा। केला कांहीं मागायाची नव्हती गरज ॥३॥

माझ्या भावें केली जोडी । न सरेसी कल्पकोडी । आणियेलें धाडी । घालुनि अवघें वैकुंठ ॥१॥

आतां न लगे यावें जावें । कोठें कांहीं च करावें । जन्मोजन्मीं खावें । सुखें बैसोनसें जालें ॥ध्रु.॥

असंख्य संख्या नाहीं पार । आनंदें दाटलें अंबर । न माये अपार । त्रिभुवनीं सांटवितां ॥२॥

अवघें भरलें सदोदित । जाले सुखाचे पर्वत । तुकयाबंधु ह्मणे परमार्थ । धन अद्भुत सांपडलें ॥३॥

आतां चुकलें देशावर । करणें अकरणें सर्वत्र । घरासी आगर । आला सकळसिद्धींचा ॥१॥

जालों निधाई निधानें। लागलें अनंतगुणरत्न । जन्माचें विच्छिन्न । दुःख जालें दारिद्र ॥ध्रु.॥

तारूं सागरिंचें अवचितें । हेंदोवलें आलें येथें । ओढिलें संचितें । पूर्वदत्तें लाधलें ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे सीमा । नाहीं आमुचिया दैवा। आतां पुरुषोत्तमा । ऐसा सवदागर सांपडला ॥३॥

सांपडलें जुनें । आमुच्या वडिलांचें ठेवणें । केली नारायणें । कृपा पुण्यें पूवाअचिया ॥१॥

सुखें आनंदरूप आतां । आह्मी आहों याकरितां । निवारली चिंता । देणें घेणें चुकलें ॥ध्रु.॥

जालें भांडवल घरिंचें । अमुप नाम विठ्ठलाचें । सुकृत भावाचें । हें तयानें दाविलें ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे फिटला । पांग नाहीं बोलायाला। चाड दुसरी विठ्ठ्ला । वांचूनियां आणीक ॥३॥ ॥३७॥

काम क्रोध अहंकार नको देहीं । आशा तृष्णा माया लज्जा चिंता कांहीं ।

वास पंढरीचा जन्म सदा देइप । आणीक दुजें मागणें तुज नाहीं ॥१॥

कृपा देइप दान हरि मज कृपा देइप दान । नासीं त्रिमिर दाखवीं चरण ।

आर्त पुरवावें भेटी देऊन । नको उपेक्षूं आलिया शरण ॥ध्रु.॥

नाम अखंड हृदयीं राहो वाणी । न पडो विसर क्षण ज्यागृतिं स्वप्नीं ।

संतसमागम ऐसा दे लावुनि । आणीक दुजें कांहीं नेणें तुजवांचूनि ॥२॥

पंथपुरिंचा रविसुत पुरे आतां । आड करावा भवसिंधु ऐसा नव्हता ।

नाहीं आडताळा त्रैलाक्यामाजी सरता । विनवी तुकयाबंधु चरणीं ठेवूनि माथा ॥३॥

तटाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लाहान नेणे ॥१॥

परी तो त्या विशेष मानुष होऊन । करी खंड मान वडिलांचा ॥ध्रु.॥

बेरसा गाढव माया ना बहीण । भुंके चवीविण भलतें चि ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे बोकड मातलें । न विचारी आपुले तोंडीं मुते ॥३॥

मायझवा खर गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥१॥

आपमानिलें जेणें श्रेष्ठाचें वचन । ते चि त्याची खुण ओळखावी ॥ध्रु.॥

मद्यपीर पुरा अधम यातीचा । तया उपदेशाचा राग वांयां ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे पिसाळलें सुनें । आप पर तेणें न विचारावें ॥३॥

मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथिवीचा भार वाहावया ॥१॥

काय धाक आह्मां कासयाची चिंता । ऐसा तो असतां साहाकारी ॥ध्रु.॥

शंखचक्रगदा आयुधें अपार । वागवितो भार भक्तासाटीं ॥२॥

पांडवां जोहरी राखिलें कुसरी । तो हा बंधुचा कैवारी तुकयाच्या ॥३॥

राम ह्मणतां कामक्रोधांचें दहन । होय अभिमान देशधडी ॥१॥

राम ह्मणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नास ही ॥ध्रु.॥

राम ह्मणे जन्म नाहीं गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधीं ॥२॥

राम ह्मणतां यम शरणागत बापुडें । आढळ पद पुढें काय तेथें ॥३॥

राम ह्मणतां धर्म घडतील सकळ । त्रिमिर पडळ नासे हेळा ॥४॥

राम ह्मणतां ह्मणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥५॥

मरोनि जाईन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायबापा ॥१॥

चुकविलीं दुःखें मायेचा वोळसा । तोडोनियां आशापाश तेणें ॥ध्रु.॥

केली काया तनु हिंवसी शीतळ । चिंतातळमळ नाहीं ऐसी ॥२॥

काळें तोंड काळ करूनि राहिलें । भूतमात्र जालें सज्जनसखें ॥३॥

तुकयाबंधु ह्मणें अवघ्या देशदिशा । मुक्त रे परेशा तुझ्या पुण्यें ॥४॥

आतां मागतों तें ऐक नारायणा । भावपूर्वक मनापासूनियां ॥१॥

असों दे मोकळी जिव्हा जरि गाइल गुण । नाहीं तरी खिळुन टाकीं परती ॥ध्रु.॥

मातेचिया परी देखती परनारी। ठेवीं नेत्र तरी नाहीं तरि नको ॥२॥

तरी बरें कांटाळा करिती निंदास्तुतीचा । नाहीं तरि कानांचा ही देख प्रेत्न ॥३॥

सकळ इंिद्रयांचा निग्रह करूनि एक । राखवीं पृथक तोडोनि भ्रम ॥४॥

तुकयाबंधु ह्मणे ते चि वाट प्राणां । पडता नारायणा विसर तुझा ॥५॥

नमस्कारी भूतें विसरोनि याती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥१॥

परउपकारीं वेचियेल्या शक्ती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥ध्रु.॥

द्वयें द्वैतभाव नाहीं जया चित्तीं । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥२॥

जयाचिये वाचे नये निंदास्तुती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥३॥

उचित अनुचित जाणे धर्मनीती । दृढ भाव भक्ती मानव तो ॥४॥

तुकयाबंधु ह्मणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही ॥५॥

चवदा भुवनें लोक तिन्हीं दाढे जो कवळी । संपुष्ट तो संबळीमध्यें देखा ॥१॥

उत्पित्तसंहारकरिता जो पाळण । तो नंदा नंदन ह्मणवीतसे ॥ध्रु.॥

असुर तोडरी दैत्यांचा काळ । जाला द्वारपाळ बळीचा तो ॥२॥

लक्षुमीचा स्वामी क्षीराच्या सागरा । उिच्छष्टकवळा पसरी मुख ॥३॥

तुकयाबंधु ह्मणे चतुरांचा रावो । भावें तो पाहा हो केला वेडा ॥४॥

कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातोहातीं ।

जाहाज पृथ्वीपति । केली ख्याती अद्भुत ॥१॥

भला रे पुंडलिका भला। महिमा नव जाये वर्णिला ।

दगा देउनि अवघियांला । सांटविलें अविनाश ॥ध्रु.॥

केलें एके घरीं केणें । भरलीं सदोदित दुकानें ।

दुमदुमिलीं सुखानें । हे भाग्याची पंढरी ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे किल्ल्या। संताचे हातीं दिल्या ।

आंगावेगळें आपुल्या । टाकुनि जाला मेहेमान ॥३॥

पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन।

पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचे ॥१॥

ऐसें अधर्माचें बळ । लोक झकविले सकळ ।

केलें धर्माचें निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥ध्रु.॥

थोर या युगाचें आश्चर्य । ब्रह्मकर्म उत्तम सार ।

सांडूनियां द्विजवर । दावलपीर स्मरताती ॥२॥

ऐसे यथार्थाचे अनर्थ । जाला बुडाला परमार्थ ।

नाहीं जाली ऐसी नीत । हा हा भूत पातलें ॥३॥

शांति क्षमा दया । भावभक्ती सित्क्रया ।

ठाव नाहीं सांगावया । सत्त्वधैर्य भंगिलें ॥४॥

राहिले वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरती कर्म ।

ह्मणवितां रामराम । श्रम महा मानिती ॥५॥

थेर भोरपाचे विशीं । धांवती भूतें आविसा तैसीं ।

कथा पुराण ह्मणतां सिसी । तिडीक उठी नक†याचे ॥६॥

विषयलोभासाटीं । सवाथॉसीं प्राण साटी ।

परमार्थी पीठ मुठी। मागतां उठती सुनींसीं ॥७॥

धनाढ्य देखोनि अनामिक । तयातें मनिती आवश्यक ।

अपमानिले वेदपाठक । सात्त्विक शास्त्रज्ञा संपन्न ॥८॥

पुत्र ते पितियापाशीं । सेवा घेती सेवका ऐसी ।

सुनांचिया दासी । सासा जाल्या आंदण्या ॥९॥

खोटें जालें आली विंवसी । केली मर्यादा नाहींसी ।

भ्रतारें तीं भार्यासी । रंक तैसीं मानिती ॥१०॥

नमस्कारावया हरिदासां । लाजती धरिती कांहीं गर्वसा ।

पोटासाटीं खौसा । वंदिती मलिंछाच्या ॥११॥

बहुत पाप जालें उचंबळ । उत्तम न ह्मणती चांडाळ।

अभक्ष भिक्षती विटाळ । कोणी न धरी कोणाचा ॥१२॥

कैसें जालें नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न ।

विडे घेऊनि ब्राह्मण। अविंदवाणी वदताती ॥१३॥

कामिनी विटंबिल्या कुळवंती। वदनें दासीचीं चुंबिती ।

सोवऑयाच्या स्फीती । जगीं मिरविती पवित्रता ॥१४॥

मद्यपानाची सुराणी । नवनीता न पुसे कोणी ।

केळवती व्यभिचारिणी । दैन्यवाणी पतिव्रता ॥१५॥

केवढी दोषाची सबळता। जाली पाहा हो भगवंता ।

पुण्य धुडावोनी संता । तीर्थां हरी आणिली ॥१६॥

भेणें मंद जाल्या मेघवृष्टि । आकांतली कांपे सृष्टि ।

देव रिगाले कपाटीं । आटाआटी प्रवर्तली ॥१७॥

अपीक धान्यें दिवसें दिवसें। गाई ह्मैसी चेवल्या गोरसें ।

नगरें दिसती उध्वंसें । पिकलीं बहुवसें पाखांडें ॥१८॥

होम हरपलीं हवनें । यज्ञायाग अनुष्ठानें ।

जपतपादिसाधनें । आचरणें भ्रष्टलीं ॥१९॥

अठरा यातींचे व्यापार। करिती तस्कराई विप्र ।

सांडोनियां शुद्ध शुभ्र । वस्त्रें निळीं पांघरती ॥२०॥

गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्रीं ।

अश्वाचियापरी। कुमारी विकिती वेदवक्ते ॥२१॥

वेदाध्ययनसंहितारुचि । भकाद्या करिती तयांची ।

आवडी पंडितांची। मुसाफावरी बैसली ॥२२॥

मुख्य सवाौत्तम साधनें । तीं उच्छेदुनि केलीं दीनें ।

कुडीं कापटें महा मोहनें। मिरविताती दुर्जन ॥२३॥

कळाकुशळता चतुराई । तर्कवादी भेद निंदेठायीं ।

विधिनिषेधाचा वाही । एक ही ऐसीं नाडलीं ॥२४॥

जे संन्यासी तापसी ब्रह्मचारी। होतां वैरागी दिगांबर निस्पृही वैराग्यकारी।

कामक्रोधें व्यापिले भारी। इच्छाकरीं न सुटती ॥२५॥

कैसें विनाशकाळाचें कौतुक । राजे जाले प्रजांचे अंतक ।

पिते पुत्र सहोदर। एकाएक शत्रुघातें वर्त्तती ॥२६॥

केवढी ये रांडेची अंगवण । भ्रमविलें अवघें जन ।

याती अठरा चा†ही वर्ण । कर्दम करूनि विटाळले ॥२७॥

पूवाअहोतें भविष्य केलें । संतीं ते यथार्थ जालें ।

ऐकत होतों ते देखिलें।प्रत्यक्ष लोचनीं ॥२८॥

आतां असो हें आघवें । गति नव्हे कळीमध्येंवागवरावें ।

देवासी भाकोनि करुणावें । वेगें स्मरावें अंतरीं ॥२९॥

अगा ये वैकुंठानायका । काय पाहातोसि या कौतुका ।

धांव कलीनें गांजिलें लोकां । देतो हाका सेवक तुकयाचा ॥३०॥

केली हार्णाळां अंघोळी । येऊनि बैसलों राउळीं ॥१॥

अजिचें जाले भोजन । राम कृष्ण नारायण ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे नास । नाहीं कल्पांती जयास ॥३॥

तुजलागीं माझा जीव जाला पिसा । अवलोकितों दिशा पांडुरंगा ॥१॥

सांडिला वेव्हार माया लोकाचार । छंद निरंतर हा चि मनीं ॥ध्रु.॥

आइकिलें कानीं तें रूप लोचन । देखावया सीण करिताति ॥२॥

प्राण हा विकळ होय कासावीस । जीवनाविण मत्स्य तयापरी ॥३॥

तुका ह्मणे आतां कोण तो उपाव । करूं तुझे पाव आतुडे तो ॥४॥

कोणे गांवीं आहे सांगा हा विठ्ठल । जरी ठावा असेल तुह्मां कोणा ॥१॥

लागतसें पायां येतों लोटांगणीं । मात तरी कोणी सांगा याची ॥ध्रु.॥

गुण रूप याचे वाणिती या संतां । मज क्षेम देतां सुख वाटे ॥२॥

सर्वस्वें हा जीव ठेवीन चरणीं । पांडुरंग कोणी दावी तया ॥३॥

तुका ह्मणे गाईवत्सा तडातोडी । तैसी जाते घडी एकी मज ॥४॥

एकाचिये सोई कवित्वाचे बांधे । बांधिलिया साध्य काय तेथें ॥१॥

काय हातीं लागे भुसाचे कांडणीं । सत्यासी दाटणी करुनि काय ॥ध्रु.॥

कवित्वाचे रूढी पायां पाडी जग । सुखावोनि मग नरका जाय ॥२॥

तुका ह्मणे देव केल्याविण साहे । फजिती आहे लटिक्या अंगीं ॥३॥

भल्याचें दरुषण । तेथें शुभ चि वचन ॥१॥

बोलावी हे धर्मनीत । क्षोभें होत नाहीं हित ॥ध्रु.॥

मर्यादा ते बरी । वेळ जाणावी चतुरीं ॥२॥

तुका ह्मणे बहु । लागे ऐसें बरें मऊ ॥३॥

आवडीनें धरिलीं नांवें । िप्रयभावें चिंतन ॥१॥

वेडा जाला वेडा जाला । लांचावला भक्तीसी ॥ध्रु.॥

निचाड्या चाड धरी । तुळसी करीं दळ मागे ॥२॥

धरिला मग न करी बळ । तुका ह्मणे कळ पायीं ॥३॥

कंठीं राहो नाम । अंगीं भरोनियां प्रेम ॥१॥

ऐसें द्यावें कांहीं दान । आलों पतित शरण ॥ध्रु.॥

संतांचिये पायीं । वेळोवेळां ठेवीं डोई ॥२॥

तुका ह्मणे तरें । भवसिंधु एका सरें ॥३॥

विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । ब्रह्मानंदें गर्जावें ॥१॥

वाये टाळ टाऑयाटाळी । होइल होळी विघ्नांची ॥ध्रु.॥

विठ्ठल आद्ये अवसानीं । विठ्ठल मनीं स्मरावा ॥२॥

तुका ह्मणे विठ्ठलवाणी। वदा कानीं आईका ॥३॥

पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥१॥

पुंडलिका दिला वर । करुणाकरें विठ्ठलें ॥ध्रु.॥

मूढ पापी जैसे तैसे। उतरी कासे लावूनि ॥२॥

तुका ह्मणे खरें जालें । एका बोलें संतांच्या ॥३॥

अमृताचीं फळें अमृताची वेली । ते चि पुढें चाली बीजाची ही ॥१॥

ऐसियांचा संग देइप नारायणा । बोलावा वचना जयांचिया ॥ध्रु.॥

उत्तम सेवन सितळ कंठासी । पुष्टी कांती तैसी दिसे वरी ॥२॥

तुका ह्मणे तैसें होइजेत संगें । वास लागे अंगें चंदनाच्या ॥३॥

पंढरीसी जा रे आलेनो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥

वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळूं तांतडी उतावीळ ॥ध्रु.॥

मागील परिहार पुढें नेहे सीण । जालिया दर्षणें एकवेळा ॥२॥

तुका ह्मणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चित्तीं निवडेना ॥३॥

न कळे तें कळों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥१॥

न दिसे तें दिसों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ध्रु.॥

न बोलों तें बोलों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥२॥

न भेटे तें भेटों येईल आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥३॥

अलभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर ह्मणतां वाचे ॥४॥

तुका ह्मणे आसक्त जीव सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥५॥

बहुजन्में केला लाग । तो हा भाग लाधलों ॥१॥

जीव देइन हा बळी । करीन होळी संसारा ॥ध्रु.॥

गेलें मग नये हाता । पुढती चिंता वाटतसे ॥२॥

तुका ह्मणे तांतड करूं । पाय धरूं बळकट ॥३॥

भक्तीप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥

आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ती सुख दुर्लभ त्यां ॥२॥

तुका ह्मणे कृपा करिल नारायण । तरि च हें वर्म पडे ठायीं ॥३॥

दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥१॥

कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ॥ध्रु.॥

मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राह्मणाचे लीळे वर्तूं नेणे ॥२॥

जरी तो ब्राह्मण जाला कर्मभ्रष्ट । तुका ह्मणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥३॥

देव भक्तालागीं करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥१॥

भाग्य द्यावें तरी अंगीं भरे ताठा । ह्मणोनि करंटा करोनि ठेवी ॥ध्रु.॥

स्त्री द्यावी गुणवंती नसती गुंते आशा । यालागीं कर्कशा पाठी लावी ॥२॥

तुका ह्मणे मज प्रचित आली देखा । आणीक या लोकां काय सांगों ॥३॥

वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला ॥१॥

अंतीं मरसी तें न चुके । मज ही मारितोसी भुके ॥ध्रु.॥

येरू ह्मणे भला भला । निवाड तुझ्या तोंडें जाला ॥२॥

देह तंव जाणार । घडेल हा उपकार ॥३॥

येरू ह्मणे मनीं । ऐसें जावें समजोनि ॥४॥

गांठी पडली ठका ठका । त्याचा धर्म बोले तुका ॥५॥

जेथें आठवती स्वामीचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥१॥

रान अथवा घर एकांत लोकांत । समाधान चित्त तें ते घडी ॥ध्रु.॥

धन्य तो हा काळ सरे आनंदरूप । वाहातां संकल्प गोविंदाचे ॥२॥

तुका ह्मणे लाभकाळ ते चि जीणें । भाग्य नारायण उत्तम तें ॥३॥

तुज न भें मी किळकाळा । मज नामाचा जिव्हाळा ॥१॥

माझा बिळया नेणसी कोण । संतां साहे नारायण ॥ध्रु.॥

शंख वधिला सागरीं । वेद घेउनि आला चारी ॥२॥

कूर्में दैत्य वधिला जेठी । हात पाय लपवी पोटीं ॥३॥

वाराहरूप धरिलें गाढें । धरा प्रतापें धरिली दाढे ॥४॥

हिरण्यकश्यप विदारिला । भक्त प्रल्हाद रिक्षला ॥५॥

वामन जाला दिनानाथ । बळी पाताळीं घातला दैत्य ॥६॥

छेदुनियां सहस्र भुजा । कामधेनु आणिली वोजा ॥७॥

शिळा प्रतापें सागरीं तारी । स्थापी बिभीषण रावण मारी ॥८॥

मारोनियां कंसराव । पिता सोडविला वसुदेव ॥९॥

पांचाळीसी गांजितां वैरी । वस्त्रें आपण जाला हरी ॥१०॥

गजेंद्र स्मरे राम राम। त्यासी पाववी वैकुंठधाम ॥११॥

तुका ह्मणे हरिरूप जाले । पुन्हा जन्मा नाहीं आले ॥१२॥

सर्वा भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथें बीज पेरीजे ॥१॥

पुण्य करितां होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि अघोर जप । दुःख विकत घेतलें ॥ध्रु.॥

भूमी पाहातां नाहीं वेगळी । माळ बरड एक काळी । उत्तम निराळी । मध्यम कनिष्ठ ॥२॥

ह्मणोनि विवेकें । कांहीं करणें निकें । तुका ह्मणे फिकें । रुची नेदी मिष्टान्न ॥३॥

देवावरी भार । वृत्ति अयाचित सार ॥१॥

देह देवाचे सांभाळी । सार योजे यथाकाळीं ॥ध्रु.॥

विश्वासीं निर्धार । विस्तारील विश्वंभर ॥२॥

तुका ह्मणे व्हावें । बळ एक चि जाणावें ॥३॥

वर्त्ततां बासर । काय करावें शरीर ॥१॥

ठेवा नेमून नेमून । माझें तुमचे पायीं मन ॥ध्रु.॥

नेदाविया वृत्ती । कोठें फांकों चि श्रीपती ॥२॥

तुका ह्मणे भले । जन्मा येऊनियां जाले ॥३॥

केली प्रज्ञा मनाशीं । तइप मी दास सत्यत्वेशीं । नेईन पायांपाशीं । स्वामी मूळ पंढरिये ॥१॥

तोंवरी हें भरीं पोट । केला तो मिथ्या बोभाट । नाहीं सांपडली वाट । सइराट फिरतसें ॥ध्रु.॥

ज्यावें आदराचें जिणें । स्वामी कृपा करी तेणें । पाळिल्या वचनें । सख्यत्वाचा अनुभव ॥२॥

घडे तैसें घडो आतां । मायबापाची सत्ता। तुका ह्मणे चिंता । काय पाहें मारगा ॥३॥

नेत्र झाकोनियां काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं भावप्रेम ॥१॥

उघडा मंत्र जाणा राम कृष्ण ह्मणा । तुटती यातना गर्भवास ॥ध्रु.॥

मंत्र यंत्र कांहीं करिसी जडी बुटी । तेणें भूतसृष्टी पावशील ॥२॥

सार तुका जपे बीजमंत्र एक । भवसिंधुतारक रामकृष्ण ॥३॥

संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती ॥१॥

काय करावीं साधनें । काय नव्हे एक तेणें ॥ध्रु.॥

शेष घेईन उिच्छष्ट । धाय धणीवरी पोट ॥२॥

तुका ह्मणे संतां पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥३॥

जैसें तैसें बाळ मातेसी आवडे । बोलतां बोबडे शब्द गोड ॥१॥

आपुले आवडी लेववी खाववी । पाहोनियां जीवीं सुख वाटे ॥२॥

तुका ह्मणे काय देऊं परिहार । काय ते साचार जाणतसें ॥३॥

देवाचिया वस्त्रा स्वप्नीं ही नाठवी । िस्त्रयेसी पाठवी उंच साडी ॥१॥

गाईचें पाळण नये चि विचारा । अश्वासी खरारा करी अंगें ॥ध्रु.॥

लेकराची रास स्वयें धांवें क्षाळूं ॥ न ह्मणे प्रक्षाळूं द्विजपायां ॥२॥

तुका ह्मणे त्याच्या तोंडावरि थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥

उरा लावी उर आळंगितां कांता । संतासी भेटतां अंग चोरी ॥१॥

अतीत देखोनि होय पाठमोरा । व्याह्यासी सामोरा जाय वेगीं ॥ध्रु.॥

द्विजा नमस्कारा मनीं भाव कैचा । तुर्काचे दासीचा लेंक होय ॥२॥

तुका ह्मणे तुह्मी क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥३॥

ब्रह्मज्ञान जरी कळें उठाउठी । तरि कां हिंपुटी वेदशास्त्रें ॥१॥

शास्त्रांचे भांडण जप तीर्थाटणें । उर्वीचें भ्रमण या च साटीं ॥ध्रु.॥

याचसाटीं जप याचसाटीं तप । व्यासें ही अमुप ग्रंथ केले ॥२॥

या च साटीं संतपाय हे सेवावे । तरि च तरावें तुका ह्मणे ॥३॥

गायत्री विकोन पोट जे जाळिती । तया होय गति यमलोकीं ॥१॥

कन्येचा जे नर करिती विकरा । ते जाती अघोरा नरकपाता ॥ध्रु.॥

नाम गाऊनियां द्रव्य जे मागती । नेणों तयां गति कैसी होय ॥२॥

आमुचा सांगाती आहे तो श्रीहरि । न लगे दुराचारी तुका ह्मणे ॥३॥

साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥

वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी ॥२॥

तुका ह्मणे आतां लाज धरीं बुच्या । टांचराच्या कुच्या मारा वेगीं ॥३॥

राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥१॥

न करी स्नान संध्या ह्मणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहर्निशी ॥ध्रु.॥

देवाब्राह्मणासी जाईना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥२॥

सुगंध चंदन सांडोनियां माशी । बसे दुगपधीशीं अतिआदरें ॥३॥

तुका ह्मणे अरे ऐक भाग्यहीना । कां रे रामराणा विसरसी ॥४॥

दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥

आतां ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥ध्रु.॥

उपजला भाव । तुमचे कृपे सिद्धी जावो ॥२॥

तुका ह्मणे आतां । लाभ नाहीं या परता ॥३॥

तरुवर बीजा पोटीं । बीज तरुवरा सेवटीं ॥१॥

तैसें तुह्मां आह्मां जालें । एकीं एक सामावलें ॥ध्रु.॥

उदकावरील तरंग।तरंग उदकाचें अंग ॥२॥

तुका ह्मणे बिंबच्छाया । ठायीं पावली विलया ॥३॥

साकरेच्या गोण्या बैलाचिये पाठी । तयासी सेवटीं करबाडें ॥१॥

मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें । तयालागीं कांटे भक्षावया ॥ध्रु.॥

वाउगा हा धंदा आशा वाढविती । बांधोनियां देती यमा हातीं ॥२॥

ज्यासी असे लाभ तो चि जाणे गोडी । येर तीं बापुडीं सिणलीं वांयां ॥३॥

तुका ह्मणे शहाणा होइप रे गव्हारा । चो†यासीचा फेरा फिरों नको ॥४॥

चिरगुटें घालूनि वाढविलें पोट । ग†हवार बोभाट जनामध्यें ॥१॥

लटिके चि डोहळे दाखवी प्रकार । दुध स्तनीं पोर पोटीं नाहीं ॥२॥

तुका ह्मणे अंतीं वांज चि ते खरी । फजिती दुसरी जनामध्यें ॥३॥

माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायांसी न विसंभें ॥१॥

विसरतां रूप क्षण एक चित्तीं । जिवलग मूर्ती सांवळी ते ॥ध्रु.॥

विसरतां हरी क्षण एक घडी । अंतरली जोडी लक्षलाभ ॥२॥

तुका ह्मणे माझ्या विठोबाचे पाये । संजीवनी आहे हृदयामाजी ॥३॥

काय तीं करावीं मोलाचीं माकडें । नाचत ती पुढें संसाराच्या ॥१॥

झाडा देतेवेळे विचकिती दांत । घेती यमदूत दंडवरी ॥ध्रु.॥

हात दांत कान हलविती मान । दाखविती जन मानावया ॥२॥

तुका ह्मणे किती जालीं हीं फजित । मागें नाहीं नीत भारवाही ॥३॥

थोर ती गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेतां सुख वाटे ॥१॥

व्यर्थ भराभर केलें पाठांतर । जोंवरी अंतर शुद्ध नाहीं ॥ध्रु.॥

घोडें काय थोडें वागवितें ओझें । भावेंविण तैसें पाठांतर ॥२॥

तुका ह्मणे धरा निष्ठावंत भाव । जरी पंढरीराव पाहिजे तो ॥३॥

जाय जाय तूं पंढरी । होय होय वारकरी ॥१॥

सांडोनियां वाळवंट । काय इिच्छसी वैकुंठ ॥ध्रु.॥

खांद्या पताकांचे भार । तुळसीमाळा आणि अबीर ॥२॥

साधुसंतांच्या दाटणी । तुका जाय लोटांगणीं ॥३॥

जगीं ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तीस जावा ॥१॥

पोटा येतां हरलें पापा । ज्ञानदेवा मायबापा ॥ध्रु.॥

मुळीं बाप होता ज्ञानी । तरी आह्मी लागलों ध्यानीं ॥२॥

तुका ह्मणे मी पोटींचें बाळ । माझी पुरवा ब्रह्मींची आळ ॥३॥

संतांच्या हेळणे बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥१॥

भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा ॥ध्रु.॥

संतांचा जो शोध करितो चांडाळ । धरावा विठाळ बहु त्याचा ॥२॥

तुका ह्मणे केली प्रज्ञा या च साटीं । कांहीं माझे पोटीं शंका नाहीं ॥३॥

बहु टाळाटाळी । होतां भोवताहे कळी ॥१॥

बरें नव्हेल सेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥

मुरगाळी कान । घुसमाडील सावधान ॥२॥

अबोलणा तुका । ऐसें कोणी लेखूं नका ॥३॥

जिव्हे जाला चळ । नेये अवसान ते पळ ॥१॥

हें चि वोसनावोनी उठी । देव सांटविला पोटीं ॥ध्रु.॥

नाहीं ओढा वारा। पडिला प्रसंग तो बरा ॥२॥

तुका ह्मणे जाली । मज हे अनावर बोली ॥३॥

गोहो यावा गांवा । ऐसे नवस करी आवा ॥१॥

कैचें पुण्य तया गांठी । व्रतें वेची लोभासाटीं ॥ध्रु.॥

वाढावें संतान। गृहीं व्हावें धनधान्य ॥२॥

मागे गारगोटी । परिसाचीये साटोवाटी ॥३॥

तुका ह्मणे मोल । देउन घेतला सोमवल ॥४॥

बाळपणें ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें ॥१॥

विटू दांडू चेंडू लगो†या वाघोडीं । चंपे पेंड खडी एकीबेकी ॥ध्रु.॥

हमामा हुंबरी पकव्याच्या बारे । खेळे जंगीभोंवरे चुंबाचुंबी ॥२॥

सेलडेरा आणि निसरभोंवडी । उचली बाले धोंडी अंगबळें ॥३॥

तुका ह्मणे ऐसें बाळपण गेलें । मग तारुण्य आलें गर्वमूळ ॥४॥

तारुण्याच्या मदें न मनी कोणासी । सदा मुसमुसी खूळ जैसा ॥१॥

अंठोनी वेंठोनीं बांधला मुंडासा । फिरतसे ह्मैसा जनामधीं ॥ध्रु.॥

हातीं दीडपान वरती च मान । नाहीं तो सन्मान भलियांसी ॥२॥

श्वानाचिया परी हिंडे दारोदारीं । पाहे परनारी पापदृष्टी ॥३॥

तुका ह्मणे ऐसा थोर हा गयाळी । करितां टवाळी जन्म गेला ॥४॥

ह्मातारपणीं थेटे पडसें खोकला । हात कपाळाला लावुनि बैसे ॥१॥

खोबरियाची वाटी जालें असे मुख । गळतसे नाक श्लेष्मपुरी ॥ध्रु.॥

बोलों जातां शब्द नये चि हा नीट । गडगडी कंठ कफ भारी ॥२॥

सेजारी ह्मणती मरेना कां मेला । आणिला कांटाळा येणें आह्मां ॥३॥

तुका ह्मणे आतां सांडुनी सर्वकाम । स्मरा राम राम क्षणक्षणा ॥४॥

जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥

बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥

तटावृषभासी दाणा। तृण मागों नये जाणा ॥२॥

तुका ह्मणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥

लंकेमाजी घरें किती तीं आइका । सांगतसें संख्या जैसीतैसी ॥१॥

पांच लक्ष घरें पाषाणांचीं जेथें । सात लक्ष तेथें विटेबंदी ॥ध्रु.॥

कोटि घरें जेथें कांशा आणि तांब्याचीं । शुद्ध कांचनाचीं सप्त कोटी ॥२॥

तुका ह्मणे ज्याची संपदा एवढी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥३॥

व्यभिचारिणी गणिका कुंटणी । विश्वास चि मनीं राघोबाचा ॥१॥

ऐसी ही पापिणी वाइली विमानी । अचळ भुवनीं टेवियेली ॥ध्रु.॥

पतितपावन तिहीं लोकीं ठसा । कृपाळू कोंवसा अनाथांचा ॥२॥

तुका ह्मणे विठोबाची धरा सोय । आणिक उपाय नेणों किती ॥३॥

गजेंद्र तो हस्ती सहस्र वरुषें । जळामाजी नक्रें पीडिलासे ॥१॥

सुहुदव सांडिलें कोणी नाहीं साहे । अंतीं वाट पाहे विठो तुझी ॥ध्रु.॥

कृपेच्या सागरा माझ्या नारायणा । तया दोघांजणा तारियेलें ॥२॥

तुका ह्मणे नेले वाऊनि विमानी । मी ही आईकोनी विश्वासलों ॥३॥

ब्रह्मयाचे वेद शंखासुरें नेले । त्यासाटीं धरिलें मत्स्यरूप ॥१॥

तेणें आत्मा नव्हता नेला ब्रह्मांडासी । काय ब्रह्मयासी नव्हतें ज्ञान ॥ध्रु.॥

परि तेणें धावा केला आवडीनें । जाले नारायण कृपासिंधु ॥२॥

तुका ह्मणे विठोबा मी नामधारक । पोसनें सेवक भेटी देइप ॥३॥

देवीं आणि दैतीं सिंधू गुसिळला । भार पृथ्वीस जाला साहावेना ॥१॥

जालासी कासव धरिली पाठीवरी । चिंता तुज हरी सकळांची ॥ध्रु.॥

तये काळीं देव करिताती स्तुती । कृपाळु श्रीपती ह्मणोनियां ॥२॥

तुका ह्मणे ऐसे उदंड पवाडे । ज्यासी सहस्र तोंडें सिणला तो ही ॥३॥

हिरण्याक्ष दैत्य मातला जे काळीं । वरदानें बळी शंकराच्या ॥१॥

इंद्रपदराज्य घेतलें हिरोनी । देवा चक्रपाणी ह्मणती धांव ॥ध्रु.॥

तइं पांडुरंगा शूकर जालेती । तया दैत्यपती मारविले ॥२॥

तुका ह्मणे ज्यांचीं राज्यें त्यांसी दिलीं । ऐसी तूं माउली पांडुरंगा ॥३॥

प्रल्हादाकारणें नरसिंहीं जालासी । त्याचिया बोलासी सत्य केलें ॥१॥

राम कृष्ण गोविंदा नारायणा हरि । गर्जे राजद्वारीं भक्तराज ॥ध्रु.॥

विठ्ठल माधव मुकुंद केशव । तेणें दैत्यराव दचकला ॥२॥

तुका ह्मणे तयां कारणें सगुण । भक्तांचें वचन सत्य केलें ॥३॥

नामाचें सामर्थ्य कां रे दवडीसी । कां रे विसरसी पवाडे हे ॥१॥

खणखणां हाणती खर्ग प्रल्हादासी । न रुपे आंगासी किंचित ही ॥ध्रु.॥

राम कृष्ण हरी ऐसी मारी हाक । तेणें पडे धाक बिळयासी ॥२॥

असों द्यावीं सामथ्यॉ ऐसिया कीर्तीचीं । आवडी तुक्याची भेटी देइप ॥३॥

वाटीभर विष दिलें प्रल्हादासी । निर्भय मानसीं तुझ्याबळें ॥१॥

भोक्ता नारायण केलें तें प्राशन । प्रतापें जीवन जालें तुझ्या ॥ध्रु.॥

नामाच्या चिंतनें विषाचें तें आप । जाहालें देखत नारायणा ॥२॥

तुका ह्मणे ऐसे तुझे बडिवार । सिणला फणीवर वर्णवेना ॥३॥

अिग्नकुंडामध्यें घातला प्रल्हाद । तरी तो गोविंद विसरेना ॥१॥

पितियासी ह्मणे व्यापक श्रीहरि । नांदतो मुरारी सर्वां ठायीं ॥ध्रु.॥

अिग्नरूपें माझा सखा नारायण । प्रल्हाद गर्जून हाक मारी ॥२॥

तुका ह्मणे अिग्न जाहाला शीतळ । प्रताप सबळ विठो तुझा ॥३॥

कोपोनियां पिता बोले प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठें आहे ॥१॥

येरू ह्मणे काष्ठीं पाषाणीं सकळीं । आहे वनमाळी जेथें तेथें ॥ध्रु.॥

खांबावरी लात मारिली दुर्जनें । खांबीं नारायण ह्मणतां चि ॥२॥

तुका ह्मणे कैसा खांब कडाडिला । ब्रह्मा दचकला सत्यलोकीं ॥३॥

डळमिळला मेरु आणि तो मांदार । पाताळीं फणिवर डोई झाडी ॥१॥

लोपे तेजें सूर्य आणीक हा चंद्र । कांपतसे इंद्र थरथरां ॥ध्रु.॥

ऐसें रूप उग्र हरीनें धरिलें । दैत्या मारियेलें मांडीवरी ॥२॥

तुका ह्मणे भक्तांकारणें श्रीहरि । बहु दुराचारी निर्दाळिले ॥३॥

बहुत कृपाळु दीनाचा दयाळु । जगीं भक्तवत्सळु नाम तुझें ॥१॥

मानियेला चित्तीं बळीचा उपकार । अझूनि त्याचें द्वार राखसील ॥ध्रु.॥

काय त्याच्या भेणें बैसलासी द्वारीं । नाहीं तुज हरि कृपा बहु ॥२॥

तुका ह्मणे भक्तजनाची ममता । तुह्मांसी अनंता अलोलिक ॥३॥

पांडुरंगा तुझे काय वाणूं गुण । पवाडे हे धन्य जगीं तुझे ॥१॥

दंडिलें दुर्वासा सुरा असुरानें । तो आला गा†हाणें सांगावया ॥ध्रु.॥

बिळचिये द्वारीं तुह्मी बैसलेती । दुर्वास विनंती करी भावें ॥२॥

तुका ह्मणे कृपासागरा श्रीहरी । तुझी भक्तावरी प्रेमच्छाया ॥३॥

दुर्वासया स्वामी गुंतलों भाकेसी । पुसा जा बळीसी निरोप द्यावा ॥१॥

त्याचे आज्ञोविण आह्मां येतां नये । द्वारपाळ राहें होऊनियां ॥ध्रु.॥

पुसे दुर्वासया बळीसी जाऊनि । येरू ह्मणे झणी बोलों नका ॥२॥

तुका ह्मणे केला अन्यत्राचा त्याग । तेव्हां पांडुरंग सखा जाला ॥३॥

बळी ह्मणे आजि दुर्वासया स्वामी । मागों नका तुह्मी नारायणा ॥१॥

बहुतां प्रयासीं जोडला श्रीहरी । बैसविला द्वारीं राखावया ॥ध्रु.॥

परतला दुर्वास मग हो तेथूनि । चिंतातुर मनीं उद्वेगला ॥२॥

काय तूं एकाचा आहेसी अंकित । होइप कृपावंत तुका ह्मणे ॥३॥

त्रैलोकींचा नाथ सकळांचा आधार । बिळचें तुवां घर धरियेलें ॥१॥

आह्मां मोकलिलें कोणां निरविलें । कोणा हातीं दिले तिन्ही लोक ॥ध्रु.॥

अनाथांचा बंधु दासांचा कैवारी । िब्रदें तुझीं हरी जाती वांयां ॥२॥

तुका ह्मणे ऐसें बोलिला दुर्वास । वाटला संतोष पांडुरंगा ॥३॥

बोलिलेती ते देवॠषी दुर्वासया । जाय पुसावया मागत्यानें ॥१॥

मागुता दुर्वास पुसे बिळराया । निरोप जावया देइप देवा ॥ध्रु.॥

बळी ह्मणे त्यासी जाय मी न ह्मणें । जाईल नारायण लागला ची ॥२॥

मजपाशीं राहें कोठें तरीं जाय । तुका ह्मणे पाय न सोडीं मी ॥३॥

दुर्वासें निरोप आणिला ये रिती । मग वाढलेती नारायणा ॥१॥

ठेविलें चरण बिळचिये द्वारीं । शीर अंगावरी लांबविलें ॥ध्रु.॥

पाडियेलें द्वार द्वारावतियेसी । वरि हृषीकेशी निघालेती ॥२॥

तेथूनियां नाम पडिलें द्वारका । वैकुंठनायका तुका ह्मणे ॥३॥

मुरुकुश दोन्ही मारिले आसुर । दुर्वास ॠषीश्वर सुखी केला ॥१॥

मारियेला मुरु ह्मणोनी मुरारी । नाम तुझें हरी पडियेलें ॥ध्रु.॥

पूवाअहुनी ऐसा भक्तिप्रतिपाळ । केला त्वां सांभाळ नारायणा ॥२॥

तुका ह्मणे ये चि वेळे काय जालें । कां सोंग धरिलें मोहनाचें ॥३॥

गुरुपादाग्रींचें जळ । त्यास मानी जो विटाळ ॥१॥

संतीं वाळिला जो खळ । नरकीं पचे चिरकाळ ॥ध्रु.॥

गुरुतीथाअ अनमान । यथासांग मद्यपान ॥२॥

गुरुअंगुष्टा न चोखी । मुख घाली वेश्येमुखीं ॥३॥

तुका ह्मणे सांगों किती । मुखीं पडो त्याचे माती ॥४॥

वाढविलें कां गा । तुह्मी एवढें पांडुरंगा ॥१॥

काय होती मज चाड । एवढी करावया बडबड ॥ध्रु.॥

ब्रह्मसंतर्पण । लोकीं करावें कीर्तन ॥२॥

निमित्याचा धणी । तुका ह्मणे नेणे कोणी ॥३॥

साही शास्त्रां अतिदुरी तो परमात्मा श्रीहरि । तो दशरथाचे घरीं क्रीडतो राम ॥१॥

शिवाचें निजदेह वाल्मीकाचें निजगुहे । तो भिल्लटीचीं फळें खाय श्रीराम तो ॥ध्रु.॥

योगियांचे मनीं नातुडे चिंतनीं । वानरांचे कानीं गोष्टी सांगे ॥२॥

चरणीं शिळा उद्धरी नामें गणिका तारी । तो कोळिया घरीं पाहुणा राम ॥३॥

क्षण एक सुरवरा नातुडे नमस्कारा । तो रिसा आणि वानरा क्षम दे राम ॥४॥

राम सांवळा सगुण राम योगियाचें ध्यान । राम राजीवलोचन तुका चरण वंदितो ॥५॥

विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ॥१॥

विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारूं । उतरील पारु भवनदीचा ॥ध्रु.॥

विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ॥२॥

विठ्ठल हे जन विठ्ठल माझें मन। सोयरा सज्जन विठ्ठल माझा ॥३॥

तुका ह्मणे माझा विठ्ठल विसावा। नश्वरित गांवा जाइन त्याच्या ॥४॥

न मनावी चिंता । कांहीं माझेविशीं आतां ॥१॥

ज्याणें लौकिक हा केला । तो हें निवारिता भला ॥ध्रु.॥

माझे इच्छे काय । होणार ते एक ठाय ॥२॥

सुखा आणि दुःखा । ह्मणे वेगळा मी तुका ॥३॥

माझा पाहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥

बोलविलें तें चि द्यावें । उत्तर व्हावें ते काळीं ॥ध्रु.॥

सोडिलिया जग निंद्य । मग गोविंद ह्मणियारा ॥२॥

तुका ह्मणे धीर केला । तेणें याला गोविलें ॥३॥

जिंकावा संसार । येणें नांवें तरी शूर ॥१॥

येरें काय तीं बापुडीं । कीर अहंकाराचीं घोडीं ॥ध्रु.॥

पण ऐशा नांवें । देवा धरिजेतो भावें ॥२॥

तुका ह्मणे ज्यावें । सत्य कीर्तीनें बरवें ॥३॥

सरे ऐसें ज्याचें दान । त्याचे कोण उपकार ॥१॥

नको वाढूं ऐसें काचें । दे वो साच विठ्ठला ॥ध्रु.॥

रडत मागें सांडी पोर । ते काय थोर माउली ॥२॥

तुका ह्मणे कीर्ति वाढे । धर्म गाढे ते ऐसे ॥३॥

तुटे मायाजाळ विघडे भवसिंधू । जरि लागे छंदु हरिनामें ॥१॥

येर कर्म धर्म करितां ये कळी । माजी तरला बळी कोण सांगा ॥ध्रु.॥

न पढवे वेद नव्हे शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥२॥

न साधवे योग न करवे वैराग्य । साधा भक्तिभाग्य संतसंगें ॥३॥

नव्हे अनुष्ठान न कळे ब्रह्मज्ञान । करावी सोपान कृष्णकथा ॥४॥

तुका ह्मणे वर्म दावियेलें संतीं । यापरती विश्रांति आणिक नाहीं ॥५॥

लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य न्याय नीत ॥१॥

त्याच्या पूर्वजां पतन । नरकीं किडे होती जाण ॥ध्रु.॥

कोटिगोहत्यापातक। त्यासी घडेल निष्टंक ॥२॥

मासां श्रवे जे सुंदरा । पाजी विटाळ पितरां ॥३॥

तुका ह्मणे ऐसियासी । यम गांजील सायासी ॥४॥

देह जाईल जाईल । यासी काळ बा खाईल ॥१॥

कां रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥ध्रु.॥

लोडें बालिस्तें सुपती । जरा आलिया फजिती ॥२॥

शरीरसंबंधाचें नातें । भोरड्या बुडविती सेतातें ॥३॥

अझुनि तरी होइप जागा । तुका ह्मणे पुढें दगा ॥४॥

मागें बहुतां जनां राखिलें आडणी । धांवसी निर्वाणी नाम घेतां ॥१॥

ऐसें ठावें जालें मज बरव्या परी । ह्मणऊनि करीं धांवा तुझा ॥ध्रु.॥

माझेविशीं तुज पडिला विसरु । आतां काय करूं पांडुरंगा ॥२॥

अझुनि कां नये तुह्मासी करुणा । दुरि नारायणा धरिलें मज ॥३॥

तुका ह्मणे जीव जाऊं पाहे माझा । आतां केशीराजा घालीं उडी ॥४॥

कळलें माझा तुज नव्हे रे आठव । काय काज जीव ठेवूं आतां ॥१॥

तूं काय करिसी माझिया संचिता । धिग हे अनंता जालें जिणें ॥ध्रु.॥

पतितपावन राहिलों या आशा । आइकोनि ठसा कीर्ती तुझी ॥२॥

आतां कोण करी माझा अंगीकार । कळलें निष्ठ‍ जालासी तूं ॥३॥

तुका ह्मणे माझी मांडिली निरास । करितों जीवा नास तुजसाटीं ॥४॥

तरि कां मागें वांयां कीर्ती वाढविली । जनांत आपुली िब्रदावळी ॥१॥

साच करितां आतां फिरसी माघारा । ठायींचें दातारा नेणवेचि ॥ध्रु.॥

संतांसी श्रीमुख कैसें दाखविसी । पुढें मात त्यांसी सांगईन ॥२॥

घेईन डांगोरा तुझिया नामाचा । नव्हे अनाथांचा नाथ ऐसा ॥३॥

तुका ह्मणे आधीं राहिलों मरोनि । तूं कां होसी धनी निमित्याचा ॥४॥

आह्मी तुझ्या दासीं । जरि जावें पतनासी ॥१॥

तरि हें दिसे विपरीत । कोठें बोलिली हे नीत ॥ध्रु.॥

तुझें नाम कंठीं । आह्मां संसार आटी ॥२॥

तुका ह्मणे काळ । करी आह्मांसी विटाळ ॥३॥

लाजती पुराणें । वेदां येऊं पाहे उणें ॥१॥

आह्मी नामाचे धारक । किविलवाणीं दिसों रंक ॥ध्रु.॥

बोलिले ते संतीं । बोल वायांविण जाती ॥२॥

तुका ह्मणे देवा । रोकडी हे मोडे सेवा ॥३॥

आहारनिद्रे न लगे आदर । आपण सादर ते चि होय ॥१॥

परमितेविण बोलणें ते वांयां । फार थोडें काया पिंड पीडी ॥ध्रु.॥

समाधान त्याचें तो चि एक जाणे । आपुलिये खुणे पावोनियां ॥२॥

तुका ह्मणे होय पीडा ते न करीं । मग राहें परी भलतिये ॥३॥

भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना ॥१॥

तैसे वोसपले जीव । सांडी नसतां अंगीं घाव ॥ध्रु.॥

जीव अवघे देव । खोटा नागवी संदेह ॥२॥

तुका ह्मणे शुद्ध । मग तुटलिया भेद ॥३॥

सरतें माझें तुझें । तरि हें उतरतें ओझें ॥१॥

न लगे सांडावें मांडावें । आहे शुद्ध चि स्वभावें ॥ध्रु.॥

घातला तो आशा। मोहोजाळें गळां फासा ॥२॥

सुखदुःखाचा तो मान । नाहीं दुःखाचा तो शीण ॥३॥

करितां नारायण । एवढें वेचितां वचन ॥४॥

लाभ हानि हे समान । तैसा मान अपमान ॥५॥

तुका ह्मणे याचें । नांव सोंवळें साचें ॥६॥

तुज करितां होती ऐसे । मूढ चतुर पंडित पिसे ॥१॥

परि वर्म नेणे तें कोणी । पीडाखाणी भोगितील ॥ध्रु.॥

उलंघितें पांगुळ गिरी । मुकें करी अनुवाद ॥२॥

पापी होय पुण्यवंत । न करी घात दुर्जन ॥३॥

अवघें हेळामात्रें हरि । मुक्त करी ब्रह्मांड ॥४॥

तुका ह्मणे खेळे लीळा । पाहे वेगळा व्यापूनि ॥५॥

पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥१॥

पुरोनि उरे खातां देतां । नव्हे खंडन मवितां ॥ध्रु.॥

खोलीं पडे ओली बीज। तरीं च हाता लागे निज ॥२॥

तुका ह्मणे धणी । विठ्ठल अक्षरें या तिन्ही ॥३॥

करिसी लाघवें । तूं हें खेळसी आघवें ॥१॥

अहंकार आड । आह्मां जगासी हा नाड ॥ध्रु.॥

येथें भुतें यावें । दावूं लपों ही जाणावें ॥२॥

तुका ह्मणे हो श्रीपती । आतां चाळवाल किती ॥३॥

घालिती पव्हया । वाटे अनाथाच्या दया ॥१॥

तैसें कां हें नये करूं । पांडुरंगा आह्मां तारूं ॥ध्रु.॥

रोगियासी काढा । देउनि वारितील पीडा ॥२॥

बुडत्यासाटीं उडी । घालितील कां हे जोडी ॥३॥

सारितील कांटे । पुढें मागिलांचे वाटे ॥४॥

तुका ह्मणे भार । घेती भागल्यांचा फार ॥५॥

नका दंतकथा येथें सांगों कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥१॥

अनुभव येथें व्हावा शिष्टाचार । न चलती चार आह्मांपुढें ॥ध्रु.॥

निवडी वेगळें क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळालीं ॥२॥

तुका ह्मणे येथें पाहिजे जातीचें । येरा गाबाळाचें काय काम ॥३॥

न करि त्याचें गांढेपण । नारायण सिद्ध उभा ॥१॥

भवसिंधूचा थडवा केला । बोलाविला पाहिजे ॥ध्रु.॥

याचे सोई पाउल वेचे । मग कैचे आडथळे ॥२॥

तुका ह्मणे खरें खोटें । न ह्मणे मोटें लहान ॥३॥

रिकामें तूं नको मना । राहों क्षणक्षणा ही ॥१॥

वेळोवेळां पारायण । नारायण हें करीं ॥ध्रु.॥

भ्रमणांच्या मोडीं वाटा। न भरें फाटा आडरानें ॥२॥

तुका ह्मणे माझ्या जीवें । हें चि घ्यावें धणीवरी ॥३॥

पंचभूतांचिये सांपडलों संदीं । घातलोंसे बंदीं अहंकारें ॥१॥

आपल्या आपण बांधविला गळा । नेणें चि निराळा असतां हो ॥ध्रु.॥

कासया हा सत्य लेखिला संसार । कां हे केले चार माझें माझें ॥२॥

कां नाहीं शरण गेलों नारायणा । कां नाहीं वासना आवरिली ॥३॥

किंचित सुखाचा धरिला अभिळास । तेणें बहु नास केला पुढें ॥४॥

तुका ह्मणे आतां देह देऊं बळी । करुनि सांडूं होळी संचिताची ॥५॥

देव जाले अवघे जन । माझे गुण दोष हारपले ॥१॥

बरवें जालें बरवें जालें । चित्त धालें महालाभें ॥ध्रु.॥

दर्पणीचें दुसरें भासे । परि तें असे एक तें ॥२॥

तुका ह्मणे सिंधुभेटी । उदका तुटी वाहाळासी ॥३॥

बहुत प्रकार परि ते गव्हाचे । जिव्हा नाचे आवडी ॥१॥

सरलें परि आवडी नवी । सिंधु दावी तरंग ॥ध्रु.॥

घेतलें घ्यावें वेळोवेळां । माय बाळा न विसंबे ॥२॥

तुका ह्मणे रस राहिला वचनीं । तो चि पडताळूनि सेवीतसें ॥३॥

आह्मां सोइरे हरिजन । जनीं भाग्य निकंचन ॥१॥

ज्याच्या धैर्या नाहीं भंग । भाव एकविध रंग ॥ध्रु.॥

भुके तान्हे चित्तीं। सदा देव आठविती ॥२॥

तुका ह्मणे धन । ज्याचें वित्त नारायण ॥३॥

ह्मणवितों दास न करितां सेवा । लंडपणें देवा पोट भरीं ॥१॥

खोटें कोठें सरे तुझे पायांपाशीं । अंतर जाणसी पांडुरंगा ॥ध्रु.॥

आचरण खोटें आपणासी ठावें । लटिकें बोलावें दुसरें तें ॥२॥

तुका ह्मणे ऐसा आहें अपराधी । असो कृपानिधी तुह्मां ठावा ॥३॥

जळालें तें बाह्य सोंग । अंतर व्यंग पडिलिया ॥१॥

कारण तें अंतरलें । वाइट भलें ह्मणवितां ॥ध्रु.॥

तांतडीनें नासी । तांतडीनें च संतोषी ॥२॥

तुका ह्मणे धीर । नाहीं बुद्धि एक िस्थर ॥३॥

चित्ताचें बांधलें जवळी तें वसे । प्रकाशीं प्रकाशे सर्वकाळ ॥१॥

अंतरीं वसावी उत्तम ते भेटी । होऊं कांहीं तुटी न सके चि ॥ध्रु.॥

ब्रह्मांड कवळे आठवणेसाटीं । धरावा तो पोटीं वाव बरा ॥२॥

तुका ह्मणे लाभ घरिचिया घरीं । प्रेमतंतु दोरी न सुटतां ॥३॥

दुखवलें चित्त आजिच्या प्रसंगें । बहु पीडा जगें केली देवा ॥१॥

कधीं हा संबंध तोडिसी तें नेणें । आठवूनि मनें पाय असें ॥ध्रु.॥

आणिकांची येती अंतरा अंतरें । सुखदुःख बरेंवाइट तीं ॥२॥

तुका ह्मणे घडे एकांताचा वास । तरिच या नास संबंधाचा ॥३॥

धनवंत एक बहिर अंधळे । शुभ्र कुष्ठ काळे भोग अंगीं ॥१॥

परारब्धगति न कळे विचित्र । आहे हातीं सूत्र विठोबाचे ॥ध्रु.॥

आणीक रोगांचीं नांवें घेऊं किती । अखंड असती जडोनियां ॥२॥

तुका ह्मणे नष्ट संचिताचें दान । पावे खातां पण सुख नेदी ॥३॥

भेदाभेदताळा न घडे घालितां । आठवा रे आतां नारायण ॥१॥

येणें एक केलें अवघें होय सांग । अच्युताच्या योगें नामें छंदें ॥ध्रु.॥

भोंवरे खळाळ चोर वाटा घेती । पावल मारिती सिवेपाशीं ॥२॥

तुका ह्मणे येथें भावेंविण पार । न पविजे सार हें चि आहे ॥३॥

जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत । त्यांचे पायीं चित्त ठेवीन मी ॥१॥

जयांसी आवडे विठ्ठलाचें नाम । ते माझे परम प्राणसखे ॥ध्रु.॥

जयांसी विठ्ठल आवडे लोचनीं । त्यांचें पायवणी स्वीकारीन ॥२॥

विठ्ठलासी जिहीं दिला सर्व भाव । त्यांच्या पायीं ठाव मागईन ॥३॥

तुका ह्मणे रज होईन चरणींचा । ह्मणविती त्यांचा हरिचे दास ॥४॥

काय तो विवाद असो भेदाभेद । साधा परमानंद एका भावें ॥१॥

निघोनि आयुष्य जातें हातोहात । विचारीं पां हित लवलाहीं ॥२॥

तुका ह्मणे भावभक्ति हे कारण । नागवी भूषण दंभ तो चि ॥३॥

देवकीनंदनें । केलें आपुल्या चिंतनें ॥१॥

मज आपुलिया ऐसें । मना लावूनियां पिसें ॥ध्रु.॥

गोवळे गोपाळां । केलें लावूनियां चाळा ॥२॥

तुका ह्मणे संग । केला दुरि नव्हे मग ॥३॥

माझिया जीवासी हे चि पैं विश्रांति । तुझे पाय चित्तीं पांडुरंगा ॥१॥

भांडवल गांठी आलें सपुरतें । समाधान चित्तें मानियेलें ॥ध्रु.॥

उदंड उच्चारें घातला पसरु । रूपावरी भरु आवडीचा ॥२॥

तुका ह्मणे मज भक्तीची आवडी । अभेदीं तांतडी नाहीं ह्मुण ॥३॥

एकविध आह्मी न धरूं पालट । न संडूं ते वाट सांपडली ॥१॥

ह्मणवूनि केला पाहिजे सांभाळ । माझें बुद्धीबळ पाय तुझे ॥ध्रु.॥

बहुत न कळे बोलतां प्रकार । अंतरा अंतर साक्ष असे ॥२॥

तुका ह्मणे आगा जीवांच्या जीवना । तूं चि नारायणा साक्षी माझा ॥३॥

राहो ये चि ठायीं । माझा भाव तुझे पायीं ॥१॥

करीन नामाचें चिंतन । जाऊं नेदीं कोठें मन ॥ध्रु.॥

देईन ये रसीं । आतां बुडी सर्वविशीं ॥२॥

तुका ह्मणे देवा । साटी करोनियां जीवा ॥३॥

तैसे नहों आह्मी विठ्ठलाचे दास । यावें आणिकांस काकुलती ॥१॥

स्वामिचिया सत्ता ठेंगणें सकळ । आला किळकाळ हाताखालीं ॥ध्रु.॥

अंकिताचा असे अभिमान देवा । समर्पूनि हेवा असों पायीं ॥२॥

तुका ह्मणे आह्मां इच्छेचें खेळणें । कोड नारायणें पुरवावें ॥३॥

मोक्ष देवापाशीं नाहीं । लटिक्या घाइप विळवतें ॥१॥

काय खरें न धरी शुद्धी । गेली बुद्धी भ्रमलें ॥ध्रु.॥

अहंकारास उरलें काई । पांचांठायीं हें वांटे ॥२॥

तुका ह्मणे कुंथे भारें । लटिकें खरें मानुनियां ॥३॥

आपला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥१॥

तें तीं माइकें दुःखाचीं जनितीं । नाहीं आदिअंतीं अवसान ॥ध्रु.॥

अविनाश करी आपुलिया ऐसें । लावीं मना पिसें गोविंदाच्या ॥२॥

तुका ह्मणे एका मरणें चि सरें । उत्तम चि उरे कीर्ति मागें ॥३॥

आजिचें हें मज तुह्मीं कृपादान । दिलें संतजन मायबापीं ॥१॥

आलीं मुखावाटा अमृतवचनें । उत्तीर्ण तीं येणें नव्हे जन्में ॥२॥

तुका ह्मणे तुह्मीं उदार कृपाळ । शृंगारिलें बाळ कवतुकें ॥३॥

स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी ॥१॥

आइकोनि होती बहिर हे बोल । वेचूनि ते मोल नरका जाती ॥ध्रु.॥

इह लोकीं थुंका उडे तोंडावरी । करणें अघोरी वास लागे ॥२॥

तुका ह्मणे माप वाचेऐसें निकें । भरलें नरकें निंदेसाटीं ॥३॥

लोह कफ गारा सिद्ध हे सामुग्री । अिग्न टणत्कारी दिसों येतो ॥१॥

सांगावें तें काई सांगावें तें काई । चित्ता होय ठायीं अनुभव तो ॥ध्रु.॥

अन्नें सांगों येतो तृप्तीचा अनुभव । करूनि उपाव घेऊं हेवा ॥२॥

तुका ह्मणे मिळे जीवनीं जीवन । तेथें कोणा कोण नांव ठेवी ॥३॥

बाळाचें जीवन । माता जाणें भूक तान ॥१॥

काय करूं विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥

ठेविलिये ठायीं । चित्त ठेवुनि असें पायीं ॥२॥

करितों हे सेवा । चिंतन सर्वां ठायीं देवा ॥३॥

न्यून तें चि पुरें । घ्यावें करोनि दातारें ॥४॥

तुका ह्मणे बुद्धि । अल्प असे अपराधी ॥५॥

जाणतों समये । परि मत कामा नये ॥१॥

तुह्मी सांगावें तें बरें । देवा सकळ विचारें ॥ध्रु.॥

फुकाचिये पुसी । चिंता नाहीं होते ऐसी ॥२॥

तुका ह्मणे आहे । धर पाय मज साहे ॥३॥

द्वारपाळ विनंती करी । उभे द्वारीं राउळा ॥१॥

आपुलिया शरणागता । वाहों चिंता नेदावी ॥ध्रु.॥

वचना या चित्त द्यावें । असो ठावें पायांसी ॥२॥

तुका ह्मणे कृपासिंधू । दीनबंधू केशवा ॥३॥

दोहीं बाहीं आह्मां वास । असों कास घालूनि ॥१॥

बोल बोलों उभयतां । स्वामीसत्ता सेवेची ॥ध्रु.॥

एकसरें आज्ञा केली । असों चाली ते नीती ॥२॥

तुका ह्मणे जोहारितों । आहें होतों ते ठायीं ॥३॥

ऐका जी देवा माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥

सन्निध पातलों सांडूनियां शंका । सन्मुख चि एकाएकीं पुढें ॥ध्रु.॥

जाणविलें कोठें पावे पायांपाशीं । केली या जिवासी साटी ह्मुण ॥२॥

तुका ह्मणे माझे हातीं द्या उद्धार । करीं करकर ह्मणवूनि ॥३॥

बैसलों तों कडियेवरी । नव्हें दुरी वेगळा ॥१॥

घडलें हें बहुवा दिसां । आतां इच्छा पुरवीन ॥ध्रु.॥

बहु होता जाला सीण । नाहीं क्षण विसांवा ॥२॥

दुःखी केलें मीतूंपणें । जवळी नेणें होतें तें ॥३॥

पाहात जे होतों वास । ते चि आस पुरविली ॥४॥

तुका ह्मणे मायबापा । झणी कोपा विठ्ठला ॥५॥

तुझें नाम मुखीं तयासी विपित्त । आश्चर्य हें चित्तीं वाटतसे ॥१॥

काय जाणों काय होसील निजला । नेणों जी विठ्ठला मायबापा ॥ध्रु.॥

भवबंधनाचे तुटतील फांसे । तें कां येथें असे अव्हेरिलें ॥२॥

तुका ह्मणे माझें दचकलें मन । वाटे वांयांविण श्रम केला ॥३॥

सेवकें करावें सांगितलें काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे ॥१॥

काय देवा नेणों आलें गांढेपण । तुह्मी शक्तिहीन जाले दिसां ॥ध्रु.॥

विष्णुदास आह्मी निर्भर ज्याबळें । तें दिसे या काळें अव्हेरिलें ॥२॥

तुका ह्मणे मूळ पाठवा लौकरी । किंवा करूं हरी काय सांगा ॥३॥

खेळतां न भ्यावें समर्थाच्या बाळें । तयाच्या सकळ सत्तेखालीं ॥१॥

तरी लेवविला शोभे अळंकार । नाहीं तरी भार मानाविण ॥ध्रु.॥

अवघी च दिशा असावी मोकळी । मायबाप बळी ह्मणऊनि ॥२॥

तुका ह्मणे माझें ऐसें आहे देवा । ह्मणऊनि सेवा समर्पिली ॥३॥

निरांजनीं एकटवाणें । संग नेणें दुसरा ॥१॥

पाहा चाळविलें कैसें । लावुनि पिसें गोवळें ॥ध्रु.॥

लपलें अंगें अंग । दिला संग होता तो ॥२॥

तुका ह्मणे नव्हतें ठावें । जालें भावें वाटोळें ॥३॥

नव्हती भेटी तों चि बरें । होतां चोरें नाडिलें ॥१॥

अवाघियांचा केला झाडा । रिता वाडा खोंकर ॥ध्रु.॥

चिंतनांचें मूळ चित्त । नेलें वित्त हरूनि ॥२॥

तुका ह्मणे मूळा आलें । होतें केलें तैसें चि ॥३॥

जये ठायीं आवडी ठेली । मज ते बोली न संडे ॥१॥

पुरवावें जीवींचें कोड । भेटी गोड तुज मज ॥ध्रु.॥

आणिलें तें येथवरी । रूप दुरी न करावें ॥२॥

तुका ह्मणे नारायणा । सेवाहीना धिग वृत्ति ॥३॥

सरलियाचा सोस मनीं । लाजोनियां राहिलों ॥१॥

आवडीनें बोलावितों । येथें तें तों लपावें ॥ध्रु.॥

माझें तें चि मज द्यावें । होतें भावें जोडिलें ॥२॥

तुका ह्मणे विश्वंभरा । आळीकरा बुझावा ॥३॥

नाचावेंसें वाटे मना । छंद गुणा अधीन ॥१॥

चेष्टविलीं माझीं गात्रें । सत्तासूत्रें हालती ॥ध्रु.॥

नामरूपें रंगा आलीं। ते चि चाली स्वभावें ॥२॥

तुका ह्मणे पांडुरंगे । अंग संगें कविळलें ॥३॥

खेळतों ते खेळ पायांच्या प्रसादें । नव्हती हीं छंदें नासिवंतें ॥१॥

माझा मायबाप उभा विटेवरी । कवतुकें करी कृपादान ॥ध्रु.॥

प्रसादाची वाणी वदें ती उत्तरें । नाहीं मतांतरें जोडियेलीं ॥२॥

तुका ह्मणे रस वाढितिया अंगें । छाया पांडुरंगें केली वरी ॥३॥

अखंड मुडतर । सासुरवास करकर ॥१॥

याची जाली बोळवण । आतां न देखों तो शीण ॥ध्रु.॥

बहुतांची दासी । तये घरीं सासुरवासी ॥२॥

तुका ह्मणे मुळें । खंड जाला एका वेळें ॥३॥

अवघा भार वाटे देवा । संतसेवा न घडतां ॥१॥

कसोटी हे असे हातीं । सत्य भूतीं भगवंत ॥ध्रु.॥

चुकलोंसा दिसें पंथ । गेले संत तो ऐसा ॥२॥

तुका ह्मणे सोंग वांयां । कारण या अनुभवें ॥३॥

आतां तुह्मी कृपावंत । साधु संत जिवलग ॥१॥

गोमटें तें करा माझें । भार ओझें तुह्मांसी ॥ध्रु.॥

वंचिलें तें पायांपाशीं। नाहीं यासी वेगळें ॥२॥

तुका ह्मणे सोडिल्या गांठी । दिली मिठी पायांसी ॥३॥

सुख वाटे परी वर्म । धर्माधर्म न कळे ॥१॥

गायें नाचें एवढें जाणें । विठ्ठल ह्मणे निर्लज्ज ॥ध्रु.॥

अवघें माझें एवढें धन । साधन ही सकळ ॥२॥

तुका ह्मणे, पायां पडें । तुमच्या कोडें संतांच्या ॥३॥

धरिलीं जीं होतीं चित्तीं । डोळां तीं च दिसती ॥१॥

आलें आवडीस फळ । जालें कारण सकळ ॥ध्रु.॥

घेईन भातुकें । मागोनियां कवतुकें ॥२॥

तुका ह्मणे लाड । विठोबा पुरवील कोड ॥३॥

बहुतां दिसांची आजि जाली भेटी । जाली होती तुटी काळगती ॥१॥

येथें सावकासें घेईन ते धणी । गेली अडचणी उगवोनि ॥ध्रु.॥

बहु दुःख दिलें होतें घरीं कामें । वाढला हा श्रमश्रमें होता ॥२॥

बहु दिस होता पाहिला मारग । क्लेशाचा त्या त्याग आजि जाला ॥३॥

बहु होती केली सोंगसंपादणी । लौकिकापासूनि निर्गमलें ॥४॥

तुका ह्मणे येथें जालें अवसान । परमानंदीं मन विसावलें ॥५॥

पुत्र जाला चोर । मायबापा हर्ष थोर ॥१॥

आतां काशासाटीं जोडी । हाट धाटे गुंडगे घडी ॥ध्रु.॥

ऐते अपाहार । आणूनियां भरी घर ॥२॥

मानिली नििंश्चती । नरका जावया उभयतीं ॥३॥

झोडाझोडगीचे पोटीं । फळें बीजें तीं करंटीं ॥४॥

तुका ह्मणे बेट्या ॥ भांडवल न लगे खट्या ॥५॥

एवढी अपकीर्ती । ऐकोनियां फजीती ॥१॥

जरि दाविल वदन । थुंका थुंका तो देखोन ॥ध्रु.॥

काळिमेचें जिणें । जीऊनियां राहे सुनें ॥२॥

तुका ह्मणे गुण । दरुषणें अपशकुन ॥३॥

पुंडलीक भक्तराज । तेणें साधियेलें काज । वैकुंठींचें निज । परब्रह्म आणिलें ॥१॥

पांडुरंग बाळमूर्ति । गाईगोपाळां संगती । येऊनियां प्रीति । उभें सम चि राहिलें ॥ध्रु.॥

एका आगळें अक्षर । वैकुंठ चि दुसरें । ह्मणविती येरें । परि ती ऐसीं नव्हेती ॥२॥

पाप पंचक्रोशीमधीं । येऊ न सकेचिना आधीं । कैंची तेथें विधि-। निषेधाची वसति ॥३॥

पुराणें वदती ऐसें । चतुर्भुज तीं मानसें । सुदर्शनावरी वसे । रीग न घडे कल्पांतीं ॥४॥

महाक्षेत्र हें पंढरी । अनुपम्य इयेची थोरी । धन्य धन्य वारकरी । तुका ह्मणे तेथींचे ॥५॥

देह मृत्याचें भातुकें । कळों आलें कवतुकें ॥१॥

काय मानियेलें सार । हें चि वाटतें आश्चर्य ॥ध्रु.॥

नानाभोगांची संचितें । करूनि ठेविलें आइतें ॥२॥

तुका ह्मणे कोडीं । उगवून न सकती बापुडीं ॥३॥

त्यागें भोग माझ्या येतील अंतरा । मग मी दातारा काय करूं ॥१॥

आतां असो तुझे पायीं हें मोटळें । इंिद्रयें सकळें काया मन ॥ध्रु.॥

सांडीमांडी विधिनिषेधाचा ठाव । न कळतां भाव जाइल वांयां ॥२॥

तुका ह्मणे आतां नको उजगरा । लपवीं दातारा अंगीं मज ॥३॥

दावूनियां बंड । पुरे न करी तें भांड ॥१॥

जळो जळो तैसें जिणें । फटमरे लाजिरवाणें ॥ध्रु.॥

घेतलें तें सोंग । बरवें संपादावें सांग ॥२॥

तुका ह्मणे धीरें । देवें नुपेक्षिलें खरें ॥३॥

न पालटे जाती जीवाचिये साटीं । बाहे तें चि पोटीं दावी वरी ॥१॥

अंतरीं सबाहीं सारिखा चि रंग । वीट आणि भंग नाहीं रसा ॥ध्रु.॥

घणाचिया घायें पोटीं शिरे हिरा । सांडूं नेणे धीरा आपुलिया ॥२॥

तुका ह्मणे कढे करावी शीतळ । ऐसें जातिबळ चंदनाचें ॥३॥

दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आलें त्यासी जतन जीवें ॥१॥

समर्थासी असे विचाराची आण । भलीं पापपुण्य विचारावें ॥ध्रु.॥

काकुळतीसाटीं सत्याचा विसर । पडिलें अंतर न पाहिजे ॥२॥

तुका ह्मणे यश कीर्ति आणि मान । करितां जतन देव जोडे ॥३॥

विचारिलें आधीं आपुल्या मानसीं । वांचों येथें कैसीं कोण्या द्वारें ॥१॥

तंव जाला साह्य हृदयनिवासी । बुद्धि दिली ऐसी नास नाहीं ॥ध्रु.॥

उद्वेगाचे होतों पडिलों समुद्रीं । कोण रीती तरी पाविजेल ॥२॥

तुका ह्मणे दुःखें आला आयुर्भाव । जाला बहु जीव कासावीस ॥३॥

आपुलें वेचूनि खोडा घाली पाव । ऐसे जया भाव हीनबुद्धि तो ॥१॥

विषयांच्या संगें आयुष्याचा नास । पडियेलें ओस स्वहितांचे ॥ध्रु.॥

भुलल्यांचें अंग आपण्या पारिखें । छंदा च सारिखें वर्ततसे ॥२॥

तुका ह्मणे दुःख उमटे परिणामीं । लंपटासी कामीं रतलिया ॥३॥

केलें शकुनें प्रयाण । आतां मागें फिरे कोण ॥१॥

होय तैसें होय आतां । देह बळी काय चिंता ॥ध्रु.॥

पडिलें पालवीं। त्याचा धाक वाहे जीवीं ॥२॥

तुका ह्मणे जीणें । देवा काय हीनपणें ॥३॥

आळणी ऐसें कळों आलें । त्यासी भलें मौन्य चि ॥१॥

नये कांहीं वेचूं वाणी । वेडे घाणीसांगातें ॥ध्रु.॥

वेगळें तें देहभावा । भ्रम जीवा माजिरा ॥२॥

तुका ह्मणे कवतुक केलें । किंवा भलें दवडितां ॥३॥

चित्ताचा चाळक । त्याचें उभय सूत्र एक ॥१॥

नाचवितें नानाछंदें । सुखें आपुल्या विनोदें ॥ध्रु.॥

चंद्र कमळणी । नाहीं धाडीत सांगोनि ॥२॥

तुका ह्मणे उठी । लोह चुंबकाचे दृष्टी ॥३॥

करितां तडातोडी । वत्सा माते सोई ओढी ॥१॥

करित्याचा आग्रह उरे । एक एकासाटीं झुरे ॥ध्रु.॥

भुके इच्छी अन्न। तें ही त्यासाटीं निर्माण ॥२॥

तुका ह्मणे जाती । एक एकाचिये चित्तीं ॥३॥

निघालें दिवाळें । जालें देवाचें वाटोळें ॥१॥

आतां वेचूं नये वाणी । विचारावें मनिच्या मनीं ॥ध्रु.॥

गुंडाळिलीं पोतीं । भीतरी लावियेली वाती ॥२॥

तुका ह्मणे करा । ऐसा राहे माजी घरा ॥३॥

तीर्थाचिये आस । पंथ तो निट देव । पाविजेतो ठाव अंतराय ॥१॥

ह्मणऊनि भलें निश्चळ चि स्थळीं । मनाचिये मुळीं बैसोनियां ॥ध्रु.॥

संकल्पारूढ तें प्रारब्धें चि जिणें । कार्य चि कारणें वाढतसे ॥२॥

तुका ह्मणे कामा नाहीं एक मुख । जिरवितां सुख होतें पोटीं ॥३॥

क्षणक्षणा हा चि करावा विचार । तरावया पार भवसिंधु ॥१॥

नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥ध्रु.॥

संतासमागमीं धरूनि आवडी । करावी तांतडी परमाथाअ ॥२॥

तुका ह्मणे येह लोकीच्या वेव्हारें । नये डोळे धुरें भरूनि राहों ॥३॥

कोणाशीं विचार करावा सेवटीं । एवढ्या लाभें तुटी जाल्या तरे ॥१॥

सांभाळितो शूर आला घावडाव । पुढें दिला पाव न करी मागें ॥ध्रु.॥

घात तो या नांवें येथें अंतराय । अंतरल्या पाय गोविंदाचे ॥२॥

तुका ह्मणे गडसंदीचा हा ठाव । केला तो उपाव कार्या येतो ॥३॥

असा जी सोंवळें । आहां तैसे चि निराळे ॥१॥

आह्मीं नयों तुमच्या वाटा । काय लटिका चि ताठा ॥ध्रु.॥

चिंतन चि पुरे । काय सलगी सवें धुरे ॥२॥

तुका ह्मणे देवा । नका नावडे ते सेवा ॥३॥

अहंकार तो नासा भेद । जगीं निंदे ओंवळा ॥१॥

नातळे तो धन्य यासी । जाला वंषीं दीपक ॥ध्रु.॥

करवितो आत्महत्या। नेदी सत्या आतळों ॥२॥

तुका ह्मणे गुरुगुरी । माथां थोरी धरोनि ॥३॥

इिच्छलें ते शकुनवंती । होय देती तात्काळ ॥१॥

क्षीरा नीरा निवाड करी । वरावरी विठ्ठल ॥ध्रु.॥

भाग्याविण कैचें फळ ।अंतर मळमूत्राचें ॥२॥

तुका ह्मणे संचित कुडें । तें बापुडें करीतसे ॥३॥

काशासाठीं आह्मी जाळिला संसार । न करा विचार ऐसा देवा ॥१॥

कैसें नेणों तुह्मां करवतें उदास । माझा प्रेमरस भंगावया ॥ध्रु.॥

समर्पूनि ठेलों देह हा सकळ । धरितां विटाळ न लजा माझा ॥२॥

तुका ह्मणे अवघी मोकलूनि आस । फिरतों उदास कोणासाटीं ॥३॥

नाहीं तुह्मां कांहीं लाविलें मागणें । कांटाऑयाच्या भेणें त्रासलेती ॥१॥

एखादिये परी टाळावीं करकर । हा नका विचार देखों कांहीं ॥ध्रु.॥

पायांच्या वियोगें प्राणासवें साटी । ने घवेसी तुटी जाली आतां ॥२॥

तुका ह्मणे तुह्मां मागेन तें आतां । हें चि कृपावंता चरणीं वास ॥३॥

जग अमंगळ । लागे देखतां विटाळ ॥१॥

धर्म भूतांची ते दया । सत्य कारण ऐसीया ॥ध्रु.॥

नव्हे माझें मत । साक्षी करूनि सांगें संत ॥२॥

तुका ह्मणे जीवें । दावी उमटूनि अनुभवें ॥३॥

दंड अन्यायाच्या माथां । देखोनि करावा सर्वथा ॥१॥

नये उगे बहुतां घाटूं । सिसें सोनियांत आटूं ॥ध्रु.॥

पापुण्यासाठीं । नीत केली सत्ता खोटी ॥२॥

तुका ह्मणे देवा । दोष कोणाचा तो दावा ॥३॥

आह्मी पापी तूं पावन । हें तों पूर्वापार जाण ॥१॥

नवें करूं नये जुनें । सांभाळावें ज्याचें तेणें ॥ध्रु.॥

राखावा तो ठाव। मिरासी करोनि उपाव ॥२॥

वादें मारी हाका । देवा आइकवी तुका ॥३॥

पाडावी ते बरी । गांठी धुरेसवें खरी ॥१॥

नये मरों लंडीपणें । काय बापुडें तें जिणें ॥ध्रु.॥

लुटावें भांडार । तरी जया नाहीं पार ॥२॥

तुका ह्मणे नांवें । कीर्ती आगळीनें ज्यावें ॥३॥

भजनें चि जालें । मग जीवाचें काय आलें ॥१॥

येऊं नेदावी पुढती । आड भयाची ते जाती ॥ध्रु.॥

करितां सरोबरी। कांहीं न ठेवावी उरी ॥२॥

तुका ह्मणे शूर । व्हावे धुरेसीं च धुरे ॥३॥

जन्मांतरीं शुद्ध नाहीं आचरण । यालागीं चरण अंतरले ॥१॥

वोडवलें संचित येणें जन्में पाहतां । आतां पंढरिनाथा कृपा करीं ॥ध्रु.॥

पतितपावन िब्रद साच करीं देवा । यालागी कुढावा करीं माझा ॥२॥

अपराधी पातकी दृष्ट दुराचारी । अहाळलों भारी संवसारें ॥३॥

कामक्रोध आदि कल्पनेच्या त्रासें । तुज न पवें ऐसें जालें देवा ॥४॥

हा ना तोसा ठाव जाला पांडुरंगा । नये चि उपेगा काय करूं ॥५॥

आपुलिया नांवा धांवणिया धांवें । लवकरी यावें तुका ह्मणे ॥६॥

प्रेमभेटी आिंळगण । मग चरण वंदावे ॥१॥

ऐसामाझा भोळा बाप । हरी ताप कवळोनि ॥ध्रु.॥

न संगतां सीण भाग। पांडुरंग जाणतसे ॥२॥

तुका ह्मणे कृपावंतें । द्यावें, भातें न मागतां ॥३॥

वचनाचा अनुभव हातीं । बोलविती देव मज ॥१॥

परि हें न कळे अभाविकां । जडलोकां जिवांसी ॥ध्रु.॥

अश्रुत हे प्रसादिक । कृपा भीक स्वामीची ॥२॥

तुका ह्मणे वरावरी । जातों तरी सांगत ॥३॥

कां रे तुह्मीं ठेवा बहुतां निमित्तें । माझिया संचितें वोडवलें ॥१॥

भक्तिप्रेमगोडी बैसली जिव्हारीं । आनंद अंतरीं अंतरीं येणें झाला ॥ध्रु.॥

पुसिलें पडळ त्रिमिर विठ्ठलें । जग चि भरलें ब्रह्मानंदें ॥२॥

तुका ह्मणे केलों कामनेवेगळा । आवडी गोपाळावरी वसे ॥३॥

आसन शयन भोजन गोविंदें । भरलें आनंदें त्रिभुवन ॥१॥

अवघियां केली काळें तडातोडी । अवश्वरु घडी पुरों नये ॥ध्रु.॥

वांटणी घातले शरीराचे भाग । दुजियाचा लाग खंडियेला ॥२॥

आवडीच्या आलें आहारासी रूप । पृथक संकल्प मावळले ॥३॥

काम तरी क्रोध बुद्धि मन नासे । भ्रमाचे वोळसे गिळिले शांती ॥४॥

तुका ह्मणे मना श्रीरंगाचा रंग । बैसला अभंग एकविध ॥५॥

ज्वरल्यासी काढा औषध पाचन । मूढां नारायण स्मरवितो ॥१॥

भवव्याधि येणें तुटेल रोकडी । करूनियां झाडी निश्चयेसी ॥ध्रु.॥

आणिकां उपायां अनुपान कठिण । भाग्यें बरें सीण शीघ्रवत ॥२॥

तुका ह्मणे केला उघडा पसारा । भाग्य आलें घरा दारावरी ॥३॥

जपाचें निमित्त झोपेचा पसरु । देहाचा विसरू पाडूनियां ॥१॥

ऐसीं तीं भजनें अमंगळवाणी । सोंगसंपादणी बहुरूप्याची ॥ध्रु.॥

सेवेविशीं केलें लोभाचिये आसे । तया कोठें असे उरला देव ॥२॥

तुका ह्मणे मानदंभ जया चित्तीं । तयाची फजीती करूं आह्मी ॥३॥

परद्रव्य परकांता । नातळे जयाचिया चित्ता । आणि कर्मी तो तत्वता । बांधला न वजाय ॥१॥

ऐसा अनुभव रोकडा । विश्वासीतो जीवा जोडा । एकांत त्या पुढां । अवघा करी उकल ॥ध्रु.॥

सकट आंबलें तें अन्न । शोधीं तें चि मद्यपान । विषमानें भिन्न । केलें शुद्धाशुद्ध ॥२॥

तुका ह्मणे नित । बरवें अनुभवें उचित । तरी काय हित । मोलें घ्यावें लागतें ॥३॥

भूक पोटापुरती । तृष्णा भरवी वाखती । करवी फजीती । हांवें भार वाढला ॥१॥

कुळिकेसी लांस फांस । डोई दाढी बोडवी दोष । अविहितनाश । करवी वजन चुकतां ॥ध्रु.॥

विधिसेवनें विहितें । कार्यकारणापुरतें । न वाटे तो चित्तें । अधमांच्या तो त्यागी ॥२॥

आज्ञापालणें ते सेवा । भय धरोनियां जीवा । तुका ह्मणे ठेवा । ठेविला तो जतन ॥३॥

कळे न कळे त्या धर्म । ऐका सांगतों रे वर्म । माझ्या विठोबाचें नाम । अटाहासें उच्चारा ॥१॥

तो या दाखवील वाटा । तया पाहिजे त्या नीटा । कृपावंत मोटा । पाहिजे तो कळवळा ॥ध्रु.॥

पुसतां चुका होतो वाटा । सवें बोळावा गोमटा । मोडों नेदी कांटा । घेऊं सांटा चोरासी ॥२॥

तुका ह्मणे मोल । न लगें द्यावें वेचावे बोल । विठ्ठल विठ्ठल । ऐसा छंद मनासी ॥३॥

तरी कां वोळगणे । राजद्वारीं होती सुने ॥१॥

अंगीं दावुनि निष्कामता । पोकळ पोकळी ते वृथा ॥ध्रु.॥

कासया मोकळ। भोंवतें शिष्यांचे गाबाळ ॥२॥

तुका ह्मणे ढाळे । बाहेर गुदे तें निराळें ॥३॥

हरिच्या दासां सोपें वर्म । सर्व धर्म पाउलें ॥१॥

कडिये देव बाहेर खांदी । वैष्णव मांदी क्रीडेसी ॥ध्रु.॥

सरती येणें आटाआटी । नाहीं तुटी लाभाची ॥२॥

तुका ह्मणे समाधान । सदा मन आमुचें ॥३॥

भूतांचिये नांदे जीवीं । गोसावी च सकळां ॥१॥

क्षणक्षणां जागा ठायीं । दृढ पायीं विश्वास ॥ध्रु.॥

दावूनियां सोंग दुजें । अंतर बीजें वसतसे ॥२॥

तुका ह्मणे जाणे धने । धरी तें वर्म चिंतन ॥३॥

संत आले घरा । तों मी अभागी दातारा ॥१॥

कासयानें पूजा करूं । चरण हृदयीं च धरूं ॥ध्रु.॥

काया कुरवंडी। करुन ओंवाळून सांडी ॥२॥

तुका ह्मणे भावें । हात जोडीं असो ठावें ॥३॥

भेद तुटलियावरी । आह्मी तुमचीं च हो हरी ॥१॥

आतां पाळावे पाळावे । आह्मां लडिवाळांचे लळे ॥ध्रु.॥

आणिकांची देवा । नाहीं जाणत चि सेवा ॥२॥

तुका ह्मणे हेवा । माझा हेत पायीं देवा ॥३॥

आमुची विश्रांति । तुमचे चरण कमळापती ॥१॥

पुढती पुढती नमन । घालूंनियां लोटांगण ॥ध्रु.॥

हें चि एक जाणें। काया वाचा आणि मनें ॥२॥

नीच जनालोकां । तिळले पायेरीस तुका ॥३॥

विनवितों सेवटीं । आहे तैसें माझे पोटीं ॥१॥

कंठीं राहावें राहावें । हें चि मागतसें भावें ॥ध्रु.॥

पुरली वासना । येणें होईल नारायणा ॥२॥

तुका ह्मणे जो देहाडा । तो चि वर्णीन पवाडा ॥३॥

आवडीची सलगी पूजा । विषम दुजा भाव तो ॥१॥

ऐसीं उफराटीं वर्में । कळों भ्रमें न येती ॥ध्रु.॥

न लगे समाधान मोल । रुचती बोल प्रीतीचे ॥२॥

तुका ह्मणे एका जीवें । सूत्र व्होवें गुंतलें ॥३॥

बाळ माते लाते वरी । मारी तेणें संतोषे ॥१॥

सुख वसे चित्ता अंगीं । तें हें रंगीं मिळालें ॥ध्रु.॥

भक्षी त्याचा जीवमाग। आले भाग तो बरा ॥२॥

तुका ह्मणे ॠणानुबंधें । सांगें सुदें सकळां ॥३॥

शिजल्यावरी जाळ । वांयां जायाचें तें मूळ ॥१॥

ऐसा वारावा तो श्रम । अतिशयीं नाहीं काम ॥ध्रु.॥

सांभाळावें वर्म। उचिताच्या काळें धर्म ॥२॥

तुका ह्मणे कळे । ऐसें कारणाचे वेळे ॥३॥

उभा ऐल थडी । तेणें घालूं नये उडी ॥१॥

पुढें गेल्याचे उपाय । करावे ते केले काय ।ध्रु.॥

दिसतें आहारीं । नये जाऊं ऐशावरी ॥२॥

अळसाची धाडी ॥ तुका ह्मणे बहु नाडी ॥३॥

शक्ती द्याव्या देवा । नाहीं पदार्थी सेवा ॥१॥

मुख्य आहे ऐसा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥ध्रु.॥

मना पोटीं देव । जाणे जैसा तैसा भाव ॥२॥

तुका ह्मणे सोसें । लागे लाविल्याचें पिसें ॥३॥

कार्य चि कारण । तृष्णा पावविते सीण ॥१॥

काय करुनि ऐसा संग । सोसें चि तूं पांडुरंग ॥ध्रु.॥

रूपीं नाहीं गोडी । हांवें हांवें ऊर फोडी ॥२॥

तुका ह्मणे पडे भारी । ऐशा वरदळाचे थोरी ॥३॥

संसाराच्या नांवें घालूनियां शून्य । वाढता हा पुण्य केला धर्म ॥१॥

हरिभजनें हें धविळलें जग । चुकविला लाग किळकाळाचा ॥ध्रु.॥

कोणां ही नलगे साधनांचा पांग । करणें केला त्याग देहबुद्धी ॥२॥

तुका ह्मणे सुख समाधि हरिकथा । नेणें भववेथा गाईल तो ॥३॥

विश्वासिया नाहीं लागत सायास । रंग अनायासें अंगा येतो ॥१॥

लेंकराच्या हातें घास मागे माता । वोरसोनि चित्ता सुख पावे ॥ध्रु.॥

गौरव त्या मानी आरुषा वचनीं । भूषण ते वाणी मिरवावी ॥२॥

तुका ह्मणे आहेस सकळ ही साक्षी । माझा कइप पक्षी पांडुरंग ॥३॥

वैभवाचे धणी सकळां शरणागत । सत्यभावें चित्त अर्पिलें तें ॥१॥

नेदी उरों देव आपणावेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥

जाणोनि नेणोनि अंगा आली दशा । मग होय इच्छा आपणच ॥२॥

तुका ह्मणे बरें धाकट्याचें जिणें । माता स्तनपानें वाढवते ॥३॥

कइप ऐसी दशा येइल माझ्या आंगा । चित्त पांडुरंगा झुरतसे ॥१॥

नाठवुनि देह पायांचें चिंतन । अवसान तें क्षण नाहीं मधीं ॥ध्रु.॥

काय ऐसा पात्र होईन लाभासी । नेणों हृषीकेशी तुष्टईल ॥२॥

तुका ह्मणे धन्य मानीन संचित । घेईन तें नित्य प्रेमसुख ॥३॥

नाहीं वागवीत जाणिवेचें ओझें । स्वामिसेवेकाजे निर्धारु हा ॥१॥

आज्ञा ते प्रमाण हा मनीं निर्धार । येणें फिटे भार निश्चयेसी ॥ध्रु.॥

आळीकरें आह्मी एकविध चित्तें । तैसें होऊं येतें मायबापें ॥२॥

तुका ह्मणे माझी ये जातीची सेवा । घातलासे देवावरी भार ॥३॥

काय नाहीं माझे अंतरीं वसति । व्यापक हा भूतीं सकळां नांदे ॥१॥

चित्तासी प्रसाद होईल चळण । तें चि तें वळण मनासही ॥ध्रु.॥

सर्व शक्ति जीवीं राहिल्या कुंटित । नाहीं केलें होत आपुलें तें ॥२॥

तुका ह्मणे दोरी खांब सूjया हातीं । नाचवी नाचती जडें तैसीं ॥३॥

This abhang still carries a transcription error we could not repair automatically.

देवाचें निर्माल्य कोण शिवे हातीं । संकल्पासी होती विकल्प ते ॥१॥

वाहिलें देह हें देवा एकसरें । होईल तें बरें तेणें द्वारें ॥ध्रु.॥

होता भार त्याची निवारली खंती । येथें आतां रिती साटवण ॥२॥

तुका ह्मणे इच्छे पावविले कष्ट । ह्मणऊनि नष्ट दुरावली ॥३॥

देव तीर्थ येर दिसे जया ओस । तोचि तया दोष जाणतिया ॥१॥

तया बरें फावे देवा चुकवितां । संचिताची सत्ता अंतराय ॥ध्रु.॥

शुद्धाशुद्धठाव पापुण्यबीज । पाववील दुजे फळभोग ॥२॥

तुका ह्मणे विश्वंभराऐसें वर्म । चुकविल्या धर्म अवघे मिथ्या ॥३॥

काय करूं सांगतां ही न कळे वर्म । उपिस्थत भ्रम उपजवितो ॥१॥

मन आधीं ज्याचें आलें होईल हातां । तयावरी सत्ता केली चाले ॥ध्रु.॥

अभुकेचे अंगीं चवी ना सवाद । मिथ्या ऐसा वाद दुराग्रह ॥२॥

तुका ह्मणे आप राखावें आपणा । संकोचों चि कोणा नये आतां ॥३॥

अमृत अव्हेरें उचळलें जातां । विष आर्त्तभूतां आवश्यक ॥१॥

आदरासी मोल नये लावूं केजें । धीर शुद्धबीजें गोमटा तो ॥ध्रु.॥

ख†याचिये अंगीं आपणे चाली । लावणी लाविली काय लागे ॥२॥

तुका ह्मणे चाडे करा वेवसाव । आह्मांसी तो वाव धीर आहे ॥३॥

अनुभवाचे रस देऊं आर्त्तभूतां । सोडूं चोजवितां पुढें पोतीं ॥१॥

देवाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी । शोभतील गुणीं आपुलिया ॥ध्रु.॥

आधीं भाव सार शुद्ध ते भूमिका । बीज आणि पिका चिंता नाहीं ॥२॥

तुका ह्मणे ज्याचें नाम गुणवंत । तें नाहीं लागत पसरावें ॥३॥

काय मज एवढा भार । हे वेव्हार चाळवाया ॥१॥

उकल तो जाणे धणी । मज भोजनीं कारण ॥ध्रु.॥

चिंता ज्याची तया शिरीं । लेंकरीं तें खेळावें ॥२॥

तुका ह्मणे सेवट झाल । देव या बोला भोगिता ॥३॥

न गमे न गमे न गमे हरिविण । न मगे न मगे न मगे मेळवा शाम कोणी गे ॥१॥

तळमळ करी तैसा जीव जळाविण मासा । दिसती दिशा ओसा वो ॥ध्रु.॥

नाठवे भूक तान विकळ जालें मन । घडी जाय प्रमाण जुगा एकी वो ॥२॥

जरी तुह्मी नोळखा सांगतें ऐका । तुकयाबंधूचा सखा जगजीवन ॥३॥

विठ्ठला रे तुझे वर्णितां गुणवाद । विठ्ठला रे दग्ध जालीं पापें ॥१॥

विठ्ठला रे तुझें पाहातां श्रीमुख । विठ्ठला रे सुख जालें नयना ॥ध्रु.॥

विठ्ठला रे तुज देतां आलिंगन । विठ्ठला तनमन निवाल्या बाह्या ॥२॥

विठ्ठला रे तुझी ऐकतां कीर्त्ति । विठ्ठल हे विश्रांति पावले स्मरणें ॥३॥

विठ्ठला रे तुकयाबंधु ह्मणे देहभाव । विठ्ठला जीवीं पाव धरितां गेला ॥४॥

एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ । लेश तो ही मळ नाहीं येथें ॥१॥

घ्यावें द्यावें आह्मीं आपुलिया सत्ता । न देखों पुसता दुजा कोणी ॥ध्रु.॥

भांडाराची किली माझे हातीं आहे । पाहिजे तो पाहें वान येथें ॥२॥

तुका ह्मणे आह्मां विश्वासाच्या बळें। ठेविलें मोकळें देवें येथें ॥३॥

स्मरणाचे वेळे । व्हावें सावध न कळे ॥१॥

पडिलों विषयांचे ओढीं । कोणी न दिसेसें काढी ॥ध्रु.॥

भांडवल माझें । वेच जालें भूमी ओझें ॥२॥

तुका ह्मणे कळे । तूं चि धावें ऐसें वेळे ॥३॥

पाहा हो देवा कैसे जन । भिन्न भिन्न संचितें ॥१॥

एक नाहीं एका ऐसें । दावी कैसे शुद्ध हीन ॥ध्रु.॥

पंचभूतें एकी रासी । सूत्रें कैसीं खेळवी ॥२॥

तुका ह्मणे जे जे जाती । तैसी िस्थति येतसे ॥३॥

कोणाचिया न पडों छंदा । गोविंदासी आळवूं ॥१॥

बहुतांचीं बहु मतें । अवघे रिते पोकळ ॥ध्रु.॥

घटापटा ढवळी मन। होय सीण न करूं तें ॥२॥

तुका ह्मणे पांडुरंग । भरूं भाग आला तो ॥३॥

एकवेळ करीं या दुःखावेगळें । दुरिताचें जाळें उगवूनि ॥१॥

आठवीन पाय हा माझा नवस । रात्री ही दिवस पांडुरंगा ॥ध्रु.॥

बहु दूरवरी भोगविले भोग । आतां पांडुरंगा सोडवावें ॥२॥

तुका ह्मणे काया करीन कुरवंडी । ओंवाळूनि सांडीं मस्तक हें ॥३॥

आणीक म्यां कोणा यावें काकुळती । कोण कामा येती अंतकाळीं ॥१॥

तूं वो माझी सखी होसी पांडुरंगे । लवकरी ये गे वाट पाहें ॥ध्रु.॥

काया वाचा मनें हें चि काम करीं । पाउलें गोजिरीं चिंतीतसें ॥२॥

तुका ह्मणे माझी पुरवीं हे आस । घालीं ब्रह्मरस भोजन हें ॥३॥

हें आह्मां सकळा । तुझ्या नामाचें चि बळ ॥१॥

करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥

जयाचा जो भोग । सुख दुःख पीडी रोग ॥२॥

तुका ह्मणे देवा । तुझे पायीं माझा हेवा ॥३॥

आर्त माझ्या बहु पोटीं । व्हावीं भेटी पायांशी ॥१॥

यासी तुह्मी कृपावंता । माझी चिंता असों द्या ॥ ।ध्रु.॥

तळमळ करी चित्त । अखंडित वियोगें ॥२॥

तुका ह्मणे पंढरिनाथा । जाणें वेथा अंतरिंची ॥३॥

बहु जन्मांतरें फेरे । केले येरे सोडवीं ॥१॥

आळवितों करुणाकरे । विश्वंभरे दयाळे ॥ध्रु.॥

वाहवतों मायापुरीं । येथें करीं कुढावा ॥२॥

तुका ह्मणे दुजा कोण । ऐसा सीण निवारी ॥३॥

कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चित्त द्यावें बोला बोबडिया ॥१॥

सोडवूनि घ्यावें काळचक्रा हातीं । बहुत विपत्ती भोगविल्या ॥ध्रु.॥

ज्यालें जेऊं नेदी मारिलें चि मरो । प्रारब्धा उरो मागुतालीं ॥२॥

तुका ह्मणे दुजा खुंटला उपाय । म्हणऊनि पाय आठविले ॥३॥

डौरलों भक्तिसुखें । सेवूं अमृत हें मुखें ॥१॥

संतसंगें सारूं काळ । प्रेमसुखाचा कल्लोळ ॥ध्रु.॥

ब्रह्मादिकांसी सुराणी । तो हा आनंद मेदिनी ॥२॥

नाहीं वैकुंठींचा पांग । धांवे कथे पांडुरंग ॥३॥

मुक्त व्हावें काशासाठीं । कैची येणें रसें भेटी ॥४॥

तुका ह्मणे गोड । हें चि पुरे माझें कोड ॥५॥

फोडिलें भांडार । माप घेऊनियां खरें ॥१॥

केली हरिनामाची वरो । मागितलें आतां सरो ॥ध्रु.॥

देशांत सुकाळ । जाला हारपला काळ ॥२॥

घ्यावें धणीवरी । तुका ह्मणे लाहान थोरीं ॥३॥

आनंदाचे डोहीं आनंदतरंग । आनंद चि अंग आनंदाचें ॥१॥

काय सांगों जालें कांहऴिचयाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥ध्रु.॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥२॥

तुका ह्मणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥

ह्मणऊनि धरिले पाय । अवो माय विठ्ठले ॥१॥

आपुलें चि करूनि घ्यावें । आश्वासावें आह्मास ॥ध्रु.॥

वाढली ते तळमळ चिंता । शम आतां करावी ॥२॥

तुका ह्मणे जीवीं वसे । मज नसे वेगळी ॥३॥

कल्याण या आशीर्वादें । जाती द्वंद्वें नासोनि ॥१॥

आश्वासिलें नारायणें । प्रेमदानें अंतरिंच्या ॥ध्रु.॥

गेली निवारोनि आतां । सकळ चिंता यावरि ॥२॥

तुका ह्मणे गातां गीत । आलें हित सामोरें ॥३॥

हरिनामवेली पावली विस्तार । फळीं पुष्पीं भार बोल्हावला ॥१॥

तेथें माझ्या मना होइप पिक्षराज । साधावया काज तृप्तीचें या ॥ध्रु.॥

मुळऴिचया बीजें दाखविली गोडी । लवकर चि जोडी जालियाची ॥२॥

तुका ह्मणे क्षणक्षणां जातो काळ । गोडी ते रसाळ अंतरेल ॥३॥

बरवें ऐसें आलें मना । नारायणा या काळें ॥१॥

देव आह्मा प्राणसखा । जालें दुःखा खंडण ॥ध्रु.॥

जन्मांतरिंच्या पुण्यरासी । होत्या त्यांसी फळ आलें ॥२॥

तुका ह्मणे निजठेवा । होईल हेवा लाधलों ॥३॥

जरि हे आड यती लाज । कैसें काज साधतें ॥१॥

कारण केलें उठाउठी । पायीं मिठी घातली ॥ध्रु.॥

समर्पिला जीव भाव । धरिला भाव अखंड ॥२॥

तुका ह्मणे आड कांहीं । काळ नाहीं घातला ॥३॥

पात्र शुद्ध चित्त गोही । न लगे कांहीं सांगणें ॥१॥

शूर तरी सत्य चि व्हावें । साटी जीवें करूनि ॥ध्रु.॥

अमुप च सुखमान । स्वामी जन मानावें ॥२॥

तुका ह्मणे जैसी वाणी । तैसे मनीं परिपाक ॥३॥

प्रगटलें ज्ञान । नारायण भूतीं तें ॥१॥

अनुभव च घेऊं व्हावा । विनंती देवा करूनियां ॥ध्रु.॥

देखोवेखीं वदे वाणी। पडिल्या कानीं प्रमाणें ॥२॥

तुका ह्मणे योगक्षेम । घडे तें वर्म साधावें ॥३॥

मुख्य आधीं विषयत्याग । विधिभाग पाळणें ॥१॥

मन पावे समाधान । हें चि दान देवाचें ॥ध्रु.॥

उदासीन वृत्ति देहीं। चाड नाहीं पाळणें ॥२॥

तुका ह्मणे नाहीं भय । सम सोय विषमाची ॥३॥

आतां हें चि सार हें चि सार । मूळबीज रे आइका ॥१॥

आवडीनें आवडी उरे । जें ज्या झुरे तें त्यासी ॥ध्रु.॥

प्रेमाचिया सूत्रदोरी । नाहीं उरी उरवी ॥२॥

तुका ह्मणे चिंतन बरें । आहे खरें ख†यापें ॥३॥

केला तैसा अंगीकार । माझा भार चालवीं ॥१॥

होऊं अंतराय बुद्धी । कृपानिधी नेदावी ॥ध्रु.॥

आह्मी तरी जड जीव। कैंचा भाव पुरता ॥२॥

अनन्यभावें घ्यावी सेवा । आह्मां देवा घडेसी ॥३॥

तुह्मीं आह्मी शरणागतें । कृपावंतें रक्षीजे ॥४॥

तुका ह्मणे भाकुं कींव । असों जीव जड आह्मी ॥५॥

सोसें बहुगर्भवासीं । मेलों असों उपवासीं । नाहीं सखीं ऐसीं । तेथें कोणी भेटलीं ॥१॥

करीं करीं रे स्वहित । देह तंव हे अनित्य । नाहीं दिलें चित्त । सोडवूं मोहापासोनि ॥ध्रु.॥

पाळी तोंडऴिचया घांसें । तें चि होय अनारिसें । ज्या नव्हे ऐसें । खेदी परि सोडवीना ॥२॥

तुका ह्मणे धनमानें । माझ्या बाटलों मीपणें । नाहीं दिला जनें । देखों लाभें हा लाभ ॥३॥

इिच्छती तयांसी व्हावें जी अरूप । आह्मांसी स्वरूपिस्थती चाड ॥१॥

आतां नव्हे माझा भाव अनारिसा । पाउलांनी इच्छा गोवियेली ॥ध्रु.॥

लेंकरासी कोठें जाणत्याची परी। करूं येते दुरी धरावया ॥२॥

लागली न सुटे नामाची आवडी। माझी भावजोडी भंगूं नका ॥३॥

घेसील वेढे मुक्तीच्या अभिळासें। चाळवीं जा पिसे ब्रह्मज्ञानी ॥४॥

तुका ह्मणे माझा कोठें भक्तिरस। पाडावया ओस चाळविसी ॥५॥

आह्मां भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती । अळंकारयुक्ति । सरों शके चि ना ॥१॥

जाणें माउली त्या खुणा। क्षोभ उपजों नेदी मना । शांतवूनि स्तना ॥लावीं अवो कृपाळे ॥ध्रु.॥

तुज अवघे होऊं येते । मज वाटों नये चित्ते । उपासने परतें। नये कांहीं आवडों ॥२॥

करूं रूपाची कल्पना । मुखीं नाम उच्चारणा। तुका ह्मणे जना । जल स्थल देखतां ॥३॥

ज्यावें हीनपणें । कासयाच्या प्रयोजनें ॥१॥

प्रारब्धीं संसार । बरी हिमतीची थार ॥ध्रु.॥

होणार ते कांहीं । येथें अवकळा नाहीं ॥२॥

तुका ह्मणे देवें । कृपा केलिया बरवें ॥३॥

किती रांडवडे । घालूनि व्हाल रे बापुडे । संसाराचे भिडे । कासावीस जालेती ॥१॥

माझ्या स्वामी शरण रिघा । कृपाळुवा पांडुरंगा । ठेवी अंगसंगा । विश्वासियां जवळी ॥ध्रु.॥

कांहीं न मागतां भलें । होईल तें चि काम केलें । नसावें आथिलें। कांहीं एका संकल्पें ॥२॥

तुका ह्मणे भाव । पाववील ठायाठाव । एकविध जीव । ठेविलिया सेवेसी ॥३॥

बाप करी जोडी लेंकराचे ओढी । आपुली करवंडी वाळवूनी ॥१॥

एकाएकीं केलों मिरासीचा धनी । कडिये वागवूनी भार खांदीं ॥ध्रु.॥

लेवऊनी पाहे डोळा अळंकार । ठेवा दावी थोर करूनियां ॥२॥

तुका ह्मणे नेदी गांजूं आणिकांसी । उदार जीवासी आपुलिया ॥३॥

या रे हरिदासानो जिंकों किळकाळा । आमुचिया बळा पुढें किती बापुडें ॥१॥

रंग सुरंग घमंडी नाना छंदें । हास्यविनोदें मनाचिये आवडी ॥ध्रु.॥

येणें तेणें प्रकारें बहुतां सुख जोडे । पूजन तें घडे नारायणा अंतरीं ॥२॥

वांकड्या माना बोल बोलावे आर्ष । येईल तो त्यांस छंद पढीयें गोविंदा ॥३॥

आपुलालें आवडी एकापुढें एक नटा । नाहीं थोर मोठा लहान या प्रसंगीं ॥४॥

तुका ह्मणे येथें प्रेम भंगूं नये कोणीं । देव भक्त दोन्ही निवडितां पातक ॥५॥

अवघा च अन्यायी । तेथें एकल्याचें काई ॥१॥

आतां अवघें एकवेळें । जळोनि सरो तें निराळें ॥ध्रु.॥

काय माझें खरें । एवढें च राखों बरें ॥२॥

तुका ह्मणे आतां । परिहार न लगे चित्ता ॥३॥

काय वृंदावन मोहियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिलें ॥१॥

तैसी अधमाची जाती च अधम । उपदेश श्रम करावा तो ॥ध्रु.॥

न कळे विंचासी कुरवाळिलें अंग । आपले ते रंग दावीतसे ॥२॥

तुका ह्मणे नये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा ॥३॥

स्तवूनियां नरा । केला आयुष्याचा मातेरा ॥१॥

नारायणचिया लोपें । घडलीं अवघीं चि पापें ॥ध्रु.॥

जीव ज्याचें दान। त्याचा खंडूनियां मान ॥२॥

तुका ह्मणे वाणी । आइके त्या दोष कानीं ॥३॥

संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान ॥१॥

ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥ध्रु.॥

घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥२॥

तुका ह्मणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम ॥३॥

अवो कृपावंता । होइप बुद्धीचा ये दाता ॥१॥

जेणें पाविजे उद्धार । होय तुझे पायीं थार ॥ध्रु.॥

वदवीं हे वाचा । भाव पांडुरंगीं साचा ॥२॥

तुका ह्मणे देवा । माझे अंतर वसवा ॥३॥

नाहीं म्या वंचिला मंत्र कोणापाशीं । राहिलों जीवासीं धरूनि तो ॥१॥

विटेवरी भाव ठेवियेलें मन । पाउलें समान चिंतीतसें ॥ध्रु.॥

पावविला पार धरिला विश्वास । घालूनियां कास बळकट ॥२॥

तुका ह्मणे मागें पावले उद्धार । तिहीं हा आधार ठेविलासे ॥३॥

चंचळीं चंचळ निश्चळीं निश्चळ । वाजवी खळाळ उदकासी ॥१॥

सोपें वर्म परि मन नाहीं हातीं । हा हा भूत चित्तीं भ्रम गाढा ॥ध्रु.॥

रविबिंब नाहीं तुटत उदका । छायेची ते नका सरी धरूं ॥२॥

तुका ह्मणे भय धरी रज्जूसाटीं । नाहीं साच पोटीं कळलें तों ॥३॥

आवडी येते कळों । गुणें चिन्हें उमटती ॥१॥

पोटीचें ओठीं उभें राहे । चित्त साहे मनासी ॥ध्रु.॥

डाहोळे याची भूक गर्भा । ताटीं प्रभा प्रतिबिंबे ॥२॥

तुका ह्मणे मानोन घ्यावें । वाटे खावें वाटतें ॥३॥

काय ऐसी वेळ । वोडवली अमंगळ ॥१॥

आजि दुखवलें मन । कथाकाळीं जाला सीण ॥ध्रु.॥

पापाचिया गुणें । त्यांचिया वेळे दर्षणें ॥२॥

तुका ह्मणे कानीं । घालूं आले दुष्टवाणी ॥३॥

किती वेळां जन्मा यावें । नित्य व्हावें फजीत ॥१॥

ह्मणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोबासी ॥ध्रु.॥

प्रारब्ध पाठी गाढें । न सरें पुढें चालत ॥२॥

तुका ह्मणे रोकडीं हे । होती पाहें फजीती ॥३॥

होतों सांपडलों वेठी । जातां भेटी संसारा ॥१॥

तों या वाटे कृपा केली । भेटी जाली विठोबासी ॥ध्रु.॥

होता भार माथां माझे । बहु ओझें अमुप ॥२॥

तुका ह्मणे केली चिंता । कोण दाता भेटेल ॥३॥

भुंकुनियां सुनें लागे हस्तीपाठी । होऊनि हिंपुटी दुःख पावे ॥१॥

काय त्या मशकें तयाचें करावें । आपुल्या स्वभावें पीडतसे ॥ध्रु.॥

मातलें बोकड विटवी पंचानना । घेतलें मरणा धरणें तें ॥२॥

तुका ह्मणे संतां पीडितील खळ । घेती तोंड काळें करूनियां ॥३॥

जा रे तुह्मी पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥१॥

गुण दोष नाणी मना । करी आपणासारिखें ॥ध्रु.॥

उभारोनि उभा कर । भवपार उतराया ॥२॥

तुका ह्मणे तांतड मोठी । जाली भेटी उदंड ॥३॥

गर्जत जावें नामावळी । प्रेमें टाळी वाहोनि ॥१॥

येणें सुखें पुढती धांवे । भेटी सवें गोपाळा ॥ध्रु.॥

लोटांगण घाला तळीं । वंदा धुळी संतांची ॥२॥

तुका ह्मणे विठ्ठल लाहो । ऐसा बाहो उभारा ॥३॥

अनुसरे तो अमर जाला । अंतरला संसारा ॥१॥

न देखती गर्भवास । कधीं दास विष्णूचे ॥ध्रु.॥

विसंभेना माता बाळा। तैसा लळा पाळावा ॥२॥

त्रिभुवनीं ज्याची सत्ता । तुक्या रिक्षता तो जाला ॥३॥

आतां केशीराजा हे चि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥

देह असो माझा भलतिये ठायीं । चित्त तुझ्या पायीं असों द्यावें ॥ध्रु.॥

काळाचें खंडण घडावें चिंतन । धनमानजनविन्मुख तो ॥२॥

कफवातपित्त देहअवसानीं । ठेवावीं वारूनि दुरितें हीं ॥३॥

सावध तों माझीं इंिद्रयें सकळें । दिलीं एका वेळे हाक आधीं ॥४॥

तुका ह्मणे तूं या सकळांचा जनिता । येथें ऐकता सकळांसी ॥५॥

चित्त तें चिंतन कल्पनेची धांव । जे जे वाढे हांव इंिद्रयांची ॥१॥

हात पाव दिसे शरीर चालतां । नावें भेद सत्ता जीवाची ते ॥ध्रु.॥

रवीचिये अंगीं प्रकाशक कळा । वचनें निराळा भेद दिला ॥२॥

तुका ह्मणे माप वचनाच्या अंगीं । मौन्य काय रंगीं निवडावें ॥३॥

बोलोनियां काय दावूं । तुह्मी जीऊ जगाचे ॥१॥

हे चि आतां माझी सेवा । चिंतन देवा करितों ॥ध्रु.॥

विरक्तासी देह तुच्छ । नाहीं आस देहाची ॥२॥

तुका ह्मणे पायापाशीं । येइन ऐसी वासना ॥३॥

निजों नव्हें सकाळवेळीं । रातीकाळी चिंन चिंनी ॥१॥

वोंगळानें घेतली पाठी । केली आटी जीवासी ॥ध्रु.॥

मेळऊनि सवें जन । चिंता नेणे देवळीं च ॥२॥

तुका ह्मणे आलों घरा । तोंडा घोरा बाइलेच्या ॥३॥

मायबाप सवें नये धनवित्त । करावें संचित भोगावें तें ॥१॥

ह्मणऊनि लाभ काय तो विचारीं । नको चालीवरी चित्त ठेवूं ॥ध्रु.॥

आयुष्य सेवटीं सांडूनि जाणार । नव्हे हें साचार शरीर हें ॥२॥

तुका ह्मणे काळें लावियेलें माप । जमे धरी पापपुण्याची ही ॥३॥

मोटळें हाटीं सोडिल्या गांठी । विक†या घातलें केण।

ज्याचे भाग त्यासी देऊनि वारिलें । सारूनि लिगाड दान ।

खरें माप हातीं घेऊनि बैसलों । मानिती ते चौघे जन ।

खरें वित्त तेथें आले चोजवीत । गि†हाइक संतजन ॥१॥

झाडिला पालव केला हाट वेच । जाली सकाळीं च अराणूक ।

याल तरि तुह्मी करा लगबग । आमचे ते कोणी लोक ॥ध्रु.॥

एक ते उत्तम मध्यम कनिष्ठ । वित्ताचे प्रकार तीन ।

बहुतां जनाचे बहुत प्रकार । वेगळाले वाण ।

लाभ हाणि कोणा मुदल जालें । कोणासी पडिलें खाण ।

अर्धमर्ध कोणी गुंतोनि राहिले । थोडे तैसे बहु जन ॥२॥

एके सांते आले एक गांवीहून । येकामे चि नव्हे जाणें ।

येतां जातां रुजू नाहीं दिवाणा । काळतोंडीं एकें तेणें ।

लाग भाग एकी एकानीं गोविलें । मागील पुढिलां ॠणें ।

तुका ह्मणे आतां पाहूं नये वास। साधावें आपुलें पेणें ॥३॥

करा करा लागपाट । धरा पंढरीची वाट । जंव नाहीं चपेट । घात पडिला काळाचा ॥१॥

दुजा ऐसा नाहीं कोणी । जो या काढी भयांतूनि । करा ह्मणऊनि । हा विचार ठायींचा ॥ध्रु.॥

होती गात्रें बेंबळीं । दिवस अस्तमाना काळीं । हातपायटाळीं । जें मोकळी आहेती ॥२॥

कां रे घेतलासी सोसें । तुज वाटताहे कैसें। तुका ह्मणे ऐसें । पुढें कैं लाहासी ॥३॥

यत्न आतां तुह्मी करा । मज दातारा सत्तेनें ॥१॥

विश्वास तो पायांवरि । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥

जाणत चि दुजें नाहीं । आणीक कांहीं प्रकार ॥२॥

तुका ह्मणे शरण आलों । नेणें बोलों विनवितां ॥३॥

अनाथां जीवन । आह्मां तुमचे चरण । करूनि सांटवण। धरीयेले हृदयीं ॥१॥

पुष्ट जाली अंगकांति । आनंद न समाये चित्तीं । कवतुकें प्रीती । गाऊं नाचों उल्हासें ॥ध्रु.॥

करुणाउत्तरीं। करून आळवण हरी । जाऊं नेदूं दुरी । प्रेमप्रीतिपडिभरें ॥२॥

मोहो माते करी गोवा । ऐसें आहे जी केशवा । तुका ह्मणे सेवा । आणीक नाहीं जाणत ॥३॥

सुखाची वसति जाली माझे जीवीं । तुमच्या गोसावी कृपादानें ॥१॥

रूप वेळावेळां आठवीं अंतरीं । बैसोनि जिव्हारीं राहिलें तें ॥ध्रु.॥

विसांवलें मन विठ्ठलें प्रपंचा ॥ गोडावली वाचा येणें रसें ॥२॥

तुका ह्मणे कांहीं नाठवेसें केलें । दुसरें विठ्ठलें मज आतां ॥३॥

आह्मां कांहीं आह्मां कांहीं । आतां नाहीं या बोलें ॥१॥

मोल सांगा मोल सांगा । घेणें तिंहीं गा पुसावें ॥ध्रु.॥

कैसें घडे कैसें घडे । बडबड तुज मज ॥२॥

मुदलें साटी मुदलें साटी । लाभ पोटीं त्या च मधीं ॥३॥

तुका ह्मणे साटवूं घरीं । आडल्या काळें पुसती तरी ॥४॥

घ्या रे भाई प्या रे भाई । कोणी कांहीं थोडें बहु ॥१॥

ये च हाटीं ये च हाटीं । बांधा गाठी पारखून ॥ध्रु.॥

वेच आहे वेच आहे । सरलें पाहे मग खोटें ॥२॥

उघडें दुकान उघडें दुकान । रात्री जाली कोण सोडी मग ॥३॥

तुका ह्मणे अंतकाळीं । जाती टाळीं बैसोनि ॥४॥

मार्ग चुकले विदेशीं एकले । तयावरि जाले दिशाभुली ॥१॥

हातीं धरूनियां पावविलें घरा । त्याच्या उपकारा काय द्यावें ॥२॥

तैसा मी कुडकुडा होतों केशीराजा । सेवा न घडे लाजा ह्मणऊनि ॥ध्रु.॥

सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभाळिली भूमि शुद्ध ॥३॥

उष्ण तान भूक एवढिये अकांतीं । वोसंगा लाविती काय ह्मणिजे ॥४॥

खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे। अन्याय हि मोटे साच केले ॥५॥

हातींचें हिरोनि घातला पाठीसी। तुका ह्मणे ऐसी परी जाली ॥६॥

3287 जैसी तैसी तरि वाणी । मना आणी माउली ॥१॥

लेकरांच्या स्नेहें गोड । करी कोड त्या गुणें ॥ध्रु.॥

मागें पुढें रिघे पोटीं । साहे खेटी करीतें ॥२॥

तुका विनवी पांडुरंगा । ऐसें पैं गा आहे हें ॥३॥

गुणांचे आवडी वाचेचा पसरू । पडिला विसरु इतरांचा ॥१॥

आदिमध्यअंतीं नाहीं अवसान । जीवनीं जीवन मिळोनि गेलें ॥ध्रु.॥

रामकृष्णनाममाळा हे साजिरी । ओविली गोजिरी कंठाजोगी ॥२॥

तुका ह्मणे तनु जालीसे शीतळ । अवघी सकळ ब्रह्मानंदें ॥३॥

देवाची भांडारी । आदा विनियोग करी ॥१॥

आतां न माखे हातपाय । नेणों होतें ऐसें काय ॥ध्रु.॥

देवें नेली चिंता । जाला सकळ करिता ॥२॥

तुका ह्मणे धणी । त्यासी अवघी पुरवणी ॥३॥

पेणावलें ढोर मार खाय पाठी । बैसलें तें नुठी तेथूनियां ॥१॥

तैसी माझ्या मना परी जाली देवा । धावें अहंभावा सांडावलों ॥ध्रु.॥

कडां घालीं उडी मागिलांच्या भेणें । मरणामरण न कळे चि ॥२॥

तुका ह्मणे जालों त्यापरी दुःखित । असें बोलावीत पांडुरंगा ॥३॥

जालिया दर्शन करीन मी सेवा । आणीक ही देवा न लगे दुजें ॥१॥

प्रारब्धा अंगीं अन्न आच्छादन । िस्थर करोनि मन ठेवीं पायीं ॥ध्रु.॥

ये गा ये गा ये गा कृपाळुवा हरी । निववीं अभ्यंतरीं देउनि भेटी ॥२॥

आसावलें मन जीवनाचे ओढी । नामरूपें गोडी लावियेली ॥३॥

काय तुह्मांपाशीं नाहीं भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥४॥

काय लोखंडाचे पाहे गुण दोष । सिवोनि परिस सोनें करी ॥५॥

तुका ह्मणे माझें अवघें असों द्यावें। आपुलें करावें ब्रीद साच ॥६॥

येथें आड कांहीं न साहे आणीक । प्रमाण तें एक हें चि जालें ॥१॥

गाऊं नाचों टाळी गाऊं गाऊं गीत छंदें । डोलवूं विनोदें अंग तेणें ॥ध्रु.॥

मथुनियां सार काढिलें बाहेरी । उपाधि ते येरी निवडिली ॥२॥

तुका ह्मणे जगा लाविली शिराणी । सेवितां हे धणी होत नाहीं ॥३॥

शरणागत जालों । तेणें मीपणा मुकलों ॥१॥

आतां दिल्याची च वाट । पाहों नाहीं खटपट ॥ध्रु.॥

नलगे उचित । कांहीं पाहावें संचित ॥२॥

तुका ह्मणे सेवा । माने तैसी करूं देवा ॥३॥

वाचेचिया आळा कविळलें ब्रह्म । चुकविला श्रम पृथक तो ॥१॥

सुलभ जालें सुलभ जालें । जवळी आलें पंढरिये ॥ध्रु.॥

नामरूपाचें बांधलें मोटळें । एक एका वेळे सारियेलें ॥२॥

तुका ह्मणे वाटे चुकली वसती । उद्धार तो हातीं आणियेला ॥३॥

सवंग जालें सवंग जालें । घरा आलें बंदरींचे ॥१॥

आतां हेवा करावा सोस । भक्तिरस बहु गोड ॥ध्रु.॥

पाउल वेचे चिंता नाहीं । आड कांहीं मग नये ॥२॥

तुका ह्मणे संचिताचें । नेणें काचें राहों तें ॥३॥

तुह्मी संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणूं ॥१॥

अवतार तुह्मां धराया कारणें । उद्धरावें जन जड जीव ॥ध्रु.॥

वाढविलें सुख भक्ति भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें ॥२॥

तुका ह्मणे गुण चंदनाचे अंगीं । तैसे तुह्मी जगीं संतजन ॥३॥

पाठी लागे तया दवडीं दुरी । घालीं या बाहेरी संवसारा ॥१॥

येउनि दडें तुमच्या पायीं । धांवें तइप छो ह्मणा ॥ध्रु.॥

पारखियाचा वास पडे । खटबड उठी तें ॥२॥

तुका ह्मणे लाविला धाक । नेदी ताक खाऊं कोणी ॥३॥

सांखिळलों प्रीती गळां । भुंके वेळा जाणोनियां ॥१॥

तुमचें मी केशीराजा । सुनें या काजा पाळिलों ॥ध्रु.॥

आलें गेलें कळे वाटा । कोण निटा वाकडिया ॥२॥

तुका ह्मणे आलें वारी । दुरितें दुरी नातळतां ॥३॥

सुनियांचा हा चि भाव । आपला ठाव राखावा ॥१॥

दुजियाचा येऊं वारा । नेदूं घरावरी देऊं ॥ध्रु.॥

केली याची फाडाफाडी। तडामोडी क्षेत्राची ॥२॥

पातेजत नाहीं लोकां । तुका देवावांचूनि ॥३॥

सुनियांची आवडी देवा । घेत सेवा नाहीं कांहीं ॥१॥

सिकविलें जवळी बैसों । जेथें असों तेथें चि ॥ध्रु.॥

नेदी दुजें बोलों करूं । गुरुगुरु न साहे ॥२॥

तुका ह्मणे कृवाळितां । अंग सत्ता संगाची ॥३॥

Not in the Wikisource transcription: 3287.

Text: तुकाराम गाथा on Marathi Wikisource, which does not name the printed edition it was transcribed from. The verses are public domain; the transcription is by Wikisource contributors, CC BY-SA 4.0. Its systematic legacy-font errors are repaired by rule (see the reading page for details); some remain — इप printed for ई in about 220 abhangas, and a few vowel signs on the wrong letter. Numbering follows Wikisource; printed editions differ. Spotted a wrong line? Write to us with the number.

If you need to talk to someone now: Tele-MANAS 14416 (free, 24×7) · Vandrevala +91 99996 66555 (24×7, call or WhatsApp) · AASRA 022 2754 6669 (24×7) · iCall 9152 987 821 (Mon–Sat, 8am–9pm) · Emergency 112