मनित्यManitya
तुकाराम गाथा · page 10 of 16

अभंग २७०१–३०००

Abhangas 2701–3000 (the Gāthā is numbered 1–4,583), in the original Marathi, with the Gāthā's own section headings — as transcribed on Marathi Wikisource, whose base edition is not named. The refrain (ध्रु.) is set in a warmer colour. One font error is not yet repaired: where you see इप, read ई (होइप = होई).

↵

बुद्धिहीना उपदेश । तें तें विष अमृतीं ॥१॥

हुंगों नये गो†हवाडी । तेथें जोडी विटाळ ॥ध्रु.॥

अळसियाचे अंतर कुडें। जैसें मढें निष्काम ॥२॥

तुका ह्मणे ऐशा हाती । मज श्रीपती वांचवा ॥३॥

न करीं तुमची सेवा । बापुडें मी पण देवा ।

बोलिलों तो पाववा । पण सिद्धी सकळ ॥१॥

आणीक काय तुह्मां काम । आह्मां नेदा तरी प्रेम ।

कैसे धर्माधर्म । निश्चयेंसी रहाती ॥ध्रु.॥

आह्मीं वेचलों शरीरें । तुझी बीज पेरा खरें ।

संयोगाचें बरें । गोड होतें उभयतां ॥३॥

एका हातें टाळी । कोठें वाजते निराळी ।

जाला तरी बळी । स्वामीविण शोभेना ॥३॥

रूपा यावे जी अनंता । धरीन पुटाची त्या सत्ता ।

होईन सरता । संतांमाजी पोसणा ॥४॥

ठेविलें उधारा । वरी काय तो पातेरा ।

तुका ह्मणे बरा । रोकडा चि निवाड ॥५॥

भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥१॥

हे तों चाळवाचाळवी । केलें आपण चि जेवी ॥ध्रु.॥

नैवेद्याचा आळ । वेच ठाकणीं सकळ ॥२॥

तुका ह्मणे जड । मज न राखावें दगड ॥३॥

सर्व भाग्यहीन । ऐसें सांभाळिलों दीन ॥१॥

पायीं संतांचे मस्तक । असों जोडोनि हस्तक ॥ध्रु.॥

जाणें तरि सेवा । दीन दुर्बळ जी देवा ॥२॥

तुका ह्मणे जीव । समर्पून भाकीं कींव ॥३॥

भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥१॥

येथूनिया नुठो माथा । मरणांवाचूनि सर्वथा ॥ध्रु.॥

होइप बळकट । माझ्या मना तूं रे धीट ॥२॥

तुका ह्मणे लोटांगणीं । भक्तिभाग्यें जाली धणी ॥३॥

नाहीं तरी आतां कैचा अनुभव । जालासीं तूं देव घरघेणा ॥१॥

जेथें तेथें देखें लांचाचा पर्वत । घ्यावें तरि चित्त समाधान ॥ध्रु.॥

आधीं वरी हात या नांवें उदार । उसण्याचे उपकार फिटाफीट ॥२॥

तुका ह्मणे जैसी तैसी करूं सेवा । सामर्थ्य न देवा पायांपाशीं ॥३॥

आह्मी सर्वकाळ कैंचीं सावधानें । वेवसायें मन अभ्यासलें ॥१॥

तरी ह्मणा मोट ठेविली चरणीं । केलों गुणागुणीं कासावीस ॥ध्रु.॥

याचे कानसुळीं मारीतसे हाका । मज घाटूं नका मधीं आतां ॥२॥

तुका ह्मणे निद्रा जागृति सुषुप्ति । तुह्मी हो श्रीपती साक्षी येथें ॥३॥

नसता चि दाउनि भेव । केला जीव हिंपुटी ॥१॥

जालों तेव्हां कळलें जना । वाउगा हा आकांत ॥ध्रु.॥

गंवसिलों पुढें मागें लागलागे पावला ॥२॥

तुका ह्मणे केली आणि । सलगीच्यांनी सन्मुख ॥३॥

हें का आह्मां सेवादान । देखों सीण विषमाचा ॥१॥

सांभाळा जी ब्रीदावळी । तुह्मीं कां कळीसारिखे ॥ध्रु.॥

शरणागत वै†या हातीं । हे नििंश्चती देखिली ॥२॥

तुका ह्मणे इच्छीं भेटी । पाय पोटीं उफराटे ॥३॥

कां हो आलें नेणों भागा । पांडुरंगा माझिया ॥१॥

उफराटी तुह्मां चाली । क्रिया गेली सत्याची ॥ध्रु.॥

साक्षी हेंगे माझें मन । आर्त कोण होतें तें ॥२॥

तुका ह्मणे समर्थपणे । काय नेणें करीतसां ॥३॥

शकुनानें लाभ हानि । येथूनि च कळतसे ॥१॥

भयारूढ जालें मन । आतां कोण विश्वास ॥ध्रु.॥

प्रीत कळे आलिंगनीं। संपादनीं अत्यंत ॥२॥

तुका ह्मणे मोकलिलें । कळों आलें बरवें हें ॥३॥

नव्हेव निग्रह देहासी दंडण । न वजे भूकतान सहावली ॥१॥

तरि नित्य नित्य करीं आळवण । माझा अभिमान असों द्यावा ॥ध्रु.॥

नाहीं विटाळिलें कायावाचामन । संकल्पासी भिन्न असें चि या ॥२॥

तुका ह्मणे भवसागरीं उतार । कराया आधार इच्छीतसें ॥३॥

ऐकिली कीर्त्ति संतांच्या वदनीं । तरि हें ठाकोनि आलों स्थळ ॥१॥

मागिला पुढिला करावें सारिखें । पालटों पारिखें नये देवा ॥ध्रु.॥

आह्मासी विश्वास नामाचा आधार । तुटतां हे थार उरी नाहीं ॥२॥

तुका ह्मणे येथें नसावें चि दुजें । विनंती पंढरिराजें परिसावी हे ॥३॥

मोलाचें आयुष्य वेचतसे सेवे । नुगवतां गोवे खेद होतो ॥१॥

उगवूं आलेति तुह्मीं नारायणा । परिहार या सिणा निमिस्यांत ॥ध्रु.॥

लिगाडाचे मासी न्यायें जाली परी । उरली ते उरी नाहीं कांहीं ॥२॥

तुका ह्मणे लाहो साधीं वाचाबळें । ओढियेलों काळें धांव घाला ॥३॥

ह्मणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी । चित्त आशापाशीं आवरूनि ॥१॥

कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केलें विसर्जन आव्हानीं च ॥ध्रु.॥

पारिखा तो आतां जाला दुजा ठाव । दृढ केला भाव एकविध ॥२॥

तुका ह्मणे कार्यकारणाचा हेवा । नाहीं जीव देवा समर्पिला ॥३॥

विभ्रंशिली बुद्धि देहांत जवळी । काळाची अकाळीं वायचाळा ॥१॥

पालटलें जैसें देंठ सोडी पान । पिकलें आपण तयापरी ॥ध्रु.॥

न मारितां हीन बुद्धि दुःख पावी । माजल्याची गोवी तयापरी ॥२॥

तुका ह्मणे गळ लागलिया मत्स्या । तळमळेचा तैसा लवलाहो ॥३॥

न वजावा तो काळ वांयां । मुख्य दया हे देवा ॥१॥

ह्मणऊनि जैसें तैसें । रहणी असें पायांचे ॥ध्रु.॥

मोकळें हे मन कष्ट। करी नष्ट दुर्जन ॥२॥

तुका ह्मणे कांहीं नेणें । न वजें येणेंपरी वांयां ॥३॥

कल्पतरूअंगीं इिच्छलें तें फळ । अभागी दुर्बळ भावें सिद्धी ॥१॥

धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्तीं सांठविला ॥ध्रु.॥

बीजाऐसा द्यावा उदकें अंकुर । गुणाचे प्रकार ज्याचे तया ॥२॥

तुका ह्मणे कळे पारखिया हिरा । ओझें पाठी खरा चंदनाचें ॥३॥

उकरडा आधीं अंगीं नरकाडी । जातीची ते जोडी ते चि चित्तीं ॥१॥

कासयानें देखे अंधळा माणिकें । चवीविण फिके वांयां जाय ॥ध्रु.॥

काय जाणे विष पालटों उपचारें । मुखासी अंतर तों चि बरें ॥२॥

तुका ह्मणे काय उपदेश वेड्या । संगें होतो रेड्यासवें कष्ट ॥३॥

जया शिरीं कारभार । बुद्धि सार तयाची ॥१॥

वर्ते तैसें वर्ते जन । बहुतां गुण एकाचा ॥ध्रु.॥

आपणीयां पाक करी । तो इतरीं सेविजे ॥२॥

तुका ह्मणे शूर राखे । गाढ्या वाखेसांगातें ॥३॥

एक एका साह्य करूं । अवघें धरूं सुपंथ ॥१॥

कोण जाणे कैसी परी । पुढें उरी ठेवितां ॥ध्रु.॥

अवघे धन्य होऊं आता । स्मरवितां स्मरण ॥२॥

तुका ह्मणे अवघी जोडी । ते आवडा चरणांची ॥३॥

फळकट तो संसार । येथें सार भगवंत ॥१॥

ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥

अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥२॥

तुका ह्मणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥३॥

सुधारसें ओलावली । रसना धाली न धाय ॥१॥

कळों नये जाली धणी । नारायणीं पूर्णता ॥ध्रु.॥

आवडे तें तें च यासी । ब्रह्मरसीं निरसें ॥२॥

तुका ह्मणे बहुतां परी । करूनि करीं सेवन ॥३॥

असंतीं कांटाळा हा नव्हे मत्सर । ब्रह्म तें विकारविरहित ॥१॥

तरि ह्मणा त्याग प्रतिपादलासे । अनादि हा असे वैराकार ॥ध्रु.॥

सिजलें हिरवें एका नांवें धान्य । सेवनापें भिन्न निवडे तें ॥२॥

तुका ह्मणे भूतीं साक्ष नारायण । अवगुणीं दंडण गुणीं पुजा ॥३॥

आपुलें आपण जाणावें स्वहित । जेणें राहे चित्त समाधान ॥१॥

बहुरंगें माया असे विखरली । कुंटित चि चाली होतां बरी ॥ध्रु.॥

पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारीं । भाव विश्वंभरीं समर्पावा ॥२॥

तुका ह्मणे गेला फिटोनियां भेव । मग होतो देव मनाचा चि ॥३॥

असोनि न कीजे अलिप्त अहंकारें । उगी च या भारें कुंथाकुंथी ॥१॥

धांवा सोडवणें वेगीं लवकरी । मी तों जालों हरी शक्तिहीन ॥ध्रु.॥

भ्रमल्यानें दिसें बांधल्याचेपरी । माझें मजवरी वाहोनियां ॥२॥

तुका ह्मणे धांव घेतलीसे सोई । आतां पुढें येइप लवकरी ॥३॥

आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटीं पारिख्या ॥१॥

ऐसें जन भुललें देवा । मिथ्या हेवा वाढवी ॥ध्रु.॥

गळ गिळी आविसें मासा । प्राण आशा घेतला ॥२॥

तुका ह्मणे बोकडमोहो । धरी पहा हो खाटिक ॥३॥

विषय तो मरणसंगीं । नेणे सुटिका अभागी ॥१॥

शास्त्राचा केला लुंडा । तोंडीं पाडियेला धोंडा ॥ध्रु.॥

अगदीं मोक्ष नाहीं ठावा । काय सांगावें गाढवा ॥२॥

तुका ह्मणे ग्यानगड । सुखें देवा पावेना नाड ॥३॥

मी च विखळ मी च विखळ । येर सकळ बहु बरें ॥१॥

पाहिजे हें क्षमा केलें । येणें बोलें विनवणी ॥ध्रु.॥

मी च माझें मी च माझें । जालें ओझें अन्याय ॥२॥

आधीं आंचवला आधीं आंचवला । तुका जाला निमनुष्य ॥३॥

येणें जाणें तरी । राहे देव कृपा करी ॥१॥

ऐसें तंव पुण्य नाहीं । पाहातां माझे गांठी कांहीं ॥ध्रु.॥

भय निवारिता कोण वेगळा अनंता ॥२॥

तुका ह्मणे वारे भोग । वारी तरी पांडुरंग ॥३॥

भल्याचें कारण सांगावें स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥१॥

परी आह्मी असों एकाचिये हातीं । नाचवितो चित्तीं त्याचें तैसें ॥ध्रु.॥

वाट सांगे त्याच्या पुण्या नाहीं पार । होती उपकार अगणित ॥२॥

तुका ह्मणे तुह्मी बहु कृपावंत । आपुलें उचित केलें संतीं ॥३॥

लावूनियां पुष्टी पोरें । आणि करकर कथेमाजी ॥१॥

पडा पायां करा विनंती । दवडा हातीं धरोनियां ॥ध्रु.॥

कुर्वाळूनि बैसे मोहें । प्रेम कां हे नासीतसे ॥२॥

तुका ह्मणे वाटे चित्त । करा फजित ह्मणऊनि ॥३॥

पुण्य उभें राहो आतां । संताचें याकारणें ॥१॥

पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥ध्रु.॥

संकल्प हे यावे फळा । कळवळा बहुतांचा ॥२॥

तुका ह्मणे होऊनि क्षमा । पुरुषोत्तमा अपराध ॥३॥

आइकिली मात । पुरविले मनोरथ ॥ ॥

प्रेम वाढविलें देवा । बरवी घेऊनियां सेवा ॥ध्रु.॥

केली विनवणी । तैसी पुरविली धणी ॥२॥

तुका ह्मणे काया । रसा कुरोंडी वरोनियां ॥३॥

संतांची स्तुति ते दर्शनाच्या योगें । पडिल्या प्रसंगें ऐसी कीजें ॥१॥

संकल्प ते सदा स्वामीचे चि चित्तीं । फाकों नये वृत्ति अखंडित ॥ध्रु.॥

दास्यत्व तें असे एकविध नांवें । उरों नये जीवें भिन्नत्वासी ॥२॥

निज बीजा येथें तुका अधिकारी । पाहिजे तें पेरी तये वेळे ॥३॥

सेजेचा एकांत आगीपाशीं कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥१॥

राहो अथवा मग जळो अगीमधीं । निवाडु तो आधीं होऊनि गेला ॥ध्रु.॥

भेणें झडपणी नाहीं येथें दुजें । पादरधिटा ओझें हतियारें ॥२॥

तुका ह्मणे मज नाहीं जी भरवसा । तोवरि सहसा निवाडु तो ॥३॥

न सरे भांडार । भरलें वेचितां अपार ॥१॥

मवित्याचें पोट भरे । पुढिलासी पुढें उरे ॥ध्रु.॥

कारणापुरता लाहो आपुलाल्या हिता ॥२॥

तुका ह्मणे देवा । पुढें केला चाले हेवा ॥३॥

तरी हांव केली अमुपा व्यापारें । व्हावें एकसरें धनवंत ॥१॥

जालों हरिदास शूरत्वाच्या नेमें । जालीं ठावीं वर्में पुढिलांची ॥ध्रु.॥

जनावेगळें हें असे अभिन्नव । बळी दिला जीव ह्मणऊनि ॥२॥

तुका ह्मणे तरी लागलों विल्हेसी । चालतिया दिसीं स्वामी ॠणी ॥३॥

कोण दुजें हरी सीण । शरण दीन आल्याचा ॥१॥

तुह्मांविण जगदीशा । उदार ठसा त्रिभुवनीं ॥ध्रु.॥

कोण ऐसें वारी पाप । हरी ताप जन्माचा ॥२॥

तुका ह्मणे धांव घाली । कोण चाली मनाचे ॥३॥

ग्रंथाचे अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयीं ॥१॥

नाहीं भेदू ह्मुण भलतें चि आचरे । मोकळा विचरे मनासवें ॥२॥

तुका ह्मणे विषा नांव तें अमृत । पापपुण्या भीत नाहीं नष्ट ॥३॥

कायावाचामनें जाला विष्णुदास । काम क्रोध त्यास बाधीतना ॥१॥

विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचें ॥२॥

तुका ह्मणे चित्त करावें निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथें ॥३॥

याती हीन मति हीन कर्म हीन माझें । सांडोनियां सर्व लज्जा शरण आलों तुज ॥१॥

येइप गा तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीण जाला क्षीण जाली काया ॥ध्रु.॥

दिनानाथ दीनबंधू नाम तुज साजे । पतितपावन नाम ऐसी ब्रीदावळी गाजे ॥२॥

विटेवरि वीट उभा कटावरी कर । तुका ह्मणे हें चि आह्मां ध्यान निरंतर ॥३॥

गंगा आली आम्हांवरि । संतपाउलें साजिरीं ॥१॥

तेथें करीन मी अंघोळी । उडे चरणरजधुळी । येती तीर्थावळी । पर्वकाळ सकळ ॥ध्रु.॥

पाप पळालें जळालें । भवदुःख दुरावलें ॥२॥

तुका ह्मणे धन्य जालों । सप्तसागरांत न्हालों ॥३॥

पोटासाठीं खटपट करिसी अवघा वीळ । राम राम ह्मणतां तुझी बसली दांतखीळ ॥१॥

हरिचें नाम कदाकाळीं कां रे नये वाचे । ह्मणतां राम राम तुझ्या बाचें काय वेचें ॥ध्रु.॥

द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती । कीर्तनासी जातां तुझी जड झाली माती ॥२॥

तुका ह्मणे ऐशा जीवा काय करूं आता । राम राम न ह्मणे त्याचा गाढव मातापिता ॥३॥

आह्मां सुकाळ सुखाचा । जवळी हाट पंढरीचा । सादाविती वाचा । रामनामें वैष्णव ॥१॥

घ्या रे आपुलाल्या परी । नका ठेवूं कांही उरी । ओसरतां भरी । तोंडवरी अंबर ॥ध्रु.॥

वाहे बंदर द्वारका । खेप आली पुंडलिका । उभे चि विकिलें एका । सनकादिकां सांपडलें ॥२॥

धन्य धन्य हे भूमंडळी । प्रगटली नामावळी । घेती जीं दुबळीं । तीं आगळीं सदैव ॥३॥

माप आपुलेनि हातें । कोणी नाहीं निवारितें । पैस करूनि चित्तें । घ्यावें हितें आपुलिया ॥४॥

नाहीं वाटितां सरलें । आहे तैसें चि भरलें । तुका ह्मणे गेलें । वांयांविण न घेतां ॥५॥

चुकलिया ताळा । वाती घालुनि बैसे डोळां ॥१॥

तैसें जागें करीं चित्ता । कांहीं आपुलिया हिता ॥ध्रु.॥

निक्षेपिलें धन। तेथें गुंतलेसे मन ॥२॥

नाशिवंतासाटीं । तुका ह्मणे करिसी आटी ॥३॥

करूनि जतन । कोणा कामा आलें धन ॥1 ॥

ऐसें जाणतां जाणतां । कां रे होतोसी नेणता ॥ध्रु.॥

िप्रया पुत्र बंधु । नाहीं तुज यांशीं संबंधु ॥२॥

तुका ह्मणे एका । हरीविण नाहीं सखा ॥३॥

आह्मीं देतों हाका । कां रे जालासी तूं मुका ॥१॥

न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥ध्रु.॥

आधीं करूं चौघाचार। मग सांडूं भीडभार ॥२॥

तुका ह्मणे सेवटीं । तुह्मां आह्मां घालूं तुटी ॥३॥

नव्हे भिडा हें कारण । जाणे करूं ऐसे जन ॥१॥

जों जों धरावा लौकिक । रडवितोसी आणीक ॥ध्रु.॥

चाल जाऊं संतांपुढें । ते हें निवडिती रोकडें ॥२॥

तुका ह्मणे तूं निर्लज्ज । आह्मां रोकडी गरज ॥३॥

बहु होता भला । परि ये रांडेनें नासिला ॥१॥

बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे ॥ध्रु.॥

नव्हतें आळवितें कोणी । इनें केला जगॠणी ॥२॥

ज्याचे त्यासी नेदी देऊं । तुका ह्मणे धांवे खाऊं ॥३॥

काय करावें तें आतां । जालें नयेसें बोलतां ॥१॥

नाहीं दोघांचिये हातीं । गांठी घालावी एकांतीं ॥ध्रु.॥

होय आपुलें काज । तों हे भीड सांडूं लाज ॥२॥

तुका ह्मणे देवा । आधीं निवडूं हा गोवा ॥३॥

केली सलगी तोंडपिटी । आह्मी लडिवाळें धाकुटीं ॥१॥

न बोलावें तें चि आलें । देवा पाहिजे साहिलें ॥ध्रु.॥

अवघ्यांमध्यें एक वेडें । तें चि खेळविती कोडें ॥२॥

तुका ह्मणे मायबापा । मजवरि कोपों नका ॥३॥

शिकवूनि बोल । केलें कवतुक नवल ॥१॥

आपणियां रंजविलें । बापें माझिया विठ्ठलें ॥ध्रु.॥

हातीं प्रेमाचें भातुकें । आह्मां देऊनियां निकें ॥२॥

तुका करी टाहो । पाहे रखुमाईचा नाहो ॥३॥

तेथें सुखाची वसति । गाती वैष्णव नाचती । पताका झळकती । गर्जती हरिनामें ॥१॥

दोषा जाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी । न येती माघारीं । नाहीं उरी परताया ॥ध्रु.॥

विसरोनि देवपणा । उभा पंढरीचा राणा । विटोनि निर्गुणा । रूप धरिलें गोजिरें ॥२॥

पोट सेवितां न धाये । भूक भुकेली च राहे । तुका ह्मणे पाहे । कोण आस या मुक्तीची ॥३॥

शूद्रवंशी जन्मलों । ह्मणोनि दंभें मोकलिलों ॥१॥

अरे तूं चि माझा आतां । मायबाप पंढरीनाथा ॥ध्रु.॥

घोकाया अक्षर। मज नाहीं अधिकार ॥२॥

सर्वभावें दीन । तुका ह्मणे यातिहीन ॥३॥

वेडें वांकडें गाईन । परि मी तुझा चि ह्मणवीन ॥१॥

मज तारीं दिनानाथा । ब्रीदें साच करीं आता ॥ध्रु.॥

केल्या अपराधांच्या राशीं । ह्मणऊनि आलों तुजपाशीं ॥२॥

तुका ह्मणे मज तारीं । सांडीं ब्रीद नाहींतरी ॥३॥

हरिभक्त माझे जिवलग सोइरे । हृदयीं पाउले धरिन त्यांचे ॥१॥

अंतकाळीं येती माझ्या सोडवणे । मस्तक बैसणें देइन त्यांसी ॥ध्रु.॥

आणिक सोइरे सज्जन वो कोणी । वैष्णवांवांचोनि नाहीं मज ॥२॥

देइन आिंळगण धरीन चरण । संवसारसीण नासे तेणें ॥३॥

कंठीं तुळशीमाळा नामाचे धारक । ते माझे तारक भवनदीचे ॥४॥

तयांचे चरणीं घालीन मी मिठी । चाड हे वैकुंठीं नाहीं मज ॥५॥

अळसें दंभें भावें हरिचें नाम गाती । ते माझे सांगाती परलोकींचे ॥६॥

कायावाचामनें देइन क्षेम त्यासी । चाड जीवित्वासी नाहीं मज ॥७॥

हरिचें नाम मज म्हणविती कोणी । तया सुखा धणी धणी वरी ॥८॥

तुका ह्मणे तया उपकारें बांधलों। ह्मणऊनि आलों शरण संतां ॥९॥

लटिका तो प्रपंच एक हरि साचा । हरिविण आहाच सर्व इंिद्रयें ॥१॥

लटिकें तें मौन्य भ्रमाचें स्वप्न । हरिविण ध्यान नश्वर आहे ॥ध्रु.॥

लटिकिया विपित्त हरिविण करिती । हरि नाहीं चित्तीं तो शव जाणा ॥२॥

तुका ह्मणे हरि हें धरिसी निर्धारीं । तरीं तूं झडकरी जासी वैकुंठा ॥३॥

सर्वस्वा मुकावें तेणें हरीसी जिंकावें । अर्थ प्राण जीवें देहत्याग ॥१॥

मोह ममता माया चाड नाहीं चिंता । विषयकंदुवेथा जाळूनियां ॥ध्रु.॥

लोकलज्जा दंभ आणि अहंकार । करूनि मत्सर देशधडी ॥२॥

शांति क्षमा दया सखिया विनउनी । मूळ चक्रपाणी धाडी त्यांसी ॥३॥

तुका ह्मणे याती अक्षरें अभिमान । सांडोनिया शरण रिघें संतां ॥४॥

एकांतांचे सुख देइप मज देवा । आघात या जीवा चुकवूनि ॥१॥

ध्यानीं रूप वाचे नाम निरंतर । आपुला विसर पडों नेदीं ॥ध्रु.॥

मायबाळा भेटी सुखाची आवडी । तैशी मज गोडी देइप देवा ॥२॥

कीर्ती ऐकोनियां जालों शरणांगत । दासाचें तूं हित करितोसी ॥३॥

तुका ह्मणे मी तों दीन पापराशी । घालावें पाठीशी मायबापा ॥४॥

लटिकें तें ज्ञान लटिकें ते ध्यान । जरि हरिकिर्तन िप्रय नाहीं ॥१॥

लटिकें चि दंभ घातला दुकान । चाळविलें जन पोटासाटीं ॥ध्रु.॥

लटिकें चि केलें वेदपारायण । जरि नाहीं स्काुंफ्दन प्रेम कथे ॥२॥

लटिकें तें तप लटिका तो जप । अळस निद्रा झोप कथाकाळीं ॥३॥

नाम नावडे तो करील बाहेरी । नाहीं त्याची खरी चित्तशुद्धि ॥४॥

तुका ह्मणे ऐसीं गर्जती पुराणें । शिष्टांची वचनें मागिला ही ॥५॥

भूतीं भगवद्भाव । मात्रासहित जीव । अद्वैत ठाव । निरंजन एकला ॥१॥

ऐसीं गर्जती पुराणें । वेदवाणी सकळ जन । संत गर्जतील तेणें । अनुभवें निर्भर ॥ध्रु.॥

माझें तुझें हा विकार । निरसतां एकंकार । न लगे कांहीं फार । विचार चि करणें ॥२॥

तुका ह्मणे दुजें । हें तों नाहीं सहजें । संकल्पाच्या काजें । आपें आप वाढलें ॥३॥

नेणें काुंफ्कों कान । नाहीं एकांतींचें ज्ञान ॥१॥

तुह्मी आइका हो संत । माझा सादर वृत्तांत ॥ध्रु.॥

नाहीं देखिला तो डोळां। देव दाखवूं सकळां ॥२॥

चिंतनाच्या सुखें । तुका ह्मणे नेणें दुःखें ॥३॥

त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें ॥१॥

मग जैसा तैसा राहें । काय पाहें उरलें तें ॥ध्रु.॥

अंतरींचें विषम गाढें । येऊं पुढें नेदावें ॥२॥

तुका ह्मणे शुद्ध मन । समाधान पाहिजे ॥३॥

मातेचिये चित्तीं । अवघी बाळकाची व्याप्ति ॥१॥

देह विसरे आपुला । जवळीं घेतां सीण गेला ॥ध्रु.॥

दावी प्रेमभातें। आणि अंगावरि चढतें ॥२॥

तुका संतापुढें । पायीं झोंबे लाडें कोडें ॥३॥

कोणा पुण्या फळ आलें । आजि देखिलीं पाउलें ॥१॥

ऐसें नेणें नारायणा । संतीं सांभाळिलें दीना ॥ध्रु.॥

कोण लाभकाळ। दीन आजि मंगळ ॥२॥

तुका ह्मणे जाला । लाभ सहज विठ्ठला ॥३॥

मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची ॥१॥

एकाचिये अंगीं दुजियाचा वास । आशा पुढें नाश सिद्ध करी ॥ध्रु.॥

आधीं फळासी कोठें पावों शके । वासनेची भिकेवरी चाली ॥२॥

तुका ह्मणे राजहंस ढोरा नांव । काय तया घ्यावें अळंकाराचें ॥३॥

संसारापासूनि कैसें सोडविशी । न कळे हृषीकेशी काय जाणें । करितां न सरे अधिक वाट पाहीं ।

तृष्णा देशधडी केलों। भक्तिभजनभाव यांसी नाहीं ठाव । चरणीं तुझ्या अंतरलों।

मागें पुढें रीग न पुरे चि पाहातां । अवघा अवघीं वेष्टिलों ॥१॥

आतां माझी लाज राखें नारायणा । हीन हीन लीन याचकाची ।

करितां न कळे कांहीं असतील गुण दोष । करीं होळी संचिताची ॥ध्रु.॥

इंिद्रयें द्वारें मन धांवे सैरें । नांगवे करितां चि कांहीं । हात पाय कान मुख लिंगस्थान ।

नेत्र घ्राणद्वारें पाहीं । जया जैसी सोय तया तैसें होय। क्षण एक िस्थर नाहीं ।

करिती ताडातोडी ऐसी यांची खोडी। न चले माझें यास कांहीं ॥२॥

शरीरसंबंधु पुत्र पत्नी बंधु। धन लोभ मायावंत । जन लोकपाळ मैत्र हे सकळ ।

सोइरीं सज्जनें बहुतें । नाना कर्म डाय करिती उपाय । बुडावया घातपातें ।

तुका ह्मणे हरी राखे भलत्या परी । आह्मी तुझीं शरणागतें ॥३॥

नाम घेतां उठाउठीं । होय संसारासी तुटी ॥१॥

ऐसा लाभ बांधा गांठी । विठ्ठलपायीं पडे मिठी ॥ध्रु.॥

नामापरतें साधन नाहीं । जें तूं करिशी आणिक कांहीं ॥२॥

हाकारोनि सांगे तुका । नाम घेतां राहों नका ॥३॥

प्राण समर्पिला आह्मी । आतां उशीर कां स्वामी ॥१॥

माझें फेडावें उसणें । भार न मना या ॠणें ॥ध्रु.॥

जाला कंठस्फोट। जवळी पातलों निकट ॥२॥

तुका ह्मणे सेवा । कैसी बरी वाटे देवा ॥३॥

येणें मागॉ आले । त्यांचें निसंतान केलें ॥१॥

ऐसी अवघड वाट । कोणा सांगावा बोभाट ॥ध्रु.॥

नागविल्या थाटी । उरों नेदी च लंगोटी ॥२॥

तुका ह्मणे चोर । तो हा उभा कटिकर ॥३॥

तोंवरि तोंवरि जंबुक करि गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ॥१॥

तोंवरि तोवरिं सिंधु करि गर्जना । जंव त्या अगिस्तब्राह्मणा देखिलें नाहीं ॥ध्रु.॥

तोंवरि तोंवरि वैराग्याच्या गोष्टी। जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाहीं ॥२॥

तोंवरि तोंवरि शूरत्वाच्या गोष्टी । जंव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाहीं ॥३॥

तोंवरि तोंवरि माळामुद्रांचीं भूषणें । जंव तुक्याचें दर्शन जालें नाहीं ॥४॥

तोंवरि तोंवरि शोभतील गारा । जंव नाहीं हिरा प्रकाशला ॥१॥

तोंवरि तोंवरि शोभतील दीपिका । नुगवता एका भास्करासी ॥२॥

तोंवरि तोंवरि सांगती संताचिया गोष्टी । जंव नाहीं भेटी तुक्यासवें ॥३॥

धरोनि दोन्ही रूपें पाळणें संहार । करी कोप रुद्र दयाळ विष्णु ॥१॥

जटाजूट एका मुगुट माथां शिरीं । कमळापति गौरीहर एक ॥ध्रु.॥

भस्मउद्धळण लक्ष्मीचा भोग । शंकर श्रीरंग उभयरूपीं ॥२॥

वैजयंती माळा वासुगीचा हार । लेणें अळंकार हरिहरा ॥३॥

कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर ॥४॥

तुका ह्मणे मज उभयरूपीं एक । सारोनि संकल्प शरण आलों ॥५॥

उचिताचा भाग होतों राखोनियां । दिसती ते वांयां कष्ट गेले ॥१॥

वचनाची कांहीं राहे चि ना रुचि । खळाऐसें वाची कुची जालें ॥ध्रु.॥

विश्वासानें माझें बुडविलें घर । करविला धीर येथवरी ॥२॥

तुका ह्मणे शेकीं थार नाहीं बुड । कैसें तुह्मीं कोड पुरविलें ॥३॥

लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले ॥१॥

खायाचा वोळसा शिव्या दे जनाला । ऐशा तापशाला बोध कैंचा ॥ध्रु.॥

सेवी भांग अफू तमाखू उदंड । परि तो अखंड भ्रांतीमाजी ॥२॥

तुका ह्मणे ऐसा सर्वस्वें बुडाला । त्यासी अंतरला पांडुरंग ॥३॥

अवघीं च तीथॉ घडलीं एकवेळा । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥१॥

अवघीं च पापें गेलीं दिगांतरीं । वैकुंठ पंढरी देखिलिया ॥ध्रु.॥

अवघिया संतां एकवेळा भेटी । पुंडलीक दृष्टी देखिलिया ॥२॥

तुका ह्मणे जन्मा आल्याचें सार्थक । विठ्ठल चि एक देखिलिया ॥३॥

सदा सर्वकाळ अंतरीं कुटिल । तेणें गळां माळ घालूं नये ॥१॥

ज्यासी नाहीं दया क्षमा शांति । तेणें अंगीं विभूती लावूं नये ॥ध्रु.॥

जयासी न कळे भक्तीचें महिमान । तेणें ब्रह्मज्ञान बोलों नये ॥२॥

ज्याचें मन नाहीं लागलें हातासी । तेणें प्रपंचासी टाकुं नये ॥३॥

तुका ह्मणे ज्यासी नाहीं हरिभक्ति । तेणें भगवें हातीं धरूं नये ॥४॥

आह्मी असों नििंश्चतीनें । एक्या गुणें तुमचिया ॥१॥

दुराचारी तरले नामें । घेतां प्रेम ह्मणोनि ॥ध्रु.॥

नाहीं तुह्मां धांव घेता। कृपावंता आळस ॥२॥

तुका ह्मणे विसरूं कांहीं । तुज वो आई विठ्ठले ॥३॥

अनुभवें वदे वाणी । अंतर ध्यानीं आपुलें ॥१॥

कैंची चिका दुधचवी । जरी दावी पांढरें ॥ध्रु.॥

जातीऐसा दावी रंग। बहु जग या नावें ॥२॥

तुका ह्मणे खद्योत ते । ढुंगाभोंवतें आपुलिया ॥३॥

परपीडक तो आह्मां दावेदार । विश्वीं विश्वंभर ह्मणऊनि ॥१॥

दंडूं त्यागूं बळें नावलोकुं डोळा । राखूं तो चांडाळा ऐसा दुरि ॥ध्रु.॥

अनाचार कांहीं न साहे अवगुणें । बहु होय मन कासावीस ॥२॥

तुका ह्मणे माझी एकविध सेवा । विमुख ते देवा वाळी चित्तें ॥३॥

कांहीं न मागे कोणांसी । तो चि आवडे देवासी ॥१॥

देव तयासी ह्मणावें । त्याचे चरणीं लीन व्हावें ॥ध्रु.॥

भूतदया ज्याचे मनीं । त्याचे घरीं चक्रपाणी ॥२॥

नाहीं नाहीं त्यासमान । तुका ह्मणे मी जमान ॥३॥

नाम उच्चारितां कंटीं । पुढें उभा जगजेठी ॥१॥

ऐसें धरोनियां ध्यान । मनें करावें चिंतन ॥ध्रु.॥

ब्रह्मादिकांच्या ध्याना नये । तो हा कीर्तनाचे सोये ॥२॥

तुका ह्मणे सार घ्यावें । मनें हरिरूप पाहावें ॥३॥

आडलिया जना होसी सहाकारी । अंधिळयाकरीं काठी तूं चि ॥१॥

आडिले गांजिले पीडिले संसारीं । त्यांचा तूं कैवारी नारायणा ॥ध्रु.॥

प्रल्हाद महासंकटीं रिक्षला । तुह्मी अपंगिला नानापरी ॥२॥

आपुलें चि अंग तुह्मी वोडविलें । त्याचें निवारलें महा दुःख ॥३॥

तुका ह्मणे तुझे कृपे पार नाहीं । माझे विठाबाई जननीये ॥४॥

तपासी तें मन करूं पाहे घात । धरोनि सांगात इंिद्रयांचा ॥१॥

ह्मणोनि कीर्तन आवडलें मज । सांडोनियां लाज हें चि करी ॥ध्रु.॥

पाहातां आगमनिगमाचे ठाव । तेथें नाहीं भाव एकविध ॥२॥

तुका ह्मणे येथें नाहीं वो विकार । नाम एक सार विठोबाचें ॥३॥

गुरुशिष्यपण । हें तों अधमलक्षण ॥१॥

भूतीं नारायण खरा । आप तैसा चि दुसरा ॥ध्रु.॥

न कळतां दोरी साप। राहूं नेंदावा तो कांप ॥२॥

तुका ह्मणे गुणदोषी । ऐसें न पडावें सोसीं ॥३॥

अंगीकार ज्याचा केला नारायणें । निंद्य तें हि तेणें वंद्य केलें ॥१॥

अजामेळ भिल्ली तारीली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य केली ॥ध्रु.॥

ब्रह्महत्याराशी पातकें अपार । वाल्मीक किंकर वंद्य केला ॥२॥

तुका ह्मणे येथें भजन प्रमाण । काय थोरपण जाळावें तें ॥३॥

धनवंता घरीं । करी धन चि चाकरी ॥१॥

होय बैसल्या व्यापार । न लगे सांडावें चि घर ॥ध्रु.॥

रानीं वनीं दीपीं । असतीं तीं होतीं सोपीं ॥२॥

तुका ह्मणे मोल । देतां कांहीं नव्हे खोल ॥३॥

हा गे माझा अनुभव । भक्तिभाव भाग्याचा ॥१॥

केला ॠणी नारायण । नव्हे क्षण वेगळा ॥ध्रु.॥

घालोनियां भार माथा। अवघी चिंता वारली ॥२॥

तुका ह्मणे वचन साटीं । नाम कंठीं धरोनि ॥३॥

देव आहे सुकाळ देशीं । अभाग्यासी दुर्भिक्षा ॥१॥

नेणती हा करूं सांटा । भरले फांटा आडरानें ॥ध्रु.॥

वसवूनि असे घर । माग दूर घातला ॥२॥

तुका ह्मणे मन मुरे । मग जें उरे तें चि तूं ॥३॥

खुंटोनियां दोरी आपणियांपाशीं । वावडी आकाशीं मोकलिली ॥१॥

आपुलिया आहे मालासी जतन । गाहाणाचे ॠण बुडों नेणें ॥ध्रु.॥

बीज नेलें तेथें येईल अंकुर । जतन तें सार करा याची ॥२॥

तुका ह्मणे माझी नििंश्चतीची सेवा । वेगळें नाहीं देवा उरों दिलें ॥३॥

शाहाणपणें वेद मुका । गोपिका त्या ताकटी ॥१॥

कैसें येथें कैसें तेथें । शहाणे ते जाणती ॥ध्रु.॥

यज्ञामुखें खोडी काढी । कोण गोडी बोरांची ॥२॥

तुका ह्मणे भावाविण । अवघा सीण केला होय ॥३॥

मजुराचें पोट भरे । दाता उरे संचला ॥१॥

या रे या रे हातोहातीं । काय माती सारावी ॥ध्रु.॥

रोजकीदव होतां झाडा । रोकडा चि पर्वत ॥२॥

तुका ह्मणे खोल पाया । वेचों काया क्लेशेसीं ॥३॥

स्मशानीं आह्मां न्याहालीचें सुख । या नांवें कौतुक तुमची कृपा ॥१॥

नाहीं तरीं वांयां अवघें निर्फळ । शब्द ते पोकळ बडबड ॥ध्रु.॥

झाडें झुडें जीव सोइरे पाषाण । होती तइप दान तुह्मीं केलें ॥२॥

तुका ह्मणे आतां पाहे अनुभव । घेऊनि हातीं जीव पांडुरंगा ॥३॥

आमची जोडी ते देवाचे चरण । करावें चिंतन विठोबाचें ॥१॥

लागेल तरीं कोणी घ्यावें धणीवरी । आमुपचि परी आवडीच्या ॥ध्रु.॥

उभारिला कर प्रसिद्ध या जग । करूं केला त्याग मागें पुढें ॥२॥

तुका ह्मणे होय दरिद्र विच्छिन्न । ऐसे देऊं दान एकवेळे ॥३॥

दधिमाझी लोणी जाणती सकळ । तें काढी निराळें जाणे मथन ॥१॥

अिग्न काष्ठामाजी ऐसें जाणे जन । मथिलियाविण कैसा जाळी ॥ध्रु.॥

तुका ह्मणे मुख मळीण दर्पणीं । उजिळल्यावांचूनि कैसें भासे ॥२॥

नको नको मना गुंतूं मायाजाळीं । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥

काळाची हे उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ॥ध्रु.॥

सोडवीना राजा देशींचा चौधरी । आणीक सोइरीं भलीं भलीं ॥२॥

तुका ह्मणे तुला सोडवीना कोणी । एका चक्रपाणी वांचूनियां ॥३॥

पुढें जेणें लाभ घडे । तें चि वेडे नाशिती ॥१॥

येवढी कोठें नागवण । अंधारुण विष घ्यावें ॥ध्रु.॥

होणारासी मिळे बुद्धि । नेदी शुद्धी धरूं तें ॥२॥

तुका ह्मणे जना सोंग । दावी रंग आणीक ॥३॥

ऐका गा ए अवघे जन । शुद्ध मन तें हित ॥१॥

अवघा काळ नव्हे जरी । समयावरी जाणावें ॥ध्रु.॥

नाहीं कोणी सवें येता । संचिता या वेगळा ॥२॥

बरवा अवकाश आहे । करा साहे इंिद्रयें ॥३॥

कर्मभूमीऐसा ठाव । वेवसाव जाणावा ॥४॥

तुका ह्मणे उत्तम जोडी । जाती घडी नरदेह ॥५॥

संतसेवेसि अंग चोरी । दृष्टी न पडो तयावरी ॥१॥

ऐसियासी व्याली रांड । जळो जळो तिचें तोंड ॥ध्रु.॥

संतचरणीं ठेवितां भाव । आपेंआप भेटे देव ॥२॥

तुका ह्मणे संतसेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा ॥३॥

गेले पळाले दिवस रोज । काय ह्मणतोसि माझें माझें ॥१॥

सळे धरोनि बैसला काळ । फाकों नेदी घटिका पळ ॥ध्रु.॥

कां रे अद्यापि न कळे । केश फिरले कान डोळे ॥२॥

हित कळोनि असतां हातीं । तोंडीं पाडोनि घेसी माती ॥३॥

तुज ठाउकें मी जाणार । पाया शोधोनि बांधिसी घर ॥४॥

तुका ह्मणे वेगें । पंढरिराया शरण रिघें ॥५॥

आतां माझ्या मायबापा । तूं या पापा प्रायिश्चत्त ॥१॥

फजित हे केले खळ । तो विटाळ निवारीं ॥ध्रु.॥

प्रेम आतां पाजीं रस । करीं वास अंतरीं ॥२॥

तुका ह्मणे पांडुरंगा । जिवलगा माझिया ॥३॥

कां रे न पवसी धांवण्या । अंगराख्या नारायणा ॥१॥

अंगीं असोनियां बळ । होसी खट्याळ नाठ्याळ ॥ध्रु.॥

आह्मां नरकासी जातां । काय येइल तुझ्या हातां ॥२॥

तुका ह्मणे कान्हा। क्रियानष्टा नारायणा ॥३॥

माझे पाय तुझी डोई । ऐसें करिं गा भाक देइप ॥१॥

पाहतां तंव उफराटें । घडे तई भाग्य मोठें ॥ध्रु.॥

बहु साधन मोलाच। यासी जोडा दुजें कैचें ॥२॥

नका अनमानूं विठ्ठला । तुका ह्मणे धडा जाला ॥३॥

पवित्र तें अन्न । हरिचिंतनीं भोजन ॥१॥

येर वेठ्या पोट भरी । चाम मसकाचे परी ॥ध्रु.॥

जेऊनि तो धाला । हरिचिंतनीं केला काला ॥२॥

तुका ह्मणे चवी आलें । जें कां मिश्रित विठ्ठलें ॥३॥

चरणाचा महिमा । हा तो तुझ्या पुरुषोत्तमा ॥१॥

अंध पारखी माणिकें । बोलविशी स्पष्ट मुकें ॥ध्रु.॥

काय नाहीं सत्ता। हातीं तुझ्या पंढरीनाथा ॥२॥

तुका ह्मणे मूढा । मज चेष्टविलें जडा ॥३॥

बिळवंत कर्म । करी आपुला तो धर्म ॥१॥

पुढें घालुनियां सत्ता । न्यावें पतना पतिता ॥ध्रु.॥

आचरणें खोटीं । केलीं सलताती पोटीं ॥२॥

तुका ह्मणे देवा । नाहीं भजन केली सेवा ॥३॥

कैं वाहावें जीवन । कैं पलंगीं शयन ॥१॥

जैसी जैसी वेळ पडे । तैसें तैसें होणें घडे ॥ध्रु.॥

कैं भौज्य नानापरी । कैं कोरड्या भाकरी ॥२॥

कैं बसावें वहनीं । कैं पायीं अन्हवाणी ॥३॥

कैं उत्तम प्रावणॉ । कैं वसनें तीं जीणॉ ॥४॥

कैं सकळ संपत्ती । कैं भोगणें विपत्ती ॥५॥

कैं सज्जनाशीं संग । कैं दुर्जनाशीं योग ॥६॥

तुका ह्मणे जाण । सुख दुःख तें समान ॥७॥

उंचनिंच नेणे कांहीं भगवंत । तिष्ठे भाव भक्त देखोनियां ॥१॥

दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्या घरीं रक्षी प्रल्हादासी ॥ध्रु.॥

चर्म रंगूं लागे रोहिदासा संगीं । कबिराचे मागीं विणी शेले ॥२॥

सजनकसाया विकुं लागे मास । मळा सांवत्यास खुरपूं लागे ॥३॥

नरहरिसोनारा घडों काुंफ्कुं लागे । चोख्यामेऑया संगें ढोरें ओढी ॥४॥

नामयाची जनी सवें वेची शेणी । धर्मा घरीं पाणी वाहे झाडी ॥५॥

नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित । ज्ञानियाची भिंत अंगीं ओढी ॥६॥

अर्जुनाचीं घोडीं हाकी हा सारथी । भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची ॥७॥

गौळियांचे घरीं गाई अंगें वळी । द्वारपाळ बळीद्वारीं जाला ॥८॥

यंकोबाचें ॠण फेडी हृषीकेशी । आंबॠषीचे सोशी गर्भवास ॥९॥

मिराबाई साटीं घेतो विषप्याला । दामाजीचा जाला पाडेवार ॥१०॥

घडी माती वाहे गो†या कुंभाराची। हुंडी महत्याची अंगें भरी ॥११॥

पुंडलिकासाटीं अझूनि तिष्ठत । तुका ह्मणे मात धन्य याची ॥१२॥

भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥

पूर्णिमेचा चंद्र चकोराचें जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥

दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥२॥

भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥३॥

तुका ह्मणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥४॥

आले संत पाय ठेविती मस्तकीं । येहीं उभयलोकीं सरता केलों ॥१॥

वंदीन पाउलें लोळेन चरणीं । आजि इच्छाधणी फिटईल ॥ध्रु.॥

अवघीं पूर्व पुण्यें जालीं सानुकूळ । अवघें चि मंगळ संतभेटी ॥२॥

तुका ह्मणे कृतकृत्य जालों देवा । नेणें परि सेवा डोळां देखें ॥३॥

करीं धंदा परि आवडती पाय । प्रीती सांगों काय नेणां देवा ॥१॥

रूप डोळां देखें सदा सर्वकाळ । संपादितों आळ प्रपंचाचा ॥ध्रु.॥

नेमून ठेविली कारया कारणीं । आमुचिये वाणी गुण वदे ॥२॥

मनासीं उत्कंठा दर्शनाचा हेवा । नाहीं लोभ जीवा धन धान्य ॥३॥

उसंतितों पंथ वेठीचिया परी । जीवनसूत्र दोरीपाशीं ओढ ॥४॥

तुका ह्मणे ऐसें करितों निर्वाण । जीव तुह्मां भिन्न नाहीं माझा ॥५॥

कां रे माझीं पोरें ह्मणसील ढोरें । मायबाप खरें काय एक ॥१॥

कां रे गेलें ह्मणोनि करिसी तळमळ । मिथ्याचि कोल्हाळ मेलियाचा ॥ध्रु.॥

कां रे माझें माझें ह्मणसील गोत । नो संडविती दूत यमा हातीं ॥२॥

कां रे मी बिळया ह्मणविसी ऐसा । सरणापाशीं कैसा उचलविसी ॥३॥

तुका ह्मणे न धरीं भरवसा कांहीं । वेगीं शरण जाइप पांडुरंगा ॥4 ॥

अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि ॥१॥

ऐकोनियां माझीं करुणेचीं वचनें । व्हावें नारायणें उतावीळ ॥ध्रु.॥

मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥२॥

उशीर तो आतां न पाहिजे केला । अहो जी विठ्ठला मायबापा ॥३॥

उरलें तें एक हें चि मज आतां । अवघें विचारितां शून्य जालें ॥४॥

तुका ह्मणे आतां करीं कृपादान । पाउलें समान दावीं डोळां ॥५॥

न मनीं ते ज्ञानी न मनीं ते पंडित । ऐसे परीचे एकएका भावें ॥१॥

धातू पोसोनियां आणिकां उपदेश । अंतरीं तो लेश प्रेम नाहीं ॥ध्रु.॥

न मनीं ते योगी न मनीं ते हरिदास । दर्शनें बहुवस बहुतां परीचीं ॥२॥

तुका ह्मणे तयां नमन बाह्यात्कारी । आवडती परी चित्तशुद्धीचे ॥३॥

कासिया पाषाण पूजिती पितळ । अष्ट धातु खळ भावें विण ॥१॥

भाव चि कारण भाव चि कारण । मोक्षाचें साधन बोलियेलें ॥ध्रु.॥

काय करिल जपमाळा कंठमाळा । करिशी वेळोवेळां विषयजप ॥२॥

काय करिशील पंडित हे वाणी । अक्षराभिमानी थोर होय ॥३॥

काय करिशील कुशल गायन । अंतरीं मळीण कुबुद्धि ते ॥४॥

तुका ह्मणे भाव नाहीं करी सेवा । तेणें काय देवा योग्य होशी ॥५॥

अंतरींचें गोड । राहें आवडीचें कोड ॥१॥

संघष्टणें येती अंगा । गुणदोष मनभंगा ॥ध्रु.॥

उचिताच्या कळा । नाहीं कळती सकळा ॥२॥

तुका ह्मणे अभावना । भावीं मूळ तें पतना ॥३॥

शिळा जया देव । तैसा फळे त्याचा भाव ॥१॥

होय जतन तें गोड । अंतरा येती नाड ॥ध्रु.॥

देव जोडे भावें । इच्छेचें तें प्रेम घ्यावें ॥२॥

तुका ह्मणे मोड दावी । तैशीं फळें आलीं व्हावीं ॥३॥

कासया जी ऐसा माझे माथां ठेवा । भार तुह्मी देवा संतजन ॥१॥

विचित्र विंदानी नानाकळा खेळ । नाचवी पुतळे नारायण ॥ध्रु.॥

काय वानरांची अंगींची ते शक्ति । उदका तरती वरी शिळा ॥२॥

तुका ह्मणे करी निमित्य चि आड । चेष्टवूनि जड दावी पुढें ॥३॥

पायां पडावें हें माझें भांडवल । सरती हे बोल कोठें पायीं ॥१॥

तरि हे सलगी कवतुक केलें । लडिवाळ धाकुलें असें बाळ ॥ध्रु.॥

काय उणें तुह्मां संताचिये घरीं । विदित या परी सकळ ही ॥२॥

तुका ह्मणे माझें उचित हे सेवा । नये करूं ठेवाठेवी कांहीं ॥३॥

वदवावी वाणी माझी कृपावंता । वागपुष्प संतां समर्पीशी ॥१॥

सर्वसंकटाचा तुह्मां परिहार । घालावा म्यां भार पांडुरंगा ॥ध्रु.॥

एकसरें चिंता ठेवूनियां पायीं । जालों उतराई होतों तेणें ॥२॥

तुका ह्मणे येथें जालें अवसान । काया वाचा मन वेचूनियां ॥३॥

नमावे पाय हें माझें उचित । आशीर्वादें हित तुमचिया ॥१॥

कृपेचा वोरस न समाये पोटीं । ह्मणोनि उफराटीं वचनें हीं ॥ध्रु.॥

तुमची उष्टावळी हें माझें भोजन । झाडावें अंगण केरपुंजे ॥२॥

परि ऐसें पुण्य नाहीं माझें गांठीं । जेणें पडे मिठी पायांसवें ॥३॥

तुका ह्मणे राहे आठवण चित्तीं । ऐशी कृपा संतीं केली तुह्मीं ॥४॥

माझिया मीपणावर पडों पाषाण । जळो हें भूषण नाम माझें ।

पापा नाहीं पार दुःखाचे डोंगर । जालों ये भूमीसी ओझें ॥१॥

काय विटंबना सांगों किती । पाषाण फुटती ऐसें दुःख ।

नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती माझें मुख ॥ध्रु.॥

काया वाचा मनें अघटित करणें चर्मचक्षु हात पाय ।

निंदा द्वेष घात विश्वासीं व्यभिचार । आणीक सांगों किती काय ॥२॥

लक्ष्मीमदें मातें घडले महा दोष । पत्नी दोनी भेदभेद ।

पितृवचन घडली अवज्ञा अविचार। कुटिल कचर वादी निंद्य ॥३॥

आणीक किती सांगों ते अवगुण । न वळे जिव्हा कांपे मन ।

भुतदया उपकार नाहीं शब्दा धीर । विषयीं लंपट हीन ॥४॥

संत महानुभाव ऐका हें उत्तरें। अवगुण अविचारें वृद्धि पापा ।

तुका ह्मणे सरतें करा पांडुरंगीं । शरण आलों मायबापा ॥५॥

फिराविलीं दोनी । कन्या आणि चक्रपाणी ॥१॥

जाला आनंदें आनंद । अवतरले गोविंद ॥ध्रु.॥

तुटलीं बंधनें । वसुदेवदेवकीचीं दर्शनें ॥२॥

गोकुळासी आलें । ब्रह्म अव्यक्त चांगलें ॥३॥

नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपती ॥४॥

निशीं जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥५॥

आनंदली मही । भार गेला सकळ ही ॥६॥

तुका ह्मणे कंसा । आट भोविला वळसा ॥७॥

सोडियेल्या गांठी । दरुषणें कृष्णभेटी ॥१॥

करिती नारी अक्षवाणें । जीवभाव देती दानें ॥ध्रु.॥

उपजल्या काळें । रूपें मोहीलीं सकळें ॥२॥

तुका तेथें वारी ॥एकी आडोनि दुसरी ॥३॥

मुख डोळां पाहे । तैशी च ते उभी राहे ॥१॥

केल्याविण नव्हे हातीं । धरोनि आरती परती ॥ध्रु.॥

न धरिती मनीं। कांहीं संकोच दाटणी ॥२॥

तुका ह्मणें देवें । ओस केल्या देहभावें ॥३॥

गोकुळीच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥

बाळकृष्ण नंदा घरीं । आनंदल्या नरनारी ॥ध्रु.॥

गुढिया तोरणें । करिती कथा गाती गाणें ॥२॥

तुका ह्मणे छंदें । येणें वेधिलीं गोविंदें ॥३॥

विटंबिलें भट । दिला पाठीवरी पाट ॥१॥

खोटें जाणोनि अंतर । न साहे चि विश्वंभर ॥ध्रु.॥

तें चि करी दान । जैसें आइके वचन ॥२॥

तुका ह्मणे देवें । पूतना शोषियेली जीवें ॥३॥

प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें। शुद्धी देशकाळाची ॥१॥

मुक्त लज्जाविरहित । भाग्यवंत हरिभक्त। जाले वोसंडत । नामकीर्तिपवाडे ॥ध्रु.॥

जोडी जाली अविनाश । जन्मोनि जाले हरिसे दास । त्यांस नव्हे गर्भवास । परब्रह्मीं सौरस ॥२॥

हे चि वाहाती संकल्प । पुण्यप्रसंगाचे जप । तुका ह्मणे पाप । गांवीं नाहीं हरिजना ॥३॥

तो चि लटिक्यामाजी भला । ह्मणे देव म्यां देखिला ॥१॥

ऐशियाच्या उपदेशें । भवबंधन कैसें नासे ।

बुडवी आपणासरिसे । अभिमानें आणिकांस ॥ध्रु.॥

आणिक नाहीं जोडा । देव ह्मणवितां या मूढा ॥२॥

आणिकांचे न मनी साचें । तुका ह्मणे या श्रेष्ठांचें ॥३॥

होईल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥

येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥

धाला आणिकांची नेणे तान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥२॥

तुका ह्मणे येथें पाहिजे अनुभव । शब्दाचें गौरव कामा नये ॥३॥

कां न वजावें बैसोनि कथे । ऐसें ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथें । उभा असे तिष्ठत ॥१॥

ह्मणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर । भवसिंधुपार । असेल ज्या तरणें ॥ध्रु.॥

कथे कांहीं अणुमात्र। नो बोलावें हा वृत्तांत । देवभक्तां चित्त । समरसीं खंडणा ॥२॥

कां वैष्णवा पूजावें । ऐका घेईल जो भावें । चरणरजा शिवें । वोडविला मस्तक ॥३॥

ऐसें जाणा हे निभ्रांत । देव वैष्णवांचा अंकित । अलिप्त अतीत । परमित त्यासाठीं ॥४॥

घालोनि लोळणा। तुका आला लोटांगणीं । वंदी पायवणीं । संतचरणींचें माथां ॥५॥

अनुभवें आलें अंगा । तें या जगा देतसें ॥१॥

नव्हती हाततुके बोल । मूळ ओल अंतरिंची ॥ध्रु.॥

उतरूनि दिलें कशीं । शुद्धरसीं सरे तें ॥२॥

तुका ह्मणे दुसरें नाहीं । ऐसी ग्वाही गुजरली ॥३॥

साधकाची दशा उदास असावी । उपाधि नसावी अंतर्बाही ॥१॥

लोलुपता काय निद्रेतें जिणावें । भोजन करावें परमित ॥ध्रु.॥

एकांतीीं लोकांतीं िस्त्रयांशीं वचन । प्राण गेल्या जाण बोलों नये ॥२॥

संग सज्जनाचा उच्चार नामाचा । घोष कीर्तनाचा अहर्निशीं ॥३॥

तुका ह्मणे ऐसा साधनीं जो राहे । तो चि ज्ञान लाहे गुरुकृपा ॥४॥

अंतरींची ज्योती प्रकाशली दीप्ति । मुळींची जे होती आच्छादिली ॥१॥

तेथींचा आनंद ब्रह्मांडीं न माये । उपमेशीं काये देऊं सुखा ॥ध्रु.॥

भावाचे मथिलें निर्गुण संचलें । तें हें उभें केलें विटेवरी ॥२॥

तुरा ह्मणे आह्मां ब्रह्मांड पंढरी । प्रेमाची जे थोरी सांठवण ॥३॥

कासया गा मज घातलें संसारीं । चित्त पायांवरी नाहीं तुझ्या ॥१॥

कासया गा मज घातलें या जन्मा । नाहीं तुझा प्रेमा नित्य नवा ॥ध्रु.॥

नामाविण माझी वाचा अमंगळ । ऐसा कां चांडाळ निर्मियेलें ॥२॥

तुका ह्मणे माझी जळो जळो काया । विठ्ठला सखया वांचूनियां ॥३॥

प्रारब्धें चि जोडे धन । प्रारब्धें चि वाडे मान ॥१॥

सोस करिसी वांयां । भज मना पंढरीराया ॥ध्रु.॥

प्रारब्धें चि होय सुख। प्रारब्धें चि पावे दुःख ॥२॥

प्रारब्धें चि भरे पोट । तुका करीना बोभाट ॥३॥

हीन माझी याति । वरी स्तुती केली संतीं ॥१॥

अंगीं वसूं पाहे गर्व । माझें हरावया सर्व ॥ध्रु.॥

मी एक जाणता । ऐसें वाटतसे चित्ता ॥२॥

राख राख गेलों वांयां । तुका ह्मणे पंढरीराया ॥३॥

तपाचे सायास । न लगे घेणें वनवास ॥१॥

ऐसें कळलें आह्मां एक । जालों नामाचे धारक ॥ध्रु.॥

जाळीं महाकर्में । दावीं निजसुख धर्में ॥२॥

तुका ह्मणे येणें । किळकाळ तें ठेंगणें ॥३॥

माता कापी गळा । तेथें कोण राखी बाळा ॥१॥

हें कां नेणां नारायणा । मज चाळवितां दिना ॥ध्रु.॥

नागवी धावणें । तेथें साह्य व्हावें कोणें ॥२॥

राजा सर्व हरी । तेथें दुजा कोण वारी ॥३॥

तुझ्या केल्याविण । नव्हे िस्थर वश जन ॥४॥

तुका ह्मणे हरी। सूत्र तुह्मां हातीं दोरी ॥५॥

गाऊं नेणें परी मी कांहीं गाईन । शरण जाईन पांडुरंगा ॥१॥

ब्रह्मांडनायक मी त्याचा अंकित । काय यमदूत करिती काळ ॥ध्रु.॥

वश्या ज्याच्या नामें तारिली गणिका । अजामेळासारिखा पापरासीं ॥२॥

चरणींच्या रजें अहिल्या तारिली। रूपवंत केली कुबजा क्षणें ॥३॥

पृथिवी तारिली पाताळासी जातां। तुका ह्मणे आतां आह्मी किती ॥४॥

गाजराची पुंगी । तैसे नवे जाले जोगी ॥१॥

काय करोनि पठन । केली अहंता जतन ॥ध्रु.॥

अल्प असे ज्ञान । अंगीं ताठा अभिमान ॥२॥

तुका ह्मणे लंड । त्याचें हाणोनि फोडा तोंड ॥३॥

परद्रव्य परनारी । अभिळासूनि नाक धरी ॥१॥

जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर ॥ध्रु.॥

सोहोऑयाची िस्थती । क्रोधें विटाळला चित्तीं ॥२॥

तुका ह्मणे सोंग । दावी बाहेरील रंग ॥३॥

टिळा टोपी उंच दावी । जगीं मी एक गोसावी ॥१॥

अवघा वरपंग सारा । पोटीं विषयांचा थारा ॥ध्रु.॥

मुद्रा लावितां कोरोनि । मान व्हावयासी जनीं ॥२॥

तुका ह्मणे ऐसे किती । नरका गेले पुढें जाती ॥३॥

ऐसे संत जाले कळीं । तोंडीं तमाखूची नळी ॥१॥

स्नानसंध्या बुडविली । पुढें भांग वोडवली ॥ध्रु.॥

भांगभुर्का हें साधन। पची पडे मद्यपान ॥२॥

तुका ह्मणे अवघें सोंग । तेथें कैचा पांडुरंग ॥३॥

जातीची शिंदळी । तिला कोण वंशावळी ॥१॥

आपघर ना बापघर । चित्तीं मनीं व्यभिचार ॥ध्रु.॥

सेजे असोनियां धणी । परद्वार मना आणी ॥२॥

तुका ह्मणे असील जाती । जातीसाठीं खाती माती ॥३॥

अंधऑयाची काठी । हिरोनियां कडा लोटी ॥१॥

हें कां देखण्या उचित । लाभ किंवा कांहीं हित ॥ध्रु.॥

साकर ह्मणोनि माती । चाळवूनि द्यावी हातीं ॥२॥

तुका ह्मणे वाटे । देवा पसरावे सराटे ॥३॥

प्रीतिचिया बोला नाहीं पेसपाड । भलतसें गोड करूनि घेई ॥१॥

तैसें विठ्ठलराया तुज मज आहे । आवडीनें गायें नाम तुझें ॥ध्रु.॥

वेडे वांकडे बाळकाचे बोल । करिती नवल मायबाप ॥२॥

तुका ह्मणे तुज येवो माझी दया । जीवींच्या सखया जिवलगा ॥३॥

माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥१॥

आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं ॥ध्रु.॥

वाचा वदे परी करणें कठीण । इंिद्रयां अधीन जालों देवा ॥२॥

तुका ह्मणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा ॥३॥

वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगों नये ॥१॥

उदंड चि जाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले राव रंक ॥ध्रु.॥

त्यांचें नाम कोणी नेघे चराचरीं । साही वेद चारी वर्णिताती ॥२॥

अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावें ॥३॥

तुका ह्मणे तुझी विठ्ठल चित्तीं ध्यातां । जन्ममरण व्यथा दूर होती ॥४॥

नको देऊं देवा पोटीं हें संतान । मायाजाळें जाण नाठवसी ॥१॥

नको देऊं देवा द्रव्य आणि भाग्य । तो एक उद्वेग होय जीवा ॥२॥

तुका ह्मणे करीं फकिराचे परी । रात्रदिवस हरि येइल घरा ॥३॥

जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥१॥

उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥

परउपकारी नेणें परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ॥२॥

भूतदया गाईपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी ॥३॥

शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्व वडिलांचें ॥४॥

तुका ह्मणे हें चि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥५॥

हरि ह्मणतां गति पातकें नासती । किळकाळ कांपती हरि ह्मणतां ॥१॥

हरि ह्मणतां भुक्ति हरि ह्मणतां मुक्ति । चुके यातायाती हरि ह्मणतां ॥ध्रु.॥

तपें अनुष्ठानें न लगती साधनें । तुटती बंधनें हरि ह्मणतां ॥२॥

तुका ह्मणे भावें जपा हरिचें नाम । मग काळयम शरण तुह्मा ॥३॥

नये वांटूं मन । कांहीं न देखावें भिन्न ॥१॥

पाय विठोबाचे चित्तीं । असों द्यावे दिवसराती ॥ध्रु.॥

नये काकुळती । कोणा यावें हरिभक्ति ॥२॥

तुका ह्मणे साई । करील कृपेची विठाई ॥३॥

सकळ देवांचें दैवत । उभें असे रंगा आंत ॥१॥

रंगा लुटा माझे बाप । शुद्ध भाव खरें माप ॥ध्रु.॥

रंग लुटिला बहुतीं । शुक नारदादि संतीं ॥२॥

तुका लुटितां हे रंग । साह्य जाला पांडुरंग ॥३॥

उशीर कां केला । कृपाळुवा विठ्ठला ॥१॥

मज दिलें कोणा हातीं । काय मानिली नििंश्चती ॥ध्रु.॥

कोठवरी धरूं धीर । आतां मन करूं िस्थर ॥२॥

तुका ह्मणे जीव । ऐसी भाकितसे कींव ॥३॥

तुका वेडा अविचार । करी बडबड फार ॥१॥

नित्य वाचे हा चि छंद । राम कृष्ण हरि गोविंद ॥ध्रु.॥

धरी पांडुरंगीं भाव। आणीक नेणें दुजा देव ॥२॥

गुरुज्ञान सर्वा ठायीं । दुजें न विचारी कांहीं ॥३॥

बोल नाईके कोणाचे । कथे नागवा चि नाचे ॥४॥

संगउपचारें कांटाळे । सुखें भलते ठायीं लोळे ॥५॥

कांहीं उपदेशिलें नेणे । वाचे विठ्ठल विठ्ठल ह्मणे ॥६॥

केला बहुतीं फजित । तरी हें चि करी नित्य ॥७॥

अहो पंडितजन । तुका टाकावा थुंकोन ॥८॥

आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा जाली धणी ॥१॥

अंतरीं पापाच्या कोडी । वरिवरि बोडी डोई दाढी ॥ध्रु.॥

बोडिलें तें निघालें । काय पालटलें सांग वहिलें ॥२॥

पाप गेल्याची काय खुण । नाहीं पालटले अवगुण ॥३॥

भक्तिभावें विण । तुका ह्मणे अवघा सीण ॥४॥

तुज घालोनियां पूजितों संपुष्टीं । परि तुझ्या पोटीं चवदा भुवनें ॥१॥

तुज नाचऊनि दाखवूं कौतुका । परी रूपरेखा नाहीं तुज ॥ध्रु.॥

तुजलागीं आह्मी गात असों गीत । परी तूं अतीत शब्दाहूनि ॥२॥

तुजलागीं आह्मीं घातियेल्या माळा । परि तूं वेगळा कर्तृत्वासी ॥३॥

तुका ह्मणे आतां होऊनि परमित । माझें कांहीं हित विचारावें ॥४॥

पापाची मी राशी । सेवाचोर पायांपाशीं ॥१॥

करा दंड नारायणा । माझ्या मनाची खंडणा ॥ध्रु.॥

जना हातीं सेवा । घेतों लंडपणें देवा ॥२॥

तुझा ना संसार । तुका दोहींकडे चोर ॥३॥

दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ॥१॥

ध्यान लागो ऐसें हरी । तुझे चरणीं तैशापरी ॥ध्रु.॥

आवंतण्याची आस । जैसी लागे दुर्बळासी ॥२॥

लोभ्या कळांतराची आस । बोटें मोजी दिवस मास ॥३॥

तुका ह्मणे पंढरीनाथा । मजला आणिक नको व्यथा ॥४॥

लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥१॥

विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वगाअ नाहीं ॥ध्रु.॥

कृष्ण विष्णु हरि गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥

सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरिनामें ॥३॥

तुका ह्मणे नामापाशीं चारी मुक्ति । ऐसें बहुग्रंथीं बोलियेलें ॥४॥

लटिकें हासें लटिकें रडें । लटिकें उडें लटिक्यापें ॥१॥

लटिकें माझें लटिकें तुझें । लटिकें ओझें लटिक्याचें ॥ध्रु.॥

लटिकें गायें लटिकें ध्यायें । लटिकें जायें लटिक्यापें ॥३॥

लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जग माया ॥३॥

लटिका तुका लटिक्या भावें । लटिकें बोले लटिक्यासवें ॥४॥

जालों म्हणती त्याचें मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन माझें ॥१॥

शिजलिया अन्ना ग्वाही दांत हात । जिव्हेसी चाखत न कळे कैसें ॥ध्रु.॥

तापलिया तेली बावन चंदन । बुंद एक क्षण शीतळ करी ॥२॥

पारखी तो जाणे अंतरींचा भेद । मूढजना छंद लावण्यांचा ॥३॥

तुका ह्मणे कसीं निवडे आपण । शुद्ध मंद हीन जैसें तैसें ॥४॥

हे चि थोर भक्ति आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥

ठेविलें अनंतें तैसें चि राह वें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥

वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥

तुका ह्मणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥

जन्मा येणें घडे पातकाचे मूळें । संचिताचें फळ आपुलिया ॥१॥

मग वांयांविण दुःख वाहों नये । रुसोनियां काय देवावरी ॥ध्रु.॥

ठाउका चि आहे संसार दुःखाचा । चित्तीं सीण याचा वाहों नये ॥२॥

तुका ह्मणे नाम त्याचें आठवावें । तेणें विसरावें जन्मदुःख ॥३॥

आतां माझे नका वाणूं गुण दोष । करितों उपदेश याचा कांहीं ॥१॥

मानदंभासाठीं छळीतसें कोणा । आण या चरणां विठोबाची ॥२॥

तुका ह्मणे हें तों ठावें पांडुरंगा । काय कळे जगा अंतरींचें ॥३॥

काय माझें नेती वाईट ह्मणोन । करूं समाधान कशासाटीं ॥१॥

काय मज लोक नेती परलोका । जातां कोणा एका निवारेल ॥ध्रु.॥

न ह्मणें कोणासी उत्तम वाईट । सुखें माझी कूट खावो मागें ॥२॥

सर्व माझा भार असे पांडुरंगा । काय माझें जगासवें काज ॥३॥

तुका ह्मणे माझें सर्व ही साधन । नामसंकीर्त्तन विठोबाचें ॥४॥

देवांनीं स्वामींस चिंचवडास नेलें होतें ते अभंग, आरत्या ॥ 13

वांजा गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥१॥

ऐसें मागत नाहीं तुज । चरण दाखवावे मज ॥ध्रु.॥

चातक पाखरूं। त्यासी वर्षे मेघधारु ॥ ॥

पक्षी राजहंस । अमोलिक मोतीं त्यास ॥३॥

तुका ह्मणे देवा । कां गा खोचलासी जीवा ॥४॥

परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥१॥

न लगे रुसावें धरावा संकोच । सहज तें नीच आलें भागा ॥ध्रु.॥

पडिलिये ठायीं उिच्छष्ट सेवावें । आरते तें चि देवें केलें ऐसें ॥२॥

तुका ह्मणे तुह्मी आह्मां जी वेगळे । केलेती निराळे द्विज देवें ॥३॥

चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं ॥१॥

देव ह्मणती तुक्या एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागवलों ॥ध्रु.॥

वाडवेळ जाला सिळें जालें अन्न । तटस्थ ब्राह्मण बैसलेती ॥२॥

तुका ह्मणे देवा तुमच्या सुकृतें । आणीन त्वरित मोरयासी ॥३॥

भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । ह्मणोनि प्राणाहुती घेतलिया ॥१॥

भर्ता आणि भोक्ता कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥ध्रु.॥

विश्वंभर कृपादृष्टी सांभाळीत । प्रार्थना करीत ब्राह्मणांची ॥२॥

कवळोकवळीं नाम घ्या गोविंदाचें । भोजन भक्तांचें तुका ह्मणे ॥३॥

माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥१॥

तीथॉ तुमच्या चरणीं जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं ॥२॥

तुका ह्मणे तुह्मी देवा द्विजवंद्य । मी तों काय निंद्य हीन याति ॥३॥

वंदिलें वंदावें जीवाचिये साटीं । किंवा बरी तुटी आरंभीं च ॥१॥

स्वहिताची चाड ते ऐका हे बोल । अवघें चि मोल धीरा अंगीं ॥ध्रु.॥

सिंपिलें तें रोंप वरीवरी बरें । वाळलिया वरी कोंभ नये ॥२॥

तुका ह्मणे टाकीघायें देवपण । फुटलिया जन कुला पुसी ॥३॥

आह्मां विष्णुदासां हें चि भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥१॥

वाणी नाहीं घ्यावें आपुलिया हातें । करोनियां चित्तें समाधान ॥२॥

तुका ह्मणे द्रव्य मेळविलें मागें । हें तों कोणासंगें आलें नाहीं ॥३॥

सुखाचे व्यवहारीं सुखलाभ जाला । आनंदें कोंदला मागें पुढें ॥१॥

संगती पंगती देवासवें घडे । नित्यानित्य पडे तें चि सांचा ॥ध्रु.॥

समर्थचे घरीं सकळ संपदा । नाहीं तुटी कदा कासयाची ॥२॥

तुका ह्मणे येथें लाभाचिया कोटी । बहु वाव पोटीं समर्थाचे ॥३॥

काय देवें खातां घेतलें हातींचें । आलें हें तयाचें थोर भय ॥१॥

ह्मणतां गजरें राम एकसरें । जळती पापें थोरें भयधाकें ॥ध्रु.॥

काय खोळंबले हात पाय अंग । नाशिलें हें सांग रूप काय ॥२॥

कोण लोकीं सांगा घातला बाहेरी । ह्मणतां हरि हरि तुका ह्मणे ॥३॥

उत्तम त्या याति । देवा शरण अनन्यगति ॥१॥

नाहीं दुजा ठाव । कांहीं उत्तम मध्यम भाव ॥ध्रु.॥

उमटती ठसे । ब्रह्मप्राप्ति अंगीं दिसे ॥२॥

भाविक विश्वासी।तुका ह्मणे नमन त्यांसी ॥३॥

ज्यासी नावडे एकादशी । तो जिता चि नरकवासी ॥१॥

ज्यासी नावडे हें व्रत । त्यासी नरक तो ही भीत ॥ध्रु.॥

ज्यासी मान्य एकादशी । तो जिता चि मुक्तवासी ॥२॥

ज्यासी घडे एकादशी । जाणें लागे विष्णुपाशीं ॥३॥

तुका ह्मणे पुण्यराशी । तो चि करी एकादशी ॥४॥

मुंगी होउनि साकर खावी । निजवस्तूची भेटी घ्यावी ॥१॥

वाळवंटी साकर पडे । गज येउनि काय रडे ॥ध्रु.॥

जाला हरिदास गोसांवी । अवघी मायिक क्रिया दावी ॥२॥

पाठ पाठांतरिक विद्या । जनरंजवणी संध्या ॥३॥

प्रेम नसतां अंगा आणी । दृढ भाव नाहीं मनीं ॥४॥

ब्रह्मज्ञान वाचे बोले । करणी पाहातां न निवती डोळे ॥५॥

मिथ्या भगल वाढविती । आपुली आपण पूजा घेती ॥६॥

तुका ह्मणे धाकुटें व्हावें । निजवस्तूसी मागुनि घ्यावें ॥७॥

भय हरिजनीं । कांहीं न धरावें मनीं ॥१॥

नारायण ऐसा सखा । काय जगाचा हा लेखा ॥ध्रु.॥

चित्त वित्त हेवा । समर्पून राहा देवा ॥२॥

तुका ह्मणे मन । असों द्यावें समाधान ॥३॥

आयुष्य मोजावया बैसला मापारी । तूं कां रे वेव्हारी संसाराचा ॥१॥

नेईल ओढोनि ठाउकें नसतां । न राहे दुश्चिता हरिविण ॥ध्रु.॥

कठीण हें दुःख यम जाचतील । कोण सोडवील तया ठायीं ॥२॥

राहतील दुरी सज्जन सोयरीं । आठवीं श्रीहरी लवलाहीं ॥३॥

तुका ह्मणे किती करिसी लंडायी । होईल भंडाई पुढें थोर ॥४॥

होऊं नको कांहीं या मना आधीन । नाइकें वचन याचें कांहीं ॥१॥

हटियाची गोष्टी मोडून टाकावी । सोई ही धरावी विठोबाची ॥ध्रु.॥

आपुले आधीन करूनियां ठेवा । नाहीं तरि जीवा घातक हें ॥२॥

तुका ह्मणे जाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥३॥

नामाविण काय वाउगी चावट । वांयां वटवट हरीविण ॥१॥

फुकट चि सांगे लोकाचिया गोष्टी । राम जगजेठी वाचे नये ॥ध्रु.॥

मेळवूनि चाट करी सुरापान । विषयांच्या गुणें माततसे ॥२॥

बैसोनि टवाळी करी दुजयाची । नाहीं गोविंदाची आठवण ॥३॥

बळें यम दांत खाय तयावरी । जंव भरे दोरी आयुष्याची ॥४॥

तुका ह्मणे तुला सोडवील कोण । नाहीं नारायण आठविला ॥५॥

संत गाती हरिकीर्त्तनीं । त्यांचें घेइन पायवणी ॥१॥

हें चि तप तीर्थ माझें । आणीक मी नेणें दुजें ॥ध्रु.॥

काया कुरवंडी करीन । संत महंत ओंवाळीन ॥२॥

संत महंत माझी पूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥३॥

तुका ह्मणे नेणें कांहीं । अवघें आहे संतापायीं ॥४॥

जालें भांडवल । अवघा पिकला विठ्ठल ॥१॥

आतां वाणी काशासाटीं । धीर धरावा च पोटीं ॥ध्रु.॥

आपुल्या संकोचें । ह्मणऊनि तेथें टांचे ॥२॥

घेतों ख†या मापें । तुका देखोनियां सोपें ॥३॥

शुद्ध ऐसें ब्रह्मज्ञान । करा मन सादर ॥१॥

रवि रसां सकळां शोषी । गुणदोषीं न लिंपे ॥ध्रु.॥

कोणासवें नाहीं चोरी । सकळांवरी समत्व ॥२॥

सत्य तरी ऐसें आहे । तुका पाहे उपदेशीं ॥३॥

अिग्न हा पाचारी कोणासी साक्षेपें । हिंवें तो चि तापे जाणोनियां ॥१॥

उदक ह्मणे काय या हो मज प्यावें । तृषित तो धांवे सेवावया ॥ध्रु.॥

काय वस्त्र ह्मणे यावो मज नेसा । आपुले स्वइच्छा जग वोढी ॥२॥

तुक्यास्वामी ह्मणे काय मज स्मरा । आपुल्या उद्धारा लागूनियां ॥३॥

भक्त देवाघरचा सुना । देव भक्ताचा पोसणा ॥१॥

येर येरां जडलें कैसें । जीवा अंगें जैसें तैसें ॥ध्रु.॥

देव भक्ताची कृपाळु माता । भक्त देवाचा जनिता ॥२॥

तुका ह्मणे अंगें । एक एकाचिया संगें ॥३॥

बरवयांबरवंट । विटे चरण सम नीट ॥१॥

ते म्या हृदयीं धरिले । तापशमन पाउलें ॥ध्रु.॥

सकळां तीर्थां अधिष्ठान । करी लक्षुमी संवाहन ॥२॥

तुका ह्मणे अंतीं । ठाव मागितला संतीं ॥३॥

मासं चर्म हाडें । देवा अवघीं च गोडें ॥१॥

जे जे हरिरंगीं रंगले । कांहीं न वचे वांयां गेले ॥ध्रु.॥

वेद खाय शंखासुर। त्याचें वागवी कलिवर ॥२॥

तुका ह्मणे ऐसा । बराडी हा भक्तिरसा ॥३॥

कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड ॥१॥

कैंचा राम अभागिया । करी कटकट वांयां ॥ध्रु.॥

स्मरणाचा राग । क्रोधें विटाळलें अंग ॥२॥

तुका ह्मणे जडा । काय चाले या दगडा ॥३॥

आपुलिया काजा । आह्मीं सांडियेलें लाजा ॥१॥

तुह्मां असों जागवीत । आपुलें आपुले हित ॥ध्रु.॥

तुह्मी देहशून्य। आह्मां कळे पाप पुण्य ॥२॥

सांगायासी लोकां । उरउरीत उरला तुका ॥३॥

मायबापें केवळ काशी । तेणें न वजावें तीर्थासी ॥१॥

पुंडलीकें काय केलें । परब्रह्म उभें ठेलें ॥ध्रु.॥

तैसा होइप सावधान। हृदयीं धरीं नारायण ॥२॥

तुका ह्मणे मायबापें । अवघीं देवाचीं स्वरूपें ॥३॥

सत्य आह्मां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी ॥१॥

ऐसें जाणा रे सकळ । भरा शुद्ध टांका मळ ॥ध्रु.॥

देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ॥२॥

तुका ह्मणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें ॥३॥

शिकवूनि हित । सोयी लावावे हे नीत ॥१॥

त्याग करूं नये खरें । ऐसें विचारावें बरें ॥ध्रु.॥

तुमचिया तोंडें । धर्माधर्म चि खंडे ॥२॥

मजसाटीं देवा । कां हो लपविला हेवा ॥३॥

जाला सावधान । त्यासी घालावें भोजन ॥४॥

तुका ह्मणे पिता । वरी बाळाच्या तो हिता ॥५॥

सुख सुखा भेटे । मग तोडिल्या न तुटे ॥१॥

रविरिश्मकळा । नये घालितां पैं डोळां ॥ध्रु.॥

दुरि तें जवळी । स्नेहें आकाशा कवळी ॥२॥

तुका ह्मणे चित्त । माझें पायीं अखंडित ॥३॥

तुह्मां न पडे वेच । माझा सरेल संकोच ॥१॥

फुकासाटीं जोडे यश । येथें कां करा आळस ॥ध्रु.॥

कृपेचें भुकेलें। होय जीवदान केलें ॥२॥

तुका ह्मणे शिकविलें । माझें ऐकावें विठ्ठलें ॥३॥

लोक ह्मणती मज देव । हा तों अधर्म उपाव ॥१॥

आतां कळेल तें करीं । सीस तुझे हातीं सुरी ॥ध्रु.॥

अधिकार नाहीं। पूजा करिती तैसा कांहीं ॥२॥

मन जाणे पापा । तुका ह्मणे मायबापा ॥३॥

एका ह्मणे भलें । आणिका सहज चि निंदिलें ॥१॥

कांहीं न करितां आयास । सहज घडले ते दोष ॥ध्रु.॥

बरें वाइटाचें। नाहीं मज कांहीं साचें ॥२॥

तुका ह्मणे वाणी । खंडोनि राहावें चिंतनीं ॥३॥

आणिलें सेवटा । आतां कामा नये फांटा ॥१॥

मज आपुलेंसें ह्मणा । उपरि या नारायणा ॥ध्रु.॥

वेचियेली वाणी । युक्ती अवघी चरणीं ॥२॥

तुका धरी पाय । क्षमा करवूनि अन्याय ॥३॥

न करा टांचणी । येथें कांहीं आडचणी ॥१॥

जिव्हा अमुप करी माप । विठ्ठल पिकला माझा बाप ॥२॥

तुका ह्मणे सर्वकाळ । अवघा गोविंद गोपाळ ॥३॥

तुझ्या नामाची आवडी । आह्मी विठो तुझीं वेडीं ॥१॥

आतां न वजों अणिकां ठायां । गाऊं गीत लागों पायां ॥ध्रु.॥

काय वैकुंठ बापुडें । तुझ्या प्रेमासुखापुढें ॥२॥

संतसमागममेळे । प्रेमसुखाचा सुकाळ ॥३॥

तुका ह्मणे तुझ्या पायीं । जन्ममरणा ठाव नाहीं ॥४॥

साकरेच्या योगें वर्ख । राजा कागदातें देखे ॥१॥

तैसें आह्मां मानुसपण । रामनाम केण्यागुणें ॥ध्रु.॥

फिरंगीच्या योगें करी । राजा काष्ठ हातीं धरी ॥२॥

रत्नकनका योगें लाख । कंठीं धरिती श्रीमंत लोक ॥३॥

देवा देवपाट देव्हा†यावरी बैसे स्पष्ट ॥४॥

ब्रह्मानंदयोगें तुका । पढीयंता सज्जन लोकां ॥५॥

धनवंतालागीं । सर्वमान्यता आहे जगीं ॥१॥

माता पिता बंधु जन । सर्व मानिती वचन ॥ध्रु.॥

जव मोठा चाले धंदा । तंव बहिण म्हणे दादा ॥२॥

सदा शृंगारभूषणें । कांता लवे बहुमानें ॥३॥

तुका ह्मणे धन । भाग्य अशाश्वत जाण ॥४॥

न विचारितां ठायाठाव । काय भुंके तो गाढव ॥१॥

केला तैसा लाहे दंड । खळ अविचारी लंड ॥ध्रु.॥

करावें लाताळें। ऐसें नेणे कोण्या काळें ॥२॥

न कळे उचित । तुका ह्मणे नीत हित ॥३॥

कंठ नामसिका । आतां किळकाळासी धका ॥१॥

रोखा माना कीं सिका माना । रोखा सिका तत्समाना ॥ध्रु.॥

रोखा न मना सिका न मना । जतन करा नाककाना ॥२॥

सिका न मनी रावण । त्याचें केलें निसंतान ॥३॥

सिका मानी हळाहळ । जालें सर्वांगीं शीतळ ॥४॥

तुका ह्मणे नाम सिका । पटीं बैसलों निजसुखा ॥५॥

भूतीं देव ह्मणोनि भेटतों या जना । नाहीं हे भावना नरनारी ॥१॥

जाणे भाव पांडुरंग अंतरींचा । नलगे द्यावा साचा परिहार ॥ध्रु.॥

दयेसाटीं केला उपाधिपसारा । जड जीवा तारा नाव कथा ॥२॥

तुका ह्मणे नाहीं पडत उपवास । फिरतसे आस धरोनियां ॥३॥

हारपल्याची नका चित्तीं । धरूं खंती वांयां च ॥१॥

पावलें तें ह्मणा देवा । सहज सेवा या नांवें ॥ध्रु.॥

होणार तें तें भोगें घडे । लाभ जोडे संकल्पें ॥२॥

तुका ह्मणे मोकळें मन । अवघें पुण्य या नांवें ॥३॥

नेसणें आलें होतें गऑया । लोक रऑया करिती ॥१॥

आपणियां सावरिलें । जग भलें आपण ॥ध्रु.॥

संबंध तो तुटला येणें । जागेपणें चेष्टाचा ॥२॥

भलती सेवा होती अंगें । बारस वेगें पडिलें ॥३॥

सावरिलें नीट वोजा । दृष्टिलाजा पुढिलांच्या ॥४॥

बरे उघडिले डोळे । हळहळेपासूनि ॥५॥

तुका ह्मणे विटंबना । नारायणा चुकली ॥६॥

जिव्हा जाणे फिकें मधुर क्षार । येर मास पर हातास न कळे ॥१॥

देखावें नेत्रीं बोलावें मुखें । चित्ता सुखदुःखें कळों येती ॥ध्रु.॥

परिमळासी घ्राण ऐकती श्रवण । एकाचे कारण एका नव्हे ॥२॥

एकदेहीं भिन्न ठेवियेल्या कळा । नाचवी पुतळा सूत्रधारी ॥३॥

तुका ह्मणे ऐशी जयाची सत्ता । कां तया अनंता विसरलेती ॥४॥

न लगे द्यावा जीव सहज चि जाणार । आहे तो विचार जाणा कांहीं ॥१॥

मरण जो मागे गाढवाचा बाळ । बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥२॥

तुका ह्मणे कइप होईल स्वहित । निधान जो थीत टाकुं पाहे ॥३॥

मोल वेचूनियां धुंडिती सेवका । आह्मी तरी फुका मागों बळें ॥१॥

नसतां जवळी हित फार करूं । जीव भाव धरूं तुझ्या पायीं ॥ध्रु.॥

नेदूं भोग आह्मी आपुल्या शरीरा । तुह्मांसी दातारा व्हावें म्हूण ॥२॥

कीर्ती तुझी करूं आमुचे सायास । तूं का रे उदास पांडुरंगा ॥३॥

तुका ह्मणे तुज काय मागों आह्मी । फुकाचे कां ना भी ह्मणसी ना ॥४॥

काय लवण किळकेविण । एके क्षीण सागरा ॥१॥

मां हे येवढी अडचण । नारायणीं मजविण ॥ध्रु.॥

कुबेरा अटाहासे जोडी । काय कवडी कारणें ॥२॥

तुका ह्मणे काचमणि । कोण गणी भांडारी ॥३॥

तुज मज नाहीं भेद । केला सहज विनोद ॥१॥

तूं माझा आकार । मी तों तूं च निर्धार ॥ध्रु.॥

मी तुजमाजी देवा । घेसी माझ्या अंगें सेवा ॥२॥

मी तुजमाजी अचळ । मजमाजी तुझें बळ ॥३॥

तूं बोलसी माझ्या मुखें । मी तों तुजमाजी सुखें ॥४॥

तुका ह्मणे देवा । विपरीत ठायीं नांवा ॥५॥

वैराग्याचें भाग्य । संतसंग हा चि लाग ॥१॥

संतकृपेचे हे दीप । करी साधका निष्पाप ॥ध्रु.॥

तो चि देवभक्त । भेदाभेद नाहीं ज्यांत ॥२॥

तुका प्रेमें नाचे गाये । गाणियांत विरोन जाये ॥३॥

जप तप ध्यान न लगे धारणा । विठ्ठलकीर्त्तनामाजी सर्व ॥१॥

राहें माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें ॥ध्रु.॥

कीर्तनसमाधि साधन ते मुद्रा । राहतील थारा धरोनियां ॥२॥

तुका ह्मणे मुक्ति हरिदासांच्या घरीं । वोळगती चारी ॠिद्धसिद्धि ॥३॥

नाहीं तुज कांहीं मागत संपत्ती । आठवण चित्तीं असों द्यावी ॥१॥

सरलिया भोग येईन सेवटीं । पायापें या भेटी अनुसंधानें ॥ध्रु.॥

आतां मजसाटीं याल आकारास । रोकडी हे आस नाहीं देवा ॥२॥

तुका ह्मणे मुखीं असो तुझें नाम । देईल तो श्रम देवो काळ ॥३॥

हितावरी यावें । कोणी बोलिलों या भावें ॥१॥

नव्हे विनोदउत्तर । केले रंजवाया चार ॥ध्रु.॥

केली अटाअटी । अक्षरांची देवासाटीं ॥२॥

तुका ह्मणे खिजों । नका जागा येथें निजों ॥३॥

संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघा जाला नारायण ॥१॥

नाहीं आह्मांसी संबंधु । जरा मरण कांहीं बाधु ॥ध्रु.॥

द्वैताद्वैतभावें। अवघें व्यापियेलें देवें ॥२॥

तुका ह्मणे हरि । आह्मांमाजी क्रीडा करी ॥३॥

नेणे करूं सेवा । पांडुरंगा कृपाळुवा ॥१॥

धांवें बुडतों मी काढीं । सत्ता आपुलिया ओढीं ॥ध्रु.॥

क्रियाकर्महीन । जालों इंिद्रयां अधीन ॥२॥

तुका विनंती करी । वेळोवेळां पाय धरी ॥३॥

जयापासोनि सकळ । महीमंडळ जालें ॥१॥

तो एक पंढरीचा राणा । नये श्रुती अनुमाना ॥ध्रु.॥

विवादती जयासाठीं। जगजेटी तो विठ्ठल ॥२॥

तुका ह्मणे तो आकळ । आहे सकळव्यापक ॥३॥

नाहीं रूप नाहीं नांव । नाहीं ठाव धराया ॥१॥

जेथें जावें तेथें आहे । विठ्ठल मायबहीण ॥ध्रु.॥

नाहीं आकार विकार । चराचर भरलेंसे ॥२॥

नव्हे निर्गुण सगुण । जाणे कोण तयासी ॥३॥

तुका ह्मणे भावाविण । त्याचें मन वोळेना ॥४॥

आहे सकळां वेगळा । खेळे कळा चोरोनि ॥१॥

खांबसुत्राचिये परी । देव दोरी हालवितो ॥ध्रु.॥

आपण राहोनि निराळा । कैसी कळा नाचवी ॥२॥

जेव्हां असुडितो दोरी । भूमीवरी पडे तेव्हां ॥३॥

तुका ह्मणे तो जाणावा । सखा करावा आपुला ॥४॥

आतां पुढें मना । चाली जाली नारायणा ॥१॥

येथें राहिलें राहिलें । कैसें गुंतोनि उगलें ॥ध्रु.॥

भोवतें भोंवनी । आलियांची जाली धणी ॥२॥

तुका ह्मणे रंग रंग । रंगलें पांडुरंगे ॥३॥

आळस पाडी विषयकामीं । शक्ती देइप तुझ्या नामीं ॥१॥

हे चि विनवणी विनवणी । विनविली धरा मनीं ॥ध्रु.॥

आणिक वचना मुकी वाणी । तुमच्या गजाॉ द्यावी गुणीं ॥२॥

तुका ह्मणे पाय डोळां । पाहें एरवी अंधळा ॥३॥

कोण वेची वाणी । आतां क्षुल्लका कारणीं ॥१॥

आतां हें चि काम करूं । विठ्ठल हृदयांत धरूं ॥ध्रु.॥

नेंदाविया वृत्ति। आतां उठों चि बहुती ॥२॥

उपदेश लोकां । करूनी वेडा होतो तुका ॥३॥

मागेन तें एक तुज । देइप विचारोनि मज ॥१॥

नको दुर्जनांचा संग । क्षणक्षणा चित्तभंग ॥ध्रु.॥

जन्म घेईन मी नाना । बहु सोसीन यातना ॥२॥

रंक होईन दीनांचा । घायें देहपात साचा ॥३॥

तुका ह्मणे हें चि आतां । देइप देइप तूं सर्वथा ॥४॥

जाणसी उचित । पांडुरंगा धर्मनीत ॥१॥

तरि म्यां बोलावें तें काई । सरे ऐसें तुझे पायीं ॥ध्रु.॥

पालटती क्षणें । संचितप्रारब्धक्रियमाण ॥२॥

तुका ह्मणे सत्ता । होसी सकळ करिता ॥३॥

तुह्मी कांटाळलां तरी । आह्मां न सोडणें हरी ॥१॥

जावें कवणिया ठाया । सांगा विनवितों पायां ॥ध्रु.॥

केली जिवा साटी । आतां सुखें लागा पाठी ॥२॥

तुका ह्मणे ठाव । न सोडणें हा चि भाव ॥३॥

येउनि संसारीं । मी तों एक जाणें हरी ॥१॥

नेणें आणिक कांहीं धंदा । नित्य ध्यातसें गोविंदा ॥ध्रु.॥

कामक्रोधलोभस्वार्थ। अवघा माझा पंढरिनाथ ॥२॥

तुका ह्मणे एक । धणी विठ्ठल मी सेवक ॥३॥

सर्वपक्षीं हरि साहेसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥१॥

सहजचाली चालतां पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ॥२॥

तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरीं वेदांत वाहे पाणी ॥३॥

काय पुण्य ऐसें आहे मजपाशीं । तांतडी धांवसी पांडुरंगा ॥१॥

काय ऐसा भक्त वांयां गेलों थोर । तूं मज समोर होसी वेगा ॥ध्रु.॥

काय कष्ट माझे देखिली चाकरी । तो तूं झडकरी पाचारिशी ॥२॥

कोण मी नांवाचा थोर गेलों मोटा । अपराधी करंटा नारायणा ॥३॥

तुका ह्मणे नाहीं ठाउकें संचित । येणें जन्महित नाहीं केलें ॥४॥

आमुचिया भावें तुज देवपण । तें कां विसरोन राहिलासी ॥१॥

समर्थासी नाहीं उपकारस्मरण । दिल्या आठवण वांचोनियां ॥ध्रु.॥

चळण वळण सेवकाच्या बळें । निर्गुणाच्यामुळें सांभाळावें ॥२॥

तुका ह्मणे आतां आलों खंडावरी । प्रेम देउनि हरी बुझवावें ॥३॥

आह्मी मेलों तेव्हां देह दिला देवा । आतां करूं सेवा कोणाची ॥१॥

सूत्रधारी जैसा हालवितो कळा । तैसा तो पुतळा नाचे छंदें ॥ध्रु.॥

बोलतसें जैसें बोलवितो देव । मज हा संदेह कासयाचा ॥२॥

पाप पुण्य ज्याचें तो चि जाणें कांहीं । संबंध हा नाहीं आह्मांसवें ॥३॥

तुका ह्मणे तुह्मी आइका हो मात । आह्मी या अतीत देहाहूनी ॥४॥

लागों नेदीं बोल पायां तुझ्या हरी । जीव जावो परि न करीं आण ॥१॥

परनारी मज रखुमाईसमान । वमनाहूनि धन नीच मानीं ॥२॥

तुका ह्मणे याची लाज असे कोणा । सहाकारी दीना ज्याची तया ॥३॥

हे चि भेटी साच रूपाचा आठव । विसावला जीव आवडीपें ॥१॥

सुखाचें भातुकें करावें जतन । सेविल्या ताहान भूक जाय ॥ध्रु.॥

दुरील जवळी आपण चि होतें । कविळलें चित्तें जिवापासीं ॥२॥

तुका ह्मणे नाम घेतों वेळोवेळां । होतील सकळा शीतळा नाडी ॥३॥

आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची ॥१॥

साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ध्रु.॥

काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥२॥

तुका ह्मणे त्याची कोण जाणे कळा । चालवी पांगळा पायांविण ॥३॥

हित सांगे तेणें दिलें जीवदान । घातकी तो जाण मनामागें ॥१॥

बळें हे वारावे अधर्म करितां । अंधळें चालतां आडरानें ॥ध्रु.॥

द्रव्य देऊनियां धाडावें तीर्थासी । नेदावें चोरासी चंद्रबळ ॥२॥

तुका ह्मणे ऐसें आहे हें पुराणीं । नाहीं माझी वाणी पदरींची ॥३॥

ऐसा घेइप कां रे संन्यास । करीं संकल्पाचा नास ॥१॥

मग तूं राहें भलते ठायीं । जनीं वनीं खाटे भोई ॥ध्रु.॥

तोडीं जाणिवेची कळा । होइप वृत्तीसी वेगळा ॥२॥

तुका ह्मणणे नभा । होइप आणुचा ही गाभा ॥३॥

सोळा सहस्र होऊं येतें । भरलें रितें आह्मापें ॥१॥

ऐसे तुह्मां ठायाठाव । देव ह्मुण संपादे ॥ध्रु.॥

कैची चिरामध्यें चिरे। मना बरें आलें तें ॥२॥

तुका ह्मणे पांडुरंगा । अंगलगा भिन्न करा ॥३॥

इहलोकीं आह्मां भूषण अवकळा । भोपळा वाकळा आणि भिक्षा ॥१॥

निमोली संपदा भयविरहित । सर्वकाळ चित्त समाधान ॥ध्रु.॥

छिद्राचा आश्रम उंदीरकुळवाडी । धन नाम जोडी देवाचें तें ॥२॥

तुका ह्मणे एक सेवटीं राहाणें । वर्ततों या जना विरहित ॥३॥

आह्मी भाग्याचे भाग्याचे । आह्मां तांबे भोपऑयाचे ॥१॥

लोकां घरीं गाई ह्मैसी । आह्मां घरीं उंदीरघुसी ॥ध्रु.॥

लोकां घरीं हत्ती घोडे । आह्मां आधोडीचे जोडे ॥२॥

तुका ह्मणे आह्मी सुडके। आह्मां देखोन काळ धाके ॥३॥

गाऊं नेणें कळा कुसरी । कान धरोनि ह्मणें हरी ॥१॥

माझ्या बोबडिया बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ॥ध्रु.॥

मज हंसतील लोक । परि मी गाईन निःशंक ॥२॥

तुझे नामीं मी निर्लज्ज । काय जनासवें काज ॥३॥

तुका ह्मणे माझी विनंती । तुह्मी परिसा कमळापती ॥४॥

विष पोटीं सर्वा । जन भीतें तया दर्पा ॥१॥

पंच भूतें नाहीं भिन्न । गुण दुःख देती शीण ॥ध्रु.॥

चंदन िप्रय वासें । आवडे तें जातीऐसें ॥२॥

तुका ह्मणे दाणा । कुचर मिळों नये अन्ना ॥३॥

देव अवघें प्रतिपादी । वंदी सकळां एक निंदी ॥१॥

तेथें अवघें गेलें वांयां । विष घास एके ठायां ॥ध्रु.॥

सर्वांग कुरवाळी । उपटी एकच रोमावळी ॥२॥

तुका ह्मणे चित्त । नाहीं जयाचें अंकित ॥३॥

मज माझा उपदेश । आणिकां नये याचा रीस ॥१॥

तुह्मी अवघे पांडुरंग । मी च दुष्ट सकळ चांग ॥ध्रु.॥

तुमचा मी शरणागत । कांहीं करा माझें हित ॥२॥

तुका पाय धरी । मी हें माझें दुर करीं ॥३॥

जाणे त्याचें वर्म नेणे त्याचें कर्म । केल्याविण धर्म नेणवती ॥२॥

मैथुनाचें सुख सांगितल्या शून्य । अनुभवाविण कळूं नये ॥२॥

तुका ह्मणे जळो शाब्दिक हें ज्ञान । विठोबाची खूण विरळा जाणे ॥३॥

अभिमानी पांडुरंग । गोवा काशाचा हो मग ॥१॥

अनुसरा लवलाहीं । नका विचार करूं कांहीं ॥ध्रु.॥

कोठें राहतील पापें । जालिया हो अनुतापें ॥२॥

तुका ह्मणे ये चि घडी । उभ्या पाववील थडी ॥३॥

तुझें वर्म हातीं । दिलें सांगोनियां संतीं ॥१॥

मुखीं नाम धरीन कंठीं । अवघा सांटवीन पोटीं ॥ध्रु.॥

नवविधा वेढिन आधीं । सांपडलासी भावसंधी ॥२॥

तुका ह्मणे बिळये गाढे । किळकाळ पायां पडे ॥३॥

माझ्या मना लागो चाळा । पहावया विठ्ठला डोळां ॥१॥

आणीक नाही चाड । न लगे संसार हा गोड ॥ध्रु.॥

तरि च फळ जन्मा आलों । सरता पांडुरंगीं जालों ॥२॥

तुका ह्मणे देवा । देइप चरणांची सेवा ॥३॥

अवघें जेणें पाप नासे । तें हें असे पंढरीसी ॥१॥

गात जागा गात जागा । प्रेम मागा विठ्ठला ॥ध्रु.॥

अवघी सुखाची च राशी । पुंडलिकाशीं वोळली हे ॥२॥

तुका ह्मणे जवळी आलें। उभे ठालें समचरणीं ॥३॥

देह तुझ्या पायीं । ठेवूनि जालों उतराई ॥१॥

आतां माझ्या जीवां । करणें तें करीं देवा ॥ध्रु.॥

बहु अपराधी । मतिमंद हीनबुद्धि ॥२॥

तुका ह्मणे नेणें । भावभक्तीचीं लक्षणें ॥३॥

जन हें सुखाचें दिल्याघेतल्याचें । अंत हें काळींचें नाहीं कोणी ॥१॥

जाल्या हीन शक्ति नाकडोळे गळती । सांडोनि पळती रांडापोरें ॥ध्रु.॥

बाइल ह्मणे खर मरता तरी बरें । नासिलें हें घर थुंकोनियां ॥२॥

तुका ह्मणे माझीं नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वांचूनियां ॥३॥

जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥१॥

मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥

ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥२॥

देखोनि न देखें प्रपंच हा दृष्टी । स्वप्नऴिचया सृष्टि चेविल्या जेवीं ॥२॥

तुका ह्मणे ऐसें जालियावांचून । करणें तें तें सीण वाटतसे ॥४॥

विठ्ठला विठ्ठला । कंठ आळवितां फुटला ॥१॥

कइप कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥

जाल्या येरझारा । जन्मां बहुतांचा फेरा ॥२॥

तुका ह्मणे नष्टा । अबोलण्या तुझ्या चेष्टा ॥३॥

ज्यासी विषयाचें ध्यान । त्यासी कैंचा नारायण ॥१॥

साधु कैंचा पापीयासी । काय चांडाळासी काशी ॥ध्रु.॥

काय पतितासी पिता । काय अधमासी गीता ॥२॥

तुका ह्मणे निरंजनी। शट कैंचा ब्रह्मज्ञानी ॥३॥

वरतें करोनियां तोंड । हाका मारितो प्रचंड ॥१॥

राग आळवितो नाना । गातो काय तें कळेना ॥ध्रु.॥

आशा धरोनि मनीं । कांहीं देईल ह्मणऊनि ॥२॥

पोटा एका साटीं । तुका ह्मणे जाले कष्टी ॥३॥

प्रपंच वोसरो । चित्त तुझे पायीं मुरो ॥१॥

ऐसें करिं गा पांडुरंगा । शुद्ध रंगवावें रंगा ॥ध्रु.॥

पुरे पुरे आतां । नको दुजियाची सत्ता ॥२॥

लटिकें तें फेडा । तुका ह्मणे जाय पीडा ॥३॥

ऐका कलीचें हें फळ । पुढें होइल ब्रह्मगोळ ॥१॥

चारी वर्ण अठरा याती । भोजन करिती एके पंक्ती ॥ध्रु.॥

पूजितीअसुरा रांडा । मद्य प्राशितील पेंढा ॥२॥

वामकवळ मार्जन । जन जाईल अधोपतन ॥३॥

तुका हरिभक्ति करी । शक्ति पाणी वाहे घरीं ॥४॥

गुरुमार्गामुळें भ्रष्ट सर्वकाळ । ह्मणती याती कुळ नाहीं ब्रह्मीं ॥१॥

पवित्राला ह्मणती नको हा कंटक । मानिती आित्मक अनामिका ॥ध्रु.॥

डोहोर होलार दासी बलुती बारा । उपदेशिती फारा रांडापोरा ॥२॥

कांहीं टाण्या टोण्या विप्र शिष्य होती । उघडी फजिती स्वधर्माची ॥३॥

नसता करुनी होम खाती एके ठायीं । ह्मणती पाप नाहीं मोक्ष येणें ॥४॥

इंिद्रयांचे पेठे भला कौल देती । मर्यादा जकाती माफ केली ॥५॥

नाहीं शास्त्राधार पात्रापात्र नेणे । उपदेशून घेणें द्रव्य कांहीं ॥६॥

तुका ह्मणे ऐसे गुरु शिष्य पूर्ण । विठोबाची आण नरका जाती ॥७॥

बोलाचे गौरव । नव्हे माझा हा अनुभव ॥१॥

माझी हरिकथा माउली । नव्हे आणिकांसी पांगिली ॥ध्रु.॥

व्याली वाढविलें। निजपदीं निजवलें ॥२॥

दाटली वो रसें । त्रिभुवन ब्रह्मरसें ॥३॥

विष्णु जोडी कर । माथां रज वंदी हर ॥४॥

तुका ह्मणे बळ । तोरडीं हा किळकाळ ॥५॥

सेवट तो भला । माझा बहु गोड जाला ॥१॥

आलों निजांच्या माहेरा । भेटों रखुमाईच्या वरा ॥ध्रु.॥

परिहार जाला । अवघ्या दुःखाचा मागिल्या ॥२॥

तुका ह्मणे वाणी । गेली आतां घेऊं धणी ॥३॥

तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगीं नाचों था था ॥१॥

तुझ्या नामाचा विश्वास । आह्मां कैंचा गर्भवास ॥ध्रु.॥

तुझे नामीं विसर पडे । तरी कोटी हत्या घडे ॥२॥

नाम घ्या रे कोणी फुका। भावें सांगतसे तुका ॥३॥

बाइल तरी ऐसी व्हावी । नरकीं गोवी अनिवार ॥१॥

घडों नेदी तीर्थयात्रा । केला कुतरा हातसोंका ॥ध्रु.॥

आपुली च करवी सेवा । पुजवी देवासारिखें ॥२॥

तुका ह्मणे गाढव पशु । केला नाशु आयुष्या ॥३॥

बाइले अधीन होय ज्याचें जिणें । तयाच्या अवलोकनें पडिजे द्वाड ॥१॥

कासया ते जंत जिताती संसारीं । माकडाच्या परी गारोड्यांच्या ॥ध्रु.॥

वाइलेच्या मना येईल तें खरें । अभागी तें पुरें बाइलेचें ॥२॥

तुका ह्मणे मेंग्या गाढवाचें जिणें । कुत†याचें खाणें लगबगा ॥३॥

जगीं मान्य केलें हा तुझा देकार । कीं कांहीं विचार आहे पुढें ॥१॥

करितों कवित्व जोडितों अक्षरें । येणें काय पुरें जालें माझें ॥ध्रु.॥

तोंवरि हे माझी न सरे करकर । जो नव्हे विचार तुझ्या मुखें ॥२॥

तुका ह्मणे तुज पुंडलिकाची आण । जरी कांहीं वचन करिसी मज ॥३॥

कोंडिला गे माज । निरोधुनी द्वार । राखण तें बरें । येथें करा कारण ॥१॥

हा गे हा गे हरि । करितां सांपडला चोरी । घाला गांठी धरी । जीवें माय त्रासाया ॥ध्रु.॥

तें चि पुढें आड । तिचा लोभ तिला नाड । लावुनी चरफड । हात गोउनी पळावें ॥२॥

संशयाचें बि†हडें । याचे निरसले भेटी । घेतली ते तुटी । आतां घेतां फावेल ॥३॥

तुका येतो काकुलती । वाउगिया सोड । यासी चि निवाड । आह्मी भार वाहिका ॥४॥

झड मारोनियां बैसलों पंगती । उठवितां फजिती दातयाची ॥१॥

काय तें उचित तुह्मां कां न कळे । कां हो झांका डोळे पांडुरंगा ॥ध्रु.॥

घेईन इच्छेचें मागोनि सकळ । नाहीं नव्हे काळ बोलायाचा ॥२॥

तुका ह्मणे जालों माना अधिकारी । नाहीं लोक परी लाज देवा ॥३॥

नाम न वदे ज्याची वाचा । तो लेंक दो बापांचा ॥१॥

हे चि ओळख तयाची । खूण जाणा अभक्ताची ॥ध्रु.॥

ज्याची विठ्ठल नाहीं ठावा । त्याचा संग न करावा ॥२॥

नाम न म्हणे ज्याचें तोंड । तें चि चर्मकाचें कुंड ॥३॥

तुका ह्मणे त्याचे दिवशीं। रांड गेली महारापाशीं ॥४॥

पतित मी पापी शरण आलों तुज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥१॥

तारियेले भक्त न कळे तुझा अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥ध्रु.॥

द्रौपदी बहिणी वैरीं गांजियेली । आपणाऐसी केली पांडुरंगा ॥२॥

प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार । माझा कां विसर पांडुरंगा ॥३॥

सुदामा ब्राह्मण दारिद्रें पीडिला । आपणाऐसा केला पांडुरंगा ॥४॥

तुका ह्मणे तुज शरण निजभावें । पाप निर्दाळावें पांडुरंगा ॥५॥

कस्तूरीचें रूप अति हीनवर । माजी असे सार मोल तया ॥१॥

आणीक ही तैसीं चंदनाचीं झाडें । परिमळें वाढे मोल तयां ॥ध्रु.॥

काय रूपें असे परीस चांगला । धातु केली मोला वाढ तेणें ॥२॥

फिरंगी आटितां नये बारा रुके । गुणें मोलें विकें सहस्रवरी ॥ ।3॥

तुका ह्मणे नाहीं जातीसवें काम । ज्याचे मुखीं नाम तो चि धन्य ॥४॥

नव्हें मी स्वतंत्र अंगाचा पाईक । जे हे सकिळक सत्ता वारूं ॥१॥

तुह्मां आळवावें पाउला पाउलीं । कृपेची साउली करीं मज ॥ध्रु.॥

शक्तिहीन तरी जालों शरणागत । आपुला वृत्तांत जाणोनियां ॥२॥

तुका ह्मणे भवाभेणें धरिलें पाय । आणीक उपाय नेणें कांहीं ॥३॥

पाहों ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐशी मति अर्थ कळे ॥१॥

होईल तें हो या विठोबाच्या नांवें । आचरलें भावें जीवीं धरूं ॥ध्रु.॥

एखादा अंगासी येईल प्रकार । विचारितां फार युक्ति वाढे ॥२॥

तुका ह्मणे आळी करितां गोमटी । मायबापा पोटीं येते दया ॥३॥

पाहातां रूप डोळां भरें । अंतर नुरे वेगळें । इच्छावशें खेळ मांडी । अवघें सांडी बाहेरी ॥१॥

तो हा नंदानंदन बाइये । यासी काय परिचार वो ॥ध्रु.॥

दिसतो हा नव्हे तैसा । असे दिशाव्यापक । लाघव हा खोळेसाटीं । होतां भेटी परतेना ॥२॥

ह्मणोनि उभी ठालीये । परतलीये या वाटा । आड करोनियां तुका। जो या लोकां दाखवितो ॥३॥

दुःखें दुभागलें हृदयसंपुष्ट । गहिंवरें कंठ दाटताहे ॥१॥

ऐसें काय केलें सुमित्रा सखया । दिलें टाकोनियां वनामाजी ॥ध्रु.॥

आक्रंदती बाळें करुणावचनीं । त्या शोकें मेदिनी फुटों पाहे ॥२॥

काय हे सामर्थ्य नव्हतें तुजपाशीं । संगें न्यावयासी अंगभूतां ॥३॥

तुज ठावें आह्मां कोणी नाहीं सखा । उभयलोकीं तुका तुजविण ॥४॥

कान्हा ह्मणे तुझ्या वियोगें पोरटीं । जालों दे रे भेटी बंधुराया ॥५॥

सख्यत्वासी गेलों करीत सलगी । नेणें चि अभागी महिमा तुझा ॥१॥

पावलों आपुलें केलें लाहें रास । निद।वां परिस काय होय ॥ध्रु.॥

कष्टविलासी म्यां चांडाळें संसारीं । अद्यापिवरि तरि उपदेशीं ॥२॥

उचित अनुचित सांभाळिलें नाहीं । कान्हा ह्मणे कांहीं बोलों आतां ॥३॥

असो आतां कांहीं करोनियां ग्लांती । कोणा काकुलती येइल येथें ॥१॥

करूं कांहीं दिस राहे तों सायास । झोंबों त्या लागास भावाचिये ॥ध्रु.॥

करितां रोदना बापुडें ह्मणती । परि नये अंतीं कामा कोणी ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे पडिलिया वनीं । विचार तो मनीं बोलिला हे ॥३॥

चरफडें चरफड शोकें शोक होये । कार्यमूळ आहे धीरापाशीं ॥१॥

कल्पतसे मज ऐसें हें पाहातां । करावी ते चिंता मिथ्या खोटी ॥ध्रु.॥

न चुके होणार सांडिल्या शूरत्वा । फुकट चि सत्त्वा होइल हानी ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे दिल्या बंद मना । वांचूनि निधाना न पवीजे ॥३॥

न लगे चिंता आतां अन्मोन हाता । आलें मूळ भ्राता गेला त्याचें ॥१॥

घरभेद्या येथें आहे तें सुकानु । धरितों कवळून पाय दोन्ही ॥ध्रु.॥

त्याचें त्याचिया मुखें पडिलें ठावें । न लगे सारावें मागें पुढें ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे करील भेटी भावा । सोडीन तेधवां या विठ्ठला ॥३॥

मूळस्थळ ज्याचें गोमतीचे तीरीं । तो हा सारी दोरी खेळवितो ॥१॥

ऐसें हे कळलें असावें सकळां । चोर त्या वेगळा नाहीं दुजा ॥ध्रु.॥

वैष्णव हे रे तयाचे पाळती । खूण हे निरुती सांगितली ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे आलें अनुभवास । तेणें च आह्मांस नागविलें ॥३॥

बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा । घरबुडवणा भेटलासी ॥१॥

एके घरीं कोणी कोणासी न धरी । ऐसी अपरांपरी केली आह्मां ॥२॥

कान्हा ह्मणे कां रे निःकाम देखिलें । ह्मणोनि मना आलें करितोसी ॥३॥

धिंदधिंद तुझ्या करीन धिंदड्या । ऐसें काय वेड्या जाणितलें ॥१॥

केली तरी बरें मज भेटी भावास । नाहीं तरि नास आरंभिला ॥ध्रु.॥

मरावें मारावें या आलें प्रसंगा । बरें पांडुरंगा कळलेंसावें ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे तुझी माझी उरी । उडाली न धरीं भीड कांहीं ॥३॥

भुक्ति मुक्ति तुझें जळों ब्रह्मज्ञान । दे माझ्या आणोनी भावा वेगीं ॥१॥

रिद्धी सिद्धी मोक्ष ठेवीं गुंडाळून । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥ध्रु.॥

नको आपुलिया नेऊं वैकुंठासी । दे माझ्या भावासी आणुन वेगीं ॥२॥

नको होऊं कांहीं होसील प्रसन्न। दे माझ्या आणून भावा वेगीं ॥३॥

तुकयाबंधु ह्मणे पाहा हो नाहींतरी । हत्या होईल शिरीं पांडुरंगा ॥४॥

मुख्य आहे आह्मां मातेचा पटंगा । तुज पांडुरंगा कोण लेखी ॥१॥

नको लावूं आह्मां सवें तूं तोंवरी । पाहा दूरवरी विचारूनी ॥ध्रु.॥

साहे संतजन केले महाराज । न घडे आतां तुज भेईन मी ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे अहिक्यें ऐक्यता । वाढतें अनंता दुःखें दुःख ॥३॥

नये सोमसरी उपचाराची हरी । करकरेचें करीं काळें तोंड ॥१॥

मागतों इतुकें जोडुनियां कर । ठेउनियां शीर पायांवरी ॥ध्रु.॥

तुह्मां आह्मां एके ठायीं सहवास । येथें द्वैत द्वेष काय बरा ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे बहुतां बहुतां रीती । अनंता विनंती परिसावी हे ॥३॥

लालुचाईसाटीं बळकाविसी भावा । परी मी जाण देवा जिरों नेदीं ॥१॥

असों द्या निश्चय हा मनीं मानसीं । घातली येविशीं दृढ कास ॥ध्रु.॥

मज आहे बळ आळीचें सबळ । फोडीन अंत्राळ हृदय तुझें ॥२॥

करुणारसें तुकयाबंधु ह्मणे भुलवीन । काढूनि घेईन निज वस्तु ॥३॥

तुझीं वर्में आह्मां ठावीं नारायणा । परी तूं शाहाणा होत नाहीं ॥१॥

मग कालाबुली हाका देते वेळे । होतोसि परी डोळे नुघडिसी ॥ध्रु.॥

जाणोनि अज्ञान करावें मोहरें । खोटी खोडी हे रे तुझी देवा ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे कारण प्रचीति । पाहातों वेळ किती तेच गुण ॥३॥

अवघीं तुज बाळें सारिखीं नाहीं तें । नवल वाटतें पांडुरंगा ॥१॥

ह्मणतां लाज नाहीं सकळांची माउली । जवळी धरिलीं एकें दुरी ॥ध्रु.॥

एकां सुख द्यावें घेऊनि वोसंगा । एक दारीं गळा श्रमविती ॥२॥

एकां नवनीत पाजावें दाटून । एकें अन्न अन्नें करितील ॥३॥

एकें वाटतील न वजावीं दुरी । एकांचा मत्सर जवळी येतां ॥४॥

तुकयाबंधु ह्मणे नावडतीं त्यांस । कासया व्यालास नारायणा ॥५॥

निनांवा हें तुला । नांव साजे रे विठ्ठला ।

बरा शिरविला । फाटक्यामध्यें पाव ॥१॥

कांहीं तरी विचारिलें । पाप पुण्य ऐसें केलें ।

भुरळें घातलें । एकाएकीं भावासी ॥ध्रु.॥

मुद्राधारणें माळ माळा टिळे । बोल रसाळ कोंवळे ।

हातीं फांशाचे गुंडाळे । कोण चाळे गृहस्था हे ॥2 ॥

तुकयाबंधु ह्मणे मिस्किन । करितोसी देखोन ।

पाहा दुरिवरी विच्छिन्न । केला परी संसार ॥३॥

नाहीं घटिका ह्मणसी । लाग लागला तुजपाशीं ।

पडिला हृषीकेशी । जाब सकळ करणें ॥१॥

माझें नेलें पांघरुण । ठावें असोन दुर्बळ दीन ।

माणसांमधून । उठविलें खाणो†या ॥ध्रु.॥

आह्मीं हें जगऊनि होतों पाणी । संदीं देवदेव करूनि ।

जालासी कोठोनि । पैदा चोरा देहाच्या ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे केलें। उघडें मजचि उमगिलें ।

ऐसें काय गेलें । होतें तुज न पुरतें ॥३॥

कनवाळ कृपाळ । उदार दयाळ मायाळ । ह्मणवितोसी परि केवळ । गळेकाटू दिसतोसी ॥१॥

काय केलें होतें आह्मीं । सांग तुझें एकये जन्मीं । जालासी जो स्वामी । एवढी सत्ता करावया ॥ध्रु.॥

भलेपणाचा पवाडा । बरा दाविला रोकडा । करूनि बंधु वेडा । जोडा माझा विखंडिला ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे भला । कैसें ह्मणताती तुजला । जीव आमुचा नेला । अंत पाहिला कांहींतरी ॥३॥

आतां कळों आले गुण । अवघे चि यावरोन । चोखट लक्षण । धरिलें हें घरघेणें ॥१॥

या नांवें कृपासिंधु । ह्मणवितोसी दीनबंधु । मज तरी मैंदु । दिसतोसी पाहातां ॥ध्रु.॥

अमळ दया नाहीं पोटीं । कठीण तैसाचि कपटी । अंधऑयाची काठी । माझी गुदरसी च ना ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे पुरता । नाहीं ह्मुण बरें अनंता। एरवीं असतां । तुझा घोंट भरियेला ॥३॥

काय सांगों हृषीकेशा । आहे अनुताप आला ऐसा । गिळावासी निमिषा । निमिष लागों नेदावें ॥१॥

माझें बुडविलें घर। लेंकरें बाळें दारोदार । लाविलीं काहार । तारातीर करोनि ॥ध्रु.॥

जीव घ्यावा कीं द्यावा । तुझा आपुला केशवा । इतुकें उरलें आहे। भावाचिया निमित्यें ॥२॥

तुकयाबंधु ह्मणें जग । बरें वाईट ह्मणो मग । या कारणें परी लाग । न संडावा सर्वथा ॥३॥

मायबाप निमाल्यावरी । घातलें भावाचे आभारीं । तो ही परि हरी । तुज जाला असमाई ॥१॥

हे कां भक्तिचे उपकार। नांदतें विध्वंसिलें घर । प्रसन्नता वेव्हार । सेवटीं हे जालासी ॥ध्रु.॥

एका जिवावरी । होतों दोनी कुटुंबारी । चाळवूं तो तरीं । तुज येतो निर्लज्जा ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे भला । आणीक काय ह्मणावें तुला । वेडा त्यानें केला । तुजसवें संबंधु ॥३॥

पूवाअ पूर्वजांची गती । हे चि आईिकली होती । सेवे लावूनि श्रीपती । नििंश्चती केली तयांची ॥१॥

कां रे पाठी लागलासी। ऐसा सांग हृषीकेशी । अद्यापवरी न राहासी । अंत पाहासी किती ह्मुण ॥ध्रु.॥

जन्मजन्मांतरीं दावा । आह्मां आपणां केशवा । निमित्य चालवा । काईसयास्तव हें ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे अदेखणा । किती होसी नारायणा । देखों सकवेना । खातयासी न खात्या ॥३॥

निसुर संसार करून । होतों पोट भरून । केली विवसी निर्माण । देवपण दाखविलें ॥१॥

ऐसा काढियेला निस । काय ह्मुण सहित वंश । आणिलें शेवटास । हाउस तरी न पुरे ॥ध्रु.॥

उरलों पालव्या सेवटीं । तें ही न देखवे दृष्टी । दोघांमध्ये तुटी । रोकडीचि पाडीली ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे गोड । बहु जालें अति वाड । ह्मणोनी कां बुड । मुऑयांसहित खावें ॥३॥

बरा जाणतोसी धर्मनीती । उचित अनुचित श्रीपती। करूं येते राती । ऐसी डोळे झांकूनि ॥१॥

आतां जाब काय कैसा। देसी तो दे जगदीशा । आणिला वोळसा । आपणां भोंवता ॥ध्रु.॥

सेवेचिया सुखास्तव । बळें धरिलें अज्ञानत्व । येइल परि हा भाव। ज्याचा त्यासी कारणा ॥२॥

तुकयाबंधु ह्मणे नाहीं । आतां आह्मां बोल कांहीं । जडोनियां पायीं । तुझे त्वां चि घेतलें ॥३॥

Not in the Wikisource transcription: 2701, 2824.

Text: तुकाराम गाथा on Marathi Wikisource, which does not name the printed edition it was transcribed from. The verses are public domain; the transcription is by Wikisource contributors, CC BY-SA 4.0. Its systematic legacy-font errors are repaired by rule (see the reading page for details); some remain — इप printed for ई in about 220 abhangas, and a few vowel signs on the wrong letter. Numbering follows Wikisource; printed editions differ. Spotted a wrong line? Write to us with the number.

If you need to talk to someone now: Tele-MANAS 14416 (free, 24×7) · Vandrevala +91 99996 66555 (24×7, call or WhatsApp) · AASRA 022 2754 6669 (24×7) · iCall 9152 987 821 (Mon–Sat, 8am–9pm) · Emergency 112