मनित्यManitya
तुकाराम गाथा · page 14 of 16

अभंग ३९०१–४२००

Abhangas 3901–4200 (the Gāthā is numbered 1–4,583), in the original Marathi, with the Gāthā's own section headings — as transcribed on Marathi Wikisource, whose base edition is not named. The refrain (ध्रु.) is set in a warmer colour. One font error is not yet repaired: where you see इप, read ई (होइप = होई).

↵

काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरिनाथा कष्ट नाहीं ॥१॥

सर्वकाळ वाचे उच्चारितां हरि । तया सुखा सरि पाड नाहीं ॥ध्रु.॥

रामकृष्णरंगीं रसना रंगली । अमृताची उकळी नाम तुझें ॥२॥

तुका ह्मणे धन्य तयाचें वदन । जया नारायण ध्यानीं मनीं ॥३॥

कीर्त्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगीं आहे ॥१॥

भक्त जाय सदा हरि कीर्ति गात । नित्यसेवें अनंत हिंडतसे ॥ध्रु.॥

त्रैलोक्य भ्रमण फिरत नारद । त्यासंगें गोविंद फिरतसे ॥२॥

नारद मंजुळ सुस्वरें गीत गाये । मागाअ चालताहे संगें हरि ॥३॥

तुका ह्मणे त्याला गोडी कीर्त्तनाची । नाहीं आणिकांची प्रीति ऐसी ॥४॥

बाळेंविण माय क्षणभरि न राहे । न देखतां होये कासाविस ॥१॥

आणिक उदंड बुझाविती जरी । छंद त्या अंतरीं माउलीचा ॥ध्रु.॥

नावडती तया बोल आणिकाचे । देखोनियां नाचे माय दृष्टी ॥२॥

तुका ह्मणे माझी विठ्ठल माउली । आणिकांचे बोलीं चाड नाहीं ॥३॥

हरिचिया भक्ता नाहीं भयचिंता । दुःखनिवारिता नारायण ॥१॥

न लगे वाहणें संसारउद्वेग । जडों नेदी पांग देवराया ॥ध्रु.॥

असों द्यावा धीर सदा समाधान । आहे नारायण जवळी च ॥२॥

तुका ह्मणे माझा सखा पांडुरंग । व्यापियेलें जग तेणें एकें ॥३॥

दसरा दिवाळी तो चि आह्मां सन । सखे संतजन भेटतील ॥१॥

आमुप जोडल्या सुखाचिया राशी । पार या भाग्यासी न दिसे आतां ॥ध्रु.॥

धन्य दिवस आजि जाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ॥२॥

तुका ह्मणे काय होऊं उतराई । जीव ठेऊं पांयीं संतांचिये ॥३॥

खिस्तीचा उदीम ब्राह्मण कलयुगीं । महारवाडीं मांगीं हिंडतसे ॥१॥

वेवसाव करितां पर्वत मांगासी । ते पैं विटाळासी न मनिती ॥ध्रु.॥

मांगिणीशीं नित्य करीतसे लेखा । तोंडावरि थुंका पडतसे ॥२॥

आशा माया रांडा नांव हें कागदीं । आठवीना कधीं नारायण ॥३॥

तुका ह्मणे देह जालें पराधीन । पांडुरंगाविण गति नाहीं ॥४॥

जगीं ब्रह्मक्रिया खिस्तीचा व्यापार । हिंडे घरोघर चांडाळाचे ॥१॥

आंतेजा खिचडी घेताती मागून । गाळिप्रधानि मायबहिणी ॥ध्रु.॥

उत्तमकुळीं जन्म क्रिया अमंगळ । बुडविलें कुळ उभयतां ॥२॥

तुका ह्मणे ऐसी कलयुगाची चाली । स्वाथॉ बुडविलीं आचरणें ॥३॥

हा चि माझा नेम धरिला हो धंदा । यावरि गोविंदा भेटी द्यावी ॥१॥

हा चि माझा ध्यास सदा सर्वकाळ । न्यावयासी मूळ येसी कधीं ॥ध्रु.॥

डोळियांची भूक पहातां श्रीमुख । आलिंगणे सुख निवती भुजा ॥२॥

बहु चित्त ओढे तयाचिये सोई । पुरला हाकांहीं नवस नेणें ॥३॥

बहुबहु काळ जालों कासावीस । वाहिले बहुवस कळेवर ॥४॥

तुका ह्मणे आतां पाडावें हें ओझें । पांडुरंगा माझें इयावरि ॥५॥

जेणें माझें हित होइल तो उपाव । करिसील भाव जाणोनियां ॥१॥

मज नाहीं सुख दुःख तया खंती । भावना हे चित्तीं नाना छंदें ॥ध्रु.॥

तोडीं हे संबंध तोडीं आशापाश । मज हो सायास न करितां ॥२॥

तुका ह्मणे मी तों राहिलों नििंश्चत । कवळोनि एकांतसुख तुझें ॥३॥

शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरि तूं जाण श्रुतिदास ॥१॥

त्याची तुज कांहीं चुकतां चि नीत । होसील पतित नरकवासी ॥ध्रु.॥

बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुकों नको ॥२॥

शिखा सूत्र याचा तोडीं तूं संबंध । मग तुज बाध नाहींनाहीं ॥३॥

तुका ह्मणे तरि वर्त्तूनि निराळा । उमटती कळा ब्रह्मींचिया ॥४॥

पतिव्रता ऐसी जगामध्यें मात । भोगी पांच सात अंधारीं ते ॥१॥

भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषीं जाण संभ्रम तो ॥२॥

तुका ह्मणे तिच्या दोषा नाहीं पार । भोगील अघोर कुंभपाक ॥३॥

सिंदळीसी नाहीं पोराची पैं आस । सांटविल्याबीजास काय करी ॥१॥

अथवा सेतीं बीज पेरिलें भाजोन । सारा देइल कोण काका त्याचा ॥२॥

तुका ह्मणे नाहीं खायाची ते चाड । तरि कां लिगाड करुनी घेतोस ॥३॥

चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥१॥

देखवी दाखवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नका ॥ध्रु.॥

मानसाची देव चालवी अहंता । मी चि एक कर्त्ता ह्मणों नये ॥२॥

वृक्षाचीं हीं पानें हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥३॥

तुका ह्मणे विठो भरला सबाहीं । तया उणें कांहीं चराचरीं ॥४॥

मायारूपें ऐसें मोहिलेंसे जन । भोगिती पतन नामाकर्में ॥१॥

काय याची प्रीती करितां आदर । दुरावितां दूर तें चि भलें ॥ध्रु.॥

नाना छंद अंगीं बैसती विकार । छिळयेले फार तपोनिधि ॥२॥

तुका ह्मणे ऐसें सिकवितों तुज । आतां धरी लाज मना पुढें ॥३॥

जेजे कांहीं मज होईल वासना । तेते नारायणा व्हावें तुह्मीं ॥१॥

काय भाव एक निवडूं निराळा । जाणसी तूं कळा अंतरींची ॥ध्रु.॥

तुजविण मज कोण आहे सखा । जें सांगा आणिकां जीवभाव ॥२॥

अवघें पिशुन जालें असे जन । आपपर कोण नाठवे हें ॥३॥

तुका ह्मणे तूं चि जीवांचें जीवन । माझें समाधान तुझे हातीं ॥४॥

कैसी करूं आतां सांग तुझी सेवा । शब्दज्ञानें देवा नाश केला ॥१॥

आतां तुझें वर्म न कळे अनंता । तुज न संगतां बुडूं पाहें ॥ध्रु.॥

संध्या स्नान केली आचाराची नासी । काय तयापासीं ह्मणती एक ॥२॥

बुडविली भक्ति म्हणीते पाषाण । पिंडाचें पाळण स्थापुनियां ॥३॥

न करावी कथा ह्मणती एकादशी। भजनाची नासी मांडियेली ॥४॥

न जावें देउळा ह्मणती देवघरीं । बुडविलें या परी तुका ह्मणे ॥५॥

नमोनमो तुज माझें हें कारण । काय जालें उणें करितां स्नान ॥१॥

संतांचा मारग चालतों झाडूनि । हो का लाभ हानि कांहींतरि ॥ध्रु.॥

न करिसी तरि हेंचि कोडें मज । भक्ति गोड काज आणीक नाहीं ॥२॥

करीं सेवा कथा नाचेन रंगणीं । प्रेमसुखधणी पुरेल तों ॥३॥

महाद्वारीं सुख वैष्णवांचे मेळीं । वैकुंठ जवळी वसे तेथें ॥४॥

तुका ह्मणे नाहीं मुक्तिसवें चाड । हें चि जन्म गोड घेतां मज ॥५॥

होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥१॥

निंदिती कदान्न इिच्छती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥२॥

तुका ह्मणे ऐसें दांभिक भजन । तया जनार्दन भेटे केवीं ॥३॥

लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती ॥१॥

सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥२॥

तुका ह्मणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळतां वर्म मिथ्यावाद ॥३॥

कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ म्हणविती जगामाजी ॥१॥

घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परि शंकरासी नोळखती ॥२॥

पोट भरावया शिकती उपाय । तुका ह्मणे जाय नर्क लोका ॥३॥

कौडीकौडीसाटीं फोडिताती शिर । काढूनि रुधिर मलंग ते ॥१॥

पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारिती आरोळी धैर्यबळें ॥२॥

तुका ह्मणे त्यांचा नव्हे चि स्वधर्म । न कळे चि वर्म गोविंदाचें ॥३॥

दाढी डोई मुंडी मुंडुनियां सर्व । पांघुरति बरवें वस्त्र काळें ॥१॥

उफराटी काठी घेऊनियां हातीं । उपदेश देती सर्वत्रासी ॥२॥

चाळवुनी रांडा देउनियां भेष । तुका ह्मणे त्यास यम दंडी ॥३॥

होउनी जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरीं ॥१॥

शिवाचें निर्माल्य तीर्था न सेविती । घंटा वाजविती पोटासाठीं ॥२॥

तुका ह्मणे त्यासी नाहीं शिवभक्ति । व्यापार करिती संसाराचा ॥३॥

लावूनियां मुद्रा बांधोनियां कंठीं । हिंडे पोटासाटीं देशोदेशीं ॥१॥

नेसोनि कोपीन शुभ्रवर्ण जाण । पहाती पक्वान्न क्षेत्रींचें तें ॥२॥

तुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥३॥

ऐसे नाना भेष घेऊनी हिंडती । पोटासाटीं घेती प्रतिग्रह ॥१॥

परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांगापां साचार नांव त्याचें ॥२॥

जन्मतां संसार त्यजियेला शुकें । तोचि निष्कळंक तुका ह्मणे ॥३॥

िस्त्रया पुत्र कळत्र हें तंव मायावंत । शेवटींचा अंत नाहीं कोणी ॥१॥

यमाचिये हातीं बांधोनियां देती । भूषणें ही घेती काढूनियां ॥२॥

ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास । धरिली तुझी कास तुका ह्मणे ॥३॥

न लगती मज शब्दब्रह्मज्ञान । तुझिया दर्शनावांचूनियां ॥१॥

ह्मणऊनि तुझें करितों चिंतन । नावडे वचन आणिकांचें ॥ध्रु.॥

काय ते महत्वी करावी मान्यता । तुज न देखतां पांडुरंगा ॥२॥

तुका ह्मणे तुज दिधल्यावांचूनि । न राहे त्याहूनि होइन वेडा ॥३॥

तुझा ह्मणोनियां दिसतों गा दीन । हा चि अभिमान सरे तुझा ॥१॥

अज्ञान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणीं कोण पावे ॥ध्रु.॥

तैसा विठो तुजविण परदेशी । नको या दुःखासीं गोऊं मज ॥२॥

तुका ह्मणे मज सर्व तुझी आशा । अगा जगदीशा पांडुरंगा ॥३॥

जन्म मृत्यू फार जाले माझ्या जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा ॥१॥

सिणलों बहुत करितां येरझारा । रखुमाईच्या वरा पावें वेगीं ॥२॥

तुका ह्मणे तूं गा पतितपावन । घेइप माझा सीण जन्मांतर ॥३॥

आतां माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाईचा पति पावे चि ना ॥१॥

कायविधा त्यानें घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होय चि ॥२॥

तुका ह्मणे माझी विसरूं नको चिंता । अगा पंढरिनाथा पाव वेगी ॥३॥

पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाई जननी भेटे केव्हां ॥१॥

न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अिग्नचिया ॥२॥

तुका ह्मणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझें ॥३॥

तन मन धन दिलें पंढरिराया । आतां सांगावया उरलें नाहीं ॥१॥

अर्थचाड चिंता नाहीं मनीं आशा । तोडियेला फांसा उपाधीचा ॥२॥

तुका ह्मणे एक विठोबाचें नाम । आहे जवळी दाम नाहीं रुका ॥३॥

आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥

देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥

देता देवविता नेता नेवविता । येथ याची सत्ता काय आहे ॥२॥

निमित्याचा धनी केला असे झणी । माझेंमाझें ह्मणोनि व्यर्थ गेला ॥३॥

तुका ह्मणे कां रे नाशवंतासाटीं । देवासवें आटी पाडितोसी ॥४॥

माय वनीं धाल्या धाये । गर्भ आंवतणें न पाहें ॥१॥

तैसें पूजितां वैष्णव । सुखें संतोषतो देव ॥ध्रु.॥

पुत्राच्या विजयें । पिता सुखातें जाये ॥२॥

तुका ह्मणे अमृतसिद्धि । हरे क्षुधा आणि व्याधि ॥३॥

तुझें अंगभूत । आह्मी जाणतों समस्त ॥१॥

येरा वाटतसे जना । गुढारसें नारायणा ॥ध्रु.॥

ठावा थारा मारा । परचिया संव चोरा ॥२॥

तुका ह्मणे भेदा । करुनि करितों संवादा ॥३॥

तुज दिला देह । आजूनि वागवितों भय ॥१॥

ऐसा विश्वासघातकी । घडली कळतां हे चुकी ॥ध्रु.॥

बोलतों जें तोंडें । नाहीं अनुभविलें लंडें ॥२॥

दंड लाहें केला । तुका ह्मणे जी विठ्ठला ॥३॥

माते लेकरांत भिन्न । नाहीं उत्तरांचा सीन ॥१॥

धाडींधाडीं वो भातुकें । रंजविल्याचें कौतुकें ॥ध्रु.॥

करुनि नवल । याचे बोलिलों ते बोल ॥२॥

तुका ह्मणे माते । पांडुरंगे कृपावंते ॥३॥

जरि न भरे पोट । तरि सेवूं दरकूट ॥१॥

परि न घलूं तुज भार । हा चि आमुचा निर्धार ॥ध्रु.॥

तुझें नाम अमोलिक। नेणती हे ब्रह्मादिक ॥२॥

ऐसें नाम तुझें खरें । तुका ह्मणे भासे पुरें ॥३॥

सर्वस्वाची साटी । तरि च देवासवें गांठी ॥१॥

नाहीं तरी जया तैसा । भोग भोगवील इच्छा ॥ध्रु.॥

द्यावें तें चिं घ्यावें । ह्मणउनि घ्यावें जीवें ॥२॥

तुका ह्मणे उरी । मागें उगवितां बरी ॥३॥

गाढव शृंगारिलें कोडें । कांहीं केल्या नव्हे घोडें ॥१॥

त्याचें भुंकणें न राहे । स्वभावासी करील काये ॥ध्रु.॥

श्वान शिबिके बैसविलें । भुंकतां न राहे उगलें ॥२॥

तुका ह्मणे स्वभावकर्म । कांहीं केल्या न सुटे धर्म ॥३॥

सेंकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें ॥१॥

स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥ध्रु.॥

सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं ज्ञानपणाची मस्ती ॥२॥

तुका ह्मणे गाढव लेखा । जेथें भेटेल तेथें ठोका ॥३॥

आवडे सकळां मिष्टान्न । रोग्या विषा त्यासमान ॥१॥

दर्पण नावडे तया एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥२॥

तुका ह्मणे तैशा खळा । उपदेशाचा कांटाळा ॥३॥

अखंड संत निंदी । ऐसी दुर्जनाची बुद्धि ॥१॥

काय ह्मणावें तयासी । तो केवळ पापरासि ॥ध्रु.॥

जो स्मरे रामराम । तयासी ह्मणावें रिकामें ॥२॥

जो तीर्थव्रत करी । तयासी ह्मणावें भिकारी ॥३॥

तुका ह्मणे विंच्वाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगीं ॥४॥

या रे नाचों अवघेजण । भावें प्रेमें परिपूर्ण ॥१॥

गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊनिं संतजना ॥ध्रु.॥

सुख साधु सुखासाटीं । नाम हरिनाम बोभाटीं ॥२॥

प्रेमासाटीं तो उदार । देतां नाहीं सानाथोर ॥३॥

पापें पळालीं बापुडीं । काळ झाला देशधडी ॥४॥

तुका ह्मणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ॥४॥

उपजलों मनीं । हे तों स्वामीची करणी ॥१॥

होइल प्रसादाचें दान । तरि हें कवुतक पाहेन ॥ध्रु.॥

येइल अभय जरि । तरि हे आज्ञा वंदिन शिरीं ॥२॥

भक्तिप्रयोजना । प्रयोजावें बंदिजना ॥३॥

यश स्वामिचिये शिरीं । दास्य करावें किंकरीं ॥४॥

तुका ह्मणे आळीकरा । त्यासी योजावें उत्तरा ॥५॥

माझें मन पाहे कसून । परि चित्त न ढळे तुजपासून ॥१॥

कापुनि देइन शिर । पाहा कृपण कीं उदार ॥ध्रु.॥

मजवरि घालीं घण । परि मी न सोडीं चरण ॥२॥

तुका ह्मणे अंतीं । तुजवांचूनि नाहीं गति ॥३॥

भूमीवरि कोण ऐसा । गांजूं शके हरिच्या दासा ॥१॥

सुखें नाचा हो कीर्त्तनीं । जयजयकारें गर्जा वाणी ॥ध्रु.॥

काळा सुटे पळ । जाती दुरितें सकळ ॥२॥

तुका ह्मणे चित्तीं । सांगूं मानाची हे निति ॥३॥

जातीचा ब्राह्मण । न करितां संध्यास्नान ॥१॥

तो एक नांनवाचा ब्राह्मण । होय हीनाहूनि हीन ॥ध्रु.॥

सांडुनियां शाळिग्राम । नित्य वेश्येचा समागम ॥२॥

नेघे संतांचें जो तीर्थ । अखंड वेश्येचा जो आर्थ ॥३॥

तुका ह्मणे ऐसे पापी । पाहूं नका पुनरपि ॥४॥

जालों जीवासी उदार । त्यासी काय भीडभार ॥१॥

करीन आडक्या घोंगडें । उभें बाजारीं उघडें ॥ध्रु.॥

जोंजों धरिली भीड । तोंतों बहु केली चीड ॥२॥

तुका ह्मणे मूळ । तुझें उच्चारीन कुळ ॥३॥

आह्मां हें चि काम । वाचे गाऊं तुझें नाम ॥१॥

आयुष्य मोलाची हे घडी । धरूं पायांची आवडी ॥ध्रु.॥

अमृताची खाणी । याचे ठायीं वेचूं वाणी ॥२॥

तुका ह्मणे पांडुरंगा । माझ्या जिवाच्या जिवलगा ॥३॥

मिळे हरिदासांची दाटी । रीग न होय शेवटी ॥१॥

तेथें म्या काय करावें । माझें कोणें आइकावें ॥ध्रु.॥

कैसें तुज लाजवावें । भक्त ह्मणोनियां भावें ॥२॥

नाचतां नये ताळीं । मज वाजवितां टाळी ॥३॥

अंतीं मांडिती भुषणें भूषणे । शरीर माझें दैन्य वाणें ॥४॥

तुका ह्मणे कमळापति । मज न द्यावें त्या हातीं ॥५॥

जाणों नेणों काय । चित्तीं धरूं तुझे पाय ॥१॥

आतां हें चि वर्म । गाऊं धरूनियां प्रेम ॥ध्रु.॥

कासया सांडूं मांडूं। भाव हृदयीं च कोंडूं ॥२॥

तुका ह्मणे देवा । जन्मोजन्मीं मागें सेवा ॥३॥

जाळें घातलें सागरीं । बिंदु न राहे भीतरी ॥१॥

तैसें पापियाचें मन । तया नावडे कीर्त्तन ॥ध्रु.॥

गाढव गंगेसी न्हाणिलें। जाउनि उकरड्यावरि लोळे ॥२॥

प्रीती पोसिलें काउळें । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥३॥

तुका ह्मणे तैसी हरी । कीरव्या नावडे कस्तुरी ॥४॥

तरलों ह्मणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ जाला फांटा ॥१॥

वांयांविण तुटे दोड । मान सुख इच्छी मांड ॥ध्रु.॥

ग्वाहीविण मात । स्थापी आपुली स्वतंत्र ॥२॥

तुका ह्मणे ऐसीं किती । नरका गेलीं अधोगती ॥३॥

कठिण नारळाचें अंग । बाहेरी भीतरी तें चांग ॥१॥

तैसा करी कां विचार । शुद्ध कारण अंतर ॥ध्रु.॥

वरि कांटे फणसफळा । माजि अंतरीं जिव्हाळा ॥२॥

ऊंस बाहेरी कठिण काळा । माजी रसाचा जिव्हाळा ॥३॥

मिठें रुचविलें अन्न । नये सतंत कारण ॥४॥

सकळतीर्थांहूनि । पंढरीनाथ मुगुटमणी ॥१॥

धन्यधन्य पंढरी । जे मोक्षाची अक्षय पुरी ॥ध्रु.॥

विश्रांतीचा ठाव । तो हा माझा पंढरीराव ॥२॥

तुका ह्मणे सांगतों स्पष्ट । दुजी पंढरी वैकुंठ ॥३॥

भाते भरूनि हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥१॥

अनंतनामाची आरोळी । एक एकाहूनि बळी ॥ध्रु.॥

नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचे अंकित त्यावांचून ॥२॥

रिद्धि सिद्धि ज्या कामारी। तुका ह्मणे ज्याचे घरीं ॥३॥

ज्याची जया आस । तयाजवळी त्या वास ॥१॥

येर जवळी तें दुरी । धेनु वत्स सांडी घरीं ॥ध्रु.॥

गोडी िप्रयापाशीं । सुख उपजे येरासी ॥२॥

तुका म्हणे बोल । घडे तयाठायीं मोल ॥३॥

बाळ माते निष्ठ‍ होये । परि तें स्नेह करीत आहे ॥१॥

तैसा तूं गा पुरुषोत्तमा । घडी न विसंबसी आह्मां ॥ध्रु.॥

नेणती भागली । कडे घेतां अंग घाली ॥२॥

भूक साहे ताहान । त्याचें राखे समाधान ॥३॥

त्याच्या दुःखें धाये । आपला जीव देऊं पाहे ॥४॥

नांवें घाली उडी । तुका ह्मणे प्राण काढी ॥५॥

हें तों टाळाटाळीं । परि भोवताहे कळी ॥१॥

बरें नव्हेल शेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥

मुरगाळिला कान । समांडिलें समाधान ॥२॥

धन्य ह्मणे आतां । येथें नुधवा माथां ॥३॥

अबोलणा तुका । ऐसें कांहीं लेखूं नका ॥४॥

किती लाजिरवाणा । मरे उपजोनि शाहाणा ॥१॥

एका घाइप न करीं तुटी । न निघें दवासोई भेटी ॥ध्रु.॥

सोसूनि आबाळी । घायाळ तें ढुंग चोळी ॥२॥

सावध करी तुका । म्हणे निजले हो आइका ॥३॥

कुरुवंडी करीन काया । वरोनि पायां गोजिरिया ॥१॥

बैसलें तें रूप डोळां । मन चाळा लागलें ॥ध्रु.॥

परतें न सरवे दुरि । आवडी पुरी बैसली ॥२॥

तुका ह्मणे विसावलों । येथें आलों धणीवरि ॥३॥

साधनाचे कष्ट मोटे । येथें वाटे थोर हें ॥१॥

मुखें गावें भावें गीत । सर्व हित बैसलिया ॥ध्रु.॥

दासा नव्हे कर्म दान। तन मन निश्चळ ॥२॥

तुका ह्मणे आत्मनिष्ट । भागे चेष्ट मनाची ॥३॥

घेतां आणिकांचा जीव । तेव्हां कींव कराना ॥१॥

आपलें तें वरदळ नेदा । हें गोविंदा कृपणता ॥ध्रु.॥

सेवा तरी इच्छा सांग । चोरिलें अंग साहेना ॥२॥

तुका ह्मणे अरे धन्या । निसंतान्या विठोबा ॥३॥

आह्मां केलें गुणवंत । तें उचित राखावें ॥१॥

तुह्मांसी तों चाड नाहीं । आणिकां कांहीं सुखदुःखां ॥ध्रु.॥

दासांचें तें देखों नये । उणें काय होइल तें ॥२॥

तुका ह्मणे विश्वंभरा । दृष्टि करा सामोरी ॥३॥

अगत्य ज्या नरका जाणें । कीर्तनीं तों वीट मानी ॥१॥

नावडेसा जाला बाप । आलें पाप वस्तीसि ॥ध्रु.॥

नारायण नाहीं वाचे । ते यमाचे अंदण ॥२॥

तुका ह्मणे अभक्तासी । माता दासी जग झोडी ॥३॥

आह्मी हरिचे हरिचे । सुर किळकाळा यमाचे ॥१॥

नामघोष बाण साचे । भाले तुळसी मंजुरेचे ॥ध्रु.॥

आह्मी हरिचे हरिचे दास । कलिकाळावरि घालूं कास ॥२॥

आह्मी हरिचे हरिचे दूत । पुढें पळती यमदूत ॥३॥

तुका ह्मणे आह्मांवरी । सुदर्शन घरटी करी ॥४॥

देवाचिये पायीं वेचों सर्व शक्ती । होतील विपित्त ज्याज्या कांहीं ॥१॥

न घेइप माझी वाचा पुढें कांहीं वाव । आणि दुजे भाव बोलायाचे ॥ध्रु.॥

मनाचे वांटणी चित्ताचा विक्षेप । राहो हा अनुताप आहे तैसा ॥२॥

तुका ह्मणे घेइप विठ्ठलाचा छंद । आनंदाचा कंद विस्तारेल ॥३॥

पांडुरंगा आतां ऐका हे विनंती । बहु माझे चित्तीं भय वाटे ॥१॥

नाहीं आइकिलें संतांचिया मुखें । तें या मज लोकें भडसाविलें ॥ध्रु.॥

विष्णुदासां गति नाहीं तरावया । ह्मणती गेले वांयां कष्टत ही ॥२॥

धिक्कारिती मज करितां कीर्तन । काय सांगों शीण ते काळिचा ॥३॥

तुका ह्मणे मज वाटतें उदास । काय करूं यास पांडुरंगा ॥४॥

वेढा वेढा रे पंढरी । मोर्चे लावा भीमातिरीं ॥१॥

चलाचला संत जन । करा देवासी भांडण ॥ध्रु.॥

लुटालुटा पंढरपूर। धरा रखुमाईचा वर ॥२॥

तुका ह्मणे चला । घाव निशानी घातला ॥३॥

पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती ॥१॥

प्रल्हादासी पिता करितो जाचणी । परि तो स्मरे मनीं नारायण ॥ध्रु.॥

सुदामा ब्राह्मण दरिद्रें पीडिला । नाहीं विसरला पांडुरंग ॥२॥

तुका ह्मणे तुझा न पडावा विसर । दुःखाचे डोंगर जाले तरी ॥३॥

निजसेजेची अंतुरी । पादलिया कोण मारी ॥१॥

तैसा आह्मासी उबगतां । तुका विनवितो संतां ॥ध्रु.॥

मूल मांडीवरी हागलें । तें बा कोणे रें त्यागिलें ॥२॥

दासी कामासी चुकली । ते बा कोणें रें विकली ॥३॥

पांडुरंगाचा तुका पापी । संतसाहें काळासि दापी ॥४॥

श्वानाचियापरी लोळें तुझ्या दारीं । भुंकों हरिहरि नाम तुझें ॥१॥

भुंकीं उठीं बैसें न वजायें वेगळा । लुडबुडीं गोपाळा पायांपाशीं ॥२॥

तुका ह्मणे आह्मां वर्म आहे ठावें । मागेन ते द्यावें प्रेमसुख ॥३॥

सोइरे धाइरे दिल्याघेतल्याचे । अंत हें काळीचें नाहीं कोणी ॥१॥

सख्या गोत्रबहिणी सुखाचे संगती । मोकलुनी देती अंतकाळीं ॥ध्रु.॥

आपुलें शरीर आपुल्यासी पारिखें । परावीं होतील नवल काई ॥२॥

तुका ह्मणे आतां सोड यांची आस । धरीं रे या कास पांडुरंगा ॥३॥

जन्ममरणांची कायसी चिंता । तुझ्या शरणागतां पंढरीराया ॥१॥

वदनीं तुझें नाम अमृतसंजीवनी । असतां चक्रपाणी भय कवणा ॥ध्रु.॥

हृदयीं तुझें रूप बिंबलें साकार । तेथें कोण पार संसाराचा ॥२॥

तुका ह्मणे तुझ्या चरणांची पाखर । असतां किळकाळ पायां तळीं ॥३॥

क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥१॥

तृण नाहीं तेथें पडे दावाग्नि । जाय तो विझोनि आपसया ॥२॥

तुका ह्मणे क्षमा सर्वांचें स्वहित । धरा अखंडित सुखरूप ॥३॥

याति गुणें रूप काय ते वानर । तयांच्या विचारें वर्ते राम ॥१॥

ब्रह्महत्यारासि पातकी अनेक । तो वंद्य वाल्मीक तिहीं लोकीं ॥२॥

तुका ह्मणे नव्हे चोरीचा व्यापार । ह्मणा रघुवीर वेळोवेळां ॥३॥

पानें जो खाईल बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ॥१॥

तमाखू ओढूनि काढला जो धूर । बुडेल तें घर तेणें पापें ॥ध्रु.॥

कीर्तनीं बडबड करील जो कोणी । बेडुक होउनी येइल जन्मा ॥२॥

जयाचिये मनीं कथेचा कंटाळा । होती त्या चांडाळा बहु जाच ॥३॥

जाच होती पाठी उडती यमदंड । त्याचें काळें तोंड तुका ह्मणे ॥४॥

कामांमध्यें काम । कांहीं ह्मणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होईल दुःखाचें ॥१॥

कळों येईल अंतकाळीं । प्राणप्रयाणाचे वेळीं । राहाती निराळीं । रांडापोरें सकळ ॥ध्रु.॥

जीतां जीसी जैसा तैसा । पुढें आहे रे वोळसा । उगवुनि फांसा । काय करणें तें करीं ॥२॥

केलें होतें या चि जन्में । अवघें विठोबाच्या नामें । तुका ह्मणे कर्म । जाळोनियां तरसी ॥३॥

तुज मज ऐसी परी । जैसे तरंग सागरीं ॥१॥

दोहींमाजी एक जाणा । विठ्ठल पंढरीचा राणा ॥ध्रु.॥

देव भक्त ऐसी बोली । जंव भ्रांति नाहीं गेली ॥२॥

तंतु पट जेवीं एक । तैसा विश्वेंसीं व्यापक ॥३॥

कोठें गुंतलासी योगीयांचे ध्यानीं । आनंदकीर्तनीं पंढरीच्या ॥१॥

काय काज कोठें पडलीसे गुंती । कानीं न पडती बोल माझे ॥ध्रु.॥

काय शेषनशयनीं सुखनिद्रा आली । सोय कां सांडिली तुह्मी देवा ॥२॥

तुका ह्मणे कोठें गुंतलेती सांगा । किती पांडुरंगा वाट पाहूं ॥३॥

माउलीसी सांगे कोण । प्रेम वाढवी ताहानें ॥१॥

अंतरींचा कळवळा । करीतसे प्रतिपाळा ॥ध्रु.॥

मायबापाची उपमा। तुज देऊं मेघश्यामा ॥२॥

ते ही साजेना पाहातां । जीवलगा पंढरिनाथा ॥३॥

माय पाळी संसारीं । परलोक राहे दुरी ॥४॥

तैसा नव्हेसी अनंता । काळावरी तुझी सत्ता ॥५॥

तुका ह्मणे नारायणा। तुह्मां बहुत करुणा ॥६॥

कोड आवडीचें । पुरवीना बाळकाचें ॥१॥

तेव्हां कैसी ते माउली । जाणा काशासाटीं व्याली ॥ध्रु.॥

वत्साचिये आसे। धेनु धांवेना गोरसें ॥२॥

तुका ह्मणे धरि । बाळ टाकिलें वानरीं ॥३॥

भक्तांची सांकडीं स्वयें सोसी देव । त्यांपाशीं केशव सर्वकाळ ॥१॥

जये ठायीं कीर्तन वैष्णव करिती । तेथें हा श्रीपति उभा असे ॥२॥

तुका ह्मणे देव सर्वाठायीं जाला । भरुनी उरला पांडुरंग ॥३॥

तुझिया नामाचा विसर न पडावा । ध्यानीं तो राहावा पांडुरंग ॥१॥

सांगितला मंत्र श्रीरामनामाचा । सर्वकाळ वाचा हें चि बोले ॥ध्रु.॥

उफराटें नाम वाल्मीक बोलीला । तो ही वंद्य केला नारायणें ॥२॥

तुका ह्मणे मज तुझा चि भरवसा । धांवुनियां कैसा येसी देवा ॥३॥

अवघ्यां पातकांची मी एक रासी । अवघा तूं होसी सवाौत्तमु ॥१॥

जैसा तैसा लागे करणें अंगीकार । माझा सर्व भार चालविणें ॥ध्रु.॥

अवघें चि मज गिळियेलें काळें । अवघीं च बळें तुझे अंगीं ॥२॥

तुका ह्मणे आतां खुंटला उपाय । अवघे चि पाय तुझे मज ॥३॥

मूर्तिमंत देव नांदतो पंढरी । येर ते दिगांतरीं प्रतिमारूप ॥१॥

जाउनियां वना करावें कीर्तन । मानुनी पाषाण विठ्ठलरूप ॥२॥

तुका मुख्य पाहिजे भाव । भावापासीं देव शीघ्र उभा ॥३॥

धरिल्या देहाचें सार्थक करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥

लावीन निशान जावया वैकुंठा । माजवीन पेठा कीर्तनाच्या ॥ध्रु.॥

नामाचिया नौका करीन सहस्रवरि । नावाडा श्रीहरि पांडुरंग ॥२॥

भाविक हो येथें धरा रे आवांका । ह्मणे दास तुका शुद्धयाति ॥३॥

अनुसरे त्यासी फिरों नेदी मागें । राहें समागमें अंगसंगें ॥१॥

अंगसंगें असे कर्मसाक्ष देव । जैसा ज्याचा भाव तैसा राहे ॥२॥

फळपाकीं देव देतील प्राणीयें । तुका ह्मणे नये सवें कांहीं ॥३॥

संसारीं असतां हरिनाम घेसी । तरीं च उद्धरसी पूर्वजेंसी ॥१॥

अवघीं च इंिद्रयें न येती कामा । जिव्हे रामनामा उच्चारीं वेगीं ॥ध्रु.॥

शरीरसंपित्त नव्हे रे आपुली । भ्रांतीची माउली अवघी व्यर्थ ॥२॥

तुका ह्मणे सार हरिनामउच्चार । ये†हवी येरझार हरीविण ॥३॥

सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥

आणीक कांहीं इच्छा आह्मां नाहीं चाड । तुझें नाम गोड पांडुरंगे ॥ध्रु.॥

जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज । आह्मांसी सहज द्यावें आतां ॥२॥

तुका ह्मणे तुज ऐसे दयाळ । धुंडितां सकळ नाहीं आह्मां ॥३॥

भक्तांहून देवा आवडे तें काइ । त्रिभुवनीं नाहीं आन दुजें ॥१॥

नावडे वैकुंठ क्षीराचा सागर । धरोनि अंतर राहे दासा ॥ध्रु.॥

सर्वभावें त्याचें सर्वस्वें ही गोड । तुळसीदळ कोड करुनी घ्यावें ॥२॥

सर्वस्वें त्याचा ह्मणवी विकला । चित्त द्यावें बोला सांगितल्या ॥३॥

तुका ह्मणे भक्तिसुखाचा बांधिला । आणीक विठ्ठला धर्म नाहीं ॥४॥

राम कृष्ण गोविंद नारायण हरी । केशवा मुरारी पांडुरंगा ॥१॥

लक्ष्मीनिवासा पाहें दिनबंधु । तुझा लागो छंदु सदा मज ॥२॥

तुझे नामीं प्रेम देई अखंडित । नेणें तप व्रत दान कांहीं ॥३॥

तुका ह्मणे माझें हें चि गा मागणें । अखंड ही गाणें नाम तुझें ॥४॥

हरी तुझें नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणें कांहीं ॥१॥

अंतरीं विश्वास अखंड नामाचा । कायामनेंवाचा देइप हें चि ॥२॥

तुका ह्मणे आतां देइप संतसंग । तुझे नामीं रंग भरो मना ॥३॥

गाबाळाचे ग्रंथीं कां रे पडां सदा । मिथ्या भेदवादा वागवितां ॥१॥

संसारगाबाळीं पडसी निखळ । जालासी तूं खळ तेणें मना ॥ध्रु.॥

साधनसंकटीं गुंतसी कासया । व्यर्थ गा अपायामाजी गुंती ॥२॥

निर्मळ फुकाचें नाम गोविंदाचें । अनंतजन्माचे फेडी मळ ॥३॥

तुका ह्मणे नको करूं कांहीं कष्ट । नाम वाचे स्पष्ट हरि बोलें ॥४॥

भाव धरिला चरणीं ह्मणवितों दास । अहिर्निशीं ध्यास करीतसें ॥१॥

करीतसें ध्यास हृदयीं सकळ । भाव तो सबळ धरियेला ॥२॥

धरिले निश्चळ न सोडीं ते पाय । तुका ह्मणे सोय करीं माझी ॥३॥

तुझें नाम गाया न सोपें डवळा । गाऊं कळवळा प्रेमाचिया ॥१॥

येइल आवडी जैसी अंतरींची । तैसी मनाची कीर्ती गाऊं ॥२॥

माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥३॥

अबद्ध चांगलें गाऊं जैसें तैसें । बाहे बाळ जैसें मायबापा ॥४॥

तुका ह्मणे मज न लावीं वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥५॥

आतां तुज मज नाहीं दुजेपण । दाखवीं चरण पांडुरंगा ॥१॥

तुज रूप रेखा नाम गुण नाहीं । एक स्थान पाहीं गांव सिंव ॥ध्रु.॥

नावडे संगाति तुजा दुजयाची । आपुल्या भक्तांची प्रीति तुह्मां ॥२॥

परि आह्मांसाटीं होसील सगुण । स्तंभासी फोडून जयापरि ॥३॥

तुका ह्मणें तैसें तुज काय उणें । देइप दरुषण चरणांचें ॥४॥

करणें तें हें चि करा । नरका अघोरा कां जातां ॥१॥

जयामध्यें नारायण । शुद्धपण तें एक ॥ध्रु.॥

शरणागतां देव राखे। येरां वाखे विघ्नाचे ॥२॥

तुका ह्मणे लीन व्हावें । कळे भावें वर्म हें ॥३॥

आणीक नका करूं चेष्टा । व्हाल कष्टा वरपडी ॥१॥

सुखें करा हरिकथा । सर्वथा हे तारील ॥ध्रु.॥

अनाथाचा नाथ देव। अनुभव सत्य हा ॥२॥

तुका ह्मणे बहुतां रिती । धरा चित्तीं सकळ ॥३॥

मुखें सांगे भ्रमकथान । जन लोकाची कापितो मान ॥१॥

असत्य सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ॥ध्रु.॥

कथा करितो ज्ञानाची । अंतरीं आशा बहु लोभाची ॥२॥

तुका ह्मणे तो चि वेडा। त्याचें बहू उद्देश हाणावा ॥३॥

कांहीं दुसरा विचार । न लगे करावा चि फार ॥१॥

सेट्या ना चौधरी । पांडेपण वाहे शिरीं ॥ध्रु.॥

पाप न लगे धुंडावें॥ पाहिजे तरि तेथें जावें ॥२॥

जकातीचा धंदा । तेथें पाप वसे सदा ॥३॥

गाई ह्मसी हेड । तुप विकी महा द्वाड ॥४॥

तुका ह्मणे पाहीं । तेथें पुण्या रीघ नाहीं ॥५॥

तुझी माझी आहे जुनी सोयरीक । आधीं बंधु लेंक मग जाले ॥१॥

वांटेकरी ह्मणून पुसती आतां । परि आहे सत्ता करीन ते ॥ध्रु.॥

लेंकीचें लेंकरूं नातु जाल्यावरी । मंगळा ही दुरि अंतरलों ॥२॥

बाइलेचा भाऊ पिसुना सोयरा । ह्मणउनि करा विनोद हा ॥३॥

आकुळीं तों करूं नये तें चि केलें । न बोलावें भलें तों चि आतां ॥४॥

न ह्मणसी लेंकी माउसी बहिणी । आह्मां केलें धणी पापाचें त्या ॥५॥

बहु पांचांजणी केली विटंबना । नये दाऊं जना तोंड ऐसें ॥६॥

तुका ह्मणे आधीं मूळ तें चि धरूं । मागील तें करूं उरी आतां ॥७॥

मागें बहुत जाले खेळ । आतां बळ वोसरलें ॥१॥

हालों नये चालों आतां । घट रिता पोकळ ॥ध्रु.॥

भाजल्याची दिसे घडी । पट ओढी न साहे ॥२॥

तुका ह्मणे पाहतां घडी । जगा जोडी अंगारा ॥३॥

आळस आला अंगा । धांव घालीं पांडुरंगा ॥१॥

सोसूं शरीराचे भाव । पडती अवगुणाचे घाव ॥ध्रु.॥

करावीं व्यसनें। दुरी येउनि नारायणें ॥२॥

जवळील दुरी । जालों देवा धरीं करीं ॥३॥

ह्मणउनि देवा । वेळोवेळां करीं धावा ॥४॥

तुका ह्मणे पांडुरंगा । दुरी धरूं नका अंगा ॥५॥

झंवविली महारें । त्याची व्याली असे पोरें ॥१॥

करी संताचा मत्सर । कोपें उभारोनि कर ॥ध्रु.॥

बीज तैसें फळ । वरी आलें अमंगळ ॥२॥

तुका ह्मणे ठावें । ऐसें जालें अनुभवें ॥३॥

पापी तो नाठवी आपुल्या संचिता । ठेवी भगवंता वरी बोल ॥१॥

भेईना करितां पापाचे डोंगर । दुर्जन पामर दुराचारी ॥ध्रु.॥

नाठवी तो खळ आपुली करणी । देवासी निंदोनि बोलतसे ॥२॥

तुका ह्मणे त्याच्या तोंडा लागो काटी । नाहीं जगजेठी जया चित्तीं ॥३॥

आधीं देह पाहता वाव । कैचा प्रारब्धासी ठाव ॥१॥

कां रे रडतोसी माना । लागें विठ्ठलचरणा ॥ध्रु.॥

दुजेपण जालें वाव। त्रिभुवनासि नाहीं ठाव ॥२॥

तुका ह्मणे खरे पाहें । विठ्ठल पाहोनियां राहें ॥३॥

िस्त्रया धन बा हें खोटें । नागवले मोठे मोठे ॥१॥

ह्मणोनि सांडा दोनी । सुख पावाल निदानीं ॥ध्रु.॥

सर्वदुःखासी कारण । हीं च दोन्हीचीं प्रमाण ॥२॥

आशा सर्वस्वें सांडावी । तेणें निजपदवी पावावी ॥३॥

देह लोभें नाडला । घाला यमाचा पडला ॥४॥

तुका ह्मणे निरापेक्षा । कांहीं न धरावी अपेक्षा ॥५॥

जेंजें होआवें संकल्पें । तें चि पुण्य होय पाप ॥१॥

कारण तें मनापासीं । मेळविल्या मिळे रसीं ॥ध्रु.॥

सांडी मांडी हाली चाली । राहे तरि भली बोली ॥२॥

तुका ह्मणे सार । नांव जीवनाचे सागर ॥३॥

ओले मातीचा भरवसा । कां रे धरिशी मानसा ॥१॥

डोळे चिरीव चांगले । वृद्धपणीं सरवया जाले ॥ध्रु.॥

नाक सरळ चांगलें । येउन हनवटी लागलें ॥२॥

तुका ह्मणे आलें नाहीं । तंव हरिला भज रे कांहीं ॥३॥

तुह्मां सांगतों कलयुगा फळ । पुढें होइल ब्रह्मगोळ ॥१॥

आह्मां ह्मणतील कंटक । ऐसा पाडिती दंडक ॥ध्रु.॥

िस्त्रया पूजुनि सरे देती । भलते िस्त्रयेसि भलते जाती ॥२॥

श्रेष्ठ वर्ण वेदविद्वांस। अंगीकारी मद्यमांस ॥३॥

चारी वर्ण अठरा याती । कवळ करिती एक पंक्ती ॥४॥

ह्मणती अंबेचा क्रीडाकल्लोळ । शिवरूप प्राणी सकळ ॥५॥

ऐसें होइल शकुन देतों । अगोदर सांगुन जातों ॥६॥

तुका सद्गुरुदास्य करी । सिद्धि पाणी वाहे घरीं ॥७॥

त्या हरिदासांची भेटी घेतां । नर्का उभयतासी जातां ॥१॥

माते परीस थोरी कथा । भाड घेतां न लाजे ॥ध्रु.॥

देतां घेतां नरकवासी । उभयतांसी रवरव ॥२॥

तुका ह्मणे नरकगांवा । जाती हांवा धरोनि ॥३॥

देव गावा ध्यावा ऐसें जालें । परदेशी नाहीं उगलें ।

वडील आणि धाकुलें । नाहीं ऐसें जालें दुसरें तें ॥१॥

नाहीं लागत मुळीहूनि । सुहृदजन आणि जननी ।

लागल्या लागें त्यागें सांडूनि। लोभीये मांडणी संयोगाची ॥ध्रु.॥

शिव बाटला जीवदशे । बहुत ओतत आलें ठसें ।

हीन जालें भूषणाचें इच्छे । निवडती कैसे गुणागुण ॥२॥

आतां हे हुतांश तों बरें । अवघे एक च मोहरें ।

पिटिलियाविण नव्हे खरें । निवडें बरें जातिशुद्ध ॥३॥

तुका उतावेळ याजसाटीं । आहे तें निवेदीन पोटीं ।

आवडी द्यावी जी येथें लाटी । तुझी जगजेठी कीर्ती वाखाणीन ॥४॥

भोगी जाला त्याग । गीती गातां पांडुरंग । इंिद्रयांचा लाग । आह्मांवरूनि चुकला ॥१॥

करुनि ठेविलों निश्चळ । भय नाहीं तळमळ । घेतला सकळ । अवघा भार विठ्ठलें ॥ध्रु.॥

तळीं पिक्षणीचे परी । नखें चोंची चारा धरी । आणुनियां घरीं । मुखीं घाली बाळका ॥२॥

तुका ह्मणे ये आवडी । आह्मीं पांयीं दिली बुडी । आहे तेथें जोडी । जन्मांतरींचें ठेवणें ॥३॥

कुंकवाची ठेवाठेवी । बोडकादेवी काशाला ॥१॥

दिवस गमा भरा पोट । कां गे नेटनेटावा ॥ध्रु.॥

दिमाख हा कोणां दावा । लटकी जीवा चरफड ॥२॥

तुका ह्मणे झोंडगीं हो । काुंफ्दा कां हो कोरडी ॥३॥

तुझें प्रेम माझ्या हृदयीं आवडी । चरण न सोडीं पांडुरंगा ॥१॥

कासया सिनासि थोरिवां कारणें । काय तुझें उणें होइल देवा ॥ध्रु.॥

चातकाची चिंता हरली जळधरें । काय त्याचें सरे थोरपण ॥२॥

चंद्र चकोरांचा पुरवी सोहळा । काय त्याची कळा न्यून होय ॥३॥

तुका ह्मणे मज अनाथा सांभाळीं । हृदयकमळीं िस्थर राहें ॥४॥

आम्ही आइते जेवणार । न लगे सोसावे डोंगर । सुखाचा वेव्हार । तेणें चि वाढलें ॥१॥

ठेवा जोडला मिरासी । ठाव जाला पायांपासी । नव्हे आणिकांसी । रीघ तेथें यावया ॥ध्रु.॥

बळी दिला जीवभाव । नेणें आणिकांचे नांव । धरिला एक भाव । तो विश्वास फळला ॥२॥

तुका ह्मणे जालों बळी । आह्मी निकट जवळी । बोलिलों तें पाळीं । वचन स्वामी आमचें ॥३॥

न लगावी दिठी । माझी तुझे मुखवटी ॥१॥

आधीं पाउलें पाउलें । ते मी पाहेन तें भलें ॥ध्रु.॥

देईन हे काया । वरि सांडणें सांडाया ॥२॥

तुका ह्मणे देवा । बहु आवडसी जीवा ॥३॥

कोण आमचीं योगतपें । करूं बापें जाणावीं ॥१॥

गीत संतसंगें गाऊं । उभीं ठाऊं जागरणीं ॥ध्रु.॥

आमुचा तो नव्हे लाग । करूं त्याग जावया ॥२॥

तुका ह्मणे इंिद्रयांसी । ये चि रसीं रंगवूं ॥३॥

नाम तारक भवसिंधु । विठ्ठल तारक भवसिंधु ॥१॥

नामधारक तया अरि मित्रु । समता त्यागुनियां क्रोधु ॥ध्रु.॥

नामधारक तया । कदापि न घडे विषयाचा बाधु ॥२॥

ज्या नामें तरले शुकादिक । नारद संत मुनिजन साधु ॥३॥

जाणूनियां जे नसरें । ते नेणति जैसा गज अंधु ॥४॥

सहज तुकया । नाम चि जपतां स्वरुपीं वेधु ॥५॥

आह्मां वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा । विश्वास नामाचा एका भावें ॥१॥

तरी च हरिचेदास ह्मणवितां श्लाघीजे । निर्वासना कीजे चित्त आधी ॥ध्रु.॥

गाऊं नाचूं प्रेमें आनंदें कीर्तनीं । भुक्ति मुक्ति दोन्ही न मगों तुज ॥२॥

तुका ह्मणे देवा ऐसी यांची सेवा। द्यावी जी केशवा जन्मोजन्मीं ॥३॥

पावलों हा देह कागतालिन्यायें । न घडे उपायें घडों आलें ॥१॥

आतां माझीं खंडीं देह देहांतरें । अभय दातारें देऊनियां ॥ध्रु.॥

अंधऑयाचे पाठीं धनाची चरवी । अघटित तेंवि घडों आलें ॥२॥

तुका ह्मणे योग घडला बरवा । आतां कास देवा न सोडीं मी ॥३॥

कळे परि न सुटे गांठी । जालें पोटीं कुपथ्य ॥१॥

अहंकाराचें आंदणें जीव । राहे कींव केली ते ॥ध्रु.॥

हेंकडाची एकी च वोढी । ते ही खोडी सांगती ॥२॥

तुका ह्मणे सांगों किती । कांहीं चित्तीं न राहे ॥३॥

सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदें ॥१॥

ऐसे तंव तुह्मी नाहीं जी दिसत । कां हें अनुचित वदलेत ॥ध्रु.॥

फांटा जाला त्यासी नाहीं वोढा वारा । वेरसा चि खरा हाटो गुण ॥२॥

तुका ह्मणे नाहीं ज्याच्या बापा ताळा । तो देखे विटाळा संतां अंगीं ॥३॥

आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहातां लोचन सुखावलें ॥१॥

आतां दृष्टीपुढें ऐसा चि तूं राहीं । जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥ध्रु.॥

लाचावलें मन लागलीसे गोडी । तें जीवें न सोडीं ऐसें जालें ॥२॥

तुका ह्मणे आह्मी केली जे लडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ॥३॥

तिळ एक अर्ध राई । सीतबुंद पावे काई । तया सुखा नाहीं । अंतपार पाहतां ॥१॥

ह्मणउनी करा लाहो । नका मागें पुढें पाहों । अवघ्यामध्यें आहों । सावचित्त तों ॥ध्रु.॥

तीथॉ न येती तुळणी । आजिया सुखाची धणी । जे कासी गयेहुनी । जीं आगळीं असती ॥३॥

येथें धरी लाज । वर्ण अभिमान काज । नाडला सहज । तुका ह्मणे तो येथें ॥३॥

विठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य । त्या देखिल्या पतित उद्धरिलि ॥१॥

विठ्ठलविठ्ठल भावें ह्मणे वाचे । तरी तो काळाचे दांत ठेंसी ॥ध्रु.॥

बहुत तारिले सांगों किती आतां । ऐसा कोणी दाता दुजा नाहीं ॥२॥

तुका ह्मणे म्यां ही ऐकोनियां कीर्ती । धरिला एकांतीं हृदयामाजी ॥३॥

भोळे भक्तिभाव धरिती मानसीं । त्यासी हृषीकेशी जवळी च ॥१॥

भाव नाहीं मनीं अभाविक सदा । त्याचिया मी खेदा काय सांगों ॥ध्रु.॥

गणिकेसारिकीं नामें उद्धरीलीं । सज्ञानें पडिलीं खटाटोपीं ॥२॥

तुका ह्मणे काय शुद्ध माझी जाति । थोर केली ख्याती हरिनामें ॥३॥

आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी ॥१॥

दुर्जनाचे संगती । बहुतांचे घात होती ॥ध्रु.॥

एक पडे मासी । तरी ते बहु अन्न नासी ॥२॥

तुका ह्मणे रांड । ऐसी कां ते व्याली भांड ॥३॥

पंढरीचें बा भूत मोटें । आल्या गेल्या झडपी वाटे ॥१॥

तेथें जाऊं नका कोणी । गेले नाहीं आले परतोनि ॥२॥

तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाहीं आला ॥३॥

बरवे दुकानीं बैसावें । श्रवण मनन असावें ॥१॥

सारासाराचीं पोतीं । ग्राहिक पाहोनि करा रितीं ॥ध्रु.॥

उगे चि फुगों नका गाल । पूर्ण सांठवावा माल ॥२॥

सत्य तराजू पैं धरा । नका कुडत्रिम विकरा ॥३॥

तुका जाला वाणी । चुकवुनि चौ†यासीच्या खाणी ॥४॥

काय करूं आतां या मना । न संडी विषयांची वासना ।

प्रार्थितां ही राहेना । आदरें पतना नेऊं पाहे ॥१॥

आतां धांवधावें गा श्रीहरी । गेलों वांयां नाहीं तरी ।

न दिसे कोणी आवरी। आणीक दुजा तयासी ॥ध्रु.॥

न राहे एके ठायीं एकी घडी। चित्त तडतडा तोडी ।

घालूं पाहे बा हे उडी या भवडोहीं ॥२॥

आशा तृष्णा कल्पना पापिणी । घात मांडला माझा यांणीं ।

तुका ह्मणे चक्रपाणी । काय अजोनि पाहातोसी ॥३॥

पाषाण परिस भूमि जांबूनद । वंशाचा संबंध धातयाचा ॥१॥

सोनियाची पुरी समुद्राचा वेढा । समुदाय गाढा राक्षसांचा ॥ध्रु.॥

ऐसी सहस्र त्या सुंदरा कामिनी । माजी मुखरणी मंदोदरी ॥२॥

पुत्रपौत्राचा लेखा कोण करी । मुख्य पुत्र हरी इंद्रा आणी ॥३॥

चौदा चौकडिया आयुष्यगणना । बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण ॥४॥

तुका ह्मणे ज्याचे देव बांदवडी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥५॥

पापांचीं संचितें देहासी दंडण । तुज नारायणा बोल नाहीं ॥१॥

पेरी कडू जिरें मागे अमृतफळ । आर्का वृक्षफळें कैसीं येती ॥ध्रु.॥

सुख अथवा दुःख भोग हो देहेचा । नास हा ज्ञानाचा न करावा ॥२॥

तुका ह्मणे आतां देवा कां रुसावें । मनासी पुसावें काय केलें ॥३॥

लाभ पुढें करी । घात नारायण वारी ॥१॥

ऐसी भक्ताची माउली । करी कृपेची साउली ॥ध्रु.॥

माय बाळकासी । जीव भाव वेची तैसी ॥२॥

तुका ह्मणे नाड । नाहीं शरणागता आड ॥३॥

आपुलेंसें करुनी घ्यावें । आश्वासावें नाभींसें ॥१॥

ह्णउनि धरिले पाय । आवो माय विठ्ठले ॥ध्रु.॥

कळलासे सीन चिंता । शम आतां करावा ॥२॥

तुका ह्मणे जीवीं वसें । मज नसें वेगळे ॥३॥

तुजविणं कांहीं । िस्थर राहे ऐसें नाहीं ॥१॥

कळों आलें बहुता रीती । पांडुरंगा माझ्या चित्तीं ॥ध्रु.॥

मोकलिली आस। सर्वभावें जालों दास ॥२॥

तुका ह्मणे तूं चि खरा । येर वाउगा पसारा ॥३॥

खोंकरी आधन होय पाकसिद्धि । हें तों घडों कधीं शके चि ना ॥१॥

खापराचे अंगीं घासितां परिस । न पालटे कीस काढिलिया ॥२॥

पालथे घागरी रिचवितां जळ । तुका ह्मणे खळ तैसे कथे ॥३॥

नागलें देखोनि चांगलें बोले । आपुलें वेचूनि त्याजपुढें खुले ॥१॥

अधमाचे ओंगळ गुण । उचित नेणें तो धर्म कोण ॥ध्रु.॥

आर्तभूता न घली पाण्याचा चुळ । न मागे त्यासी घाली साखर गुळ ॥२॥

एकासी आड पडोनि होंकरी । एकासी देखोनि लपवी भाकरी ॥३॥

एकासी धड न बोले वाचा । एकासी ह्मणे मी तुझे बांदीचा ॥४॥

तुका ह्मणे ते गाढवपशु । लाभेंविण केला आयुष्यनाशु ॥५॥

पिंडपोशकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टिभेटी न हो त्याची ॥१॥

नाहीं संतचिन्ह उमटलें अंगीं । उपदेशालागीं पात्र जाला ॥ध्रु.॥

पोहों सिणलें नये कासे लावितो आणिका । ह्मणावें त्या मूर्खा काय आतां ॥२॥

सिणलें तें गेलें सिणलियापासीं । जाली त्या दोघांसी एक गति ॥३॥

तुका ह्मणे अहो देवा दिनानाथा। दरुषण आतां नको त्याचें ॥४॥

संतचिन्हें लेउनि अंगीं । भूषण मिरविती जगीं ॥१॥

पडिले दुःखाचे सागरीं । वहावले ते भवपुरीं ॥ध्रु.॥

कामक्रोधलोभ चित्तीं । वरिवरि दाविती विरक्ती ॥२॥

आशापाशीं बांधोनि चित्त । ह्मणती जालों आह्मी मुक्त ॥३॥

त्यांचे लागले संगती । जाली त्यांसी ते चि गति ॥४॥

तुका ह्मणे शब्दज्ञानें । जग नाडियेलें तेणें ॥५॥

दोष करूनि आह्मी पतित सिद्ध जालों । पावन मागों आलों ब्रीद तुझें ॥१॥

आतां पतिता तारावें कीं ब्रीद हें सोडावें । यांत जें पुरवे तें चि सांगा ॥ध्रु.॥

उद्धार तुमच्यानें नव्हे हो श्रीहरि। सोडा झडकरी ब्रीद आतां ॥२॥

तें ब्रीद घेउनी हिंडों दारोदारीं । सांगूं तुझी कीर्ती रे पांडुरंगा ॥३॥

देवें हारविलें ब्रीद हें सोडिलें । पतितें जिंकिलें आह्मीं देवा ॥४॥

तुका ह्मणे आह्मीं उठलों दैन्यवरि। विचारा श्रीहरी तुह्मी आतां ॥५॥

राम कृष्ण ऐसीं उच्चारितां नामें । नाचेन मी प्रेमें संतांपुढें ॥१॥

काय घडेल तें घडो ये सेवटीं । लाभ हाणी तुटी देव जाणे ॥ध्रु.॥

चिंता मोह आशा ठेवुनि निराळीं । देईन हा बळी जीव पायीं ॥२॥

तुका ह्मणे कांहीं उरों नेदीं उरी । सांडीन हे थोरी ओवाळोनी ॥३॥

देव धरी नाना सोंगें । नाम श्रेष्ठ पांडुरंग ॥१॥

तो हा गविळयाचे घरीं । नाम सारितो मुरारि ॥ध्रु.॥

धन्य यशोदेचें प्रारब्ध । नाचे अंगणीं गोविंद ॥२॥

ऐशा भक्तांसाटीं देवें । नाना धरियेलीं नांवें ॥३॥

होय दासांचा जो दास । तुका ह्मणे विठ्ठलास ॥४॥

आइत्या भाग्या धणी व्हावे । केनें घ्यावें न सरे तें ॥१॥

केणें आहे पंढरपुरीं । उधाराचें लाभीक ॥ध्रु.॥

बाखराची करुनी रीती । भरा पोतीं लवलाहीं ॥२॥

तुका ह्मणे संतांपाडें । करूं पुढें वाखती ॥३॥

जन्मोजन्मीं दास । व्हावें हे चि माझी आस ॥१॥

पंढरीचा वारकरी । वारी चुकों नेदीं हरी ॥ध्रु.॥

संतसमागम । अंगीं थिरावलें प्रेम ॥२॥

स्नान चंद्रभागे । तुका ह्मणे हें चि मागें ॥३॥

कां गा कोणी न ह्मणे पंढरीची आई । बोलावितें पाहीं चाल नेटें ॥१॥

तेव्हां माझ्या मना होइल समाधान । जाइल सर्व शीण जन्मांतरिंचा ॥२॥

तुका ह्मणे माझी होशील माउली । वोरसोनि घाली प्रेमपान्हा ॥३॥

वेद अनंत बोलिला । अर्थ इतका चि शोधिला ॥१॥

विठोबासी शरण जावें । निजनिष्ट नाम गावें ॥ध्रु.॥

सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतका चि निर्धार ॥२॥

अठरापुराणीं सिद्धांत । तुका ह्मणे हा चि हेत ॥३॥

मायेचा मारिला अंगीं नाहीं घाव । दुःखें तरी लव धडधडी ॥१॥

न लभे हा काळ न सुटे हातींचा । न बोलवे वाचा खोडावली ॥ध्रु.॥

न पवे धांवणें न पवे चि लाग । न चलती माग धरावया ॥२॥

भेणें तरि अंगा लावियेल्या राखा । परी त्यासी वाखा करीतसे ॥३॥

तुका ह्मणे नेदी हाका मारूं देवा । लोकापाठी हेवा लागलासे ॥४॥

धिग तो दुर्जन नाहीं भूतदया । व्यर्थ तया माया प्रसवली ॥१॥

कठिण हृदय तया चांडाळाचें । नेणे पराचें दुःख कांहीं ॥ध्रु.॥

आपुला का प्राण तैसे सकळ लोक । न करी विवेक पशु जैसा ॥२॥

तुका ह्मणे सुखें कापीतसे गळे । आपुलिया वेळे रडतसे ॥३॥

गरुडावरि बैसोनि येतो जगजेठी । त्याचे चरणीं मिठी घालूं चला ॥१॥

सांवळें रूपडें देखिलें लोचनीं । शंख चक्र दोन्ही शोभताहे ॥ध्रु.॥

पीतांबर झळके हे चि त्याची खूण । वाकी रुणझुण करिताती ॥२॥

गरुडाचा चपेटा असे नेटें । कस्तुरीमळवट शोभताहे ॥३॥

पदक एकावळी शोभताहे कंठीं । तुका ह्मणे मिठी घालूं चला ॥४॥

नाहीं पाक होत उफराटे चाली । बोलिली ते केली व्हावी नीत ॥१॥

नाहीं मानूं येत वांजटाचे बोल । कोरडे च फोल चवी नाहीं ॥ध्रु.॥

तरुवरा आधीं कोठें आहे फळ । चावटा बरळ ह्मणा त्यासी ॥२॥

तुका ह्मणे किती ठकलीं बापुडीं । गव्हा आहे गोडी मांडे पु†या ॥३॥

जाली हरिकथा रंग वोरसला । उचितासी आला पांडुरंग ॥१॥

वांटितो हें प्रेम उचिताचा दाता । घेइप रे तूं आतां धणीवरि ॥ध्रु.॥

प्रेम देऊनियां अवघीं सुखीं केलीं । जें होतीं रंगलीं विटलीं तीं ॥२॥

तुकें हें दुर्बळ देखियलें संतीं । ह्मणउनि पुढती आणियेलें ॥३॥

संकिल्पला तुज सकळ ही भाव । कोण एक ठाव उरला तेथें ॥१॥

इंिद्रयव्यापार जेंजें कांहीं कर्म । करितों ते धर्म सकळ तुझे ॥ध्रु.॥

माझें हित फार लागला विचार । तुज सर्व भार चालवणें ॥२॥

जो कांहीं लौकिक करिसी तो तुझा । अपमान पूजा कांहींतरि ॥३॥

तुका ह्मणे मी तों राहिलों नििंश्चत । तुज कळे हित तैसें करीं ॥४॥

भय नाहीं भेव । अनुतापीं नव्हतां जीव ॥१॥

जेथें देवाची तळमळ । तेथें काशाचा विटाळ ॥ध्रु.॥

उच्चारितां दोष । नाहीं उरों देत लेश ॥२॥

तुका ह्मणे चित्त । होय आवडी मिश्रित ॥३॥

ध्यानीं ध्यातां पंढरिराया । मनासहित पालटे काया ॥१॥

तेथें बोला कैची उरी । माझें मीपण जाला हरि ॥ध्रु.॥

चित्तचैतन्यीं पडतां मिठी । दिसे हरिरूप अवघी सृष्टि ॥२॥

तुका ह्मणे सांगों काय । एकाएकीं हरिवृत्तिमय ॥३॥

कोणा ही केंडावें हा आह्मां अधर्म । जोजो पावे श्रम तोतो देव ॥१॥

ह्मणउनि चित्ता सिकविलें वोजें । आतां हें चि दुजें न बोलावें ॥ध्रु.॥

हालविलें जरि परउपकारें । जिव्हे पाप खरें उपाधीचें ॥२॥

तुका ह्मणे जीव प्रारब्धा आधीन । कोण वाहे सीण करुणा शोभे ॥३॥

देव तिळीं आला । गोडगोड जीव धाला ॥१॥

साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥

पापपुण्य गेलें । एका स्नानें चि खुंटलें ॥२॥

तुका ह्मणे वाणी । शुद्ध जनार्दनीं जनीं ॥३॥

काय उणें मज पांडुरंगा पायीं । रिद्धिसिद्धि ठायीं वोळगती ॥१॥

कोण पाहे सुखा नासिवंताकडे । तृष्णेचें बापुडें नहों आह्मी ॥ध्रु.॥

स्वर्गसुखें आह्मीं केलीं पावटणी । पापपुण्यें दोन्ही उलंडिलीं ॥२॥

तुका ह्मणे घरीं आणिलें वैकुंठ । वसविली पेठ वैष्णवांची ॥३॥

माझें मागणें तें किती । दाता लक्ष्मीचा पति ॥१॥

तान्हेल्यानें पीतां पाणी । तेणें गंगा नव्हे उणी ॥ध्रु.॥

कल्पतरु जाला देता । तेथें पोटाचा मागता ॥२॥

तुका ह्मणे संतां ध्यातां । परब्रह्म आलें हाता ॥३॥

अर्भकाचे साटीं । पंतें हातीं धरिली पाटी ॥१॥

तैसे संत जगीं । क्रिया करुनी दाविती अंगीं ॥ध्रु.॥

बालकाचे चाली । माता जाणुनि पाउल घाली ॥२॥

तुका ह्मणे नाव । जनासाटीं उदकीं ठाव ॥३॥

जन्मोजन्मींची संगत । भेटी जाली अकस्मात ॥१॥

आतां सोडितां सुटेना । तंतु प्रीतीचा तुटेना ॥ध्रु.॥

माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडिली पंढरिराया ॥२॥

तुका ह्मणे अंतीं । तुझी माझी एक गति ॥३॥

सांग पांडुरंगा मज हा उपाव । जेणें तुझे पाव आतुडति ॥१॥

न कळे हा निर्धार ब्रह्मादिकां पार । कायसा विचार माझा तेथें ॥२॥

तुका ह्मणे आतां धरुनियां धीर । राहूं कोठवर मायबापा ॥३॥

काय फार जरी जालों मी शाहाणा । तरी नारायणा नातुडसी ॥१॥

काय जालें जरी मानी मज मन । परि नातुडति चरण तुझे देवा ॥ध्रु.॥

काय जालें जरी जालों उदासीन । परि वर्म भिन्न तुझें देवा ॥२॥

काय जालें जरी केले म्यां सायास । ह्मणवितों दास भक्त तुझा ॥३॥

तुका ह्मणे तुज दाविल्यावांचून । तुझें वर्म कोण जाणे देवा ॥४॥

जातां पंढरीच्या मागॉ । काय वणूप सुखा मग ॥१॥

घडे लाभ लक्षकोटि । परब्रह्मीं होइल भेटी ॥ध्रु.॥

नाम गर्जत येती संत । त्यांच्या दर्शनें होईजे मुक्त ॥२॥

जो अलक्ष्य ब्रह्मादिकां । आला संनिध ह्मणे तुका ॥३॥

सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठीं विठोबाचें ॥१॥

तयाच्या चिंतनें निरसलें संकट । तरलों दुर्घट भवसिंधु ॥ध्रु.॥

जन्मोनियां कुळीं वाचे स्मरे राम । धरी हा चि नेम अहिर्निशीं ॥२॥

तुका ह्मणे कोटी कुळें तीं पुनीत । भावें गातां गीत विठोबाचे ॥३॥

मोल घेऊनियां कथा जरी करीं । तरी भंगो हरी देह माझा ॥१॥

माझी कथा करा ऐसें ह्मणें कोणा । तरी झडो जाणा जिव्हा माझी ॥ध्रु.॥

साह्य तूं जालासी काय उणें तुपें । आणीक भूतांपें काय मागों ॥२॥

तुका ह्मणे सर्व सिद्धि तुझे पायीं । तूं माझा गोसावी पांडुरंगा ॥३॥

जरि हा हो कृपा करिल नारायण । तरी हें चि ज्ञान ब्रह्म होय ॥१॥

कोठोनियां कांहीं न लगे आणावें । न लगे कोठें जावें तरावया ॥ध्रु.॥

जरी देव कांहीं धरिल पैं चित्तीं । तरि हे चि होती दिव्य चक्षु ॥२॥

तुका ह्मणे देव दावील आपणा । तरि जीवपणा ठाव नाहीं ॥३॥

पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरिसील सत्ता सकळ ही ॥१॥

कां जी आह्मांवरी आणिकांची सत्ता । तुह्मासी असतां जविळक ॥२॥

तुका ह्मणे पायीं केलें निवेदन । उचित हें दान करीं आतां ॥३॥

रात्री दिवस आह्मां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥१॥

जीवा ही आगोज पडती आघात । येऊनियां नित्य नित्य करी ॥२॥

तुका ह्मणे तुझ्या नामाचिया बळें । अवघीयांचें काळें केलें तोंड ॥३॥

होइन खडे गोटे । चरणरज साने मोठे । पंढरीचे वाटे । संतचरणीं लागेन ॥१॥

आणीक काय दुजें । म्या मागणें तुजपासीं । अविट तें सुख । भय नास नाहीं ज्यासी ॥ध्रु.॥

होइन मोचे वाहणा । पायीं सकळां संतजनां । मांजर सुकर सुणा । जवळी शेष घ्यावया ॥२॥

सांडोवा पायरी । वाहळ बावी गंगातिरी । होइन तयावरी । संतसज्जन चालती ॥३॥

लागें संतां पांयीं । ऐसा ठेवीं भलता ठायीं । तुका ह्मणे देइप । धाक नाहीं जन्माचा ॥४॥

माझिया जीवाचा मज निरधार । न करीं उत्तर जनासवें ॥१॥

आपुलें कारण साधों जी विचार । करावा हा धीर धरूनियां ॥ध्रु.॥

काय कराविया आणिका या युक्ति । काय नव्हे भक्ति विठोबाची ॥२॥

एक पुढें गेले वाट दावूनियां । मारग तो वांयां कोण सांडी ॥३॥

तुका ह्मणे माझी विठोबासी चिंता । भेईना सर्वथा न घडे तें ॥४॥

कासया व्हावें जीतांचि मुक्त । सांडुनियां थीतें प्रेमसुख ॥१॥

वैष्णवांचा दास जाला नारायण । काय त्या मिळोन असे काम ॥ध्रु.॥

काय त्या गांठीचें पडलें सुटोन । उगला चि बैसोन धीरु धरीं ॥२॥

सुख आह्मांसाटीं केलें हें निर्माण । निद।व तो कोण हाणे लाता ॥३॥

तुका ह्मणे मज न लगे सायोज्यता । राहेन या संतां समागमें ॥४॥

आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पांडुरंग ॥१॥

कामधेनु कल्पतरु चिंतामणी । आवडीची धणी पुरवीती ॥२॥

तुका ह्मणे जीवा थोर जालें सुख । नाठवे हे भूक तान कांहीं ॥३॥

लाडें भाकितों करुणा । तूं रे उदाराचा राणा ॥१॥

करिसी आमुचा सांभाळ । तूं रे माउली स्नेहाळ ॥ध्रु.॥

नाहीं चिंता रे आह्मांसी । तूं चि भार चालविसी ॥२॥

आह्मी जालों उदासीन । तूं चि करिसी जतन ॥३॥

आह्मां नाहीं जीवनास । तूं चि पुरविसी घास ॥४॥

तुका ह्मणे भलते सवें । जातां मागें मागें धांवे ॥५॥

आह्मां हें सकळ । तुझ्या पायांचें चि बळ ॥१॥

करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥

जयाचा जो भोग। सुख दुःख पीडा रोग ॥२॥

तुका ह्मणे देवा । तुझे पायीं माझा ठेवा ॥३॥

प्रपंच परमार्थ संपादोनि दोन्ही । एक ही निदानीं न घडे त्यासी ॥१॥

दोहीं पेंवावरी ठेवूं जातां हात । शेवटीं अपघात शरीराचा ॥२॥

तुका ह्मणे तया दोहींकडे धका । शेवटीं तो नरकामाजी पडे ॥३॥

संसारा आलिया एक सुख आहे । आठवावे पाय विठोबाचे ॥१॥

येणें होय सर्व संसार सुखाचा । न लगे दुःखाचा लेश कांहीं ॥ध्रु.॥

घेईल तयासी सोपें आहे सुख । बोलियेलें मुखें नारायण ॥२॥

सांगितली सोय करुणासागरें । तुह्मां कांहो बरें न वाटतें ॥३॥

तुका ह्मणे तेणें उपकार केला । भोऑया भाविकाला तरावया ॥४॥

आह्मां भय धाक कोणाचा रे पाहें । काळ मशक काय मानव हे ॥१॥

आह्मांसी ते काय चिंता या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥ध्रु.॥

काय करावी हे कोणाची मान्यता । करितां अनंता कोण वारी ॥२॥

नाहीं शीण आह्मां जालें कवतुक । पुनीत हे लोक करावया ॥३॥

तुका ह्मणे खातों आनंदाचे लाडू । नका चरफडूं घ्या रे तुह्मी ॥४॥

तांबगी हें नाणें न चले ख†या मोलें । जरी हिंडविलें देशोदेशीं ॥१॥

करणीचें कांहीं न मने सज्जना । यावें लागे मना वृद्धांचिया ॥ध्रु.॥

हिरयासारिका दिसे शिरगोळा । पारखी ते डोळां न पाहाती ॥२॥

देऊनियां भिंग कामाविलें मोतीं । पारखिया हातीं घेतां नये ॥३॥

तुका ह्मणे काय नटोनियां व्यर्थ । आपुलें हें चित्त आपणा ग्वाही ॥४॥

चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभवितां दूर तों चि भलें ॥१॥

ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥ध्रु.॥

हो कां पिता पुत्र बंधु कोणी तेही । विजाति संग्रहीं धरूं नये ॥२॥

तुका ह्मणे सत्य पाळावें वचन । अन्यथा आपण करूं नये ॥३॥

आपुली कसोटी शुद्ध राखी कारण । आगीनें भूषण अधिक पुट ॥१॥

नाहीं कोणासवें बोलणें लागत । नििंश्चतीनें चित्तसमाधान ॥ध्रु.॥

लपविलें तें ही ढेंकरें उमटे । खोटियाचें खोटें उर फोडी ॥२॥

तुका ह्मणे निंदा स्तुति दोन्ही वाव । आपुलाला भाव फळा येतो ॥३॥

आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदुःख दोष अंगीं लागे ॥१॥

ऐसें मनीं वाहूं नयेती संकल्प । करूं नये पाप भांडवल ॥ध्रु.॥

क्लेशाची चित्तीं राहाते कांचणी । अग्नींत टाकोनी ठाव जाळी ॥२॥

तुका ह्मणे येणें घडे पुण्यक्षय । होणार तें होय प्रारब्धें चि ॥३॥

अज्ञानाची भक्ति इिच्छती संपत्ती । तयाचिये मती बोध कैंचा ॥१॥

अज्ञानाची पूजा कामिक भावना । तयाचिया ध्याना देव कैंचा ॥ध्रु.॥

अज्ञानाचें कर्म फळीं ठेवी मन । निष्काम साधन तया कैंचें ॥२॥

अज्ञानाचें ज्ञान विषयावरी ध्यान । ब्रह्म सनातन तया कैंचें ॥३॥

तुका ह्मणे जळो ऐसियांचे तोंड । अज्ञानाचें बंड वाढविती ॥४॥

गुळें माखोनियां दगड ठेविला । वर दिसे भला लोकाचारी ॥१॥

अंतरीं विषयाचें लागलें पैं पिसें । बाहिरल्या वेषें भुलवी लोकां ॥ध्रु.॥

ऐसिया डांभिकां कैची हरिसेवा । नेणे चि सद्भावा कोणे काळीं ॥२॥

तुका ह्मणे येणें कैसा होय संत । विटाळलें चित्त कामक्रोधें ॥३॥

आयुष्य वेचूनि कुटुंब पोसिलें । काय हित केलें सांग बापा ॥१॥

फुकाचा चाकर जालासी काबाडी । नाहीं सुख घडी भोगावया ॥ध्रु.॥

दुर्लभ मनुष्यजन्म कष्टें पावलासी । दिला कुटुंबासी कामभोग ॥२॥

तुका ह्मणे ऐसें आयुष्य नासिलें । पाप तें सांचिलें पतनासी ॥३॥

अनंत लक्षणें वाणितां अपार । संताचें तें घर सांपडेना ॥१॥

जये घरीं संत राहती आपण । तें तुह्मां ठिकाण आतुडेना ॥ध्रु.॥

ठिकाण धरूनी पाहवे ते संत । उगा च अकांत करूं नये ॥२॥

संत होऊनियां संतांसी पाहावें । तरि च तरावें तुका ह्मणे ॥३॥

संतांचा पढीयावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे ॥१॥

हे चि थोर चिंता लागली मनासी । निजतां निद्रेसी न लगे डोळा ॥ध्रु.॥

जेवितां जेवणीं न लगे गोड धड । वाटतें काबाड विषयसुख ॥२॥

ऐसिया संकटीं पाव कृपानिधी । लावीं संतपदीं प्रेमभावें ॥३॥

तुका ह्मणे आह्मीं नेणों कांहीं हित । तुजविण अनाथ पांडुरंगा ॥४॥

पंढरीचा वास धन्य ते चि प्राणी । अमृताची वाणी दिव्य देहो ॥१॥

मूढ मतिहीन दुष्ट अविचारी । ते होती पंढरी दयारूप ॥ध्रु.॥

शांति क्षमा अंगीं विरक्ति सकळ । नैराश्य निर्मळ नारी नर ॥२॥

तुका ह्मणे नाहीं वर्णा अभिमान । अवघे जीवनमुक्त लोक ॥३॥

देखीचें तें ज्ञान करावें तें काई । अनुभव नाहीं आपणासी ॥१॥

इंिद्रयांचे गोडी ठकलीं बहुतें । सोडितां मागुतें आवरेना ॥ध्रु.॥

युक्तीचा आहार नीतीचा वेव्हार । वैराग्य तें सार तरावया ॥२॥

नाव रेवाळितां घाला घाली वारा । तैसा तो पसारा अहंतेचा ॥३॥

तुका ह्मणे बुद्धि आपुले अधीन । करी नारायण आतुडे तों ॥४॥

नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥१॥

न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥ध्रु.॥

असावें म्यां सदा विषयीं विरक्त । काया वाचा चित्त तुझे पायीं ॥२॥

करोनियां साह्य पुरवीं मनोरथ । व्हावें कृपावंत तुका ह्मणे ॥३॥

आपुल्या पोटासाटीं । करी लोकांचिया गोष्टी ॥१॥

जेणें घातलें संसारीं । विसरला तो चि हरी ॥ध्रु.॥

पोटा घातलें अन्न । न ह्मणे पतितपावन ॥२॥

मी कोठील आणि कोण । हें न कळे ज्यालागून ॥३॥

तुका ह्मणे नरस्तुति । करितो भाट त्रिजगतीं ॥४॥

स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥१॥

सेकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें ॥ध्रु.॥

सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं ज्ञानपणाची मस्ती ॥२॥

तुका ह्मणे गाढव लेखा। जेथें भेटेल तेथें ठोका ॥३॥

जगीं कीर्ति व्हावी । ह्मणोनी जालासी गोसावी ॥१॥

बहुत केलें पाठांतर । वर्म राहिलेंसे दूर ॥ध्रु.॥

चित्तीं नाहीं अनुताप। लटिकें भगवें स्वरूप ॥२॥

तुका ह्मणे सिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा ॥३॥

प्राक्तनाच्या योगें आळशावरी गंगा । स्नान काय जगा करूं नये ॥१॥

उभी कामधेनु मागिलें अंगणीं । तिसी काय ब्राह्मणीं वंदूं नये ॥ध्रु.॥

कोढियाचे हातें परिसें होय सोनें । अपवित्र ह्मणोन घेऊं नये ॥२॥

यातिहीन जाला गांवींचा मोकासी । त्याच्या वचनासी मानूं नये ॥३॥

भावारूढ तुका मुद्रा विठोबाची । न मनी तयांचीं तोंडें काळीं ॥४॥

बोलिलों उत्कषॉ । प्रेमरस दाशत्वें ॥१॥

साच करिता नारायण । जया शरण गेलों तो ॥ध्रु.॥

समर्थ तो आहे ऐसा । धरिली इच्छा पुरवी ॥२॥

तुका ह्मणे लडिवाळाचें । द्यावें साचें करूनियां ॥३॥

विचा केला ठोबा । ह्मणोनि नांव तो विठोबा ॥१॥

कां रे नेणां त्याचें नांव । काय वेदासि नाहीं ठाव ॥ध्रु.॥

शेष स्तुती प्रवर्तला । जिव्हा चिरूनि पलंग जाला ॥२॥

तुका ह्मणे सत्ता । ज्याची काळाचिये माथा ॥३॥

भ्रतारअंगसंगें सुखाची वेवस्था । आधीं तों सांगतां नये कोणा ॥१॥

तथापि सांगणें कुमारिकेपाशीं । ते काय मानसीं सुख मानी ॥ध्रु.॥

तैसा आत्मबोध आधीं बोलों नये । बोलासी तो काय सांपडेल ॥२॥

तथापि सांगणें बहिर्मुखापाशीं । तो काय संतोषासी मूळ होय ॥३॥

तुका ह्मणे संत सुखाचे विभागी । ब्रह्मानंद जगीं साधुरूपें ॥४॥

कलयुगामाजी थोर जालें बंड । नष्ट लोक लंड जाले फार ॥१॥

न धरिती सोय न पुसती कोणा । येतें जैसें मना तैसें चाले ॥ध्रु.॥

सज्जनाचा वारा टेकों नेदी द्वारा । ऐसिया पामरा तारी कोण ॥२॥

विश्वास तयाचा बैसेना कोठें ही । स्तुति निंदा पाहीं जीवीं धरी ॥३॥

तुका ह्मणे कैसें केलें नारायणें । जाणावें हें कोणें तयाविण ॥४॥

आपुली बुटबुट घ्यावी । माझी परताप द्यावी ॥१॥

आपुला मंत्र नव्हे बरा । माझा बईल चुकला मोरा ॥२॥

तुका ह्मणे ऐशा नरा । परिस न झोंबे खापरा ॥३॥

भावभक्तिवादें करावें कीर्तन । आशाबधी मन करूं नये ॥१॥

अन्न पाणी धन द्रव्य नारायण । विठ्ठला वांचून बोलूं नये ॥ध्रु.॥

सप्रेम करावें देवाचें कीर्तन । भय द्या सोडून शरीराचें ॥२॥

तरी मग जोडे विठ्ठलनिधान । केलिया कीर्तन सिद्धि पावे ॥३॥

देव जोडिलिया तया काय उणें । तुका ह्मणे मन धीट करा ॥४॥

चोरासी चांदणें वेश्येसी सेजार । परिसेंसी खापर काय होय ॥१॥

दुधाचे आधणीं वैरिले पाषाण । कदा काळीं जाण पाकनव्हे ॥२॥

तुका ह्मणे जरि पूर्वपुण्यें सिद्धि । तरि च राहे बुद्धि संतसंगीं ॥३॥

रोगिया मिष्टान्न मर्कटा चंदन । कागासी लेपन कर्पूराचें ॥१॥

निर्नासिका जैसा नावडे आरिसा । मूर्खालागीं तैसा शास्त्रबोध ॥ध्रु.॥

दास तुका ह्मणे विठ्ठलउदारें । अज्ञानअंधारें दूरी केलें ॥२॥

मथनासाटीं धर्माधर्म । त्याचें वर्म नवनीत ॥१॥

तें चि तें घाटूं नये । आलें जाय नासूनि ॥ध्रु.॥

सांभाळावें वरावर । वर्म दूर न वजावें ॥२॥

तुका ह्मणे घालें पोट । मग बोटचांचणी ॥३॥

माझा घात पात अथवा हित फार । अवघा विचार तुझ्या हातीं ॥१॥

ठेवुनि जीव भाव तुझ्या ठायीं चित्त । राहिलों निवांत पांडुरंगा ॥ध्रु.॥

चित्ताचा चाळक बुद्धीचा जनिता । काय नाहीं सत्ता तुझे हातीं ॥२॥

तुका ह्मणे काय करिसी तें पाहीन । ठेविसी राहीन सुखें तेथें ॥३॥

संतपाउलें साजिरीं । गंगा आली आह्मांवरी ॥१॥

जेथें पडे रजधुळी । तेथें करावी अंघोळी ॥ध्रु.॥

स्वेतबंद वाराणसी। अवघीं तीथॉ तयापासीं ॥२॥

तुका ह्मणे धन्य जालों । संतसागरीं मिळालों ॥३॥

न घडे मायबापें बाळकाचा घात । आपणादेखत होऊं नेदी ॥१॥

कां मी मनीं चिंता वाहूं भय धाक । काय नव्हे एक करितां तुज ॥ध्रु.॥

वर्म जाणे त्याच्या हिताचे उपाय । तान भूक वाहे कडिये खांदीं ॥२॥

तुका ह्मणे तूं गा कृपावंत भारी । ऐसें मज हरी कळों आलें ॥३॥

करावें कीर्तन । मुखीं गावे हरिचे गुण ॥१॥

मग कांहीं नव्हे बाधा । काम दुर्जनाच्या क्रोधा ॥ध्रु.॥

शांतिखड्ग हातीं। काळासी ते नागविती ॥२॥

तुका ह्मणे दाता सखा । ऐसा अनंतासारिखा ॥३॥

तुझी कीर्ती सांगों तुजपुढें जरी । ब्रह्मांडीं ही हरी माईना ते ॥१॥

मेरूची लेखणी सागराची शाई । कागद हा मही न पुरे चि ॥ध्रु.॥

अनंत अपार आपंगिले भक्त । माझें चि संचित ओडवेना ॥२॥

तुका ह्मणे तुह्मां बोल नाहीं देवा । पामरें म्यां सेवा केली नाहीं ॥३॥

काय साधनाच्या कोटी । केल्या आटी होती त्या ॥१॥

देव कृपा करी जरी । होय उजरी स्वरूपीं ॥ध्रु.॥

केले होते चिंता श्रम । उपरम न होतां ॥२॥

तुका ह्मणे कळों आलें । सर्व जालें आपरूप ॥३॥

तुज काय करूं मज एक सार । अमृतसागर नाम तुझें ॥१॥

काय येणें उणें आह्मां तयापोटीं । गोवितां हे कंठीं कामधेनु ॥ध्रु.॥

नोळखे तानुलें माय ऐसी कोण । वोरसे देखून शोक त्याचा ॥२॥

जो नाहीं देखिला याचक नयनीं । तो पावे घेउनि लज्जा दान ॥३॥

नामासाटीं प्राण सांडियेला रणीं । शूर ते भांडणीं न फिरती ॥४॥

तुका ह्मणे आह्मी गातां गीतीं भला । भेटूनी विठ्ठला काय चाड ॥५॥

कृपेचे सागर हे साधुजन । तिंहीं कृपादान केलें मज ॥१॥

बोबडे वाणीचा केला अंगीकार । तेणें माझा िस्थर केला जीव ॥ध्रु.॥

तेणें सुखें मन िस्थर जालें ठायीं । संतीं दिला पायीं ठाव मज ॥२॥

नाभी नाभी ऐसें बोलिलों वचन । तें माझें कल्याण सर्वस्व ही ॥३॥

तुका ह्मणे जालों आनंदनिर्भर । नाम निरंतर घोष करूं ॥४॥

भक्तीचें वर्म जयाचिये हातीं । तया घरी शांति दया ॥१॥

अष्टमासिद्धि वोळगती द्वारीं । न वजती दुरी दवडितां ॥ध्रु.॥

तेथें दुष्ट गुण न मिळे निशेष । चैतन्याचा वास जयामाजी ॥२॥

संतुष्ट चित्त सदा सर्वकाळ । तुटली हळहळ त्रिगुणाची ॥३॥

तुका ह्मणे येथें काय तो संदेह । आमचें गौरव आह्मी करूं ॥४॥

साच हा विठ्ठल साच हें करणें । संत जें वचनें बोलियेले ॥१॥

साच तें स्वहित साच ते प्रचित । साच वेद नीत सांगतील ॥२॥

तुका ह्मणे घेती साच साच भावें । लटिकें वर्म ठावें नाहीं त्यांसी ॥३॥

संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥१॥

याचि दुःखें या जनाचा कांटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥ध्रु.॥

एकविध भाव राहावया ठाव । नेदी हा संदेह राहों चित्तीं ॥२॥

शब्दज्ञानी हित नेणती आपुलें । आणीक देखिलें नावडे त्या ॥३॥

तुका ह्मणे आतां एकलें चि भलें । बैसोनि उगलें राहावें तें ॥४॥

तुझें वर्म आह्मां कळों आलें सुखें । संतांचिया मुखें पांडुरंगा ॥१॥

अवघा चि नट वाउगा पसारा । चेईला तूं खरा तूं चि एक ॥ध्रु.॥

ह्मणउनि देहबुद्धि नासिवंता । नातळे या चित्ता नेदावया ॥२॥

सोय हे लागली पुढिलांची वाट । पावले जे नीट तुजपाशीं ॥३॥

तुका ह्मणे नाहीं कोणासवें काज । बोलायाचें मज अंतरींचें ॥४॥

पुण्यपापा ठाव नाहीं सुखदुःखा । हानिलाभशंका नासलिया ॥१॥

जिंता मरण आलें आप पर गेलें । मूळ छेदियेलें संसाराचें ॥ध्रु.॥

अधिकार जाती वर्णधर्मयाती । ठाव नाहीं सत्यअसत्याशी ॥२॥

जन वन भिन्न आचेत चळण । नाहीं दुजेपण ठाव यासी ॥३॥

तुका ह्मणें देह वाईलें विठ्ठलीं । तेव्हां च घडली सर्व पूजा ॥४॥

संकोचतो जीव महत्त्वाच्या भारें । दासत्व चि बरें बहु वाटे ॥१॥

कळावी जी माझी आवडी हे संतां । देणें तरि आतां हें चि द्यावें ॥ध्रु.॥

तुमचे चरण पावविलों सेवा । ह्मणउनि हेवा हा चि करीं ॥२॥

विनउनी तुका वंदितो चरण । लेखा रजरेण चरणींचें ॥३॥

देव कैंचा तया दुरी । भाका बरी करुणा ॥१॥

आळवित्या न लगे धर । माय जाणे रे भातुकें ॥ध्रु.॥

नावे तरी ज्याचा भार । पैल पार जवळी त्या ॥२॥

आतां परदेशी तुका । जाला लोकांवेगळा ॥३॥

भक्ति ज्याची थोडी । पूर्ण विषयांची गोडी ॥१॥

तो नर चि नव्हे पाहीं । खर जाणावा तो देहीं ॥ध्रु.॥

भजन पूजन ही नेणे । काय स्वरूपासी जाणे ॥२॥

तुका ह्मणे त्याला । भोवंडून बाहेर घाला ॥३॥

समुद्र हा पिता बंधु हा चंद्रमा । भगिनी ते रमा शंखाची या ॥१॥

मेहुणा जयाचा द्वारकेचा हरि । शंख दारोदारीं भीक मागे ॥२॥

दुष्ट हें जाणावें आपुलें स्वहित । तुका ह्मणे मात ऐसी आहे ॥३॥

भवाचिया संगें बहु च नाडिले । किळकाळें पाडिले तोंडघसीं ॥१॥

तया भवसंगें गुंतलासी वांयां । धन पुत्र जाया भुलों नको ॥ध्रु.॥

जेजे घडी जाय तेते काळ खाय । प्राण्या तरणोपाय काय केला ॥२॥

तुका ह्मणे करीं सर्व ही तूं त्याग । अपाअ हें सर्वांग जगदीशीं ॥३॥

रुचे सकळा मिष्टान्न । रोग्या विखाच्या समान ॥१॥

तरि कां तया एकासाटीं । काम अवघें करणें खोटीं ॥ध्रु.॥

दर्पण नावडे एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥२॥

तुका ह्मणे खळा । उपदेशाचा कांटाळा ॥३॥

जागा घरटी फिरे तस्कराची दिवसाराती । नीदसुरें नाडिलीं असो मागों किती ॥१॥

हाट करी सकळ जन । वस्तु करा रे जतन ॥ध्रु.॥

हुशार ठायीं । निजनिजेलिया पाहीं ॥२॥

सावचित्त असे खरा । लाभ घेउन जाये घरा ॥३॥

तराळ राळ बोंबें उतराई। राखा आपुलिया भाई ॥४॥

हरिच्या नामीं घालूं जागा । तुका ह्मणे हुशार गा ॥५॥

संतांनीं सरता केलों तैसेपरी । चंदनीं ते बोरी व्यापियेली ॥१॥

गुण दोष याती न विचारितां कांहीं । ठाव दिला पायीं आपुलिया ॥२॥

तुका ह्मणे आलें समर्थाच्या मना । तरि होय राणा रंक त्याचा ॥३॥

चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान । अखंड मुखीं नाम वर्णावे गुण ॥१॥

हें चि एक तुह्मां देवा मागणें दातारा । उचित तें करा माझा भाव जाणूनि ॥ध्रु.॥

खुंटली जाणींव माझें बोलणें आतां । करूं यावी तैसी करावी बाळकाची चिंता ॥२॥

तुका ह्मणे आतां नको देऊं अंतर । न कळे पुढें काय बोलों विचार ॥३॥

संतांच्या पादुका घेईन मोचे खांदीं । हातीं टाळ दिंडी नाचेन पुढें ॥१॥

भजनविधी नेणें साधन उपाय । सकळ सिद्धि पाय हरिदासांचे ॥ध्रु.॥

ध्यानगति मति आसन समाधि । हरिनाम गोविंदीं प्रेमसुख ॥२॥

नेणता निर्लज्ज नेणें नादभेद । सुखें हा गोविंद गाऊं गीतीं ॥३॥

सर्व जोडी मज गोत आणि वित्त । तुका ह्मणे संतमहंतपाय ॥४॥

हरिजनीं प्राण विकली हे काया । अंकिला मी तया घरीं जालों ॥१॥

ह्मणियें सत्वर करीन सांगतां । घेईन मी देतां शेष त्यांचें ॥ध्रु.॥

आस करूनियां राहेन अंगणीं । उचिष्टाची धणी घ्यावयासी ॥२॥

चालतां ते मागाअ चरणीचे रज । उडती सहज घेइन आतां ॥३॥

दुरि त्यांपासूनि न वजें दवडितां । तुका ह्मणे लाता घेइन अंगीं ॥४॥

पुण्य फळलें बहुतां दिवसां । भाग्यउदयाचा ठसा । जाला सन्मुख तो कैसा । संतचरण पावलों ॥१॥

आजि फिटलें माझें कोडें । भवदुःखाचें सांकडें । कोंदाटलें पुढें । ब्रह्म सावळें ॥ध्रु.॥

आलिंगणें संतांचिया । दिव्य जाली माझी काया । मस्तक पाया । वरी त्यांच्या ठेवितां ॥२॥

तुका ह्मणे धन्य झालों । सुखें संतांचिया धालों । लोटांगणीं आलों । पुढें भार देखोनी ॥३॥

ठाव देऊनिया राखें पायापासीं । मी तों आहें रासी पातकाची ॥१॥

पातकाची रासी ह्मणतां लागे वेळ । ऐके तो कृपाळ नारायण ॥ध्रु.॥

नारायणनामें अवघें सांग जालें । असंग चि केलें एकमय ॥२॥

एकमय जालें विठोबाच्या नामें । भेदाभेद कर्म आणिक कांहीं ॥३॥

तुका ह्मणे चित्तीं चिंतिलें जें होतें । तें होय आपैतें नामें याच्या ॥४॥

आतां आह्मां भय नाहीं बा कोणाचें । बळ विठोबाचें जालें असे ॥१॥

धीर दिला आह्मां येणें पांडुरंगें । न पांगों या पांगें संसाराच्या ॥२॥

तुका ह्मणे माझा कैवारी हा देव । नाहीं भय भेव त्याच्या संगें ॥३॥

भक्ति आह्मी केली सांडुनी उद्वेग । पावलों हें सांग सुख याचें ॥१॥

सुख आह्मां जालें धरितां यांचा संग । पळाले उद्वेग सांडूनिया ॥२॥

तुका ह्मणे सुख बहु जालें जिवा । घडली या सेवा विठोबाची ॥३॥

शास्त्रज्ञा हो ज्ञाते असती बहुत । परि नाहीं चित्त हाता आलें ॥१॥

क्षणा एका साटीं न धरवे धीर । तेणें हा रघुवीर अंतरतो ॥ध्रु.॥

तोळाभर सोनें रतिभार राई । मेळविल्या पाहीं नास होतो ॥२॥

हरीचे अंकित असती विरळागत । तयांसी अच्युत कृपा करी ॥३॥

तुका ह्मणे काय धुडवण्या गोष्टी । जंव नाहीं गांठी चित्त आलें ॥४॥

इंिद्रयांसी नेम नाहीं । मुखीं राम ह्मणोनि काई ॥१॥

जेविं मासीसंगें अन्न । सुख नेदी तें भोजन ॥ध्रु.॥

कीर्तन करावें । तैसें करूनी दावावें ॥२॥

हें तों अंगीं नाहीं चिन्हें । गाइलें वेश्येच्या ढव्यानें ॥३॥

तुका ह्मणे नका रागा । संत शिवूं नेदिती अंगा ॥४॥

न लगे देवा तुझें आह्मांसी वैकुंठ । सायुज्याचा पट न लगे मज ॥१॥

देइप तुझें नाम मज सर्वकाळीं । मागेन वनमाळीहें चि तुज ॥ध्रु.॥

नारद तुंबर उद्धव प्रल्हाद । बळी रुक्मांगद नाम ध्याती ॥२॥

सिद्ध मुनिगण गंधर्व किन्नर । करिताती गजर रामनामें ॥३॥

तुका ह्मणे हरी देइप तुझें नाम । अखंडित प्रेम हें चि द्यावें ॥४॥

पावलों प्रसाद इच्छा केली तैसी । जालें या चित्तासी समाधान ॥१॥

मायबाप माझा उभा कृपादानी । विटे सम जोडूनि पादांबुजें ॥ध्रु.॥

सांभाळासी येऊं नेदी च उणीव । अधिकारगौरव राखे तैसें ॥२॥

तुका ह्मणे सर्व अंतर्बाह्य आहे । जया तैसा राहे कवळूनी ॥३॥

िस्थरावली वृत्ति पांगुळला प्राण । अंतरींची खुण पावूनियां ॥१॥

पुंजाळले नेत्र जाले अधाौन्मीळित । कंठ सद्गदित रोमांच आले ॥ध्रु.॥

चित्त चाकाटलें स्वरूपा माझारी । न निघे बाहेरी सुखावलों ॥२॥

सुनीळ प्रकाश उदैजला दिन । अमृताचें पान जीवनकळा ॥३॥

शशिसूर्या जाली जीवें ओंवाळणी । आनंदा दाटली आनंदाची ॥४॥

तुका ह्मणे सुखें प्रेमासी डुलत । वीरालों नििंश्चत नििंश्चतीनें ॥५॥

बोध्यअवतार माझिया अदृष्टा । मौन्य मुखें निष्ठा धरियेली ॥१॥

लोकांचियेसाटीं शाम चतुर्भुज । संतांसवें गुज बोलतसां ॥ध्रु.॥

आलें कलियुग माझिया संचिता । डोळां हाकलितां न पडेसी ॥२॥

म्यां च तुझें काय केलें नारायणा । कां नये करुणा तुका ह्मणे ॥३॥

मुखीं विठ्ठलाचें नाम । मग कैचा भवभ्रम ॥१॥

चालतां बोलतां खातां । जेवितां निद्रा करितां ॥ध्रु.॥

सुखें असों संसारीं । मग जवळी च हरि ॥२॥

मुक्तिवरील भक्ति जाण । अखंड मुखीं नारायण ॥३॥

मग देवभक्त जाला । तुका तुकीं उतरला ॥४॥

प्रेम जडलें तुझे पायीं । आणीक न सुचे मजला कांहीं ॥१॥

रात्रीदिवस तुझें ध्यान । तें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥

नामापरतें नेणें दुजें । ऐसें कळलें मजला निज ॥२॥

तुका ह्मणे अंतकाळीं । आह्मां सोडवीं तात्काळीं ॥३॥

तुझे पाय माझी काशी । कोण जाय माझें काशी ॥१॥

तुझें रूप तें चि ध्यान । तें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥

तुझे चरण ते चि गया । जालें गयावर्जन देहा ॥२॥

तुका ह्मणे सकळ तीथॉ । तुझें पायीं वसती येथें ॥३॥

क्षुधा तृषा कांहीं सर्वथा नावडे । पहावया धांवें कोल्हांटासी ॥१॥

कथेसी साक्षेपें पाचारिला जरी । ह्मणे माझ्या घरीं कोणी नाहीं ॥ध्रु.॥

बलत्कारीं जरी आणिला कथेसी । निद्रा घे लोडेंसी टेंकूनियां ॥२॥

तुका ह्मणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥३॥

श्रीराम सखा ऐसा धरीं भाव । मीपणाचा ठाव पुसीं मना ॥१॥

शरण निरंतर ह्मण तूं गोविंदा । वाचे लावीं धंदा नारायण ॥ध्रु.॥

यापरि सोपान नाहीं रे साधन । वाहातसें आण तुझी मना ॥२॥

नको कांहीं करूं अळस अंतरीं । जपें निरंतर रघुपती ॥३॥

तुका ह्मणे मोठा लाभ नरदेहीं । देहीं च विदेही होती नामें ॥४॥

सर्वापरी तुझे गुण गाऊं उत्तम । तुझेठायीं प्रेम राहो माझें ॥१॥

माउलीपरिस आहेसी उदार । तरि कां निष्ठ‍ मन केलें ॥ध्रु.॥

गजेंद्राकारणें केलें त्वां धांवणें । तरि कां निर्वाण पाहातोसी ॥२॥

प्रल्हादास कष्टीं रिक्षलें तों देवा । तरि कां केशवा सांडी केली ॥३॥

अन्यायी अजामेळ तो जाला पावन । ऐसें हें पुराण हाका मारी ॥४॥

तुका ह्मणे माझे थोर अपराध । नाम करी छेद क्षणमात्रें ॥५॥

आतां वांटों नेदीं आपुलें हें मन । न सोडीं चरण विठोबाचे ॥१॥

दुजियाचा संग लागों नेदीं वारा । आपुल्या शरीरावरूनियां ॥ध्रु.॥

यावें जावें आह्मीं देवा च सांगातें । मागूनी करीत हें चि आलों ॥२॥

काय वांयां गेलों तो करूं उद्वेग । उभा पांडुरंग मागें पुढें ॥३॥

तुका ह्मणे प्रेम मागतों आगळें । येथें भोगूं फळें वैकुंठींचीं ॥४॥

आतां आह्मां हें चि काम । वाचे स्मरूं रामराम ॥१॥

ऐसी मोलाची हे घडी । धरूं पायांची आवडी ॥ध्रु.॥

अमृताची खाणी । तये ठायीं वेचूं वाणी ॥२॥

तुका ह्मणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जिवलगा ॥३॥

आतां जावें पंढरीसी । दंडवत विठोबासी ॥१॥

जेथें चंद्रभागातिरीं । आह्मी नाचों पंढरपुरीं ॥ध्रु.॥

जेथें संतांची दाटणी । त्याचें घेऊं पायवणी ॥२॥

तुका ह्मणे आह्मी बळी । जीव दिधला पायां तळीं ॥३॥

आह्मी नरका जातां काय येइल तुझ्या हाता । ऐसा तूं अनंता विचारीं पां ॥१॥

तुज शरण आलियाचें काय हें चि फळ। विचारा दयाळ कृपानिधी ॥ध्रु.॥

तुझें पावनपण न चले आह्मांसीं । ऐसें हृषीकेशी कळों आलें ॥२॥

आह्मी दुःख पावों जन्ममरण वेथा । काय तुझ्या हाता येत असे ॥३॥

तुका ह्मणे तुह्मी खादली हो रडी । आह्मी धरली सेंडी नाम तुझें ॥४॥

पांडुरंगे पाहा खादलीसे रडी । परिणाम सेंडी धरिली आह्मी ॥१॥

आतां संतांनीं करावी पंचाईत । कोण हा फजितखोर येथें ॥ध्रु.॥

कोणाचा अन्याय येथें आहे स्वामी । गर्जतसों आह्मी पातकी ही ॥२॥

याचें पावनपण सोडवा चि तुह्मी । पतितपावन आह्मी आहों खरें ॥३॥

आह्मी तंव आहों अन्यायी सर्वथा । याची पावन कथा कैसी आहे ॥४॥

तुका ह्मणे आह्मी मेलों तरी जाणा । परि तुमच्या चरणा न सोडावें ॥५॥

घालूनियां मध्यावर्ती । दाटुनि उपदेश देती ॥१॥

ऐसे पोटभरे संत । तयां कैंचा भगवंत ॥ध्रु.॥

रांडापोरांतें गोविती । वर्षासन ते लाविती ॥२॥

जसे बोलती निरोपणीं । तैसी न करिती करणी ॥३॥

तुका ह्मणे तया । तमोगुणियाची क्रिया ॥४॥

वैभव राज्य संपत्ती टाकावी । उदरार्थ मागावी माधोकरी ॥१॥

आपुलें तें आधीं करावें स्वहित । ऐसी आहे नीत स्वधर्माची ॥ध्रु.॥

वर्ण कुळ जाति याचा अभिमान । तजावा सन्मान लौकिकाचा ॥२॥

तुका ह्मणे राहे एकाकी निःशंक । देउनियां हाक कंठीं काळ ॥३॥

हातपाय मिळोनि मेळा । चला ह्मणती पाहों डोळां ॥१॥

देखणी नव्हे देखती कैसे । सकळांचा देखणा डोळा चि असे ॥२॥

डोऑयाचा डोळा पाहों गेला । तुका ह्मणे तो पाहों ठेला ॥३॥

मुखें संति इंिद्रयें जती । आणिक नेणे भाव भक्ती ॥१॥

देवा हे चि दोन्ही पदें । येर गाइलीं विनोदें ॥२॥

चित्ताचें आसन। तुका करितो कीर्त्तन ॥३॥

धांवोनियां आलों पहावया मुख । गेलें माझें दुःख जन्मांतरिंचें ॥१॥

ऐकिलें ही होतें तैसें चि पाहिलें । मन िस्थरावलें तुझ्या पायीं ॥२॥

तुका ह्मणे माझी इच्छा पूर्ण जाली । कांहीं न राहिली वासना हे ॥३॥

गावलोकिकाहीं लावियेलें पिसें । काय सांगों ऐसें तुजपासीं ॥१॥

तोंड काळें केलें फिरविलें मज । नाहीं धरिली लाज पांडुरंगा ॥ध्रु.॥

काय तुजपासीं सांगों हें गा†हाणें । मग काय जिणें तुझें माझें ॥२॥

कोणासाटीं आतां करावा संसार । केली वारावार आपणें चि ॥३॥

तुका ह्मणे आह्मी मोडिला घरचार । धरियेला धीर तुझ्या पायीं ॥४॥

जीवें जीव नेणे पापी सारिका चि । नळी दुजयाची कापूं बैसे ॥१॥

आत्मा नारायण सर्वां घटीं आहे । पशुमध्यें काय कळों नये ॥ध्रु.॥

देखत हा जीव हुंबरे वरडत । निष्ठ‍ाचे हात वाहाती कैसे ॥२॥

तुका ह्मणे तया चांडाळासी नर्क । भोगिती अनेक महादुःखें ॥३॥

मनीं भाव असे कांहीं । तेथें देव येती पाहीं ॥१॥

पाहा जनाई सुंदरी । तेथें देव पाणी भरी ॥ध्रु.॥

शुद्ध पाहोनियां भाव । त्याचे हृदयीं वसे देव ॥२॥

तुका ह्मणे विठोबासी । ठाव देइप चरणापासीं ॥३॥

भागल्याचें तारूं शिणल्याची साउली । भुकेलिया घाली प्रेमपान्हा ॥१॥

ऐसी हे कृपाळू अनाथांची वेशी । सुखाची च राशी पांडुरंग ॥ध्रु.॥

सकळां सन्मुख कृपेचिया दृष्टी । पाहे बहु भेटी उतावीळां ॥२॥

तुका ह्मणे येथें आतां उरला कैंचा । अनंता जन्मींचा शीण भाग ॥३॥

काय न्यून आहे सांगा । पांडुरंगा तुह्मांपें ॥१॥

आमुची तों न पुरे इच्छा । पिता ऐसा मस्तकीं ॥ध्रु.॥

कैसी तुह्मां होय सांडी । करुणा तोंडीं उच्चारें ॥२॥

आश्चर्य चि करी तुका । हे नायका वैकुंठिंचिया ॥३॥

चित्त गुंतलें प्रपंचें । जालें वेडें ममतेचें ॥१॥

आतां सोडवीं पांडुरंगा । आलें निवारीं तें आंगा ॥ध्रु.॥

गुंतली चावटी । नामीं रूपीं जाली तुटी ॥२॥

तुका ह्मणे चाली । पुढें वाट खोळंबली ॥३॥

किती एका दिसीं । बुद्धि जाली होती ऐसी ॥१॥

कांहीं करावें स्वहित । तों हें न घडे उचित ॥ध्रु.॥

अवलंबुनी भीक। लाज सांडिली लौकिक ॥२॥

तुका ह्मणे दीन । जालों मनुष्यपणा हीन ॥३॥

आतां बरें जालें । सकाळीं च कळों आलें ॥१॥

मज न ठेवीं इहलोकीं । आलों तेव्हां जाली चुकी ॥ध्रु.॥

युगमहिमा ठावा । नव्हता ऐसा पुढें देवा ॥२॥

तुका ह्मणे ठेवीं । भोगासाटीं निरयगांवीं ॥३॥

परि आतां माझी परिसावी विनंती । रखुमाईच्या पती पांडुरंगा ॥१॥

चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥२॥

तुका ह्मणे तुझा ह्मणताती मज । आतां आहे लाज हे चि तुह्मां ॥३॥

पापाचिया मुळें । जालें सत्याचें वाटोळें ॥१॥

दोष जाले बिळवंत । नाहीं ऐसी जाली नीत ॥ध्रु.॥

मेघ पडों भीती । पिकें सांडियेली िक्षती ॥२॥

तुका ह्मणे कांहीं । वेदा वीर्य शक्ति नाहीं ॥३॥

ऐसा दुस्तर भवसागर । नेणों कैसा उतरूं पार ॥१॥

कामक्रोधादि सावजें थोर । दिसताती भयंकर ॥ध्रु.॥

मायाममतेचे भोवरे । घेती भयानक फेरे ॥२॥

वासनेच्या लहरा येती । उद्योगहेलकावे बसती ॥३॥

तरावया एक युक्ति असे । तुका नामनावेमधीं बैसे ॥४॥

देव जडला जाइना अंगा । यासी काय करूं सांगा ॥१॥

वरकड देव येती जाती । हा देव जन्माचा सांगाती ॥ध्रु.॥

अंगीं भरलें देवाचें वारें । देव जग चि दिसे सारें ॥२॥

भूत न बोले निरुतें। कांहीं केल्या न सुटे तें ॥३॥

जीव खादला दैवतें । माझा आणि पंचभूतें ॥४॥

तुका ह्मणे वाडें कोडें । उभें पुंडलिकापुढें ॥५॥

हरिदासाचिये घरीं । मज उपजवा जन्मांतरीं ॥१॥

ह्मणसी कांहीं मागा । हें चि देगा पांडुरंगा ॥ध्रु.॥

संतां लोटांगणीं । जातां लाजों नको मनीं ॥२॥

तुका ह्मणे अंगीं । शक्ती देइप नाचें रंगीं ॥३॥

लटिक्याचें आंवतणें जेविलिया साच । काय त्या विश्वास तो चि खरा ॥१॥

कोल्हांटिणी लागे आकाशीं खेळत । ते काय पावत अमरपद ॥ध्रु.॥

जळमंडपयाचे घोडे राउत नाचती । ते काय तडवती युद्धालागीं ॥२॥

तुका ह्मणे तैसें मतवादीयांचें जिणें। दिसे लाजिरवाणें बोलतां चि ॥३॥

काय आह्मीं केलें ऐसें । नुद्धरीजेसें सांगावें ॥१॥

हरण कोल्हें वैकुंठवासी । कोण त्यासी अधिकार ॥ध्रु.॥

गजा नाड्या सरोवरीं । नाहीं हरी विचारिलें ॥२॥

तुका ह्मणे गणिका नष्ट। माझे कष्ट त्याहूनि ॥३॥

भाग्यासाटीं गुरु केला । नाहीं आह्मांसी फळला ॥१॥

याचा मंत्र पडतां कानीं । आमच्या पेवांत गेलें पाणी ॥ध्रु.॥

गुरु केला घरवासी । आमच्या चुकल्या गाईम्हसी ॥२॥

स्वामी आपुली बुटबुट घ्यावी । आमुची प्रताप टाकुन द्यावी ॥३॥

तुका ह्मणे ऐसे नष्ट । त्यांसी दुणे होती कष्ट ॥४॥

गुणा आला ईटेवरी । पीतांबरधारी सुंदर जो ॥१॥

डोळे कान त्याच्या ठायीं । मन पायीं राहो हें ॥ध्रु.॥

निवारोनी जाय माया । ऐसी छाया जयासी ॥२॥

तुका ह्मणे समध्यान । हे चरण सकुमार ॥३॥

रंगीं रंगें नारायण । उभा करितों कीर्त्तन ॥१॥

हातीं घेउनियां वीणा । कंठीं राहें नारायणा ॥ध्रु.॥

देखिलीसे मूर्ती । माझ्या हृदयाची विश्रांति ॥२॥

तुका ह्मणे देवा । देइप कीर्त्तनाचा हेवा ॥३॥

तुझा भरवसा आम्हां । फार होता पुरुषोत्तमा ॥१॥

भवसागरसंकटीं । तारिशील जगजेठी ॥ध्रु.॥

नाम आदित्याचें झाड। त्याचा न पडे उजड ॥२॥

सिलंगणीचें सोनें । त्यासीं गाहाण ठेवी कोण ॥३॥

तुका ह्मणे देवा । िब्रद सोडूनियां ठेवा ॥४॥

जालों आतां दास । माझी पुरवीं हे आस ॥१॥

पंढरीचा वारकरी । वारी चुकों नेदीं हरी ॥ध्रु.॥

संतसमागम । अंगीं भरोनियां प्रेम ॥२॥

चंद्रभागे स्नान । तुका ह्मणे हें चि दान ॥३॥

यासाटीं करितों निष्ठ‍ भाषण । आहेसी तूं जाण सर्वदाता ॥१॥

ऐसें दुःख कोण आहे निवारिता । तें मी जाऊं आतां शरण त्यासी ॥ध्रु.॥

बैसलासे केणें करुनि एक घरीं । नाहीं येथें उरी दुस†याची ॥२॥

तुका ह्मणे आलें अवघें पायांपें । आतां मायबापें नुपेक्षावें ॥३॥

पोरा लागलीसे चट । धरी वाट देवळाची ॥१॥

सांगितलें नेघे कानीं । दुजें मनी विठ्ठल ॥ध्रु.॥

काम घरीं न करी धंदा । येथें सदा दुश्चित्त ॥२॥

आमुचे कुळीं नव्हतें ऐसें । हें चि पिसें निवडलें ॥३॥

लौकिकाची नाहीं लाज । माझें मज पारिखें ॥४॥

तुका ह्मणे नरका जाणें । त्या वचनें दुष्टाचीं ॥५॥

देवा बोलें आतां बोला । त्वां कां धरिला अबोला ॥१॥

भेऊं नको देइप भेटी । तूं कां पडिलासी संकटीं ॥ध्रु.॥

तुझ्या जीवींचें मी जाणें । ह्मणसी मुक्ती आह्मां देणें ॥२॥

तुका ह्मणे न लगे कांहीं । चित्त राहो तुझे पायीं ॥३॥

यमधर्म आणिक ब्रह्मादिक देव । त्यांचा पूर्ण भाव तुझे पायीं ॥१॥

करिती स्मरण पार्वतीशंकर । तेथें मी किंकर कोणीकडे ॥ध्रु.॥

सहजरमुखेंसी घोष फणिवराचा । मज किंकराचा पाड काय ॥२॥

चंद्र सूर्य आणि सर्व तारांगणें । करिती भ्रमण प्रदिक्षणा ॥३॥

तुका ह्मणे त्यांसी स्वरूप कळेना । तेथें मज दीना कोण पुसे ॥४॥

विठोबाचे पायीं जीव म्यां ठेविला । भक्तिभावें केला देव ॠणी ॥१॥

देव माझा ॠणी आहे सहाकारी । परसपरवारि भवभय ॥ध्रु.॥

भवभयडोहीं बुडों नेदी पाहीं । धरूनियां बाही तारी मज ॥२॥

तारियेले दास पडिल्या संकटीं । विष केलें पोटीं अमृतमय ॥३॥

अमृतातें सेवीतसे नामरसा । तोडियेला फांसा बंधनाचा ॥४॥

बंधनाचा फांसा आह्मीं कांहीं नेणों । पाय तुझे जाणों पद्मनाभा ॥५॥

पद्मनाभा नाभिकमळीं ब्रह्मादिक । त्रैलोक्यनायक ह्मणविसी ॥६॥

ह्मणविसी देवा दासाचा अंकित । मनाचा संकेत पाहोनियां ॥७॥

पाहोनियां दृढ निश्चय तयाचा । तो चि दास साचा जवळीक ॥८॥

जवळीक जाली ब्रह्मीं सुखावले । मार्ग दाखविले मूढा जना ॥९॥

मूढा जनामाजी दास तुझा मूढ । कास तुझी दृढ धरियेली ॥१०॥

धरियेले तुझे पाय रे विठ्ठला । तुका सुखी जाला तुझ्या नामें ॥११॥

बहु क्लेशी जालों या हो नरदेहीं । कृपादृष्टी पाहीं पांडुरंगा ॥१॥

पांडुरंगा सर्वदेवांचिया देवा । घ्यावी माझी सेवा दिनानाथा ॥ध्रु.॥

दिनानाथ िब्रद त्रिभुवनीं तुझें । मायबापा ओझें उतरावें ॥२॥

उतरीं सत्वर पैलथडी नेइप । पूर्णसुख देइप पायांपाशीं ॥३॥

पायांपाशीं मज ठेवीं निरंतर । आशा तुझी फार दिवस केली ॥४॥

केली आस तुझी वाट मी पाहातों । निशिदिनीं ध्यातों नाम तुझें ॥५॥

नाम तुझें गोड स्वभक्ता आवडे । भक्तांलागीं कडे खांदा घेसी ॥६॥

घेसी खांद्यावरी खेळविसी लोभें । पाउल शोभे विटेवरि ॥७॥

विटेवरि उभा देखिलासी डोळां । मनाचा सोहळा पुरविसी ॥८॥

पुरवीं सत्वर त्रैलोक्यस्वामिया । मिठी घाली पायां तुका भावें ॥९॥

एक वेळे तरी जाईन माहेरा । बहुजन्म फेरा जाल्यावरी ॥१॥

चित्ता हे बैसली अविट आवडी । पालट ती घडी नेघे एकी ॥ध्रु.॥

करावें ते करी कारणशरीर । अंतरीं त्या धीर जीवनाचा ॥२॥

तुका ह्मणे तरि होइल विलंब । परि माझा लाभ खरा जाला ॥३॥

सांग त्वां कोणासी तारिलें । संतांवेगळें उद्धरिलें ॥१॥

संत शब्द उपदेशी । मग तूं हो ह्मणशी ॥२॥

तुका ह्मणे नाहीं तुझा उपकार । करूं संतांचा उच्चार ॥३॥

उमा रमा एके सरी । वाराणसी ते पंढरी ॥१॥

दोघे सारिखे सारिखे । विश्वनाथ विठ्ठल सखे ॥ध्रु.॥

तेथें असे भागीरथी। येथें जाणा भीमरथी ॥२॥

वाराणशी त्रिशुलावरी । सुदर्शनावरि पंढरी ॥३॥

मनकर्णिका मनोहर । चंद्रभागा सरोवर ॥४॥

वाराणशी भैरवकाळ । पुंडलीक क्षेत्रपाळ ॥५॥

धुंडिराज दंडपाणी। उभा गरुड कर जोडुनी ॥६॥

गया ते चि गोपाळपुर । प्रयाग निरानरसिंपुर ॥७॥

तेथें असती गयावळ । येथें गाई आणि गोपाळ ॥८॥

शमीपत्रपिंड देती । येथें काला निजसुखप्राप्ति ॥९॥

संतसज्जनीं केला काला । तुका प्रसाद लाधला ॥१०॥

फट्याचे बडबडे चवी ना संवाद । आपुला चि वाद आपणासी ॥१॥

कोणें या शब्दाचे मरावें घाणी । अंतरें शाहाणी राहिजे हो ॥ध्रु.॥

गाढवाचा भुंक आइकतां कानीं । काय कोडवाणी ऐसियेचें ॥२॥

तुका ह्मणे ज्यासी करावें वचन । त्याचे येती गुण अंगास ते ॥३॥

दिवसा व्यापारचावटी । रात्री कुटुंबचिंता मोटी ॥१॥

काय करूं या मनासी । नाठवे हृषीकेशी ॥ध्रु.॥

वेश्येपाशीं रात्रीं जागे । हरिकीर्त्तनीं निद्रा लागे ॥२॥

तुका ह्मणे काय जालासी । वृथा संसारा आलासी ॥३॥

अहो कृपावंता । हाइप बुद्धीचा ये दाता ॥१॥

जेणें पाविजे उद्धार । होय तुझे पायीं थार ॥ध्रु.॥

वदवी हे वाचा । भाव पांडुरंगीं साचा ॥२॥

तुका ह्मणे देवा । माझें अंतर वसवा ॥३॥

निंदक तो परउपकारी । काय वणूप त्याची थोरी । जे रजकाहुनि भले परि । सर्व गुणें आगळा ॥१॥

नेघे मोल धुतो फुका। पाप वरच्यावरि देखा । करी साधका । शुद्ध सरते तिहीं लोकीं ॥ध्रु.॥

मुखसंवदणी सांगते । अवघें सांटविलें तेथें । जिव्हा साबण निरुतें । दोष काढी जन्माचे ॥२॥

तया ठाव यमपुरीं । वास करणें अघोरीं । त्यासी दंडण करी । तुका ह्मणे न्हाणी ते ॥३॥

प्रपंचाची पीडा सोसिती अघोरी । जया क्षणभरी नाम नये ॥१॥

नाम नाठविती आत्मया रामाचें । धिग जिणें त्याचें भवा मूळ ॥ध्रु.॥

मूळ ते पापाचें आचरण तयाचें । नाहीं राघवाचें स्मरण त्या ॥२॥

स्मरण भजन नावडे जयासी । आंदणीया दासी यमदूतां ॥३॥

चिंतन रामाचें न करी तो दोषी । एकांत तयासीं बोलों नये ॥४॥

नये त्याचा संग धरूं ह्मणे तुका । धरितां पातका वांटेकरी ॥५॥

अथॉविण पाठांतर कासया करावें । व्यर्थ चि मरावें घोकूनियां ॥१॥

घोकूनियां काय वेगीं अर्थ पाहे । अर्थरूप राहे होऊनियां ॥२॥

तुका ह्मणे ज्याला अथाअ आहे भेटी । नाहीं तरी गोष्टी बोलों नका ॥३॥

बसतां चोरापाशीं तैसी होय बुद्धि । देखतां चि चिंधी मन धांवे ॥१॥

व्यभिचा†यापासीं बैसतां क्षणभरी । देखतां चि नारी मन धांवे ॥ध्रु.॥

प्रपंचाचा छंद टाकूनियां गोवा । धरावें केशवा हृदयांत ॥२॥

सांडुनियां देइप संसाराची बेडी । कीर्तनाची गोडी धरावी गा ॥२३॥

तुका ह्मणे तुला सांगतों मी एक । रुक्मिणीनायक मुखीं गावा ॥४॥

मस्तकीं सहावें ठांकियासी जाण । तेव्हां देवपण भोगावें गा ॥१॥

आपुलिये स्तुती निंदा अथवा मान । टाकावा थुंकोन पैलीकडे ॥ध्रु.॥

सद्ग‍ुसेवन तें चि अमृतपान । करुनी प्राशन बैसावें गा ॥२॥

आपुल्या मस्तकीं पडोत डोंगर । सुखाचें माहेर टाकुं नये ॥३॥

तुका ह्मणे आतां सांगूं तुला किती । जिण्याची फजीती करूं नये ॥४॥

स्वामिसेवा गोड । माते बाळकाचें कोड ॥१॥

जेंजें मागावें भातुकें । तेंतें पुरवी कौतुकें ॥ध्रु.॥

खेळविलें कोडें । हरुषें बोले कीं बोबडें ॥२॥

तुका ह्मणे लाड । तेथें पुरे माझें कोड ॥३॥

तुझें नाम पंढरिनाथा । भावेंविण नये हाता ॥१॥

दाहां नये विसां नये । पंनासां साटां नये ॥ध्रु.॥

शां नये सहस्रा नये। लक्षकोडीलागीं नये ॥२॥

तुका ह्मणे पंढरिनाथा । भावेंविण नये हाता ॥३॥

संतांपायीं विन्मुख जाला । तो जरि संगति मागों आला ॥१॥

तरि त्याहुनि दुरी जावें । सुखें एकांतीं बैसावें ॥ध्रु.॥

आत्मचर्चा नाहीं जेथें । अगी लावुनि द्यावी तेथें ॥२॥

तुका ह्मणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥३॥

हिरा ठेवितां काळें गाहाण । मोल न तुटे दुकाळीं जाण ॥१॥

तैसे संतजन पाहीं । विनटले श्रीहरिपायीं ॥२॥

तुका ह्मणे तैसे भक्त । तयांसी जन हें निंदित ॥३॥

परिसें गे सुनेबाई । नको वेचूं दूध दहीं ॥१॥

आवा चालिली पंढरपुरा । वेसीपासुनि आली घरा ॥ध्रु.॥

ऐकें गोष्टी सादर बाळे । करीं जतन फुटकें पाळें ॥२॥

माझे हातींचा कलवडू । मजवाचुंनि नको फोडूं ॥३॥

वळवटिक्षरीचें लिंपन । नको फोडूं मजवांचून ॥४॥

उखळ मुसळ जातें । माझें मन गुंतलें तेथें ॥५॥

भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ॥६॥

भक्षीं मपित आहारु । नको फारसी वरो सारूं ॥७॥

सून ह्मणे बहुत निकें । तुह्मी यात्रेसि जावें सुखें ॥८॥

सासूबाई स्वहित जोडा । सर्व मागील आशा सोडा ॥९॥

सुनमुखीचें वचन कानीं । ऐकोनि सासू विवंची मनीं ॥१०॥

सवतीचे चाळे खोटे । म्यां जावेंसें इला वाटे ॥११॥

अतां कासया यात्रे जाऊं । काय जाउनि तेथें पाहूं ॥१२॥

मुलें लेंकरें घर दार । माझें येथें चि पंढरपूर ॥१३॥

तुका ह्मणे ऐसें जन । गोवियेलें मायेंकरून ॥१४॥

एक ते गाढव मनुष्याचे वेष । हालविती पुस पुढें दाढी ॥१॥

निंदा हें भोजन जेवण तयांसी । जोडी घरीं रासी पातकांच्या ॥२॥

तुका ह्मणे सुखें बैसोनियां खाती । कुंभपाकीं होती नर्कवासी ॥३॥

मागत्याची टाळाटाळी । झिंझ्या वोढूनि कपाळीं ॥१॥

ऐसा तंव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥ध्रु.॥

नसेल ना नवें । ऐसें धरियेलें देवें ॥२॥

तुका ह्मणे जाला । उशीर नाहीं तो विठ्ठला ॥३॥

Not in the Wikisource transcription: 4138.

Text: तुकाराम गाथा on Marathi Wikisource, which does not name the printed edition it was transcribed from. The verses are public domain; the transcription is by Wikisource contributors, CC BY-SA 4.0. Its systematic legacy-font errors are repaired by rule (see the reading page for details); some remain — इप printed for ई in about 220 abhangas, and a few vowel signs on the wrong letter. Numbering follows Wikisource; printed editions differ. Spotted a wrong line? Write to us with the number.

If you need to talk to someone now: Tele-MANAS 14416 (free, 24×7) · Vandrevala +91 99996 66555 (24×7, call or WhatsApp) · AASRA 022 2754 6669 (24×7) · iCall 9152 987 821 (Mon–Sat, 8am–9pm) · Emergency 112