तुह्मी बैसलेती निर्गुणाचे खोळे । आह्मां कां हे डोळे कान दिले ॥१॥
नाइकवे तुझी अपकीर्त्ति देवा । अव्हेरली सेवा न देखवे ॥ध्रु.॥
आपुले पोटीं तों राखियेला वाव । आह्मांसी कां भाव अल्प दिला ॥२॥
तुका ह्मणे दुःखी असें हें कळों द्या । पुढिलिया धंद्या मन नेघे ॥३॥
सोंगें छंदें कांहीं । देव जोडे ऐसें नाहीं ॥१॥
सारा अवघें गाबाळ । डोऑया आडील पडळ ॥ध्रु.॥
शुद्ध भावाविण । जो जो केला तो तो सीण ॥२॥
तुका ह्मणे कळे । परि होताती अंधळे ॥३॥
अवघीं भूतें साम्या आलीं । देखिलीं म्यां कैं होतीं ॥१॥
विश्वास तो खरा मग । पांडुरंगकृपेचा ॥ध्रु.॥
माझी कोणी न धरो शंका ।हो कां लोकां निद्वपद्व ॥२॥
तुका ह्मणे जें जें भेटे । तें तें वाटे मी ऐसें ॥३॥
सत्यसंकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥
येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फळ इच्छेचेंतें ॥ध्रु.॥
अंतरींचें बीज जाणे कळवळा । व्यापक सकळां ब्रह्मांडाचा ॥२॥
तुका ह्मणे नाहीं चालत तांतडी । प्राप्तकाळघडी आल्याविण ॥३॥
काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
थोरींव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥ध्रु.॥
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥२॥
भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥३॥
तुका ह्मणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें जरवतसे ॥४॥
जन्मा आलों त्याचें । आजि फळ जालें साचें ॥१॥
तुह्मी सांभाळिलों संतीं । भय निवारली खंती ॥ध्रु.॥
कृत्याकृत्य जालों । इच्छा केली ते पावलों ॥२॥
तुका ह्मणे काळ । आतां करूं न शके बळ ॥३॥
काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशीं ॥१॥
तुह्मी जालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥ध्रु.॥
काय वोळलें संचित । ऐसें नेणें अगणित ॥२॥
तुका ह्मणे नेणें । काय केलें नारायणें ॥३॥
असें येथींचिया दिनें । भाग्यहीन सकळां ॥१॥
भांडवल एवढें गांठी । नाम कंठीं धरियेलें ॥ध्रु.॥
आणिक तें दुजें कांहीं । मज नाहीं यावरी ॥२॥
तुका ह्मणे केली कोणें । एवढा नेणें लौकिक ॥३॥
गायें नाचें वायें टाळी । साधन कळी उत्तम हें ॥१॥
काय जाणों तरले किती । नाव ऐती या बैसा ॥ध्रु.॥
सायासाचें नाहीं काम । घेतां नाम विठोबाचें ॥२॥
तुका ह्मणे निर्वाणीचें । शस्त्र साचें हें एक ॥३॥
सर्वकाळ माझे चित्तीं । हे चि खंती राहिली ॥१॥
बैसलें तें रूप डोळां । वेळोवेळां आठवे ॥ध्रु.॥
वेव्हाराची सरली मात । अखंडित अनुसंधान ॥२॥
तुका ह्मणे वेध जाला । अंगा आला श्रीरंग ॥३॥
जैसें दावी तैसा राहे । तरि कां देव दुरी आहे ॥१॥
दुःख पावायाचें मूळ । रहनी ठाव नाहीं ताळ ॥ध्रु.॥
माळामुद्रांवरी। कैंचा सोंगें जोडे हरि ॥२॥
तुका ह्मणे देखें । ऐसे परीचीं बहुतेकें ॥३॥
अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चरण ॥१॥
येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥ध्रु.॥
संग हरिच्या नामाचा। शुचिर्भूत सदा वाचा ॥२॥
तुका ह्मणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥३॥
ब्रह्मरूपाचीं कर्में ब्रह्मरूप । विरहित संकल्प होती जाती ॥१॥
ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥ध्रु.॥
नानाभाषामतें आळविती बाळा । प्रबोध तो मूळा जननीठायीं ॥२॥
तुका ह्मणे माझें नमन जाणतियां । लागतसें पायां वेळोवेळां ॥३॥
नाहीं सुगंधाची लागती लावणी । लावावी ते मनीं शुद्ध होतां ॥१॥
वाया हातीं माप चाले सज्जनाचें । कीर्ति मुख त्याचें नारायण ॥ध्रु.॥
प्रभा आणि रवि काय असे आन । उदयीं तंव जन सकळ साक्षी ॥२॥
तुका ह्मणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाहीं पुन्हा ॥३॥
तीर्थाटणें एकें तपें हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥१॥
तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पायां एक ॥ध्रु.॥
अक्षरें आणिती अंगासी जाणीव । इच्छा ते गौरव पूज्य व्हावें ॥२॥
तुका ह्मणे विधिनिषधाचे डोहीं । पडिले त्यां नाहीं देव कधीं ॥३॥
पटे ढाळूं आह्मी विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥१॥
निर्भर अंतरीं सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवें ॥ध्रु.॥
बिळवंत जेणें रचिलें सकळ । आह्मां त्याचें बळ अंकितांसी ॥२॥
तुका ह्मणे आह्मी देखत चि नाहीं । देवाविण कांहीं दुसरें तें ॥३॥
कथेचा उलंघ तो अधमां अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥१॥
कासया जीऊन जाला भूमी भार । अनउपकार माते कुंसी ॥ध्रु.॥
निद्रेचा आदर जागरणीं वीट । त्याचे पोटीं कीट कुपथ्याचें ॥२॥
तुका ह्मणे दोन्ही बुडविलीं कुळें । ज्याचें तोंड काळें कथेमाजी ॥३॥
सांडोनी दों अक्षरां । काय करूं हा पसारा ।
विधिनिषेधाचा भारा । तेणें दातारा नातुडेसी ॥१॥
ह्मणोनि बोबडा उत्तरीं । वाचें जपें निरंतरीं ।
नाम तुझें हरी । भवसागरीं तारूं तें ॥ध्रु.॥
सर्वमय ऐसें वेदांचें वचन । श्रुति गर्जती पुराणें ।
नाहीं आणीक ध्यान । रे साधन मज चाड ॥२॥
शेवटीं ब्रह्मार्पण । या चि मंत्राचें कारण ।
काना मात्र वांयांविण । तुका ह्मणे बिंदुलीं ॥३॥
हरिनामाचें करूनि तारूं । भवसिंधुपार उतरलों ॥१॥
फावलें फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥ध्रु.॥
हरिनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥२॥
हरिनामाचीं धनुष्यकांडें । विन्मुख तोंडें किळकाळ ॥३॥
येणें चि बळें सरते आह्मी । हरिचे नामें लोकीं तिहीं ॥४॥
तुका ह्मणे जालों साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥५॥
नव्हें हें गुरुत्व मेघवृष्टि वाणी । ऐकावी कानीं संतजनीं ॥१॥
आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥ध्रु.॥
देहपिंड दान दिला एकसरें । मुळिचें तें खरें टांकसाळ ॥२॥
तुका ह्मणे झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥३॥
घटीं अलिप्त असे रवि । अिग्न काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवीं । जीवसाक्षीवर्तनें ॥१॥
भोग ज्याचे तया अंगीं । भिन्न प्रारब्ध जगीं । विचित्र ये रंगीं । रंगें रंगला गोसावी ॥ध्रु.॥
देह संकल्पासारिखें । एक एकांसी पारिखें । सुख आणि दुःखें । अंगी कर्में त्रिविध ॥२॥
तुका ह्मणे कोडें । न कळे तयासी सांकडें । त्याचिया निवाडें । उगवे केलें विंदान ॥३॥
सद्गदित कंठ दाटो । येणें फुटो हृदय ॥१॥
चिंतनाचा एक लाहो । तुमच्या अहो विठ्ठला ॥ध्रु.॥
नेत्रीं जळ वाहो सदां । आनंदाचे रोमांच ॥२॥
तुका ह्मणे कृपादान । इच्छी मन हे जोडी ॥३॥
जेथें देखें तेथें उभा । अवघ्या गगनाचा गाभा ॥१॥
डोळां बैसलें बैसलें । ध्यान राहोनि संचलें ॥ध्रु.॥
सरसावलें मन । केले सोज्वळ लोचन ॥२॥
तुका ह्मणे सवें । आतां असिजेत देवें ॥३॥
तान्हे तान्ह प्याली । भूक भुकेने खादली ॥१॥
जेथें तें च नाहीं जालें । झाडा घेतला विठ्ठलें ॥ध्रु.॥
वास वासनेसी नाहीं । मन पांगुळलें पायीं ॥२॥
शेष उरला तुका । जीवा जीवीं जाला चुका ॥३॥
पाणिपात्र दिगांबरा । हस्त करा सारिखे ॥१॥
आवश्यक देव मनीं । चिंतनींच सादर ॥ध्रु.॥
भिक्षा कामधेनुऐशी । अवकाशीं शयन ॥२॥
पांघरोनि तुका दिशा ॥ केला वास अलक्षीं ॥३॥
विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रह्मरस ठसावला ॥१॥
माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥
लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥२॥
तुका ह्मणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मि एकमय ॥३॥
कृष्णरामनाम मांडीं पां वोळी । तेणें होइल होळी पापा धुनी ॥१॥
ऐसा मना छंद लावीं रे अभ्यास । जया नाहीं नास ब्रह्मरसा ॥ध्रु.॥
जोडी तरी ऐसी करावी न सरे । पुढें आस नुरे मागुताली ॥२॥
तुका ह्मणे ऐसें धरा कांहीं मनीं । यातायाती खाणीं चुकतील ॥३॥
परमार्थी तो न ह्मणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥१॥
थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढतां इंधनीं वाढविला ॥ध्रु.॥
पितियानें तैसा वंदावा कुमर । जयाचें अंतर देवें वसे ॥२॥
तुका ह्मणे शिरीं वाहावें खापर । माजी असे सार नवनीत ॥३॥
ज्याचा ऐसा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ॥१॥
देव तया जवळी असे । पाप नासे दरुषणें ॥ध्रु.॥
कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाली समता ॥२॥
तुका ह्मणे भेदाभेद । गेले वाद खंडोनि ॥३॥
सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥१॥
न लगे हालावें चालावें बाहेरी । अवघें चि घरीं बैसलिया ॥ध्रु.॥
देवाचीं च नामें देवाचिये शिरीं । सर्व अळंकारीं समर्पावीं ॥२॥
तुका ह्मणे आहे भावें चि संतोषी । वसे नामापाशीं आपुलिया ॥३॥
ज्ञानियांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठी लागे ॥१॥
ह्मणोनियां ऐसे सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥ध्रु.॥
वेदपारायण पंडित वाचक । न मिळती एक एकांमधीं ॥२॥
पाहों गेलों भाव कैसी आत्मनिष्ठा । तेथें देखें चेष्टा विपरीत ॥३॥
आपुलिया नाहीं निवाले जे अंगें । योगी करती रागें गुरगुरु ॥४॥
तुका ह्मणे मज कोणांचा पांगिला । नको बा विठ्ठला करूं आतां ॥५॥
पंढरीची वाट पाहें निरंतर । निडळावरी कर ठेवूनियां ॥१॥
जातियां निरोप पाठवीं माहेरा । कां मज सासुरा सांडियेलें ॥ध्रु.॥
पैल कोण दिसे गरुडाचे वारिकें । विठ्ठलासारिकें चतुर्भुज ॥२॥
तुका ह्मणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा ॥३॥
ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥१॥
नासिवंत आटी िप्रयापुत्रधन । बीज ज्याचा सीण तें चि फळ ॥ध्रु.॥
नाव धड करा सहजरा नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥२॥
तुका ह्मणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरिरामबाणीं ॥३॥
पाहें मजकडे भरोनियां दृष्टी । बहुत हिंपुष्टी जालों माते ॥१॥
करावेंसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हें वचन श्रुंघारिक ॥ध्रु.॥
सत्यासाटीं माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचें तें नव्हे ॥२॥
तुका ह्मणे माझी कळवऑयाची कींव । भागलासे जीव कर्तव्यानें ॥३॥
तुज ह्मणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥१॥
आझुनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥ध्रु.॥
आळवितों जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभूक ॥२॥
प्रेमरसपान्हा पाजीं माझे आई । धांवें वो विठाई वोरसोनि ॥३॥
तुका ह्मणे माझें कोण हरी दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥४॥
भक्ति तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥१॥
जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु.॥
कामावलें तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ॥२॥
तुका ह्मणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥३॥
पापी ह्मणों तरि आठवितों पाय । दोष बळी काय तयाहूनि ॥१॥
ऐशा विचाराचे घालूनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती ॥ध्रु.॥
एकवेळ जेणें पुत्राच्या उद्देशें ॥ घेतल्याचें कैसें नेलें दुःख ॥२॥
तुका ह्मणे अहो वैकुंठनायका । चिंता कां सेवका तुमचिया ॥३॥
उगविल्या गुंती । ऐशा मागें नेणों किती ॥१॥
ख्यात केली अजामेळें । होतें निघालें दिवाळें ॥ध्रु.॥
मोकलिला प्रायिश्चतीं । कोणी न धरिती हातीं ॥२॥
तुका ह्मणे मुक्त वाट । वैकुंठीची घडघडाट ॥३॥
सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरि बा गोविंदा रामकृष्णा ॥१॥
पुण्य पर्वकाळ तीथॉ ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ध्रु.॥
अवघे चि लाभ बैसलिया घरा । येती भाव धरा एके ठायीं ॥२॥
सेऑया मेंढ्या गाई सेवा घेती ह्मैसी । कामधेनु तैसी नव्हे एक ॥३॥
तुका ह्मणे सुखें पाविजे अनंता । हें वर्म जाणतां सुलभ चि ॥४॥
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥
तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥
देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥२॥
काय त्यां उरलें वेगळें आणीक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥३॥
तुका ह्मणे देवभक्तांचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥४॥
पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया भेटी हरिदासांची ॥१॥
ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तपें तिथॉ जगीं दानें व्रतें ॥ध्रु.॥
चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथां ॥२॥
भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेंदी पाव हात कांहीं ॥३॥
तुका ह्मणे मन जालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥४॥
येणें बोधें आह्मी असों सर्वकाळ । करूनि निर्मळ हरिकथा ॥१॥
आह्मी भूमीवरी एक दइवांचे । निधान हें वाचे सांपडलें ॥ध्रु.॥
तरतील कुळें दोन्ही उभयतां । गातां आइकतां सुखरूप ॥२॥
न चळे हा मंत्र न ह्मणों यातीकुळ । न लगे काळ वेळ विचारावी ॥३॥
तुका ह्मणे माझा विठ्ठल विसांवा । सांटवीन हांवा हृदयांत ॥४॥
बहुतां जन्मींचें संचित । सबळ होय जरि बहुत । तरि चि होय हरिभक्त । कृपावंत मानसीं ॥१॥
ह्मणवी ह्मणियारा तयांचा । दास आपुल्या दासांचा । अनुसरले वाचा । काया मनें विठ्ठलीं ॥ध्रु.॥
असे भूतदया मानसीं । अवघा देखे हृषीकेशी । जीवें न विसंबे तयासी । मागें मागें हिंडतसे ॥२॥
तुका ह्मणे निर्विकार । शरणागतां वज्रपंजर । जे जे अनुसरले नर । तयां जन्म चुकलें ॥३॥
तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥१॥
लुटा लुटा संतजन । अमुप हें रासी धन ॥ध्रु.॥
जाला हरिनामाचा तारा। सीड लागलें फरारा ॥२॥
तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥३॥
आळवीन स्वरें । कैशा मधुरा उत्तरें ॥१॥
यें वो यें वो पांडुरंगे । प्रेमपान्हा मज दें गे ॥ध्रु.॥
पसरूनि चोंची । वचन हें करुणेची ॥२॥
तुका ह्मणे बळी । आह्मी लडिवाळें आळीं ॥३॥
सकिळकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥१॥
रूप दाखवीं रे आतां । सहजरभुजांच्या मंडिता ॥ध्रु.॥
शंखचक्रपद्मगदा। गरुडासहित ये गोविंदा ॥२॥
तुका ह्मणे कान्हा । भूक लागली नयनां ॥३॥
पतितपावना । दिनानाथा नारायणा ॥१॥
तुझें रूप माझे मनीं । राहो नाम जपो वाणी ॥ध्रु.॥
ब्रह्मांडनायका । भक्तजनाच्या पाळका ॥२॥
जीवांचिया जीवा । तुका ह्मणे देवदेवा ॥३॥
करीं हें चि काम । मना जपें राम राम ॥१॥
लागो हा चि छंद । मना गोविंद गोविंद ॥२॥
तुका ह्मणे मना । मज भीक द्यावी दीना ॥३॥
आपुलिया लाजा । धांवे भक्तांचिया काजा ॥१॥
नाम धरिलें दिनानाथ । सत्य करावया व्रत ॥ध्रु.॥
आघात निवारी। छाया पीतांबरें करी ॥२॥
उभा कर कटीं । तुका ह्मणे याजसाटीं ॥३॥
साधावया भक्तिकाज । नाहीं लाज हा धरीत ॥१॥
ऐसियासी शरण जावें । शक्ती जीवें न वंची ॥ध्रु.॥
भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षीलें ॥२॥
तुका ह्मणे साक्ष हातीं । तो म्यां चित्तीं धरियेला ॥३॥
धेनु चरे वनांतरीं । चित्त बाळकापें घरीं ॥१॥
तैसें करीं वो माझे आई । ठाव देऊनि राखें पायीं ॥ध्रु.॥
न काढितां तळमळी । जिवनाबाहेर मासोळी ॥२॥
तुका ह्मणे कुडी । जीवाप्राणांची आवडी ॥३॥
हरिजनाची कोणां न घडावी निंदा । साहात गोविंदा नाहीं त्याचें ॥१॥
रूपा येऊनियां धरी अवतार । भक्तां अभयंकर खळां कष्ट ॥ध्रु.॥
दुर्वास हा छळों आला आंबॠषी । सुदर्शन त्यासी जाळित फिरे ॥२॥
द्रौपदीच्या क्षोभें कौरवांची शांति । होऊनि श्रीपति साहे केलें ॥३॥
न साहे चि बब्रु पांडवां पारिखा । धुडाविला सखा बिळभद्र ॥४॥
तुका ह्मणे अंगीं राखिली दुगपधि । अश्वत्थामा वधी पांडवपुत्रां ॥५॥
ज्यासी आवडी हरिनामांची । तो चि एक बहु शुचि ॥१॥
जपतो हरिनामें बीज । तो चि वर्णांमाजी द्विज ॥२॥
तुका ह्मणे वर्णा धर्म । अवघें आहे सम ब्रह्म ॥३॥
विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥१॥
आह्मां विठ्ठल जीवन । टाळ चिपिळया धन ॥ध्रु.॥
विठ्ठल हे वाणी। अमृत हे संजिवनी ॥२॥
रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगें ॥३॥
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥१॥
भाग्यवंता छंद मनीं । कोडें कानीं ऐकती ॥ध्रु.॥
विठ्ठल हें दैवत भोळें। चाड काळें न धरावी ॥२॥
तुका ह्मणे भलते याती । विठ्ठल चित्तीं ते शुद्ध ॥३॥
ह्मणे विठ्ठल ब्रह्म नव्हे । त्याचे बोल नाइकावे ॥१॥
मग तो हो का कोणी एक । आदि करोनि ब्रह्मादिक ॥ध्रु.॥
नाहीं विठ्ठल जया ठावा । तो ही डोळां न पाहावा ॥२॥
तुका ह्मणे नाहीं। त्याची भीड मज कांहीं ॥३॥
एक पाहातसां एकांचीं दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा ॥१॥
मारा हाक देवा भय अटाहासें । जंव काळाऐसें जालें नाहीं ॥ध्रु.॥
मरणांची तंव गांठोडी पदरीं । जिणें तो चि वरि माप भरी ॥२॥
तुका ह्मणे धींग वाहाती मारग । अंगा आलें मग हालों नेदी ॥३॥
संतांसी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो ॥१॥
ह्मणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु.॥
भावहीना आड येतसे आशंका । उचितासी चुका घालावया ॥२॥
तुका ह्मणे जया संकोच दर्शनें । तया ठाया जाणें अनुचित ॥३॥
संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥१॥
हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥ध्रु.॥
ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊं पाहे ॥२॥
तुका ह्मणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटीं विचार त्या ॥३॥
जातीचें तें चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम ॥१॥
ते काय गुण लागती येरां । कागा पिंजरा शोभेना ॥ध्रु.॥
शिकविलें तें सुजात सोसी । मग तयासी मोल चढे ॥२॥
तुका ह्मणे वेषधारी ॥ हिजड्या नारी नव्हती ॥३॥
वसनें थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी ॥१॥
नाहीं देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हांवा ॥ध्रु.॥
फुगातें काउळें । ह्मणे मी राजहंसा आगळें ॥२॥
गजाहूनि खर । ह्मणे चांगला मी फार ॥३॥
मुलाम्याचें नाणें । तुका ह्मणे नव्हे सोनें ॥४॥
मुक्त होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥१॥
पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥
तुका ह्मणे वांयां गेलें वांयां विण । जैसा मृगशीण मृगजळीं ॥३॥
पंढरीये माझें माहेर साजणी । ओविये कांडणीं गाऊं गीत ॥१॥
राही रखुमाई सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥ध्रु.॥
उद्धव अक्रूर व्यास आंबॠषि । भाई नारदासी गौरवीन ॥२॥
गरुड बंधु लडिवाळ पुंडलीक । यांचें कवतुक वाटे मज ॥३॥
मज बहु गोत संत आणि महंत । नित्य आठवीत ओवियेसी ॥४॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगया । जिवलगा माझिया नामदेवा ॥५॥
नागोजन मित्रा नरहरि सोनारा । रोहिदास कबिरा सोईिरया ॥६॥
परसो भागवता सुरदास सांवता । गाईन नेणतां सकळांसी ॥७॥
चोखामेळा संत जिवाचे सोइरे । न पडे विसर यांचा घडी ॥८॥
जीवींच्या जीवना एका जनार्दना । पाटका कान्हया मिराबाई ॥९॥
आणीक हे संत महानुभाव मुनि । सकळां चरणीं जीव माझा ॥१०॥
आनंदें ओविया गाईन मी त्यांसी । जाती पंढरीसी वारकरी ॥११॥
तुका ह्मणे माझा बिळया बापमाय । हरुषें नांदों सये घराचारी ॥१२॥
पोट लागलें पाठीशीं । हिंडवितें देशोदेशीं ॥१॥
पोटाभेणें जिकडे जावें । तिकडे पोट येतें सवें ॥ध्रु.॥
जप तप अनुष्ठान। पोटासाटीं जाले दीन ॥२॥
पोटें सांडियेली चवी । नीचापुढें तें नाचवी ॥३॥
पोट काशियानें भरे । तुका ह्मणे झुरझुरूं मरे ॥४॥
जगदेश जगदेश तुज ह्मणती । परि या जनामाजी असशील युक्ति ।
पुण्यपापविरहित सकळां अधिपति । दृष्टा परि नळणी अलिप्त गति ॥१॥
जय देव जय देव जय पंढरिनाथा । श्रीपंढरिनाथा । नुरे पाप विठ्ठल ह्मणतां सर्वथा ॥ध्रु.॥
आगम निगम तुज नेणती कोणी । परि तूं भाव भक्ति जवळी च दोन्ही ।
नेणतां विधियुक्त राते पूजेनी । न माये ब्रह्मांडीं संपुष्टशयनीं ॥२॥
असुरां काळ भासे विक्राळ पुढें । पसरी मुख्यक चावितो धुडें ।
भक्ता शरणागता चाले तो पुढें । दावी वाट जाऊ नेदी वांकडें ॥३॥
एकाएकीं बहु विस्तरला सुखें । खेळे त्याची लीळा तो चि कवतुकें।
तेथें नरनारी कवण बाळकें । काय पापपुण्य कवण सुखदुःखें ॥४॥
सकळा वर्मां तूं चि जाणशी एक । बद्ध मोक्ष प्राप्त आणि सुखदुःख।
जाणों ह्मणतां तुज टकलीं बहुतेकें । तुका ह्मणे शरण आलों मज राखें ॥५॥
दैत्यभारें पीडिली पृथुवी बाळा । ह्मणोनि तूज येणें जालें गोपाळा ।
भक्तिप्रतिपाळक उत्सव सोहळा । मंगळें तुज गाती आबळ बाळा ॥१॥
जय देव जय देव जय गरुडध्वजा । श्रीगरुडध्वजा। आरती ओवाळूं तुज भक्तीकाजा ॥ध्रु.॥
गुण रूप नाम नाहीं जयासी। चिंतितां तैसा चि होसी तयांसी ।
मत्स्य कूर्म वराह नरसिंह जालासी। असुरां काळ मुणि ठाके ध्यानासी ॥२॥
सहजर रूपें नाम सांवळा ना गोरा । श्रुति नेती ह्मणती तुज विश्वंभरा।
जीवनां जीवन तूं चि होसी दातारा । न कळे पार ब्रह्मादिकां सुरवरां ॥३॥
संतां महंतां घरीं ह्मणवी ह्मणियारा । शंखचक्रगदाआयुधांचा भारा ।
सुदर्शन घरटी फिरे अवश्वरा । सकुमार ना स्थूळ होसी गोजिरा ॥४॥
भावेंविण तुझें न घडे पूजन । सकळ ही गंगा जाल्या तुजपासून ।
उत्पित्त प्रळय तू चि करिसी पाळण । धरूनि राहिला तुका निश्चयीं चरण ॥५॥
काय तुझा महिमा वणूप मी किती । नामें मात्रे भवपाश तुटती ।
पाहातां पाउले हे विष्णुमूर्ती । कोटिकुळां सहित जे उद्धरती ॥१॥
जय देव जय देव जय पंढरिराया । श्रीपंढरिराया। करुनियां कुरवंडी । सांडीन काया ॥ध्रु.॥
मंगळआरतीचा थोर महिमा । आणीक द्यावया नाहीं उपमा ।
श्रीमुखासहित देखे जो कर्मा । पासुन सुटे जैसा रवि नासी तमा ॥२॥
धन्य व्रतकाळ हे एकादशी । जागरण उपवास घडे जयांसी ।
विष्णूचें पूजन एकाभावेंसी। नित्यमुक्त पूज्य तिहीं लोकांसी ॥३॥
न वजे वांयां काळ जे तुज ध्याती । असे तुझा वास तयांच्या चित्तीं ।
धालें सुखें सदा प्रेमें डुल्लती । तीथॉ मिळन वास तयांचा वाहाती ॥४॥
देव भक्त तूं चि जालासी दोन्ही । वाढावया सुख भक्ति हे जनीं ।
जड जीवां उद्धार होय लागोनि । शरण तुका वंदी पाउलें दोन्ही ॥५॥
कंसरायें गर्भ वधियेले सात । ह्मणोनि गोकुळासी आले अनंत ।
घ्यावया अवतार जालें हें चि निमित्य । असुर संहारूनि तारावे भक्त ॥१॥
जय देव जय देव जय विश्वरूपा । श्रीविश्वरूपा । ओवाळीन तुज देहदीपें बापा ॥ध्रु.॥
स्थूळरूप होऊनि धरितसे सानें । जैसा भाव तैसा तयांकारणें ।
दैत्यांसी भासला सिहीं गजान । काळासी महाकाळ यशोदेसी तान्हें ॥२॥
अनंत वर्णी कोणा न कळे चि पार । सगुण कीं निर्गुण हा ही निर्धार ।
पांगलीं साई अठरा करितां वेव्हार । तो विळतसे गौळियांचें खिल्लार ॥३॥
तेहतिस कोटि तिहीं देवांसी श्रेष्ठ । पाउलें पाताळीं नेणती स्वर्ग मुगुट ।
गिळिलीं चौदा भूवनें तरि न भरे चि पोट । तो खाउन धाला गोपाळाचें उिच्छष्ट ॥४॥
महिमा वणूप तरि पांगलिया श्रुति । सिणला शेष चिरल्या जिव्हा करितां स्तुती ।
भावेंविण कांहीं न चले चि युक्ति । राखें शरण तुकयाबंधु करी विनंती ॥५॥
परमानंदा परमपुरुषोत्तमरामा । अच्युता अनंता हरि मेघश्यामा ।
अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा । अकळकळा कमळापती न कळे महिमा ॥१॥
जय देव जय देव जया जी श्रीपती । मंगळशुभदायका करीन आरती ॥ध्रु.॥
गोविंदा गोपाळा गोकुळरक्षणा। गिरिधरकर भवसागरतारक दधिमथना ।
मधुसूदन मुनिजीवन धरणीश्रमहरणा । दीनवत्सळ सकळां मूळ जय जयनिधाना ॥२॥
विश्वंभरा सर्वेश्वर जगदाधारा । चक्रधर करुणाकर पावन गजेंद्रा ।
सुखसागर गुणआगर मुगुटमणी शूरा । कल्याणकैवल्यमूर्ति मनोहरा ॥३॥
गरुडासना शेषशयना नरहरी । नारायणा ध्याना सुरहरवरगौरी।
नंदा नंदनवंदन त्रिभुवनांभीतरी । अनंतनामीं ठसा अवतारांवरी ॥४॥
सगुणनिर्गुणसाक्ष श्रीमंत संतां । भगवाना भगवंता कालकृदांता।
उत्पित्तपाळणपासुन संहारणसत्ता । शरण तुकयाबंधु तारीं रिति बहुतां ॥५॥
पंढरि पुण्यभूमी भीमा दिक्षणावाहिनी । तीर्थ हें चंद्रभागा महा पातकां धुनी ।
उतरलें वैकुंठमहासुख मेदिनी ॥१॥
जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा । आरती ओंवाळीन तुह्मां लक्ष्मीकांता ॥ध्रु.॥
नित्य नवा सोहळा हो महावाद्यां गजर । सन्मुख गरुड पारीं उभा जोडुनि कर ।
मंडितचतुर्भुजा कटीं मिरवती कर ॥२॥
हरिनाम कीर्तन हो आनंद महाद्वारीं । नाचती प्रेमसुखें नर तेथिंच्या नारी ।
जीवन्मुक्त लोक नित्य पाहाती हरी ॥३॥
आषाढी कार्तिकी हो गरुडटकयां भार । गर्जती नाम घोष महावैष्णववीर ।
पापासी रीग नाहीं असुर कांपती सुर ॥४॥
हें सुख पुंडलिकें कसें आणिलें बापें । निर्गुण साकारले आह्मांलागिं हें सोपें ।
ह्मणोनि चरण धरोनि तुका राहिला सुखें ॥५॥
अवतार गोकुळीं हो जन तारावयासी । लावण्यरूपडें हे तेजपुंजाळरासी ।
उगवतां कोटि बिंबें रवि लोपले शशी । उत्साव सुरवरां मही थोर मानसीं ॥१॥
जय देवा कृष्णनाथा जय रखुमाईकांता। आरती ओंवाळीन तुह्मां देवकीसुता । जय देवा कृष्णनाथा ॥ध्रु.॥
वसुदेवदेवकीची बंद फोडुनी शाळ । होउनि विश्वजनिता तया पोटिंचा बाळ ।
दैत्य हे त्रासियेले समूळ कंसासी काळ । राजया उग्रसेना केला मथुरापाळ ॥२॥
राखतां गोधनें हो इंद्र कोपला वरि । मेघ जो कडाडिला शिळा वर्षतां धारीं ।
राखिलें गोकुळ हें नखीं धरिला गिरी। निर्भय लोकपाळ अवतरले हरी ॥३॥
कौतुक पाहावया माव ब्रह्म्यानें केली । वत्सें चोरोनियां सत्यलोकासि नेलीं ।
गोपाळ गाईवत्सें दोहीं ठायीं राखीलीं । सुखाचा प्रेमसिंधु अनाथांची माउली ॥४॥
तारिलें भक्तजना दैत्य निर्दाळूनि । पांडवां साहकारी आडल्यां निर्वाणी ।
गुण मी काय वणूप मति केवढी वाणी । विनवितो दास तुका ठाव देइप चरणीं ॥५॥
सुंदर अंगकांती मुखें भाळ सुरेख । बाणली उटी अंगीं टिळा साजिरी रेख ।
मस्तकीं मुगुट कानीं कुंडलां तेज फांके। आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके ॥१॥
जय देवा चुतर्भुजा जया लावण्यतेजा । आरती ओवाळीन भवतारिया हा वोजा । जय. ॥ध्रु.॥
उदार जुंझार हा जया वाणिती श्रुति । परतल्या नेति ह्मणती तयां न कळे गति ।
भाट हा चतुर्मुखें अनुवाद करिती । पांगलीं साही अठरा रूप न गति ॥२॥
ऐकोनि रूप ऐसें तुजलागीं धुंडिती। बोडके नग्न एक निराहार ईित ।
साधनें योग नाना तपें दारुण किती। सांडिलें सुख दिली संसारा शांती ॥३॥
भरूनि माजी लोकां तिहीं नांदसि एक। कामिनी मनमोहना रूप नाम अनेक ।
नासति नाममात्रें भवपातकें शोक । पाउलें वंदिताती सिद्ध आणि साधक ॥४॥
उपमा द्यावयासी दुजें काय हें तुज । तत्त्वासि तत्त्वसार मूळ जालासी बीज ।
खेळसि बाळलीळा अवतार सहज । विनवितो दास तुका कर जोडोनि तुज ॥५॥
सकुमार मुखकमळ निजसारनिर्मळ । सावळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ ।
झळकति दिव्य तेजें दंत माज पातळ । मिरवलिं मयोरपत्रें मुगुट कुंडलें माळ ॥१॥
जय देवा जगदीश्वरा । धन्य रखुमाईवरा । आरती करीन काया । ओंवाळिन सुंदरा । जय. ॥ध्रु.॥
गोजिरें ठाणमाण भुजा मंडित चारी । शोभति शंखचक्रगदापद्म मोहरी ।
हृदयीं ब्रह्मपद बाणलें शृंगारीं । गर्जति चरणीं वांकी कंठ कोकिळास्वरीं ॥२॥
घवघवित उटी अंगीं बावन चंदनांची । लल्हाट कस्तुरिचा कास पितांबरीची ।
कटिसूत्र वरि साजिरें प्रभा वर मोतियांची। संगीत सकळ मुद्रा पाउलें कुंकुमाचीं ॥३॥
सौभाग्यसुख सागर गुणलावण्यखाणी । लाघवी दीनवत्सळ विश्व लाविलें ध्यानीं ।
आश्चर्य देव करिती ॠषि राहिले मुनि । धन्य ते प्रसवली ऐसिया नंदपत्नी ॥४॥
वर्णितां ध्यान महिमा श्रुति राहिल्या नेति । रविकोटि चंद्र तारा प्रकाशा न तुळती ।
उदार सुर गंभीर पूर्ण आनंदमूर्ति । तुकयाबंधु ह्मणे स्तवूं मी काय किती ॥५॥
महा जी महादेवा महाकाळमर्दना । मांडियेलें उग्रतप महादीप्त दारुणा ।
परिधान व्याघ्रांबर चिदाभस्मलेपना । स्मशान क्रीडास्थळ तुह्मा जी त्रिनयना ॥१॥
जय देवा हरेश्वरा जय पार्वतीवरा। आरती ओंवाळिन कैवल्यदातारा । जय. ॥ध्रु.॥
रुद्र हें नाम तुह्मां उग्र संहारासी । शंकर शिव भोळा उदार सर्वस्वीं ।
उदक बेलपत्र टाळी वाहिल्या देसी । आपुलें पद दासां ठाव देइप कैलासीं ॥२॥
त्रैलोक्यव्यापका हो जन आणि विजन । विराटस्वरूप हें तुझें साजिरें ध्यान ।
करितो वेद स्तुती कीर्ती मुखें आपण । जाणतां नेणवे हो तुमचें महिमान ॥३॥
बोलतां नाम महिमा असे आश्चर्य जगीं । उपदेश केल्यानंतरें पापें पळती वेगीं ।
हरहर वाणी गर्जे प्रेम संचरे अंगीं । राहिलि दृष्टी चरणीं रंग मीनला रंगीं ॥४॥
पुजूनि लिंग उभा तुका जोडोनी हात। करिती विज्ञापना परिसावी हे मात ।
अखंड राहूं द्यावें माझें चरणीं चित्त । घातले साष्टांग मागे मस्तकीं हात ॥५॥
अवतारनामभेद गणा आदि अगाद । जयासि पार नाहीं पुढें खुंटला वाद ।
एक चि दंत शोभे मुख विक्राळ दोंद । ब्रह्मांडामाजि दावी अनंत हे छंद ॥१॥
जय जया गणपती ओंवाळित आरती । साजिया सरळ भुजा फरशकमळ शोभती ॥ध्रु.॥
हे मही ठेंगणी हो तुज नृत्यनायका । भोंवरि फेर देतां असुर मदिले एकां ।
घातले तोडरीं हो भक्तजनपाळका । सहस्र नाम तुज भुक्तिमुक्तिदायका ॥२॥
सुंदर शोभला हो रूपें लोपलीं तेजें । उपमा काय देऊं असे आणिक दुजें ।
रविशशितारागणें जयामाजी सहजें । उदरी सामावलीं जया ब्रह्मांडबीजें ॥३॥
वर्णिता शेष लीळा तया भागलीं मुखें । पांगुळले वेद चारी कैसे राहिले सुखें ।
अवतार जन्मला हो लिंगनाभी या मुखें । अमूर्त मूर्तिमंत होय भक्तीच्या सुखें ॥४॥
विश्व हें रूप तुझें हस्त पाद मुखडें । ऐसा चि भाव देइप तया नाचतां पुढें ।
धूप दीप पंचारति ओंवाळिन निवाडें । राखें या शरणागता तुका खेळतां लाडें ॥५॥
कनकाच्या परियेळीं उजळूनि आरती । रत्नदीपशोभा कैशा पाजळल्या ज्योती ॥१॥
ओंवाळूं गे माये सबाह्य साजिरा । राहिरखुमाईसत्यभामेच्या वरा ।ध्रु.॥
मंडितचतुर्भुज दिव्य कानीं कुंडलें। श्रीमुखाची शोभा पाहातां तेज फांकलें ॥२॥
वैजयंती माळ गळां शोभे श्रीमंत । शंखचक्रगदापद्म आयुधें शोभत ॥३॥
सांवळा सकुमार जैसा कर्दळीगाभा । चरणीचीं नेपुरें वांकी गर्जती नभा ॥४॥
ओंवाळितां मन हें उभें ठाकलें ठायीं । समदृष्टि समाधि तुकया लागली पायीं ॥५॥
भक्तीचिया पोटीं बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावें ओंवाळूं आरती ॥१॥
ओंवाळू आरती माझ्या पंढरीनाथा। दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा ॥ध्रु.॥
काय महिमा वणूप आतां सांगणें तें किती । कोटि ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥२॥
राही रखुमाई दोही दों बाही । मयूर पिच्छचामरें ढाळिति ठायीं ठायीं ॥३॥
तुका ह्मणे दीप घेऊनि उन्मनति शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥४॥
धन्य दिवस आजि दरुषण संतांचें । नांदे तया घरीं दैवत पंढरीचें ॥१॥
धन्य पुण्य रूप कैसा जालें संसार । देव आणि भक्त दुजा नाहीं विचार ॥ध्रु.॥
धन्य पूर्व पुण्य वोडवलें निरुतें । संतांचें दर्शन जालें भाग्यें बहुतें ॥२॥
तुका ह्मणे धन्य आह्मां जोडली जोडी । संतांचे चरण आतां जीवें न सोडीं ॥३॥
गाऊं वाणूं तुज विठो तुझा करूं अनुवाद । जिकडे पाहें तिकडे सर्वमय गोविंद ॥१॥
आनंद रे विठोबा जाला माझे मनीं। देखिले लोचनीं विटेसहित पाउले ॥ध्रु.॥
न करीं तपसाधनें रे मुक्तीचे सायास । हा चि जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस ॥२॥
तुका ह्मणे आह्मां प्रेमा उणें तें काई । पंढरीचा राणा सांटविला हृदयीं ॥३॥
मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा ॥१॥
या संतांसी निरवीं हें मज देइप । आणिक दुजें काहीं न मगें तुज ॥२॥
तुका ह्मणे आतां उदार होइप । मज ठेवीं पायीं संतांचिया ॥३॥
स्वामींनीं काया ब्रह्म केली ते अभंग ॥ 24
शोधितां चि नये । ह्मणोनि वोळगतों पाये ॥१॥
आतां दिसों नये जना । ऐसें करा नारायणा ॥ध्रु.॥
परतोनि मन । गेलें ठायीं चि मुरोन ॥२॥
विसरला तुका । बोलों चालों जाला मुका ॥३॥
रज्जुसर्पाकार । भासयेलें जगडंबर ॥१॥
ह्मणोनि आठवती पाय । घेतों आलाय बलाय ॥ध्रु.॥
द्रुश द्रुमाकार लाणी। केलों सर्व सासी धणी ॥२॥
तुकीं तुकला तुका । विश्वीं भरोनि उरला लोकां ॥३॥
ह्मणवितों दास । परि मी असें उदास ॥१॥
हा चि निश्चय माझा । परि मी निश्चयाहुनि दुजा ॥ध्रु.॥
सरतें कर्तुत्व माझ्यानें । परि मी त्याही हून भिन्न ॥२॥
तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥१॥
घोंटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हातीं । मुक्तां आत्मिस्थती सांडवीन ॥१॥
ब्रह्मभूत होते काया च कीर्तनीं । भाग्य तरी ॠणी देवा ऐसा ॥ध्रु.॥
तीर्थ भ्रमकासी आणीन आळस । कडु स्वर्गवास करिन भोग ॥२॥
सांडवीन तपोनिधा अभिमान । यज्ञा आणि दान लाजवीन ॥३॥
भक्तिभाग्यप्रेमा साधीन पुरुषार्थ । ब्रह्मींचा जो अर्थ निजठेवा ॥४॥
धन्य ह्मणवीन येहे लोकीं लोकां । भाग्य आह्मीं तुका देखियेला ॥५॥
संसाराचे अंगीं अवघीं च वेसनें । आह्मी या कीर्तनें शुद्ध जालों ॥१॥
आतां हें सोंवळें जालें त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥ध्रु.॥
ब्रह्मपुरीं वास करणें अखंड । न देखिजे तोंड विटाळाचें ॥२॥
तुका ह्मणे आह्मां एकांताचा वास । ब्रह्मीं ब्रह्मरस सेवूं सदा ॥३॥
तुह्मी सनकादिक संत । ह्मणवितां कृपावंत ॥१॥
एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥ध्रु.॥
भाकूनि करुणा । विनवा वैकुंठींचा राणा ॥२॥
तुका ह्मणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥३॥
आपुल्या माहेरा जाईन मी आतां । निरोप या संतां हातीं आला ॥१॥
सुख दुःख माझें ऐकिलें कानीं । कळवळा मनीं करुणेचा ॥ध्रु.॥
करुनी सिद्ध मूळ साउलें भातुकें । येती दिसें एकें न्यावयासी ॥२॥
त्या चि पंथें माझें लागलेंसे चित्त । वाट पाहें नित्य माहेराची ॥३॥
तुका ह्मणे आतां येतील न्यावया । अंगें आपुलिया मायबाप ॥४॥
चिन्हें उमटताती अंगीं । शकुना जोगीं उत्तम ॥१॥
आठवला बापमाय । येइल काय मूळ नेणों ॥ध्रु.॥
उत्कंठित जालें मन । ते चि खुण तेथींचि ॥२॥
तुका ह्मणे काम वारीं । आळस घरीं करमेना ॥३॥
आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना ॥१॥
आलियांस पुसें मात । तेथें चित्त लागलें ॥ध्रु.॥
दळीं कांडीं लोकांऐसें । परि मी नसें ते ठायीं ॥२॥
तुका ह्मणे येथें पिसें । तेथें तैसें असेल ॥३॥
येथीलिया अनुभवें । कळों जीवें हें येतसे ॥१॥
दोहीं ठायीं एक जीव । माझी कींव त्या अंगीं ॥ध्रु.॥
भूक भुके चि खाउनि धाय । नाहीं हाय अन्नाची ॥२॥
तुका ह्मणे सुख जालें । अंतर धालें त्यागुणें ॥३॥
पैल आले हरि । शंख चक्र शोभे करीं ॥१॥
गरुड येतो फडत्कारें । ना भी ना भी ह्मणे त्वरे ॥ध्रु.॥
मुगुटकुंडलांच्या दीप्ति । तेजें लोपला गभिस्त ॥२॥
मेघश्यामवर्ण हरि । मूर्ति डोळस साजिरी ॥३॥
चुतर्भुज वैजयंती । गळां माळ हे रुळती ॥४॥
पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥५॥
तुका जालासे संतुष्ट । घरा आलें वैकुंठपीठ ॥६॥
शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥१॥
ना भी ना भी भक्तराया । वेगीं पावलों सखया ॥ध्रु.॥
दुरूनि येतां दिसे दृष्टी। धाकें दोष पळती सृष्टी ॥२॥
तुका देखोनि एकला । वैकुंठींहूनि हरि आला ॥३॥
पैल दिसतील भार । दिंडी पताका अपार ॥१॥
आला पंढरीचा राणा । दिसतील त्याच्या खुणा ।
सुख वाटे मना । डोळे बाह्या स्फुरती ॥ध्रु.॥
उठिले गजर नामाचे । दळभार वैष्णवांचे ॥२॥
तुका करी रिता ठाव । त्यांसी बैसावया वाव ॥३॥
चला जाऊं रे सामोरे । पुढें भेटों विठ्ठल धुरे ॥१॥
तुका आनंदला मनीं । कैसा जातो लोटांगणीं ।
फेडावया धणी । प्रेमसुखाची आजि ॥ध्रु.॥
पुढें आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥२॥
आळंगिला बाहीं । ठेविला विठोबाचे पायीं ॥३॥
पाहुणे घरासी । आजि आले हृषीकेशी ॥१॥
काय करूं उपचार । कोंप मोडकी जर्जर ।
कण्या दरदर । पाण्यामाजी रांधिल्या ॥ध्रु.॥
घरीं मोडकिया बाजा । वरि वाकळांच्या शेजा ॥२॥
मुखशुद्धि तुळसी दळ । तुका ह्मणे मी दुर्बळ ॥३॥
संतीं केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर ॥१॥
कांहीं ठेविलें चरणीं । घेतीं तें चि पुरवूनि ।
तुका पायवणी । घेऊनियां निराळा ॥ध्रु.॥
नसतां कांहीं संचित । भेटी जाली अवचित ॥२॥
देव मिळोनियां भक्त । तुका केलासे सनाथ ॥३॥
अवघियांच्या आलों मुळें । एका वेळे न्यावया ॥१॥
सिद्ध व्हावें सिद्ध व्हावें । आधीं ठावें करितों ॥ध्रु.॥
जोंवरि ते घटिका दुरी । आहे उरी तो काळ ॥२॥
मंगळाचे वेळे उभे । असों शोभे सावध ॥३॥
अवघियांचा योग घडे । तरी जोडे श्लाघ्यता ॥४॥
तुका ह्मणे पाहें वाट । बहु आट करूनि ॥५॥
सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावें तुह्मीं ॥१॥
कर्मधर्में तुह्मां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥ध्रु.॥
वाढवूनि दिलों एकाचिये हातीं । सकळ नििंश्चती जाली तेथें ॥२॥
आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । माझिया भावें अनुसरलों ॥३॥
वाढवितां लोभ होईल उसीर । अवघींच िस्थर करा ठायीं ॥४॥
धर्म अर्थ काम जाला एके ठायीं । मेळविला जिंहीं हाता हात ॥५॥
तुका ह्मणे आतां जाली हे चि भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥६॥
बोलिलों तें आतां पाळावें वचन । ऐसें पुण्य कोण माझे गांठी ॥१॥
जातों आतां आज्ञा घेऊनियां स्वामी । काळक्षेप आह्मी करूं कोठें ॥ध्रु.॥
न घडे यावरि न धरवे धीर । पीडतां राष्टध देखोनि जग ॥२॥
तुका ह्मणे तुह्मी दिसे मोकलिलें । काय आतां आलें जीवित्वाचें ॥३॥
करावें तें काम । उगाच वाढवावा श्रम ॥१॥
अवघें एकमय । राज्य बोलों चालों नये ॥ध्रु.॥
दुजयाची सत्ता । न चलेसी जाली आतां ॥२॥
आतां नाहीं तुका । पुन्हा हारपला लोकां ॥३॥
आह्मी जातों तुह्मी कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥
वाडवेळ जाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥२॥
अंतकाळीं विठो आह्मांसी पावला । कुडीसहित जाला गुप्त तुका ॥३॥
तुका उतरला तुकीं । नवल जालें तिहीं लोकीं ॥१॥
नित्य करितों कीर्तन । हें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥
तुका बैसला विमानीं । संत पाहाती लोचनीं ॥२॥
देव भावाचा भुकेला । तुका वैकुंठासी नेला ॥३॥
न देखिजे ऐसें केलें । या विठ्ठलें दुःखासी ॥१॥
कृपेचिये सिंव्हासनीं । अधिष्ठानीं बैसविलें ॥ध्रु.॥
वाजता तो नलगे वारा क्षीरसागरा शयनीं ॥२॥
तुका ह्मणें अवघें ठायीं । मज पायीं राखिलें ॥३॥
वाराणसीपयपत असों सुखरूप । सांगावा निरोप संतांसी हा ॥१॥
येथूनियां आह्मां जाणें निजधामा । सवें असे आह्मां गरुड हा ॥२॥
कृपा असों द्यावी मज दीनावरी । जातोंसों माहेरी तुका ह्मणे ॥३॥
शखे 1571 एकाहत्तरीं विरोधनामसंवत्सरीं फालगुनवद्य द्वितीया सोमवासरीं प्रथमप्रहरीं तुकोबा गुप्त जाले ॥१
जाती पंढरीस । ह्मणे जाइपन तयांस ॥१॥
तया आहे संवसार । ऐसें बोले तो माहार ॥ध्रु.॥
असो नसो भाव । जो हा देखे पंढरिराव ॥२॥
चंद्रभागे न्हाती । तुका ह्मणे भलते याती ॥३॥
धरियेलीं सोंगें । येणें अवघीं पांडुरंगें ॥१॥
तें हें ब्रह्म विटेवरी । उभें चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥
अंतर व्यापी बाहे । धांडोळितां कोठें नोहे ॥२॥
योगयागतपें । ज्याकारणें दानजपें ॥३॥
दिले नेदी जति । भोग सकळ ज्या होती ॥४॥
अवघी लीळा पाहे । तुका ह्मणे दासां साहे ॥५॥
ज्याचे गर्जतां पवाडे । किळकाळ पायां पडे ॥१॥
तो हा पंढरीचा राणा । पुसा सा चौं अठरा जणां ॥ध्रु.॥
चिंतितां जयासी । भुक्तिमुक्ति कामारी दासी ॥२॥
वैकुंठासी जावें । तुका ह्मणे ज्याच्या नांवें ॥३॥
ज्याचे गर्जतां पवाडे । श्रुतिशास्त्रां मौन्य पडे ॥१॥
तेथें माझी वाचा किती । पुरे करावया स्तुती ॥ध्रु.॥
सिणलें सहजर तोंडें । शेषाफणी ऐसें धेंडें ॥२॥
तुका ह्मणे मही । पत्र सिंधु न पुरे शाही ॥३॥
देव राखे तया मारील कोण । न मोडे कांटा हिंडतां वन ॥१॥
न जळे न बुडे नव्हे कांहीं । विष तें ही अमृत पाहीं ॥ध्रु.॥
न चुके वाट न पडे फंदीं । नव्हे कधीं कधीं यमबाधा ॥२॥
तुका ह्मणे नारायण । येता गोऑया वारी वाण ॥३॥
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला ॥१॥
दिनानाथ ब्रीद सांभाळीं आपुले । नको पाहों केलें पापपुण्य ॥ध्रु.॥
पतितपावन ब्रीदें चराचर । पातकी अपार उद्धरिले ॥२॥
तुकयाबंधु ह्मणे द्रौपदीचा धांवा । केला तैसा मला पावें आतां ॥३॥
कोठें गुंतलासी कोणांच्या धांवया । आली देवराया निद्रा तुज ॥१॥
कोठें गुंतलासी भक्तिप्रेमसुखें । न सुटेती मुखें गोपिकांचीं ॥ध्रु.॥
काय पडिलें तुज कोणाचें संकट । दुरी पंथ वाट न चालवे ॥२॥
काय माझे तुज गुण दोष दिसती । ह्मणोनि श्रीपती कोपलासी ॥३॥
काय जालें सांग माझिया कपाळा । उरला जीव डोळां तुका ह्मणे ॥४॥
परस्त्रीतें ह्मणतां माता । चित्त लाजवितें चित्ता ॥१॥
काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कानकोंडें ॥ध्रु.॥
धर्मधारिष्टगोष्टी सांगे । उष्ट्या हाते नुडवी काग ॥२॥
जें जें कर्म वसे अंगीं । तें तें आठवे प्रसंगीं ॥३॥
बोले तैसा चाले । तुका ह्मणे तो अमोल ॥४॥
असत्य वचन होतां सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥१॥
जाईल पतना यासि संदेह नाहीं । साक्ष आहे कांहीं सांगतों ते ॥ध्रु.॥
वदविलें मुखें नारायणें धर्मा । अंगुष्ठ त्या कर्मासाटीं गेला ॥२॥
तुका ह्मणे आतां सांभळा रे पुढें । अंतरिंचे कुडें देइल दुःख ॥३॥
जळों त्याचें तोंड । ऐसी कां ते व्याली रांड ॥१॥
सदा भोवयासी गांठी । क्रोध धडधडीत पोटीं ॥ध्रु.॥
फोडिली गोंवरी। ऐसी दिसे तोंडावरी ॥२॥
तुका ह्मणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥३॥
तोंडें खाये फार । पादे बोचा करी मार ॥१॥
एक ऐसे ते शाहाणे । आपुले अधीन तें नेणें ॥ध्रु.॥
कुले घालूनि उघडे। रागें पाहे लोकांकडे ॥२॥
खेळे जुतकर्म । मग बोंबली जुलूम ॥३॥
निजतां आला मोहो । वीतां ह्मणे मेला गोहो ॥४॥
तुका ह्मणे त्यांनीं। मनुष्यपणा केली हानी ॥५॥
पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥१॥
तैसें माझें मन एकविध जालें । नावडे विठ्ठलेंविण दुजें ॥ध्रु.॥
सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेंसी ॥२॥
तुका ह्मणे बाळ मातेपुढें नाचे । बोल आणिकांचे नावडती ॥३॥
पंडित ह्मणतां थोर सुख । परि तो पाहातां अवघा मूर्ख ॥१॥
काय करावें घोकिलें । वेदपठण वांयां गेलें ॥ध्रु.॥
वेदीं सांगितलें तें न करी । सम ब्रह्म नेणे दुराचारी ॥२॥
तुका देखे जीवीं शिव । हा तेथींचा अनुभव ॥३॥
पंडित तो चि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥१॥
अवघें सम ब्रह्म पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे ॥ध्रु.॥
रिता नाहीं कोणी ठाव । सर्वां भूतीं वासुदेव ॥२॥
तुका ह्मणे तो चि दास। त्यां देखिल्या जाती दोष ॥३॥
ऐका पंडितजन । तुमचे वंदितों चरण ॥१॥
नका करूं नरस्तुति । माझी परिसा हे विनंती ॥ध्रु.॥
अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥२॥
तुका ह्मणे वाणी । सुखें वेचा नारायणीं ॥३॥
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥१॥
विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥
विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥२॥
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा। तुकया मुखा विठ्ठल ॥३॥
काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक दोन ॥१॥
काय तुझें रूप घेतों मी चोरोनि । त्या भेणें लपोनि राहिलासी ॥ध्रु.॥
काय तुझें आह्मां करावें वैकुंठ । भेवों नको भेट आतां मज ॥२॥
तुका ह्मणे तुझी नलगे दसोडी । परि आहे आवडी दर्शनाची ॥३॥
संतनिंदा ज्याचे घरीं । नव्हे घर ते यमपुरी ॥१॥
त्याच्या पापा नाहीं जोडा । संगें जना होय पीडा ॥ध्रु.॥
संतनिंदा आवडे ज्यासी । तो जिता चि नर्कवासी ॥२॥
तुका ह्मणे तो नष्ट। जाणा गाढव तो स्पष्ट ॥३॥
आलें देवाचिया मना । तेथें कोणाचें चालेना ॥१॥
हरिश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घरीं पाणी ॥ध्रु.॥
पांडवांचा साहाकारी। राज्यावरोनि केले दुरी ॥२॥
तुका ह्मणे उगेचि राहा । होईल तें सहज पाहा ॥३॥
निजल्यानें गातां उभा नारायण । बैसल्या कीर्तन करितां डोले ॥१॥
उभा राहोनियां मुखीं नाम वदे । नाचे नाना छंदें गोविंद हा ॥ध्रु.॥
मारगीं चालतां मुखीं नाम वाणी । उभा चक्रपाणी मागें पुढें ॥२॥
तुका ह्मणे यासी कीर्तनाची गोडी । प्रेमे घाली उडी नामासाटीं ॥३॥
काम क्रोध आह्मी वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥१॥
आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु.॥
रिद्धिसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥२॥
तुका ह्मणे आम्ही विठोबाचे दास । करूनि ठेलों ग्रास ब्रह्मांडाचा ॥३॥
उठाउठीं अभिमान । जाय ऐसें स्थळ कोण ॥१॥
तें या पंढरीस घडे । खळां पाझर रोकडे ॥ध्रु.॥
अश्रूचिया धारा । कोठें रोमांच शरीरा ॥२॥
तुका ह्मणे काला । कोठें अभेद देखिला ॥३॥
पंढरी पंढरी । ह्मणतां पापाची बोहोरी ॥१॥
धन्य धन्य जगीं ठाव । होतो नामाचा उत्साव ॥ध्रु.॥
रिद्धिसिद्धी लोटांगणीं। प्रेमसुखाचिया खाणी ॥२॥
अधिक अक्षरानें एका । भूवैकुंठ ह्मणे तुका ॥३॥
भार घालीं देवा । न लगे देश डोई घ्यावा ॥१॥
देह प्रारब्धा अधीन । सोसें अधिक वाढे सीण ॥ध्रु.॥
व्यवसाय निमित्त। फळ देतसे संचित ॥२॥
तुका ह्मणे फिरे । भोंवडीनें दम जिरे ॥३॥
भोग भोगावरी द्यावा । संचिताचा करुनी ठेवा ॥१॥
शांती धरणें जिवासाटीं । दशा उत्तम गोमटी ॥ध्रु.॥
देह लेखावें असार । सत्य परउपकार ॥२॥
तुका ह्मणे हे मिरासी । बुडी द्यावी ब्रह्मरसी ॥३॥
येथें बोलोनियां काय । व्हावा गुरू तरि जाय ॥१॥
मज न साहे वांकडें । ये विठ्ठलकथेपुढें ॥ध्रु.॥
ऐकोनि मरसी कथा। जंव आहेसि तुं जीता ॥२॥
हुरमतीची चाड । तेणें न करावी बडबड ॥३॥
पुसेल कोणी त्यास । जा रे करीं उपदेश ॥४॥
आह्मी विठ्ठलाचे वीर । फोडूं किळकाळाचें शीर ॥५॥
घेऊं पुढती जन्म । वाणूं कीर्त मुखें नाम ॥६॥
तुका ह्मणे मुक्ती । नाहीं आस चि ये चित्ती ॥७॥
आनुहातीं गुंतला नेणे बाह्य रंग । वृत्ति येतां मग बळ लागे ॥१॥
मदें माते तया नाहीं देहभाव । आपुले आवेव आवरितां ॥ध्रु.॥
आणिकांची वाणी वेद तेणें मुखें । उपचारदुःखें नाठवती ॥२॥
तें सुख बोलतां आश्चर्य या जना । विपरीत मना भासतसे ॥३॥
तुका ह्मणे बाह्य रंग तो विठ्ठल । अंतर निवालें ब्रह्मरसें ॥४॥
ब्रह्मरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली सकळ ज्यांची ॥१॥
नाहीं त्या विटाळ अखंड सोंवळीं । उपाधीवेगळीं जाणिवेच्या ॥ध्रु.॥
मन हें निश्चळ जालें एके ठायीं । तयां उणें काई निजसुखा ॥२॥
तीं चि पुण्यवंतें परउपकारी । प्रबोधी त्या नारीनरलोकां ॥३॥
तुका ह्मणे त्यांचे पायीं पायपोस । होऊनियां वास करिन तेथें ॥ 4॥
जैसें तैसें राहे देवाचें हें देणें । यत्न करितां तेणें काय नव्हे ॥१॥
दासां कृपासिंधु नुपेक्षी सर्वथा । अंतरींची व्यथा कळे त्यासी ॥ध्रु.॥
मागों नेणे परी माय जाणे वर्म । बाळा नेदी श्रम पावों कांहीं ॥२॥
तुका ह्मणे मज अनुभव अंगें । वचन वाउगें मानेना हें ॥३॥
आह्मां हरिच्या दासां कांहीं । भय नाहीं त्रैलोकीं ॥१॥
देव उभा मागें-पुढें । उगवी कोडें संकट ॥ध्रु.॥
जैसा केला तैसा होय। धांवे सोय धरोनि ॥२॥
तुका ह्मणे असों सुखें । गाऊं मुखें विठोबा ॥३॥
परद्रव्यपरनारीचा अभिळास । तेथूनि हारास सर्वभाग्या ॥१॥
घटिका दिवस मास वरुषें लागेतीन । बांधलें पतन गांठोडीस ॥ध्रु.॥
पुढें घात त्याचा रोकडा शकुन । पुढें करी गुण निश्चयेंसी ॥२॥
तुका ह्मणे एकां तडतांथवड । काळ लागे नाड परी खरा ॥३॥
समर्थाचें केलें । कोणां जाईल मोडिलें ॥१॥
वांयां करावी ते उरे । खटपटें सोस पुरे ॥ध्रु.॥
ठेविला जो ठेवा । आपुलाला तैसा खावा ॥२॥
ज्याचें त्याचें हातीं । भुके तयाची फजिती ॥३॥
तुका ह्मणे कोटी । बाळे जाले शूळ पोटी ॥४॥
हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं ॥१॥
याचा धरीन अभिमान । करीन आपुलें जतन ॥ध्रु.॥
देऊनियां जीव। बळी साधिला हा ठाव ॥२॥
तुका ह्मणे देवा । जुन्हाट हे माझी सेवा ॥३॥
नेणे गति काय कवण अधोगति । मानिली नििंश्चती तुझ्या पायीं ॥१॥
कर्म धर्म कोण नेणें हा उपाव । तुझ्या पायीं भाव ठेवियेला ॥ध्रु.॥
नेणें निरसं पाप पुण्य नेणें काय । ह्मणऊनि पाय धरिले तुझे ॥२॥
वेडा मी अविचार न कळे विचार । तुज माझा भार पांडुरंगा ॥३॥
तुका ह्मणे तुज करितां नव्हे काय । माझा तो उपाय कवण तेथें ॥४॥
तुझा ह्मणऊनि जालों उतराई । त्याचें वर्म काई तें मी नेणें ॥१॥
हातीं धरोनियां दावीं मज वाट । पुढें कोण नीट तें चि देवा ॥ध्रु.॥
देवभक्तपण करावें जतन । दोहीं पक्षीं जाण तूं चि बळी ॥२॥
अभिमानें तुज लागली हे लाज । शरणागतां काज करावया ॥३॥
तुका ह्मणे बहु नेणता मी फार । ह्मणऊनि विचार जाणविला ॥४॥
मारगीं चालतां पाउलापाउलीं । चिंतावी माउली पांडुरंग ॥१॥
सर्व सुख लागे घेउनिया पाठी । आवडींचा कंठीं रस ओती ॥ध्रु.॥
पीतांबरें छाया करी लोभापर । पाहे तें उत्तर आवडीचें ॥२॥
तुका ह्मणे हें चि करावें जीवन । वाचे नारायण तान भूक ॥३॥
जालों आतां दास । माझे तोडोनियां पाश ॥१॥
ठाव द्यावा पायांपाशीं । मी तो पातकांची राशी ॥ध्रु.॥
सकळ ही गोवा । माझा उगवूनि देवा ॥२॥
तुका ह्मणे भय । करा जवळी तें नये ॥३॥
अंतरींचें जाणां । तरि कां येऊं दिलें मना ॥१॥
तुमची करावी म्यां सेवा । आतां अव्हेरितां देवा ॥ध्रु.॥
नव्हती मोडामोडी । केली मागें ते चि घडी ॥२॥
तुका ह्मणे दिला वाव । पायीं लागों दिला भाव ॥३॥
पवित्र होईन चरित्रउच्चारें । रूपाच्या आधारें गोजिरिया ॥१॥
आपुरती बुद्धि पुण्य नाहीं गांठी । पायीं घालीं मिठी पाहें डोळां ॥ध्रु.॥
गाईन ओविया शिष्टांच्या आधारें । सारीन विचारें आयुष्या या ॥२॥
तुका ह्मणे तुझें नाम नारायणा । ठेवीन मी मना आपुलिया ॥३॥
काय ऐसा जन्म जावा वांयांविण । कांहीं तरी ॠण असो माथां ॥१॥
कोणे तरी काळें होईल आठव । नाहीं जरी भाव भार खरा ॥ध्रु.॥
शता एकातरी जन्माच्या शेवटीं । कृपाळुवा पोटीं होइल दया ॥२॥
तुका ह्मणे नाहीं फांकों तरी देत । सर्वांचें उचित सांपडलें ॥३॥
नाहीं कोणी दिस जात वांयांविण । साध्य नाहीं सीण लटिका चि ॥१॥
एकाचिये माथां असावें निमित्त । नसो नाहीं हित कपाळीं तें ॥ध्रु.॥
कांहीं एक तरी बोलायाचा जागा । नेदिती वाउगा उभा ठाकों ॥२॥
तुका ह्मणे वर्में कळों येती कांहीं । ओळखी जे नाहीं होईल ते ॥३॥
काय करील तें नव्हे विश्वंभर । सेवका दारिद्र लाज नाहीं ॥१॥
मजपासूनि हें पडिलें अंतर । काय तो अव्हेर करूं जाणे ॥ध्रु.॥
नामाच्या चिंतनें नासी गर्भवास । नेदी करूं आस आणिकांची ॥२॥
तुका ह्मणे नेणों किती वांयां गेले । तयां उद्धरिलें पांडुरंगें ॥३॥
संध्या करितोसी केशवाच्या नांवें । आरंभीं तें ठावें नाहीं कैसें ॥१॥
किती या सांगावें करूनि फजित । खळ नेणे हित जवळीं तें ॥ध्रु.॥
माजल्या न कळे उचित तें काय । नेघावें तें खाय घ्यावें सांडी ॥२॥
तुका ह्मणे घेती भिंती सवें डोकें । वावसी तें एकें अंधारलीं ॥३॥
दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥१॥
तैसे खळां मुखें न करावें श्रवण । अहंकारें मन विटाळलें ॥ध्रु.॥
काय करावीं तें बत्तीस लक्षणें । नाक नाहीं तेणें वांयां गेलीं ॥२॥
तुका ह्मणे अन्न जिरों नेदी माशी । आपुलिया जैशी सवें श्वगॉ ॥३॥
सांगावें तें बरें असतें हें पोटीं । दुःख देते खोटी बुद्धि मग ॥१॥
आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥ध्रु.॥
नाहीं मागें येत बोलिलें वचन । पावावा तो सीण बरा मग ॥२॥
तुका ह्मणे बहु भ्यालों खटपटे । आतां देवा खोटे शब्द पुरे ॥३॥
वाराणसीस यात्रा चालली तेव्हां स्वामींनीं भागीरथीस पत्र धाडिलें - ते अभंग ॥ 4
परिसें वो माते माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
भागीरथी महादोष निवारणी । सकळां स्वामिणी तीर्थांचिये ॥ध्रु.॥
जीतां भुक्ति मोक्ष मरणें तुझ्या तिरीं । अहिक्यपरत्री सुखरूप ॥२॥
तुका विष्णुदास संतांचें पोसनें । वागपुष्प तेणें पाठविलें ॥३॥
तुह्मी विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥१॥
कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥ध्रु.॥
काय उणें तुह्मांपाशीं। मी तों अल्पें चि संतोषी ॥२॥
तुका ह्मणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥३॥
पिंड पदावरी । दिला आपुलिये करीं ॥१॥
माझें जालें गयावर्जन । फिटलें पितरांचें ॠण ॥ध्रु.॥
केलें कर्मांतर । बोंब मारिली हरिहर ॥२॥
तुका ह्मणे माझें । भार उतरलें ओझें ॥३॥
मथुरेच्या राया । माझें दंडवत पायां ॥१॥
तुमचे कृपेचें पोसनें । माझा समाचार घेणें ॥ध्रु.॥
नाम धरिलें कंठीं । असें आर्तभूत पोटीं ॥२॥
जीवींचें ते जाणा । तुका ह्मणे नारायणा ॥३॥
जाय तिकडे लागे पाठीं । नाहीं तुटी आठवाची ॥१॥
हरूनियां नेलें चित्त । माझें थीत भांडवल ॥ध्रु.॥
दावूनियां रूप डोळां। मन चाळा लावियेलें ॥२॥
आणीक तोंडा पडिली मिठी । कान गोठी नाइकती ॥३॥
बोलिल्याचा आठव न घडे । वाणी ओढे ते सोई ॥४॥
तुका ह्मणे प्रेमधगी । भरली अंगीं अखंड ॥५॥
नको ऐसें जालें अन्न । भूक तान ते गेली ॥१॥
गोविंदाची आवडी जीवा । करीन सेवा धणीवरी ॥ध्रु.॥
राहिलें तें राहो काम । सकळ धर्म देहीचे ॥२॥
देह घरिला त्याचें फळ । आणीक काळ धन्य हा ॥३॥
जाऊं नेदीं करितां सोस । क्षेमा दोष करवीन ॥४॥
तुका ह्मणे या च पाठी । आता साटी जीवाची ॥५॥
वाट पाहें हरि कां नये आझूनि । निष्ठ कां मनीं धरियेलें ॥१॥
काय करूं धीर होत नाहीं जीवा । काय आड ठेवा उभा ठेला ॥ध्रु.॥
नाहीं माझा धांवा पडियेला कानीं । कोठें चक्रपाणी गुंतलेती ॥२॥
नाही आलें कळों अंतरा अंतर । कृपावंत फार ऐकतो ॥३॥
बहुता दिसांचें राहिलें भातुकें । नाहीं कवतुकें कृवाळिलें ॥४॥
तुका ह्मणे देइप एकवेळा भेटी । शीतळ हें पोटीं होइल मग ॥५॥
नाहीं दिलें कधीं कठिण उत्तर । तरी कां अंतर पडियेलें ॥१॥
ह्मणऊनि आतां वियोग न साहे । लांचावलें देहे संघष्टणें ॥ध्रु.॥
वेळोवेळां वाचे आठवितों नाम । अधिक चि प्रेम चढे घेतां ॥२॥
तुका ह्मणे पांडुरंगे जननिये । घेऊनि कडिये बुझाविलें ॥३॥
आतां न करीं सोस । सेवीन हा ब्रह्मरस ॥१॥
सुखें सेवीन अमृत । ब्रह्मपदींचें निश्चित ॥ध्रु.॥
तुमचा निज ठेवा । आह्मी पाडियेला ठावा ॥२॥
तुका ह्मणे देवरांया । आतां लपालेती वांयां ॥३॥
जेथें जेथें जासी । तेथें मज चि तूं पासी ॥१॥
ऐसा पसरीन भाव । रिता नाहीं कोणी ठाव ॥ध्रु.॥
चित्त जडलें पायीं । पाळती हें ठायीं ठायीं ॥२॥
तुका ह्मणे पोटीं । देव घालुनि सांगें गोष्टी ॥३॥
सांपडला हातीं । तरी जाली हे नििंश्चती ॥१॥
नाहीं धांवा घेत मन । इंिद्रयांचें समाधान ॥ध्रु.॥
सांडियेला हेवा । अवघा संचिताचा ठेवा ॥२॥
तुका ह्मणे काम । निरसुनियां घेतों नाम ॥३॥
मुक्तिपांग नाहीं विष्णुचिया दासां । संसार तो कैसा न देखती ॥१॥
बैसला गोविंद जडोनियां चित्ती । आदि ते चि अंतीं अवसान ॥ध्रु.॥
भोग नारायणा देऊनि निराळीं । ओविया मंगळीं तो चि गाती ॥२॥
बळ बुद्धि त्यांची उपकारासाटीं । अमृत तें पोटी सांटवलें ॥३॥
दयावेंत तरी देवा च सारिखीं । आपुलीं पारखीं नोळखती ॥४॥
तुका ह्मणे त्यांचा जीव तो चि देव । वैकुंठ तो ठाव वसती तो ॥५॥
सेवीन उिच्छष्ट लोळेन अंगणीं । वैष्णवां चरणीं होइन जोडा ॥१॥
ऐसें जन्म आतां मज देइप देवा । आवडी हे जीवा सर्व काळ ॥ध्रु.॥
त्यांचे चरणरज येती अंगावरी । वंदीत ते शिरीं जाइन मागें ॥२॥
तुका ह्मणे येथें राहिलासे भाव । सकळ ही वाव जाणोनियां ॥३॥
क्षेम देयाला हो । स्फुरताती दंड बाहो ॥१॥
आतां झडझडां चालें । देइप उचलूं पाउलें ॥ध्रु.॥
सांडीं हंसगती । बहु उत्कंठा हे चित्तीं ॥२॥
तुका ह्मणे आई । श्रीरंगे विठाबाई ॥३॥
जेणें वेळ लागे । ऐसें सांडीं पांडुरंगे ॥१॥
कंठ कंठा मिळों देइप । माझा वोरस तूं घेइप ॥ध्रु.॥
नको पीतांबर । सांवरूं हे अळंकार ॥२॥
टाकीं वो भातुकें । लौकिकाचें कवतुकें ॥३॥
हातां पायां नको । कांहीं वेगळालें राखों ॥४॥
तुका ह्मणे यावरी । मग सुखें अळंकारीं ॥५॥
कृपेचा ओलावा । दिसे वेगळा चि देवा ॥१॥
मी हें इच्छीतसें साचें । न लगे फुकटशाई काचें ॥ध्रु.॥
जेणें जाय कळसा। पाया उत्तम तो तैसा ॥२॥
तुका ह्मणे घरीं । तुझ्या अवघिया परी ॥३॥
दावूनियां कोणां कांहीं । ते चि वाहीं चाळविलीं ॥१॥
तैसें नको करूं देवा । शुद्धभावा माझिया ॥ध्रु.॥
रिद्धिसिद्धी ऐसे आड । येती नाड नागवूं ॥२॥
उदकाऐसे दावुनि ओढी । उर फोडी झळई ॥३॥
दर्पणींचें दिलें धन । दिसे पण चरफडी ॥४॥
तुका ह्मणे पायांसाटीं । करीं आटी कळों द्या ॥५॥
काय माता विसरे बाळा । कळवळा प्रीतीचा ॥१॥
आवडीनें गळां मिठी । घाली उठी बैसवी ॥ध्रु.॥
लावूं धांवे मुख स्तना । नये मना निराळें ॥२॥
भावंडाचें भातें दावी । आपुलें लावी त्यास जी ॥३॥
माझें थोडें त्याचें फार । उत्तर हें वाढवी ॥४॥
तुका ह्मणे नारायणा । तुह्मी जाणां बुझावूं ॥५॥
तरीं आह्मी तुझी धरियेली कास । नाहीं कोणी दास वांयां गेला ॥१॥
आगा पंढरीच्या उभ्या विटेवरी । येइप लवकरी धांवें नेटे ॥ध्रु.॥
पालवितों तुज उभी करोनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे ॥२॥
तुका ह्मणे तुज बहु कान डोळे । कां हे माझे वेळे ऐसी परी ॥३॥
करावा कांटाळा नव्हे हें उचित । आधीं च कां प्रीत लावियेली ॥१॥
जाणतसां तुह्मीं रूपाचें लाघव । आपुलें तें जीव घेतें ऐसा ॥ध्रु.॥
काय ह्मणऊनि आलेती आकारा । आह्मां उजगरा करावया ॥२॥
तुका ह्मणे भीड होती आजिवरी । आतां देवा उरी कोण ठेवी ॥३॥
धरूनि पालव असुडीन करें । मग काय बरें दिसे लोकीं ॥१॥
काय तें विचारा ठायींचें आपणां । जो हा नारायणा अवकाश ॥ध्रु.॥
अंतर पायांसी तो वरी या गोष्टी । पडिलिया मिठी हालों नेदीं ॥२॥
रुसलेती तरी होईल बुझावणी । तांतडी करूनि साधावें हें ॥३॥
सांपडलिया आधीं कारणासी ठाव । येथें करूं भाव दृढ आतां ॥४॥
तुका ह्मणे तुझे ठाउके बोभाट । मग खटपट चुकली ते ॥५॥
निष्ठा उत्तरीं न धरावा राग । आहे लागभाग ठायींचा चि ॥१॥
तूं माझा जनिता तूं माझा जनिता । रखुमाईच्या कांता पांडुरंगा ॥ध्रु.॥
मुळींच्या ठेवण्यां आहे अधिकार । दुरावोनि दूर गेलों होतों ॥२॥
पोटींच्या आठवा पडिला विसर । काहीं आला भार माथां तेणें ॥३॥
राखिला हा होता बहु चौघां चार । साक्षीने वेव्हार निवडिला ॥४॥
तुका ह्मणे कांहीं बोलणें न लगे । आतां पांडुरंगे तूं मी ऐसें ॥५॥
सांगतां गोष्टी लागती गोडा । हा तो रोकडा अनुभव ॥१॥
सुख जालें सुख जालें । नये बोले बोलतां ॥ध्रु.॥
अंतर तें नये दिसों । आतां सोस कासया ॥२॥
तुका ह्मणे जतन करूं । हें चि धरूं जीवेंसी ॥३॥
मजशीं पुरे न पडे वादें । सुख दोहींच्या संवादें ॥१॥
तूं चि आगळा काशानें । शिर काय पायांविणे ॥ध्रु.॥
वाहों तुझा भार । दुःख साहोनि अपार ॥२॥
तुका ह्मणे नाहीं भेद । देवा करूं नये वाद ॥३॥
तुज नाहीं शक्ति । काम घेसी आह्मां हातीं ॥१॥
ऐसें अनुभवें पाहीं । उरलें बोलिजेसें नाहीं ॥ध्रु.॥
लपोनियां आड । आह्मां तुझा कैवाड ॥२॥
तुका ह्मणे तुजसाठी । आह्मां संवसारें तुटी ॥३॥
तुझाठायीं ओस । दोन्ही पुण्य आणि दोष ॥१॥
झडलें उरलें किती । आह्मी धरियेलें चित्तीं ॥ध्रु.॥
कळलासी नष्टा। यातिक्रियाकर्मभ्रष्टा ॥२॥
तुका ह्मणे बोला । नाहीं ताळा गा विठ्ठला ॥३॥
भांडावें तों हित । ठायी पडा तें उचित ॥१॥
नये खंडों देऊं वाद । आह्मां भांडवलभेद ॥ध्रु.॥
शब्दासारसें भेटी । नये पडों देऊं तुटी ॥२॥
तुका ह्मणे आळस । तो चि कारणांचा नास ॥३॥
नव्हों गांढे आळसी । जो तूं आह्मांपुढें जासी ॥१॥
अरे दिलें आह्मां हातीं । वर्म वेवादाचें संतीं ॥ध्रु.॥
धरोनियां वाट। जालों शिरोमणि थोंट ॥२॥
तुका ह्मणे देवा । वाद करीन खरी सेवा ॥३॥
तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥१॥
जाओ राहो देह आतां ये चि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥
कुश्चीळ इंिद्रयें आपुलिया गुणें । यांचिया पाळणें कोण हित ॥२॥
पुत्र पत्नी बंधु सोयरीं खाणोरीं । यांचा कोण धरी संग आतां ॥३॥
पिंड हा उसना आणिला पांचांचा । सेकीं लागे ज्याचा त्यासी देणें ॥४॥
तुका ह्मणे नाहीं आणिक सोइरें । तुजविण दुसरें पांडुरंगा ॥५॥
ऐसें सत्य माझें येईल अंतरा । तरि मज करा कृपा देवा ॥१॥
वचनांसारिखें तळमळी चित्त । बाहेरि तो आंत होइल भाव ॥ध्रु.॥
तरि मज ठाव द्यावा पायांपाशीं । सत्यत्वें जाणसी दास खरा ॥२॥
तुका ह्मणे सत्य निकट सेवकें । तरि च भातुकें प्रेम द्यावें ॥३॥
आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा ॥१॥
आतां काय देऊं पायांपें परिहार । जाणां तो विचार करा देवा ॥ध्रु.॥
आपुलें तें येथें काय चाले केलें । जोडावे ते भले हात पुढें ॥२॥
तुका ह्मणे फिके बोल माझे वारा । कराल दातारा होईल तें ॥३॥
सुखें न मनी अवगुण । दुःख भोगी त्याचें कोण ॥१॥
हें कां ठायींचें न कळे । राती करा झांकुनि डोळे ॥ध्रु.॥
चालोनि आड वाटे । पायीं मोडविले कांटे ॥२॥
तुका ह्मणे कोणा। बोल ठेवितो शाहाणा ॥३॥
आह्मी न देखों अवगुणां । पापी पवित्र शाहाणा ॥१॥
अवघीं रूपें तुझीं देवा । वंदूं भावें करूं सेवा ॥ध्रु.॥
मज मुक्ती सवें चाड । नेणें पाषाण धातु वाड ॥२॥
तुका ह्मणे घोटीं। विष अमृत तुजसाटीं ॥३॥
मज नाहीं तुझ्या ज्ञानाची ते चाड । घेतां वाटे गोड नाम तुझें ॥१॥
नेणतें लेंकरूं आवडीचें तान्हें । बोलतों वचनें आवडीनें ॥ध्रु.॥
भक्ती नेणें कांहीं वैराग्य तें नाहीं । घातला विठाई भार तुज ॥२॥
तुका ह्मणे नाचें निर्लज्ज होऊनि । नाहीं माझे मनीं दुजा भाव ॥३॥
काय माझी संत पाहाती जाणीव । सर्व माझा भावत्यांचे पायीं ॥१॥
कारण सरतें करा पांडुरंगीं । भूषणाची जगीं काय चाड ॥ध्रु.॥
बोबडा उत्तरीं ह्मणें हरिहरि । आणीक भीकारी नेणें दुजें ॥२॥
तुका ह्मणे तुह्मी विठ्ठलाचे दास । करितों मी आस उिच्छष्टाची ॥३॥
जीवाचें जीवन अमृताची तनु । ब्रह्मांड भूषणु नारायण ॥१॥
सुखाचा सांगात अंतकासी अंत । निजांचा निवांत नारायण ॥ध्रु.॥
गोडाचें ही गोड हर्षाचें ही कोड । प्रीतीचा ही लाड नारायण ॥२॥
भावाचा निज भाव नांवांचा हा नांव । अवघा पंढरिराव अवतरलासे ॥३॥
तुका ह्मणे जें हें साराचें हें सार । माझा अंगीकार तेणें केला ॥४॥
आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥१॥
माय रखुमाई पांडुरंग पिता । शुद्ध उभयतां पक्ष दोन्ही ॥ध्रु.॥
बापुडा मी नव्हें दुर्बळ ठेंगणा । पांगिला हा कोणा आणिकांसी ॥२॥
दृष्ट नव्हों आह्मी अभागी अनाथ । आमुचा समर्थ कैवारी हा ॥३॥
संवसार आह्मां सरला सकळ । लपोनियां काळ ठेला धाकें ॥४॥
तुका ह्मणे जालों निर्भर मानसीं । जोडलिया रासी सुखाचिया ॥५॥
केलें नाहीं मनीं तया घडे त्याग । उबगें उद्वेग नाहीं चित्तीं ॥१॥
देव चि हा जाणे अंतरींचा भाव । मिथ्या तो उपाव बाह्य रंग ॥ध्रु.॥
त्यागिल्याचें ध्यान राहिलें अंतरीं । अवघी ते परी विटंबना ॥२॥
तुका ह्मणे आपआपण्यां विचारा । कोण हा दुसरा सांगे तुह्मां ॥३॥
हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥१॥
आवडी विठ्ठल गाईजे एकांतीं । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥
आणीकां अंतरीं निदावी वसति । करावी हे शांती वासनेची ॥२॥
तुका ह्मणे बाण हा चि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचूं नये ॥३॥
हो कां नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरि ॥१॥
ते मज विठोबासमान । नमूं आवडी ते जन ॥ध्रु.॥
ज्याचें अंतर निर्मळ । त्याचें सबाह्य कोमळ ॥२॥
तुका ह्मणे भावें । जिव्हें प्रेम वोसंडावें ॥३॥
हरिची हरिकथा नावडे जया । अधम ह्मणतां तया वेळ लागे ।
मनुष्यदेहीं तया नाट लागलें । अघोर साधिलें कुंभपाक ॥१॥
कासया जन्मा आला तो पाषाण । जंत कां होऊन पडिला नाहीं।
उपजे मरोनि वेळोवेळां भांड । परिलाज लंड न धरी कांहीं ॥ध्रु.॥
ऐसियाची माता कासया प्रसवली । वर नाहीं घातली मुखावरी।
देवधर्मांविण तो हा चांडाळ नर । न साहे भूमि भार क्षणभरी ॥२॥
राम ह्मणतां तुझें काय वेचेल । कां हित आपुलें न विचारिसी ।
जन्मोजन्मींचा होईल नरकीं । तुका ह्मणे चुकी जरी यासी ॥३॥
उपेक्षिला येणें कोणी शरणागत । ऐसी नाहीं मात आईिकली ॥१॥
आतां काय ब्रीद सांडील आपुलें । ठायींचें धरिलें जाणोनियां ॥ध्रु.॥
माझ्या दोषासाटीं होइल पाठमोरा । ऐसा कोण पुरा भोग बळी ॥२॥
तुका ह्मणे रूप आमुच्या कैवारें । धरिलें गोजिरें चतुर्भुज ॥३॥
आवडीसारिखें संपादिलें सोंग । अनंत हें मग जालें नाम ॥१॥
कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा । दुर्गम या नभाचा ही साक्षी ॥ध्रु.॥
हातें जेवी एक मुखीं मागे घांस । माउली जयास तैसी बाळा ॥२॥
तुका ह्मणे माझें ध्यान विटेंवरी । तैसी च गोजिरी दिसे मूर्ति ॥३॥
धन्य मी मानीन आपुलें संचित । राहिलीसे प्रीत तुझे नामीं ॥१॥
धन्य जालों आतां यासि संदेह नाहीं । न पडों या वाहीं काळा हातीं ॥ध्रु.॥
ब्रह्मरस करूं भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ॥२॥
तुका ह्मणे पोट धालें चि न धाये । खादलें चि खायें आवडीनें ॥३॥
आवडी न पुरे सेवितां न सरे । पडियेली धुरेसवें गांठी ॥१॥
न पुरे हा जन्म हें सुख सांटितां । पुढती ही आतां हें चि मागों ॥ध्रु.॥
मारगाची चिंता पालखी बैसतां । नाहीं उसंतितां कोसपेणी ॥२॥
तुका ह्मणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूक तान ॥३॥
नाहीं त्रिभुवनीं सुख या समान । ह्मणऊनि मन िस्थरावलें ॥१॥
धरियेलीं जीवीं पाउलें कोमळीं । केली एकावळी नाममाळा ॥ध्रु.॥
शीतळ होऊनियां पावलों विश्रांती । न साहे पुढती घाली चित्ता ॥२॥
तुका ह्मणे जाले सकळ सोहळे । पुरविले डोहळे पांडुरंगें ॥३॥
मायबापापुढें लाटिकें लेंकरूं । तैसे बोल करूं कवतुकें ॥१॥
कृपावंता घालीं प्रेमपान्हारस । वोळली वोरसे पांडुरंग ॥ध्रु.॥
नाहीं धीर खुंटी जवळी हुंबरे । ठायीं च पाखर कविळते ॥२॥
तुका ह्मणे मज होऊं नेदी सीण । कळों नेदी भिन्न आहे ऐसें ॥३॥
आठवों नेंदी आवडी आणीक । भरूनियां लोक तिन्ही राहे ॥१॥
मन धांवे तेथें तिचें चि दुभतें । संपूर्ण आइतें सर्वकाळ ॥ध्रु.॥
न लगे वोळावीं इंिद्रयें धांवतां । ठाव नाहीं रिता उरों दिला ॥२॥
तुका ह्मणे समपाउलाचा खुंट । केला बळकट हालों नेदी ॥३॥
उत्तम घालावें आमुचिये मुखीं । निवारावें दुःखी होऊनि तें ॥१॥
न बैसे न वजे जवळूनि दुरी । मागें पुढें वारी घातपात ॥ध्रु.॥
नाहीं शंका असो भलतिये ठायीं । मावळलें पाहीं द्वैताद्वैत ॥२॥
तुका ह्मणे भार घेतला विठ्ठलें । अंतरीं भरलें बाह्य रूप ॥३॥
आह्मां अळंकार मुद्रांचे शृंगार । तुळसीचे हार वाहों कंठीं ॥१॥
लाडिके डिंगर पंढरिरायाचे । निरंतर वाचे नामघोष ॥ध्रु.॥
आह्मां आणिकांची चाड चि नाहीं । सर्व सुखें पायीं विठोबाच्या ॥२॥
तुका ह्मणे आह्मी नेघों या मुक्ती । एकविण चित्तीं दुजें नाहीं ॥३॥
चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं ॥१॥
डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥ध्रु.॥
संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥२॥
तें तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचें भांडार ॥३॥
जन्म नाहीं रे आणीक । तुका ह्मणे माझी भाक ॥४॥
पैल घरीं जाली चोरी । देहा करीं बोंब ॥१॥
हाबा हाबा करिसी काये । फिराऊनि नेट्यां वायें ॥ध्रु.॥
सांडुनियां शुद्धी। निजलासी गेली बुद्धी ॥२॥
चोरीं तुझा काढला बुर । वेगळें भावा घातलें दूर ॥३॥
भलतियासी देसी वाव । लाहेसि तूं एवढा ठाव ॥४॥
तुका ह्मणे अझुनि तरी । उरलें तें जतन करीं ॥५॥
किती वेळा खादला दगा । अझून कां जागसी ना ॥१॥
लाज नाहीं हिंडतां गांवें । दुःख नवें नित्य नित्य ॥ध्रु.॥
सवें चोरा हातीं फांसे । देखतां कैसे न देखसी ॥२॥
तुका ह्मणे सांडिती वाट । तळपट करावया ॥३॥
मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥१॥
आणिकांची कां लाज नाहीं । आळसा जिहीं तजिलें ॥ध्रु.॥
एके सांते सरिखीं वित्तें । हानि हित वेगळालीं ॥२॥
तुका ह्मणे हित धरा । नव्हे पुरा गांवढाळ ॥३॥
निरोप सांगतां । न धरीं भय न करीं चिंता ॥१॥
असो ज्याचें त्याचे त्याचे माथां । आपण करावी ते कथा ॥ध्रु.॥
उतरावा भार । किंवा न व्हावें सादर ॥२॥
तुका ह्मणे धाक । तया इह ना परलोक ॥३॥
शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥१॥
केला न संडी कैवाड । जीवेंसाटीं तों हे होड ॥ध्रु.॥
धीर तो कारण । साह्य होतो नारायण ॥२॥
तुका ह्मणे हरि । दासां रिक्षतो निर्धारीं ॥३॥
हरिच्या दासां भये । ऐसें बोलों तें ही नये ॥१॥
राहोनियां आड । उभा देव पुरवी कोड ॥ध्रु.॥
हरिच्या दासां चिंता। अघटित हे वार्ता ॥२॥
खावे ल्यावें द्यावें । तुका ह्मणे पुरवावें ॥३॥
दासां सर्व काळ । तेथें सुखाचे कल्लोळ ॥१॥
जेथें वसती हरिदास । पुण्य पिके पापा नास ॥ध्रु.॥
फिरे सुदर्शन । घेऊनियां नारायण ॥२॥
तुका ह्मणे घरीं । होय ह्मणियारा कामारी ॥३॥
आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास ॥१॥
मायबापाचीं लाडकीं । कळों आलें हें लौकिकीं ॥ध्रु.॥
नाहीं निपराद । कोणां आह्मांमध्यें भेद ॥२॥
तुका ह्मणे मान । अवघें आमचें हें धन ॥३॥
काय ढोरापुढें घालूनि मिष्टान्न । खरा विलेपन चंदनाचें ॥१॥
नको नको देवा खळाची संगति । रस ज्या पंगती नाहीं कथे ॥ध्रु.॥
काय सेज बाज माकडा विलास । अळंकारा नास करुनी टाकी ॥२॥
तुका ह्मणे काय पाजूनि नवनीत । सर्पा विष थीत अमृताचें ॥३॥
आनंदें एकांतीं प्रेमें वोसंडत । घेऊं अगणित प्रेमसुख ॥१॥
गोप्य धन वारा लागों यास । पाहों नेदूं वास दुर्जनासी ॥ध्रु.॥
झणी दृष्टि लागे आवडीच्या रसा । सेवूं जिरे तैसा आपणासी ॥२॥
तुका ह्मणे हें बहु सकुमार । न साहावे भार वचनाचा ॥३॥
मोक्षपदें तुच्छ केलीं याकारणें । आह्मां जन्म घेणें युगायुगीं ॥१॥
विटे ऐसें सुख नव्हे भक्तिरस । पुडतीपुडती आस सेवावें हें ॥ध्रु.॥
देवा हातीं रूप धरविला आकार । नेदूं निराकार होऊं त्यासी ॥२॥
तुका ह्मणे चित्त निवांत राहिलें । ध्याइप तीं पाउलें विटेवरि ॥३॥
नको बोलों भांडा । खीळ घालुन बैस तोंडा ॥१॥
ऐक विठोबाचे गुण । करीं सादर श्रवण ॥ध्रु.॥
प्रेमसुखा आड । काय वाजातें चाभाड ॥२॥
तुका ह्मणे हिता । कां रे नागवसी थीता ॥३॥
अति जालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न ह्मणावी ॥१॥
उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ध्रु.॥
शूरत्वावांचूनि शूरांमाजी ठाव । नाहीं आयुर्भाव आणिलिया ॥२॥
तुका ह्मणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाईिवण नाहीं ॥३॥
शूरां साजती हतियारें । गांढ्यां हासतील पोरें ॥१॥
काय केली विटंबण । मोतीं नासिकावांचून ॥ध्रु.॥
पतिव्रते रूप साजे। सिंदळ काजळ लेतां लाजे ॥२॥
दासी पत्नी सुता । नव्हे सरी एक पिता ॥३॥
मान बुद्धिवंतां । थोर न मनिती पिता ॥४॥
तुका ह्मणे तरी । आंत शुद्ध दंडे वरी ॥५॥
काय केलें जळचरीं । ढीवर त्यांच्या घातावरी ॥१॥
हा तों ठायींचा विचार । आहे यातिवैराकार ॥ध्रु.॥
श्वापदातें वधी । निरपराधें पारधी ॥२॥
तुका ह्मणे खळ । संतां पीडिती चांडाळ ॥३॥
वाइटानें भलें । हीनें दाविलें चांगलें ॥१॥
एकाविण एका । कैचें मोल होतें फुका ॥ध्रु.॥
विषें दाविलें अमृत । कडू गोड घातें हित ॥२॥
काळिमेनें ज्योती । दिवस कळों आला राती ॥३॥
उंच निंच गारा । हिरा परिस मोहरा ॥४॥
तुका ह्मणे भले । ऐसे नष्टांनीं कळले ॥५॥
असो खळ ऐसे फार । आह्मां त्यांचे उपकार ॥१॥
करिती पातकांची धुनी । मोल न घेतां साबनीं ॥ध्रु.॥
फुकाचे मजुर। ओझें वागविती भार ॥२॥
पार उतरुन ह्मणे तुका । आह्मां आपण जाती नरका ॥३॥
संत पंढरीस जाती । निरोप धाडीं तया हातीं ॥१॥
माझा न पडावा विसर । तुका विनवितो किंकर ॥ध्रु.॥
केरसुणी महाद्वारीं । ते मी असें निरंतरीं ॥२॥
तुमचे पायीं पाइतन । मोचे माझे तन मन ॥३॥
तांबुलाची पिकधरणी । ते मी असें मुख पसरूनि ॥४॥
तुमची इष्टा पंढरीराया । ते सारसुबी माझी काया ॥५॥
लागती पादुका । ते मी तळील मृत्तिका ॥६॥
तुका ह्मणे पंढरिनाथा। दुजें न धरावें सर्वथा ॥७॥
इच्छेचें पाहिलें । डोळीं अंतीं मोकलिलें ॥१॥
यांचा विश्वास तो काई । ऐसें विचारूनि पाहीं ॥ध्रु.॥
सुगंध अभ्यंगें पाळितां । केश फिरले जाणतां ॥२॥
पिंड पाळितां ओसरे । अवघी घेऊनि मागें सरे ॥३॥
करितां उपचार । कोणां नाहीं उपकार ॥४॥
अल्प जीवन करीं । तुका ह्मणे साधीं हरी ॥५॥
यज्ञानिमित्त तें शरिरासी बंधन । कां रे तृष्णा वांयांविण वाढविली ॥१॥
नव्हे ते भक्ति परलोकसाधन । विषयांनीं बंधन केलें तुज ॥ध्रु.॥
आशा धरूनि फळाची । तीथाअ व्रतीं मुक्ति कैंचि ॥२॥
तुका ह्मणे सिणसी वांया । शरण न वजतां पंढरिराया ॥३॥
संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघें घडे नाम उच्चारितां ।
न वेचे मोल कांहीं लागती न सायास । तरी कां आळस करिसी झणी ॥१॥
ऐसें हे सार कां नेघेसी फुकाचें । काय तुझें वेचे मोल तया ॥ध्रु.॥
पुत्रस्नेहें शोक करी अजामेळ । तंव तो कृपाळ जवळी उभा ।
अनाथांच्या नाथें घातला विमानीं । नेला उचलूनि परलोका ॥२॥
अंतकाळीं गणिका पिक्षयाच्या छंदें । राम राम उच्चारिलें ।
तंव त्या दिनानाथा कृपा आली । त्यानें तयेसी वैकुंठा नेलें ॥३॥
अवचिता नाम आलिया हे गती । चिंतितां चित्तीं जवळी असे ।
तुका ह्मणे भावें स्मरा राम राम । कोण जाणे तये दशे ॥४॥
दुष्टाचें चित्त न भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला।
पालथे घागरी घातलें जीवन । न धरी च जाण तें ही त्याला ॥१॥
जन्मा येउनि तेणें पतन चि साधिलें । तमोगुणें व्यापिलें जया नरा।
जळो जळो हें त्याचें ज्यालेपण । कासया हे आलें संवसारा ॥ध्रु.॥
पाषाण जीवनीं असतां कल्पवरी । पाहातां अंतरीं कोरडा तो।
कुचर मुग नये चि पाका । पाहातां सारिखा होता तैसा ॥२॥
तुका ह्मणे असे उपाय सकळां । न चले या खळा प्रेत्न कांहीं ।
ह्मणऊनि संग न करितां भला । धरितां अबोला सर्व हित ॥३॥
कासियानें पूजा करूं केशीराजा । हा चि संदेह माझा फेडीं आतां ॥१॥
उदकें न्हाणूं तरी स्वरूप तुझें । तेथें काय माझें वेचे देवा ॥ध्रु.॥
गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथें मी दुर्बळ काय करूं ॥२॥
फळदाता तूंच तांबोल अक्षता । तरी काय आतां वाहों तुज ॥३॥
वाहूं दिक्षणा जरी धातु नारायण । ब्रह्म तें चि अन्न दुजें काई ॥४॥
गातां तूं ओंकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाहीं कोठें ॥५॥
तुका ह्मणें मज अवघें तुझें नाम । धूप दीप रामकृष्णहरि ॥६॥
गातां आइकतां कांटाळा जो करी । वास त्या अघोरीं कुंभपाकीं ॥१॥
रागें यमधर्म जाचविती तया । तु दिलें कासया मुख कान ॥ध्रु.॥
विषयांच्या सुखें अखंड जगासी । न वजे एकादशी जागरणा ॥२॥
वेचूनियां द्रव्य सेवी मद्यपान । नाहीं दिलें अन्न अतीतासी ॥३॥
तीर्थाटण नाहीं केले उपकार । पाळिलें शरीर पुष्ट लोभें ॥४॥
तुका ह्मणे मग केला साहे दंड । नाइकती लंड सांगितलें ॥५॥
तुझें ह्मणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥१॥
परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥ध्रु.॥
समूळीं संसार केला देशधडी । सांडिली आवडी ममतेची ॥२॥
लोभ दंभ काम क्रोध अहंकार । यांसी नाहीं थार ऐसें केलें ॥३॥
मृत्तिका पाषाण तैसें केलें धन । आपले ते कोण पर नेणों ॥४॥
तुका ह्मणे जालों देहासी उदार । आणीक विचार काय तेथें ॥५॥
जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षाळिलें वरीं वरीं ॥१॥
अंतरींचें शुद्ध कासयानें जालें । भूषण तों केलें आपणया ॥ध्रु.॥
इंद्रावण फळ घोळिलें साकरा । भीतरील थारा मोडे चि ना ॥२॥
तुका ह्मणे नाहीं शांति क्षमा दया । तोंवरी कासया काुंफ्दां तुह्मी ॥३॥
बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ॥१॥
येऊनि अंतरीं राहील गोपाळ । सायासाचें फळ बैसलिया ॥ध्रु.॥
राम कृष्ण हरि मुकुंद मुरारि । मंत्र हा उच्चारीं वेळोवेळां ॥२॥
तुका ह्मणे ऐसें देईन मी दिव्य । जरी होइल भाव एकविध ॥३॥
धन्य पुंडलिका बहु बरें केलें । निधान आणिलें पंढरिये ॥१॥
न पवीजे केल्या तपांचिया रासी । तें जनलोकांसी दाखविलें ॥ध्रु.॥
सवाौत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनी हा भाव निवडिला ॥२॥
विष्णुपद गया रामधाम काशी । अवघीं पायांपाशीं विठोबाच्या ॥३॥
तुका ह्मणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ या नास अहंकाराचा ॥४॥
धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणियेलें सार पुंडलिकें ॥१॥
धन्य तो हि लोक अवघा दैवांचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥ध्रु.॥
धन्य ते ही भूमी धन्य तरुवर । धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥२॥
धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान । आनंदें भवन गर्जतसे ॥३॥
धन्य पशु पक्षी कीटक पाषाण । अवघा नारायण अवतरला ॥४॥
तुका ह्मणे धन्य संसारातें आलीं । हरिरंगीं रंगलीं सर्वभावें ॥५॥
मायबाप करिती चिंता । पोर नाइके सांगतां ॥१॥
नको जाऊं देउळासी । नेतो बागुल लोकांसी ॥ध्रु.॥
कर्णद्वारें पुराणिक। भुलवी शब्दें लावी भीक ॥२॥
वैष्णवां संगती । हातीं पडलीं नेणों किती ॥३॥
आह्मां कैंचा मग । करिसी उघडियांचा संग ॥४॥
तुका ह्मणे जाणें नरका । त्यांचा उपदेश आइका ॥५॥
मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ िस्थर नाहीं ॥१॥
आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥ध्रु.॥
धांव घालीं पुढें इंिद्रयांचे ओढी । केलें तडातडी चित्त माझें ॥२॥
तुका ह्मणे माझा न चले सायास । राहिलों हे आस धरुनी तुझी ॥३॥
मागतियाचे दोनि च कर । अमित भांडार दातियाचें ॥१॥
काय करूं आतां कासयांत भरूं । हा मज विचारु पडियेला ॥ध्रु.॥
एकें सांटवणें प्रेमें वोसंडलीं । जिव्हा हे भागली करितां माप ॥२॥
तुका ह्मणे आतां आहे तेथें असो । अंखुनियां बैसों पायांपाशीं ॥३॥
जिचें पीडे बाळ । प्राण तयेचा विकळ ॥१॥
ऐसा मातेचा स्वभाव । सूत्र दोरी एक जीव ॥ध्रु.॥
सुखाची विश्रांती । उमटे मातेचिये चित्तीं ॥२॥
तुका ह्मणे संत । तुह्मी बहु कृपावंत ॥३॥
यावें माहेरास । हे च सर्वकाळ आस ॥१॥
घ्यावी उिच्छष्टाची धणी । तीर्थ इच्छी पायवणी ॥ध्रु.॥
भोग उभा आड । आहे तोंवरी च नाड ॥२॥
तुका ह्मणे देवें । माझें सिद्धी पाववावें ॥३॥
लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥१॥
ऐसी कळवऑयाची जाती । करी लाभेंविण प्रीती ॥ध्रु.॥
पोटीं भार वाहे। त्याचें सर्वस्व ही साहे ॥२॥
तुका ह्मणे माझें । तैसे तुह्मां संतां ओझें ॥३॥
आह्मां गांजी जन । तरि कां मेला नारायण ॥१॥
जालों पोरटीं निढळें । नाहीं ठाव बुड आळें ॥ध्रु.॥
आह्मीं जना भ्यावें। तरि कां न लाजिजे देवें ॥२॥
तुका ह्मणे देश । जाला देवाविण ओस ॥३॥
तुह्मी पाय संतीं । माझे ठेवियेले चित्तीं ॥१॥
आतां बाधूं न सके काळ । जालीं विषम शीतळ ॥ध्रु.॥
भय नाहीं मनीं । देव वसे घरीं रानीं ॥२॥
तुका ह्मणे भये । आतां स्वप्नीं ही नये ॥३॥
काळाचे ही काळ । आह्मी विठोबाचे लडिवाळ ॥१॥
करूं सत्ता सर्वां ठायी । वसों निकटवासें पायीं ॥ध्रु.॥
ऐसी कोणाची वैखरी । वदे आमुचे समोरी ॥२॥
तुका ह्मणे बाण । हातीं हरिनाम तीक्षण ॥३॥
जन्मा येऊन उदार जाला । उद्धार केला वंशाचा । मेळवूनि धन मेळवी माती । सदा विपत्ती भोगीतसे ॥१॥
नाम घेतां न मिळे अन्न । नव्हे कारण देखिलिया । धर्म करितां ऐके कानीं । बांधे निजोनि डोकियासी ॥ध्रु.॥
घरा व्याही पाहुणा आला । ह्मणे त्याला बरें नाहीं । तुमचे गावीं वैद्य आहे । बैसोनि काय प्रयोजन ॥२॥
उजवूं किती होतिल पोरें । मरतां बरें ह्मणे यांसी । ह्मणऊनि देवा नवस करी । दावी घरींहुनि बोनें ॥३॥
पर्वकाळीं भट घरासी आला । बोंब घाला ह्मणे पोरां । तुमचा उणा होईल वांटा । काळ पिठासी आला ॥४॥
दाढी करितां अडका गेला । घरांत आला बाइलेपें । ह्मणे आतां उगवीं मोडी । डोई बोडीं आपुली ॥५॥
तीर्थ स्वप्नीं नेणें गंगा । पूजन लिंगा गांविंचिया । आडकुनि दार बैसे दारीं। आल्या घर ह्मणे ओस ॥६॥
तुका ह्मणे ऐसे आहेत गा हरी। या ही तारीं जीवांसी । माझ्या भय वाटे चित्तीं । नरका जाती ह्मणोनि ॥७॥
जाणे वर्तमान । परि तें न वारे त्याच्याने ॥१॥
तो ही कारणांचा दास । देव ह्मणवितां पावे नास ॥ध्रु.॥
वेची अनुष्ठान। सिद्धी कराया प्रसन्न ॥२॥
तुका ह्मणे त्याचें । मुदल गेलें हाटवेचें ॥३॥
घातला दुकान । पढीये तैसा आहे वान ॥१॥
आह्मी भांडारी देवाचे । द्यावें घ्यावें माप वाचे ॥ध्रु.॥
उगवूं जाणों मोडी । जाली नव्हे त्याची जोडी ॥२॥
तुका ह्मणे पुडी । मोल तैसी खरी कुडी ॥३॥
सादाविलें एका । सरें अवघियां लोकां ॥१॥
आतां आवडीचे हातीं । भेद नाहीं ये पंगती ॥ध्रु.॥
मोकळी च पोतीं । नाहीं पुसायाची गुंती ॥२॥
तुका ह्मणे बरा । आहे ढसाळ वेव्हारा ॥३॥
तडामोडी करा । परि उत्तम तें भरा ॥१॥
जेणें खंडे एके खेपे । जाय तेथें लाभें वोपे ॥ध्रु.॥
दाविल्या सारिखें । मागें नसावें पारिखें ॥२॥
मागें पुढें ॠण । तुका ह्मणे फिटे हीण ॥३॥
नसावें ओशाळ । मग मानिती सकळ ॥१॥
जाय तेथें पावे मान । चाले बोलिलें वचन ॥ध्रु.॥
राहों नेदी बाकी । दान ज्याचें त्यासी टाकी ॥२॥
होवा वाटे जना । तुका ह्मणे साटीं गुणां ॥३॥
अनघडसिद्धाच्या शब्देंकरून रामेश्वरभटाच्या शरीरीं दाह जाला तो ज्यानें शमला तो अभंग ॥ 1
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥१॥
विष तें अमृत अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ध्रु.॥
दुःख तें देईल सर्व सुख फळ । होतील शीतळ अिग्नज्वाळा ॥२॥
आवडेल जीवां जीवाचे परी । सकळां अंतरीं एक भाव ॥३॥
तुका ह्मणे कृपा केली नारायणें । जाणियेते येणें अनुभवें ॥४॥
लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगी ॥१॥
मजुनि झिजलों मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥ध्रु.॥
कोमळ कंटक तीक्षण अगरीं । पोचट ते वरी अंगकांति ॥२॥
चित्रींचे लेप शृंगारिलें निकें । जीवेंविण फिकें रूप त्याचें ॥३॥
तुका ह्मणे दिसें वांयां गेलों देवा । अनुभव ठावा नाहीं तेणें ॥४॥
बोलविसी माझें मुख । परी या जना वाटे दुःख ॥१॥
जया जयाची आवडी । तया लागीं तें चरफडी ॥ध्रु.॥
कठीण देतां काढा । जल्पे रोगी मेळवी दाढा ॥२॥
खाऊं नये तें चि मागे । निवारितां रडों लागे ॥३॥
वैद्या भीड काय । अतित्याई जीवें जाय ॥४॥
नये भिडा सांगों आन । पथ्य औषधाकारण ॥५॥
धन माया पुत्र दारा । हे तों आवडी नरका थारा ॥६॥
तुका ह्मणे यांत । आवडे ते करा मात ॥७॥
पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं ॥१॥
जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भलें जगीं ॥ध्रु.॥
सुख पुराणीं आचारशीळा । दुःख वाटे अनर्गळा ॥२॥
शूरा उल्हास अंगीं । गांढ्या मरण ते प्रसंगीं ॥३॥
शुद्ध सोनें उजळे अगी । हीन काळें धांवे रंगीं ॥४॥
तुका ह्मणे तो चि हिरा । घनघायें निवडे पुरा ॥५॥
चालिती आड वाटा । आणिकां द्राविती जे नीटा ॥१॥
न मनीं तयांचे उपकार । नाहीं जोडा तो गंव्हार ॥ध्रु.॥
विष सेवूनि वारी मागें । प्राण जातां जेणें संगें ॥२॥
बुडतां हाक मारी । ठाव नाहीं आणिकां वारी ॥३॥
तुका ह्मणे न करीं हिंका । गुण घेऊन अवगुण टाका ॥४॥
कुळींचे दैवत ज्याचें पंढरीनाथ । होईन दासीसुत त्याचे घरीं ॥१॥
शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाहीं । करीं भलते ठायीं दास तुझा ॥ध्रु.॥
पंढरीस कोणी जाती वारेकरी । होईन त्यांचे घरीं पशुयाति ॥२॥
विठ्ठलचिंतन दिवसरात्रीं ध्यान । होईन पायतन त्याचे पायीं ॥३॥
तुळसीवृंदावन जयाचे अंगणीं । होइन केरसुणी त्याचे घरीं ॥४॥
तुका ह्मणे हा चि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज ॥५॥
अवघिया चाडा कुंटित करूनि । लावीं आपुली च गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना ।
करूनियां देशधडी । मीतूंपणापासाव गुंतलों । मिथ्या संकल्प तो माझा तोडीं ।
तुझिये चरणीं माझे दोन्ही पक्ष । अवघी करुनि दाखवीं पिंडी रे रे ॥१॥
माझें साच काय केलें मृगजळ । वर्णा याती कुळ अभिमान । कुमारी भातुकें खेळती कवतुकें । काय त्यांचें साचपण ॥ध्रु.॥
वेगळाल्या भावें चित्ता तडातोडी । केलों देशधडी मायाजाळें । गोत वित्त माय बाप बहिणी सुत ।
बंधुवर्ग माझीं बाळें । एका एक न धरी संबंध पुरलिया । पातलिया जवळी काळें ।
जाणोनियां त्याग सर्वस्वें केला। सांभाळीं आपुलें जाळें ॥२॥
एकां जवळी धरी आणिकां अंतरीं । तीं काय सोयरीं नव्हतीं माझीं । एकांचे पाळण एकांसी भांडण ।
चाड कवणिये काजीं । अधिक असे उणें कवण कवण्या गुणें । हे माव न कळे चि तुझी ।
ह्मणोनि चिंतनीं राहिलों श्रीपती। तुका ह्मणे भाक माझी ॥३॥
आणिकां छळावया जालासी शाहाणा । स्वहिता घातले खानें । आडिके पैके करूनि सायास ।
कृपणें सांचलें धन। न जिरे क्षीर श्वानासी भिक्षतां । याती तयाचा गुण ।
तारुण्यदशे अधम मातला । दवडी हात पाय कान ॥१॥
काय जालें यांस वांयां कां ठकले । हातीं सांपडलें टाकीतसे ।
घेउनि स्फटिकमणी टाकी चिंतामणी । नागवले आपुले इच्छे ॥ध्रु.॥
सिद्धीं सेविलें सेविती अधम । पात्रासारिखे फळ । सिंपिला मोतीं जन्मलें स्वाती ।
वरुषलें सर्वत्र जळ । कापुस पट नये चि कारणा । तयास पातला काळ ।
तें चि भुजंगें धरिलें कंठीं । मा विष जालें त्याची गरळ ॥२॥
भक्षूनि मिष्टान्न घृतसाकर । सहित सोलुनि केळें । घालुनियां घसां अंगोळिया।
हाते वांत करू बळें । कुंथावयाची आवडी बोंबा । उन्हवणी रडवी बाळें ।
तुका ह्मणे जे जैसें करिती । ते पवती तैसीं च फळें ॥३॥
चंदनाचे गांवीं सर्पांच्या वसति । भोगिते ते होती द्वीपांतरीं ॥१॥
एका ओझें एका लाभ घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥ध्रु.॥
क्षीराची वसति अशुद्ध सेवावें । जवळी तें जावें भोगें दुरी ॥२॥
तुका ह्मणे ऐसी बुद्धि ज्याची जड । त्याहुनि दगड बरे देवा ॥३॥
तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव-वाचाकायामन ॥१॥
भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता ॥ध्रु.॥
नेणतां सोसिली तयाची आटणी । नव्हतां ही कोणी कांहीं माझीं ॥२॥
वर्म नेणें दिशा हिंडती मोकट । इंिद्रयें सुनाट दाही दिशा ॥३॥
वेरझारीफेरा सिणलों सायासीं । आतां हृषीकेशी अंगिकारीं ॥४॥
तुका ह्मणे मन इंिद्रयांचे सोई । धांवे यासी काई करूं आतां ॥५॥
स्वयें पाक करी । संशय तो चि धरी । संदेहसागरीं। आणीक परी बुडती ॥१॥
जाणे विरळा एक । जालें तेथींचे हें सुख। देखिले बहुतेक । पुसतां वाट चुकले ॥ध्रु.॥
तो चि जाणे सोंवळें । शोधी विकल्पाचीं मुळें । नाचती पाल्हाळें । जे विटाळें कोंडिले ॥२॥
तो चि साधी संधी । सावध त्रिकाळ जो बुद्धी । संदेहाचा संधी। वेठी आणि करियेले ॥३॥
अखंड ते ध्यान । समबुद्धि समाधान । सोंग वांयांविण । ते झांकून बैसती ॥४॥
करणें जयासाटीं । जो नातुडे कवणे आटी । तुका ह्मणे साटी । चित्तवित्तेंवांचूनि ॥५॥
माझिया संचिता । दृढ देखोनि बिळवंता । पळसी पंढरिनाथा । भेणे आतां तयाच्या ॥१॥
तरि मज कळलासी । नव्हतां भेटी जाणीवेसी । एक संपादिसी । मान करिसी लोकांत ॥ध्रु.॥
तरि हें प्रारब्ध जी गाढें । कांहीं न चले तयापुढें । काय तुज म्यां कोंडें । रें सांकडें घालावें ॥२॥
भोगधीपति क्रियमाण । तें तुज नांगवे अजून। तरि का वांयांविण । तुज म्यां सीण करावा ॥३॥
तुज नव्हतां माझें कांहीं । परि मी न संडीं भक्तिसोई । हो कां भलत्या ठायीं । कुळीं जन्म भलतैसा ॥४॥
तूं भितोसि माझिया दोषा । कांहीं मागणें ते आशा । तुका ह्मणे ऐसा । कांहीं न धरीं संकोच ॥५॥
लोकमान देहसुख । संपित्तउपभोग अनेक । विटंबना दुःख । तुझिये भेटीवांचूनि ॥१॥
तरी मज ये भेट ये भेट । काय ठाकलासी नीट । थोर पुण्यें वीट । तुज दैवें चि लाधली ॥ध्रु.॥
काय ब्रह्मज्ञान करूं कोरडें । रितें मावेचें मापाडें । भेटीविण कुडें । तुझिये अवघें मज वाटे ॥२॥ आत्मिस्थतीचा विचार । काय करूं हा उद्धार। न देखतां धीर । चतुर्भुज मज नाहीं ।3॥
रिद्धीसिद्धी काय करूं । अथवा अगम्य विचारू । भेटीविण भारु । तुझिये वाटे मज यांचा ॥४॥
तुजवांचूनि कांहीं व्हावें । ऐसें नको माझिया जीवें। तुका ह्मणे द्यावें । दरुषण पायांचें ॥५॥
तुझा ह्मणवून तुज नेणें । ऐसें काय माझें जिणें ॥१॥
तरि मज कवणाचा आधार । करोनियां राहों धीर ॥ध्रु.॥
काय शब्दीं चि ऐकिला । भेटी नव्हतां गा विठ्ठला ॥२॥
तुका ह्मणे आतां । अभय देइप पंढरिनाथा ॥३॥
उद्धवअक्रूरासी । आणीक व्यासआंबॠषी । रुक्मांगदाप्रल्हादासी । दाविलें तें दाखवीं ॥१॥
तरि मी पाहेन पाहेन। तुझे श्रीमुखचरण । उताविळ मन । तयाकारणें तेथें ॥ध्रु.॥
जनकश्रुतदेवा करीं । कैसा शोभलासी हरी । विदुराच्या घरीं । कण्या धरी कवतुकें ॥२॥
पांडवा अकांतीं । तेथें पावसी स्मरती । घातलें द्रौपदी । यागीं बिरडें चोळीचें ॥३॥
करी गोपीचें कवतुक । गाईगोपाळांसी सुख । दावीं तें चि मुख । दृष्टी माझ्या आपुलें ॥४॥
तरि तूं अनाथाचा दाता । मागतियां शरणागतां । तुका ह्मणें आतां। कोड पुरवीं हें माझें ॥५॥
मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देइप मज हरी कृपादान ॥१॥
प्रेम प्रीति नाम उचित करावें । भावें संचरावें हृदयामाजी ॥ध्रु.॥
सर्वभावें शरण आलों पांडुरंगा । कृपाळु तूं जगामाजी एक ॥२॥
तापत्रयें माझी तापविली काया । शीतळ व्हावया पाय तुझे ॥३॥
संबंधीं जनवाद पीडलों परोपरी । अंतरलों दुरी तुजसी तेणें ॥४॥
तुका ह्मणे आतां तुझा शरणागता । करावें सनाथ मायबापा ॥५॥
भाव नाहीं काय मुद्रा वाणी । बैसे बगळा निश्चळ ध्यानीं ॥१॥
न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥ध्रु.॥
नाहीं चाड देवाची कांहीं । छळणें टोंके तस्करघाई ॥२॥
तुका ह्मणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शअंग ॥३॥
दिनदिन शंका वाटे । आयुष्य नेणवतां गाढें ॥१॥
कैसीं भुललीं बापुडीं । दंबविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥
विसरला मरण। त्याची नाहीं आठवण ॥२॥
देखत देखत पाहीं । तुका ह्मणे आठव नाहीं ॥३॥
माझें मज आतां न देखें निरसतां । ह्मणऊन आधार केला । संसाराची आस सांडुनि लौकिक ।
जीव भाव तुज दिला । नव्हतीं माझीं कोणी मी कवणांचा । अर्थ मोहो सांडवला ।
तारीं मारीं करीं भलतें दातारा । होऊन तुझा आतां ठेलों रे ॥१॥
असो माझें कोडें तुज हे सांकडें । मी असेन निवाडें सुखरूप ।
बाळकासी चिंता काय पोटवेथा । जया शिरीं मायबाप ॥ध्रु.॥
पापपुण्यें श्रुति आटिल्या। शास्त्रांस न लगे चि ठाव ।
विधिनिषिधें गोविलीं पुराणें वेदांसी तो अहंभाव ।
ओंकाराचें मूळ व्यापिलें माया । तेथें न धरे च भाव ।
ह्मणऊन काबाड सांडिलें उपसतां । धरिलें तुझें चि नांव ॥२॥
तनमनइंिद्रयें ठेवूनि राहिलों । सर्व आशा तुझे पायीं । तप तीर्थ दान करवूं कवणा ।
हातीं अधीन तें मज काई । आहिक्यें परत्रें चाड नाहीं सर्वथा । जन्म सदा मज देहीं ।
मायामोहपाश करीं विष तैसें । तुका ह्मणे माझ्याठायीं ॥३॥
तुझें नाम गोड नाम गोड । पुरे कोड सकळ ही ॥१॥
रसना येरां रसां विटे । घेतां घोट अधिक हें ॥ध्रु.॥
आणिकां रसें मरण गांठी । येणें तुटी संसारें ॥२॥
तुका ह्मणे आहार जाला। हा विठ्ठला आह्मांसी ॥३॥
धालों सुखें ढेकर देऊं । उमटे जेवूं तोंवरी ॥१॥
क्रीडा करूं निरांजनीं । न पुरे धणी हरिसवें ॥ध्रु.॥
अवघे खेळों अवघ्यामधीं । डाइप न पडों ऐसी बुद्धि ॥२॥
तुका ह्मणे वांचवीत। आह्मां सत्ता समर्थ ॥३॥
एकल्या नव्हे खेळ चांग । धरिला संग ह्मणऊनि ॥१॥
उमटे तेव्हां कळे नाद । भेदाभेद निवडेना ॥ध्रु.॥
दुसरा परी एक ऐसा । वजे रिसा निकुरें ही ॥२॥
तुका ह्मणे कळत्यां कळे । येर खेळे खेळ ह्मुण ॥३॥
बोलविले जेणें । तो चि याचें गुह्य जाणे ॥१॥
मी तों काबाडाचा धनी । जेवूं मागावें थिंकोनि ॥ध्रु.॥
मजुराच्या हातें । माप जालें गेलें रितें ॥२॥
जाला पुरविता । पांडुरंग माझा पिता ॥३॥
मायबापासवें । बाळें कौतुकें खेळावें ॥४॥
जैसा करिती धंदा । तैसा पडोनियां छंदा ॥५॥
त्याच्या साच गाई ह्मैसी । येणें खेळावें मातीशीं ॥६॥
तुका ह्मणे बोल । माझा बोलतो विठ्ठल ॥७॥
कां हो तुह्मी माझी वदविली वाणी । नेदा हे निवडूनि पांडुरंगा ॥१॥
आणीक म्यां कोणां पुसावा विचार । मुळीं संवसार दुराविला ॥ध्रु.॥
स्वामिसेवा ह्मुण घेतली पदरीं । सांगितलें करीं कारण तें ॥२॥
तुका ह्मणें नाहीं शिकविलें जेणें । तो याच्या वचनें उगा राहे ॥३॥
सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ॥१॥
आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं टळों नये ॥ध्रु.॥
समय सांभाळूनि आगळें उत्तर । द्यावें भेदी वज्र तपायरी ॥२॥
तुका ह्मणे तरी ह्मणवावें सेवक । खादलें तें हाक अन्न होय ॥३॥
नये पुसों आज्ञा केली एकसरें । आह्मांसी दुसरें आतां नाहीं ॥१॥
ज्याचें तो बिळवंत सर्व निवारिता । आह्मां काय चिंता करणें लागें ॥ध्रु.॥
बुद्धीचा जनिता विश्वाचा व्यापक । काय नाहीं एक अंगीं तया ॥२॥
तुका ह्मणे मज होईल वारिता । तरी काय सत्ता नाहीं हातीं ॥३॥
बिळवंत आह्मी समर्थाचे दास । घातली या कास किळकाळासी ॥१॥
तेथें मानसाचा कोण आला पाड । उलंघोनि जड गेलों आधीं ॥ध्रु.॥
संसाराचे बळी साधिलें निधान । मारिले दुर्जन षडवर्ग ॥२॥
तुका ह्मणे एक उरला धरिता ठाव । येर केले वाव तृणवत ॥३॥
एका गावें आह्मीं विठोबाचे नाम । आणिकांपें काम नाहीं आतां ॥१॥
मोडूनियां वाटा सूक्षम सगर । केला राज्यभार चाले ऐसा ॥ध्रु.॥
लावूनि मृदांग टाळश्रुतिघोष । सेवूं ब्रह्मरस आवडीनें ॥२॥
तुका ह्मणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळामात्रें ॥३॥
वाचाचापल्ये बहु जालों कुशळ । नाहीं बीजमूळ हाता आलें ॥१॥
ह्मणोनि पंढरिराया दुखी होतें मन । अंतरींचे कोण जाणे माझें ॥ध्रु.॥
पूज्य जालों अंगा आला अभिमान । पुढील कारण खोळंबलें ॥२॥
तुका ह्मणे खूण न कळे चि निरुती। सांपडलों हातीं अहंकाराचे ॥३॥
आतां काढाकाढी करीं बा पंढरिराया । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥१॥
जाणतां बैसलों दगडाचे नावे । तिचा धर्म घ्यावे प्राण हा चि ॥ध्रु.॥
मनाचा स्वभाव इंिद्रयांचे ओढी । पतनाचे जोडी वरी हांव ॥२॥
तुका ह्मणे जाली अंधऑयाची परी । आतां मज हरी वाट दावीं ॥३॥
सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥१॥
एक गुण तो केला दोंठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ध्रु.॥
भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥२॥
परउपकार घडे तो भला । नाठ्याळ तया दया नाहीं ॥३॥
जाणीवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा ॥४॥
हित तें अनहित केलें कैसें । तुका ह्मणे पिसें लागलें यास ॥५॥
तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हा ते चि घडी झडो माझी ॥१॥
हें मज देइप हें मज देइप । आणिक दुजें कांहीं न मगें तुज ॥ध्रु.॥
बहिर कान तुझी कीर्ती नाइकतां । पाय न देखतां जात डोळे ॥३॥
मना तुझें ध्यान नाहीं नित्य काळ । धिग तें चांडाळ जळो जळो ॥३॥
हातपाय तेणें पंथ न चलतां । जावे ते अनंता गळोनियां ॥४॥
तुजविण जिणें नाहीं मज चाड । तुका ह्मणे गोड नाम तुझें ॥५॥
ह्मणसी होऊनी नििंश्चता । हरूनियां अवघी चिंता । मग जाऊं एकांता
भजन करूं । संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साटी होईल तुझ्या ॥१॥
सेकीं नाडसील नाडसील । विषयसंगें अवघा नाडसील । मागुता पडसील भवडोहीं ॥ध्रु.॥
शरीर सकळ मायेचा बांधा । यासी नाहीं कधीं अराणूक । करिती तडातोडी
आंत बाह्यात्कारीं । ऐसे जाती चारी दिवस वेगीं ॥२॥
मोलाची घडी जाते वांयांविण । न मिळे मोल धन देतां कोडी ।
जागा होइप करीं हिताचा उपाय । तुका ह्मणे हाय करिसी मग ॥३॥
कनवाळू कृपाळू भक्तांलागीं मोही । गजेंद्राचा धांवा तुवां केला विठाई ॥१॥
पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥ध्रु.॥
भक्तांच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले । आंबॠषीकारणें जन्म दाहा घेतले ॥२॥
प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार केला । विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥३॥
उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं । पाजी प्रेमपान्हा क्षीरसागराठायीं ॥४॥
कौरवीं पांचाळी सभेमाजी आणिली । वस्त्रहरणीं वस्त्रें कैसी जाली माउली ॥५॥
दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं । धांवसी लवलाहीं शाखादेठ घेऊनि ॥६॥
कृपाळू माउली भुक्तिमुक्तिभांडार । करीं माझा अंगीकार तुका ह्मणे विठ्ठले ॥७॥
कवणा पाषाणासी धरूनि भाव । कवणावरी पाव ठेवूं आतां ।
ह्मणऊनि निश्चित राहिलों मनीं । तूं चि सर्वां खाणी देखोनियां ॥१॥
कवणाचें कारण न लगे कांहीं । सर्वांठायीं तूं एक।
कायावाचामन ठेविलें तुझ्या पायीं । आता उरलें काई न दिसे देवा ॥ध्रु.॥
जळें जळ काय धोविलें एक । कवण तें पातक हरलें तेथें ।
पापपुण्य हे वासना सकळ । ते तुज समूळ समर्पिली ॥२॥
पितरस्वरूपी तूं चि जनार्दन। सव्य तें कवण अपसव्य ।
तुका ह्मणे जीत पिंड तुह्मां हातीं। देऊनि नििंश्चती मानियेली ॥३॥
सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां सोडवीं संसारापासोनियां ॥१॥
न सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसें खोडा हाडांचिया ॥ध्रु.॥
मायबापें माझीं जीवाचीं सांगाती । तीं देतील हातीं काळाचिया ॥२॥
पडताळूनि सुरी बैसली सेजारीं । यमफासा करीं घेऊनिया ॥३॥
पाठी पोटीं एकें लागलीं सरसीं । नेती नरकापाशीं ओढूनियां ॥४॥
जन साहेभूत असे या सकळां । मी एक निराळा परदेशी ॥५॥
कोणा काकुलती नाहीं कोणे परी । तुजविण हरी कृपाळुवा ॥६॥
तुका ह्मणे मज तुझाची भरवसा । ह्मणऊनि आशा मोकलिली ॥७॥
देवाचा भक्त तो देवासी गोड । आणिकांसी चाड नाहीं त्याची ।
कवणाचा सोइरा नव्हे च सांगाती । अवघियां हातीं अंतरला ॥१॥
निष्काम वेडें ह्मणतील बापुडे । अवघियां सांकडें जाला कैसा ।
माझें ऐसें तया न ह्मणत कोणी । असे रानीं वनीं भलते ठायीं ॥ध्रु.॥
प्रातःस्नान करी विभूतिचर्चन । दखोनिया जन निंदा करी ।
कंठीं तुळसीमाळा बैसोनि निराळा । ह्मणती या चांडाळा काय जालें ॥२॥
गातां शंका नाहीं बैसे भलते ठायीं । शिव्या देती आई बाप भाऊ ।
घरी बाइल ह्मणे कोठें व्याली रांड । बरें होतें शंड मरता तरी ॥३॥
जन्मोनि जाला अवघियां वेगळा । ह्मणोनि गोपाळा दुर्लभ तो ।
तुका ह्मणे जो संसारा रुसला । तेणें चि टाकिला सिद्धपंथ ॥४॥
कस्तुरी भिनली जये मृत्तिके । तयेसी आणिके कैसी सरी ॥१॥
लोखंडाचे अंगीं लागला परिस । तया आणिकास कैसी सरी ॥२॥
तुका ह्मणे मी न वजें यातीवरी । पूज्यमान करीं वैष्णवांसी ॥ ।3॥
अनुहात ध्वनि वाहे सकळां पिंडीं । राम नाहीं तोंडीं कैसा तरे ॥१॥
सकळां जीवांमाजी देव आहे खरा । देखिल्या दुसरा विण न तरे ॥ध्रु.॥
ज्ञान सकळांमाजी आहे हें साच । भक्तीविण तें च ब्रह्म नव्हे ॥२॥
काय मुद्रा कळल्या कराव्या सांगतां । दीप न लगतां उन्मनीचा ॥३॥
तुका ह्मणे नका पिंडाचें पाळण । स्थापू नारायण आतुडेना ॥४॥
नेणें अर्थ कांहीं नव्हती माझे बोल । विनवितों कोपाल संत झणी ॥१॥
नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगें व्यापूनिया ॥ध्रु.॥
मज मूढा शक्ति कैंचा हा विचार । निगमादिकां पार बोलावया ॥२॥
राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारि । बोबडा उत्तरीं हें चि ध्यान ॥३॥
तुका ह्मणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगें भार घेतला माझा ॥४॥
देवासी लागे सकळांसी पोसावें । आह्मां न लगे खावें काय चिंता ॥१॥
देवा विचारावें लागे पापपुण्य । आह्मासी हे जन अवघें भलें ॥ध्रु.॥
देवासी उत्पित्त लागला संहार । आह्मां नाहीं फार थोडें काहीं ॥२॥
देवासी काम लागला धंदा । आह्मासी ते सदा रिकामीक ॥३॥
तुका ह्मणे आह्मी भले देवाहून । विचारितां गुण सर्वभावें ॥४॥
घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥१॥
हरिनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ध्रु.॥
आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःख नाहीं चाड आह्मां ॥२॥
आणीक सायास न करीं न धरीं आस । होईन उदास सर्व भावें ॥३॥
मोक्ष आह्मां घरीं कामारी ते दासी । होय सांगों तैसी तुका ह्मणे ॥४॥
देवा तुज मज पण । पाहों आगळा तो कोण ॥१॥
तरी साच मी पतित । तूं च खोटा दिनानाथ ।
ग्वाही साधुसंत जन। करूनि अंगीं लावीन ॥ध्रु.॥
आह्मी धरिले भेदाभेद । तुज नव्हे त्याचा छेद ॥२॥
न चले तुझे कांहीं त्यास । आह्मी बळकाविले दोष ॥३॥
दिशा भरल्या माझ्या मनें । लपालासी त्याच्या भेणें ॥४॥
तुका ह्मणे चित्त । करी तुझी माझी नीत ॥५॥
लापनिकशब्दें नातुडे हा देव । मनिंचे गुह्य भाव शुद्ध बोला ॥१॥
अंतरिंचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणें लागे ॥२॥
तुका ह्मणे जरी आपुलें स्वहित । तरी करीं चित्त शुद्धभावें ॥३॥
नव्हे ब्रह्मज्ञान बोलतां सिद्ध । जंव हा आत्मबोध नाहीं चित्तीं ॥१॥
काय करिसी वांयां लटिका चि पाल्हाळ । श्रम तो केवळ जाणिवेचा ॥ध्रु.॥
मी च देव ऐसें सांगसी या लोकां । विषयांच्या सुखा टोंकोनियां ॥२॥
अमृताची गोडी पुढिलां सांगसी। आपण उपवासी मरोनिया ॥३॥
तुका ह्मणे जरि राहील तळमळ । ब्रह्म तें केवळ सदोदित ॥४॥
गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी ॥१॥
रवि दीप काळिमा काय जाणे हिरा । आणिका तिमिरा नासे तेणे ॥ध्रु.॥
कर्पूरकांडणी काय कोंडा कणी । सिंधू मिळवणीं काय चाले ॥२॥
परिस चिंतामणि आणिकांचा गुणी । पालटे लागोनि नव्हे तैसा ॥३॥
तुका ह्मणे तैसे जाणा संतजन । सर्वत्र संपूर्ण गगन जैसें ॥४॥
परिस काय धातु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥१॥
काय तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझे एक ॥ध्रु.॥
कल्तपरु कोड पुरवितो रोकडा । चिंतामणि खडा चिंतिलें तें ॥२॥
चंदनांच्या वासें वसतां चंदन । होती काष्ठ आन वृक्षयाती ॥३॥
काय त्याचें उणें जालें त्यासी देतां । विचारीं अनंता तुका ह्मणे ॥४॥
तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार ॥१॥
कोण हित तेणें देखिलें आपुलें । आणीक पाहिलें सुख काई ॥ध्रु.॥
धान्यें बीजें जेणें जाळिलीं सकळें । पेरितो काळें जिरें बीज ॥२॥
मोडोनिया वाटा पुढिलांची सोय । आडरानें जाय घेउनि लोकां ॥३॥
विषाचें अमृत ठेवूनियां नाम । करितो अधम ब्रह्महत्या ॥४॥
तुका ह्मणे त्यास नाइके सांगतां । तया हाल करितां पाप नाहीं ॥५॥
संसाराच्या भेणें । पळों न लाहेसें केलें ॥१॥
जेथें तेथें आपण आहे । आह्मीं करावें तें काये ॥ध्रु.॥
एकांतींसी ठाव । तिहीं लोकीं नाहीं वाव ॥२॥
गांवा जातों ऐसें । न लगे ह्मणावें तें कैसें ॥३॥
स्वप्नाचे परी । जागा पाहे तंव घरीं ॥४॥
तुका ह्मणे काये । तुझे घेतले म्यां आहे ॥५॥
आण काय सादर । विशीं आह्मां कां निष्ठ ॥१॥
केलें भक्त तैसें देइप । तुझें प्रेम माझ्याठायीं ॥ध्रु.॥
काय पंगतीस कोंडा । एकांतासी साकरमांडा ॥२॥
काय एकपण । पोतां घालूनि गांठी खूण ॥३॥
काय घ्यावें ऐसें । त्या आपण अनारिसें ॥४॥
तुका ह्मणे मधीं । आतां तोडूं भेद बुद्धी ॥५॥
चित्त तुझ्या पायीं । ठेवुनि जालों उतराई ॥१॥
परि तूं खोटा केशीराजा । अंतपार न कळे तुझा ॥ध्रु.॥
आह्मी सर्वस्वें उदार । तुज देऊनियां धीर ॥२॥
इंिद्रयांची होळी । संवसार दिला बळी ॥३॥
न पडे विसर । तुझा आह्मां निरंतर ॥४॥
प्रेम एकासाटी। तुका ह्मणे न वेचे गांठी ॥५॥
आह्मी पतित ह्मणोनि तुज आलों शरण । करितों चिंतन दिवस रात्रीं ।
नाहीं तरी मज काय होती चाड । धरावया भीड तुज चित्तीं ॥१॥
आह्मां न तारावें तुह्मी काय करावें । सांगीजोजी भावें नारायणा ॥ध्रु.॥
अन्याय एकाचा अंगीकार करणें। तया हातीं देणें लाज ते चि ।
काय ते शूरत्व मिरवूनि बोलणें । जनामाजी दावणें बळरया ॥२॥
पोह्या अन्नछत्र घालूनियां घरीं । दंडितो बाहेरी आलियासी ।
नव्हे कीर्त कांहीं न माने लोकां । काय विटंबणा तैसी ॥३॥
प्रत्यक्षासी काय द्यावें हें प्रमाण । पाहातां दर्पण साक्ष काई ।
तुका ह्मणे तरी आह्मां का न कळे । तरलों किंवा आह्मी नाहीं ॥४॥
काग बग रिठा मारिले बाळपणीं । अवघी दैत्यखाणी बुडविली ॥१॥
तो मज दावा तो मज दावा । नंदनंदन जीवा आवडे तो ॥ध्रु.॥
गोवर्धन गिरी उचलिला करीं । गोकुळ भीतरी राखियेलें ॥२॥
बघुनि भौमासुरा आणिल्या गोपांगना । राज्य उग्रसेना मथुरेचें ॥३॥
पांडव जोहरीं राखिले कुसरी । विवराभीतरीं चालविले ॥४॥
तुका ह्मणे हा भक्तांचा कृपाळ । दुष्टजना काळ नारायण ॥५॥
तुजविण देवा । कोणा ह्मणे माझी जिव्हा ॥१॥
तरि हे हो कां शतखंड । पडो झडोनियां रांड ॥ध्रु.॥
कांहीं इच्छेसाटीं । करिल वळवळ करंटी ॥२॥
तुका ह्मणे कर । कटीं तयाचा विसर ॥३॥
आह्मां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम ॥१॥
न लगे करावी हे चिंता । तरणें करणें काय आतां ॥ध्रु.॥
आसनीं भोजनीं शयनीं । दुजें नाहीं ध्यानीं मनीं ॥२॥
तुका ह्मणे कृपानिधी । माझी तोडिली उपाधी ॥३॥
नव्हें कांहीं कवणाचा । भाव जाणवला साचा ॥१॥
ह्मणोनि तुझ्या पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥ध्रु.॥
शरीर जायाचें कोंपट । याची काय खटपट ॥२॥
तुका ह्मणे वांयांविण । देवा कळों आला सीण ॥३॥
Not in the Wikisource transcription: 1777.
Text: तुकाराम गाथा on Marathi Wikisource, which does not name the printed edition it was transcribed from. The verses are public domain; the transcription is by Wikisource contributors, CC BY-SA 4.0. Its systematic legacy-font errors are repaired by rule (see the reading page for details); some remain — इप printed for ई in about 220 abhangas, and a few vowel signs on the wrong letter. Numbering follows Wikisource; printed editions differ. Spotted a wrong line? Write to us with the number.